साधारणतः दोन हजार वर्षांपूर्वी ,एक ईश्वरनिष्ठ वृद्ध व्यक्ती " जकारिया" अ. हे जेरुसलेम या शहरात राहत होते. ते इस्राइल (याकूब अ.) वंशजाच्या कुटुंबातून होते. आणि सुलेमान अ. चा एक वंश होते. ते प्रार्थना स्थळाच्या जागेची देखभाल करायचे आणि धार्मिक आणि पारंपरिक समारंभ करायचे. जेरुसलेम चे लोक त्यांचा खूप आदर करायचे. त्याच्या उदरनिर्वाहासाठी ते सुतारकाम करायचे आणि लाकडापासून सुंदर वस्तू बनवायचे.
जकरीया अ. लहान मुलांवर खूप प्रेम
करायचे पण त्यांना स्वतःचे मूल नव्हते.
सतत जेव्हा ते दुसऱ्या मुलांना खेळतांना पहायचे, त्यांना वाटायचे की, त्यांनाही त्यांचा स्वतःचा एक पुत्र असावा. पण ते अल्लाह (एक ईश्वर) ला घाबरणारे वृद्ध व्यक्ती होते, त्यांनी तक्रार केली नाही आणि शांत राहिले.
जकरीया अ. च्या पत्नीला एक बहीण होती. "हन्ना". जिचे लग्न इमरान शी झाले होते. इमरान हा त्याच जमातीतील म्हणजे इस्राइल च्या वंशजातील कुटुंबातून होता.
हन्ना आणि इमरान यांनाही मूल नव्हते. त्यांनी अल्लाह (ईश्वर) ला, त्यांना एक मूल देण्यासाठी प्रार्थना केली आणि वचन दिले की, जर त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर मिळाले, तर ते त्या मुलाला अल्लाह (ईश्वर) ची सेवा करण्यासाठी समर्पित करतील आणि त्याला प्रार्थनास्थळामध्येच, यासाठी ठेवतील.
अल्लाह (ईश्वर) ने त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर दिले आणि त्यांना एक सुंदर छोटीसी कन्या दिली. त्यांनी तिचे नाव मरियम ठेवले आणि त्यांनी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी , त्या कृतज्ञ पालकांनी, त्यांच्या छोट्या मुलीला प्रार्थना स्थळात सोडण्यासाठी, जे जेरुसलेम मध्ये होते, तेथे घेऊन आले.
पण एक नवजात मूल, त्याच्या आईवडिलांपासून दूर, कोणीही पालनकर्ता नसल्यास, एकटे जीवन कसे जगेल? त्यामुळे तेेेेेथील लोकांनी, त्या मुलीसाठी एक पालनकर्ता असावा, असा निर्णय घेतला. सर्वात योग्य व्यक्ती जकरिया अ. होते. कारण ते मरियम चे नात्याने काका ही होते,
जे जेरुसलेम च्या प्रार्थनास्थळा च्या अगदी
समोर राहत होते आणि प्रार्थनास्थळाची देखभाल करत होते आणि ते स्वतः एक धार्मिक वृद्ध व्यक्ती होते. ते मरियम ला, तिच्या धार्मिक संगोपनात मार्गदर्शन ही करू शकत होते.
त्यांची पत्नी मरियम ची मावशी होती. तरीही तेथे खूप लोक होते, जे ही चांगली जबाबदारी घेण्यास इच्छुक होते. ते ह्या बाळाचे संगोपन करण्यासाठी इतके उत्सुक होते की, त्यावरून ते भांडले देखील. शेवटी एक उपाय सापडला. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. जकरिया अ. च्याच नावाची चिठ्ठी निघाली. (अल्लाह ची म्हणजेच ईश्वराची हीच इच्छा होती.)
अशाप्रकारे समस्या निवारण झाले आणि जकरिया अ. ला "मरियम" या लहान बाळाच्या चा पालनकर्ता बनविण्यात आले.
तिच्या काकांच्या आणि मावशीच्या मार्गदर्शनाखाली मरियम जगत होती, प्रार्थना करत होती आणि प्रार्थनास्थळीे वाढत होती. ती एक खूप सदाचारी (ईश्वर निष्ठ) मुलगी होती आणि अल्लाह ची भक्ती करण्यात तिचा जास्तीत जास्त वेळ घालवत होती.
जशी ती मोठी झाली, जकरिया अ. यांना तिच्यासाठी एक वेगळी खोली मिळाली, जिथे ती एकनिष्ठतेने आणि एकाग्रतेने प्रार्थना करू शकत होती.
काही वेळेस जेव्हा ते, मरियमकडे, तिला कशाची
आवश्यकता आहे का?, हे विचारण्यासाठी जायचे, तिच्याकडे ताजी फळे आणि रुचकर अन्न तिच्यासमोर असलेले पाहून चकित व्हायचे. "तू हे कोठून मिळवते, मरियम?" जकारिया विचारायचे. ती साधेपणाने आणि निरागसतेने उत्तर द्यायची,
"अल्लाह कडून. तो ज्याला इच्छितो, त्याला देतो, न मोजता."
जकरिया अ. यांना माहीत होते, मरियम किती ईश्वरनिष्ठ , खरी आणि निर्मळ होती, त्यामुळे ती जे म्हणत आहे, त्यावर शंका करण्याचे काहीच कारण नव्हते.
यामुळे त्यांचा अल्लाह (ईश्वर) वरील विश्वास अजून कणखर झाला आणि त्यांना अल्लाह (ईश्वर) ला,
जी खूप खूप दिवसांपासून त्यांच्या मनात ते इच्छा करत होते, त्याविषयी मागण्यासाठी त्यांना धैर्य मिळाले.
जर "अल्लाह त्याची कृपा, तो ज्यावर इच्छितो त्यावर करतो,"
तर ते, निश्चितपणे त्यांना एक पुत्र होण्यासाठी प्रार्थना करू शकतात, असा त्यांनी अल्लाहवर विश्वास ठेवून, मनाशीच विचार केला. म्हणून जकरिया अ. यांनी अल्लाह (ईश्वर) ला प्रार्थना करून, त्यांना एक ईश्वरनिष्ठ मूल व्हावे, असे प्रार्थनेत मागितले, जो त्यांचे काम पुढे चालू ठेवेल.
"हे माझ्या अल्लाह (ईश्वरा), मला एकटा सोडू नको. तुझा आधार खूप चांगला आहे." त्यांनी प्रार्थना केली.
"मला एक सद्गुणी मुलगा दे, काहीच शंका नाही, की तू आमच्या प्रार्थना ऐकतोस."
अल्लाह ने त्यांची प्रार्थना ऐकली आणि एक संदेश त्यांच्याकडे पाठवला की, "त्यांना एक पुत्र होईल,
ज्याला ते "यहया" या नावाने बोलावतील. जकरिया अ. या बातमीवर खूप आनंदी झाले. त्यांनी आभार मानण्यासाठी वाकून नमन केले. पण विचार केला की, एक मुलगा होणे, हे कसे शक्य आहे, कारण ते आणि त्याची पत्नी खूप वृद्ध आहेत.
"तू जेव्हा काहीही नव्हता, तेव्हा मी तुला निर्माण केले नाही का?" अल्लाह (ईश्वर) ने म्हंटले. "ते माझ्यासाठी अशक्य नाही."
"माझ्या अल्लाह, मला कसे कळेल की केव्हा?" जकरिया अ. यांनी विचारले. "तू तीन दिवसांसाठी बोलू शकणार नाहीस", अल्लाह (ईश्वर) ने म्हटले.
आणि खरच एक दिवस जकरिया अ. ला आढळले, की ते काहीच बोलू शकत नाहीत.
ते खूप आनंदी झाले, कारण ही त्यांच्यासाठी चांगली बातमी होती. लवकरच त्यांना एक मुलगा झाला, ज्याचे नाव त्यांनी "यहया" ठेवले, जसे अल्लाहने म्हंटले होते. "यहया" हा ही मोठा होऊन एक खूप ईश्वरनिष्ठ व्यक्ती बनला आणि अल्लाह चा एक संदेशकर्ता बनला.
🌹🌹🌹सबा ची राणी 🌹🌹🌹 एक दिवस जेव्हा राजा सुलेमान ने दरबार भरवला होता, त्याच्या लक्षात आले की, हूदहूद( हुपू; hoopoe) गायब होता. तो त्याच्या अनुपस्थितीने नाराज झाला आणि म्हणाला," हुदहुद कोठे आहे? मला तो तुमच्यामध्ये दिसत नाही. जर अनुपस्थित राहण्याचे एक चांगले कारण नसेल तर, मी त्याला नक्कीच शिक्षा करेन." तो असे म्हणत असतानाच, हुदहुद उडत आत आला आणि विलंब झाल्याने दिलगिरी व्यक्त केली. " मी एका शक्तीशाली राज्य "सबा" बातमी आणली आहे. त्या राज्यावर एक राणी राज्य करते , जी एका उत्कृष्ट सिंहासनावर विराजमान होते. सबा येथील लोक, खऱ्या अल्लाहची उपासना सोडून, सूर्याची उपासना करतात." त्याने राजाला सांगितले.
"तू आमच्याशी खरे बोलत आहे का, हे आम्ही लवकरच माहीत करू," सुलेमान म्हंटला." हे घे, हे पत्र घेऊन सबा ला जा, तेथे ते पोहोचव आणि मग काय घडते ते पाहायची वाट पाहा. हुदहुद ने सुलेमानचे पत्र घेतले आणि सबा ला जाण्यासाठी निघाला. तेथे त्याने राणीच्या समोर ते टाकले आणि शांतपणे काय घडते , ते पाहण्याची वाट पाहू लागला.
राणीने जेव्हा ते पत्र वाचले, तिच्या सल्लागाराला काय करावे असे विचारले. "येथे राजा सुलेमान कडून एक पत्र आहे. अल्लाहचा योग्य सन्मान करून आणि अल्लाहच्या नावाने सुरू केलेले आहे. त्याने अल्लाह सत्यनिष्ठेला विरोध न करता, मला समर्पण करण्यासाठी त्याच्याकडे बोलावले आहे." मग राणीने थोडा वेळ विचार केला.आणि सुलेमानसाठी काही मौल्यवान भेटवस्तू पाठविण्याचा निर्णय घेतला.
पण सुलेमान काही साधारण राजा नव्हता. तो अल्लाहचा संदेश कर्ता (प्रेषित) होता. तो क्रोधित झाला, जेव्हा त्याने पाहिले की राणीने त्याच्या संदेशाचा कसा अर्थ लावला. त्याने तिच्या संदेश देणाऱ्याला भेटवस्तू सहित वापस पाठविले आणि त्याला म्हंटले की, "राणीला सांग की, जर त्याच्या अल्लाहच्या सत्य निष्ठेकडे बोलवण्याचे उत्तर भेटवस्तू असेल, तर तो सबाला सैन्यासह येईन."
आता राणी खरच घाबरली आणि तिने तत्काळ स्वतः सुलेमानकडे जाण्याचा निर्णय घेतला.जेव्हा सुलेमानला तिच्या येण्याचा हेतू कळला, त्याने त्याच्या दरबाऱ्यांना विचारले, "येथे कोणी आहे का, जो तिचे सिंहासन, ती इथे येण्याआधी आणू शकेल ." एका जिन्नने उत्तर दिले की, "डोळ्यांची पापणी लवण्याआधी तो ते आणू शकेल." सिंहासन आणण्याचा आदेश देण्यात आला. जेव्हा तो आणला गेला, सुलेमानने त्याच्यात थोडा बदल केला. जेव्हा राणी आली, तिला तो सिंहासन दाखविण्यात आला आणि विचारले," हे तुझे सिंहासन आहे का?" तिने लगेच त्या सिंहासनाला ओळखले, कारण ती खरोखर बुद्धिमान होती, पण तिने तिचे आश्चर्य लपविले आणि म्हणाली," हे तसेच दिसत आहे". सुलेमानने तिला त्यानंतर एका सुंदर राजवाड्यात नेले, ज्याची फरशी चकाकणारी होती.तिने फरशीवर पाय ठेवण्यासाठी तिचा घागरा वर उचलला. कारण तिला वाटले की ते पाण्याचे तळे आहे. पण ती खरंच राजवाड्याची फरशी होती ज्याची पारदर्शक ( विशेष मौल्यवान काचेने) फरस बंदी केली होती. (आच्छादली होती.) अशी त्या राजवाड्याची भव्यता होती. जे अल्लाहने सुलेमानला बहाल केले होते, त्याने ती राणी इतकी प्रभावित झाली की ती अल्लाहच्या सत्यनिष्ठेला शरण गेली. " मी स्वतःशी चूक केली आहे. आता सुलेमानसह मी या जगाच्या प्रभुला शरण जात आहे." अशाप्रकारे सुलेमान त्या सुंदर राणीला अल्लाहची शक्ती पटविण्यास सक्षम झाला.
सुलेमानच्या पायाशी सर्व मौल्यवान सांसारिक (ऐहिक) खजिने होते. तरीही त्याची अल्लाहची श्रध्दा कमकुवत झाली नाही. तो नेहमी इतके जास्त देण्यासाठी अल्लाहला आभार मानत राहिला आणि गर्विष्ठ झाला नाही.
जेव्हा एकदा सुलेमान एका उत्कृष्ट मशिदीच्या बांधकामाची देखरेख करत होता. त्याच्यासाठी मृत्यूची वेळ आली. जेव्हा त्याला याची जाणीव झाली की, तो मरणार आहे, तो उरलेल्या बांधकामाच्या देखरेखी विषयी चिंताग्रस्त झाला. त्याला भीती होती की अडेल ( बेलगाम , ताब्यात न राहणारे) जिन्न अर्धवट काम सोडून, मोकळे सुटतील. अल्लाहने याची काळजी घेतली. त्याच्या मृत्यूनंतर , जेव्हा बांधकाम पूर्ण केले जात होते, सुलेमान त्याच्या चालण्याच्या काठीचा आधार घेऊन उभा राहिला. जेव्हा किड्यांनी आतून काठी पोखरून खाल्ली आणि तो कोसळला, फक्त तेव्हाच सुलेमानच्या मृत्यूचे गुपित जिन्नांसमोर प्रकट झाले. जिन्नांनी ते सर्व , अल्लाहचे रहस्य न समजण्यालायक असल्यामुळे त्यांनी एकमेकांना शाप दिला. " जर आम्हाला याविषयी आधीच माहीत असते तर आम्ही या परिश्रमापासून खूप लवकर सुटका करून घेतली असती." ते म्हणाले.
लूत अ. हे इब्राहीम अ. च्याच भावाचे पुत्र म्हणजेच त्यांचे पुतणे होते…जेव्हा इब्राहीम अ. यांनी त्यांचा देश सोडला, तेव्हा लूत अ. ही त्यांच्या बरोबर होते.. लूत अ. खूप सद्गुणी असे अल्लाहचे संदेशवाहक होते…
त्यांचा देश सोडल्यानंतर, इब्राहीम अ. हे आधी जेरुसलेमला गेले आणि अल्लाहकडून लूत अ. यांना सदोम या ठिकाणी, जे जॉर्डनच्या पूर्वेत आहे, पाठविण्यात आले. तेथे राहणाऱ्या पापी आणि वाईट लोकांना, अल्लाहच्या संदेशाची शिकवण देण्यासाठी त्यांना पाठविण्यात आले होते.
हे लोक प्रत्येक व्यवसायी, जो त्यांच्या रस्त्यात येत होता, त्याला लुटत होते…त्यांना न्याय काय असतो याचे ज्ञान नव्हते…
एक दिवस एक प्रवासी, त्याची अमानत म्हणजे त्याची कमावलेली संपत्ती… घेऊन जात होता… एका माणसाने त्याच्या कपाळाला एक दगड मारला…आणि त्याला पकडून म्हंटले, "माझ्या दगडाने तुला लागले आहे…तुला जे घडले याची भरपाई द्यावी लागेल"...
प्रवासी खूप रागावला आणि म्हणाला, "तू मूर्ख आहेस का? तू कशाविषयी बोलत आहे…तू मला मारले..तू मारेकरी आहेस…तुला मला भरपाई दिली पाहिजे…"
ते दरबारात गेले…पण न्यायाधीशाने त्या मारेकऱ्याच्या कडून निर्णय दिला, ज्याने प्रवाश्याला मारले होते आणि म्हणाला, "हो, हा बरोबर आहे…याच्या दगडाने तुला मारले… आता तुला याची भरपाई करावी लागेल…"
या अन्यायावर , प्रवासी इतका नाराज झाला की, त्याने एक दगड उचलला आणि न्यायाधीशाच्या डोक्याला मारला…
"बरं.." तो मारल्यानंतर म्हणाला, "आता तुला मला भरपाई द्यावी लागेल. ज्याला तू मला भरपाई द्यायला सांगितली होती, त्याला तू ही भरपाई देऊ शकतो."...
लूत अ. यांनी, या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला की, ते पापाने भरलेले जीवन जगत आहेत. ..पण त्यांनी त्यांची थट्टा उडविली…ते म्हणाले की, "जर तू इतका चांगला आहेस, तर तू आमच्यासोबत राहू शकत नाही…येथून चालला जा…आम्ही तुझ्यासारखे का होऊ?"
लूत अ. दुःखी झाले..त्यांनी त्यांच्याकडून अल्लाहचा संदेश देण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता…पण त्या लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही…
एक दिवस तीन स्वर्ग दूत (फरिश्ते), जे खूप देखणे तरुण दिसत होते.. लूत अ. यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबाकडे आले. ते म्हणाले, "तुम्ही अनोळखी दिसत आहात…कोण आहात तुम्ही?"
स्वर्ग दूत त्यांना म्हणाले की, ते अल्लाहकडून पाठविण्यात आलेले फरिश्ते आहेत. जे त्या लोकांना, जे ऐकत नाहीत त्यांना शिक्षा देण्यासाठी आले आहेत.
त्यांनी सांगितले की, "पूर्ण शहर नष्ट होणार आहे…" आणि त्यांनी लूत अ.यांना सांगितले की, "तुमच्या कुटुंबाला घेऊन, रात्रीच्या शांततेत हे शहर सोडून जा. कोणीच मागे पाहू नका…तुम्हाला सूर्योदय होण्याच्या आधी, जो प्रकाश दिसतो. म्हणजेच पहाट…त्याआधी ही जागा सोडायची आहे…"
जेव्हा ते बोलत होते, तेव्हा शहरातील सगळे वाईट लोक आले आणि त्यांनी देखण्या तरुणांना पाहिले, "यांना आम्हाला दे", ते म्हणाले…
"हे तुझे पाहुणे आहेत…नाही का?" "आम्ही तुला म्हटले नव्हते का की, कुणी पाहुणे येऊ देऊ नको… आता त्यांना आमच्या हवाले कर…आम्हाला त्यांच्यासोबत हवे ते करण्यासाठी…"
लूत अ. यांनी त्यांना विनवणी केली, "इतके क्रूर होऊ नका. त्यांच्या पाहुण्यांसमोर इतका वाईट व्यवहार करू नका"…
पण त्यांनी ऐकले नाही आणि जोर देत राहिले…
ते तरुण मुले…निश्चितच अल्लाहचे फरिश्ते होते…आणि त्यांना कुणीच काही करू शकत नव्हते…ते लूत अ. यांना म्हणाले, "आमची काळजी करू नको आणि शांततेने हे शहर सोडून जा"...
