कुरान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कुरान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

आदम अलैहिस्सलाम आणि एक अहंकारी

✔️📗2:30 ३०. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने फरिश्त्यांना फर्माविले की मी धरतीवर एक खलीफा (असा समूह जो एकमेकांनंतर येईल) बनवीत आहे. तेव्हा (फरिश्ते) म्हणाले, काय तू धरतीवर अशा लोकांना निर्माण करशील, जे तिच्यावर फसाद आणि रक्तपात करतील आणि आम्ही तुझ्या स्तुती-प्रशंसेसह तुझे गुणगान आणि तुझी पवित्रता वर्णन करतो. त्याने फर्माविले, जे मी जाणतो तुम्ही नाही जाणत. 

2:31 ३१. आणि त्या (अल्लाह) ने आदमला सर्व नावे शिकवून त्या चीज वस्तूंना फरिश्त्यांसमोर प्रस्तुत केले आणि फर्माविले, तुम्ही सच्चे असाल तर या चीज वस्तुंची नावे सांगा.  

2:32 ३२. फरिश्ते म्हणाले, हे अल्लाह! तू तर पवित्र (दोष- व्यंग नसलेला) आहे. आम्हाला तर तेवढेच ज्ञान आहे, जेवढे तू आम्हाला शिकविले आहे परिपूर्ण ज्ञान आणि बुद्धी कुशलता राखणारा केवळ तूच आहे. 

2:33 ३३. सर्वश्रेष्ठ अल्लाहने आदमला फर्माविले, तुम्ही यांची नावे सांगा. जेव्हा त्यांनी ती नावे सांगितली तेव्हा फर्माविले, काय मी तुम्हाला सांगितले नव्हते की मी आकाशांच्या आणि धरतीच्या अदृश्य गोष्टी जाणतो आणि जे तुम्ही करता किंवा लपविता तेही जाणतो. 

2:34 ३४. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना फर्माविले की आदमला सजदा करा. तेव्हा इब्लीसशिवाय सर्वांनी सजदा केला. त्याने इन्कार केला आणि घमेंड दाखविली  आणि तो काफिरां (इन्कारी लोकां) पैकीच होता. 

2:35 ३५. आणि आम्ही फर्माविले हे आदम! तुम्ही आणि तुमची पत्नी जन्नतमध्ये राहा आणि जिथून इच्छा होईल तिथून वाटेल तेवढे खा व प्या. परंतु या झाडाच्या जवळ जाऊ नका, अन्यथा अत्याचारी ठराल. 

2:36 ३६. परंतु सैताानाने त्यांना बहकवून तिथून बाहेर घालविलेच आणि आम्ही सांगून टाकले की उतरा येथून (जा, चालते व्हा), तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात आणि एक ठराविक वेळेपर्यंत तुम्हाला धरतीवर राहायचे आणि लाभ घ्यायचे आहे. 

 2:37 ३७. आदमने आपल्या पालनकर्त्याकडून काही वचने शिकून घेतली (आणि अल्लाहजवळ क्षमायाचना केली). अल्लाहने त्यांची तौबा (क्षमायाचना) कबूल केली. निःसंशय तोच तौबा कबूल करणारा, दया करणारा आहे. 

 2:38 ३८. आम्ही फर्माविले, तुम्ही सर्व येथून उतरा, मग जर तुमच्याजवळ माझ्याकडून मार्गदर्शन आले तर जो कोणी माझ्या उचित मार्गाचा स्वीकार करील त्यांच्यावर कसलेही भय राहणार नाही, ना ते दुःखी होतील. 

 2:39 ३९. आणि जे कुप्र (इन्कार) आणि असत्याद्वारे आमच्या आयतींना खोटे ठरवतील ते जहन्नममध्ये राहणारे आहेत. नेहमी त्यातच राहतील.
(Qur'an 2:30-39)
==================================

 4:1 १. हे लोकांनो! आपल्या त्या पालनकर्त्याचे भय राखा, ज्याने तुम्हाला एकाच जीवापासून निर्माण केले आणि त्याच्यापासूनच त्याच्या पत्नीलाही निर्माण केले, आणि त्या दोघांपासून अनेक स्त्री-पुरुष पसरविले आणि त्या अल्लाहचे भय राखा, ज्याच्या नावाने तुम्ही एकमेकांकडे याचना करतात आणि नाते-संबंध तोडण्यापासूनही (स्वतःला वाचवा) निःसंशय, अल्लाह तुम्हा सर्वांची देखरेख करणारा आहे. 
(Qur'an 4:1)
==================================

✔️📗7:11 ११. आणि आम्ही तुम्हाला निर्माण केले, मग तुमचे रूप घडविले, मग आम्ही फरिश्त्यांना फर्माविले की आदमला सजदा करा, तेव्हा इब्लिसला सोडून सर्वांनी सजदा केला कारण तो सजदा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही. 

 7:12 १२. (अल्लाहने) फर्माविले, जेव्हा मी तुला सजदा करण्याचा आदेश दिला, तेव्हा कोणत्या कारणाने तुला सजदा करण्यापासून रोखले. तो म्हणाला, मी याच्यापेक्षा अधिक चांगला आहे. तू मला आगीपासून निर्माण केले आणि याला मातीपासून निर्माण केले आहे. 

 7:13 १३. (अल्लाहने) आदेश दिला की तू आकाशातून खाली उतर, आकाशात राहून घमेंड करण्याचा तुला काहीच हक्क नाही. तेव्हा चल निघ. निःसंशय तू धिःक्कारलेल्यांपैकी आहेस. 

 7:14 १४. (सैतान) म्हणाला, मला (कयामतपर्यंत) संधी प्रदान कर, जेव्हा लोक दुसऱ्यांदा जिवंत केले जातील. 

 7:15 १५. (अल्लाहने) फर्माविले, तुला ती संधी प्रदान केली गेली. 

 7:16 १६. (सैतान) म्हणाला, तू मला धिःक्कारल्यामुळे मी त्यांच्यासाठी तुझ्या सरळ मार्गावर बसेन. 

 7:17 १७. मग त्यांच्या समोरून आणि पाठीमागून आणि उजव्या व डाव्या बाजूने हल्ला करीन आणि तुला यांच्यात अधिकांश लोक कृतज्ञशील आढळणार नाहीत.  

 7:18 १८. (अल्लाहने) फर्माविले, तू यापासून (येथून) अपमानित होऊन निघून जा जे त्यांच्यापैकी तुझ्या मार्गावर चालतील तर मी तुम्हा सर्वांनी जहन्नमला भरून टाकीन. 

 7:19 १९. आणि (आम्ही फर्माविले की) हे आदम! तुम्ही आणि तुमची पत्नी जन्नतमध्ये राहा, मग जिथून इच्छा होईल तिथून खा, आणि त्या झाडाच्या जवळ जाऊ नका अन्यथा अत्याचारी ठराल. 

 7:20 २०. मग सैतानाने दोघांच्या मनात कुविचार निर्माण केला, यासाठी की दोघांच्या वर त्यांची लज्जास्थाने उघड करावीत आणि सांगितले की तुम्हा दोघांच्या पालनकर्त्याने तुम्हाला या झाडापासून अशासाठी रोखले आहे की तुम्ही दोघे फरिश्ते व्हाल किंवा सदैवकाळ राहणारे व्हाल. 

 7:21 २१. त्याने (सैतानाने) त्या दोघांच्या समोर शपथ घेतली की, मी तुम्हा दोघांचा शुभचिंतक आहे. 

 7:22 २२. अशा प्रकारे धोकेबाजीने दोघांना खाली आणले, मग त्या दोघांनी झाडाचा स्वाद घेताच, दोघांवर त्यांची गुप्तांगे उघड झाली आणि ते आपल्यावर जन्नतची पाने चिकटवू लागले, आणि त्यांच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने दोघांना पुकारले की काय मी तुम्हा दोघांना या झाडापासून रोखले नव्हते? आणि तुम्हाला सांगितले नव्हते की सैतान तुमचा खुला शत्रू आहे. 

 7:23 २३. दोघे म्हणाले, हे आमच्या पालनकर्त्या! आम्ही स्वतःवर जुलून करून घेतला आणि जर तू आम्हाला माफ केले नाही आणि आमच्यावर दया केली नाही तर आम्ही नुकसान उचलणाऱ्यांपैकी होऊ. 

 7:24 २४. (अल्लाहने) फर्माविले, तुम्ही खाली उतरा. तुम्ही आपसात वैरी आहात आणि तुम्हाला एक अवधीपर्यंत धरतीत राहावयाचे आणि लाभ प्राप्त करून घ्यायचे आहे. 

7:25 २५. फर्माविले की तुम्ही त्यातच जीवन व्यतीत कराल आणि त्यातच मरण पावाल आणि त्यातूनच बाहेर काढले जाल. 

7:26 २६. हे आदमच्या पुत्रांनो! आम्ही तुम्हाला असे वस्त्र प्रदान केले जे तुमच्या लज्जास्थानांना झाकेल आणि शोभा देईल आणि सर्वांत उत्तम वस्त्र, अल्लाहच्या भयाचे वस्त्र आहे. ही अल्लाहची निशाणी आहे यासाठी की यांनी स्मरण राखावे. 

 7:27 २७. हे आदमच्या पुत्रांनो! तुम्हाला सैतानाने बहकवून न द्यावे, जसे तुमच्या माता-पित्याला जन्नतमधून बाहेर घालिवले. त्याने त्यांचे वस्त्र उतरवून दिले, यासाठी की त्यांना त्यांची गुप्तांगे दाखवावीत. निःसंशय तो आणि त्याचे जातीबांधव तुम्हाला अशा ठिकाणाहून पाहतात की तुम्ही त्यांना पाहू शकत नाही. आम्ही सैतानांना अशा लोकांचे मित्र बनविले, जे ईमान (विश्वास) राखत नाही.
(Qur'an 7:11-27)
==================================

 ✔️📗7:189 १८९. तो (अल्लाह) असा आहे की ज्याने तुम्हाला फक्त एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच्याद्वारे त्याची जोडी बनवली, यासाठी की त्याने आपल्या त्या जोडीदारापासून सुख चैन प्राप्त करावी, मग पतीने पत्नीशी जवळीक केली, तेव्हा तिला गर्भ राहिला हलकासा, मग ती त्याला घेऊन चालत फिरत राहिली. जेव्हा तिला भार जाणवू लागला, तेव्हा पती-पत्नी दोघे अल्लाहशी, जो त्यांचा स्वामी आहे, दुआ (प्रार्थना) करू लागले की जर तू आम्हाला सहीसलामत (व्यवस्थित स्वरूपात) संतान प्रदान केली तर आम्ही खूप खूप आभार मानू. (Qur'an 7:189)
==================================

✔️📗15:28 २८. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने फरिश्त्यांना फर्माविले की मी एक मानव, काळ्या सडलेल्या, खनकणाऱ्या मातीपासून निर्माण करणार आहे. 

15:29 २९. तर जेव्हा मी त्याला पूर्ण बनवून घेईन आणि त्यात आपला आत्मा फुंकेन तेव्हा तुम्ही सर्व त्याला सजदा करा (त्याच्यापुढे माथा टेका) 

15:30 ३०. यास्तव सर्वच्या सर्व फरिश्त्यांनी आपला माथा टेकला. 

15:31 ३१. परंतु इब्लिसने सजदा करणाऱ्यांमध्ये सामील होण्यास इन्कार केला. 

15:32 ३२. (अल्लाहने) फर्माविले, हे इब्लिस! तुला झाले तरी काय की तू सजदा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही? 

15:33 ३३. तो म्हणाला, मी असा नाही की या मानवाला सजदा करावा, ज्याला तू काळ्या आणि सडलेल्या खणखणणाऱ्या मातीपासून निर्माण केले आहे. 

15:34 ३४. (अल्लाहने) फर्माविले, आता तू जन्नतमधून चालता हो कारण तू धिःक्कारलेला आहेस. 

15:35 ३५. आणि तुझ्यावर कयामतच्या दिवसापर्यंत माझ्यातर्फे धिःक्कार आहे. 

15:36 ३६. तो म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! मला त्या दिवसापर्यंत संधी प्रदान कर की लोकांना दुसऱ्यांदा (जिवंत करून) उठविले जाईल. 

15:37 ३७. फर्माविले, (ठीक आहे) तू त्यांच्यापैकी आहेस, ज्यांना संधी दिली गेली आहे. 

15:38 ३८. ठरलेल्या दिवसाच्या वेळेपर्यंतची. 

15:39 ३९. (सैतान) म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! तू मला मार्गभ्रष्ट केलेस तर मीदेखील शपथ घेतो की मी सुद्धा धरतीत त्यांच्यासाठी मोह माया निर्माण करीन आणि त्या सर्वांना बहकवून मार्गभ्रष्ट करीन. 

15:40 ४०. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, ज्यांना तू निवडून घेतले आहे. 

15:41 ४१. फर्माविले, हो. हाच माझ्यापर्यंत पोहचण्याचा सरळ मार्ग आहे. 
(Qur'an 15:28-41)
==================================

✔️📗17:61 ६१. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना आदेश दिला की आदमला सजदा करा, तेव्हा इब्लिसखेरीज सर्वांनी सजदा केला. तो म्हणाला, काय मी त्याला सजदा करू, ज्याला तू मातीपासून बनविले आहे. 

17:62 ६२. ठीक आहे, पण पाहा तू त्याला माझ्यावर श्रेष्ठता तर प्रदान केली आहे, परंतु जर तू मला कयामतपर्यंत संधी देशील तर मी याच्या संततीला, फार कमी लोकांशिवाय आपल्या काबूत करेन. 

17:63 ६३. (अल्लाहने) आदेश दिला, जा, त्यांच्यापैकी जो कोणी तुझा अनुयायी होईल तर तुम्हा सर्वांची शिक्षा जहन्नम आहे, जो पुरेपूर मोबदला आहे. 

17:64 ६४. त्यांच्यापैकी तू ज्याला देखील आपल्या बोलण्याने बहकवू शकशील बहकव आणि त्यांच्यावर आपले स्वार आणि प्यादे चढवून आण, आणि त्यांच्या धन आणि संततीमधून आपलाही हिस्सा लाव, आणि त्यांना (खोटे) वचन दे. त्यांच्याशी जेवढी देखील वचने (वायदे) सैतानाचे असतात, सर्वच्या सर्व पूर्ण दगाबाजी आहे. 

17:65 ६५. माझ्या सच्चा दासांवर तुझा कोणताही प्रभाव आणि काबू नाही आणि तुमचा पालनकर्ता मोठा काम बनविणारा पुरेसा आहे. 
(Qur'an 17:61-65)
==================================

✔️📗18:50 ५०. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना आदेश दिला की आदमच्या पुढे सजदा करा, तेव्हा इब्लिस (सैताना) खेरीज सर्वांनी सजदा केला तो जिन्नांपैकी होता. त्याने आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाची अवज्ञा केली. काय तरीही तुम्ही त्याला आणि त्याच्या संततीला, मला सोडून आपला मित्र बनवित आहात? वास्तविक तो तुम्हा सर्वांचा शत्रू आहे. अशा जुलमी लोकांचा किती वाईट मोबदला आहे.
(Qur'an 18:50)
==================================

✔️📗20:115 ११५. आणि आम्ही आदमला अगोदरच ताकीदपूर्ण आदेश दिला होता, परंतु त्यांना त्याचा विसर पडला आणि आम्हाला त्यांच्यात कोणताही दृढनिश्चय आढळला नाही. 

20:116 ११६. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना सांगितले की आदमला सजदा करा तेव्हा इब्लिसखेरीज सर्वांनी सजदा केला, त्याने साफ इन्कार केला. 

20:117 ११७. तेव्हा आम्ही सांगितले, हे आदम! हा तुमचा आणि तुमच्या पत्नीचा शत्रु आहे (लक्षात ठेवा) असे न व्हावे की त्याने तुम्हा दोघांना जन्नतमधून बाहेर घालवावे, ज्यामुळे तुम्ही संकटात सापडावे. 

20:118 ११८. इथे तर तुम्हाला ही सवलत आहे की ना तुम्ही उपाशी राहता, ना नग्न. 

20:119 ११९. आणि इथे ना तुम्ही तहानलेले राहता, ना उन्हाने त्रस्त राहता. 

20:120 १२०. परंतु सैतानाने आदमच्या मनात कुविचार टाकला, म्हणाला, हे आदम! काय मी तुम्हाला चिरस्थायी जीवनाचा वृक्ष आणि त्या राज्यसत्तेची खबर देऊ जी कधीही जुनी न व्हावी. 

20:121 १२१. यास्तव त्या दोघांनी त्या झाडातून काही खाल्ले, मग त्यांची गुप्तांगे उघडी झालीत आणि ते जन्नतची पाने आपल्या अंगावर चिकटवू लागले. आदमने आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली आणि बहकले. 

20:122 १२२. मग त्यांच्या पालनकर्त्याने त्यांना उपकृत केले, आदमची तौबा कबूल केली आणि त्यांचे मार्गदर्शन केले. 

20:123 १२३. (अल्लाहने) फर्माविले, तुम्ही दोघेही इथून खाली उतरा. तुम्ही आपसात एकमेकांचे शत्रू आहात. आता तुमच्याजवळ जेव्हा कधीही माझ्याकडून मार्गदर्शन पोहचेल, तर जो कोणी माझ्या मार्गदर्शनाचे पालन करील तर तो न बहकेल, ना कष्ट- यातनाग्रस्त होईल.

20:124 १२४. आणि जो कोणी माझ्या स्मरणापासून तोंड फिरविल, त्याचे जीवन तंगी- अडचणीचे राहील आणि कयामतच्या दिवशी आम्ही त्याला आंधळा करून उठवू. 

20:125 १२५. (तो) म्हणेल, हे पालनकर्त्या! मला तू आंधळा बनवून का उठविले? वास्तविक मी चांगले बघू शकत होतो. 

20:126 १२६. उत्तर मिळेल, असेच व्हायला पाहिजे होते. तू माझ्या (तर्फे) आलेल्या आयातींचा विसर पाडला, तद्‌वतच आज तुझाही विसर पाडला जात आहे. 

20:127 १२७. आणि आम्ही असाच मोबदला प्रत्येक माणसाला देत असतो, जो मर्यादेचे उल्लंघन करील आणि आपल्या पालनकर्त्याच्या आयतींवर ईमान न राखेल आणि निःसंशय आखिरत (मरणोत्तर जीवना) चा अज़ाब मोठा सक्त आणि चिरस्थायी आहे. 
(Qur'an 20:115-127)
==================================

✔️📗38:71 ७१. जेव्हा तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने फरिश्त्यांना सांगितले, मी मातीपासून मानवाला निर्माण करणार आहे. 

