जेरमाया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जेरमाया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ जून, २०२०

अरमाया (जेरमाया) अ. (655BC)(2675वर्षांपूर्वी )

अरमाया (जेरमाया) अ. (655BC)(2675वर्षांपूर्वी )
जेरुसलेमच्या लोकांनी फक्त एक अल्लाह (अल्लाहला ते लोक ' यहोवा ' म्हणत होते.) (परमेश्वर) ची उपासना करणे सोडून, दगडांच्या प्रतिमा बनविल्या आणि त्यांची उपासना सुरू केली.

अरमाया यांनी अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला, फक्त एका अल्लाहची  (ईश्वराची) उपासना करा आणि परत या. पश्र्चाताप करा. क्षमा मागा.अल्लाह दयाळू आहे.

अरमाया यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला की, ही त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे. नाहीतर ते सर्व लोक नष्ट होतील.
पण त्यांचा उपदेश लोकांनी मानला नाही. त्यांनी अरमाया यांना खोटं बोलणारा समजले. ते लोक गर्विष्ठ झाले. त्यांच्यामध्ये खूप लोक चुकीच्या रस्त्यावर गेले. पाप वाढले. लोक कुकर्म करू लागले. त्यांना चमत्कार दाखवूनही (अल्लाहच्या मदतीने) काही फरक पडत नव्हता. ते या गोष्टीवर विश्वासच करू शकत नव्हते की, अल्लाह त्या दगडाच्या गुंबद (हैकले सुलेमानी) ला, जे जेरुसलेममध्ये सुलेमानने बांधले होते आणि ज्यावर अल्लाहची कृपा होती, नष्टही करू शकतो.

लोकांनी त्या संदेशातील धमकी आणि चेतावणी ऐकली, ते म्हणाले, ' तू खोटे बोलत आहेस, तू असे म्हणत आहे की, अल्लाह या जमिनीला, प्रार्थना स्थळाला, [जे आधी, फक्त एका अल्लाह (यहोवा, ईश्वर)ची उपासना करण्यासाठी होते, आणि आता] जेथे दगडाच्या प्रतिमा ठेवल्या गेल्या होत्या, ग्रंथाला (ज्यामध्ये बदल केला गेला होता) नष्ट करेल? '

जेरुसलेमचा राजा खूप गर्विष्ठ होता. त्याने आदेश दिला की, अरमायाला कैद करा आणि तुरुंगात टाका. त्यांनी अरमायाला जकडून तुरुंगात टाकले. ही खूप मोठी चूक होती.

अल्लाहने       नबूकदनेस्सर(nebuchadnezzar) या बेबीलोन (इराकचे प्राचीन शहर) च्या राजाला त्यांच्यावर आक्रमण करण्यास पाठवले. त्याने त्याच्या सैन्यासह देशात प्रवेश केला आणि शहराला घेरले . जेव्हा हा सैन्याचा वेढा प्रदीर्घ कालावधी पर्यंत राहिला. जेरुसलेमच्या सैन्याने शरणागती पत्करली, त्यांनी त्यांच्या शहराचे दरवाजे उघडले आणि राजाच्या सैन्याने शहरात प्रवेश केला आणि ते खूप क्रूर होते. राजाने क्रूरतेने त्यांच्यावर, त्याचा कायदा लागू केला आणि त्यांना निर्दयीपणे शिक्षा केली.

राजाने एक तृतीयांश लोकांचा वध केला आणि एक तृतीयांश लोकांना पकडले. बेबिलोनच्या सैन्याने फक्त अपंग आणि वृद्ध लोकांना जाऊ दिले. त्यांनी जेरुसलेमच्या लोकांच्या सर्व घरांना नष्ट केले. त्या सैन्याने हैकले सुलेमानीच्या इमारतीला  (प्रार्थनास्थळाला) नष्ट केले. बेबोलोनच्या सैन्याने , तेथील लोकांचे सर्व पुस्तके आणि ग्रंथ जाळून टाकले. त्यांनी मुलांशी आणि स्त्रियांशी ही वाईट वागणूक केली. हा तेथील लोकांसाठी खूप भयावह दिवस होता.
मग त्यांनी, त्यांना घोड्यांवर स्वार होऊन पायदळी तुडविले. तरुणांना वेगळे करून स्त्रियांना बाजाराच्या ठिकाणी रक्षक म्हणून उभे केले. त्यांनी सैन्यात दहशत पसरवली आणि राजाने जेरुसलेमच्या वंशाला पूर्णपणे संपुष्टात आणले. हे इस्राइल  (याकूब)च्या वंशाच्या लोकांसाठी जे जेरुसलेम मध्ये राहत होते, खूप भयानक दृश्य होते. ती जागा लोकांच्या रक्ताने भरली. सगळी कडे मृतदेह होते.