त्यामुळे लूत अ. यांनी, ते शहर, रात्रीच्या अंधारात, त्याच्या कुटुंबीयासोबत सोडले…पण त्यांच्या पत्नीला सदोमच्या लोकांवर दया आली. तिने अल्लाहची आज्ञा मानली नाही. तिने जातांना मागे वळून पाहिले आणि ती, जे मागे राहीले आणि ज्यांना शिक्षा मिळाली, त्यांच्यामध्ये ती ही होती…ती दगडाची झाली…
पहाटे एक खूप भयानक आवाजाने त्या लोकांना पकडले...एक जोरदार कडक आणि भाजलेल्या दगडांचा फवारा होता… पूर्ण शहर, तेथे राहणाऱ्या लोकांसहीत आणि त्याजमिनीत उगवलेल्या प्रत्येकासहीत उध्वस्त झाले…
आज इतक्या हजारो वर्षानंतर त्या शहराचा उध्वस्त ढिगारा.. मृत समुद्राच्या जवळ दिसतो…ज्या मृत समुद्रात कुणीही जिवंत राहू शकत नाही…काही लोक विश्वास करतात की, हे ढिगारे आणि समुद्र याची आठवण करून देतात की, अल्लाहचा शाप ज्यामुळे सदोमचे आज्ञा न पाळणारे लोक, नष्ट झाले…तो किती वेदनादायी आहे…
🐳माशाच्या पोटात 🐳 युनूस हा एक ईश्वरनिष्ठ तरुण होता.जो "निनेवेह" ( सध्याच्या "मोसुल" च्या बाहेरील भागात असणारे एक प्राचीन शहर , इराक) येथे राहत होता. या ठिकाणचे लोक एकाच खऱ्या अल्लाहवर (ईश्र्वरावर) विश्वास ठेवत नव्हते. त्यामुळे अल्लाहने त्या लोकांसाठी युनुसला त्याचा संदेशकर्ता म्हणून निवडला. युनूसने अल्लाहच्या संदेशाचा उपदेश त्या लोकांना दिला. पण त्या लोकांनी त्यांच्या पद्धतीने अविचारीपने त्याचा उपदेश लक्षपूर्वक ऐकला, आणि जेव्हा तो म्हणाला एकच अल्लाह (ईश्वर, पालन कर्ता) आणि तो, अल्लाहचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे, त्यांनी त्याची थट्टा केली. युनूस ने त्यांना विनवणी केली, अल्लाहच्या क्रोधाविषयी आणि दंडाविषयी (शिक्षा) चेतावणी दिली. पण काहीच अर्थ नव्हता. ते त्याला पाहून अजून हसले आणि विश्वास केला नाही. यामुळे युनूसची त्यांच्याकडून निराशा झाली. त्याने रागावून आणि अल्लाहच्या शिक्षेबद्दल चेतावणी देत, अल्लाहचा आदेश येण्याची वाट न पाहताच निनेवेह च्या लोकांना सोडले. यावर निनेवेह च्या लोकांना काहितरी गंभीरपने चूक झाली आहे, याची जाणीव झाली.त्यांना त्यानंतर भीती वाटली आणि वाटले की, युनूस हा अल्लाहचा खरा संदेशकर्ता होता. त्याला त्रास देऊन, त्यांनी अल्लाहला नाराज केले आहे. आणि आता अल्लाहची दिलेली शिक्षा नक्कीच त्यांना नष्ट करू शकते..ज्या क्षणी त्यांना याची जाणीव झाली, ते पश्र्चाताप करण्यासाठी खुल्या जागेत आले, वाकून आणि अल्लाहकडे याचना करत, नमन करू लागले. त्यांनी क्षमा याचना केली आणि सत्य निष्ठा स्वीकार केली. त्यांनी इतक्या प्रामाणिकपणेे क्षमा मागितली की, अल्लाहने त्यांना क्षमा केली आणि त्यांच्यावर ती शिक्षा (दंड, आपदा) केली नाही, जी युनूस त्यांना चेतावणी देऊन गेला होता.
या काळात, युनूस ने त्याच्या लोकांना आणि निनेवेह ला रागात सोडल्यानंतर , तो दूर जावून, एका नौकावर चढला जी, त्या क्षणी समुद्रात प्रवासासाठी निघणार होती. ती नौका, जी लोकांनी भरली होती समुद्रात निघाली, पण रस्त्यात, एक वादळ नौकेवर आदळले आणि नौका लहरींवर हेलकावे देऊ लागली.
त्याकाळी असे मानले जायचे की, जर एखादा पळपुटा गुलाम ( विकत घेतलेला नोकर, जशी त्या काळी माणसांना विकत घेऊन काम करवून घेण्यासाठी, "गुलाम" बनविण्याची पद्धत होती.), नौकेवर किंवा जहाजावर चढला तर, ते जहाज किंवा बोट बुडते.
या कारणामुळे लोकांनी संशय केला की, या बोटीवर, एक पळून आलेला गुलाम आहे. तो कोण आहे हे माहीत करण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकून, ज्या माणसाचे नाव येईल त्याला, नावेच्या बाहेर समुद्रात फेकण्याचा निर्णय घेतला..जेव्हा सगळ्या चिठ्ठ्यामधून, एका नावाची चिठ्ठी उचलण्यात आली, ते युनूसचे नाव होते. कोणीच युनूसवर विश्वास करण्यास तयार नव्हता की, युनूस पळून आलेला गुलाम नाहीं, कारण तो इतका सभ्य आणि धार्मिक वाटत होता. तीन वेळा चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि प्रत्येक वेळेस युनूसचे नाव आले. आता युनूसला खात्री झाली की, त्याने अल्लाहचा आदेश येईपर्यंत वाट पाहिली नाही आणि रागात निनेवेह आणि त्याच्या लोकांना सोडून, अल्लाहला नाराज केले आहे.
"हो, मी पळून आलेला गुलाम आहे" तो म्हणाला, मी माझ्या प्रभू आणि मालकाला (ईश्वराला) सोडून पळालो, जर तुम्हाला पुढे सुरक्षित जायचे आहे तर, मला नौकेच्या बाहेर फेका."
खूप अनिच्छिने नावेच्या लोकांनी, जे सांगण्यात आले ते केले आणि त्यांचा पुढचा प्रवास चालू ठेवला. जसा युनूस खोल पाण्यात पडला, एक मोठा मासा पोहत आला आणि त्या मास्याने त्याला गिळले. युनूसने स्वतःला मास्याच्या पोटात पाहिले, जेथे अंधकार आणि खूप जास्त खोली होती. तो भयभीत आणि असहाय्य होता. जेव्हा मासा पोहायचा, युनूस आतल्या आत फेकला जायचा आणि त्याला खूप अस्वस्थ वाटायचे आणि भिती वाटायची. तो पुन्हा कधी दिवसाचा प्रकाश पाहू शकेन का? किंवा तो अशा दयनीय पिंजऱ्यात मरून जाईल का? त्याला असे विचार यायचे. त्याने निनेवेहच्या लोकांना का सोडले? त्याने त्याच्या चुकीचा पश्र्चाताप केला आणि अल्लाहकडे क्षमा याचना केली. त्याने त्याच्या मालकाला (अल्लाहला) दया करण्याची विनंती केली.आणि या दुःखातून मुक्त करण्यास प्रार्थना केली. "हे अल्लाह, तुझ्या शिवाय कुणीच अल्लाह (ईश्वर) नाही. फक्त तूच आहेस. सगळा गौरव तुझाच आहे. मी खरंच चूक होतो." तो म्हणाला. त्याचा पश्र्चाताप पाहून अल्लाहने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याच्यावर दया केली. मासा पोहत वर किनाऱ्यावर आला आणि युनूसला बाहेर रेतीवर फेकले. जेथे तो पडला, अस्वस्थ, खूप अशक्त आणि असहाय्य होता, जसा नवीन जन्म झालेला बालक असतो. एक वेल त्याच्या जवळ वाढला आणि त्याला सावली दिली, जोपर्यंत त्याला इतके बळ येत नाही, की तो उठेन आणि त्याच्या लोकांपर्यंत जाईल तोपर्यंत. आतापर्यंत त्याच्या लोकांनी प्रत्येक ठिकाणी त्याचा शोध घेतला होता. आणि ते त्याला पाहून खूप आनंदित झाले. त्याला कळले की, त्यांनी शेवटी खरी श्रध्दा स्वीकार केली आहे. जे त्याला पाहिजे होते. अल्लाह, जे पश्र्चाताप करतात आणि नम्रतेते क्षमा मागतात, त्यांना क्षमा करतो.
याकूब अ.(इस्राइल) हे खूप अल्लाहनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्ती होते आणि अल्लाहचा संदेश पोहोचविणारे होते..त्यांना वेगवेगळ्या पत्नींपासून बारा मुले होती…सगळ्यात लहान मुलगा होता युसुफ अ. आणि बनी अमीन…
याकूब अ. सर्व मुलांमध्ये, त्याच्या सगळ्यात लहान मुलावर युसुफ अ. वर सर्वात जास्त प्रेम करायचे…
एक दिवस बालक युसुफ अ. यांना स्वप्न पडले की सूर्य, चंद्र आणि अकरा तारे त्यांना वाकून प्रणाम करीत आहेत..त्यांनी हे स्वप्न त्यांच्या पित्याला वर्णन केले..त्यांचे पिता त्यांना म्हणाले, की, तू ह्या स्वप्नाबद्दल तुझ्या मोठ्या भावंडांना काहीही सांगू नकोस..कारण त्यांना ईर्ष्या होऊन, ते तुला नुकसान करण्याचा प्रयत्न करतील…त्यांच्या पित्याने हे ही सांगितले की, "युसुफवर अल्लाहचे आशीर्वाद असतील..आणि तो ही अल्लाहचा संदेश सर्वांना पोहोचवेल.."
युसुफ अ. यांचे सावत्र भाऊ युसुफ अ. वर खूप जळायचे..कारण त्यांचे वडील याकूब अ., त्यांच्यावर खूप प्रेम करायचे..
एक दिवस ते सर्व भाऊ, त्यांच्या वडिलांजवळ गेले आणि म्हणाले, "आम्ही बाहेर जात आहोत…तुम्ही आमच्यासोबत युसुफला पाठवाल का?..आम्ही त्याची चांगली काळजी घेऊ..तो आमच्यासोबत खाईल, पियील आणि खेळेल… तुम्ही त्याला आमच्यासोबत ठेवण्यासाठी विश्वास करत नाही का?…"
याकुब अ. यांना, त्यांच्या वाईट हेतूची भनक लागली…ते म्हणाले, "मला भीती वाटते की, रस्त्यात लांडगा युसुफवर आक्रमण करेल…"
पण त्या सगळ्या भावांनी त्याला पटवून दिले आणि हमी दिली की, ते त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतील..त्यामुळे भरलेल्या अंतःकरणाने याकूब अ. यांनी, युसुफ अ. यांना त्यांच्यासोबत जाऊ दिले…
जेव्हा ते सर्व जण जंगलात होते, तेव्हा मोठ्या भावांनी लहान युसुफ अ. यांना एका कोरड्या, जुन्या विहिरीत फेकले…
ते सर्व जण रडत घरी आले आणि त्यांच्या वडिलांना म्हणाले की, लांडग्याने खरेच त्याला खाल्ले..त्यांनी युसुफ अ. यांचा रक्तळलेला कुरता (सदरा) त्यांची कहाणी सिद्धकरण्यासाठी (दाखविण्यासाठी), वापस आणला होता..
याकूब अ.यांनी पाहिले की, कुरता (सदरा) अजिबात फाटला नव्हता..त्यांना त्याच वेळी सगळे समजले की नक्की काय घडले असावे ..आणि ते खूप दुखी झाले…
ते म्हणाले, "मला माहित आहे, हे खरे नाही..पण मी काही तक्रार करणार नाही आणि धीर सोडणार नाही..मी फक्त माझ्या अल्लाहला मदत मागेल.."
लवकरच एक तांडा (राहण्याची व्यवस्था असलेल्या उंटाच्या गाड्या), ज्या इजिप्तकडे जात होत्या, त्या विहिरीजवळून जात असताना पाणीसाठी थांबल्या, ज्यात युसुफ अ. यांना फेकले गेले होते.
त्या विहिरीत त्यांना युसुफ अ. आढळले..ते लोक त्यांना पाहून खूप आनंदी झाले. त्या दिवसांत गुलामाची (सेवकाची) खरेदी आणि विक्री करणे एक साधारण प्रथा होती..आणि तो ही एक चांगला तरुण युसुफ अ. सारखा मुलगा इजिप्तमध्ये विकून त्यांना एक चांगली रक्कम मिळाली असती..
इजिप्तच्या गुलामाच्या बाजारातून, अजीज नावाच्या एका माणसाने, जो एका शाही कुटुंबाचा सदस्य होता आणि सैन्य अधिकारी होता, युसुफ अ. यांना विकत घेतले आणि त्यांना घरी आणले आणि त्याच्या पत्नीला जुलेखाला म्हटले की, "युसुफ ला सन्मानाने वागव..तो आपल्यासाठी चांगले नशीब घेऊन येईल..आणि आपण त्याला एका मुलाप्रमाणे दत्तक घेऊ शकू…"
युसुफ अ. मोठे होऊन खूपच देखणे तरुण झाले… अजीज त्यांच्यावर खूप दया करायचा. त्यांच्यावर खूप प्रेम करायचा. घराच्या सर्व आर्थिक कारभाराची जबाबदारी युसुफ अ. यांना दिली होती..अजीजची सुंदर बायको युसुफ अ. यांच्याकडे आकर्षित झाली...
एक दिवस युसुफ अ. खोलीत एकटे असताना, जुलेखा त्यांना पटवू लागली…युसुफ अ. मानले नाही..ते एक विनम्र आणि अल्लाहला घाबरणारे तरुण होते. त्यांना, त्यांच्या मालकाला, अजीजला अपमानित नव्हते करायचे आणि अल्लाहची अवज्ञा करायची नव्हती..
त्यांनी अल्लाहची प्रार्थना केली आणि अल्लाहने त्यांना मदत केली…आणि तेथून निसटून जाणे त्यांना जमले..
त्यांनी दरवाजा उघडला आणि खोलीच्या बाहेर पळण्याचा प्रयत्न केला.. जूलेखा त्यांच्या मागे पळाली आणि तिने त्याचा कुरता (सदरा) पकडून मागे ओढले..सदरा फाटला..
जुलेखाचा पती अजीज आणि जुलेखाचा चुलत भाऊ, जे दाराच्या बाहेर उभे होते त्यांनी दोघांना बाहेर येताना पाहिले...
तिने जे केले त्याची लाज वाटण्याऐवजी, तिने युसुफ अ. यांना दोष दिला, "या माणसाला तुरुंगात पाठविले पाहिजे, मला नुकसान पोहोचविल्याबद्दल" असे तिने तिच्या पतीला सांगितले..
युसुफ अ. यांनी हे अमान्य केले आणि त्यांनी जे काही खरे घडले, ते अजीजला सांगितले…
दोन वेगवेगळे कथन होते…अजीजला कुणावर विश्वास ठेवावा, युसुफ अ. की जुलेखा वर कळत नव्हते..
जुलेखाचा चुलत भाऊ खूप हुशार होता..तो म्हणाला, "जर युसुफ चा सदरा पुढून फाटला असेल तर जुलेखा खरी आहे आणि जर सदरा मागच्या बाजूने फाटला तर, जुलेखा खोटे बोलत आहे आणि युसुफ निरागस आहे.."
युसुफ अ. यांचा शर्ट मागून फाटला होता (कारण जुलेखाने त्याला थांबवण्यासाठी मागून ओढले होते)..यामुळे युसुफ अ. यांनी निरागसता सिद्ध झाली होती…
अजीजला क्षणात कळाले की काय घडले..त्याने युसुफ अ. यांच्यावर विश्वास केला आणि त्याच्या बायकोला त्याची माफी मागायला सांगितली..अजीज ने युसुफ अ. यांनी माफी मागितली आणि विसरून जायला सांगितले…
पण जुलेखा विसरली नाही…तिला अपमानित झाल्यासारखे वाटले आणि तिची हार झाल्यामुळे तिला राग आला..
हळू हळू बातमी महिलांमध्ये पसरली..आणि त्या गप्पा करू लागल्या की, जुलेखा एका सेवकाच्या प्रेमात पडली.. जेव्हा जुलेखा ने हे ऐकले, तेव्हा तिने सर्व महिलांना, एक मोठ्या आणि छान मेजवानीसाठी तिच्या घरी आमंत्रित केले..
तिला त्यांना दाखवायचे होते, 'युसुफ ज्याच्याकडे ती आकर्षित झाली होती, तो साधारण व्यक्ती नव्हतां..तो विलक्षण देखणा तरुण होता..इतका देखणा की, कोणीही त्याच्याकडे आकर्षित होण्यापासून स्वतःला रोखू शकत नव्हते …
जेव्हा त्या सगळ्या महिला जेवणासाठी बसल्या, त्यांच्या हातात फळे कापन्यासाठी चाकू दिलेला होता.. जुलेखा ने युसुफ अ. यांना बोलावले..
जसे युसुफ अ. खोलीत आले…महिला त्याच्या चकाकत्या रूपाकडे पाहतच राहिल्या..आणि त्यांनी फळे कापन्या ऐवजी स्वतःची बोटे कापून घेतली…
त्यानंतर त्यांनी जुलेखाकडे पाहून म्हटले की, "तू खरी आहेस..तो साधारण मनुष्य नाही..तो इतका चांगला दिसतो की, जसा एक स्वर्गदूत…"
जुलेखा त्यांना म्हणाली, "जर त्याने, मी जे सांगितले ते केले नाही, तर माझ्या आज्ञेनुसार त्याला तुरुंगात जावे लागेल. (कारण तो एक सेवक आहे आणि मालकिणीची आज्ञा न मानणे हा त्याच्यासाठी गुन्हा आहे)…"
हा युसुफ अ. वर अन्याय झाला होता.
युसुफ अ. यांनी जुलेखा चे ऐकून काही चुकीचे करण्याऐवजी, तुरुंगात जाणे निवडले.. आणि त्यांना (महिलांच्या सांगण्यावरून), तो निरपराधी असताना देखील तुरुंगात टाकले गेले.
युसुफ अ. जेव्हा तुरुंगात होते, त्याच तुरुंगात एक आचारी आणि शाही दरबाराचा एक साकी (मद्य देणारा), त्यांचे सहकारी कैदी होते…
एक दिवस ते युसुफ अ. जवळ आले आणि त्यांना पडलेले स्वप्न त्यांनी वर्णन केले..आचारीला स्वप्न पडले होते की तो एक ब्रेड (भाकरी किंवा पोळी) त्याच्या डोक्यावर घेऊन जात आहे..आणि पक्षी त्यातून ते खात आहेत…साकी ला स्वप्न पडले होते की तो अंगूर पासून वाईन बनवत आहे…
अल्लाहने युसुफ अ. यांना आशीर्वादासह प्रतिभा दिली होती, ज्यामुळे ते स्वप्नांचा अर्थ सांगू शकत होते…त्यांच्या सहकारी कैद्यांना ते म्हणाले, "मी तुमच्या स्वप्नांचे अर्थ सांगेन. जे मला अल्लाहने शिकविले आहे, त्यातलाच हा एक भाग आहे…"
मग युसुफ अ. यांनी दोघांना सांगितले की, आचारी ला फाशी दिली जाईल आणि पक्षी त्याचे डोके खातील..आणि साकी कैदेतून मुक्त होईल आणि राजाला दरबारात वाईन देण्यासाठी नियुक्त केला जाईल..युसुफ अ. यांनी साकी ला, जेव्हा तो दरबारात जाईल तेव्हा, त्याच्या विषयी राजाशी बोलण्यास सांगितले…
पण साकी तुरुंगातून सुटल्यानंतर युसुफ अ. यांच्या बद्दल सर्व विसरून गेला..आणि युसुफ अ. तुरुंगात काही अजून वर्ष तसाच राहिले...
एक दिवस राजाला एक स्वप्न पडले…राजाने पाहीले की, सात अशक्त गायी, सात जाड गायींना खात आहेत…त्याने सात कोरडे आणि सात हिरवे मक्याचे कणीस पाहिले…राजाने दरबारातील लोकांना विचारले की, कुणी स्वप्नांचा अर्थ सांगू शकेल का?.. त्यानंतर साकीला, युसुफ अ. आठवले…जे अजूनही तुरुंगात होते...
त्याने राजाची आज्ञा घेतली आणि युसुफ अ. यांना भेटण्यासाठी गेला… त्याने राजाचे स्वप्न युसुफ अ. यांना सांगितले..
त्याच्यावर राग न करता आणि त्याच्याविषयी राजाशी लवकरच बोलण्यास सांगून, युसुफ अ. यांनी, त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला…"जमिनीत सात वर्ष मकाचे पीक खूप जास्त होईल…त्यामुळे तुम्हाला जेवढे आवश्यक आहे तेवढे खा आणि बाकीचा मका सुरक्षित स्थळी ठेवा..त्यानंतर सात वर्ष खूप भयानक दुष्काळ येईल...त्या वर्षांत पाऊस होणार नाही आणि मका येणार नाही…जे तुम्ही जमा करून ठेवलेले मक्याचे दाणे आहेत, त्यातून खा..त्यानंतर त्यापुढचे वर्ष खूप पाऊस होईल आणि त्यानंतर पिकाची कापणी…."
जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो खूप आनंदी झाला आणि तो, त्या व्यक्तीला भेटण्यासाठी इच्छुक झाला, ज्याने स्वप्नाचा अर्थ सांगितला होता…युसुफ अ. यांच्याकडे सैनिकांना पाठविण्यात आले…पण युसुफ अ. यांनी तुरुंग सोडण्यास नकार दिला, कारण त्यांना राजाला जाणीव करून द्यायची होती की, त्यांना अन्यायपूर्वक बंद केले गेले होते…
त्यामुळे राजाने, त्या महिलांशी योग्य चौकशी करवून घेतली, ज्यांनी मानले की, "युसुफ हा निरागस आणि सदाचारी आहे"…
त्यानंतरच युसुफ अ. तुरुंगातून बाहेर येण्यास तयार झाले...युसुफ अ. यांना सन्मानाने त्या राजाच्या दरबारात नेण्यात आले, जो आधीच युसुफ अ. च्या ज्ञान, हुशारी, निष्ठा, इमानदारी आणि पुण्य या गुणांनी प्रभावित होता…राजाने इच्छा केली की, "युसुफ अ. त्याचा प्रमुख सल्लागार बनावा.."
युसुफ अ. यांनी सुचविले की, त्यांना धान्य साठा करने आणि त्याचे व्यवस्थापन करणे याची जबाबदारी द्यावी…राजा मानला आणि त्याला याचा पूर्ण अधिकार दिला.. अशा प्रकारे अल्लाहने युसुफ अ. यांना त्यांच्या सद्गुणांमुळे, त्यांना दरबारात एक पद आणि स्थान देऊन, बक्षीस दिले, ज्यासाठी ते योग्य होते…
पुढे येणाऱ्या वर्षांमध्ये, जेव्हा आजूबाजूच्या जमिनीत दुष्काळ (धान्याची कमी) होती, इजिप्त मधील जनतेला खाण्यासाठी अजूनही पुष्कळ अन्न होते..हे सगळे युसुफ अ. यांच्या, देशाच्या खाद्य राखीव संग्रहातील, चांगल्या व्यवस्थापन मुळे होते..शेजारील देशातून लोक अन्नासाठी इजिप्त मध्ये येत होते..
युसुफ अ. यांचे भाऊ त्यांना येऊन भेटले का?…युसुफ अ. यांचे पिता..त्यांना भेटले का?...
सगळीकडे खूप वाईट दुष्काळ पसरला आणि इजिप्त च्या जवळचे आणि दूरचे लोक, इजिप्त मध्ये आले…त्यामध्ये युसुफ अ. यांचे सावत्र भाऊ ही " कानान " वरून (त्यांचे गाव, जे सध्या इस्राइल मध्ये आहे) आले होते..
युसुफ अ. यांनी, जरी त्यांच्या भावांना पाहताक्षणी ओळखले होते, तरी त्या भावांनी, त्यांना ओळखले नव्हते…
युसुफ अ. त्यांना म्हणाले, "पुढच्या वेळेस येताना त्यांच्या सर्वात लहान भावाला (बनी अमीन, जो युसुफ अ. चा सख्खा भाऊ होता) घेऊन या...नाहीतर पुढच्या वेळी धान्य मिळणार नाही.."
सगळे भाऊ घरी (कानान) आल्यावर, त्यांच्या वडिलांजवळ ,याकूब अ. जवळ गेले आणि जे काही झाले ते सांगितले..आणि म्हंटले की, "आमच्यासोबत बनी अमीन ला पाठवा…आम्ही वचन देतो की, आम्ही त्याची काळजी घेऊ आणि येताना जास्त धान्य आणू..पण याकूब अ., त्यांनी जे युसुफ अ. सोबत केले होते, ते विसरले नव्हते आणि त्यांची बनी अमीनला त्यांच्यासोबत पाठवायची इच्छा नव्हती..
त्यांच्यावर दुसऱ्या वेळेस विश्वास ठेवण्यासाठी ते अजिबात इच्छुक नव्हते…तरीसुद्धा जेव्हा भावांनी जोर दिला आणि अल्लाहची शपथ घेतली की, "ते बनी अमीन ची पूर्ण जबाबदारी घेतील"…याकूब अ. यांनी त्याला जावू दिले…
जेव्हा ते जात होते तेव्हा याकूब अ. यांनी, त्यांना इजिप्त मध्ये प्रवेश करताना शहराच्या वेगवेगळ्या दरवाजाने प्रवेश करायचा सल्ला दिला..
सर्व भाऊ बनी अमीन सोबत इजिप्तकडे निघाले..पूर्ण रस्ता मोठ्या भावांनी बनी अमीन ला टोमणे मारले आणि चिडविले..जेव्हा ते इजिप्तला पोहोचले आणि युसुफ अ. यांच्या जवळ गेले.
युसुफ अ. यांनी, त्यांच्या सख्ख्या भावाला लगेच ओळखले आणि त्याला स्वतःविषयी सांगितले..त्यांनी हे ही सांगितले की, मोठे भाऊ ज्या पद्धतीने वागवीत आहेत, त्याची यापुढे काळजी करायची आवश्यकता नाही…जे अन्न धान्य ते विकत घेण्यासाठी आले होते ते त्यांनी दिले.
पण जाण्याआधी एक चांदीची वाटी युसुफ अ. यांनी बनी अमीन च्या उंटावरच्या पिशवीत ठेवली.. सर्व भाऊ जसे निघणार होते, राजाच्या सेवकांना राजाची चांदीची वाटी हरवल्याचे आढळले…त्यांनी तांडा (उंटांच्या गाड्यांचा समूह) थांबवला आणि त्यांच्या समानांत शोधले.. वाटी बनी अमीन च्या उंटावरील पिशवीत सापडली…
हा इजिप्तचा कायदा होता की, कोणताही चोर, जिथे त्याने गुन्हा केला, ते शहर सोडून जाऊ शकत नाही…त्यामुळे बनी अमीनला जाण्याची आज्ञा नव्हती…
हेच युसुफ अ. यांना पाहीजे होते…यामुळे युसुफ अ. यांना, त्यांच्या लहान भावाला त्यांच्याजवळ ठेवण्यासाठी निमित्त मिळाले होते…बनी अमीनलाही हे कळले होते…
पण त्याचे मोठे भाऊ अत्यंत चिंता करू लागले..कारण त्यांनी त्यांच्या पित्याला याकूब अ. यांना, बनी अमीनला सुरक्षित वापस आणण्याचे वचन दिले होते…त्यांनी युसुफ अ. कडे विनवणी केली की, "त्याला (बनी अमीनला) जावू द्यावे आणि आमच्या पैकी एकाला त्याच्या जागी ठेवून घ्यावे."…पण युसुफ अ. मानले नाही…
ते म्हणाले, "हे चूक आहे की, ज्याने गुन्हा केला त्याच्या ऐवजी दुसऱ्या कुणाला ठेवून घ्यावे"…
सर्व भाऊ यावर खूप उदास झाले होते..सर्वात मोठा भाऊ म्हणाला, "मी माझ्या वडिलांना बनी अमीन बद्दल शब्द दिला आहे..मी त्याच्याविना जाणार नाही..जोपर्यंत अल्लाह याविषयी काही ठरवत नाही.."
बाकीचे सर्व भाऊ घरी गेले आणि त्यांच्या वडिलांना सगळी कहाणी सांगितली, "तुमचा मुलगा चोर आहे, हे सगळे त्याच्यामुळे घडले…"
याकूब अ. हे विश्वास करण्यासाठी तयार नव्हते. "हे अशक्य आहे..बनी अमीन कधीही चोरी करणार नाही…पण जरी मी त्यासाठी काही करू शकत नसलो तरी मी धीर धरेन आणि तक्रार करणार नाही…"
याकूब अ. यांनी त्यांचे, दिवस आणि रात्र दुःखात आणि प्रार्थना करण्यात घालविले…ते इतके रडले की, त्यांची दृष्टी गेली..पण त्यांनी धीर सोडला नाही…
त्यांची मुले त्यांच्यावर नाराज झाली. ते म्हणाले, "जर तुम्ही रडणे थांबवले नाही, तर तुम्ही मरून जाल…"
"मी तुम्हाला काहीच म्हणत नाही…मी फक्त माझ्या अल्लाहला मदत मागत आहे…आणि त्याच्यातर्फेच मदत मिळेल, तुमच्याकडून नाही" युसुफ अ. म्हंटले…
याकूब अ. यांनी त्यांच्या मुलांना, वापस इजिप्तला जावून युसुफ अ. आणि बनी अमीनला बघून येण्यास सांगितले आणि आशा सोडली नाही…
सर्व भाऊ युसुफ अ. यांच्या जवळ तिसऱ्या वेळेस गेले आणि म्हणाले, "आम्ही वापस आलो, कारण आमची गरज आहे…आमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत, तरी कृपा करून आम्हाला आमच्या कुटुंबासाठी धान्य द्या. आमच्यावर दया दाखवा..आम्ही तुमचे खरेच खूप आभारी राहू.."
युसुफ अ. यांना, त्यांच्याच कुटुंबाची दशा ऐकून खूप वाईट वाटले..पण त्यांना, त्यांच्याशी केलेल्या त्यांच्या निर्दयीपणाची आठवण करून द्यायची होती. "आठवा, तुम्हाला एक भाऊ होता का…युसुफ?..त्याच्याशी तुम्ही काय केले?"
तेव्हा त्यांना जाणीव झाली की, 'हा चांगला माणूस खरंच त्यांचा भाऊ, युसुफ आहे…ज्याला त्यांनी विहिरीत फेकून दिले होते '….
"तू खरच युसुफ आहे का?" त्यांना विश्वास बसत नव्हता आणि स्वतःची लाज ही वाटत होती…
"हो" युसुफ अ. यांनी उत्तर दिले…
"खरंच आम्ही चुकलो…आम्हाला माफ कर"
युसुफ अ. यांनी त्यांना माफ केले..आणि अल्लाहला प्रार्थना केली की, "त्यांच्यावर कृपा दृष्टी व्हावी"…
मग त्यांनी त्यांच्या पूर्ण कुटुंबाला इजिप्तमध्ये आणण्यास सांगितले…युसुफ अ. यांनी त्यांच्या वडिलांसाठी, त्यांचा सदरा दिला आणि म्हटले की, "हा सदरा त्यांच्या डोळ्यावर लावा…आणि त्यांची दृष्टी परत येईल.."
कानान ला तांडा ( उंटाच्या गाड्या) वापस येण्याआधीच याकूब अ. म्हणाले की, "हवेत युसुफच्या असण्याचा आभास होत आहे"..
लोक बोलत राहिले की, "खरंच तुमचे डोके काम करीत नाही…हे कसे शक्य आहे जर युसुफचे काहीच शिल्लक राहिले नाही?"
पण याकूब अ. यांना खात्री होती की, त्यांचा मुलगा जिवंत आहे…
लवकरच त्याची मुले, युसुफ अ. बद्दल चांगली बातमी घेऊन घरी पोहोचली…आणि त्याचा सदरा, त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर ठेवला…याकूब अ. यांना, लगेच दृष्टी वापस मिळाली आणि ते म्हणाले, "मी म्हणालो नव्हतो का की, जे अल्लाहकडून मला कळले, ते तुम्हाला नाही कळले..मी अल्लाहला तुम्हाला माफ करण्यासाठी प्रार्थना करेल…
नंतर पूर्ण कुटुंब इजिप्तला गेले…युसुफ अ. आता इजिप्तचा राजा बनले होते…ते त्यांना घेण्यासाठी शहराच्या गेट पाशी आले.. त्यांनी त्यांच्या पित्याला खूप आदराने आणि सन्मानाने, त्यांच्या दरबारात संरक्षण दिले. जेव्हा युसुफ अ. त्यांच्या सिंहासन वर चढले, तेव्हा त्याच्या कुटुंबासह सर्वांनी त्यांना वाकून प्रणाम केला…
आणि अशा प्रकारे त्यांचे बालपणाचे स्वप्न खरे झाले की, त्यांचे आईवडील आणि अकरा भाऊ, जे स्वप्नात सूर्य, चंद्र आणि तारे होते, ते त्याला वाकून प्रणाम करीत होते…
🍁🍁यशायाह (Isaiah)🍁🍁 राजा "हजकिया" (Hezekiah) (700BC) (साधारणतः 2700वर्षांपूर्वी) जेरुसलेम (जूदा) या राज्यावर राज्य करीत होता. अल्लाहचा चांगला सेवक आणि राजा होता. त्यावेळी 'यशायाह ' हे अल्लाहचे संदेश कर्ता होते. राजा हजकीया, राज्याच्या चांगल्यासाठी, यशायाह,जे काही करण्याचा सल्ला देत होते आणि ज्यावर प्रतिबंध लावत होते, राजा ऐकत होता आणि त्यांचा आज्ञाकारी होता आणि त्यांना सल्ला मागत होता. इस्रायली लोकांमध्ये घडामोडी होत गेल्या आणि प्रकरणांना वेग आला. राज्य एका योग्य राजाच्या हातात होते आणि राज्याची प्रजा त्यांना पसंत करत होती. एक दिवस राजाला एक आजार झाला. त्याचा पायाला संसर्गित जखम झाली. याच काळात त्यांनी एक भयानक बातमी ऐकली. त्यांचा एक सेवक राजवाड्यात पळत आला आणि त्याने ओरडून सांगितले, " ' बेबिलोन ' चा राजा 'सनहेरीब ' (sennacherib) आपल्यावर आक्रमण करण्यास येत आहेत." आणि हे खरे होते. क्रूर आश्शुरी राजा साठ हजार सैन्यासह इस्राइल (जेरुसलेम) कडे येत होता.
बेबिलोन (बाबिली) हे मेसोपोटेमिया मधील एक सुप्रसिद्ध प्राचीन शहर होते. या शहराची स्थापना 1894 BC मध्ये आमोरी वंशीय राजांनी केली होती.(हल्लीच्या इराक, इराण, तुर्कस्तान व सीरिया या देशांचा काही भूभाग प्राचीन काळी ' मेसोपोटेमिया' भूप्रदेश नावाने ओळखला जायचा.) {बेबिलोन चे अवशेष इराकच्या बेबीलोन प्रांतातील अल हिल्लाह या गावाजवळील एका टेकडीखाली सापडतात.}
लोक खूप भयभीत झाले.बातमी ऐकून राजा चिंताग्रस्त झाला आणि त्याने यशायाह ला विचारले, "अल्लाह ने सेनेरब आणि त्याच्या सैन्याविषयी तुमच्यावर काय प्रकट केले (सांगितले) आहे". "अल्लाहने आतापर्यंत मला काहीही नाही सांगितले", त्यांनी उत्तर दिले. राजा दुःखी होता. कारण तो त्याच्या पायाच्या आजारमुळे लढाई करू शकत नव्हता. यशायाह प्रार्थना करत होते, तेव्हा अल्लाहने त्यांना एक गुप्त गोष्ट सांगितली. (प्रकट केली) दुसऱ्या दिवशी यशायाह संदेश घेऊन राजाला भेटावयास आले. "तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या उत्तराधिकारीची नेमणूक करा .कारण तुमची शेवटची वेळ आलेली आहे." जेव्हा यशायाहने हे सांगितले, राजा प्रार्थना स्थळाकडे तोंड करून प्रार्थना करू लागला. त्याने गौरवशाली अल्लाहला प्रार्थना केली आणि विनंती केली, रडला. प्रामाणिक मन, विश्वास आणि संयम ठेवून, सर्वशक्तीशाली आणि उदात्त अल्लाहला रडत आणि विनंती करत, तो म्हणाला" हे प्रभू, माझ्या कर्मांची आठवण ठेव, इस्राइलच्या लोकांसाठी असलेला निर्णय, सगळे तुझ्याकडूनच होते. मी जे करतो, ते तू चांगले जाणतो. माझे सर्व काम आणि माझे खुले आणि गुप्त कार्य तुझ्या समोर आहेत." जेव्हा अल्लाहने हिजकियाची मनापासून केलेला प्रार्थना ऐकली, तेव्हा अल्लाहला त्याच्यावर दया आली. त्या रात्री जेव्हा यशायाह प्रार्थना करत होते, अल्लाहने त्यांना राजाला आनंददायक बातमी देण्यास सांगितले की, त्याच्यावर दया झाली आहे. अल्लाह आणखी पंधरा वर्षांसाठी हिजकीयाचे वय वाढवणार आहे. आणि त्यांचा आजार बरा होणार आहे. आणि शत्रू सनहेरीब पासून वाचवनार आहे.
लगेच दुसऱ्या दिवशी यशायह ने राजाला ही चांगली बातमी दिली. जेव्हा राजाने हे ऐकले, तो आनंदी झाला. दुःख आणि वाईट विचार दूर झाले. त्याने वाकून प्रणाम करून प्रार्थना केली, " हे प्रभू, तू ज्याला इच्छितो त्याला राजा बनवतो आणि ज्याला इच्छितो त्याला सत्तेवरून काढून टाकतो.ज्याला इच्छितो त्याला उन्नत करतो आणि ज्याला इच्छितो त्याची अधोगती करतो. अदृश्य जाणणारा आणि स्पष्ट असणारा. सगळ्यात पहिला आणि शेवटचा. अभिव्यक्त आणि ज्ञात असणारा. तू दया दाखविली आणि अस्वस्थ लोकांच्या प्रार्थनांना उत्तर दिले." जेव्हा राजाने त्याचे डोके वर केले, अल्लाहने यशायाह ला राजाला आदेश देण्यास सांगितला की, अंजिराचे पाणी काढून त्याच्या जखमेवर लावावे आणि तो बरे होईल.
राजाने अल्लाहच्या आदेशा प्रमाणे पाणी लावले. हा एक चमत्कार होता. त्याचे जखम लगेच भरले. राजा आनंदी होता. त्याने म्हंटले की, ' अल्लाह दया करतो आणि दुःखी लोकांच्या वेदना कमी करतो.
अल्लाहने सनहेरीब च्या सैन्याकडे मृत्यु च्या स्वर्गदुताला पाठविले. सकाळी राजा सनहेरीब ने त्याच्या सैन्याला मृत झालेले पाहिले.अल्लाहने जे वचन दिले होते ते पूर्ण केले. राजा आणि त्याचे पाच सहकारी सोडून कोणीच जिवंत नव्हते.या पाच सहकाऱ्यांमध्ये नबूकदनेस्सर (बूख्त नसर) ही होता. राजा हजकिया ने त्यांना बेड्या घातल्या आणि त्यांच्या राज्यात वापस नेले. त्यांनी सनहेरीब आणि त्याच्या सहकाऱ्यांना, सर्वांना दिसण्यासाठी, दरबाराच्या शिक्षा देण्याच्या जागी ठेवले आणि सत्तर दिवसापर्यंत, द्वेष आणि अपमानित करण्यासाठी कैदेत ठेवले. रोज प्रत्येकाला खाण्यासाठी बारले ची भाकरी देण्यात यायची. सत्तर दिवसानंतर त्यांना राजाने तुरुंगात टाकले.
सत्तर दिवसानंतर अल्लाहने यशायाह ला सनहेरीब आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्यांच्या राज्यात वापस पाठवण्यास सांगितले. जेणेकरून ते त्यांच्या लोकांना सावध करतील, की त्यांच्यासोबत काय घडले. जेव्हा यशायाह ने राजा हजकिया ला या बाबतीत संदेश दिला, तेव्हा राजाने तुरंत त्यांना मुक्त केले. जेव्हा सनहेरीब त्याच्या लोकांत वापस गेला, त्याने त्याच्या वाजिरांना आणि सल्लागारांना जमा केले आणि सांगितले, की त्यांच्या सैन्याला कसे मारण्यात आले आणि सत्तर दिवस त्यांना त्रास दिला. तेव्हा धार्मिक लोक आणि जादूगार लोक पुढे आले आणि म्हणाले, आम्ही तुम्हाला अल्लाह आणि त्यांच्या संदेशकर्त्या विषयी सूचना दिली होती.पण तुम्ही ऐकले नाही. दुसऱ्याने असे म्हंटले, तो एक असा देश आहे ज्याला कोणी मिटवू शकत नाही. त्या देशाला कोणी जिंकू शकत नाही. सनहेरीब आता अल्लाह ला घाबरला होता. त्याने पुन्हा कधी इस्राएलवर आक्रमण करण्याचा विचार केला नाही. त्यानंतर सात वर्षांनंतर त्याचा मृत्यू झाला.
कुराण मध्ये यशायाह चे नाव आहे. यहुदी( ज्यू,हिब्रू) लोक अल्लाह ला याहोदा म्हणतात.आणि ख्रिश्चन लोक गॉड म्हणतात.तिन्ही ग्रंथात कुराण,बायबल आणि तोराह( तोरेत) मध्ये जवळजवळ सारख्याच कथा आहेत. संदेशकर्ता ही सारखेच आहेत.पण कुराण च्या आधीचे ग्रंथ काही धार्मिक लोकांकडून बदलण्यात आले.त्यामुळे ते मूळ ग्रंथ नाही.
इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्या लोकांना, वंशजाला पसंद करत नव्हते….कारण बनी इस्राइल, एक आणि एक अल्लाह ची उपासना करत होते…
इजिप्तचे लोक आणि सैनिक, बनी इस्राईल वर अन्याय करत होते…त्यांच्याशी वाईट वागत होते…इजिप्तचे लोक, खूप शक्तिशाली होते…त्यामुळे गरीब, अत्याचार होणारे बनी इस्राईल, यांना त्यांच्या क्रूरतेपासून आणि निर्दयतेपासून, खूप कमी संरक्षण मिळायचे…ते त्यांचा आवाज उठवू शकत नव्हते…
त्या काळी, इजिप्तच्या राजाला, फिरौंन (फैरों, pharo) म्हंटले जायचे…
इजिप्त च्या लोकांना ज्योतिष विद्येत, जादू आणि भविष्यकथन यामध्ये खूप विश्वास होता…
एका भविष्य कथन करणाऱ्याने (ज्योतिषी) फिरौंनला सांगितले की एक मुलगा, बनी इस्राईलच्या जमातीत जन्म घेईल, जो त्याचे राज्य कोसळण्यास कारण होईल…
फिरौंन यावर खूप नाराज झाला आणि त्याने आज्ञा दिली की, बनी इस्राईलच्या कोणत्याही कुटुंबात जन्माला येणाऱ्या, प्रत्येक मुलाला जन्मताच मारून टाकावे…
याच काळात, एक मुलगा बनी इस्राइलमध्ये जन्माला आला…त्याची आई खूप घाबरली…तिने त्याचा जन्म गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण जर राजाच्या कोणत्याही सैनिकांनी त्या मुलाला, शोधले तर ते लगेच त्याला मारून टाकतील…
तिने अल्लाहकडे प्रार्थना केली आणि अल्लाहने तिला मार्गदर्शन केले की, एका लाकडाच्या पेटीत त्या बाळाला ठेव आणि ती पेटी नाईल नदीत सोड…तिने अल्लाहवर विश्वास ठेऊन ती आज्ञा पाळली…आणि अल्लाह ने तिला वचन दिले की, तिचा मुलगा सुरक्षित राहील…आणि ती पुन्हा लवकरच त्याच्या जवळ जाईल…
त्यामुळे तिने जेव्हा बाळाला एका लाकडाच्या पेटीत ठेवले आणि नदीच्या पाण्यावर तरंगू दिले, तेव्हा तिने तिच्या मोठ्या मुलीला, मरियमला सांगितले की, त्या पेटीकडे नजर ठेव…
ती पेटी राजवाड्याच्या दिशेने वाहत चालली होती आणि मरियम पेटीच्या मागे मागे नदीच्या काठावरून जात होती…जेव्हा पेटी राजवाड्याच्या जवळून जात होती, काही दरबारातील महिलांनी पाहिले की, ते छान आणि गोंडस बाळ, त्याचा अंगठा चोकत आरामात पेटीत खेळत आहे…त्यांनी ते बाळ राणीकडे आणले, जी फिरौंनची पत्नी होती… आसिया… आसिया त्या बाळाला पाहून खूप आनंदी झाली कारण तिला स्वतःचे मूल नव्हते…तिने, त्या बाळाला दत्तक घेण्यासाठी, तिच्या पतीची परवानगी मागितली…पण तिच्या पतीला ही कल्पना आवडली नाही…
"हे मूल मला इजा करू शकते, जसे ज्योतिषाने भविष्य कथन केले आहे…" त्याने नकारार्थी उत्तर दिले… पण आसियाने याचना केली, "या मुलाला मारू नका…तो आपल्यासाठी चांगला ही असू शकेल…" अनिच्छेने तो मानला…
हे ठरवले गेले की, ते बाळ राजवाड्यात मोठे होईल आणि एक महिला त्याची काळजी घेण्यासाठी आणि त्याला दूध पाजण्यासाठी नियुक्त केली जाईल..जी महिला त्या बाळाला दूध देण्यासाठी नियुक्त केली गेली, बाळाने तिच्याकडून दूध घेतले नाही..आणि रडणे चालू ठेवले…मग मरियम (जी त्याची बहीण होती, पण हे कुणालाही माहीत नव्हते…) पुढे आली आणि म्हणाली, मी तुम्हाला एका महिलेविषयी सांगू शकते, जी खूप चांगली आहे आणि या बाळाला दूध पाजू शकते…
मरियमला त्या महिलेला बोलण्यास सांगण्यात आले…ती घरी आली आणि तिच्या आईला तिथे वापस घेऊन गेली…त्या बाळाने, त्याच्या आईच्या हातात गेल्यावर लगेच रडणे थांबवले…आणि दूध घेतले…
प्रत्येक जण आनंदी झाला…आणि त्या आईला, त्या लहान बाळाची देखभाल करण्याचे आणि दूध पाजण्याचे काम देण्यात आले…जो तिचाच मुलगा होता. (पण हे कुणालाही माहीत नव्हते)..
या बाळाचे नाव होते, "मूसा". मूसा अ., एका राजकुमारासारखा फिरौंनच्या राजवाड्यात मोठा झाला…तो एक बलवान, सद्गुणी आणि योग्य तरुण बनला…पण तो जे अवतीभोवती पाहत होता, ते त्याला आवडत नव्हते… नेहमी, जेव्हा तो शहरात, त्याच्या लोकांना भेटायला जायचा आणि पहायचा की इजिप्तचे लोक, गरीब लोकांशी निर्दयीतेने आणि क्रूरपणाने वागायचे…, तो त्यांच्या अन्यायाने शिकार झालेल्या लोकांना मदत करायचा…त्याला क्रूरता आवडायची नाही..त्याला खूप राग यायचा जो त्याला स्वतःला सहन होत नव्हता… एक दिवस एका बलवान इजिप्तच्या माणसाने, एका गरीब व्यक्तीला खूप मारले…त्या माणसाने मदतीसाठी मुसाला बोलावले…मुसा खूप रागावला आणि इजिप्तच्या माणसाला त्याने एक थोबाडीत मारले…इतक्या जोरात मारले की तो माणूस खाली पडला आणि मृत झाला… आता मुसा, जे झाले त्यामुळे, घाबरला आणि नाराज झाला…त्याला त्या माणसाचा जीव घ्यायचा नव्हता…ते झाले कारण अन्याय पाहून, त्याचा राग अनावर झाला…त्याने अल्लाहची क्षमा याचना केली… जेव्हा इजिप्तच्या लोकांना कळले की, मुसाने एका माणसाला मारले आहे, फिरौंनच्या लोकांनी त्याला शोध सुरू केला..आणि म्हणून मुसाला इजिप्त सोडावे लागले…तो एका "मदयन" नावाच्या जागी गेला…
जेव्हा तो तेथे आला, त्याने एका विहिरीभोवती खूप लोकं पहिली…ते त्या विहिरीतून पानी काढत होते..आणि त्यांच्या शेळ्यांना आणि मेंढ्यांना देत होते…त्या गर्दीपासून, थोड्याच अंतरावर दोन तरुण मुली, त्यांच्या शेळ्यांसोबत उभ्या होत्या आणि शांततेने, प्रत्येकाची पाळी संपण्याची वाट पाहत होत्या..ज्यामुळे त्यांची पाणी घेण्याची पाळी येईल… "तुम्ही पण तुमच्या हिश्श्याचे पाणी का नाही घेत?" मुसाने विचारले… "कारण आम्ही इतके धैर्यवान नाही, आम्हाला प्रत्येकाचे होईपर्यंत वाट पाहावी लागेल…आमचे पिता, इथे स्वतःहून येण्यासाठी, खूप वृद्ध आणि अशक्त आहेत…त्यामुळे आम्हाला वाट पाहावी लागेल" ,त्या म्हणाल्या…
एक शक्तिशाली आणि सभ्य तरुण असल्याने आणि ज्याला न्याय देण्याची खूप चांगली बुध्दी असल्याने, मुसा पुढे झाला त्यांच्यासाठी पाणी काढले आणि त्यांच्या गुरांना दिले…. जेव्हा मुली घरी गेल्या, त्यांनी त्यांच्या पित्याला सांगितले की, कसे एका दयाळू तरुण माणसाने त्यांना मदत केली…त्यांचे पिता एक पवित्र व्यक्ती होते…एक संदेशवाहक होते…"शोएब". ते त्यांच्या मुलींना म्हणाले की, "वापस जा आणि त्या तरुणाला घेऊन या…" जेव्हा दोघींमधील एक मुलगी मुसाला बोलावण्यासाठी वापस गेली, तो एका झाडाखाली झोपला होता…थकलेला आणि भुकेला होता..आणि अल्लाहला प्रार्थना करत होता की मदत कर…ती त्याच्याकडे आली आणि म्हणाली की, तिचे पिता त्याला भेटण्यासाठी इच्छुक आहेत… म्हणून मुसा उठला आणि तिच्यासोबत तिच्या घरी गेला… शोएबने त्याला छान जेवण दिले आणि मग विचारले की, तो कोण आहे… मुसाने त्यांना फिरौंन आणि त्याच्या लोकांचा, गरीब बनी इस्राइलवरच्या अन्यायाची कहाणी सांगितली…आणि त्याच्या स्वतःच्या सुटकेची कहाणी सांगितली..त्या वृद्ध संदेश वाहकाने त्याला म्हंटले की, त्याला काही काळजी करण्याचे कारण नाही..कारण आता तो, एका सुरक्षित जागी, मित्रांत आला आहे… दोघीपैकी एका मुलीने, तिच्या पित्याला मुसाला एका मेंढपाळच्या कामावर ठेवण्यास सांगितले ..शेळ्यांची देखभाल करण्यासाठी कारण तो बलवान, सद्गुणी आणि प्रामाणिक होता…
म्हणून त्यांचा पिता मुसाला म्हणाला, "जर तू आमच्यासोबत राहिला आणि आठ ते दहा वर्ष आमच्या शेळ्यांची देखभाल केली, तर मी माझ्या मुलीशी तुझे लग्न करून देईन…"
…..मुसा तेथे राहण्यास आणि त्यांच्यासाठी काम करण्यास तयार झाला… तेवढ्या वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर, त्याने लग्न करण्याची परवानगी मागितली आणि त्याच्या पत्नीसोबत, त्याच्या गुरांच्या कळपाला घेऊन, त्याने मदयन सोडले…
इजिप्तला जातांना, मुसाने एका टेकडीवर एक प्रकाश पहिला…त्याने त्याच्या पत्नीला जोपर्यंत तो तेथून(टेकडीवरून), काही आग घेऊन येत नाही, तोपर्यंत वाट पाहण्यास सांगितले…त्याने विचार केला की कोणी, जो त्याला रस्ता दाखवण्यास पात्र आहे, तेथे असेन…
त्यामुळे आगीकडे गेला…पण तो काही साधारण प्रकाश नव्हता…तो अल्लाहचा प्रकाश होता…
जसा मुसाजवळ गेला, तो प्रकाश दूर आणि आणखी दूर गेला…तो घाबरला आणि तेथून वापस येण्यासाठी फिरला…पण एका आवाजाने त्याला थांबवले…, "ओ, मुसा..मी तुझा अल्लाह आहे…तुझे पादत्राणे काढ…तू एका पवित्र "तोवा" च्या दरीत उभा आहे…मी तुला माझा संदेशवाहक म्हणून निवडले आहे…त्यामुळे तुला जे सांगितले जाईल, नीट काळजीपूर्वक ऐक…"
अशाप्रकारे अल्लाह मुसाशी बोलला आणि त्याला संदेशवाहक बनविले…मुसा गोंधळलेला होता…अल्लाहने त्याला विचारले की, त्याच्या हातात काय आहे?.. "ती माझी काठी आहे", मुसाने उत्तर दिले…. "खाली टाक", आज्ञा आली…
मुसाने आज्ञा पाळली आणि त्याला आश्चर्य वाटले, ती काठी एक भयंकर साप बनली… "आता ती काठी उचल आणि घाबरु नको", आज्ञा आली आणि तो साप, पुन्हा काठी बनला… मग मुसाला आज्ञा देण्यात आली की, त्याचा हाथ, त्याच्या दुसऱ्या भुजेच्या खाली घेऊन जा…आणि बाहेर काढ… तो हात, त्याच्यावर काही जळण्याचे निशांनांविना चमकू लागला…(मुसा जेव्हा बालक होता तेव्हा त्याचा हात जळला होता…)
हे दोन चमत्कार मुसाला देऊन, अल्लाहने आज्ञा केली की, इजिप्तला वापस जा आणि त्याच्या खऱ्या धर्माची शिकवण, फिरौंनला आणि त्याच्या लोकांना दे. पण मुसाला भीती वाटत होती की, ते त्याला मारून टाकतील कारण त्याने, त्यांच्यामधील एका इजिप्शियनला मारले होते…अल्लाहने त्याला आश्वासनं दिले की ते तसे करणार नाही…
मुसाला त्याचे शब्द बोलतांना अडचण येत होती…तो थोडा तोतरे बोलायचा…म्हणून तो अल्लाहला म्हणाला की, त्याच्या भावाला, हारूनला(aron) सुध्दा, एक संदेशवाहक बनव, त्यामुळे तो मुसाला मदत करेन…
"हे ओझे सहन करण्यासाठी, माझ्या मनाला (हृदयाला) धैर्य दे आणि जे लोक ऐकतील त्यांच्यासाठी, माझे बोलणे स्पष्ट आणि प्रभावात्मक होऊ दे…" मुसाने अल्लाहला प्रार्थना केली… अल्लाहने त्याला, त्याने जे मागितले सगळे दिले आणि दोघा भावांना, अल्लाहचा संदेश घेऊन, इजिप्तच्या दरबारात जाण्याची आज्ञा केली… "तुमची शिकवण देतांना दयाळू रहा, कठोर राहू नका"…त्यांना सांगण्यात आले…
अल्लाहच्या मदतीने मुसा बळकट झाला आणि त्याच्या संदेशवाहक भावासोबत, हारून सोबत तो, इजिप्तच्या दरबारात जावून अल्लाहची शिकवण देण्यासाठी निघाला…
🌊मुसा आणि फिरौंन 3🌊 जेव्हा मुसा आणि हारून अल्लाहच्या संदेशाची शिकवण फिरौंन आणि त्याच्या लोकांना देण्यासाठी इजिप्त मध्ये आले, तेव्हा त्यांना दिसले की, बनी इस्राईल दयनीय अवस्थेत जगत आहेत…त्यांना कठोर गुलामी करण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे…
मुसा आणि हारून फिरौंनच्या दरबारात गेले आणि त्यांनी घोषणा केली की, ते त्यांच्या लोकांना, बनी इस्राईलला इजिप्त पासून दूर घेऊन जाण्यासाठी आले आहेत…त्यांच्या बापदादाच्या धरतीवर….
फिरौंनने लोकांना घेऊन जाण्यास नकार दिला आणि म्हंटला, " तू विसरला का, मुसा, की तू माझ्या राजवाड्यात माझ्या मुलासारखा मोठा झाला आहेस? आणि आता तू उपकार विसरून कृतघ्न बनला आहेस…?"
मुसाने उत्तर दिले , " माझ्या अल्लाहने मला मार्गदर्शन केले आहे आणि मला एक संदेशवाहक बनविले आहे…तू मला लहानाचे मोठे केले, या अशा एक मोठ्या उपकारामुळे, मी माझ्या सर्व लोकांना दुःख सहन करायला लावू का ?
फिरौंनने मुसाचे काही ऐकले नाही आणि त्याच्या शिकवणी वर खूप नाराज झाला कारण तो स्वतःला अल्लाह ( ईश्वर) समजत होता…
"तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे, मुसा? कोण आहे तुझा अल्लाह?" त्याने विचारले…
"माझा अल्लाह हा, तो आहे …ज्याने हे विश्व बनविले…त्याला भूतकाळाविषयी पूर्ण ज्ञान आहे…त्याने ही धरती, तुझ्या त्यावर चालण्यासाठी बनविली आणि तोच पाऊस खाली पाठवतो.." मुसा उत्तरला…
"हा हा…", फिरौंन हसला…" , मला माहित आहे की माझ्याशिवाय कोणीच ईश्वर नाही…" मग तो त्याच्या मंत्र्यांकडे वळला आणि म्हणाला, " हमाम, खूप उंच इमारत बनली का? जेणेकरून मी त्याच्या शिखरावर चढू शकेल आणि मुसाच्या अल्लाहला भेटेन…, नक्कीच तो खोटे बोलत आहे…
पण त्याच्या मनात फिरौंनला खात्री नव्हती…त्याने मुसाला घाबरवन्याचा प्रयत्न केला… "मी तुला तुरुंगात टाकेल , मुसा,जर तू म्हणाला की माझ्याशिवाय दुसरा कोणी ईश्वर आहे"..तो म्हणाला. "जर तो बरोबर आहे, तर तू मला काही स्पष्ट निशाण सिध्द करण्यासाठी दाखविले पाहिजे… "
मुसा तयार झाला…अल्लाह ने त्याला दोन चमत्कार दाखविण्याची शक्ती सोबत आशीर्वाद दिला..त्याने त्याची काठी खाली फेकली आणि ती एका सापात बदलली…मग त्याने त्याचा हाथ त्याच्या काखेत नेला आणि बाहेर काढला…तो प्रखरतेने चमकू लागला…यावर दरबारातील लोक म्हणाले, "हा माणूस नक्कीच जादूगार आहे.."
फिरौंनने इजिप्तच्या सगळ्या हुशार जादूगारांना, त्यांची जादू मुसाला दाखविण्यासाठी बोलावले…
एक दिवस आणि वेळ स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आली आणि हे मान्य करण्यात आले की जो स्पर्धेत जिंकेल, तो योग्य आहे, असे मानण्यात येईल…त्या काळी जादूचे खेळ इजिप्त मध्ये खूप प्रसिद्ध होते…त्यामुळे सर्व शहरातून लोक हे पाहण्यासाठी आले…
मुसाने स्पर्धा ठेवण्यासाठी ,फिरौंनचे मन बदलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, "आम्ही जादूगार नाही, आम्ही अल्लाहचे संदेशवाहक आहोत. अल्लाहवर शंका करू नको..तो तुझा नाश करू शकतो…"
पण फिरौंनने निश्चय केला होता की स्पर्धा ठेवायची…कारण तो त्याच्या जादू गारांवर अगदीं खात्री बाळगून होता…
शेवटी मुसा मानला…," ठीक आहे, हे प्रत्येकाला सत्य काय आहे ते सिद्ध करेल…"
जादू गारांनी फिरौंनला विचारले, " जर आम्ही जिंकलो तर तुम्ही पारितोषिक देणार का?" "नक्कीच", फिरौंन उत्तर ला…"मी तुम्हाला उच्च पद ही देईन".
"कोण सुरू करनार?" जादू गारांनी विचारले.."तू का आम्ही ?"
"तुम्ही" मुसा ने उत्तर दिले…
जादूगारांनी त्यांच्या सळया आणि काठ्या खाली फेकल्या, ज्या सापांमध्ये बदलल्या…काही क्षणासाठी मुसाला चिंता वाटली की, ह्याने ती गर्दी प्रभावित झाली असेल…
पण अल्लाह ने त्याला आधार दिला, " काळजी करू नको, मुसा, तू जिंकशील…तुझी काठी फेक" मुसाने तसे केले…आणि त्याची काठी एक मोठा सर्प होऊन त्या सापाने त्याच्या आजूबाजूचे सर्व साप गिळून टाकले…प्रत्येक जण आश्चर्य चकित झाला…ह्याने जादूगारांची पराजय सिद्ध झाली.. आणि सत्याचा विजय झाला…ह्याने हेही सिद्ध झाले, की मुसा आणि हारून हे अल्लाहचे खरे संदेशवाहक होते… जेव्हा जादुगारांना ह्याची जाणीव झाली, ते सगळे गुडघ्यावर पडून वाकून नमन करू लागले…आणि म्हणाले, " आम्ही मूसाच्या अल्लाहवर विश्वास करतो. जो खरोखर विश्वाचा ईश्वर आहे……
फिरौंन यावर संतापला होता आणि ओरडला, " जर तुमचे धैर्य असेल तर तसे करा. मी तुमचा डावा हाथ आणि उजवा पाय कापून टाकेन आणि तुम्हाला झाडांना अटकवेल.."