38:72 ७२. तर जेव्हा मी त्याला यथायोग्य करीन आणि त्याच्यात आपला आत्मा फुंकीन, तेव्हा तुम्ही सर्व त्याच्यासमोर सजदा करा (माथा टेका) 

38:73 ७३. तेव्हा सर्व फरिश्त्यांनी सजदा केला.

38:74 ७४. परंतु इब्लिसने (केला नाही) त्याने घमेंड केली आणि तो इन्कार करणाऱ्यांपैकी होता. 

38:75 ७५. (अल्लाहने) फर्माविले की हे इब्लिस! त्याला (आदमला) सजदा करण्यापासून तुला कोणत्या गोष्टीने रोखले, ज्याला मी आपल्या हातांनी बनविले, काय तू गर्विष्ठ झाला आहेस की तू उच्च दर्जा राखणाऱ्यांपैकी आहेस? 

38:76 ७६. (त्याने) उत्तर दिले की मी याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, तू मला आगीपासून निर्माण केले आणि याला मातीपासून निर्माण केले. 

38:77 ७७. फर्माविले की तू येथून निघून जा, तू तिरस्कृत (धिःक्कारित) झाला. 

38:78 ७८. आणि कयामतच्या दिवसापर्यंत तुझा माझ्यातर्फे धिःक्कार आहे. 

38:79 ७९. तो म्हणाला, हे माझ्या स्वामी! मला त्या दिवसापर्यंत सवड प्रदान कर, जेव्हा लोक (जिवंत करून) उठविले जातील. 

38:80 ८०. (अल्लाहने) फर्माविले, तू सवड दिल्या जाणाऱ्यांपैकी आहेस. 

38:81 ८१. निर्धारित वेळेच्या दिवसापर्यंत . 

38:82 ८२. म्हणाला, मग तर तुझ्या प्रतिष्ठेची शपथ! मी या सर्वांना अवश्य भटकवीन. 

38:83 ८३. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, जे निवडक (आणि प्रिय, पवित्र) असतील. 

38:84 ८४. फर्माविले, सत्य हेच आहे आणि मी सत्यच सांगत असतो.

38:85 ८५. की मी तुझ्याद्वारे आणि तुझ्या सर्व अनुयायींद्वारे जहन्नमला भरून टाकेन. 
(Qur'an 38:71-85)
==================================
अनुवाद-  — Muhammad Shafi’i Ansari 

शुक्रवार, १४ मे, २०२१

दाऊद सुलेमान अ. भाग 5

🌴🌴🌴पॅलेस्टाईन (फलस्तीन) आणि इस्राईल मधील इतिहास...कुरआनमधील सत्य बोधकथांच्या च्या आधारे...🌴🌴🌴

ही सत्य कथा इस्राइल या देशातली 3000 वर्षांपूर्वीची म्हणजेच 1000 BC ची आहे..

प्रोफेट मूसा (Moses) यांच्यानंतर

मूसा अ. यांचे अनुयायी आणि बनी इस्राईल चे लोक, यांनी त्यांचा एक राजा असावा अशी इच्छा केली. आणि त्यावेळच्या संदेशकर्ताच्या द्वारे  " तालुत " यास राजा बनविले गेले.

बनी इस्राइलचा राजा, “तालुत”, शत्रूंसमोर जाण्याआधी, हे माहीत करू इच्छित होता की, त्याच्या लोकांची अचूक कुवत (सामर्थ्य) किती आहे…त्याला हे माहीत करायचे होते की, त्यांच्यातले किती जन शौर्याने लढणारे आहेत…म्हणून जेव्हा, ते एका झऱ्याजवळ एकत्र आले, तो लोकांना म्हणाला, “तुमची परीक्षा घ्यायची, अल्लाहची इच्छा आहे…

"जो कोणी, त्याची पूर्ण तहान भागविण्यासाठी पाणी पियील, तो आमच्यापैकी नाही…जर तुम्ही खूप तहानलेले असाल, तर फक्त एक घोट घेऊन घसा ओलसर करू शकता…”

जवळ जवळ, सर्व बनी इस्राईलच्या

लोकांनी पूर्ण तहान भागविली आणि म्हणाले, "आमच्यात जालुत सारख्या (शत्रू) मोठ्या शक्तीशाली सैनिकाशी लढण्याचे सामर्थ्य नाही…आम्ही मागे राहू…"

म्हणून काही थोड्याच लोकांनी तालुत चे लक्षपूर्वक ऐकले आणि त्यांनी, त्या वाहत्या झऱ्यातून जास्त पाणी पिले नाही, ते तयार होते आणि तेच लढाईसाठी योग्य होते…

ज्यांनी स्वतःचे धैर्य हरवले होते, त्यांना,

जे अल्लाहचे नाव घेऊन लढण्यासाठी तयार होते, त्यांनी म्हटले,

"तुम्ही का घाबरत आहात? जरी आपण थोडे असलो आणि शत्रू आपल्या संख्येपेक्षा खूप पटीने आणि जास्त मजबूत असला, तरी आपण लढू…

अल्लाहच्या मदतीने, खूप कमकुवत आणि कमी लोकांनी मजबूत शत्रूंविरूध्दची लढाई जिंकली आहे…”

जेव्हा ह्या संख्येने कमी असलेल्या तालुतच्या सैन्याचा, पॅलेस्टाईनच्या              (फिलिस्तीन) सैन्याशी सामना झाला…त्यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांना कणखर आणि शूर राहण्यासाठी मदत कर…

लढाई सुरू झाली…आणि शक्तीशाली पॅलेस्टिनी सैनिक जालुत पुढे आला…त्याने बनी इस्राइल मधील प्रत्येकाला त्याच्याशी लढण्याचे आव्हान केले…तो इतका बलवान होता की, कोणीही पुढे येण्याचे साहस केले नाही..

बनी इस्राइल मध्ये एक दुबळा तरुण होता “दाऊद अ.” जे पुढे चालून संदेश कर्ते बनविले गेले.

जालुत ने केलेला अपमान ते सहन करू शकले नाही..

ते त्यांच्या सैन्यातून, बाहेर आले आणि म्हणाले, ” मी तुझे आव्हान स्वीकारतो..मी तुझ्याशी लढेन…”

जालुत हसला आणि त्याने दाऊद अ. यांची  थट्टा उडविली…पण ते कणखररित्या उभे राहीले…त्यांचा निशाणा खूप चांगला होता…जेव्हा त्यांनी त्यांचा गुल्लेर (गलोल) उचलला आणि तीन दगड जालुतच्या दिशेने भिरकावले…तीन ही दगड, त्या बलवान व्यक्तीला, त्याच्या कपाळावर लागले आणि तो खाली पडला आणि मृत झाला…

यामुळे शत्रुची बाजी त्यांच्यावरच उलटली..जेव्हा पॅलेस्टिनीनी पाहीले, त्यांचा शक्तीशाली माणूस, एका तरुणाकडून मारला गेला…त्या तरुणाची बहादुरी पाहून, शत्रूने धास्ती घेतली आणि त्यांनी धैर्य गमावले आणि पळाले.

कमी संख्या असलेल्या, अल्लाहला घाबरणाऱ्या सैन्याकडून, ज्यांनी अल्लाह (ईश्वर) ची मदत आणि धैर्य मागितले होते, त्यांच्या पेक्षा जास्त पटीने (संख्येने) असणारे शत्रू पराभूत झाले…

बनी इस्राइल विजयी झाले… तेव्हापासून ते लोक तरुण दाऊद अ. यांची, त्यांच्या बहादुरी आणि धैर्यासाठी प्रशंसा करू लागले, त्यांच्यावर प्रेम करू लागले 

आणि त्याचा सन्मान करू लागले…

तालुतचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांनी दाऊद अ. यांना राजा बनविले…

हे थोडे असाधारण होते कारण, बनी इस्राइलच्या जमातीतून साधारणतः संदेशवाहक आणि पवित्र व्यक्ती असायच्या आणि राजा दुसऱ्या जमातीतील असायचा…पण दाऊद अ. हे त्यांच्याच जमातीतील होते….

नंतर अल्लाह (ईश्वर) ने त्यांना एक संदेशकर्ता ही बनविले…त्यामुळे दाऊद अ. दोन्ही होते, एक संदेशकर्ताही आणि राजाही …पण ते असे राजा नव्हते, जे त्यांच्या लोकांच्या (प्रजेच्या, जनतेच्या) पैश्यांवर जीवन जगतात…दाऊद अ. हे एक सदाचारी आणि प्रामाणिक व्यक्ती होते. ते जरी एका अफाट साम्राज्याचे बादशाह होते, तरी त्यांनी राजवाड्याची शाही संपत्ती (खजिना) ला, त्यांच्या वैयक्तिक उपयोग करण्यासाठी कधीच स्पर्श केला नाही.

त्यांनी, लोखंड आणि पोलाद यांपासून विविध वस्तू बनविल्या…आणि त्यावर उदर निर्वाह करून जगले…त्यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांचे श्रम त्यांच्यासाठी सोपे व्हावे…

अल्लाह (ईश्वर) ने, त्याच्या संदेशवाहकाची प्रार्थना ऐकली आणि त्यांच्या

हातात (तळहातात) लोखंड नरम होण्याचे सामर्थ्य ,बक्षिसाच्या रुपात दिले…जेणेकरून ते त्यांना आवडेल त्या साच्यात लोखंड बसवू शकतील. म्हणून ते 

त्यांचे चिलखत (लढाईत शरीर रक्षणासाठी घालावयाचे धातूचे कवच) बनवू शकले… लोखंडापासून त्याच्या स्वतःच्या हातांनी, चिलखताचे कवच बनवून ते त्यांचा  उदरनिर्वाह पूर्ण करायचे.

ते चिलखत मजबूत करण्यासाठी, लोखंडाच्या किचकट साखळ्या विणायचे.

हे विकून, अल्लाह (ईश्वर) चा संदेशवाहक आणि बनी इस्राइलचा राजा, दाऊद अ., त्यांच्या उपजिविकेसाठी कमवायचे…
अल्लाह (ईश्वर)ने दाऊद अ. यांना

महान ज्ञान दिले होते आणि निर्णय घेण्याची शक्ती दिली होती. धार्मिकता दिली होती…

त्यांनी त्यांच्या लोकांवर चांगले 

आणि न्यायाने राज्य केले…..

अल्लाह (ईश्वर) ने दाऊद अ. यांना 

त्याचा ग्रंथ दिला “जबुर”.

दाऊद अ. यांचा आवाज खूप सुंदर आणि गोड होता..प्रत्येक सकाळी जेव्हा ते “जबुर” मधून अल्लाह (ईश्वर) च्या प्रशंसेचे वाचन करायचे… त्यांचा गोड आवाज पर्वतांत घुमायचा…पर्वत त्या प्रशंसेच्या आवाजाचे प्रतिध्वनी उमटवायचे…आणि सर्व पक्षी, त्याच्यासोबत अल्लाह (ईश्वर) ची प्रशंसा करण्यासाठी, त्याच्याभोवती घोळक्याने जमा व्हायचे….त्याचा आवाज इतका नियंत्रित, ओघवता आणि स्पष्ट की, ते त्यांच्या घोड्यावर, खोगीर (saddle)
बसवतांनाा, पूर्ण “जबूर” ग्रंथ 

वाचू शकत होते. (बोलून, पाठांतर करून) 

ज्यात अल्लाह ने वर्णन केलेल्या बोधकथा आणि प्रशंसा होत्या.

पक्ष्यांची भाषा दाऊद अ. यांना समजत होती आणि ते त्यांच्यासोबत बोलू शकत होते…जसे माणसे एकमेकांशी बोलतात….

ते मानायचे की, सगळी पृथ्वी एक अल्लाह (ईश्वर) च्या मालकीची आहे.आणि सदाचारी लोक, हे या जमिनीचे खरे वारसदार आहेत.

एक दिवस दोन माणसे राजा दाऊद अ. कडे आली आणि त्यांनी त्यांच्या

आपसातील वादाचा निर्णय करण्यास 

सांगितले.


एक म्हणाला, "ह्या माणसाने त्याच्या मेंढ्यांच्या कळपाला माझ्या शेतात चरण्यासाठी आणि पीक खाण्यासाठी सोडले, जे पीक कापणीसाठी तयार होते. मी काय केले पाहिजे? मी त्याला न्यायासाठी तुमच्याकडे घेऊन आलो आहे."

दाऊद अ. यांनी सर्व काळजीपूर्वक ऐकले. मग त्यांनी निर्णय घेतला की, पूर्ण वाढ झालेल्या पिकाची किंमत तेवढीच असते जेवढी एका मेढ्यांच्या कळपाची असते. त्यामुळे तो माणूस, ज्याच्या मेंढ्यांनी 

पीक खाल्ले आहे 

त्याने त्याच्या मेंढ्यांचा कळप, शेताच्या मालकाला द्यावा.

दाऊद अ. यांंचा पुत्र सुलेमान अ.

 (जे नंतर संदेश कर्ता बनविले गेले)

 हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होते, ते म्हणाले, “माझ्या पित्याने जे काही म्हंटले आहे, ते बरोबर आहे. पण येथे एक चांगला उपाय असू शकतो. मेंढ्यांच्या मालकाने , त्याच्या मेंढ्या त्या माणसाला द्यायचा, जो शेताचा मालक आहे ,आणि जो मेंढ्याचा मालक होता, तो त्याच्या शेताकडे लक्ष ठेवेल.

शेताचा मालक, मेंढ्यांना ठेऊन घेऊ शकतो आणि त्यांचे दूध आणि लोकर उपयोगात आणू शकतो, जोपर्यंत शेतात पुन्हा पीक परिपक्व होत नाही. त्यानंतर त्याने त्या मेंढ्या, त्याच्या मालकाला परत करायच्या आणि त्याचे शेत वापस घ्यायचे.

दाऊद अ., त्यांचा तरुण पुत्र , त्या वादावर, इतक्या हुशारीने उपायाचा निर्णय घेऊ शकला , म्हणून खूप आनंदी झाले.
सुलेमान अ. मोठा होऊन, त्यांच्या पित्यासारखे उत्तम एक राजा आणि एक संदेश वाहक बनले.

सुलेमान अ. यांना ही पक्ष्यांची भाषा समजत होती आणि ते ही त्याच्या पित्यासारखे ज्ञानी होते.

प्रेषित दाऊद यांचे एक भव्य साम्राज्य होते. त्यांच्या मुलाला ते साम्राज्य , वंश परंपरेने मिळाले होते.


सुलेमान अ. एक  खूप हुशार आणि बुद्धिमान युवक होते. 

आणि ते नेहमी त्यांच्या वडिलांना, त्यांच्या चांगल्या तार्किक बुध्दी आणि ज्ञानाने चकीत करायचे. ते ही त्यांच्या पित्यासारखे खूप धार्मिक वृत्ती, कर्तव्यनिष्ठतेने मोठे झाले होते.आणि अल्लाह (ईश्वर) कडून संदेशकर्ता बनविले गेले होते…

अल्लाहने त्यांना पक्षी आणि प्राणी यांची भाषा समजण्याची प्रतिभा “बक्षीस” म्हणून दिली होती. 

अल्लाहने त्यांना वाऱ्याच्या हालचालीवरचे नियंत्रण ही दिले होते. सुलेमान अ. यांचे साम्राज्य जगातील एक भव्य, संपन्न आणि खूप उत्कृष्ट साम्राज्य होते. जे आधी कुणीही पाहिले नव्हते. त्याच्या प्रजाजनमध्ये फक्त माणसेच नव्हती तर जिन्न (आगीने बनलेले जीव), प्राणी आणि पक्षी ही होते.

सुलेमान अ. वारा नियंत्रित करू शकत होते., त्यामुळे ते स्वतःला त्यांच्या इच्छेप्रमाणे, दूर अंतरावर हवेवर स्वार होवून घेऊ जावू शकत होते.

त्यांच्या पक्षी आणि प्राण्याच्या भाषेच्या ज्ञानामुळे त्यांना खूप दूरच्या आणि विस्तृत जागे विषयी बातमी मिळण्यास मदत मिळायची.

जिन्न हे खूप शक्तीशाली जीव होते.

ते जमिनीत आणि समुद्राच्या, महासागराच्या तळाशी लपलेले अमूल्य खजिने सुलेमान अ. साठी आणायचे आणि त्यांच्या राज्यात, खूप मोठ्या आणि उत्कृष्ट इमारती, बनवायचे.
पवित्र क़ुरआन मध्ये म्हटले गेले आहे की, 

सुलेमान अ. जिन्नांचा श्रमिक म्हणून, मोठ्या इमारती, किल्ले आणि तलाव बांधण्यासाठी, वापर करायचे. शक्तीशाली आणि सहसा कुणाच्या ताब्यात न राहणारे जिन्न, सुलेमान अ. साठी न थकता काम करायचे. 

सुलेमान अ. इमारतींना, किल्ल्यांना सुंदर किमती दगडांनी आणि रत्नांनी सजवायचे. हे सगळे शक्य होते कारण सुलेमान अ. यांनी अल्लाह (ईश्वर, यहोवा) ला प्रार्थना केली होती की, त्यांना एक भव्य साम्राज्य द्यावे आणि म्हणून अल्लाहने अशा धन्यतेची कृपा केली होती.

जेव्हा सुलेमान त्यांच्या राजवाड्यात दरबार 

भरवत होते, तेव्हा जिन्न, प्राणी आणि पक्षी आज्ञाधारक पणे, त्यांच्यासमोर रांगेत उभे राहायचे. जसे दुसरे प्रजाजन उभे राहायचे.अशा प्रकारे अल्लाहने त्याच्या सद्गुणी प्रेषिताला पारितोषिक दिले होते.

एकदा जेव्हा सुलेमान अ. आणि त्यांचे सैन्य प्रवासात होते, 

ते एका दरीत आले, जी पूर्ण मुंग्यांनी भरली होती. जसे ते मुंग्यांच्या जवळ गेले, सुलेमान अ. यांनी ऐकले की, मुंग्यांच्या राजाने त्यांना लवकर त्यांच्या वारुळांत जाण्यास सांगितले, जेणेकरून ते, सुलेमानच्या सैन्याने चिरडले जावू नये. (सुलेमान यांना प्राण्यांची भाषा समजत होती. त्यांना ही समज अल्लाह म्हणजेच ईश्वराकडून देण्यात आली होती.)

सुलेमान अ. हसले., जेव्हा त्यांनी हे ऐकले आणि शक्तिशाली अल्लाहचे आभार मानले, ज्याने त्यांना छोट्या जीवांना समजण्याच्या प्रतिभेचे “बक्षीस” दिले होते, 

ज्यामुळे सुलेमान अ. त्यांच्यावर दया करू शकत होते.

’ताबूत सकीना’ त्यांनी व्यवस्थित राजवाड्यात ठेवला होता.