बेबोलोनच्या राजाला माहीत झाले की, इस्राइल च्या लोकांचा एक संदेशकर्ता आहे, ज्याला आधी पासूनच या विनाशा विषयी माहीत होते आणि त्याचे नाव अरमाया आहे. राजाने आदेश दिला की, त्या संदेश कर्त्याला तुरुंगातून बाहेर आणले जावे. अरमायाशी बोलल्यानंतर राजाला जाणीव झाली, की ते खरच अल्लाहचे  खरे संदेश कर्ता (पैगंबर) होते. राजा ने त्यांची सुटका केली.
त्या पूर्ण शहराला नष्ट करून बेबिलोनचा राजा पुन्हा त्याच्या राज्यात निघाला. राजा बेबिलोनला, सर्व लूट घेऊन निघाला, ज्यामध्ये संपत्ती, सोने, हिरे, मौल्यवान खजिने होते आणि पुरुष, स्त्रिया, मुले होती, त्यांच्यात तरुणी होत्या आणि धर्मोपदेशकांची मुले होती, सर्व मिळून सत्तरहजार पर्यंत होते.अंदाजे सत्तर हजार पुरुष आणि स्त्रियांना त्याने सेवक बनविले.

इस्राइल ची जमात ही अल्लाह ची जमात होती. त्या लोकांकडे खूप संदेश देणारे (पैगंबर) आले. अल्लाहने त्यांना खूप संधी दिल्या होत्या. पण दुर्दैवाने त्यांनी अल्लाह चा प्रत्येक आदेश तोडला. इतकेच नाही तर त्यांनी अल्लाहचा संदेश देणाऱ्यांचा वध केला. आणि दगडाच्या प्रतिमांची उपासना करणे चालू ठेवले. याच कारणाने अल्लाह त्यांच्यावर खूप क्रोधित झाला आणि पूर्ण जमातीला ध्वस्त आणि नष्ट केले.

या विध्वंसानंतर इस्राइल मध्ये नवीन युग सुरू झाले. अरमायाने लोकांना म्हंटले की, जे इस्राइल मध्ये हजर आहेत, त्यांनी स्वतःच्या अपराधावर पश्चाताप करून अल्लाहला क्षमा मागावी आणि हे ही सांगितले की, अल्लाह पुन्हा एकदा त्या लोकांची भरभराट करेल. पण खूप लोक त्या विध्वंस झालेल्या शहरात राहण्यास इच्छुक नव्हते. त्यांनी पुन्हा एकदा अरमाया यांचा आदेश मानण्यास नकार दिला. आणि ते सगळे लोक जगाच्या वेगवेगळ्या भागात स्थलांतरित झाले. त्यातील काही इजिप्त (मिसर), स्पेन(हिजर) आणि सौदी अरेबिया(तैफ) मध्ये गेले. पण अरमाया अ. यांनी इस्राइल ची पुन्हा भरभराट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

ही सत्य घटना आहे. बायबलमध्ये पूर्ण एक chapter यावर आधारित आहे. जेरुसलेमचे लोक ( इस्राइलचे वंशज) दोन वेळा उपद्रव माजवतील व दोन वेळा जेरुसलेम नष्ट केले जाईल, अशी चेतावणी अल्लाह (यहोवा) कडून देण्यात आली होती.

कुराण मध्ये हा संदर्भ आहे.
#कुराणचा_काही_अंश

4 आणि आम्ही इस्राईल च्या मुलांना, ग्रंथाद्वारे हे आधीच कळविले होते की, तुम्ही जमिनीवर दोन वेळा उपद्रव माजवाल आणि मोठ्या विद्रोहाचे प्रदर्शन कराल. 5 मग ज्या दोन घटनेच्या बाबतीत आधीच इशारा दिलेला होता, त्यांपैकी जेव्हा पहिल्या घटनेची वेळ आली, तेव्हा आम्ही आमच्या भक्तांपैकी अशा काही भक्तांना तुमच्या विरुद्ध पाठवले. जे युद्धाच्या बाबतीत फार शक्तीशाली असे होते, जे तुमच्या घरांत (घुसले व) त्यांचे वाटोळे केले. अशाप्रकारे आधीपासून वर्तवलेले भाकीत पूर्णत्वास पोहोचले.
( कुराण 17:4-6)
________________________________

अब्दूर रहमान चाऊस, नांदेड यांचे भाषांतर.

[इस्रायली लोकांच्या ग्रंथात ' तोराह ' मध्ये हे भाकीत अल्लाह (यहोवा)ने वर्तविले आहे, जो अल्लाहचाच ग्रंथ आहे , पण लोकांनी त्यात फेरबदल केले आहे. अरमाया यांना त्या इस्राईलच्या वंशजाकडे, चेतावणी देण्यासाठी पाठवले होते. ही पहिली घटना होती. दुसरी घटना पुढे येणाऱ्या पोस्ट मध्ये असेल, जी ईसा (येशू) येण्याच्या आधीची आहे.]

08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...