"तुला जे आनंद देईल ते तू कर," जादूगारांनी उत्तर दिले…,"पण आता आम्ही सत्य निष्ठा स्वीकार केली आहे…आमचा अल्लाह, आमच्या भूतकाळातील जादू दाखविण्याच्या पापासाठी आम्हाला क्षमा करो, जे तू आमच्याकडून जबरदस्तीने करून घेतले…."
थोड्या संख्येने तरुण व्यक्ती, जेव्हा त्यांनी हे घडलेले पाहिले, मुसाच्या धर्माचे अनुयायी बनले…पण ते, त्यांची श्रद्धा उघडपणे जाहीर करण्यास, फिरौंनच्या भीतीमुळे घाबरत होते…
मुसा इजिप्तमध्ये लोकांना उपदेश देत होता…इजिप्त मध्ये एक खूप श्रीमंत माणूस राहत होता "कारून". त्याचा खजिना अगणित होता…त्याने शक्तिशाली माणसे त्याच्या खजिन्याच्या चाव्या सांभाळण्यासाठी ठेवले होते..ते त्या चाव्यांच्या ओझ्याने पार थकून गेले होते…
मुसा नेहमी रस्त्यात आणि शहराच्या चौकात उपदेश द्यायचा…तो त्याच्या लोकांना आठवण करून द्यायचा की, फक्त एका आणि एकाच अल्लाहची आराधना करा..आणि सांसारिक गोष्टींची काळजी करणे थांबवा…त्याचवेळेस कारून तेथून जात होता…भव्य रुबाबदार अंगरखा घातलेला त्याचा पोषाक होता आणि त्याच्या मागे त्याचे सेवक, जे त्याच्या खजिन्याच्या चाव्या सांभाळून होते…चालत होते… त्याच्या संपत्तीचे आणि सामर्थ्याचे , हे प्रदर्शन होते…यामुळे जे तरुण लोक मूसाचे ऐकत होते, त्यांचे ध्यान विचलित झाले… त्यांच्यातले काही, कारूनच्या अवाढव्य संपत्तीला एक मत्सराने भरलेल्या नजरेने पाहण्यासाठी, अल्लाहच्या संदेशाचे शब्द सोडून, तिकडे वळले…त्यांनी या जीवनंतरच्या स्वर्गाच्या सुखापेक्षा, अशा संपत्तीची इच्छा केली… या कारूनच्या संपत्तीच्या आणि सामर्थ्याच्या प्रदर्शनाने मुसाचे कार्य अजुन कठीण केले… मुसाने कारूनला म्हंटले, "अल्लाह ने तुझ्यावर कृपा केली आहे आणि तुला इतकी जास्त संपत्ती दिली आहे…तू गरीबांसाठी दयाळू होऊन त्यांना दान केले पाहिजे…" कारून निर्लज्जपणे फुशारकी मारत म्हणाला, "ही माझी संपत्ती आहे, जी मी माझ्या कौशल्याने आणि बुध्दीने मिळविली आहे…तुझ्या अल्लाहने मला दिली नाही…मी का या संपत्तीला दान देऊ? मी मूर्ख नाही मुसा…" मुसा खूप नाराज झाला…पण तो काही करू शकत नव्हता…कारून त्याची संपत्ती गरिबांना आणि गरजूंना वाटू इच्छित नव्हता…तो स्वार्थी आणि हट्टी होता…आणि असे मानत होता की, त्याची संपत्ती त्याच्या कष्टांचे फळ आहे…आणि अल्लाहची कृपा नाही… अल्लाह त्यांना देतो, जो त्याला आनंदी ठेवतो..(गरिबांना दान करून) आणि त्यांच्याकडून घेतो, जो त्याला नाराज करतो…लवकरच लोकांना कळाले की , स्वर्गाचा आणि धरतीचा भव्य खजिना कोण नियंत्रित करतो… अल्लाहने कारूनला जे पुष्कळ दिले होते, ते त्याच्याकडून घेतले….फुशारकी मारणारा कारून बुडाला…आणि जमिनीत त्याच्या खजिन्याच्या सोबत नष्ट झाला… त्याचा पैसा त्याच्या किंवा कुणाच्याही, काही कामी आला नाही… जेव्हा लोकांनी त्याचे भाग्य पाहिले, त्यांना जाणीव झाली की मुसा बरोबर होता पण तो गर्विष्ठ आणि फुशारकी मारणारा विनाशक होता….(तो कसा बुडाला हे पुढील भागात)
कुराणसत्यकथा
🌊मुसा आणि फिरौंन-4🌊 "फिरौंनला घाबरु नका", मुसा त्याच्या लोकांना म्हणाला. " अल्लाह वर निष्ठा ठेवा आणि त्याला मदत मागा…" मुसा त्याच्या लोकांना इजिप्तपासून त्यांच्या बापदादांच्या (युसुफ आणि याकूब) जमिनीवर घेऊन जाण्यास इच्छुक होता…पण ते इजिप्शियनचे नोकर(गुलाम) होते, त्यामुळे जाऊ शकत नव्हते… मुसाने त्याच्याकडून जितके होऊ शकते तितके त्यांना मदत केली आणि मार्ग दर्शन केले…
जेव्हा फिरौंनला मुसाचा हेतू समजला, त्याने मुसाला आणि तरुण बनी इस्राईलचे लोक, जे मुसाच्या धर्माचे अनुयायी बनले होते, त्यांना मारण्याचा निर्णय घेतला…पण त्याच्या दरबारातील एका दरबाऱ्याला ,जो गुप्तपणे मुसाच्या धर्माचा अनुयायी बनला होता, त्याने फिरौंनला तसे करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. "तुम्ही त्याला का मारू इच्छिता?" त्याने विचारले.."फक्त यासाठी का? की, तो असे मानतो की, तुम्ही त्याचे ईश्वर नाही…"
मग तो धैर्याने बोलला आणि लोकांना त्या शिक्षेची आठवण करून दिली , जी, त्या लोकांवर येणार आहे, ज्यांनी पूर्वी खऱ्या ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे…
या त्याच्याविरोधात खुल्या बंडाने, फिरौंन खूप रागावला आणि त्या माणसाला सुद्धा, मारण्याची धमकी दिली…
जेव्हा फिरौंनच्या क्रौर्यतेने सगळ्या मर्यादा पार केल्या..,अल्लाह ने मुसा आणि त्याच्या लोकांना आज्ञा केली की, रात्री शांततेने इजिप्त सोडून जा…त्यामुळे मुसा,हारून आणि बनी इस्राईल चे लोक शांततेने "काणान" (आताचे पॅलेस्टाईन किंवा फिलिस्तिन) कडे निघाले…जी त्यांच्या बापदादांची जमीन होती…
इजिप्त पासून खूप दूरचा रस्ता होता आणि रस्त्यात नदी होती…(काही म्हणतात तो समुद्र होता).त्यांना दुसऱ्या काठावर जाण्यासाठी, ती नदी पार करायची होती…पण ते तसे करू शकण्याआधी, फिरौंनने शोधून काढले की, त्यांनी सुटका करून घेतली आहे…
तो मोठ्या सैन्यासह तो त्यांच्या मागे गेला…बनी इस्राईल चे लोक, भयंकर घाबरले आणि मुसाकडे वळून म्हणाले, "आता, आपण पकडले गेलो…" "नाही, कधीही नाही," मुसाने उत्तर दिले.."अल्लाह आपल्या सोबत आहे. तो आपल्याला मार्ग दाखवेल…"
या अशा असहाय्यतेच्या वेळी, जेव्हा फिरौंनचे सैन्य मागे होते आणि खोल पाणी समोर होते, त्यांना अल्लाहशिवाय कोणीच मदत करू शकत नव्हते…आणि अल्लाह ने केली. अल्लाह ने मुसाला आज्ञा केली की, त्याच्या काठीने पाण्यावर वार कर…त्याने तसे केले आणि लोकांना त्यामधून चालण्यासाठी, मधला कोरडा रस्ता सोडून, पानी विभागले (दोन भाग झाले..) बनी इस्राईलच्या लोकांनी नदी पार केली आणि सुरक्षितपणे दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचले…
जेव्हा फिरौंनच्या सैन्याने हे पाहिले, ते पाणी पार करण्यासाठी त्याच रस्त्यावरून धावले, जो एका चमत्काराने निर्माण झाला होता…पण जसे ते मध्यभागी पोहोचले, पाणी मोठ्या लहरींच्या रूपाने, वापस आले आणि पूर्ण सैन्य बुडाले…. फिरौंन मरताना ओरडला, "हो, मी विश्वास करतो, बनी इस्राईल ज्याची निष्ठा करतात, तोच ईश्वर आहे…दुसरा कोणताही नाही…" आणि अल्लाह म्हणाला, " तर तू शेवटी मला मानले ".पण, खूप उशीर झाला होता …
(फिरौंनचे शरीर अजूनही तसेच आहे…. संग्रहालयात ठेवलेले आहे…ज्या पाण्यात तो बुडाला होता तो रेड सी ( red sea) आहे असे मानतात…आणि तिथले पाणी हे खूप खारे असल्याने त्याचे शरीर तसेच राहीले..आणि अल्लाहने कुराण मध्ये हे सांगितले आहे की येणाऱ्या पिढ्यांना ते शरीर पाहता यावे आणि त्याला दिलेली शिक्षेची आठवण व्हावी म्हणून ते शरीर तसेच ठेवण्यात येईल….)
नदी पार केल्यानंतर मुसा आणि बनी इस्राइलचे लोक, अशा निर्जन ठिकाणी पोहोचले, जेथे पाणी, झाडे आणि घरे नव्हती…. इस्राइलचे लोक नम्र आणि सौम्य झाले होते…शतकांपासून ते दाबून राहिले होते, त्यामुळे ते धैर्य आणि आत्मविश्वास गमावून बसले होते… इजिप्तमधून सुटकेनंतर ते थकून गेले होते…ते भुकेले होते आणि घाबरलेले होते…आणि त्यांना मार्गदर्शन, मदत आणि आश्वासनं पाहिजे होते… मुसा आणि हारून साठी हे एक कठीण काम होते… मुसा आणि हारूनने त्यांना समजावून सांगितले की, "जर त्यांनी अल्लाहची आज्ञा पाळत राहिले, तर अल्लाह निश्चितपणे त्यांची मदत करेल.. फिरौंनच्या हातून अपमानाच्या जीवनापेक्षा, एक स्वातंत्र्य जीवन आणि सत्य श्रद्धा ही कितीतरी चांगली आहे…"
इतक्या दिवसापासून जे लोक दाबून जीवन जगत होते, त्यांनी त्यांचा आत्मविश्वास आणि काही नवीन करून दाखवायची इच्छा गमावली होती…. त्यांनी तक्रार करण्यास सुरुवात केली, "मुसा, तू आम्हाला कोठे आणले आहे? इथे पाणी नाही…आम्ही काय पिणार आहे? तहानेने आम्ही मारून जावू…" मुसाने अल्लाहला प्रार्थना केली आणि अल्लाहने त्याला म्हंटले की, त्याची काठी, एका खडकावर मार… मुसाने तसे केले आणि बारा पाण्याचे झरे (प्रवाह), त्या कोरड्या खडकातून वाहू लागले…जेणेकरून तेथे प्रत्येकासाठी पुष्कळ पाणी झाले…
त्यांनी मुसाकडे वळून म्हंटले, "आता आम्हाला पाणी आहे, पण अन्नाविषयी काय? आम्ही भुकेले आहोत…आम्ही काय खाणार? पुन्हा मुसाने अल्लाहला प्रार्थना केली आणि अल्लाहने उत्तर दिले, "काळजी करू नको मुसा, तुम्हाला अन्न ही मिळून जाईल". दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा लोक झोपेतूनं उठले, त्यांनी झुडूपांवर काही मऊ आणि पांढरे पाहीले…हे "मन्न" होते…एक प्रकारचे अन्न ज्याचा आकाशातून थेंबासारखा पाऊस झाला होता…त्याची चव गोड होती… दिवसा, जोऱ्याचां वारा आला आणि त्याच्यासोबत एक खूप मोठा क्वेलस (लहान पक्षी) चा कळप उडत आला…आणि जमिनीवर सर्वीकडे बसला…लोकांनी त्यांना हातांनी पकडले आणि जेवणासाठी भाजले…हे "सलवा" होते…. त्या दिवसापासून बनी इस्राइलच्या लोकांना रोज मन्न आणि सलवा भेटू लागले…पण अल्लाहने त्यांना दुसऱ्या दिवसासाठी अन्न जमा करून ठेवण्यास मनाही केली… अल्लाहने त्यांना अन्न आणि पाणी पुरविल्यावर, लोक पून्हा मुसा कडे येऊन म्हणाले, "आम्हाला येथे घरे ही नाही आणि सावली ही नाही, मुसा…आम्ही उन्हाच्या उष्णतेने मरून जाऊ, असे आम्हाला वाटते… मुसाने अल्लाहला प्रार्थना केली..अल्लाहने उन्हापासून त्यांच्या रक्षणासाठी भारी ढग पाठविले…
लवकरच त्यांचा त्रास कमी होईल, जेव्हा ते त्यांना वचन दिलेल्या, त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीवर ( कानान म्हणजेच फिलिस्तीन किंवा palestine) पोहोचतील आणि हे सर्व, एका चांगल्या कारणासाठीच होते की त्यांनी इजिप्त सोडले, हे सर्व त्यांना समजावणे मुसाला कठीण होऊन बसले… मुसाने अल्लाहच्या मदतीने त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण केल्या…. त्यांनी आपसांत वाद आणि भांडण सुरू केले… ते म्हणाले, "मुसा मन्न आणि सलवा पुरेसे नाही…आम्हाला कांदा, लसूण, डाळ आणि हिरव्या भाज्या पाहिजेत…तुझ्या अल्लाहला हे देण्यास सांग" त्यांच्या कृतघ्नतेने मुसा नाराज झाला आणि म्हणाला, "इतक्या चांगल्या अन्ना ऐवजी तुम्हाला या सामान्य वस्तू पाहिजे का? बरं, मग तुम्ही एका शहरात जा आणि तेथे राहा जेथे तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल…"
लवकरच ते एका शहरा पासून जात असताना त्यांनी पाहिले की , लोक दगडाच्या पुतळ्याची आराधना करत होते….ते मुसा ला म्हणाले की, " मुसा, आमच्यासाठी ही अशी प्रतिमा बनव". मुसा खूप नाराज झाला आणि त्याला वीट आला," अरेरे…", तो म्हणाला…," तुम्ही खरेच अज्ञानी आहात…तुम्हाला अजूनही तुमच्यासाठी, एकाच आणि खऱ्या अल्लाहच्या ऐवजी, पुतळे(प्रतिमा) पाहिजे का? बनी इस्राइलच्या लोकांनी आग्रह केला… खूप थोडे होते, जे खरंच अल्लाहवर विश्वास करत होते, ते सोडून बाकी सर्व खरंच अज्ञानी आणि खूप कृतघ्न होते….
अल्लाहने मुसाला वचन दिले होते की, जेव्हा त्याचे लोक इजिप्त सोडतील, त्याला अल्लाहचा कायदा देण्यात येईल…म्हणून इजिप्त सोडल्यानंतर तो "तूर" (माउंट सिनिन) या डोंगरावर प्रार्थनेसाठी गेला….त्याने त्याच्या भावाला हारूनला, "जेव्हा तो दूर असेन तेव्हा, त्याच्या लोकांची काळजी घेण्यास सांगितले…"
तेथे मुसाने अल्लाहला चाळीस दिवस पूर्ण भक्तीने प्रार्थना केली, "हे माझ्या प्रभु….माझ्यासमोर प्रकट हो, जेणेकरून मी तुला पाहू शकेन", त्याने प्रार्थना केली…. आणि अल्लाहने उत्तर दिले, "हे तुझ्यासाठी शक्य नाही, की तू मला प्रत्यक्षपने पाहू शकशील…पण जर तू आग्रह करत असशील तर, त्या टेकडीकडे पाहा….जर मला पाहण्यासाठी, तू ते सहन करू शकला, तर तू पाहू शकतो…". मुसाने आग्रह केला आणि जेव्हा अल्लाहने त्याची तेजस्विता (प्रकाश,चमक) टेकडीला दाखविली…,ती टेकडी विखरली आणि मुसा बेशुद्ध होऊन खाली पडला…
जेव्हा तो शुध्दीवर आला, म्हणाला, "तुझा गौरव असू दे, हे अल्लाह…मी तुझी क्षमेची याचना करतो आणि मी तो पहिला विश्वास करणारा आहे…" अल्लाहने मुसाला त्याचा कायदा दिला आणि त्याचा ग्रंथ दिला "तोरैत (तोराह) आणि म्हणाला, " मुसा मी तुझ्याशी संभाषण केले…आणि तुला एक प्रेषित (संदेष्टा) म्हणून निवडले….म्हणून मी जे दिले आहे ते घे आणि कृतज्ञ (आभारी) राहा..ते मजबुतीने पकड…आणि तुझ्या लोकांना त्या खऱ्या श्रध्येचे अनुसरण करावयास सांग…"
जेव्हा मुसा दूर, तूर डोंगरावर होता, त्याच्या लोकांनी त्याच्याविरुद्ध बंड केले… तेथे त्यांच्यामध्ये एक जादूगार होता.. सामरी…
त्याने त्या लोकांकडून सोन्याचे अलंकार जमा केले आणि त्यांना वितळविले….ते पातळ सोने एका साच्यात ओतले आणि एक सोन्याचे बछडे बनविले जे आवाज काढू शकत होते….मग त्याने लोकांना त्याची आराधना करण्यास सांगितले…. जेव्हा मुसा तूर डोंगरावरून वापस आला आणि त्याच्या लोकांना एका सोन्याच्या बछड्याची आराधना करतांना पाहिले…तो उग्र झाला…त्याने त्याच्या भावाला, त्याची दाढी धरून ओढले…आणि म्हणाला," मी तुला सांगितले नव्हते का, की त्यांना मार्ग दर्शन कर आणि माझ्या अनुपस्थितीत त्यांची काळजी घे? तू ते का केले नाही? हारून म्हणाला, "भाऊ, या लोकांसमोर माझ्यावर रागावू नको…अल्लाहला माहीत आहे, की मी त्यांना म्हंटले होते की, ते जे करत आहेत, ते करू नका…जर मी त्यांच्याशी जास्त कठोर नव्हतो, तर ते केवळ या भीती पायी की ,जेव्हा तू दूर असशील, तेव्हा ते आपसांत भांडतील….आणि तू वापस आल्यावर माझ्यावर रागावशील…"
मुसा त्याच्या लोकांकडे वळला आणि म्हणाला, "माझ्या लोकांनो, तुम्ही हे का केले? तुम्हाला अल्लाहने त्याच्या कृपेचे वचन दिले नव्हते का? मग का तुम्ही एवढ्या लवकर त्याला विसरला? तुम्हाला स्वतःला मारण्यासाठी, अल्लाहचा प्रकोप पाहिजे का? कारण तुम्ही, मला दिलेले तुमचे वचन तोडले…." त्या सोन्याच्या बछड्याकडे इशारा करत तो म्हणाला," आणि आता पाहा तुमच्या आराध्याकडे…आपण त्याला आगीत वितळवू आणि त्याचे अवशेष समुद्रात टाकू…एक आणि फक्त एक अल्लाहच्या शिवाय दुसरा कोणताही प्रभु नाही…माझ्या लोकांनो, तुम्ही, एक सोन्याचा बछडा तयार करून आणि त्याची आराधना करून, एक अपराध केला आहे… आता खऱ्या अल्लाहकडे वळा, आणि त्याची क्षमा याचना करा…आणि त्याला असे बलिदान द्या की, तो तुमच्यावर दया करो…"
मुसाचे लोक आधी होते तसेच हट्टी होते..त्यांनी, जोपर्यंत ते अल्लाहला त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही तोपर्यंत, अल्लाह वर विश्वास ठेवण्यास नकार दिला…मुसाने त्याच्याकडून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला की, ते शक्य नाही, पण त्यांनी आग्रह धरला….