बादशाह_सुलेमान

🌹🌹🌹सबा ची राणी 🌹🌹🌹
एक दिवस जेव्हा राजा सुलेमान अ. यांनी दरबार भरवला होता, त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या दरबारातील हुदहुुद (हुपू; hoopoe) पक्षी गायब होता.

सुलेमान अ. त्याच्या अनुपस्थितीने नाराज झाले आणि म्हणाले, " हुदहुद कोठे आहे? मला तो तुमच्यामध्ये दिसत नाही. जर अनुपस्थित राहण्याचे एक चांगले कारण नसेल तर, मी त्याला नक्कीच शिक्षा करेन."

ते असे म्हणत असतानाच, हुदहुद उडत आत आला आणि विलंब झाल्याने दिलगिरी व्यक्त केली.

"मी एका शक्तीशाली राज्य "सबा" ची बातमी आणली आहे. त्या राज्यावर एक राणी राज्य करते , जी एका उत्कृष्ट सिंहासनावर विराजमान होते. सबा येथील लोक, खऱ्या अल्लाह (एक ईश्वर) ची उपासना सोडून, सूर्याची उपासना करतात." त्याने राजाला सांगितले.

"तू आमच्याशी खरे बोलत आहे का, हे आम्ही लवकरच माहीत करू," सुलेमान अ. म्हंटले. 

"हे घे, हे पत्र घेऊन सबा ला जा, तेथे ते पोहोचव आणि मग काय घडते ते पाहायची वाट पाहा.
हुदहुद ने सुलेमान अ. यांचे पत्र घेतले आणि सबा ला जाण्यासाठी निघाला. तेथे त्याने राणीच्या समोर ते टाकले आणि शांतपणे काय घडते , ते पाहण्याची वाट पाहू लागला.

राणीने जेव्हा ते पत्र वाचले, तिच्या सल्लागाराला काय करावे असे विचारले. "हे राजा सुलेमान कडून एक पत्र आहे. अल्लाह (ईश्वर) चा योग्य सन्मान करून आणि अल्लाहच्या नावाने सुरू केलेले आहे. त्याने अल्लाह च्या सत्यनिष्ठेला विरोध न करता,  समर्पण करण्यासाठी मला त्याच्याकडे बोलावले आहे."
मग राणीने थोडा वेळ विचार केला आणि सुलेमान अ. साठी काही मौल्यवान भेटवस्तू पाठविण्याचा निर्णय घेतला.

पण सुलेमान अ. काही साधारण राजा नव्हते. ते अल्लाहचे (एक ईश्वराचे) संदेश कर्ता (प्रेषित) होते. ते क्रोधित झाले, जेव्हा त्यांनी पाहिले की, राणीने त्यांच्या संदेशाचा कसा अर्थ लावला. 

त्यांनी तिच्या संदेश देणाऱ्याला भेटवस्तू सहित वापस पाठविले आणि त्याला म्हंटले की, "राणीला सांग की, जर अल्लाह (ईश्वर) च्या सत्य निष्ठेकडे बोलवण्याचे उत्तर भेटवस्तू असतील, तर तो सबा ला सैन्यासह येईन."

आता राणी खरच घाबरली आणि तिने तत्काळ स्वतः सुलेमान अ.कडे जाण्याचा निर्णय घेतला.जेव्हा सुलेमान अ. यांना  तिच्या येण्याचा हेतू कळला, 

त्यांनी त्यांच्या दरबाऱ्यांना विचारले, "येथे कोणी आहे का, जो तिचे सिंहासन, ती इथे येण्याआधी आणू शकेल ."

एका जिन्नने उत्तर दिले की, "डोळ्यांची पापणी लवण्याआधी तो ते आणू शकेल." सिंहासन आणण्याचा आदेश देण्यात आला. जेव्हा तो आणला गेला, सुलेमान अ. यांनी त्याच्यात थोडा बदल केला.

जेव्हा राणी आली, तिला तो सिंहासन दाखविण्यात आला आणि विचारले, "हे तुझे सिंहासन आहे का?" तिने लगेच त्या सिंहासनाला ओळखले, कारण ती खरोखर बुद्धिमान होती, पण तिने तिचे आश्चर्य लपविले आणि म्हणाली, "हे तसेच दिसत आहे".
सुलेमान अ. यांनी तिला त्यानंतर एका सुंदर राजवाड्यात नेले, ज्याची फरशी चकाकणारी होती. तिने फरशीवर पाय ठेवण्यासाठी तिचा घागरावर उचलला. कारण तिला वाटले की, ते पाण्याचे तळे आहे. पण ती खरंच राजवाड्याची फरशी होती ज्याची पारदर्शक (विशेष मौल्यवान काचेने) फरस बंदी केली होती.(आच्छादली होती.) 

अशी त्या राजवाड्याची भव्यता होती.
जे अल्लाह ने सुलेमान अ. यांना बहाल केले होतेे. राणी इतकी प्रभावित झाली की, ती अल्लाह (ईश्वर) च्या सत्यनिष्ठेला शरण गेली.

"मी स्वतःशी चूक केली आहे. आता सुलेमान अ. सह मी या जगाच्या प्रभुला शरण जात आहे."
अशाप्रकारे सुलेमान अ. त्या सुंदर राणीला अल्लाहची शक्ती पटविण्यास सक्षम झाले.

सुलेमान अ. यांच्या पायाशी सर्व मौल्यवान सांसारिक (ऐहिक) खजिने होते. तरीही त्यांची अल्लाहवर असलेल्या श्रध्देत कमी झाली नाही. ही सुद्धा अल्लाह चीच कृपा होती.

ते नेहमी, इतके जास्त देण्यासाठी अल्लाहला आभार मानत राहिले आणि गर्विष्ठ झाले नाही. 

एकदा जेव्हा सुलेमान अ. एका उत्कृष्ट मशिदीच्या बांधकामाची देखरेख करत होते. त्यांच्या मृत्यूची वेळ आली. जेव्हा त्यांना याची जाणीव झाली की, ते मरणार आहे, ते उरलेल्या बांधकामाच्या देखरेखी विषयी चिंताग्रस्त झाले. त्यांना भीती होती की अडेल (बेलगाम, ताब्यात न राहणारे) जिन्न अर्धवट काम सोडून, मोकळे सुटतील.

अल्लाह ने याची काळजी घेतली. जेव्हा बांधकाम पूर्ण केले जात होते, सुलेमान अ. त्यांच्या चालण्याच्या काठीचा आधार घेऊन उभे राहिले. 

त्याच अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा

किड्यांनी त्यांची काठी आतून पोखरून खाल्ली आणि ते कोसळले, फक्त तेव्हाच सुलेमानच्या मृत्यूचे गुपित जिन्नांसमोर प्रकट झाले. तोपर्यंत ते काम करत राहिले. कारण सुलेमान अ. यांना एकाच अवस्थेत काठीच्या मदतीने उभे राहण्याची सवय होती.

जिन्नांनी, ते सर्व , अल्लाह (ईश्वर) चे रहस्य न समजण्यालायक असल्यामुळे एकमेकांना शाप दिला. " जर आम्हाला याविषयी आधीच माहीत असते तर आम्ही या परिश्रमापासून खूप लवकर सुटका करून घेतली असती." ते म्हणाले.

ही बोध कथा आणि सत्य कथा पवित्र कुरआन मध्ये वर्णन केली आहे. कृपया मराठी कुरआन वाचा आणि ईश्वराची संकेत वचने जाणून घ्या.


सत्यकथा🍁यशायाह (Isaiah)🍁🍁राजा "हजकिया" (Hezekiah) (700BC) (साधारणतः 2700वर्षांपूर्वी) जेरुसलेम (जुडा) राज्यावर राज्य करीत होता. 

अल्लाह (ईश्वर, यहोवा,God) चा चांगला सेवक आणि राजा होता. त्यावेळी 'यशायाह' अ. हे अल्लाहचे संदेशकर्ता म्हणजेच प्रोफेट होते. 

राजा हजकीया, राज्याच्या चांगल्यासाठी, यशायाह अ. ,जे काही करण्याचा सल्ला देत होते आणि ज्यावर प्रतिबंध लावत होते, राजा ऐकत होता आणि त्यांचा आज्ञाकारी होता आणि त्यांना सल्ला मागत होता. इस्रायली लोकांमध्ये घडामोडी होत गेल्या आणि प्रकरणांना वेग आला. राज्य एका योग्य राजाच्या हातात होते आणि राज्याची प्रजा त्याला पसंत करत होती. एक दिवस राजाला एक आजार झाला. त्याच्या पायाला संसर्गित जखम झाली. 

याच काळात त्याने एक भयानक बातमी ऐकली. त्याचा एक सेवक राजवाड्यात पळत आला आणि त्याने ओरडून सांगितले, " 'बेबिलोन' चा राजा 'सनहेरीब ' (sennacherib) आपल्यावर आक्रमण करण्यास येत आहेत." 

आणि हे खरे होते. क्रूर आश्शुरी राजा साठ हजार सैन्यासह इस्राइल (जेरुसलेम) कडे येत होता.

बेबिलोन (बाबिली) हे मेसोपोटेमिया मधील एक सुप्रसिद्ध प्राचीन शहर होते. या शहराची स्थापना 1894 BC मध्ये आमोरी वंशीय राजांनी केली होती.(हल्लीच्या इराक, इराण, तुर्कस्तान व सीरिया या देशांचा काही भूभाग प्राचीन काळी ' मेसोपोटेमिया' भूप्रदेश नावाने ओळखला जायचा.)
{बेबिलोन चे अवशेष इराकच्या बेबीलोन प्रांतातील "अलहिल्लाह" या गावाजवळील एका टेकडीखाली सापडतात.}

लोक खूप भयभीत झाले. बातमी ऐकून राजा चिंताग्रस्त झाला आणि त्याने 

यशायाह अ. यांना विचारले, "अल्लाह ने सनहेरीब आणि त्याच्या सैन्याविषयी तुमच्यावर काय प्रकट केले (सांगितले) आहे".

"अल्लाहने आतापर्यंत मला काहीही नाही सांगितले", त्यांनी उत्तर दिले.
राजा दुःखी होता. कारण तो त्याच्या पायाच्या आजारमुळे लढाई करू शकत नव्हता.
यशायाह अ.प्रार्थना करत होते, तेव्हा अल्लाहने त्यांना एक गुप्त गोष्ट सांगितली. (प्रकट केली)

दुसऱ्या दिवशी यशायाह संदेश घेऊन राजाला भेटावयास आले.
"तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या उत्तराधिकारीची नेमणूक करा .कारण तुमची शेवटची वेळ आलेली आहे."


जेव्हा यशायाह अ. यांनी हे सांगितले, 

राजा प्रार्थना स्थळाकडे तोंड करून प्रार्थना करू लागला. त्याने गौरवशाली अल्लाहला प्रार्थना केली आणि विनंती केली, रडला.

प्रामाणिक मन, विश्वास आणि संयम ठेवून, सर्वशक्तीशाली आणि उदात्त अल्लाहला रडत आणि विनंती करत, तो म्हणाला, "हे प्रभू, माझ्या कर्मांची आठवण ठेव, इस्राइलच्या लोकांसाठी असलेले निर्णय,  सगळे तुझ्याकडूनच होते. मी जे करतो, ते तू चांगले जाणतो. माझे सर्व काम आणि माझे खुले आणि गुप्त कार्य तुझ्या समोर आहेत."

जेव्हा अल्लाहने हिजकियाची मनापासून केलेला प्रार्थना ऐकली, तेव्हा अल्लाहला त्याच्यावर दया आली.


त्या रात्री जेव्हा यशायाह प्रार्थना करत होते, अल्लाहने त्यांना राजाला आनंददायक बातमी देण्यास सांगितले की, त्याच्यावर दया झाली आहे. अल्लाह आणखी पंधरा वर्षांसाठी हिजकीयाचे वय वाढवणार आहे. आणि त्यांचा आजार बरा होणार आहे. आणि शत्रू सनहेरीब पासून वाचवणर आहे.

लगेच दुसऱ्या दिवशी यशायह अ. यांनी राजाला ही चांगली बातमी दिली. जेव्हा राजाने हे ऐकले, तो आनंदी झाला.

दुःख आणि वाईट विचार दूर झाले. त्याने वाकून प्रणाम करून प्रार्थना केली, "हे प्रभू, तू ज्याला इच्छितो त्याला राजा बनवतो आणि ज्याला इच्छितो त्याला सत्तेवरून काढून टाकतो. ज्याला इच्छितो त्याला उन्नत करतो आणि ज्याला इच्छितो त्याची अधोगती करतो. अदृश्य जाणणारा आणि स्पष्ट असणारा. सगळ्यात पहिला आणि शेवटचा. अभिव्यक्त आणि ज्ञात असणारा. तू दया दाखविली आणि अस्वस्थ लोकांच्या प्रार्थनांना उत्तर दिले."


जेव्हा राजाने त्याचे डोके वर केले, अल्लाहने यशायाह अ. यांना, राजाला आदेश देण्यास सांगितले की, अंजिराचे पाणी काढून त्याच्या जखमेवर लावावे आणि तो बरे होईल.

राजाने अल्लाहच्या आदेशाप्रमाणे पाणी लावले. हा एक चमत्कार होता. त्याचे जखम लगेच भरले. राजा आनंदी होता. त्याने म्हंटले की, "अल्लाह दया करतो आणि दुःखी लोकांच्या वेदना कमी करतो."

अल्लाहने सनहेरीब च्या सैन्याकडे मृत्यूच्या स्वर्गदूताला पाठविले. सकाळी राजा सनहेरीब ने त्याच्या सैन्याला मृत झालेले पाहिले. अल्लाहने जे वचन दिले होते ते पूर्ण केले.

शत्रूच्या सैन्यातील राजा आणि त्याचे पाच 

सहकारी सोडून कोणीच जिवंत नव्हते. या पाच सहकाऱ्यांमध्ये नबूकदनेस्सर (बूख्तनसर) ही होता.


राजा हजकिया ने त्यांना बेड्या घातल्या आणि त्याच्या राज्यात वापस नेले. 

राजाने, सनहेरीब आणि त्याच्या सहकाऱ्यांना, सर्वांना दिसण्यासाठी, दरबाराच्या शिक्षा देण्याच्या जागी ठेवले आणि सत्तर दिवसापर्यंत, द्वेष आणि अपमानित करण्यासाठी कैदेत ठेवले. 

रोज प्रत्येकाला खाण्यासाठी "बारले" ची भाकरी देण्यात यायची. सत्तर दिवसानंतर त्यांना, राजाने तुरुंगात टाकले.

सत्तर दिवसानंतर अल्लाहने, यशायाह अ. यांना, सनहेरीब आणि त्याच्या सहकाऱ्यांना, त्याच्या राज्यात वापस पाठवण्यास सांगितले. 

जेणेकरून ते त्याच्या प्रजेला, म्हणजेच त्याच्या राज्यातील लोकांना सावध करतील, की, त्यांच्यासोबत काय घडले. 

जेव्हा यशायाह अ. यांनी, राजा हजकिया ला, या बाबतीत संदेश दिला, तेव्हा राजाने तुरंत त्यांना मुक्त केले.
जेव्हा सनहेरीब त्याच्या लोकांत वापस गेला, त्याने त्याच्या वाजिरांना आणि सल्लागारांना जमा केले आणि सांगितले, की, त्याच्या सैन्याला कसे मारण्यात आले आणि सत्तर दिवस त्यांना किती त्रास दिला.
तेव्हा धार्मिक लोक आणि जादूगार लोक पुढे आले आणि म्हणाले, आम्ही तुम्हाला अल्लाह आणि त्यांच्या संदेशकर्त्याविषयी सूचना दिली होती.पण तुम्ही ऐकले नाही. दुसऱ्याने असे म्हंटले, तो एक असा देश आहे, ज्याला कोणी मिटवू शकत नाही. त्या देशाला कोणी जिंकू शकत नाही. सनहेरीब आता अल्लाह (ईश्वर) ला घाबरला होता. त्याने पुन्हा कधी इस्राइलवर आक्रमण करण्याचा विचार केला नाही. त्यानंतर सात वर्षांनंतर त्याचा मृत्यू झाला.

कुरआन मध्ये यशायाह अ. यांचे नाव आहे.
यहुदी (ज्यू,हिब्रू) लोक एक अल्लाहला (ईश्वराला) यहोवा म्हणतात.आणि ख्रिश्चन लोक गॉड म्हणतात. तिन्ही ग्रंथात 

कुरआन, बायबल (इंजील) आणि तोराह (तौरेत) मध्ये जवळजवळ सारख्याच

सत्यकथा आहेत. संदेशकर्ता ही सारखेच आहेत.

पण कुरआन च्या आधीच्या ग्रंथांत, लोकांकडून बदल झाला. त्यामुळे ते मूळ ग्रंथ नाही.


अरमाया (जेरमाया) अ. 

(655BC)(2675वर्षांपूर्वी )
जेरुसलेमच्या लोकांनी फक्त एक अल्लाह

म्हणजेच ईश्वर ची (अल्लाहला ते "यहोवा" म्हणत होते.) उपासना करणे सोडून, दगडांच्या प्रतिमा बनविल्या आणि त्यांची उपासना सुरू केली.

अरमाया अ. यांनी अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला, फक्त एका अल्लाहची  (ईश्वराची) उपासना करा आणि परत या. पश्र्चाताप करा. क्षमा मागा.अल्लाह दयाळू आहे.

अरमाया अ. यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला की, ही त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे. नाहीतर ते सर्व लोक नष्ट होतील.


पण त्यांचा उपदेश लोकांनी मानला नाही. त्यांनी अरमाया अ. यांना खोटं बोलणारा समजले. ते लोक गर्विष्ठ झाले. त्यांच्यामध्ये खूप लोक चुकीच्या रस्त्यावर गेले. 

पाप वाढले. लोक कुकर्म करू लागले. त्यांना चमत्कार दाखवूनही (अल्लाहच्या मदतीने) काही फरक पडत नव्हता. ते या गोष्टीवर विश्वासच करू शकत नव्हते की, अल्लाह, त्या दगडाच्या गुंबद (हैकले सुलेमानी) ला, जे जेरुसलेममध्ये सुलेमान अ. यांनी बांधले होते आणि ज्यावर अल्लाहची कृपा होती, नष्टही करू शकतो.

लोकांनी अरमाया अ. यांच्या, संदेशातील धमकी आणि चेतावणी ऐकली, ते म्हणाले,  "तू खोटे बोलत आहेस, तू असे म्हणत आहे की, अल्लाह या जमिनीला, प्रार्थना स्थळाला, [जे आधी, फक्त एका अल्लाह (यहोवा, ईश्वर)ची उपासना करण्यासाठी होते, आणि आता] जेथे दगडाच्या प्रतिमा ठेवल्या गेल्या होत्या, ग्रंथाला (ज्यामध्ये बदल केला गेला होता) नष्ट करेल?"

