आदम अ. .. जगातील पहिले मानव

स्वर्ग हा खूप सुंदर बगीचा आहे. ज्याचा कुणी स्वप्नातही विचार करू शकत नाही.....तिथे सगळ्या प्रकारची फळझाडे आहेत...त्यात डाळिंब,अंगुर,ऑलिव...सर्व फळे जितका मनुष्य विचार करु शकतो...आणि त्याच्याहून आधिक.....

आणि त्या फळांच्या झाडांच्या मधून थंड आणि गोड पाण्याचे, दुधाचे आणि मधाचे झरे वाहत आहेत....

एक दिवस अल्लाहने स्वर्गात त्याच्या दूतांना म्हटले की, "माझी इच्छा आहे एक मनुष्य बनविण्याची"

दूत म्हटले, "आम्ही तुझ्या आज्ञा पाळत नाही का?"

अल्लाह म्हणाला, "मला चांगले माहीत आहे"

अल्लाहने ओल्या मातीपासून एक मनुष्य बनविला, आदम (अडम)...आणि त्यात आत्मा(जीव) फुंकला...त्या मनुष्याने त्याच्या जीवनाचा पहिला श्वास घेतला...या प्रत्येक गोष्ट त्याला शिकविली. त्याला बोलण्यासाठी काही शब्द शिकविले... अल्लाहने त्याच्या सर्व दूतांना बोलावले आणि म्हटले, "हा आदम आहे...त्याला वाकून प्रणाम करा.."

सगळ्या दूतांनी आज्ञाचे पालन केले...फक्त एकाने केले नाही..तो होता इब्लिस (शैतान)...तो एक जिन्न होता...तो म्हणाला, " मी का प्रणाम करू?..मी आगीने बनलो आहे आणि हा फक्त मातीने बनला आहे..मी याला प्रणाम करणार नाही"

अल्लाह इब्लीस वर रागावला आणि त्याला स्वर्गातून बाहेर केले... इबलीस ( शैतान)(लूसिफर)(evil) ने तिथून जाताना प्रण केला की, "तो संपूर्ण मनुष्य जातीशी प्रलय (महाविनाश) (कयामत) येईपर्यंत बदला घेईल"

अल्लाहने म्हटले की," चांगले मनुष्य तुझे ऐकणार नाहीत.."

अल्लाहने आदमला  स्वर्गात राहायला परवानगी दिली.

आणि त्याला सांगितले की, "तुला जे आनंद देईल ते तू कर..कोणतेही फळ खा...आणि जे तुला आवडेल ते तू पी... तू  स्वर्गातले प्रत्येक फळ खावू शकतो, फक्त एका झाडाचे फळ तू खायचे नाही.."आदम ने सर्व मजा केली...आनंद घेतला...पण लवकरच त्याला एकटेपणा जाणवू लागला..त्याला मित्र नव्हते...म्हणून त्याने ईश्वराला म्हटले, "कृपा करून मला एक सोबती दे". अल्लाहने त्याच्या बरगडीच्या (rib) हाडापासून एक स्त्री बनविली आणि त्याला एक मैत्रीण दिली... हव्वा ( एव्ह).

इबलीस चालाक होता..त्याने विचार करण्यास सुरू केला की, आदमला अल्लाहची अवज्ञा करण्यास कसे भाग पाडावे... एक दिवस आदम आणि हव्वा (अडम आणि एव्ह) स्वर्गात असताना, तो त्यांच्या कानात फुसफुसला की (बोलला) की, ज्या झाडाचे फळ खाण्यासाठी तुला मना केलेले आहे, ते फळ  छान आहे..तू जर ते खाशील तर तू नेहमीसाठी जिवंत राहशील...आदमला मोह झाला...दोंघांनी इबलिस चे ऐकून त्या झाडाकडे जावून ते फळ  खाल्ले.... ते फळ खाताच, त्यांना याची जाणीव झाली की, त्यांनी खूप मोठी चूक केली आहे...त्यांना लाज वाटली...कारण त्यांचे काही अंग हे दिसू लागले होते...झाडाच्या पानांमध्ये ते दोघे स्वतःला लपावण्याचा प्रयत्न करू लागले...पण अल्लाहला सर्व माहीत होते आणि तो सर्वीकडे असतो... अल्लाह त्यांच्यावर खूप रागावला,..." मी तुला चेतावणी दिली होती...की त्या मना केलेल्या झाडाचे फळ खावू नको...पण तू माझी आज्ञा पाळली नाही.... आता तुझी जागा धर्तीवर  आहे...स्वर्गात नाही"...
अल्लाहने दोघांना स्वर्ग सोडून धर्तीवर जाण्यास सांगितले.. त्या दोंघांनी ही एक चूक केली होती..पण त्यांना अल्लाहची अवज्ञा करायची नव्हती... त्यांना त्याचा खूप पश्र्चाताप  होत होता..त्यांनी अल्लाहकडून काही माफी मागण्याचे शब्द शिकून घेतले... ते खूप रडले आणि त्यांनी अल्लाहकडून माफी मागितली...शेवटी अल्लाहला त्यांच्यावर दया आली...अल्लाहने म्हटले की जर तुम्ही चांगले काम (कर्म) केले आणि माझी आज्ञा पाळली, तर मी तुम्हाला वापस  स्वर्गात, जी एक सुंदर बाग आहे, बोलावेन...पण तुमच्या मृत्यूनंतर...पण जर चांगले काम (कर्म) केले नाही आणि आज्ञा पाळली नाही तर मृत्युनंतर खूप भयानक नरकात जावे लागेल....