शेवटी, मुसाने, त्यांच्यामधील सत्तर लोकांना निवडले…आणि त्यांना त्याच्यासोबत तूर डोंगरावर घेऊन गेला…,जेथे त्याने अल्लाहशी संभाषण केले होते..पण हेही त्यांना पटवून देण्यात पुरेसे नव्हते…त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी अल्लाहला पाहण्याचा आग्रह धरला… अल्लाह त्यांच्या हट्टीपणावर रागावला…भयानक वीज चमकली, मेघ गर्जना झाली आणि भूकंप आला…आणि सर्व सत्तर माणसे मृत होऊन खाली पडली… जेव्हा मुसाने हे पाहीले, त्याने अल्लाहला पूर्ण प्रामाणिक ते ने याचना केली की, त्याच्या लोकांना, त्यांच्या अविश्वासाठी क्षमा कर, "हे माझ्या प्रभु, आमच्यावर दया कर…आम्हाला सर्वांना, काही लोकांच्या मूर्खते मुळे, नष्ट करू नकोस."
अल्लाहने दया दाखविली आणि मृत लोकांना पुन्हा जीवन देऊन, वापस आणले….जेणेकरून ते कृतज्ञ बनतील…ते त्यांचे डोळे चोळत उठले आणि चमत्कार पाहून चकीत झाले… अल्लाहने म्हंटले, "माझी कृपा त्यांच्यासाठी असेल जे योग्य करतील आणि दान देतील आणि त्यांच्यासाठी असेल जे प्रेषितांना (संदेशवाहक) ज्यांचे नाव त्यांच्या ग्रंथात , इंजिल( बायबल) आणि तोरैत ( तोराह) आहे, अनुसरण करतील…..ते असे असतील, ज्यांची भरभराट होईल…
जेव्हा हे सत्तर लोक, त्यांच्या लोकांकडे वापस गेले, त्यांनी त्यांचा अनुभव वर्णन केला आणि म्हणाले की मुसा खरंच अल्लाहचां एक संदेश वाहक आहे…त्यांनी त्यांना जे सांगितले त्यावरही विश्वास करण्यास सांगितले…पण लोक अजूनही शंका करत होते…आणि ऐकण्यासाठी इच्छुक नव्हते….
मुसाने अल्लाहला प्रार्थना केली आणि पुन्हा एकदा अल्लाहने, तूर डोंगर उचलून, त्या लोकांच्या डोक्यावर आणून, त्यांना चमत्कार दाखविला. जेव्हा त्यांनी पाहिले की, तो डोंगर त्यांच्या वर पडणारच आहे, ते घाबरले आणि ओरडले, "आम्ही विश्वास करतो की, मुसा हा अल्लाह चा संदेश वाहक आहे आणि तोरैत हा अल्लाह चा प्रकट झालेला ग्रंथ आहे…..
…मराठीत भाषांतर असलेले कुराण वाचावे…
कुराणसत्यकथा
🟢 मूसा आणि खिझ्र -5🟢 खीझ्र एक ज्ञानी माणूस होता… जेव्हा मुसाने खिझ्रच्या ज्ञानाविषयी ऐकले, तो एका सहकाऱ्यासोबत त्याला शोधण्यासाठी निघाला….आणि जोपर्यंत त्यांना तो भेटत नाही, तोपर्यंत विश्रांती घ्यायची नाही असा निर्णय घेतला…
जेव्हा ते एका जागी पोहोचले जेथे दोन पाण्याचे प्रवाह(झरे) एका प्रवाहात एकत्र होऊन वाहत होते…, मुसा खूप थकला आणि एका खडकावर गाढ झोपला…
तेथे, मासा जो त्यांनी त्यांच्या दुपारच्या जेवणासाठी आणला होता, जिवंत झाला आणि त्याने पाण्यात उडी मारली…आणि पोहत एक चंदेरी रेषा बनवत दूर गेला…. मुसाच्या सहकाऱ्याने हे पाहीले पण याबाबत मुसाला सांगण्यास विसरला…त्यामुळे त्यांनी, जोपर्यंत मुसाला भूक लागत नाही आणि तो सहकाऱ्याला मास्या विषयी विचारत नाही, तोपर्यंत, त्यांचा प्रवास चालू ठेवला…
त्यानंतर, सहकाऱ्याने मुसाला जे घडले आहे ते सांगितले…मुसाला त्या क्षणी वाटले की, त्याला खीझ्र कडे जाण्यासाठी, मार्ग दाखविण्यासाठी तो एक संकेत होता….म्हणून तो वापस त्या जागी गेला, जेथे तो गाढ झोपला होता…आणि त्याला एक संतासारखा माणूस त्याच खडकावर बसलेला दिसला…तो खीझ्र होता….
मुसाने त्याला अभिवादन केले आणि म्हंटले, जे अल्लाह खिझ्र च्या द्वारे मुसाला माहीत करवून देणार होते…ते तो जाणण्यासाठी आला आहे…
खिझ्र म्हणाला, अल्लाहने मला त्याच्या काही रहस्याचे ज्ञान दिले आहे….जे तुला माहित नाही…तुला ते विचित्र वाटेल आणि त्यामुळे जेव्हा तू माझ्यासोबत असशील, तेव्हा तुला स्वतःला प्रश्न विचारण्यापासून थांबवणे, हे तुझ्यासाठी अवघड होईल…
पण जेव्हा मुसाने वचन दिले की, तो संयमी राहील. खिझ्र मुसाला त्याच्या सोबत घेऊन जाण्यास आणि शिकण्यास, या अटीवर की तो फक्त लक्ष देऊन पाहिलं आणि कोणतेही प्रश्न विचारणार नाही, तयार झाला…
मुसा खिझ्र सोबत गेला…लवकरच ते एका नदीवर आले आणि खिझ्र ने नदी पार करण्यासाठी, एक नाव भाड्याने घेतली…नावे वरील लोक खिझ्र ला ओळखत होते…आणि त्यांना नदी पार करवून देण्यासाठी, त्यांनी कोणतेही शुल्क घेतले नाही…
जेव्हा ते नदी पार करत होते, खिझ्र ने एक फळी तोडून, नावेत एक छिद्र केले…..हे जास्त विचित्र होते… मुसा यावर नाराज झाला…आणि खिझ्र ला म्हणाला,…"या अशाप्रकारे, त्यांच्या दयाळुते ची तू भरपाई करणार आहे का? तू ते का केले?"
"मी तुला म्हटले नव्हते का, की कोणताही प्रश्न विचारायचा नाही?", खिझ्र बोलला….
त्याच वेळेस एक पक्षी आला आणि नौकेच्या पुढच्या निमुळत्या भागावर बसला आणि एक थेंब पाणी पिला…तिकडे इशारा करून खिझ्र म्हणाला," अल्लाह च्या ज्ञान शी तुलना करतांना, जे एका महासागरा सारखे आहे, आपले ज्ञान त्या एका थेंबासारखे आहे…"
मुसाला त्याची चूक कळली, वचनाची आठवण करून त्याने माफी मागितली, "मी पुढच्या वेळेस जास्त सावध राहील….", तो म्हणाला…..
जेव्हा ते नदीच्या पलीकडे, शहरात पोहोचले आणि ते त्या शहरातून जात असताना, त्यांनी एका मुलाला पाहिले…काहीच खास कारण नसतांना खिझ्र ने त्या मुलाला मारले…..
हे मुसासाठी सहन करने खूप कठीण होते….तो त्याचे वचन विसरला आणि त्याने रागाने विचारले," त्या निरागस मुलाला तू का मारले?"
खिझ्रने काहीच उत्तर दिले नाही….त्याने फक्त मुसाला त्याच्या वाचनाची आठवण करून दिली…आणि म्हणाला," जर तू पुन्हा एकदा तुझे वचन तोडले तर मी तुला सोडून जाईल"
मुसाणें माफी मागितली…आणि वचन दिले की पुन्हा प्रश्न विचारणार नाही… लवकरच ते दुसऱ्या शहरात पोहोचले जेथे, कुणालाही आश्रय देण्यास नाखूष असे लोकं होते….त्यांनी मुसा आणि खिझ्र, या प्रवाश्यांना कोणतेही अन्न आणि निवारा दिला नाही… खिझ्र एका भिंतीजवळ आला, जी अगदी कोसळणारच होती… खिझ्र ने ती भिंत, कामाचे काहीही पैसे न घेता दुरुस्त केली….
मुसाला ही निर्दयपनाच्यासाठी दयाळूता कळाली नाही….तो स्वतःला विचारण्यापासून थांबवू शकला नाही, "जर ते लोक आपल्याशी इतके निर्दयी राहिले, तर तू हे का केले? कमीत कमी त्यामुळे काही अन्न विकत घेण्यासाठी, तू काही पैसे घेऊ शकत होता"
"अरेरे", खिझ्र म्हणाला…," तू संयम ठेऊ शकला नाही…आपण वेगळे होण्याची ही वेळ आहे…पण मी तुला सांगतो की मी का केले आणि मी काय केले" "ती नाव ज्या मध्ये मी छिद्र पाडले, ती गरीब लोकांची होती, ज्यांनी त्यापासून त्यांच्या जीवनाचा उदरनिर्वाह मिळवला… नदीच्या पलीकडे राहणारा राजा खूप क्रूर आहे आणि सगळी चांगली चालणारी नावे जबरदस्तीने घेऊन टाकतो….त्याने ती नाव ही घेतली असती…म्हणून मी त्यात छिद्र पाडले…" "पण तू त्या मुलाला का मारले?" मुसाने विचारले…
"मी त्याला मारले कारण त्याचे माता पिता खूप साधे आणि सद्गुणी लोक आहेत," खिझ्र म्हणाला," पण तो एक खूप दुष्ट व्यक्ती म्हणून मोठा होणार होता…आणि त्यांचे जीवन दयनीय करणार होता…. यामुळे ते नाराज झाले असतील पण या वेदना आणि दुःख खूप कमी आहे, त्यापेक्षा जेव्हा तो मोठा होऊन एक पापी बनला असता आणि तेव्हा त्यांना जे सहन करावे लागले असते….अल्लाह लवकरच त्यांना दुसरा मुलगा देईल जो त्यांच्या वृधदापकाळात एक आनंद देईल"
"शेवटच्या कृत्य काय होते? तू ती भिंत का नीट केली, त्या लोकांनी आपल्याला इतका निर्दयपना दाखवूनही," मुसा म्हणाला….
"बरं, मी तसे केले कारण त्या भिंतिखाली, दोन अनाथ मुलांच्या मालकीचा खजिना लपलेला आहे…" खिझ्र म्हणाला…," त्यांचे पिता खूप सद्गुणी मनुष्य होते…आणि ही अल्लाह ची ईच्छा आहे की जेव्हा ही मुले मोठी होतील, तेव्हा खजिना शोधून काढतील…"
मुसा समोर हे सर्व स्पष्ट केल्यानंतर खिझ्र म्हणाला," लक्षात घे, मी स्वतःहून काहीही केलेले नाही, ही सर्व अल्लाह ची इच्छा होती…" मग खिझ्र मुसाला आश्चर्यचकित सोडून निघून गेला…आणि तो या विचारांत हरवून गेला, की अल्लाह च्या रहस्यांविषयी मनुष्याला किती कमी माहीत आहे…खरंच प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि एकट्या अल्लाहला सर्व माहीत आहे…
(Surah Al- Kahf (Chapter 18, verses 60-82). सुरत 18 अल कहफ: आयत 60-82 मध्ये ही कथा आहे….मराठी भाषांतर असलेले कुराण वाचा…
कुराणसत्यकथा
🍀🌼🌺बनी इस्राइल 6🌺🌼🍀 बनी इस्राइलचे लोक, एक खूप लांब प्रवास करून, "सिना" या ठिकाणी पोहोचले, जे ठिकाण, त्यांना ज्या त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीचे (आधीचे कानान(canaan) फिलिस्तीन, palestine) वचन दिले होती…त्याच्या जवळच होते… मुसाने त्यांना म्हंटले की, त्यांच्या पूर्वजांच्या शहरात प्रवेश करण्यासाठी आणि त्यांची गेलेली जमीन आणि संपत्ती मागण्यासाठी, स्वतःला तयार करा, मुसाने म्हंटले, की धैर्याने, आणि अल्लाह वरच्या कणखर निष्ठेने, जमिनीत प्रवेश करा…जर असे कराल तर , विजय त्यांचाच होईल, असे आश्वासन दिले… त्यांनी शहरात प्रवेश करण्यास नकार दिला…मुसा ने बारा माणसे निवडली आणि त्यांना त्या शहरातील स्थिती पाहून येण्यास पाठविले… जेव्हा हे लोक वापस आले, दोन माणसे सोडून बाकी सर्वांनी तेथील शत्रुंच्या सामर्थ्याविषयी भयानक कहाण्या सांगितल्या…लोक अस्वस्थ झाले आणि अशा कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यास नकार दिला… "आम्ही येथे बसू आणि वाट पाहू, मुसा. तू आणि तुझा अल्लाह जावू शकतो आणि शत्रूशी लढू शकतो…", ते म्हणाले…मुसा काहीच मदत करू शकत नव्हता… मुसा त्यांच्या या वागण्याच्या पद्धतीवर नाराज आणि रागावलेला होता…त्याने त्याचे उरलेले आयुष्य, त्यांना अल्लाहचा संदेश समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात खर्च केले… स्वतःची मदत कशी करायची आणि आळशी आणि भांडत राहणे, योग्य नाही, हे शिकवण्यात गेली…
🍂🏵️शिस्य🏵️🍂 मुसाच्या मृत्युनंतर त्याचा मित्र आणि अनुयायी "शिस्य" याने, त्याचे कार्य पुढे चालू ठेवले…मुसाने आधी, जे काही सांगितले होते, ते उपदेश त्याने तसेच देने चालू ठेवले…आणि बनी इस्राइलच्या लोकांना, वापस येण्यास आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्यास खूप प्रेरीत केले…त्याने लढाई करण्यासाठी, त्या लोकांचे नेतृत्व केले…आणि त्यांना एका मागून एक खूप लढाया करावयास, त्यांचे नेतृत्व करत, घेऊन गेला…जोपर्यंत ते पुन्हा एकदा, त्यांच्या वचन दिलेल्या भूमीच्या दारात पोहोचत नाहीत…
शेवटचा विजय झाल्यावर, अल्लाह ने त्यांच्या संदेशवाहकाकडून, त्यांना आदेश दिला की शहरात विनम्रतेने…अल्लाहला वाकून आभार मानून एक प्रार्थना करत, प्रवेश करा…
त्यांनी या ऐवजी, फुशारकी मारत, त्यांचा विजय साजरा करत प्रवेश केला…त्यांनी, अल्लाहच्या कृपा आणि मदतीसाठी, ज्या अल्लाहने त्यांना, गुलामगिरीतून वाचवून, शांती आणि स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे त्यांना त्यांचे घर आणि जमीन वापस मिळाली, अल्लाहचे आभार मानत प्रार्थना केली नाही…त्यांनी, जे शब्द त्यांना प्रवेश करतांना बोलावयास सांगितले होते, ते अल्लाहचे शब्द बदलले आणि त्या शब्दांची थट्टा उडविली…हे त्यांच्या मर्यादा पेक्षा अती झाले होते…अल्लाहने या कृतघ्न आणि अवज्ञाकारी लोकांना भयंकर दंड दिला…
💖हरझाकील💖 मुसाचा दुसरा अनुयायी हरझाकील ने सुद्धा बनी इस्राइलच्या लोकांना, अल्लाहने दिलेल्या संदेशाच्या मार्गावर लढत राहण्यास वारंवार प्रेरित केले… एकदा त्याने खूप अडचणीने आणि एक पूर्ण फौज जमा केली…तो शत्रूवर एक खास आक्रमण करण्याची योजना करून होता…तेव्हा हजारो लोकांनी त्याला एकटे सोडले…ते पळून गेले आणि मरणापासून सुटका करण्यासाठी, एका दरीत लपून बसले… हरझाकिल, या भित्रेपणा आणि त्याला एकटे सोडून जाण्याची कृती वर, इतका निराश झाला आणि दुखावला की त्याने अल्लाह ला प्रार्थना केली…अल्लाह ने त्या पळून गेलेल्या लोकांना कठोर शिक्षा केली…. त्याच दरीत जेथे त्यांनी आश्रय घेतला होता, त्यांच्या वर मृत्यू आला…ते मृत झाले, जेथे ते जिवंत राहण्यासाठी आले होते… काही दिवसांनंतर जेव्हा हरझाकिल त्या दरीतून गेला आणि त्याने त्या युद्धातून पळून गेलेल्यांचे भाग्य (विधिलिखित) पाहिले, त्याला खूप वाईट वाटले…त्याने पुन्हा अल्लाहची प्रार्थना केली, या वेळेस दयेसाठी प्रार्थना केली…आणि अल्लाहने, जो सर्वांत मोठा क्षमा करणारा आहे, त्यांना त्यांचे जीवन पुन्हा वापस दिले …की ते पुन्हा अल्लाह कडे वळतील आणि कृतज्ञ राहतील…आणि असा गुन्हा, पुन्हा करणार नाही…
🌷शम्मील🌷(samuel)
शामोल हा एक पवित्र व्यक्ती होता…त्यानेही बनी इस्राइल च्या लोकांचे , शत्रूं विरूध्द मार्गदर्शन आणि नेतृत्व केले…अल्लाह ने त्यांना संदेश वाहक बनविले…. जेव्हा शामोल वृद्ध झाला, बनी इस्राइल त्याला म्हणाले, " आम्हाला वाटते तू आम्हाला एक राजा निश्चित करून द्यावा, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि लढाईत आमचे नेतृत्व करण्यासाठी…" शामोल त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून म्हणाला, की ते सर्व खूप ज्ञानी नाहीत पण त्यांनी आग्रह धरला…
पुढील भाग लवकरच… (आता ही त्या देशांमध्ये जी लढाई चालली आहे…त्याचा इतिहास इथूनच सुरू झालेला आहे…तिकडील लढाईचे वातावरण समजण्यासाठी हा इतिहास समजून घ्यावा लागतो…इस्राइल या देशाचे लोकं हे मूसाचे (a) अनुयायी आहेत…पण मुसा नंतर ईसा(a) आणि मुहम्मद(saw) हे प्रेषित आले, त्यामुळे तिन्ही धर्माच्या लोकांचा एकाच जागेचा इतिहास आहे…) प्रत्येक कथेत, एका आणि फक्त एकाच अल्लाहवर, परमेश्वरावर आणि परमात्म्यावर विश्वास ठेवण्यास सांगितला आहे…ज्याची प्रतिमा,पुतळा बनूच शकत नाही…कारण तो कसा दिसतो किंवा आहे…हे पाहण्याचे सामर्थ्य मनुष्याच्या डोळ्यांत नाही…कुणीच. त्या सर्व शक्तिमान निर्मात्याला पाहिले नाही…
कुराणसत्यकथा
🍀🌼🌺बनी इस्राइल 6🌺🌼🍀 बनी इस्राइलचे लोक, एक खूप लांब प्रवास करून, "सिना" या ठिकाणी पोहोचले, जे ठिकाण, त्यांना ज्या त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीचे (आधीचे कानान(canaan) फिलिस्तीन, palestine) वचन दिले होती…त्याच्या जवळच होते… मुसाने त्यांना म्हंटले की, त्यांच्या पूर्वजांच्या शहरात प्रवेश करण्यासाठी आणि त्यांची गेलेली जमीन आणि संपत्ती मागण्यासाठी, स्वतःला तयार करा, मुसाने म्हंटले, की धैर्याने, आणि अल्लाह वरच्या कणखर निष्ठेने, जमिनीत प्रवेश करा…जर असे कराल तर , विजय त्यांचाच होईल, असे आश्वासन दिले… त्यांनी शहरात प्रवेश करण्यास नकार दिला…मुसा ने बारा माणसे निवडली आणि त्यांना त्या शहरातील स्थिती पाहून येण्यास पाठविले… जेव्हा हे लोक वापस आले, दोन माणसे सोडून बाकी सर्वांनी तेथील शत्रुंच्या सामर्थ्याविषयी भयानक कहाण्या सांगितल्या…लोक अस्वस्थ झाले आणि अशा कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यास नकार दिला… "आम्ही येथे बसू आणि वाट पाहू, मुसा. तू आणि तुझा अल्लाह जावू शकतो आणि शत्रूशी लढू शकतो…", ते म्हणाले…मुसा काहीच मदत करू शकत नव्हता… मुसा त्यांच्या या वागण्याच्या पद्धतीवर नाराज आणि रागावलेला होता…त्याने त्याचे उरलेले आयुष्य, त्यांना अल्लाहचा संदेश समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात खर्च केले… स्वतःची मदत कशी करायची आणि आळशी आणि भांडत राहणे, योग्य नाही, हे शिकवण्यात गेली…