जेरुसलेमचा राजा खूप गर्विष्ठ होता. त्याने आदेश दिला की, "अरमायाला कैद करा आणि तुरुंगात टाका. त्यांनी अरमाया अ. यांना, जकडून तुरुंगात टाकले. ही खूप मोठी चूक होती.

अल्लाहने (ईश्वराने) नबूकदनेस्सर (nebuchadnezzar) या 

बेबीलोन (इराकचे प्राचीन शहर) च्या राजाला जेरुसलेम वर, आक्रमण करण्यास पाठवले. 

त्याने, त्याच्या सैन्यासह देशात प्रवेश केला आणि शहराला घेरले . जेव्हा हा सैन्याचा वेढा प्रदीर्घ कालावधी पर्यंत राहिला. जेरुसलेमच्या सैन्याने शरणागती पत्करली, त्यांनी त्यांच्या शहराचे दरवाजे उघडले आणि राजाच्या सैन्याने शहरात प्रवेश केला आणि ते खूप क्रूर होते. राजाने क्रूरतेने त्यांच्यावर, त्याचा कायदा लागू केला आणि त्यांना निर्दयीपणे शिक्षा केली.

राजाने, एक तृतीयांश लोकांचा वध केला आणि एक तृतीयांश लोकांना पकडले. बेबिलोनच्या सैन्याने फक्त अपंग आणि वृद्ध लोकांना जाऊ दिले. त्यांनी जेरुसलेमच्या लोकांच्या सर्व घरांना नष्ट केले. त्या सैन्याने हैकले सुलेमानीच्या इमारतीला  (प्रार्थनास्थळाला) नष्ट केले. बेबोलोनच्या सैन्याने, तेथील लोकांचे, सर्व पुस्तके आणि ग्रंथ जाळून टाकले. त्यांनी मुलांशी आणि स्त्रियांशी ही वाईट वागणूक केली. हा तेथील लोकांसाठी खूप भयावह दिवस होता.
मग त्यांनी, त्यांना घोड्यांवर स्वार होऊन पायदळी तुडविले. तरुणांना वेगळे करून स्त्रियांना बाजाराच्या ठिकाणी रक्षक म्हणून उभे केले. त्यांनी सैन्यात दहशत पसरवली आणि राजाने जेरुसलेमच्या वंशाला पूर्णपणे संपुष्टात आणले. 

हे इस्राइल अ.  (याकूब अ.) च्या वंशाच्या लोकांसाठी, जे जेरुसलेम मध्ये राहत होते, खूप भयानक दृश्य होते. ती जागा लोकांच्या रक्ताने भरली. सगळी कडे मृतदेह होते.

बेबोलोनच्या राजाला माहीत झाले की, इस्राइल च्या लोकांचा एक संदेशकर्ता आहे, ज्याला आधी पासूनच या विनाशा विषयी माहीत होते आणि त्याचे नाव अरमाया आहे. राजाने आदेश दिला की, त्या संदेश कर्त्याला तुरुंगातून बाहेर आणले जावे. अरमाया अ.शी बोलल्यानंतर राजाला जाणीव झाली, की ते खरच अल्लाह (ईश्वर) चे  खरे संदेशकर्ता (पैगंबर) होते. राजा ने त्यांची सुटका केली.
त्या पूर्ण शहराला नष्ट करून बेबिलोनचा राजा पुन्हा त्याच्या राज्यात निघाला. राजा बेबिलोनला, सर्व लूट घेऊन निघाला, ज्यामध्ये संपत्ती, सोने, हिरे, मौल्यवान खजिने होते आणि पुरुष, स्त्रिया, मुले होती, त्यांच्यात तरुणी होत्या आणि धर्मोपदेशकांची मुले होती, सर्व मिळून सत्तरहजार पर्यंत होते. अंदाजे सत्तर हजार पुरुष आणि स्त्रियांना त्याने सेवक बनविले.

इस्राइलची जमात ही अल्लाहची जमात होती. त्या लोकांकडे खूप संदेश देणारे (पैगंबर) आले. अल्लाहने त्यांना खूप संधी दिल्या होत्या. पण दुर्दैवाने त्यांनी अल्लाह चा प्रत्येक आदेश तोडला. इतकेच नाही तर त्यांनी अल्लाहचा संदेश देणाऱ्यांची हत्या केली आणि दगडाच्या प्रतिमांची उपासना करणे चालू ठेवले. याच कारणाने अल्लाह (ईश्वर) त्यांच्यावर खूप क्रोधित झाला आणि पूर्ण जमातीला ध्वस्त आणि नष्ट केले.

या विध्वंसानंतर इस्राइल मध्ये नवीन युग सुरू झाले. अरमाया अ. यांनी लोकांना म्हंटले की, जे इस्राइल मध्ये हजर आहेत, त्यांनी स्वतःच्या अपराधावर पश्चाताप करून अल्लाह (ईश्वर) ला क्षमा मागावी आणि हे ही सांगितले की, अल्लाह पुन्हा एकदा त्या लोकांची भरभराट करेल. पण खूप लोक, त्या विध्वंस झालेल्या शहरात राहण्यास इच्छुक नव्हते. त्यांनी पुन्हा एकदा अरमाया अ. यांचा आदेश मानण्यास नकार दिला. आणि ते सगळे लोक जगाच्या वेगवेगळ्या भागात स्थलांतरित झाले. त्यातील काही इजिप्त (मिस्र), स्पेन (हिजर) आणि सौदी अरेबिया (तैफ) मध्ये गेले. पण अरमाया अ. यांनी इस्राइल ची पुन्हा भरभराट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

ही सत्य घटना आहे. बायबलमध्ये पूर्ण एक chapter यावर आधारित आहे. जेरुसलेमचे लोक ( इस्राइलचे वंशज) दोन वेळा उपद्रव माजवतील व दोन वेळा जेरुसलेम नष्ट केले जाईल, अशी चेतावणी अल्लाह (यहोवा) कडून देण्यात आली होती.

कुरआन मध्ये हा संदर्भ आहे.
#कुरआनचा_काही_अंश

"4 आणि आम्ही इस्राईलच्या मुलांना, ग्रंथाद्वारे हे आधीच कळविले होते की, तुम्ही जमिनीवर दोन वेळा उपद्रव माजवाल आणि मोठ्या विद्रोहाचे प्रदर्शन कराल. 5 मग ज्या दोन घटनेच्या बाबतीत आधीच इशारा दिलेला होता, त्यांपैकी जेव्हा पहिल्या घटनेची वेळ आली, तेव्हा आम्ही आमच्या भक्तांपैकी अशा काही भक्तांना तुमच्या विरुद्ध पाठवले. जे युद्धाच्या बाबतीत फार शक्तीशाली असे होते, जे तुमच्या घरांत (घुसले व) त्यांचे वाटोळे केले. अशाप्रकारे आधीपासून वर्तवलेले भाकीत पूर्णत्वास पोहोचले.
[कुरआन 17:4-6]

________________________________


[इस्रायली लोकांच्या ग्रंथात ' तोराह ' मध्ये हे भाकीत अल्लाह (यहोवा) ने वर्तविले आहे, जो अल्लाहचाच ग्रंथ आहे , पण लोकांनी त्यात फेरबदल केले आहे. अरमाया अ. यांना त्या इस्राइलच्या वंशजाकडे, चेतावणी देण्यासाठी पाठवले होते. ही पहिली घटना होती. दुसरी घटना, जी ईसा (येशू) अ. यांच्या काळातील आहे. जेव्हा दुसऱ्या वेळेस इस्राइल च्या वंशजाने उपद्रव माजवला होता आणि विद्रोह केला होता.]

 

🐳माशाच्या पोटात 🐳
युनूस अ. हे एक ईश्वरनिष्ठ तरुण होते.

ते "निनेवेह" (सध्याच्या "मोसुल" च्या बाहेरील भागात असणारे एक प्राचीन शहर, इराक) येथे राहत होते. 

या ठिकाणचे लोक फक्त एक खऱ्या अल्लाहवर (ईश्र्वरावर) विश्वास ठेवत नव्हते. त्यामुळे अल्लाहने त्या लोकांसाठी युनूस अ. यांना, त्याचा संदेशकर्ता म्हणून निवडला. 

युनूस अ. यांनी अल्लाहच्या संदेशाचा उपदेश त्या लोकांना दिला. पण त्या लोकांनी त्यांच्या पद्धतीने अविचारीपने त्याचा उपदेश लक्षपूर्वक ऐकला, आणि जेव्हा तो म्हणाला एकच अल्लाह (ईश्वर, पालनकर्ता) आणि तो, अल्लाहचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे, त्यांनी त्याची थट्टा केली.
युनूस अ. यांनी त्यांना विनवणी केली, अल्लाहच्या क्रोधाविषयी आणि दंडाविषयी (शिक्षा) चेतावणी दिली. पण काहीच अर्थ नव्हता. ते त्याला पाहून अजून हसले आणि विश्वास केला नाही. 

यामुळे युनूस अ. यांची त्यांच्याकडून निराशा झाली. त्यांनी रागावून आणि अल्लाहच्या शिक्षेबद्दल चेतावणी देत, अल्लाहचा आदेश येण्याची वाट न पाहताच, निनेवेह च्या लोकांना सोडले.

यावर निनेवेह च्या लोकांना काहितरी गंभीरपने चूक झाली आहे, याची जाणीव झाली. त्यांना त्यानंतर भीती वाटली आणि वाटले की, "युनूस अ. हा अल्लाहचा खरा संदेशकर्ता होता. त्याला त्रास देऊन, त्यांनी अल्लाहला नाराज केले आहे आणि आता अल्लाहची दिलेली शिक्षा नक्कीच त्यांना नष्ट करू शकते.."

ज्या क्षणी त्यांना याची जाणीव झाली, ते पश्र्चाताप करण्यासाठी खुल्या जागेत आले, वाकून आणि अल्लाहकडे याचना करत, नमन करू लागले. त्यांनी क्षमा याचना केली आणि सत्य निष्ठा स्वीकार केली. त्यांनी इतक्या प्रामाणिकपणेे क्षमा मागितली की, अल्लाहने त्यांना क्षमा केली आणि त्यांच्यावर ती शिक्षा (दंड, आपदा) केली नाही, ज्या विषयी, युनूस अ. त्यांना चेतावणी देऊन गेले होते.

या काळात, युनूस अ. यांनी, त्यांच्या लोकांना आणि "निनेवेह" ला रागाच्या भरात सोडल्यानंतर , ते दूर जावून, एका नौकावर चढले जी, त्या क्षणी समुद्रात प्रवासासाठी निघणार होती.
ती नौका, जी लोकांनी भरली होती समुद्रात निघाली, पण रस्त्यात, एक मोठे वादळ नौकेवर आदळले आणि नौका लहरींवर हेलकावे देऊ लागली.

त्याकाळी असे मानले जायचे की, जर एखादा पळपुटा गुलाम (विकत घेतलेला नोकर, जशी त्या काळी माणसांना विकत घेऊन काम करवून घेण्यासाठी, "गुलाम" बनविण्याची पद्धत होती.), नौकेवर किंवा जहाजावर चढला तर, ते जहाज किंवा बोट बुडते.

या कारणामुळे लोकांनी संशय केला की, या बोटीवर, एक पळून आलेला गुलाम आहे. तो कोण आहे हे माहीत करण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकून, ज्या माणसाचे नाव येईल त्याला, नावेच्या बाहेर समुद्रात फेकण्याचा निर्णय घेतला..जेव्हा सगळ्या चिठ्ठ्यामधून, एका नावाची चिठ्ठी उचलण्यात आली, ते युनूस अ. यांचे नाव होते. 

कोणीच युनूस अ. यांच्यावर विश्वास करण्यास तयार नव्हता की, "युनूस पळून आलेला गुलाम नाहीं", कारण ते खूप सभ्य आणि धार्मिक वाटत होते.
तीन वेळा चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि प्रत्येक वेळेस युनूस अ. यांचे नाव आले.
आता युनूस अ. यांना खात्री झाली की, 

त्यांनी अल्लाह (ईश्वर) चा आदेश येईपर्यंत वाट पाहिली नाही आणि रागाच्या भरात, निनेवेह आणि त्यांच्या लोकांना सोडून, अल्लाह (ईश्वर) ला नाराज केले आहे.

"हो, मी पळून आलेला गुलाम आहे" ते म्हणाले, मी माझ्या प्रभू आणि मालकाला (ईश्वराला) सोडून पळालो, जर तुम्हाला पुढे सुरक्षित जायचे आहे तर, मला नौकेच्या बाहेर फेका."

खूप अनिच्छिने नावेच्या लोकांनी, जे युनूस अ. यांच्याकडून सांगण्यात आले होते, ते केले आणि त्यांचा पुढचा प्रवास चालू ठेवला.
जसे युनूस अ. खोल पाण्यात पडले, 

एक मोठा मासा पोहत आला आणि त्या मास्याने त्यांना गिळले. युनूस अ. यांनी स्वतःला माश्याच्या पोटात असलेले पाहिले, जेथे अंधकार आणि खूप जास्त खोली होती. ते भयभीत आणि असहाय्य होते. जेव्हा मासा पोहायचा, युनूस अ. आतल्या आत फेकले जायचे आणि त्यांना खूप अस्वस्थ वाटायचे आणि भिती वाटायची.    "मी पुन्हा कधी दिवसाचा प्रकाश पाहू शकेन का? मी अशा दयनीय पिंजऱ्यात मरून जाईल का?"  असे विचार त्यांना यायचे.

" मी निनेवेहच्या लोकांना का सोडले?" त्यांनी त्यांच्या चुकीचा पश्र्चाताप केला आणि अल्लाहकडे क्षमा याचना केली. त्यांनी, त्यांच्या मालकाला (अल्लाहला) दया करण्याची विनंती केली आणि या दुःखातून मुक्त करण्यास प्रार्थना केली.

"हे अल्लाह, तुझ्या शिवाय कुणीच अल्लाह (ईश्वर) नाही. फक्त तूच आहेस. सगळा गौरव तुझाच आहे. मी खरंच चूक होतो." 

ते म्हणाले. त्यांचा पश्र्चाताप पाहून अल्लाहने त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांच्यावर दया केली. मासा पोहत वर किनाऱ्यावर आला आणि युनूस अ. यांना बाहेर किनाऱ्यावरील रेतीवर (तोंडातून) बाहेर फेकले.
जेथे ते पडले, अस्वस्थ, खूप अशक्त आणि असहाय्य होते, जसा नवीन जन्म झालेला बालक असतो.

एक वेल, त्याच्या जवळ वाढला आणि त्यांना सावली दिली, जोपर्यंत त्यांना इतके बळ येत नाही, की ते स्वतः उठतील आणि त्यांच्या लोकांपर्यंत जातील, तोपर्यंत. आतापर्यंत त्यांच्या लोकांनी प्रत्येक ठिकाणी त्यांचा शोध घेतला होता. 

जेव्हा युनूस अ. शेवटी त्यांना दिसले ते लोक त्यांना पाहून खूप आनंदित झाले. युनूस अ. यांना कळले की, लोकांनी शेवटी खरी श्रध्दा स्वीकार केली आहे. जो संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोहोचविला होता, की फक्त एका पालन कर्त्याची उपासना करा, लोकांनी त्याचे अनुसरण केले होते आणि त्या एका प्रभूची क्षमा मागितली होती.

अल्लाह, जे पश्र्चाताप करतात आणि नम्रतेते क्षमा मागतात, त्यांना क्षमा करतो.

युनूस अ. यांचे नाव पवित्र कुरआन मध्ये आहे आणि त्यांनी जी प्रार्थना माश्याच्या पोटातून केली होती, ती प्रार्थना ही पवित्र क़ुरआन मध्ये आहे..कृपया स्वतःच्या मातृभाषेत कुर आन समजून वाचा आणि जाणून घ्या की, फक्त एक अल्लाह (ईश्वर, God, यहोवा)  चा आदेश आणि संदेश काय आहे, कशामुळे खरे यश मिळते आणि सत्य काय आहे...

💞💞अय्युब चा संयम 💞💞
दीर्घकाळाच्या आणि वेदनादायक आजाराने अय्युब अ. यांना अशक्त आणि अवतीभोवती फिरण्यास असमर्थ बनविले 

होते. ते वर्षांपासून एक असहाय्य आजारी बनून राहिले होते. त्यांच्या जागी दुसरा व्यक्ती असता तर, त्याचे धैर्य खचले असते आणि अल्लाहची निष्ठा हरवली असती आणि वेदनेने तो ओरडला असता. त्याने अल्लाहला असे दुःख आणि अस्वस्थता देण्याविषयी, ज्यात त्याचा स्वतःचा काही दोष नाही, तक्रार केली असती. 

पण अय्युब अ. यांनी संयमानेे आणि अल्लाहच्या निष्ठेत कणखर राहून त्रास सहन केला. त्यांनी त्यांच्या दुःखाविषयी कधीही तक्रार केली नाही.

लोकांनी त्यांना भेटण्यास येणे बंद केले 

आणि त्यांना मरण्यासाठी एकटे सोडून दिले. फक्त त्यांच्या पत्नीने त्याची सेवा केली आणि त्यांना प्रवृत्त केले आणि एकदा तीही एका क्षणासाठी खूप त्रासाने आणि खिन्नतेने, असंयमित झाली आणि तिने अल्लाहला तक्रार केली. 

यामुळे अय्युब अ. खूप दुखवले. ते, ज्यांनी एक शब्द ही न उच्चारता, इतक्या दिवसापासून इतका जास्त त्रास सहन केला होता, अल्लाहचे आभार न मानण्याची पत्नीची वृत्ती सहन करू शकले नाही.

त्यांनी, ते जेव्हा बरे होतील, तेव्हा त्यांच्या पत्नीला शंभर वेळा मारण्याची शपथ (वचन) घेतली. ते हे कदाचित अशामुळे ही बोलले असतील, कारण ते त्यावेळी, इतके असहाय्य होते की, ते किंचाळू शकत नव्हते. त्यांचा राग कोणत्याही तऱ्हेने व्यक्त करू शकत नव्हते.

एक पूर्ण असहाय्यतेच्या दशेत, अय्युब अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्याच्यावर दया होवू दे आणि या वेदनेतून त्यांची सुटका कर. 

अल्लाहने त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांच्यावर कृपा केली. अल्लाहने आदेश दिला की, जेथे ते झोपलेले आहे, तेथे पाय जमिनीवर आपट. 

