स्वर्ग हा खूप सुंदर बगीचा आहे. ज्याचा कुणी स्वप्नातही विचार करू शकत नाही.....तिथे सगळ्या प्रकारची फळझाडे आहेत...त्यात डाळिंब, अंगुर, ऑलिव...सर्व फळे जितका मनुष्य विचार करु शकतो...आणि त्याच्याहून आधिक.....
आणि त्या फळांच्या झाडांच्या मधून थंड आणि गोड पाण्याचे, दुधाचे आणि मधाचे झरे वाहत आहेत....
एक दिवस अल्लाहने स्वर्गात त्याच्या दूतांना म्हटले की, "माझी इच्छा आहे एक मनुष्य बनविण्याची"
दूत म्हटले, "आम्ही तुझ्या आज्ञा पाळत नाही का?"
अल्लाह म्हणाला, "मला चांगले माहीत आहे"
अल्लाहने ओल्या मातीपासून एक मनुष्य बनविला, आदम अ. (अडम)...आणि त्यात आत्मा (जीव) फुंकला...त्या मनुष्याने त्याच्या जीवनाचा पहिला श्वास घेतला...या प्रत्येक गोष्ट त्याला शिकविली. त्याला बोलण्यासाठी काही शब्द शिकविले... अल्लाहने त्याच्या सर्व दूतांना बोलावले आणि म्हटले, "हा आदम आहे...त्याला वाकून प्रणाम करा.."
सगळ्या दूतांनी आज्ञाचे पालन केले...फक्त एकाने केले नाही..तो होता इब्लिस (शैतान)...तो एक जिन्न होता...
तो म्हणाला, "मी का प्रणाम करू?..मी आगीने बनलो आहे आणि हा फक्त मातीने बनला आहे..मी याला प्रणाम करणार नाही"
अल्लाह इब्लीस वर रागावला आणि त्याला स्वर्गातून बाहेर केले... इबलीस (शैतान/लूसिफर/evil) ने तिथून जाताना प्रण केला की, "तो संपूर्ण मनुष्य जातीशी प्रलय (महाविनाश) (कयामत) येईपर्यंत बदला घेईल"
अल्लाहने म्हटले की, "चांगले मनुष्य तुझे ऐकणार नाहीत.."
अल्लाहने आदम अ. यांना स्वर्गात राहायला परवानगी दिली.
आणि त्यांना सांगितले की, "तुला जे आनंद देईल ते तू कर..कोणतेही फळ खा...आणि जे तुला आवडेल ते तू पी... तू स्वर्गातले प्रत्येक फळ खावू शकतो, फक्त एका झाडाचे फळ तू खायचे नाही.."
आदम अ. यांनी सर्व मजा केली...आनंद घेतला...पण लवकरच त्यांना एकटेपणा जाणवू लागला..त्यांना मित्र नव्हते...म्हणून त्यांनी अल्लाहला म्हटले, "कृपा करून मला एक सोबती दे". अल्लाहने त्यांच्या बरगडीच्या (rib) हाडापासून, एक स्त्री बनविली आणि त्यांना एक पत्नी दिली... हव्वा अ. (एव्ह).
आदम अ. आणि हव्वा अ. यांनी त्यांचे उरलेले जीवन धरतीवर चांगले काम (कर्म) करण्यात आणि अल्लाहची आज्ञा पाळण्यात घालविले...त्यांना आशा होती की, ते पुन्हा अल्लाहला आनंदी करून त्यांच्या मृत्यूनंतर स्वर्गात जातील.....
आदम अ. आणि हव्वा अ. यांची दोन मुले हाबिल (अबेल) आणि काबील (केन) ह्या दोघांना, एकाच मुलीशी लग्न करायची इच्छा होती, जी खूप सुंदर होती...त्यांना माहीत नव्हते की, कसे ठरवावे की दोघांपैकी कोण लग्न करू शकेन?...म्हणून आदम अ. यांनी, त्यापैकी प्रत्येकाला अल्लाहला मेंढी अर्पण करण्यासाठी सांगितले...ज्याची अर्पण केलेली मेंढी अल्लाह स्वीकार करेल, तो त्या मुलीशी लग्न करेल...
काबील यावर खूप रागावला आणि बोलला की काहीही झाले तरी, तोच तिच्याशी लग्न करेन... हाबील ने लढण्यास नकार दिला...पण काबील उग्र होता. त्याने त्याच्या भावाला एका दगडाने मारले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला...
ही पहिली वेळ होती, ज्यात कुणी मनुष्याने दुसऱ्या मनुष्याचा वध केला होता...त्यामुळे हाबीलला मारल्यानंतर, काबील अतिशय घाबरला...त्याला मृत शरीराचे काय करावे, ते कळत नव्हते..त्याने ते मृत शरीर खांद्यावर घेतले आणि अवती भोवती असहाय्यतेने भटकू लागला...
अल्लाहने, दोन कावळे पाठविले, जे काबीलच्या समोर लढले आणि एक मारला गेला...दुसऱ्याने जमिनीत एक खड्डा केला आणि ते मेलेल्या कावळ्याचे शरीर त्या खड्डयात ओढले आणि मातीने झाकले...
हे पाहून काबील ने, इतकेही माहीत नाही, जितके त्या कावळ्यालाही माहीत आहे...म्हणून स्वतःला दोष दिला...मग त्याने जमिनीत खोदून त्याच्या भावाला हाबीलला त्यात गाडले (दफन केले).
आजपर्यंत, जर कोणी त्याच्या भावाला मारतो (कारण आपण सगळे एकाच मातापित्याची मुले आहोत) तर, नेहमी दोष पहिल्या मारेकऱ्याला जातो ज्याने एक वाईट उदाहरण प्रस्तुत केले....