ही घटना साधारणतः 6000 वर्षांपूर्वीची आहे...आदम अ. ला श्रीलंकेतील एका डोंगरावर उतरविण्यात आले आणि हव्वाला अराफात या डोंगरावर उतरविण्यात आले...पुढे ते इराक (बेनीलोन च्या जवळ काही दिवस राहिले)
( Wikipedia search करून अजुन वाचावे)

आदम अ. आणि हव्वा ने त्यांचे उरलेले जीवन धर्तीवर चांगले काम (कर्म) करण्यात आणि अल्लाहची आज्ञा पाळण्यात घालविले...त्यांना आशा होती की, ते पुन्हा अल्लाहला आनंदी करून त्यांच्या मृत्युनंतर स्वर्गात जातील.....

त्यांना खूप मुले आणि नातवंड झाली...सर्व मानवजात त्यांची पिढी आहे...त्यामुळे आदम अ. ला father of  human race   हव्वाला mother of human race म्हंटले जाते....



आदम अ. आणि हव्वा धरतीवर राहायला आले...जग खूप मोठे होते...अल्लाहला वाटत होते की जग माणसांनी भरून जावे...त्याला प्रत्येक जागी...सर्वात थंड ठिकाणी आणि सर्वात गरम ठिकाणी, वाळवंटात, जंगलात आणि डोंगरावर मनुष्य हवा होता...त्यामुळे अल्लाहनेे आदम अ. आणि हव्वाला असा आशीर्वाद दिला, ज्यामुळे त्यांना खूप दिवसांपर्यंत, रोज दोन मुले होत होतीे, एक मुलगा आणि एक मुलगी..त्यांना खूप खूप मुले झाली, मुले आणि मुली...लवकरच मानवजात पूर्ण धरतीवर पसरली...एकच माता आणि पित्याचे, आदम अ. आणि हव्वाची सगळी मुले होती...पांढरे,काळे आणि पिवळे (wheatish) त्वचेचे चे लोक झाले...

आदम आणि हव्वाची दोन मुले हाबिल(अबेल) आणि काबील (केन) ह्या दोघांना, एकाच मुलीशी लग्न करायची इच्छा होती, जी खूप सुंदर होती...त्यांना माहीत नव्हते की कसे ठरवावे की दोघांपैकी कोण लग्न करू शकेन?...म्हणून आदमने, त्यापैकी प्रत्येकाला अल्लाहला  मेंढी अर्पण करण्यासाठी सांगितले...ज्याची अर्पण केलेली मेंढी अल्लाह स्वीकार करेल, तो त्या मुलीशी लग्न करेल...

हाबिल ज्याचा हेतू चांगला होता, त्याने एक चांगली मेंढी, अल्लाहला अर्पण करण्यासाठी निवडली.. काबीलने चांगली त्याच्या स्वतःसाठी ठेवली आणि थोडी अशक्त अर्पण केली...
अल्लाहने स्वाभाविकपणे हाबीलची अर्पण केलेली मेंढी स्वीकार केली...एक आग येऊन त्या मेंढीला घेऊन गेली...याचा अर्थ हाबीलला मुलीशी लग्न करण्यासाठी अल्लाहची परवानगी होती...

काबील यावर खूप रागावला आणि बोलला की काहीही झाले तरी, तोच तिच्याशी लग्न करेन... हाबील ने लढण्यास नकार दिला...पण काबील उग्र होता. त्याने त्याच्या भावाला एका दगडाने मारले ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला...

ही पहिली वेळ होती ज्यात कुणी मनुष्याने दुसऱ्या मनुष्याचा वध केला होता...त्यामुळे हाबीलला मारल्यानंतर, काबील अतिशय घाबरला...त्याला मृत शरीराचे काय करावे ते कळत नव्हते..त्याने ते मृत शरीर खांद्यावर घेतले आणि अवती भोवती असहाय्यतेने भटकू लागला...

अल्लाहने, दोन कावळे पाठविले जे काबीलच्या समोर लढले आणि एक मारला गेला...दुसऱ्याने जमिनीत एक खड्डा केला आणि ते मेलेल्या  कावळ्याचे शरीर त्या खड्डयात ओढले आणि मातीने झाकले...

हे पाहून काबील ने, इतकेही माहीत नाही, जितके त्या कावळ्यालाही माहीत आहे...म्हणून स्वतःला दोष दिला...मग त्याने जमिनीत खोदून त्याच्या भावाला हाबीलला त्यात गाडले (दफन केले).

आजपर्यंत, जर कोणी त्याच्या भावाला मारतो (कारण आपण सगळे एकाच मातापित्याची मुले आहोत) तर, नेहमी दोष पहिल्या मारेकऱ्याला जातो ज्याने एक वाईट उदाहरण प्रस्तुत केले....



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...