अय्युब अ. यांनी आदेश पाळला आणि जेव्हा त्यांनी असे केले, ताजे पाणी तेथपासून उसळून वाहू लागले.अल्लाहने त्याला म्हंटले की, पाणी पी आणि त्यात स्नान कर. एक वेल त्यात वाढला आणि जेथे ते आराम करत होते तेथे त्यांना सावली दिली.

अय्युब अ. अल्लाहच्या कृपेने बरे झाले, पण जेव्हा त्यांना आठवले की, त्यांनी बरे झाल्यानंतर, त्यांच्या पत्नीला मारण्याची शपथ घेतली होती, ते अस्वस्थ आणि दुःखी झाले.

एकीकडे त्यांनी अल्लाहचे नाव घेऊन केलेले वचन होते आणि दुसरीकडे त्यांची पत्नी होती, जिला ते प्रेम करत होते. ते त्यांचे वचन तोडू शकत नव्हते, पण त्यांच्या पत्नीला मारहाण करण्याचा विचार, त्यांना नाखूष करत होता. या अवघड प्रसंगातून बाहेर येण्यासाठी अल्लाहने त्याच्या सद्गुणी संदेशवाहकाची मदत केली. अल्लाहने ( ईश्वराने) आज्ञा केली की, शंभर गवताच्या काड्या जमा कर आणि त्याने त्याच्या पत्नीला एकदाच मार. अशाप्रकारे ते, त्यांचे वचन ठेऊ शकले आणि त्यांच्या पत्नीला वेदना झाली नाही.

अल्लाहने त्याच्या कृपेने अय्युब अ. यांना बरे केले, त्यांच्या कुटुंब आणि मित्रांसोबत त्यांना एकत्र केले आणि त्यांना पुष्कळ संपत्ती आणि सुख दिले.

अय्युब अ. यांनी अल्लाह ला (ईश्वर ला ) केलेली प्रार्थना (दुआ) पवित्र क़ुरआन मध्ये, अल्लाह ने प्रकट केली आहे. 

या प्रार्थनेने खूप व्यक्तींना समाधान मिळते, जेव्हा व्यक्ती निराशेच्या काळात ती प्रार्थना करतो.

स्वतःच्या मातृभाषेत पवित्र क़ुरआन वाचा आणि जीवनाचा योग्य मार्ग निवडा...

मंगळवार, २३ जून, २०२०

08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन 

(*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.)

इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्या लोकांना, वंशजाला पसंद करत नव्हते….कारण बनी इस्राइल, एक आणि एक अल्लाह ची उपासना करत होते…

इजिप्तचे लोक आणि सैनिक, बनी इस्राईल वर अन्याय करत होते…त्यांच्याशी वाईट वागत होते…इजिप्तचे लोक, खूप शक्तिशाली होते…त्यामुळे गरीब, अत्याचार होणारे बनी इस्राईल, यांना त्यांच्या क्रूरतेपासून आणि निर्दयतेपासून, खूप कमी संरक्षण मिळायचे…ते त्यांचा आवाज उठवू शकत नव्हते…

त्या काळी, इजिप्तच्या राजाला, फिरौंन (फैरों, pharo) म्हंटले जायचे…

इजिप्त च्या लोकांना ज्योतिष विद्येत, जादू आणि भविष्यकथन यामध्ये खूप विश्वास होता…

एका भविष्य कथन करणाऱ्याने (ज्योतिषी) फिरौंनला सांगितले की एक मुलगा, बनी इस्राईलच्या जमातीत जन्म घेईल, जो त्याचे राज्य कोसळण्यास कारण होईल…

फिरौंन यावर खूप नाराज झाला आणि त्याने आज्ञा दिली की, बनी इस्राईलच्या कोणत्याही कुटुंबात जन्माला येणाऱ्या, प्रत्येक मुलाला जन्मताच मारून टाकावे…

याच काळात, एक मुलगा बनी इस्राइलमध्ये जन्माला आला…त्याची आई खूप घाबरली…तिने त्याचा जन्म गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण जर राजाच्या कोणत्याही सैनिकांनी त्या मुलाला, शोधले तर ते लगेच त्याला मारून टाकतील…

तिने अल्लाहकडे प्रार्थना केली आणि अल्लाहने तिला मार्गदर्शन केले की, एका लाकडाच्या पेटीत त्या बाळाला ठेव आणि ती पेटी नाईल नदीत सोड…तिने अल्लाहवर विश्वास ठेऊन ती आज्ञा पाळली…आणि अल्लाह ने तिला वचन दिले की, तिचा मुलगा सुरक्षित राहील…आणि ती पुन्हा लवकरच त्याच्या जवळ जाईल…

त्यामुळे तिने जेव्हा बाळाला एका लाकडाच्या पेटीत ठेवले आणि नदीच्या पाण्यावर तरंगू दिले, तेव्हा तिने तिच्या मोठ्या मुलीला, मरियमला सांगितले की, त्या पेटीकडे नजर ठेव…

ती पेटी राजवाड्याच्या दिशेने वाहत चालली होती आणि मरियम पेटीच्या मागे मागे नदीच्या काठावरून जात होती…जेव्हा पेटी राजवाड्याच्या जवळून जात होती, काही दरबारातील महिलांनी पाहिले की, ते छान आणि गोंडस बाळ, त्याचा अंगठा चोकत आरामात पेटीत खेळत आहे…त्यांनी ते बाळ राणीकडे आणले, जी फिरौंनची पत्नी होती… आसिया…
आसिया त्या बाळाला पाहून खूप आनंदी झाली कारण तिला स्वतःचे मूल नव्हते…तिने, त्या बाळाला दत्तक घेण्यासाठी, तिच्या पतीची परवानगी मागितली…पण तिच्या पतीला ही कल्पना आवडली नाही…

"हे मूल मला इजा करू शकते, जसे ज्योतिषाने भविष्य कथन केले आहे…" त्याने नकारार्थी उत्तर दिले…
पण आसियाने याचना केली, "या मुलाला मारू नका…तो आपल्यासाठी चांगला ही असू शकेल…"
अनिच्छेने तो मानला…

हे ठरवले गेले की, ते बाळ राजवाड्यात मोठे होईल आणि एक महिला त्याची काळजी घेण्यासाठी आणि त्याला दूध पाजण्यासाठी नियुक्त केली जाईल..जी महिला त्या बाळाला दूध देण्यासाठी नियुक्त केली गेली, बाळाने तिच्याकडून दूध घेतले नाही..आणि रडणे चालू ठेवले…मग मरियम (जी त्याची बहीण होती, पण हे कुणालाही माहीत नव्हते…) पुढे आली आणि म्हणाली, मी तुम्हाला एका महिलेविषयी सांगू शकते, जी खूप चांगली आहे आणि या बाळाला दूध पाजू शकते…

मरियमला त्या महिलेला बोलण्यास सांगण्यात आले…ती घरी आली आणि तिच्या आईला तिथे वापस घेऊन गेली…त्या बाळाने, त्याच्या आईच्या हातात गेल्यावर लगेच रडणे थांबवले…आणि दूध घेतले…

प्रत्येक जण आनंदी झाला…आणि त्या आईला, त्या लहान बाळाची देखभाल करण्याचे आणि दूध पाजण्याचे काम देण्यात आले…जो तिचाच मुलगा होता. (पण हे कुणालाही माहीत नव्हते)..

या बाळाचे नाव होते, "मूसा".
मूसा अ., एका राजकुमारासारखा फिरौंनच्या राजवाड्यात मोठा झाला…तो एक बलवान, सद्गुणी आणि योग्य तरुण बनला…पण तो जे अवतीभोवती पाहत होता, ते त्याला आवडत नव्हते…
नेहमी, जेव्हा तो शहरात, त्याच्या लोकांना भेटायला जायचा आणि पहायचा की इजिप्तचे लोक, गरीब लोकांशी निर्दयीतेने आणि क्रूरपणाने वागायचे…, तो त्यांच्या अन्यायाने शिकार झालेल्या लोकांना मदत करायचा…त्याला क्रूरता आवडायची नाही..त्याला खूप राग यायचा जो त्याला स्वतःला सहन होत नव्हता…
एक दिवस एका बलवान इजिप्तच्या माणसाने, एका गरीब व्यक्तीला खूप मारले…त्या माणसाने मदतीसाठी मुसाला बोलावले…मुसा खूप रागावला आणि इजिप्तच्या माणसाला त्याने एक थोबाडीत मारले…इतक्या जोरात मारले की तो माणूस खाली पडला आणि मृत झाला…
आता मुसा, जे झाले त्यामुळे, घाबरला आणि नाराज झाला…त्याला त्या माणसाचा जीव घ्यायचा नव्हता…ते झाले कारण अन्याय पाहून, त्याचा राग अनावर झाला…त्याने अल्लाहची क्षमा याचना केली…
जेव्हा इजिप्तच्या लोकांना कळले की, मुसाने एका माणसाला मारले आहे, फिरौंनच्या लोकांनी त्याला शोध सुरू केला..आणि म्हणून मुसाला इजिप्त सोडावे लागले…तो एका "मदयन" नावाच्या जागी गेला…

जेव्हा तो तेथे आला, त्याने एका विहिरीभोवती खूप लोकं पहिली…ते त्या विहिरीतून पानी काढत होते..आणि त्यांच्या शेळ्यांना आणि मेंढ्यांना देत होते…त्या गर्दीपासून, थोड्याच अंतरावर दोन तरुण मुली, त्यांच्या शेळ्यांसोबत उभ्या होत्या आणि शांततेने, प्रत्येकाची पाळी संपण्याची वाट पाहत होत्या..ज्यामुळे त्यांची पाणी घेण्याची पाळी येईल…
"तुम्ही पण तुमच्या हिश्श्याचे पाणी का नाही घेत?" मुसाने विचारले…
"कारण आम्ही इतके धैर्यवान नाही, आम्हाला प्रत्येकाचे होईपर्यंत वाट पाहावी लागेल…आमचे पिता, इथे स्वतःहून येण्यासाठी, खूप वृद्ध आणि अशक्त आहेत…त्यामुळे आम्हाला वाट पाहावी लागेल" ,त्या म्हणाल्या…

एक शक्तिशाली आणि सभ्य तरुण असल्याने आणि ज्याला न्याय देण्याची खूप चांगली बुध्दी असल्याने, मुसा पुढे झाला त्यांच्यासाठी पाणी काढले आणि त्यांच्या गुरांना दिले….
जेव्हा मुली घरी गेल्या, त्यांनी त्यांच्या पित्याला सांगितले की, कसे एका दयाळू तरुण माणसाने त्यांना मदत केली…त्यांचे पिता एक पवित्र व्यक्ती होते…एक संदेशवाहक होते…"शोएब".
ते त्यांच्या मुलींना म्हणाले की, "वापस जा आणि त्या तरुणाला घेऊन या…"
जेव्हा दोघींमधील एक मुलगी मुसाला बोलावण्यासाठी वापस गेली, तो एका झाडाखाली झोपला होता…थकलेला आणि भुकेला होता..आणि अल्लाहला प्रार्थना करत होता की मदत कर…ती त्याच्याकडे आली आणि म्हणाली की, तिचे पिता त्याला भेटण्यासाठी इच्छुक आहेत…
म्हणून मुसा उठला आणि तिच्यासोबत तिच्या घरी गेला…
शोएबने त्याला छान जेवण दिले आणि मग विचारले की, तो कोण आहे… मुसाने त्यांना फिरौंन आणि त्याच्या लोकांचा, गरीब बनी इस्राइलवरच्या अन्यायाची कहाणी सांगितली…आणि त्याच्या स्वतःच्या सुटकेची कहाणी सांगितली..त्या वृद्ध संदेश वाहकाने त्याला म्हंटले की, त्याला काही काळजी करण्याचे कारण नाही..कारण आता तो, एका सुरक्षित जागी, मित्रांत आला आहे…
दोघीपैकी एका मुलीने, तिच्या पित्याला मुसाला एका मेंढपाळच्या कामावर ठेवण्यास सांगितले ..शेळ्यांची देखभाल करण्यासाठी कारण तो बलवान, सद्गुणी आणि प्रामाणिक होता…

म्हणून त्यांचा पिता मुसाला म्हणाला, "जर तू आमच्यासोबत राहिला आणि आठ ते दहा वर्ष आमच्या शेळ्यांची देखभाल केली, तर मी माझ्या मुलीशी तुझे लग्न करून देईन…"

…..मुसा तेथे राहण्यास आणि त्यांच्यासाठी काम करण्यास तयार झाला… तेवढ्या वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर, त्याने लग्न करण्याची परवानगी मागितली आणि त्याच्या पत्नीसोबत, त्याच्या गुरांच्या कळपाला घेऊन, त्याने मदयन सोडले…

इजिप्तला जातांना, मुसाने एका टेकडीवर एक प्रकाश पहिला…त्याने त्याच्या पत्नीला जोपर्यंत तो तेथून(टेकडीवरून), काही आग घेऊन येत नाही, तोपर्यंत वाट पाहण्यास सांगितले…त्याने विचार केला की कोणी, जो त्याला रस्ता दाखवण्यास पात्र आहे, तेथे असेन…

त्यामुळे आगीकडे गेला…पण तो काही साधारण प्रकाश नव्हता…तो अल्लाहचा प्रकाश होता…

जसा मुसाजवळ गेला, तो प्रकाश दूर आणि आणखी दूर गेला…तो घाबरला आणि तेथून वापस येण्यासाठी फिरला…पण एका आवाजाने त्याला थांबवले…, "ओ, मुसा..मी तुझा अल्लाह आहे…तुझे पादत्राणे काढ…तू एका पवित्र "तोवा" च्या दरीत उभा आहे…मी तुला माझा संदेशवाहक म्हणून निवडले आहे…त्यामुळे तुला जे सांगितले जाईल, नीट काळजीपूर्वक ऐक…"

अशाप्रकारे अल्लाह मुसाशी बोलला आणि त्याला संदेशवाहक बनविले…मुसा गोंधळलेला होता…अल्लाहने त्याला विचारले की, त्याच्या हातात काय आहे?..
"ती माझी काठी आहे", मुसाने उत्तर दिले….
"खाली टाक", आज्ञा आली…

मुसाने आज्ञा पाळली आणि त्याला आश्चर्य वाटले, ती काठी एक भयंकर साप बनली…
"आता ती काठी उचल आणि घाबरु नको", आज्ञा आली आणि तो साप, पुन्हा काठी बनला…
मग मुसाला आज्ञा देण्यात आली की, त्याचा हाथ, त्याच्या दुसऱ्या भुजेच्या खाली घेऊन जा…आणि बाहेर काढ…
तो हात, त्याच्यावर काही जळण्याचे निशांनांविना चमकू लागला…(मुसा जेव्हा बालक होता तेव्हा त्याचा हात जळला होता…)

हे दोन चमत्कार मुसाला देऊन, अल्लाहने आज्ञा केली की, इजिप्तला वापस जा आणि त्याच्या खऱ्या धर्माची शिकवण, फिरौंनला आणि त्याच्या लोकांना दे. पण मुसाला भीती वाटत होती की, ते त्याला मारून टाकतील कारण त्याने, त्यांच्यामधील एका इजिप्शियनला मारले होते…अल्लाहने त्याला आश्वासनं दिले की ते तसे करणार नाही…

मुसाला त्याचे शब्द बोलतांना अडचण येत होती…तो थोडा तोतरे बोलायचा…म्हणून तो अल्लाहला म्हणाला की, त्याच्या भावाला, हारूनला(aron) सुध्दा, एक संदेशवाहक बनव, त्यामुळे तो मुसाला मदत करेन…

"हे ओझे सहन करण्यासाठी, माझ्या मनाला (हृदयाला) धैर्य दे आणि जे लोक ऐकतील त्यांच्यासाठी, माझे बोलणे स्पष्ट आणि प्रभावात्मक होऊ दे…" मुसाने अल्लाहला प्रार्थना केली…
अल्लाहने त्याला, त्याने जे मागितले सगळे दिले आणि दोघा भावांना, अल्लाहचा संदेश घेऊन, इजिप्तच्या दरबारात जाण्याची आज्ञा केली…
"तुमची शिकवण देतांना दयाळू रहा, कठोर राहू नका"…त्यांना सांगण्यात आले…

अल्लाहच्या मदतीने मुसा बळकट झाला आणि त्याच्या संदेशवाहक भावासोबत, हारून सोबत तो, इजिप्तच्या दरबारात जावून अल्लाहची शिकवण देण्यासाठी निघाला…

🌊मुसा आणि फिरौंन 3🌊
जेव्हा मुसा आणि हारून अल्लाहच्या संदेशाची शिकवण फिरौंन आणि त्याच्या लोकांना देण्यासाठी इजिप्त मध्ये आले, तेव्हा त्यांना दिसले की, बनी इस्राईल दयनीय अवस्थेत जगत आहेत…त्यांना कठोर गुलामी करण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे…

मुसा आणि हारून फिरौंनच्या दरबारात गेले आणि त्यांनी घोषणा केली की, ते त्यांच्या लोकांना, बनी इस्राईलला इजिप्त पासून दूर घेऊन जाण्यासाठी आले आहेत…त्यांच्या बापदादाच्या धरतीवर….

फिरौंनने लोकांना घेऊन जाण्यास नकार दिला आणि म्हंटला, " तू विसरला का, मुसा, की तू माझ्या राजवाड्यात माझ्या मुलासारखा मोठा झाला आहेस? आणि आता तू उपकार विसरून कृतघ्न बनला आहेस…?"

मुसाने उत्तर दिले , " माझ्या अल्लाहने मला मार्गदर्शन केले आहे आणि मला एक संदेशवाहक बनविले आहे…तू मला लहानाचे मोठे केले, या अशा एक मोठ्या उपकारामुळे, मी माझ्या सर्व लोकांना दुःख सहन करायला लावू का ?

फिरौंनने मुसाचे काही ऐकले नाही आणि त्याच्या शिकवणी वर खूप नाराज झाला कारण तो स्वतःला अल्लाह ( ईश्वर) समजत होता…

"तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे, मुसा? कोण आहे तुझा अल्लाह?" त्याने विचारले…

"माझा अल्लाह हा, तो आहे …ज्याने हे विश्व बनविले…त्याला भूतकाळाविषयी पूर्ण ज्ञान आहे…त्याने ही धरती, तुझ्या त्यावर चालण्यासाठी बनविली आणि तोच पाऊस खाली पाठवतो.." मुसा उत्तरला…

"हा हा…", फिरौंन हसला…" , मला माहित आहे की माझ्याशिवाय कोणीच ईश्वर नाही…" मग तो त्याच्या मंत्र्यांकडे वळला आणि म्हणाला, " हमाम, खूप उंच इमारत बनली का? जेणेकरून मी त्याच्या शिखरावर चढू शकेल आणि मुसाच्या अल्लाहला भेटेन…, नक्कीच तो खोटे बोलत आहे…

पण त्याच्या मनात फिरौंनला खात्री नव्हती…त्याने मुसाला घाबरवन्याचा प्रयत्न केला…
"मी तुला तुरुंगात टाकेल , मुसा,जर तू म्हणाला की माझ्याशिवाय दुसरा कोणी ईश्वर आहे"..तो म्हणाला. "जर तो बरोबर आहे, तर तू मला काही स्पष्ट निशाण सिध्द करण्यासाठी दाखविले पाहिजे… "

मुसा तयार झाला…अल्लाह ने त्याला दोन चमत्कार दाखविण्याची शक्ती सोबत आशीर्वाद दिला..त्याने त्याची काठी खाली फेकली आणि ती एका सापात बदलली…मग त्याने त्याचा हाथ त्याच्या काखेत नेला आणि बाहेर काढला…तो प्रखरतेने चमकू लागला…यावर दरबारातील लोक म्हणाले, "हा माणूस नक्कीच जादूगार आहे.."