🍂🏵️शिस्य🏵️🍂 मुसाच्या मृत्युनंतर त्याचा मित्र आणि अनुयायी "शिस्य" याने, त्याचे कार्य पुढे चालू ठेवले…मुसाने आधी, जे काही सांगितले होते, ते उपदेश त्याने तसेच देने चालू ठेवले…आणि बनी इस्राइलच्या लोकांना, वापस येण्यास आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्यास खूप प्रेरीत केले…त्याने लढाई करण्यासाठी, त्या लोकांचे नेतृत्व केले…आणि त्यांना एका मागून एक खूप लढाया करावयास, त्यांचे नेतृत्व करत, घेऊन गेला…जोपर्यंत ते पुन्हा एकदा, त्यांच्या वचन दिलेल्या भूमीच्या दारात पोहोचत नाहीत…
शेवटचा विजय झाल्यावर, अल्लाह ने त्यांच्या संदेशवाहकाकडून, त्यांना आदेश दिला की शहरात विनम्रतेने…अल्लाहला वाकून आभार मानून एक प्रार्थना करत, प्रवेश करा…
त्यांनी या ऐवजी, फुशारकी मारत, त्यांचा विजय साजरा करत प्रवेश केला…त्यांनी, अल्लाहच्या कृपा आणि मदतीसाठी, ज्या अल्लाहने त्यांना, गुलामगिरीतून वाचवून, शांती आणि स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे त्यांना त्यांचे घर आणि जमीन वापस मिळाली, अल्लाहचे आभार मानत प्रार्थना केली नाही…त्यांनी, जे शब्द त्यांना प्रवेश करतांना बोलावयास सांगितले होते, ते अल्लाहचे शब्द बदलले आणि त्या शब्दांची थट्टा उडविली…हे त्यांच्या मर्यादा पेक्षा अती झाले होते…अल्लाहने या कृतघ्न आणि अवज्ञाकारी लोकांना भयंकर दंड दिला…
💖हरझाकील💖 मुसाचा दुसरा अनुयायी हरझाकील ने सुद्धा बनी इस्राइलच्या लोकांना, अल्लाहने दिलेल्या संदेशाच्या मार्गावर लढत राहण्यास वारंवार प्रेरित केले… एकदा त्याने खूप अडचणीने आणि एक पूर्ण फौज जमा केली…तो शत्रूवर एक खास आक्रमण करण्याची योजना करून होता…तेव्हा हजारो लोकांनी त्याला एकटे सोडले…ते पळून गेले आणि मरणापासून सुटका करण्यासाठी, एका दरीत लपून बसले… हरझाकिल, या भित्रेपणा आणि त्याला एकटे सोडून जाण्याची कृती वर, इतका निराश झाला आणि दुखावला की त्याने अल्लाह ला प्रार्थना केली…अल्लाह ने त्या पळून गेलेल्या लोकांना कठोर शिक्षा केली…. त्याच दरीत जेथे त्यांनी आश्रय घेतला होता, त्यांच्या वर मृत्यू आला…ते मृत झाले, जेथे ते जिवंत राहण्यासाठी आले होते… काही दिवसांनंतर जेव्हा हरझाकिल त्या दरीतून गेला आणि त्याने त्या युद्धातून पळून गेलेल्यांचे भाग्य (विधिलिखित) पाहिले, त्याला खूप वाईट वाटले…त्याने पुन्हा अल्लाहची प्रार्थना केली, या वेळेस दयेसाठी प्रार्थना केली…आणि अल्लाहने, जो सर्वांत मोठा क्षमा करणारा आहे, त्यांना त्यांचे जीवन पुन्हा वापस दिले …की ते पुन्हा अल्लाह कडे वळतील आणि कृतज्ञ राहतील…आणि असा गुन्हा, पुन्हा करणार नाही…
🌷शम्मील🌷(samuel)
शामोल हा एक पवित्र व्यक्ती होता…त्यानेही बनी इस्राइल च्या लोकांचे , शत्रूं विरूध्द मार्गदर्शन आणि नेतृत्व केले…अल्लाह ने त्यांना संदेश वाहक बनविले…. जेव्हा शामोल वृद्ध झाला, बनी इस्राइल त्याला म्हणाले, " आम्हाला वाटते तू आम्हाला एक राजा निश्चित करून द्यावा, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि लढाईत आमचे नेतृत्व करण्यासाठी…" शामोल त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून म्हणाला, की ते सर्व खूप ज्ञानी नाहीत पण त्यांनी आग्रह धरला…
पुढील भाग लवकरच… (आता ही त्या देशांमध्ये जी लढाई चालली आहे…त्याचा इतिहास इथूनच सुरू झालेला आहे…तिकडील लढाईचे वातावरण समजण्यासाठी हा इतिहास समजून घ्यावा लागतो…इस्राइल या देशाचे लोकं हे मूसाचे (a) अनुयायी आहेत…पण मुसा नंतर ईसा(a) आणि मुहम्मद(saw) हे प्रेषित आले, त्यामुळे तिन्ही धर्माच्या लोकांचा एकाच जागेचा इतिहास आहे…) प्रत्येक कथेत, एका आणि फक्त एकाच अल्लाहवर, परमेश्वरावर आणि परमात्म्यावर विश्वास ठेवण्यास सांगितला आहे…ज्याची प्रतिमा,पुतळा बनूच शकत नाही…कारण तो कसा दिसतो किंवा आहे…हे पाहण्याचे सामर्थ्य मनुष्याच्या डोळ्यांत नाही…कुणीच. त्या सर्व शक्तिमान निर्मात्याला पाहिले नाही…
कुराणसत्यकथा
ताबूतसकिना
❤️💚💕ताबूत सकीना💕💚❤️💚 ताबूत सकीना म्हणजेच The ark of the Covenant. यामध्ये (पेटीत) मूसा (अ) आणि आणखी दुसऱ्या प्रेषितांचे (संदेश वाहकांचे) काही पवित्र अवशेष होते म्हणजेच आहेत…
लढाई करता वेळेस, बनी इस्राइलचे लोक या पेटीला स्वतःच्या सैन्यासमोर समोर, पुढच्या रांगेत ठेवायचे…आणि अल्लाह त्यांना त्या पेटीच्या उज्ज्वल भविष्य सूचकतेच्या गुणांमुळे, विजय देत असे…
प्रेषितांच्या अवशेषामुळे, ज्यांनी प्रेषित अल्लाहच्या इच्छेने लोकांसमोर संदेशवाहक म्हणून स्वतःला प्रस्तुत केले, पुढे न पाहिलेल्या मदतीचे आश्वासन मिळायचे….
"ताबूत सकीना" मध्ये अल्लाहने मुसाला तूर डोंगरावर जो ग्रंथ दिला, तो, एका शुभ दगडाच्या दोन भागावर अंतर्लिखित आहे, त्यात मुसाला दिलेला कायदा म्हणजे नीतिशास्त्र आणि आराधना अंतर्लिखित केला गेला आहे, ज्याला टेन कमांडमेंटस असे म्हणतात, जे तोराह या ग्रंथात आहेत. आणि मूसाची पवित्र काठी आहे…
हा "ताबूत सकीना", जो तिन्ही धर्मात शुभ मानला जातो यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम, हा सध्या कुठे आहे हे कुणालाही माहीत नाही…पण सर्व त्याच्या शोधात आहे…कारण तो कसा आणि केव्हा गायब झाला? याचा इतिहास काय? आणि तो प्राप्त झाल्यावर काय काय या जगात घडणार आहे, याचे प्राचीन पुस्तकांमध्ये जे भाकीत आहे, यांविषयी जे भविष्य वर्तविले आहे त्याविषयी येणाऱ्या लेखांत असेल…(Wikipedia search करू शकता..)
🌿🌿तलुत 🌿🌿
शम्मिल ने अल्लाह ला प्रार्थना केली आणि अल्लाहच्या मदतीने, बनी अमीनच्या जमातीतल्या तलुत ला, एक शक्तिशाली आणि देखण्या तरुण व्यक्तीला, त्यांचा शासक म्हणून नियुक्त केले… बनी इस्राइलच्या लोकांना हे आवडले नाही कारण तालुत एक गरीब माणूस होता आणि तो त्यांच्या जमातितील नव्हता…त्यांनी त्याचा आदेश पाळण्यास नकार दिला…. शम्मील ने त्यांना म्हंटले की, एक शासकाला त्याच्या कुटुंबावरून किंवा जन्मावरून नाही तर, वैयक्तिक गुणांवरून प्रशंसित करायला हवे… तलुत कडे एका चांगल्या राजाचे सर्व गुण आणि ज्ञान आहे, जे त्याला अल्लाह ने दिलेले आहे…
बनी इस्राइलच्या लोकांनी त्यांचा वाद चालू ठेवला..त्यांना काही तरी सत्याचा पुरावा पाहिजे होता की, तलुतला अल्लाह ने नियुक्त केले आहे…
शम्मिल त्यांना म्हंटला की एक पुरावा म्हणून, ते "ताबूत सकीना" ची पेटी पुन्हा वापस मिळवतील..ज्यात मुसा आणि हारूनचे अवशेष आहेत…जे ते गमावून बसले होते…तो म्हणाला की, फरिश्ते (स्वर्गदूत) त्या पेटीला वापस घेऊन येतील…
पॅलेस्टाईन( फिलिस्तिंन) च्या लोकांनी ती पेटी असा विचार करून घेतली होती की, त्या पेटीला व्यवस्थित ठेवतील, हे त्यांच्या साठी दुर्भाग्य ठरले..त्यांनी त्या पेटीपासून सुटका करण्याचा प्रयत्न केला…यासाठी ते दोन गायींच्या मागे गेले, ज्या त्यांना बनी इस्राइल च्या लोकांपर्यंत घेऊन आल्या आणि ते तेथे त्या पेटीला सोडून गेले…
त्यामुळे बनी इस्राइल च्या लोकांना त्यांची पेटी शाबूत वापस मिळाली…या पुरव्यानंतर त्यांना तलुत ला राजा म्हणून स्वीकार करावे लागले…
ज्यू लोक (यहुदी/जुदाइजम/Judaism/Hebrew/इब्रानी) हे इस्राईलचे लोक आहेत…ते मूसा अ.(Moses/मोशे) यांना अल्लाहचे संदेशवाहक मानतात…
[याकूब अ. (ज्यांना "इस्राईल" ही म्हंटले जाते), याकूब अ. यांचे पुत्र... युसुफ अ. आणि युसुफ अ. यांचे अकरा भाऊ इजिप्त (मिस्र) मध्ये स्थायिक झाले…आणि फक्त एकाच अल्लाहची (ज्याला ते यहोवा/ yahweh म्हणत होते) शिकवण देत राहिले…त्यांना "बनी इसराईल" म्हणजेच इस्राईलची (याकूब अ. यांची) संतान म्हंटले जात होते…ते ज्या जागेतून इजिप्तमध्ये आले होते, ती जागा म्हणजे जुने "कानान"(फिलिस्तीन/palestine) हे सध्या इस्राइल या देशामध्ये आहे. मुहम्मद स. अ. व. येण्याआधी हे पूर्वीचे लोक अल्लाह ला यहोवा (yahweh) असे म्हणून संबोधित करत होते. कुराण मध्ये वारंवार "बनी इस्राईल" ला अल्लाह ने संबोधित केले आहे.)]
ही साधारणतः 4000 वर्षांपूर्वीची म्हणजेच 2000 BC ची सत्यकथा आहे.. खूप खूप वर्षांपूर्वी इराकमध्ये, एका माणसाला ज्याचे नाव अझर होते, जो लाकडाच्या प्रतिमा कोरून बनवत होता त्याला एक मुलगा झाला…इब्राहीम अ.…
त्या दिवसात अरबचे लोक, लाकडाच्या आणि दगडांच्या प्रतिमांची आराधना करत होते…ते असाही विश्वास ठेवत होते की, तारे मनुष्याच्या भाग्यावर नियंत्रण ठेवतात…
जस जसे इब्राहीम अ. मोठे होऊ लागले, त्यांना जाणीव होऊ लागली की, मनुष्याने बनविलेल्या प्रतिमा कुणालाच मदत करत नाहीत…त्यांची आराधना करून काही उपयोग नाही..त्या प्रतिमा एक दुसऱ्यांना ही मदत करू शकत नाहीत…
इब्राहीम अ. हे एक चांगले, हुशार आणि ज्ञानी व्यक्ती होते…ज्यांना अल्लाहने त्याचा संदेशवाहक म्हणून निवडले…प्रतिमांची आराधना करण्याऐवजी इब्राहीम अ. यांनी एका आणि फक्त एका अल्लाहवर विश्वास ठेवला…
त्यांनी त्याच्या वडिलांना आणि सर्व दुसऱ्या लोकांना प्रतिमांची आराधना करण्यास थांबवले…”ज्यांना तुम्ही स्वतः बनविले त्यांची तुम्ही आराधना कशी करू शकता?…” त्यांनी त्यांना विचारले,” या प्रतिमा तुम्हाला कशी मदत करू शकतात?…” पण त्यांचे वडील,अझर रागावले आणि म्हणाले, “इब्राहिम मी तुला चेतावणी देतो की, मी तुला मरेपर्यंत दगडांनी मारेन, जर तू हा मूर्खपणा थांबवला नाहीस..” यामुळे इब्राहीम अ. उदास झाले…पण ते म्हणाले की, अल्लाह तुम्हाला आर्शिवाद देवो…मी अल्लाहला प्रार्थना करेन की, तो तुमच्यासाठी दयाळू राहो…”
इब्राहीम अ. ची ही सुद्धा इच्छा होती की, लोकांनी ताऱ्यांवर, ईश्वरासारखा विश्वास ठेवणे थांबावावे…एका रात्री जेव्हा ते आकाशात ताऱ्यांची चमक पाहत होते… ते लोकांना म्हंटले, “मी सर्वात तेजस्वी ताऱ्याची आराधना करेन…”
लोक हा विचार करून थोडे आनंदी झाले की, शेवटी इब्राहीम अ. यांनी, त्यांच्या श्रद्धेवर अनुसरण करण्यास सुरुवात केली…पण जेव्हा तो तारा मंद झाला आणि चंद्र आला, इब्राहीम अ. म्हणाले, “ओह…मी त्या ताऱ्याची आराधना करू शकत नाही, जो मंद आहे…मी चंद्राची आराधना करेन…” पुन्हा जेव्हा चंद्र मावळला आणि तेजस्वी सूर्य उगवला…इब्राहीम अ. म्हणाले, “ओह, हा सूर्य चंद्रापेक्षा जास्त तेजस्वी आहे…मी याला ईश्वर बनवतो…” पण जेव्हा सूर्यास्त झाला आणि सूर्य दिसेनासा झाला…इब्राहीम अ. लोकांकडे येऊन बोलले, “लोकहो…जर मला माझ्या अल्लाहने योग्य रस्ता दाखवला नसता तर मी भलतीकडेच भटकलो असतो..”
मी अल्लाहला सोडून कुणावरही विश्वास करणार नाही…एक आणि फक्त एक अल्लाह, ज्याने ह्या पृथ्वीवरची आणि आकाशातली प्रत्येक गोष्ट बनविली…
इब्राहीम अ. यांच्याशी लोक वाद करत राहिले आणि त्यांच्या प्रतिमांची भीती दाखवत राहिले. इब्राहिम अ. म्हणाले, “मी तुमच्या प्रतिमांच्या आराध्याला का घाबरु, जर तुम्ही एक आणि फक्त एक खऱ्या अल्लाहला घाबरत नाही?” मी तुमच्या पैकी एक नाही…मी एकटा अल्लाहकडे वळेल…जो स्वर्गाचा आणि धरतीचा प्रभु आहे…
तरीही लोकांनी मनुष्याने बनविलेल्या प्रतिमांची आराधना करने चालू ठेवले… एकदा इब्राहीम अ. ने शांतपणेे सांगितले, “मी तुमच्या प्रतीमांबरोबर एक पेच करणार आहे…हे यासाठी कारण मला माहीत आहे, या प्रतिमा कुणालाच मदत आणि नुकसान करू शकत नाही…”
एक दिवस जेव्हा शहराचा प्रत्येक जण, एका मोठ्या धार्मिक उत्सवासाठी गेला होता, इब्राहीम अ. आजारी असल्याचे सांगून मागे राहिले… ते सर्व लोक गेल्यावर इब्राहीम अ. त्यांच्या मोठ्या आराधनेच्या ठिकाणी गेले, जेथे शंभर प्रतिमा ठेवल्या होत्या…त्या ठिकाणी सर्व प्रकारची फळे आणि मिठाई, लोकांनी त्या प्रतिमांसाठी ठेवली होती…इब्राहीम अ. यांनी प्रतिमांना विचारले, “तुम्ही या हव्या हव्याशा वस्तू, ज्या तुमच्यासाठी ठेवल्या आहेत, का खात नाहीत?…जेव्हा लाकडाच्या आणि दगडाच्या पुतळ्यानी उत्तर दिले नाही, त्यांनी विचारले,”तुम्ही का बोलत नाही?” मग त्यांनी एक गज घेतला आणि त्यांना आकारहीन केले…फक्त एका मोठ्या प्रतिमेला तसेच ठेवले…जी सर्व कहाणी लोकांना सांगेल. जेव्हा लोक उत्सवातून, त्या जागी वापस आले आणि पुतळे पाहीले, ते खूप रागावले… “हे इब्राहीम शिवाय कोणीच करू शकत नाही..” ते म्हंटले… लगेच शहरातील सर्व लोक जमा झाले…त्यांनी इब्राहीम अ. यांना बोलावले आणि विचारले की, त्यांनी त्यांच्या पुतळ्यांच्या प्रतिमांशी काय केले…
इब्राहीम अ. बोलले, ” तुमच्या सर्वात मोठ्या पुतळ्याने, बाकी पुतळ्यांना असे केले…तुमच्याच मोठ्या प्रतिमेने हे केले…तुम्ही विचारा…म्हणजे जर ती बोलत असेल तर ..” अर्थात, पुतळे बोलत नाहीत…त्यामुळे ते स्तब्ध राहिले आणि बोलले, ” इब्राहीम, तुला चांगले माहीत आहे की, हे पुतळे बोलत नाहीत…”
“मग तुम्ही त्यांची आराधना का करता?” इब्राहीम अ. यांनी विचारले….”ह्या तुम्हाला काहीच कामाच्या नाहीत…तुम्ही का विचार करत नाही आणि समजून घेत नाही…हे पुतळे तुम्ही स्वतः बनविले…तुम्ही अशा मृत लोकांची पुतळा बनवून आराधना का करता?” पण ते समजून घेण्यास तयारच नव्हते…
‘ नमरुद’ हा इराक (बेबीलोन)चा राजा होता, जो स्वतःला ईश्वर समजत होता…त्यानेहीे इब्राहीम अ. विषयी ऐकले. त्याने इब्राहीम अ. यांना, त्याच्या दरबारात बोलावले आणि त्यांना विचारले की, तो नमरुदला ईश्वर का मानत नाही?
इब्राहीम अ. एक धैर्यवान तरुण होते, जे अल्लाहशिवाय कुणालाही भीत नव्हते..त्यांनी उत्तर दिले,”कारण तुम्ही एक मनुष्य आहात, जसे आमच्या पैकी प्रत्येक जण आहे…आणि पुतळ्यांविषयी म्हणाल तर ते मुके,बहिरे आणि आंधळे आहेत तर मग ते ईश्वर कसे असू शकतील?”
नमरूद खूप रागावला आणि विचारले, “तुझा अल्लाह काय करू शकतो,जे मी करू शकत नाही?” इब्राहीम अ. बोलले, ” अल्लाह जीवन देतो आणि जीव घेतो” नमरुद म्हणाला, “मीही हे करू शकतो…मी कैद्याला फाशी (मृत्युदंड) देतो आणि ज्याला मृत्यूची शिक्षा दिली आहे त्याला जीवनदान देतो…”
मग इब्राहीम अ. म्हणाले, “अल्लाह सूर्याला पूर्वेतून उदय करतो आणि पश्चिमेस अस्त करतो…तुम्ही सूर्य पश्चिमेतून उदय करून दाखवू शकता का?”
नमरुद गोंधळलेला होता…त्याला कळलेच नाही की, काय बोलावे…पण तो एक क्रूर आणि गर्विष्ठ राजा होता, त्याने आज्ञा दिली की, इब्राहीम अ. यांना एका मोठ्या आगीत फेकून देण्यात यावे…राजाच्या लोकांनी एक मोठी आग लावली आणि इब्राहीम अ. यांना त्यात फेकले…
इब्राहीम अ. यांनी स्वतःला वाचवण्यासाठी अल्लाहची प्रार्थना केली…अल्लाहने इब्राहीम अ. वर खूप प्रेमाने आशीर्वाद दिला आणि आज्ञा केली, “हे आग…शांत होऊन जा आणि इब्राहीमला वाचवून आशीर्वाद दे.” त्याच्या भोवतालची आग शांत झाली…प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आणि इब्राहीम सुखरूप बाहेर आले….