फिरौंनने इजिप्तच्या सगळ्या हुशार जादूगारांना, त्यांची जादू मुसाला दाखविण्यासाठी बोलावले…

एक दिवस आणि वेळ स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आली आणि हे मान्य करण्यात आले की जो स्पर्धेत जिंकेल, तो योग्य आहे, असे मानण्यात येईल…त्या काळी जादूचे खेळ इजिप्त मध्ये खूप प्रसिद्ध होते…त्यामुळे सर्व शहरातून लोक हे पाहण्यासाठी आले…

मुसाने स्पर्धा ठेवण्यासाठी ,फिरौंनचे मन बदलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, "आम्ही जादूगार नाही, आम्ही अल्लाहचे संदेशवाहक आहोत. अल्लाहवर शंका करू नको..तो तुझा नाश करू शकतो…"

पण फिरौंनने निश्चय केला होता की स्पर्धा ठेवायची…कारण तो त्याच्या जादू गारांवर अगदीं खात्री बाळगून होता…

शेवटी मुसा मानला…," ठीक आहे, हे प्रत्येकाला सत्य काय आहे ते सिद्ध करेल…"

जादू गारांनी फिरौंनला विचारले, " जर आम्ही जिंकलो तर तुम्ही पारितोषिक देणार का?"
"नक्कीच", फिरौंन उत्तर ला…"मी तुम्हाला उच्च पद ही देईन".

"कोण सुरू करनार?" जादू गारांनी विचारले.."तू का आम्ही ?"

"तुम्ही" मुसा ने उत्तर दिले…

जादूगारांनी त्यांच्या सळया आणि काठ्या खाली फेकल्या, ज्या सापांमध्ये बदलल्या…काही क्षणासाठी मुसाला चिंता वाटली की, ह्याने ती गर्दी प्रभावित झाली असेल…

पण अल्लाह ने त्याला आधार दिला, " काळजी करू नको, मुसा, तू जिंकशील…तुझी काठी फेक"
मुसाने तसे केले…आणि त्याची काठी एक मोठा सर्प होऊन त्या सापाने त्याच्या आजूबाजूचे सर्व साप गिळून टाकले…प्रत्येक जण आश्चर्य चकित झाला…ह्याने जादूगारांची पराजय सिद्ध झाली.. आणि सत्याचा विजय झाला…ह्याने हेही सिद्ध झाले, की मुसा आणि हारून हे अल्लाहचे खरे संदेशवाहक होते…
जेव्हा जादुगारांना ह्याची जाणीव झाली, ते सगळे गुडघ्यावर पडून वाकून नमन करू लागले…आणि म्हणाले, " आम्ही मूसाच्या अल्लाहवर विश्वास करतो. जो खरोखर विश्वाचा ईश्वर आहे……

फिरौंन यावर संतापला होता आणि ओरडला, " जर तुमचे धैर्य असेल तर तसे करा. मी तुमचा डावा हाथ आणि उजवा पाय कापून टाकेन आणि तुम्हाला झाडांना अटकवेल.."

"तुला जे आनंद देईल ते तू कर," जादूगारांनी उत्तर दिले…,"पण आता आम्ही सत्य निष्ठा स्वीकार केली आहे…आमचा अल्लाह, आमच्या भूतकाळातील जादू दाखविण्याच्या पापासाठी आम्हाला क्षमा करो, जे तू आमच्याकडून जबरदस्तीने करून घेतले…."

थोड्या संख्येने तरुण व्यक्ती, जेव्हा त्यांनी हे घडलेले पाहिले, मुसाच्या धर्माचे अनुयायी बनले…पण ते, त्यांची श्रद्धा उघडपणे जाहीर करण्यास, फिरौंनच्या भीतीमुळे घाबरत होते…

मुसा इजिप्तमध्ये लोकांना उपदेश देत होता…इजिप्त मध्ये एक खूप श्रीमंत माणूस राहत होता "कारून". त्याचा खजिना अगणित होता…त्याने शक्तिशाली माणसे त्याच्या खजिन्याच्या चाव्या सांभाळण्यासाठी ठेवले होते..ते त्या चाव्यांच्या ओझ्याने पार थकून गेले होते…

मुसा नेहमी रस्त्यात आणि शहराच्या चौकात उपदेश द्यायचा…तो त्याच्या लोकांना आठवण करून द्यायचा की, फक्त एका आणि एकाच अल्लाहची आराधना करा..आणि सांसारिक गोष्टींची काळजी करणे थांबवा…त्याचवेळेस कारून तेथून जात होता…भव्य रुबाबदार अंगरखा घातलेला त्याचा पोषाक होता आणि त्याच्या मागे त्याचे सेवक, जे त्याच्या खजिन्याच्या चाव्या सांभाळून होते…चालत होते…
त्याच्या संपत्तीचे आणि सामर्थ्याचे , हे प्रदर्शन होते…यामुळे जे तरुण लोक मूसाचे ऐकत होते, त्यांचे ध्यान विचलित झाले…
त्यांच्यातले काही, कारूनच्या अवाढव्य संपत्तीला एक मत्सराने भरलेल्या नजरेने पाहण्यासाठी, अल्लाहच्या संदेशाचे शब्द सोडून, तिकडे वळले…त्यांनी या जीवनंतरच्या स्वर्गाच्या सुखापेक्षा, अशा संपत्तीची इच्छा केली…
या कारूनच्या संपत्तीच्या आणि सामर्थ्याच्या प्रदर्शनाने मुसाचे कार्य अजुन कठीण केले… मुसाने कारूनला म्हंटले, "अल्लाह ने तुझ्यावर कृपा केली आहे आणि तुला इतकी जास्त संपत्ती दिली आहे…तू गरीबांसाठी दयाळू होऊन त्यांना दान केले पाहिजे…"
कारून निर्लज्जपणे फुशारकी मारत म्हणाला, "ही माझी संपत्ती आहे, जी मी माझ्या कौशल्याने आणि बुध्दीने मिळविली आहे…तुझ्या अल्लाहने मला दिली नाही…मी का या संपत्तीला दान देऊ? मी मूर्ख नाही मुसा…"
मुसा खूप नाराज झाला…पण तो काही करू शकत नव्हता…कारून त्याची संपत्ती गरिबांना आणि गरजूंना वाटू इच्छित नव्हता…तो स्वार्थी आणि हट्टी होता…आणि असे मानत होता की, त्याची संपत्ती त्याच्या कष्टांचे फळ आहे…आणि अल्लाहची कृपा नाही…
अल्लाह त्यांना देतो, जो त्याला आनंदी ठेवतो..(गरिबांना दान करून) आणि त्यांच्याकडून घेतो, जो त्याला नाराज करतो…लवकरच लोकांना कळाले की , स्वर्गाचा आणि धरतीचा भव्य खजिना कोण नियंत्रित करतो…
अल्लाहने कारूनला जे पुष्कळ दिले होते, ते त्याच्याकडून घेतले….फुशारकी मारणारा कारून बुडाला…आणि जमिनीत त्याच्या खजिन्याच्या सोबत नष्ट झाला… त्याचा पैसा त्याच्या किंवा कुणाच्याही, काही कामी आला नाही…
जेव्हा लोकांनी त्याचे भाग्य पाहिले, त्यांना जाणीव झाली की मुसा बरोबर होता पण तो गर्विष्ठ आणि फुशारकी मारणारा विनाशक होता….(तो कसा बुडाला हे पुढील भागात)

कुराणसत्यकथा

🌊मुसा आणि फिरौंन-4🌊
"फिरौंनला घाबरु नका", मुसा त्याच्या लोकांना म्हणाला. " अल्लाह वर निष्ठा ठेवा आणि त्याला मदत मागा…"
मुसा त्याच्या लोकांना इजिप्तपासून त्यांच्या बापदादांच्या (युसुफ आणि याकूब) जमिनीवर घेऊन जाण्यास इच्छुक होता…पण ते इजिप्शियनचे नोकर(गुलाम) होते, त्यामुळे जाऊ शकत नव्हते…
मुसाने त्याच्याकडून जितके होऊ शकते तितके त्यांना मदत केली आणि मार्ग दर्शन केले…

जेव्हा फिरौंनला मुसाचा हेतू समजला, त्याने मुसाला आणि तरुण बनी इस्राईलचे लोक, जे मुसाच्या धर्माचे अनुयायी बनले होते, त्यांना मारण्याचा निर्णय घेतला…पण त्याच्या दरबारातील एका दरबाऱ्याला ,जो गुप्तपणे मुसाच्या धर्माचा अनुयायी बनला होता, त्याने फिरौंनला तसे करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला.
"तुम्ही त्याला का मारू इच्छिता?" त्याने विचारले.."फक्त यासाठी का? की, तो असे मानतो की, तुम्ही त्याचे ईश्वर नाही…"

मग तो धैर्याने बोलला आणि लोकांना त्या शिक्षेची आठवण करून दिली , जी, त्या लोकांवर येणार आहे, ज्यांनी पूर्वी खऱ्या ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे…

या त्याच्याविरोधात खुल्या बंडाने, फिरौंन खूप रागावला आणि त्या माणसाला सुद्धा, मारण्याची धमकी दिली…

जेव्हा फिरौंनच्या क्रौर्यतेने सगळ्या मर्यादा पार केल्या..,अल्लाह ने मुसा आणि त्याच्या लोकांना आज्ञा केली की, रात्री शांततेने इजिप्त सोडून जा…त्यामुळे मुसा,हारून आणि बनी इस्राईल चे लोक शांततेने "काणान" (आताचे पॅलेस्टाईन किंवा फिलिस्तिन) कडे निघाले…जी त्यांच्या बापदादांची जमीन होती…

इजिप्त पासून खूप दूरचा रस्ता होता आणि रस्त्यात नदी होती…(काही म्हणतात तो समुद्र होता).त्यांना दुसऱ्या काठावर जाण्यासाठी, ती नदी पार करायची होती…पण ते तसे करू शकण्याआधी, फिरौंनने शोधून काढले की, त्यांनी सुटका करून घेतली आहे…

तो मोठ्या सैन्यासह तो त्यांच्या मागे गेला…बनी इस्राईल चे लोक, भयंकर घाबरले आणि मुसाकडे वळून म्हणाले, "आता, आपण पकडले गेलो…"
"नाही, कधीही नाही," मुसाने उत्तर दिले.."अल्लाह आपल्या सोबत आहे. तो आपल्याला मार्ग दाखवेल…"

या अशा असहाय्यतेच्या वेळी, जेव्हा फिरौंनचे सैन्य मागे होते आणि खोल पाणी समोर होते, त्यांना अल्लाहशिवाय कोणीच मदत करू शकत नव्हते…आणि अल्लाह ने केली.
अल्लाह ने मुसाला आज्ञा केली की, त्याच्या काठीने पाण्यावर वार कर…त्याने तसे केले आणि लोकांना त्यामधून चालण्यासाठी, मधला कोरडा रस्ता सोडून, पानी विभागले (दोन भाग झाले..) बनी इस्राईलच्या लोकांनी नदी पार केली आणि सुरक्षितपणे दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचले…

जेव्हा फिरौंनच्या सैन्याने हे पाहिले, ते पाणी पार करण्यासाठी त्याच रस्त्यावरून धावले, जो एका चमत्काराने निर्माण झाला होता…पण जसे ते मध्यभागी पोहोचले, पाणी मोठ्या लहरींच्या रूपाने, वापस आले आणि पूर्ण सैन्य बुडाले….
फिरौंन मरताना ओरडला, "हो, मी विश्वास करतो, बनी इस्राईल ज्याची निष्ठा करतात, तोच ईश्वर आहे…दुसरा कोणताही नाही…"
आणि अल्लाह म्हणाला, " तर तू शेवटी मला मानले ".पण, खूप उशीर झाला होता …

(फिरौंनचे शरीर अजूनही तसेच आहे…. संग्रहालयात ठेवलेले आहे…ज्या पाण्यात तो बुडाला होता तो रेड सी ( red sea)
आहे असे मानतात…आणि तिथले पाणी हे खूप खारे असल्याने त्याचे शरीर तसेच राहीले..आणि अल्लाहने कुराण मध्ये हे सांगितले आहे की येणाऱ्या पिढ्यांना ते शरीर पाहता यावे आणि त्याला दिलेली शिक्षेची आठवण व्हावी म्हणून ते शरीर तसेच ठेवण्यात येईल….)

नदी पार केल्यानंतर मुसा आणि बनी इस्राइलचे लोक, अशा निर्जन ठिकाणी पोहोचले, जेथे पाणी, झाडे आणि घरे नव्हती….
इस्राइलचे लोक नम्र आणि सौम्य झाले होते…शतकांपासून ते दाबून राहिले होते, त्यामुळे ते धैर्य आणि आत्मविश्वास गमावून बसले होते…
इजिप्तमधून सुटकेनंतर ते थकून गेले होते…ते भुकेले होते आणि घाबरलेले होते…आणि त्यांना मार्गदर्शन, मदत आणि आश्वासनं पाहिजे होते…
मुसा आणि हारून साठी हे एक कठीण काम होते…
मुसा आणि हारूनने त्यांना समजावून सांगितले की, "जर त्यांनी अल्लाहची आज्ञा पाळत राहिले, तर अल्लाह निश्चितपणे त्यांची मदत करेल.. फिरौंनच्या हातून अपमानाच्या जीवनापेक्षा, एक स्वातंत्र्य जीवन आणि सत्य श्रद्धा ही कितीतरी चांगली आहे…"

इतक्या दिवसापासून जे लोक दाबून जीवन जगत होते, त्यांनी त्यांचा आत्मविश्वास आणि काही नवीन करून दाखवायची इच्छा गमावली होती….
त्यांनी तक्रार करण्यास सुरुवात केली, "मुसा, तू आम्हाला कोठे आणले आहे? इथे पाणी नाही…आम्ही काय पिणार आहे? तहानेने आम्ही मारून जावू…"
मुसाने अल्लाहला प्रार्थना केली आणि अल्लाहने त्याला म्हंटले की, त्याची काठी, एका खडकावर मार… मुसाने तसे केले आणि बारा पाण्याचे झरे (प्रवाह), त्या कोरड्या खडकातून वाहू लागले…जेणेकरून तेथे प्रत्येकासाठी पुष्कळ पाणी झाले…

त्यांनी मुसाकडे वळून म्हंटले, "आता आम्हाला पाणी आहे, पण अन्नाविषयी काय? आम्ही भुकेले आहोत…आम्ही काय खाणार? पुन्हा मुसाने अल्लाहला प्रार्थना केली आणि अल्लाहने उत्तर दिले, "काळजी करू नको मुसा, तुम्हाला अन्न ही मिळून जाईल".
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा लोक झोपेतूनं उठले, त्यांनी झुडूपांवर काही मऊ आणि पांढरे पाहीले…हे "मन्न" होते…एक प्रकारचे अन्न ज्याचा आकाशातून थेंबासारखा पाऊस झाला होता…त्याची चव गोड होती…
दिवसा, जोऱ्याचां वारा आला आणि त्याच्यासोबत एक खूप मोठा क्वेलस (लहान पक्षी) चा कळप उडत आला…आणि जमिनीवर सर्वीकडे बसला…लोकांनी त्यांना हातांनी पकडले आणि जेवणासाठी भाजले…हे "सलवा" होते….
त्या दिवसापासून बनी इस्राइलच्या लोकांना रोज मन्न आणि सलवा भेटू लागले…पण अल्लाहने त्यांना दुसऱ्या दिवसासाठी अन्न जमा करून ठेवण्यास मनाही केली…
अल्लाहने त्यांना अन्न आणि पाणी पुरविल्यावर, लोक पून्हा मुसा कडे येऊन म्हणाले, "आम्हाला येथे घरे ही नाही आणि सावली ही नाही, मुसा…आम्ही उन्हाच्या उष्णतेने मरून जाऊ, असे आम्हाला वाटते…
मुसाने अल्लाहला प्रार्थना केली..अल्लाहने उन्हापासून त्यांच्या रक्षणासाठी भारी ढग पाठविले…

लवकरच त्यांचा त्रास कमी होईल, जेव्हा ते त्यांना वचन दिलेल्या, त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीवर ( कानान म्हणजेच फिलिस्तीन किंवा palestine) पोहोचतील आणि हे सर्व, एका चांगल्या कारणासाठीच होते की त्यांनी इजिप्त सोडले, हे सर्व त्यांना समजावणे मुसाला कठीण होऊन बसले… मुसाने अल्लाहच्या मदतीने त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण केल्या….
त्यांनी आपसांत वाद आणि भांडण सुरू केले…
ते म्हणाले, "मुसा मन्न आणि सलवा पुरेसे नाही…आम्हाला कांदा, लसूण, डाळ आणि हिरव्या भाज्या पाहिजेत…तुझ्या अल्लाहला हे देण्यास सांग"
त्यांच्या कृतघ्नतेने मुसा नाराज झाला आणि म्हणाला, "इतक्या चांगल्या अन्ना ऐवजी तुम्हाला या सामान्य वस्तू पाहिजे का? बरं, मग तुम्ही एका शहरात जा आणि तेथे राहा जेथे तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल…"

लवकरच ते एका शहरा पासून जात असताना त्यांनी पाहिले की , लोक दगडाच्या पुतळ्याची आराधना करत होते….ते मुसा ला म्हणाले की, " मुसा, आमच्यासाठी ही अशी प्रतिमा बनव".
मुसा खूप नाराज झाला आणि त्याला वीट आला," अरेरे…", तो म्हणाला…," तुम्ही खरेच अज्ञानी आहात…तुम्हाला अजूनही तुमच्यासाठी, एकाच आणि खऱ्या अल्लाहच्या ऐवजी, पुतळे(प्रतिमा) पाहिजे का?
बनी इस्राइलच्या लोकांनी आग्रह केला… खूप थोडे होते, जे खरंच अल्लाहवर विश्वास करत होते, ते सोडून बाकी सर्व खरंच अज्ञानी आणि खूप कृतघ्न होते….

अल्लाहने मुसाला वचन दिले होते की, जेव्हा त्याचे लोक इजिप्त सोडतील, त्याला अल्लाहचा कायदा देण्यात येईल…म्हणून इजिप्त सोडल्यानंतर तो "तूर" (माउंट सिनिन) या डोंगरावर प्रार्थनेसाठी गेला….त्याने त्याच्या भावाला हारूनला, "जेव्हा तो दूर असेन तेव्हा, त्याच्या लोकांची काळजी घेण्यास सांगितले…"

तेथे मुसाने अल्लाहला चाळीस दिवस पूर्ण भक्तीने प्रार्थना केली, "हे माझ्या प्रभु….माझ्यासमोर प्रकट हो, जेणेकरून मी तुला पाहू शकेन", त्याने प्रार्थना केली….
आणि अल्लाहने उत्तर दिले, "हे तुझ्यासाठी शक्य नाही, की तू मला प्रत्यक्षपने पाहू शकशील…पण जर तू आग्रह करत असशील तर, त्या टेकडीकडे पाहा….जर मला पाहण्यासाठी, तू ते सहन करू शकला, तर तू पाहू शकतो…".
मुसाने आग्रह केला आणि जेव्हा अल्लाहने त्याची तेजस्विता (प्रकाश,चमक) टेकडीला दाखविली…,ती टेकडी विखरली आणि मुसा बेशुद्ध होऊन खाली पडला…

जेव्हा तो शुध्दीवर आला, म्हणाला, "तुझा गौरव असू दे, हे अल्लाह…मी तुझी क्षमेची याचना करतो आणि मी तो पहिला विश्वास करणारा आहे…"
अल्लाहने मुसाला त्याचा कायदा दिला आणि त्याचा ग्रंथ दिला "तोरैत (तोराह) आणि म्हणाला, " मुसा मी तुझ्याशी संभाषण केले…आणि तुला एक प्रेषित (संदेष्टा) म्हणून निवडले….म्हणून मी जे दिले आहे ते घे आणि कृतज्ञ (आभारी) राहा..ते मजबुतीने पकड…आणि तुझ्या लोकांना त्या खऱ्या श्रध्येचे अनुसरण करावयास सांग…"

जेव्हा मुसा दूर, तूर डोंगरावर होता, त्याच्या लोकांनी त्याच्याविरुद्ध बंड केले…
तेथे त्यांच्यामध्ये एक जादूगार होता.. सामरी…

त्याने त्या लोकांकडून सोन्याचे अलंकार जमा केले आणि त्यांना वितळविले….ते पातळ सोने एका साच्यात ओतले आणि एक सोन्याचे बछडे बनविले जे आवाज काढू शकत होते….मग त्याने लोकांना त्याची आराधना करण्यास सांगितले….
जेव्हा मुसा तूर डोंगरावरून वापस आला आणि त्याच्या लोकांना एका सोन्याच्या बछड्याची आराधना करतांना पाहिले…तो उग्र झाला…त्याने त्याच्या भावाला, त्याची दाढी धरून ओढले…आणि म्हणाला," मी तुला सांगितले नव्हते का, की त्यांना मार्ग दर्शन कर आणि माझ्या अनुपस्थितीत त्यांची काळजी घे? तू ते का केले नाही?
हारून म्हणाला, "भाऊ, या लोकांसमोर माझ्यावर रागावू नको…अल्लाहला माहीत आहे, की मी त्यांना म्हंटले होते की, ते जे करत आहेत, ते करू नका…जर मी त्यांच्याशी जास्त कठोर नव्हतो, तर ते केवळ या भीती पायी की ,जेव्हा तू दूर असशील, तेव्हा ते आपसांत भांडतील….आणि तू वापस आल्यावर माझ्यावर रागावशील…"

मुसा त्याच्या लोकांकडे वळला आणि म्हणाला, "माझ्या लोकांनो, तुम्ही हे का केले? तुम्हाला अल्लाहने त्याच्या कृपेचे वचन दिले नव्हते का? मग का तुम्ही एवढ्या लवकर त्याला विसरला? तुम्हाला स्वतःला मारण्यासाठी, अल्लाहचा प्रकोप पाहिजे का? कारण तुम्ही, मला दिलेले तुमचे वचन तोडले…."
त्या सोन्याच्या बछड्याकडे इशारा करत तो म्हणाला," आणि आता पाहा तुमच्या आराध्याकडे…आपण त्याला आगीत वितळवू आणि त्याचे अवशेष समुद्रात टाकू…एक आणि फक्त एक अल्लाहच्या शिवाय दुसरा कोणताही प्रभु नाही…माझ्या लोकांनो, तुम्ही, एक सोन्याचा बछडा तयार करून आणि त्याची आराधना करून, एक अपराध केला आहे… आता खऱ्या अल्लाहकडे वळा, आणि त्याची क्षमा याचना करा…आणि त्याला असे बलिदान द्या की, तो तुमच्यावर दया करो…"

मुसाचे लोक आधी होते तसेच हट्टी होते..त्यांनी, जोपर्यंत ते अल्लाहला त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही तोपर्यंत, अल्लाह वर विश्वास ठेवण्यास नकार दिला…मुसाने त्याच्याकडून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला की, ते शक्य नाही, पण त्यांनी आग्रह धरला….

शेवटी, मुसाने, त्यांच्यामधील सत्तर लोकांना निवडले…आणि त्यांना त्याच्यासोबत तूर डोंगरावर घेऊन गेला…,जेथे त्याने अल्लाहशी संभाषण केले होते..पण हेही त्यांना पटवून देण्यात पुरेसे नव्हते…त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी अल्लाहला पाहण्याचा आग्रह धरला…
अल्लाह त्यांच्या हट्टीपणावर रागावला…भयानक वीज चमकली, मेघ गर्जना झाली आणि भूकंप आला…आणि सर्व सत्तर माणसे मृत होऊन खाली पडली…
जेव्हा मुसाने हे पाहीले, त्याने अल्लाहला पूर्ण प्रामाणिक ते ने याचना केली की, त्याच्या लोकांना, त्यांच्या अविश्वासाठी क्षमा कर, "हे माझ्या प्रभु, आमच्यावर दया कर…आम्हाला सर्वांना, काही लोकांच्या मूर्खते मुळे, नष्ट करू नकोस."

अल्लाहने दया दाखविली आणि मृत लोकांना पुन्हा जीवन देऊन, वापस आणले….जेणेकरून ते कृतज्ञ बनतील…ते त्यांचे डोळे चोळत उठले आणि चमत्कार पाहून चकीत झाले…
अल्लाहने म्हंटले, "माझी कृपा त्यांच्यासाठी असेल जे योग्य करतील आणि दान देतील आणि त्यांच्यासाठी असेल जे प्रेषितांना (संदेशवाहक) ज्यांचे नाव त्यांच्या ग्रंथात , इंजिल( बायबल) आणि तोरैत ( तोराह) आहे, अनुसरण करतील…..ते असे असतील, ज्यांची भरभराट होईल…

जेव्हा हे सत्तर लोक, त्यांच्या लोकांकडे वापस गेले, त्यांनी त्यांचा अनुभव वर्णन केला आणि म्हणाले की मुसा खरंच अल्लाहचां एक संदेश वाहक आहे…त्यांनी त्यांना जे सांगितले त्यावरही विश्वास करण्यास सांगितले…पण लोक अजूनही शंका करत होते…आणि ऐकण्यासाठी इच्छुक नव्हते….

मुसाने अल्लाहला प्रार्थना केली आणि पुन्हा एकदा अल्लाहने, तूर डोंगर उचलून, त्या लोकांच्या डोक्यावर आणून, त्यांना चमत्कार दाखविला. जेव्हा त्यांनी पाहिले की, तो डोंगर त्यांच्या वर पडणारच आहे, ते घाबरले आणि ओरडले, "आम्ही विश्वास करतो की, मुसा हा अल्लाह चा संदेश वाहक आहे आणि तोरैत हा अल्लाह चा प्रकट झालेला ग्रंथ आहे…..

…मराठीत भाषांतर असलेले कुराण वाचावे…

कुराणसत्यकथा

🟢 मूसा आणि खिझ्र -5🟢
खीझ्र एक ज्ञानी माणूस होता…
जेव्हा मुसाने खिझ्रच्या ज्ञानाविषयी ऐकले, तो एका सहकाऱ्यासोबत त्याला शोधण्यासाठी निघाला….आणि जोपर्यंत त्यांना तो भेटत नाही, तोपर्यंत विश्रांती घ्यायची नाही असा निर्णय घेतला…

जेव्हा ते एका जागी पोहोचले जेथे दोन पाण्याचे प्रवाह(झरे) एका प्रवाहात एकत्र होऊन वाहत होते…, मुसा खूप थकला आणि एका खडकावर गाढ झोपला…

तेथे, मासा जो त्यांनी त्यांच्या दुपारच्या जेवणासाठी आणला होता, जिवंत झाला आणि त्याने पाण्यात उडी मारली…आणि पोहत एक चंदेरी रेषा बनवत दूर गेला…. मुसाच्या सहकाऱ्याने हे पाहीले पण याबाबत मुसाला सांगण्यास विसरला…त्यामुळे त्यांनी, जोपर्यंत मुसाला भूक लागत नाही आणि तो सहकाऱ्याला मास्या विषयी विचारत नाही, तोपर्यंत, त्यांचा प्रवास चालू ठेवला…

त्यानंतर, सहकाऱ्याने मुसाला जे घडले आहे ते सांगितले…मुसाला त्या क्षणी वाटले की, त्याला खीझ्र कडे जाण्यासाठी, मार्ग दाखविण्यासाठी तो एक संकेत होता….म्हणून तो वापस त्या जागी गेला, जेथे तो गाढ झोपला होता…आणि त्याला एक संतासारखा माणूस त्याच खडकावर बसलेला दिसला…तो खीझ्र होता….

मुसाने त्याला अभिवादन केले आणि म्हंटले, जे अल्लाह खिझ्र च्या द्वारे मुसाला माहीत करवून देणार होते…ते तो जाणण्यासाठी आला आहे…

खिझ्र म्हणाला, अल्लाहने मला त्याच्या काही रहस्याचे ज्ञान दिले आहे….जे तुला माहित नाही…तुला ते विचित्र वाटेल आणि त्यामुळे जेव्हा तू माझ्यासोबत असशील, तेव्हा तुला स्वतःला प्रश्न विचारण्यापासून थांबवणे, हे तुझ्यासाठी अवघड होईल…

पण जेव्हा मुसाने वचन दिले की, तो संयमी राहील. खिझ्र मुसाला त्याच्या सोबत घेऊन जाण्यास आणि शिकण्यास, या अटीवर की तो फक्त लक्ष देऊन पाहिलं आणि कोणतेही प्रश्न विचारणार नाही, तयार झाला…

मुसा खिझ्र सोबत गेला…लवकरच ते एका नदीवर आले आणि खिझ्र ने नदी पार करण्यासाठी, एक नाव भाड्याने घेतली…नावे वरील लोक खिझ्र ला ओळखत होते…आणि त्यांना नदी पार करवून देण्यासाठी, त्यांनी कोणतेही शुल्क घेतले नाही…

जेव्हा ते नदी पार करत होते, खिझ्र ने एक फळी तोडून, नावेत एक छिद्र केले…..हे जास्त विचित्र होते… मुसा यावर नाराज झाला…आणि खिझ्र ला म्हणाला,…"या अशाप्रकारे, त्यांच्या दयाळुते ची तू भरपाई करणार आहे का? तू ते का केले?"

"मी तुला म्हटले नव्हते का, की कोणताही प्रश्न विचारायचा नाही?", खिझ्र बोलला….

त्याच वेळेस एक पक्षी आला आणि नौकेच्या पुढच्या निमुळत्या भागावर बसला आणि एक थेंब पाणी पिला…तिकडे इशारा करून खिझ्र म्हणाला," अल्लाह च्या ज्ञान शी तुलना करतांना, जे एका महासागरा सारखे आहे, आपले ज्ञान त्या एका थेंबासारखे आहे…"

मुसाला त्याची चूक कळली, वचनाची आठवण करून त्याने माफी मागितली, "मी पुढच्या वेळेस जास्त सावध राहील….", तो म्हणाला…..

जेव्हा ते नदीच्या पलीकडे, शहरात पोहोचले आणि ते त्या शहरातून जात असताना, त्यांनी एका मुलाला पाहिले…काहीच खास कारण नसतांना खिझ्र ने त्या मुलाला मारले…..

हे मुसासाठी सहन करने खूप कठीण होते….तो त्याचे वचन विसरला आणि त्याने रागाने विचारले," त्या निरागस मुलाला तू का मारले?"

खिझ्रने काहीच उत्तर दिले नाही….त्याने फक्त मुसाला त्याच्या वाचनाची आठवण करून दिली…आणि म्हणाला," जर तू पुन्हा एकदा तुझे वचन तोडले तर मी तुला सोडून जाईल"

मुसाणें माफी मागितली…आणि वचन दिले की पुन्हा प्रश्न विचारणार नाही…
लवकरच ते दुसऱ्या शहरात पोहोचले जेथे, कुणालाही आश्रय देण्यास नाखूष असे लोकं होते….त्यांनी मुसा आणि खिझ्र, या प्रवाश्यांना कोणतेही अन्न आणि निवारा दिला नाही…
खिझ्र एका भिंतीजवळ आला, जी अगदी कोसळणारच होती… खिझ्र ने ती भिंत, कामाचे काहीही पैसे न घेता दुरुस्त केली….

मुसाला ही निर्दयपनाच्यासाठी दयाळूता कळाली नाही….तो स्वतःला विचारण्यापासून थांबवू शकला नाही, "जर ते लोक आपल्याशी इतके निर्दयी राहिले, तर तू हे का केले? कमीत कमी त्यामुळे काही अन्न विकत घेण्यासाठी, तू काही पैसे घेऊ शकत होता"

"अरेरे", खिझ्र म्हणाला…," तू संयम ठेऊ शकला नाही…आपण वेगळे होण्याची ही वेळ आहे…पण मी तुला सांगतो की मी का केले आणि मी काय केले"
"ती नाव ज्या मध्ये मी छिद्र पाडले, ती गरीब लोकांची होती, ज्यांनी त्यापासून त्यांच्या जीवनाचा उदरनिर्वाह मिळवला… नदीच्या पलीकडे राहणारा राजा खूप क्रूर आहे आणि सगळी चांगली चालणारी नावे जबरदस्तीने घेऊन टाकतो….त्याने ती नाव ही घेतली असती…म्हणून मी त्यात छिद्र पाडले…"
"पण तू त्या मुलाला का मारले?" मुसाने विचारले…

"मी त्याला मारले कारण त्याचे माता पिता खूप साधे आणि सद्गुणी लोक आहेत," खिझ्र म्हणाला," पण तो एक खूप दुष्ट व्यक्ती म्हणून मोठा होणार होता…आणि त्यांचे जीवन दयनीय करणार होता….
यामुळे ते नाराज झाले असतील पण या वेदना आणि दुःख खूप कमी आहे, त्यापेक्षा जेव्हा तो मोठा होऊन एक पापी बनला असता आणि तेव्हा त्यांना जे सहन करावे लागले असते….अल्लाह लवकरच त्यांना दुसरा मुलगा देईल जो त्यांच्या वृधदापकाळात एक आनंद देईल"

"शेवटच्या कृत्य काय होते? तू ती भिंत का नीट केली, त्या लोकांनी आपल्याला इतका निर्दयपना दाखवूनही," मुसा म्हणाला….

"बरं, मी तसे केले कारण त्या भिंतिखाली, दोन अनाथ मुलांच्या मालकीचा खजिना लपलेला आहे…" खिझ्र म्हणाला…," त्यांचे पिता खूप सद्गुणी मनुष्य होते…आणि ही अल्लाह ची ईच्छा आहे की जेव्हा ही मुले मोठी होतील, तेव्हा खजिना शोधून काढतील…"

मुसा समोर हे सर्व स्पष्ट केल्यानंतर खिझ्र म्हणाला," लक्षात घे, मी स्वतःहून काहीही केलेले नाही, ही सर्व अल्लाह ची इच्छा होती…"
मग खिझ्र मुसाला आश्चर्यचकित सोडून निघून गेला…आणि तो या विचारांत हरवून गेला, की अल्लाह च्या रहस्यांविषयी मनुष्याला किती कमी माहीत आहे…खरंच प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि एकट्या अल्लाहला सर्व माहीत आहे…

(Surah Al- Kahf (Chapter 18, verses 60-82).
सुरत 18 अल कहफ: आयत 60-82
मध्ये ही कथा आहे….मराठी भाषांतर असलेले कुराण वाचा…

कुराणसत्यकथा

🍀🌼🌺बनी इस्राइल 6🌺🌼🍀
बनी इस्राइलचे लोक, एक खूप लांब प्रवास करून, "सिना" या ठिकाणी पोहोचले, जे ठिकाण, त्यांना ज्या त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीचे (आधीचे कानान(canaan) फिलिस्तीन, palestine) वचन दिले होती…त्याच्या जवळच होते…
मुसाने त्यांना म्हंटले की, त्यांच्या पूर्वजांच्या शहरात प्रवेश करण्यासाठी आणि त्यांची गेलेली जमीन आणि संपत्ती मागण्यासाठी, स्वतःला तयार करा,
मुसाने म्हंटले, की धैर्याने, आणि अल्लाह वरच्या कणखर निष्ठेने, जमिनीत प्रवेश करा…जर असे कराल तर , विजय त्यांचाच होईल, असे आश्वासन दिले…
त्यांनी शहरात प्रवेश करण्यास नकार दिला…मुसा ने बारा माणसे निवडली आणि त्यांना त्या शहरातील स्थिती पाहून येण्यास पाठविले…
जेव्हा हे लोक वापस आले, दोन माणसे सोडून बाकी सर्वांनी तेथील शत्रुंच्या सामर्थ्याविषयी भयानक कहाण्या सांगितल्या…लोक अस्वस्थ झाले आणि अशा कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यास नकार दिला…
"आम्ही येथे बसू आणि वाट पाहू, मुसा. तू आणि तुझा अल्लाह जावू शकतो आणि शत्रूशी लढू शकतो…", ते म्हणाले…मुसा काहीच मदत करू शकत नव्हता…
मुसा त्यांच्या या वागण्याच्या पद्धतीवर नाराज आणि रागावलेला होता…त्याने त्याचे उरलेले आयुष्य, त्यांना अल्लाहचा संदेश समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात खर्च केले… स्वतःची मदत कशी करायची आणि आळशी आणि भांडत राहणे, योग्य नाही, हे शिकवण्यात गेली…