नमरुदच्या क्रूरपना नंतर, जो इराक (बेबिलोन) चा राजा होता, ज्याने इब्राहीम अ. यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.. इब्राहीम अ. यांनी इराक सोडले आणि फिलिस्तीन मध्ये गेले आणि नंतर इजिप्त मध्ये गेले…त्याची पत्नी ‘ सारा ‘ जी त्यांच्या जवळच्या नात्यातली होती आणि त्यांचा पुतण्या ‘ लूत ‘ त्यांच्यासोबत होते… लूत अ. हे खरे ईश्र्वरावर श्रद्धा करणारे आणि विश्वास ठेवणारे होते…काही दिवसांनी ते ही अल्लाहचा संदेशवाहक बनले…
जेव्हा ते इजिप्तला गेले, लोकांनी त्यांना सांगितले की, फिरौंन (pharaoh,फैरो) खूप कपटाचारी आहे..तो इजिप्तचा राजा आहे…
जर त्याने, एका सुंदर स्त्रीला पाहिले, तर तो त्याच्या माणसांना म्हणतो, तिला उचला आणि तिला राजवाड्यात घेऊन या… जबरदस्तीे केले तरी चालेल…
इब्राहीम अ. यांची पत्नी “सारा” सुंदर होती..त्यामुळे फिरौंनच्या लोकांनी तिला राजाकडे घेऊन गेले…एक सद्गुणी स्त्री असल्याने, तिने अल्लाहकडे मदत मागितली…अल्लाहने तिच्या प्रार्थनेचे उत्तर दिले… फिरौंन तिला काहीच इजा पोहोचवू शकला नाही, स्पर्श करू शकला नाही..त्याचा हात एकाच जागी कडक झाला….तो हैराण झाला..
तिला राजाच्या वाईट हेतूपासून अल्लाहने संरंक्षण दिले होते…आणि वाचवले होते…फिरौंनने जाणले की, सारा एक सद्गुणी स्त्री आहे आणि कोणती तरी अज्ञात शक्ती (अल्लाह) तिला वाचवत आहे… आता तो इतका भयभीत झाला की, त्याने साराला मोकळे केले आणि तिच्यासोबत आणखी एक सद्गुणी मुलगी जिचे नाव “हाजरा” होते, पाठविली आणि त्यांना सन्मानाने पाठविले.
इब्राहीम अ. यांनी हाजरा शी लग्न केले… इब्राहीम अ. हे वयस्कर झाले होते आणि त्यांना मूल नव्हते…त्यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांना एक वारस (एक मुलगा) मिळावा…अल्लाहने या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि त्याला हाजरा पासून एक मुलगा दिला, इस्माईल..
जेव्हा हाजरा ने इस्माईल ला जन्म दिला, इब्राहीम अ. यांची पहिली पत्नी, सारा नाराज झाली, कारण तिला तिचे स्वतःचे मूल नव्हते… त्यामुळे अल्लाहने इब्राहीम अ. यांना आज्ञा केली की, ‘हाजरा आणि तिचा मुलगा इस्माईल यांना घेऊन वाळवंटाच्या ठिकाणी घेऊन जा आणि तेथे सोडून वापस ये..’
इब्राहीम अ. यांना ही आज्ञा पाळणे खूप अवघड होते…इतक्या वर्षांनी जो मुलगा जन्माला आला, आणि ज्याच्यासाठी खूप तीव्र इच्छा आणि प्रार्थना करावी लागली, त्याला आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीला हाजराला सोडून देणे, इब्राहीम अ. यांना खूप कठीण होते…
पण ते अल्लाह ची खरी श्रध्दा करणारे होते…त्यांनी कोणताही संकोच न बाळगता ती आज्ञा पाळली…
अल्लाह च्या हुकुमाप्रमाने ते हाजरा आणि इस्माईल ला घेऊन वाळवंटाच्या ठिकाणी गेले…रस्त्यात हाजरा ने त्यांना विचारले, “तुम्ही आम्हाला कोठे आणि का घेऊन जात आहात?” इब्राहीम अ. शांत राहिले आणि काहीही उत्तर दिले नाही… हाजरा समजली आणि तिने विचारले,” ही अल्लाहची इच्छा आहे का?” “हो, असेच आहे” इब्राहीम अ. यांनी उत्तर दिले… “मग मी प्रश्न विचारणार नाही आणि मला कशाचीच भीती नाही..निश्चितपने अल्लाह आमचे संरक्षण करेल”, हाजरा म्हणाली…हाजरा एक धैर्यंवान आणि कर्तव्यनिष्ठ स्त्री होती… इब्राहीम अ. त्यांना निर्मनुष्य जागी घेऊन गेले…जेथे पाणी नव्हते आणि मैल पर्यन्त झाड नव्हते…आणि त्यांना तेथे सोडले…ही जागा “मक्का” होती… जेव्हा त्यांनी हाजरा आणि इस्माईल ला निर्जन ठिकाणी एकटे सोडले, त्यांना खूप वाईट वाटले…तो त्यांच्यासाठी खूप मोठा त्याग होता…पण इब्राहीम अ. लटपटले नाही आणि कमजोर पडले नाही… ते त्यांना सोडून वापस थोडे दूर गेले…जेव्हा ते दोघे त्यांना दिसेनासे झाले, तेव्हा ते थांबले आणि चेहरा तिकडे करून अल्लाहला कळकळीने प्रार्थना केली,” ‘ओ अल्लाह’, तुझ्या इच्छेप्रमाणे, मी माझ्या वारसाला वाळवंटाच्या ठिकाणी सोडून जात आहे… ‘ओ अल्लाह’…मी त्यांना सोडले जेणेकरून, ते तुला इथे प्रार्थना करत राहतील. कृपा करून त्यांचे रक्षण कर… लोकांनी त्यांच्याकडे येऊन, त्यांना तुझ्या धरतीतून अन्न पुरवठा होवू दे, जेणेकरून ते नेहमी तुझे आभारी राहतील” असे म्हणून इब्राहीम अ. वळले आणि त्यांनी त्यांना अल्लाहच्या दयाळूतेवर विश्वास करून, सोडून गेले…. अल्लाह इब्राहीम अ. च्या निष्ठेवर इतका प्रसन्न झाला की, अल्लाहने इस्माईल आणि हाजरा चे फक्त संरक्षणच केले नाही तर वचन ही दिले की, त्यांच्या नंतरच्या वंशजांची भरभराट होईल…मुहम्मद (स. अ. व.) हे त्यांच्याच पिढीतील आहेत….
इकडे हाजरा दोन शुष्क डोंगराच्या मधील वाळवंटात होती…डोंगराचे नाव “सफा” आणि “मरवा” होते…तिला काय करावे काही कळत नव्हते…जेव्हा बाळ प्रखर उष्णतेने, तहान लागल्यामुळे रडायचे, तेव्हा तीचे हृदय बाळासाठी दुखायचे…पण ती काय करू शकत होती?…तेथे पाणी नव्हते, अन्न नव्हते, छत नव्हते आणि कोणीच दिसत नव्हते…ती एक माता होती…ती कसे बसून तिच्या बाळाला मरतांना पाहू शकत होती…. ती सफा डोंगरावर, हे पाहण्यासाठी चढली की, त्या दिशेला, कोणी मदतीसाठी दिसते का? पण सगळे वाळवंट होते…मग ती पळत वापस आली, तिच्या तहानलेल्या बाळाला पाहण्यासाठी…. पुन्हा ती दुसऱ्या डोंगरावर ” मरवा ” वर पळाली… त्या दिशेला कोणी दिसते का, ज्याला ती मदतीसाठी विचारू शकते….पण तिथे कोणीच नव्हते..
स्वतःला त्रास घेऊन, हाजरा एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर मदतीसाठी पळत राहिली…प्रत्येक वेळेस वापस येताना तिच्या तहानलेल्या आणि भुकेल्या बाळाला पाहत होती…अशा वर खाली आणि एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जावून आणि परत जावून सात चकरा झाल्यावर ती…अल्लाहची इच्छा असे स्वीकार करून, अल्लाहच्या इच्छेला शरण गेली, ती थकून बसली… आणि मग अल्लाहने त्याची दयाळूता दाखविली.चमत्कारिकरित्या एक पाण्याचा फवारा (झरा), बाळाच्या जवळ वाहू लागला… त्यालाच आज जमजम म्हणतात…”आब ए जमजम” (जमजम चे पाणी) हे पाणी खूप ताजेतवाने करणारे, उपचार करणारे, जखम भरणारे आणि उत्साहवर्धक म्हणजेच ताकद देणारे समजले जाते…आजही जे “हज” आणि “उमरा” साठी पूर्ण जगातून “मक्का” येथे जातात,अशा लाखो मनुष्यांसाठी जमजमचे पाणी उफाळून पुढे येते…
हाजराला तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.. तिचे हृदय आनंदाने भरले…दोघांना, तिला आणि तिच्या बाळाला अल्लाहने वाचविले… अल्लाहला हाजराची श्रद्धा आणि धैर्य इतके आवडले की, अल्लाहने या दिवसापासून लाखो माणसे, पुरुष, स्त्रिया, मुले, याच धर्मनिष्ठ स्त्रीने, हाजराने चाललेल्या रस्त्यावर पुन्हा पावले टाकतील..जेव्हा ते सफा आणि मरवाच्या दरम्यान, “हज “च्या अवधीत चालतील, असा आशीर्वाद दिला..
काही वेळानंतर, एक उंटाच्या गाड्या असलेल्या तांडवाने, या वाळवंटातून जात असताना, ते झऱ्याचे पाणी पाहिले आणि हाजराला, तेथे थांबून तात्पुरता मुक्काम करण्याची परवानगी मागितली…
“हो नक्कीच”, तिने उत्तर दिले…”पण या पाण्यावर तुमचा अधिकार करू नका..ते प्रत्येकासाठी मोफत असेल…” ते लोक मानले…आणि ते तिथे काही दिवस पाण्यासाठी राहिले. (पाणी शोधणे अरेबिया मध्ये हे खूप कठीण होते. जिथे कुठे पाणी असायचे…लोक आजूबाजूला त्यांची घरे बनवायचे…) अशा प्रकारे “मक्का ” एक व्यस्त वस्ती बनले..आणि इब्राहीम अ. यांनी अल्लाहला जी प्रार्थना केली होती की, ‘त्याच्या पत्नी आणि त्याच्या वारसाचे रक्षण कर…आणि लोकांना त्यांच्याकडे येऊ दे..’ त्याचे अल्लाह कडून उत्तर मिळाले…
हाजरा आणि इस्माईल तिथेच राहिले, जेथे इब्राहीम अ. त्यांना सोडून गेले होते..इब्राहीम त्याच्या कुटुंबाला कधी कधी येऊन भेटायचे…
जेव्हा इस्माईल मोठा झाला…इब्राहीम अ. यांनी एक स्वप्न पाहिले…अल्लाह त्यांच्या मुलाची, इस्माईलची, आहुती देण्याची आज्ञा करत आहे…
इब्राहीम अ. खूप घाबरले आणि जागे झाले…पण त्यांना, तीन रात्री तेच स्वप्न पडले…त्यांना खात्री झाली की, ही अल्लाहची आज्ञा आहे…आणि त्यांना त्या आज्ञेसाठी झुकले पाहिजे…
ही इब्राहीम अ. यांच्यासाठी अत्यंत कडक परीक्षा होती…जे आता एक वृद्ध मनुष्य होते…ते त्याच्या जिवलग मुलाची आहुती कसे देऊ शकणार होते?…पण त्यांनी स्वतःच आठवण केली की, ते अल्लाहचे संदेशवाहक आहे…आणि आज्ञा न पाळण्याचा, ते कधीही विचार करू शकत नाही…
त्यामुळे ते इस्माईल कडे गेले..आणि त्याला त्यांच्यासोबत चलण्यास सांगितले… जेव्हा ते इस्माईलला सूनसान जागी घेऊन जात होते, इस्माईलने त्याच्या वडिलांना विचारले की, ते कोठे जात आहेत… इब्राहीम अ. यांनी, त्यांच्या स्वप्नाविषयी त्याला सांगितले…इस्माईल त्याच्या अल्लाहनिष्ठ, वडिलांचा एक शूर मुलगा होता..घाबरून न जाता किंवा विचलित न होता तो म्हणाला, “बाबा…जर ही अल्लाहची इच्छा आहे तर करा…मी आहुती साठी तयार आहे..तुम्ही मला अल्लाहच्या इच्छेशी शरणागत (नम्र) पाहाल…” इब्राहीम अ. ने इस्माईलला झोपविले. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, जेणेकरून, ते जे काही करणार आहे, त्यांना दिसणार नाही.लगेच अल्लाह त्यांच्याशी बोलला, “इब्राहिम खरंच…मी त्यांना पारितोषिक देतो, जे योग्य करतात..ही एक परीक्षा होती…..आणि इस्माईल च्या जागी एक कोकरू आहुती झाले होते…आणि इस्माईल जिवंत होता…
अल्लाहने त्याच्या वचनावर खरे राहून, इब्राहीम अ. आणि इस्माईलला आशीर्वाद दिला की, येणाऱ्या पिढ्या त्यांची आठवण करतील…
या दिवसापासून प्रत्येक मनुष्य जेव्हा “हज” साठी जातो, तेव्हा त्यांच्या आहुतीची आठवण करतो…प्रत्येक वर्षी “ईद उल अजहा” ला प्रत्येक अनुयायी, त्याच्या ऐपतीनुसार इब्राहीम अ. यांच्या आहुतीच्या स्मृतीत एक बकरा बळी देतो…
त्यानंतर अल्लाहची आज्ञा पाळून इब्राहीम अ. आणि इस्माईलने अल्लाहचे घर बनविले…”काबा” जेथे लोक प्रार्थना करू शकतील…
जसे इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. अल्लाहच्या घराचा पाया उंच करत होते…ते प्रार्थना करत होते. “हे अल्लाह, ही सेवा स्वीकार कर…आणि आम्हाला तुझ्या इच्छेसाठी आज्ञाधारक बनव…आणि तुझ्या कृपेवर अवलंबून राहू दे, कारण तू खूप दयाळू आहेस…”
इब्राहीम अ. यांनी अशीही प्रार्थना केली की, ही जागा एक शांतीचे शहर बनू दे…त्यांनी त्यांच्या मुलांना अल्लाहच्या श्रद्धेसमोर झुकण्यास सांगितले…आणि अल्लाहपासून कधीही दूर न जाण्यास सांगितले… अल्लाह त्याच्या संदेशवाहकाला, इब्राहीम अ. यांवर, इतके प्रेम करत होता की, त्याने नंतर मुहम्मद (peace be upon him)ला जे शेवटचे संदेश वाहक होते, इब्राहीम अ. यांच्या श्रध्देच्या रस्त्यावर चालण्यास सांगितले….
आज जेव्हा पूर्ण जगातून, लाखो मनुष्य “काबा” ला जातात, ते तिच प्रार्थना म्हणतात, जी मुहम्मद (peace be upon him) ने शिकविली आहे.. आणि तवाफ (“काबा” ला सात चक्कर मारणे) करतात…अशाप्रकारे “इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. यांची अल्लाहच्या इच्छेशी अधीनता ” याची आठवण करणे, लोकांनी चालू ठेवले आहे..
काबा च्या समोर एक स्थान आहे… “मुकाम ए इब्राहीम”, जेथे दगडावर इब्राहीम अ. यांच्या पायाचे निशाण दिसतात..हे लोकांकडून शतकांपासून संरक्षित केले गेले आहे…येथे प्रत्येक मनुष्य अल्लाहला एक खास प्रार्थना म्हणतो….आणि अल्लाहच्या प्रिय संदेशवाहकाला ज्याने “काबा” बांधला त्याला “दुआ” देतात…
इब्राहीम अ. हाजराला वाळवंटात सोडून सारा कडे आले… सारा नाराज होती..तिला स्वतःचे मूल नव्हते म्हणून… काही वर्षांनंतर अल्लाहने इब्राहीम अ. कडे, फरिश्ते(स्वर्गदूत,angel) पाठविले…त्यांना हे सांगण्यासाठी की, एक चांगली बातमी आहे की, त्यांना अजून एक मुलगा होईल…हे फरिश्ते मनुष्याच्या रुपात आले होते…इब्राहीम अ. यांना आशिर्वादासह शुभेच्छा देण्यासाठी आले होते… इब्राहीम अ. यांनी, त्यांच्या शुभेच्छा वापस केल्या.. फरिश्ते नम्रतेने त्याला म्हणाले, “आम्ही तुझ्यासाठी चांगली बातमी आणली आहे ..एक हुशार आणि बुध्दीमान मुलाविषयी…”इसाक ” आणि त्यानंतर त्याच्या पुढची पिढी… याकूब (इस्राइल)… ही अल्लाहची इच्छा आहे की तुला सारा पासून एक मुलगा होईल…
इब्राहीम अ. यांची पत्नी सारा तेथे उभी होती. ती खूप आश्चर्य चकित झाली…आणि तिने विचारले, “पण हे कसे शक्य आहे? मी एक वृद्ध स्त्री आहे आणि माझे पती ही खूप वृद्ध आहेत…आम्हाला मूल कसे होऊ शकते?”…
फरिश्ते उत्तरले ,”अल्लाहच्या इच्छेवर तुम्ही आश्चर्य करत आहात का?अल्लाह निश्चितच सर्वात मोठा आहे आणि जे काही तो इच्छा करतो, ते तो करू शकतो… तुमच्यावर त्याचे आशीर्वाद असो… आशा सोडू नका…”
“नाही, मी आशा सोडणार नाही..जे लोक श्रद्धा करत नाहीत, ते आशा सोडतात…” इब्राहीम अ. म्हंटले..
अशा प्रकारे अल्लाहने वचन दिल्याप्रमाणे सारा ला एक मुलगा झाला…इसाक…जो मोठा झाल्यावर एक संदेशवाहक बनला…आणि त्यानंतर त्याचा मुलगा याकूब (इस्राइल) अ. आणि मग त्याचा मुलगा युसुफ अ.…ही संदेशवाहक बनले… अशाप्रकारे इब्राहीम अ. यांनी, जी प्रार्थना केली होती की, त्यांना चांगले आणि सद्गुणी मुले आणि वंशज होऊ दे…ती अल्लाहने पूर्ण केली…त्याचे दोन्ही मुले इस्माईल आणि इसाक आणि त्यांचे वंशज ही संदेशवाहक बनले…त्यामुळे इब्राहीमला “संदेश वाहकांचा पिता” म्हंटले जाते…
एक दिवस उत्सुकतेने इब्राहीम अ. यांनी अल्लाहला विचारून, त्यांना दाखविण्यास सांगितले की अल्लाह,”न्याय करण्याच्या दिवशी” मृत झालेल्यांना जिवंत कसे करेल? अल्लाहने विचारले,” इब्राहीम, तुला विश्वास नाही का?”
“मला खरंच विश्वास आहे…”…इब्राहीम अ. म्हणाले,” पण मला स्वतःला संतुष्ट करण्यासाठी ते पहायचे आहे”…
अल्लाहने मान्य केले… अल्लाहने इब्राहीम अ. यांना चार पक्षी पाळण्यास सांगितले…त्यांचे आहुती देऊन, वेगवेगळे भाग (तुकडे) करण्यास सांगितले…आणि ते भाग (हिस्से) चार डोंगरावर एकमेकांपासून दूर दूर फेकण्यास सांगितले…
मग इब्राहीम अ. यांना, त्या पक्ष्यांना हाक मारण्यास सांगितली…सगळे पक्षी त्यांच्याकडे…त्यांच्या पूर्ण शरीरात वापस आले… अल्लाहने हा चमत्कार इब्राहीम अ. यांना, त्यांच्यासाठी आणि सर्व मनुष्यांच्यासाठी दाखविला, जेणेकरून प्रत्येक जण समजू शकेल की, जो एक वेळेस जीवन देऊ शकतो..पुन्हा एकदा “न्याय देण्याच्या दिवशी” जीवन देऊ शकतो…
ही कथा कुराण मध्ये दुसऱ्या धड्यात, “सुरे बकरा” मध्ये वर्णन केलेली आहे…