🍂🏵️शिस्य🏵️🍂
मुसाच्या मृत्युनंतर त्याचा मित्र आणि अनुयायी "शिस्य" याने, त्याचे कार्य पुढे चालू ठेवले…मुसाने आधी, जे काही सांगितले होते, ते उपदेश त्याने तसेच देने चालू ठेवले…आणि बनी इस्राइलच्या लोकांना, वापस येण्यास आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्यास खूप प्रेरीत केले…त्याने लढाई करण्यासाठी, त्या लोकांचे नेतृत्व केले…आणि त्यांना एका मागून एक खूप लढाया करावयास, त्यांचे नेतृत्व करत, घेऊन गेला…जोपर्यंत ते पुन्हा एकदा, त्यांच्या वचन दिलेल्या भूमीच्या दारात पोहोचत नाहीत…

शेवटचा विजय झाल्यावर, अल्लाह ने त्यांच्या संदेशवाहकाकडून, त्यांना आदेश दिला की शहरात विनम्रतेने…अल्लाहला वाकून आभार मानून एक प्रार्थना करत, प्रवेश करा…

त्यांनी या ऐवजी, फुशारकी मारत, त्यांचा विजय साजरा करत प्रवेश केला…त्यांनी, अल्लाहच्या कृपा आणि मदतीसाठी, ज्या अल्लाहने त्यांना, गुलामगिरीतून वाचवून, शांती आणि स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे त्यांना त्यांचे घर आणि जमीन वापस मिळाली, अल्लाहचे आभार मानत प्रार्थना केली नाही…त्यांनी, जे शब्द त्यांना प्रवेश करतांना बोलावयास सांगितले होते, ते अल्लाहचे शब्द बदलले आणि त्या शब्दांची थट्टा उडविली…हे त्यांच्या मर्यादा पेक्षा अती झाले होते…अल्लाहने या कृतघ्न आणि अवज्ञाकारी लोकांना भयंकर दंड दिला…

💖हरझाकील💖
मुसाचा दुसरा अनुयायी हरझाकील ने सुद्धा बनी इस्राइलच्या लोकांना, अल्लाहने दिलेल्या संदेशाच्या मार्गावर लढत राहण्यास वारंवार प्रेरित केले…
एकदा त्याने खूप अडचणीने आणि एक पूर्ण फौज जमा केली…तो शत्रूवर एक खास आक्रमण करण्याची योजना करून होता…तेव्हा हजारो लोकांनी त्याला एकटे सोडले…ते पळून गेले आणि मरणापासून सुटका करण्यासाठी, एका दरीत लपून बसले… हरझाकिल, या भित्रेपणा आणि त्याला एकटे सोडून जाण्याची कृती वर, इतका निराश झाला आणि दुखावला की त्याने अल्लाह ला प्रार्थना केली…अल्लाह ने त्या पळून गेलेल्या लोकांना कठोर शिक्षा केली….
त्याच दरीत जेथे त्यांनी आश्रय घेतला होता, त्यांच्या वर मृत्यू आला…ते मृत झाले, जेथे ते जिवंत राहण्यासाठी आले होते…
काही दिवसांनंतर जेव्हा हरझाकिल त्या दरीतून गेला आणि त्याने त्या युद्धातून पळून गेलेल्यांचे भाग्य (विधिलिखित) पाहिले, त्याला खूप वाईट वाटले…त्याने पुन्हा अल्लाहची प्रार्थना केली, या वेळेस दयेसाठी प्रार्थना केली…आणि अल्लाहने, जो सर्वांत मोठा क्षमा करणारा आहे, त्यांना त्यांचे जीवन पुन्हा वापस दिले …की ते पुन्हा अल्लाह कडे वळतील आणि कृतज्ञ राहतील…आणि असा गुन्हा, पुन्हा करणार नाही…

🌷शम्मील🌷(samuel)

शामोल हा एक पवित्र व्यक्ती होता…त्यानेही बनी इस्राइल च्या लोकांचे , शत्रूं विरूध्द मार्गदर्शन आणि नेतृत्व केले…अल्लाह ने त्यांना संदेश वाहक बनविले….
जेव्हा शामोल वृद्ध झाला, बनी इस्राइल त्याला म्हणाले, " आम्हाला वाटते तू आम्हाला एक राजा निश्चित करून द्यावा, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि लढाईत आमचे नेतृत्व करण्यासाठी…"
शामोल त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून म्हणाला, की ते सर्व खूप ज्ञानी नाहीत पण त्यांनी आग्रह धरला…

पुढील भाग लवकरच…
(आता ही त्या देशांमध्ये जी लढाई चालली आहे…त्याचा इतिहास इथूनच सुरू झालेला आहे…तिकडील लढाईचे वातावरण समजण्यासाठी हा इतिहास समजून घ्यावा लागतो…इस्राइल या देशाचे लोकं हे मूसाचे (a) अनुयायी आहेत…पण मुसा नंतर ईसा(a) आणि मुहम्मद(saw) हे प्रेषित आले, त्यामुळे तिन्ही धर्माच्या लोकांचा एकाच जागेचा इतिहास आहे…)
प्रत्येक कथेत, एका आणि फक्त एकाच अल्लाहवर, परमेश्वरावर आणि परमात्म्यावर विश्वास ठेवण्यास सांगितला आहे…ज्याची प्रतिमा,पुतळा बनूच शकत नाही…कारण तो कसा दिसतो किंवा आहे…हे पाहण्याचे सामर्थ्य मनुष्याच्या डोळ्यांत नाही…कुणीच. त्या सर्व शक्तिमान निर्मात्याला पाहिले नाही…

कुराणसत्यकथा

🍀🌼🌺बनी इस्राइल 6🌺🌼🍀
बनी इस्राइलचे लोक, एक खूप लांब प्रवास करून, "सिना" या ठिकाणी पोहोचले, जे ठिकाण, त्यांना ज्या त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीचे (आधीचे कानान(canaan) फिलिस्तीन, palestine) वचन दिले होती…त्याच्या जवळच होते…
मुसाने त्यांना म्हंटले की, त्यांच्या पूर्वजांच्या शहरात प्रवेश करण्यासाठी आणि त्यांची गेलेली जमीन आणि संपत्ती मागण्यासाठी, स्वतःला तयार करा,
मुसाने म्हंटले, की धैर्याने, आणि अल्लाह वरच्या कणखर निष्ठेने, जमिनीत प्रवेश करा…जर असे कराल तर , विजय त्यांचाच होईल, असे आश्वासन दिले…
त्यांनी शहरात प्रवेश करण्यास नकार दिला…मुसा ने बारा माणसे निवडली आणि त्यांना त्या शहरातील स्थिती पाहून येण्यास पाठविले…
जेव्हा हे लोक वापस आले, दोन माणसे सोडून बाकी सर्वांनी तेथील शत्रुंच्या सामर्थ्याविषयी भयानक कहाण्या सांगितल्या…लोक अस्वस्थ झाले आणि अशा कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यास नकार दिला…
"आम्ही येथे बसू आणि वाट पाहू, मुसा. तू आणि तुझा अल्लाह जावू शकतो आणि शत्रूशी लढू शकतो…", ते म्हणाले…मुसा काहीच मदत करू शकत नव्हता…
मुसा त्यांच्या या वागण्याच्या पद्धतीवर नाराज आणि रागावलेला होता…त्याने त्याचे उरलेले आयुष्य, त्यांना अल्लाहचा संदेश समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात खर्च केले… स्वतःची मदत कशी करायची आणि आळशी आणि भांडत राहणे, योग्य नाही, हे शिकवण्यात गेली…

🍂🏵️शिस्य🏵️🍂
मुसाच्या मृत्युनंतर त्याचा मित्र आणि अनुयायी "शिस्य" याने, त्याचे कार्य पुढे चालू ठेवले…मुसाने आधी, जे काही सांगितले होते, ते उपदेश त्याने तसेच देने चालू ठेवले…आणि बनी इस्राइलच्या लोकांना, वापस येण्यास आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्यास खूप प्रेरीत केले…त्याने लढाई करण्यासाठी, त्या लोकांचे नेतृत्व केले…आणि त्यांना एका मागून एक खूप लढाया करावयास, त्यांचे नेतृत्व करत, घेऊन गेला…जोपर्यंत ते पुन्हा एकदा, त्यांच्या वचन दिलेल्या भूमीच्या दारात पोहोचत नाहीत…

शेवटचा विजय झाल्यावर, अल्लाह ने त्यांच्या संदेशवाहकाकडून, त्यांना आदेश दिला की शहरात विनम्रतेने…अल्लाहला वाकून आभार मानून एक प्रार्थना करत, प्रवेश करा…

त्यांनी या ऐवजी, फुशारकी मारत, त्यांचा विजय साजरा करत प्रवेश केला…त्यांनी, अल्लाहच्या कृपा आणि मदतीसाठी, ज्या अल्लाहने त्यांना, गुलामगिरीतून वाचवून, शांती आणि स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे त्यांना त्यांचे घर आणि जमीन वापस मिळाली, अल्लाहचे आभार मानत प्रार्थना केली नाही…त्यांनी, जे शब्द त्यांना प्रवेश करतांना बोलावयास सांगितले होते, ते अल्लाहचे शब्द बदलले आणि त्या शब्दांची थट्टा उडविली…हे त्यांच्या मर्यादा पेक्षा अती झाले होते…अल्लाहने या कृतघ्न आणि अवज्ञाकारी लोकांना भयंकर दंड दिला…

💖हरझाकील💖
मुसाचा दुसरा अनुयायी हरझाकील ने सुद्धा बनी इस्राइलच्या लोकांना, अल्लाहने दिलेल्या संदेशाच्या मार्गावर लढत राहण्यास वारंवार प्रेरित केले…
एकदा त्याने खूप अडचणीने आणि एक पूर्ण फौज जमा केली…तो शत्रूवर एक खास आक्रमण करण्याची योजना करून होता…तेव्हा हजारो लोकांनी त्याला एकटे सोडले…ते पळून गेले आणि मरणापासून सुटका करण्यासाठी, एका दरीत लपून बसले… हरझाकिल, या भित्रेपणा आणि त्याला एकटे सोडून जाण्याची कृती वर, इतका निराश झाला आणि दुखावला की त्याने अल्लाह ला प्रार्थना केली…अल्लाह ने त्या पळून गेलेल्या लोकांना कठोर शिक्षा केली….
त्याच दरीत जेथे त्यांनी आश्रय घेतला होता, त्यांच्या वर मृत्यू आला…ते मृत झाले, जेथे ते जिवंत राहण्यासाठी आले होते…
काही दिवसांनंतर जेव्हा हरझाकिल त्या दरीतून गेला आणि त्याने त्या युद्धातून पळून गेलेल्यांचे भाग्य (विधिलिखित) पाहिले, त्याला खूप वाईट वाटले…त्याने पुन्हा अल्लाहची प्रार्थना केली, या वेळेस दयेसाठी प्रार्थना केली…आणि अल्लाहने, जो सर्वांत मोठा क्षमा करणारा आहे, त्यांना त्यांचे जीवन पुन्हा वापस दिले …की ते पुन्हा अल्लाह कडे वळतील आणि कृतज्ञ राहतील…आणि असा गुन्हा, पुन्हा करणार नाही…

🌷शम्मील🌷(samuel)

शामोल हा एक पवित्र व्यक्ती होता…त्यानेही बनी इस्राइल च्या लोकांचे , शत्रूं विरूध्द मार्गदर्शन आणि नेतृत्व केले…अल्लाह ने त्यांना संदेश वाहक बनविले….
जेव्हा शामोल वृद्ध झाला, बनी इस्राइल त्याला म्हणाले, " आम्हाला वाटते तू आम्हाला एक राजा निश्चित करून द्यावा, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि लढाईत आमचे नेतृत्व करण्यासाठी…"
शामोल त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून म्हणाला, की ते सर्व खूप ज्ञानी नाहीत पण त्यांनी आग्रह धरला…

पुढील भाग लवकरच…
(आता ही त्या देशांमध्ये जी लढाई चालली आहे…त्याचा इतिहास इथूनच सुरू झालेला आहे…तिकडील लढाईचे वातावरण समजण्यासाठी हा इतिहास समजून घ्यावा लागतो…इस्राइल या देशाचे लोकं हे मूसाचे (a) अनुयायी आहेत…पण मुसा नंतर ईसा(a) आणि मुहम्मद(saw) हे प्रेषित आले, त्यामुळे तिन्ही धर्माच्या लोकांचा एकाच जागेचा इतिहास आहे…)
प्रत्येक कथेत, एका आणि फक्त एकाच अल्लाहवर, परमेश्वरावर आणि परमात्म्यावर विश्वास ठेवण्यास सांगितला आहे…ज्याची प्रतिमा,पुतळा बनूच शकत नाही…कारण तो कसा दिसतो किंवा आहे…हे पाहण्याचे सामर्थ्य मनुष्याच्या डोळ्यांत नाही…कुणीच. त्या सर्व शक्तिमान निर्मात्याला पाहिले नाही…

कुराणसत्यकथा

ताबूतसकिना

❤️💚💕ताबूत सकीना💕💚❤️💚
ताबूत सकीना म्हणजेच The ark of the Covenant.
यामध्ये (पेटीत) मूसा (अ) आणि आणखी दुसऱ्या प्रेषितांचे (संदेश वाहकांचे) काही पवित्र अवशेष होते म्हणजेच आहेत…

लढाई करता वेळेस, बनी इस्राइलचे लोक या पेटीला स्वतःच्या सैन्यासमोर समोर, पुढच्या रांगेत ठेवायचे…आणि अल्लाह त्यांना त्या पेटीच्या उज्ज्वल भविष्य सूचकतेच्या गुणांमुळे, विजय देत असे…

प्रेषितांच्या अवशेषामुळे, ज्यांनी प्रेषित अल्लाहच्या इच्छेने लोकांसमोर संदेशवाहक म्हणून स्वतःला प्रस्तुत केले, पुढे न पाहिलेल्या मदतीचे आश्वासन मिळायचे….

"ताबूत सकीना" मध्ये अल्लाहने मुसाला तूर डोंगरावर जो ग्रंथ दिला, तो, एका शुभ दगडाच्या दोन भागावर अंतर्लिखित आहे, त्यात मुसाला दिलेला कायदा म्हणजे नीतिशास्त्र आणि आराधना अंतर्लिखित केला गेला आहे, ज्याला टेन कमांडमेंटस असे म्हणतात, जे तोराह या ग्रंथात आहेत. आणि मूसाची पवित्र काठी आहे…

हा "ताबूत सकीना", जो तिन्ही धर्मात शुभ मानला जातो यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम, हा सध्या कुठे आहे हे कुणालाही माहीत नाही…पण सर्व त्याच्या शोधात आहे…कारण तो कसा आणि केव्हा गायब झाला? याचा इतिहास काय? आणि तो प्राप्त झाल्यावर काय काय या जगात घडणार आहे, याचे प्राचीन पुस्तकांमध्ये जे भाकीत आहे, यांविषयी जे भविष्य वर्तविले आहे त्याविषयी येणाऱ्या लेखांत असेल…(Wikipedia search करू शकता..)

🌿🌿तलुत 🌿🌿

शम्मिल ने अल्लाह ला प्रार्थना केली आणि अल्लाहच्या मदतीने, बनी अमीनच्या जमातीतल्या तलुत ला, एक शक्तिशाली आणि देखण्या तरुण व्यक्तीला, त्यांचा शासक म्हणून नियुक्त केले…
बनी इस्राइलच्या लोकांना हे आवडले नाही कारण तालुत एक गरीब माणूस होता आणि तो त्यांच्या जमातितील नव्हता…त्यांनी त्याचा आदेश पाळण्यास नकार दिला….
शम्मील ने त्यांना म्हंटले की, एक शासकाला त्याच्या कुटुंबावरून किंवा जन्मावरून नाही तर, वैयक्तिक गुणांवरून प्रशंसित करायला हवे… तलुत कडे एका चांगल्या राजाचे सर्व गुण आणि ज्ञान आहे, जे त्याला अल्लाह ने दिलेले आहे…

बनी इस्राइलच्या लोकांनी त्यांचा वाद चालू ठेवला..त्यांना काही तरी सत्याचा पुरावा पाहिजे होता की, तलुतला अल्लाह ने नियुक्त केले आहे…

शम्मिल त्यांना म्हंटला की एक पुरावा म्हणून, ते "ताबूत सकीना" ची पेटी पुन्हा वापस मिळवतील..ज्यात मुसा आणि हारूनचे अवशेष आहेत…जे ते गमावून बसले होते…तो म्हणाला की, फरिश्ते (स्वर्गदूत) त्या पेटीला वापस घेऊन येतील…

पॅलेस्टाईन( फिलिस्तिंन) च्या लोकांनी ती पेटी असा विचार करून घेतली होती की, त्या पेटीला व्यवस्थित ठेवतील, हे त्यांच्या साठी दुर्भाग्य ठरले..त्यांनी त्या पेटीपासून सुटका करण्याचा प्रयत्न केला…यासाठी ते दोन गायींच्या मागे गेले, ज्या त्यांना बनी इस्राइल च्या लोकांपर्यंत घेऊन आल्या आणि ते तेथे त्या पेटीला सोडून गेले…

त्यामुळे बनी इस्राइल च्या लोकांना त्यांची पेटी शाबूत वापस मिळाली…या पुरव्यानंतर त्यांना तलुत ला राजा म्हणून स्वीकार करावे लागले…


ज्यू लोक (यहुदी/जुदाइजम/Judaism/Hebrew/इब्रानी) हे इस्राईलचे लोक आहेत…ते मूसा अ.(Moses/मोशे) यांना अल्लाहचे संदेशवाहक मानतात…

[याकूब अ. (ज्यांना "इस्राईल" ही म्हंटले जाते), याकूब अ. यांचे पुत्र... युसुफ अ. आणि युसुफ अ. यांचे अकरा भाऊ इजिप्त (मिस्र) मध्ये स्थायिक झाले…आणि फक्त एकाच अल्लाहची (ज्याला ते यहोवा/ yahweh म्हणत होते) शिकवण देत राहिले…त्यांना "बनी इसराईल" म्हणजेच इस्राईलची (याकूब अ. यांची) संतान म्हंटले जात होते…ते ज्या जागेतून इजिप्तमध्ये आले होते, ती जागा म्हणजे जुने "कानान"(फिलिस्तीन/palestine) हे सध्या इस्राइल या देशामध्ये आहे. मुहम्मद स. अ. व. येण्याआधी हे पूर्वीचे लोक अल्लाह ला यहोवा (yahweh) असे म्हणून संबोधित करत होते. कुराण मध्ये वारंवार "बनी इस्राईल" ला अल्लाह ने संबोधित केले आहे.)] 

कुराणसत्यकथा


08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...