संदेशकर्ता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संदेशकर्ता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २९ जून, २०२०

ईसा अ.

🌹🌴ईसा अ.🌴🌹
मरियम एका पवित्र वातावरणात मोठी झाली. सदाचारी लोकांत, ती एक खूप धार्मिक (ईश्वरनिष्ठ) मुलगी बनली. तिने तिचा जास्तीत जास्त वेळ तिच्या खोलीत प्रार्थना करण्यात खर्च केला आणि स्वतःला अल्लाहच्या सेवेसाठी अर्पण केले. तिची धर्म निष्ठा इतकी चांगली होती की, तिच्यापेक्षा मोठे लोकही तिचा सन्मान करायचे आणि तिच्याकडून प्रेरणा घ्यायचे.

तिची ईश्वर निष्ठा आणि पावित्र्य असाधारण होते. जे तिला ओळखत होते, त्या प्रत्येकाकडून तिने, तिची प्रतिष्ठा जिंकली होती.

एक दिवस जेव्हा मरियम तिच्या खोलीतून, एका वेगळ्या जागेत, जिथे पडदे टाकून आच्छादन केले होते, गेली तेव्हा तिने एक  व्यक्ती तिच्यासमोर उभा राहिलेला पाहिले. मरियम घाबरली होती. "कोण आहे तू?" तिने विचारले. "ईश्र्वरासाठी जवळ येऊ नकोस. मी अल्लाहचा आश्रय मागते तुझ्यापासून"

तो व्यक्ती उत्तरला, "घाबरु नको, मी अल्लाहचा दूत (स्वर्गदूत) आहे आणि अल्लाहकडून फक्त संदेश देणारा म्हणून  पाठविण्यात आलो आहे. तुला हे सांगण्यासाठी की, तुला एक पवित्र मुलगा होईल."

"पण जर मला कोणत्याही पुरुषाने स्पर्श केला नाही (मी विवाहित नाही), तर मला एक पुत्र कसा होईल. मी शील भ्रष्ट (वाईट स्त्री) नाही?", ती म्हणाली.

"ती अल्लाह (ईश्वर) ची इच्छा आहे. ते, त्याच्यासाठी खूप कठीण नाही. जेव्हा तो काही निर्माण करण्याची इच्छा करतो, म्हणतो, होऊन जा आणि ती होते. तुझा पुत्र, एक खूप पवित्र मुलगा असेल." असे म्हणून, स्वर्गदूत दिसेनासा झाला आणि मरियमला विस्मित (स्तंभित) करून गेला.

नंतर काही दिवसांनी, जेव्हा तिचा पुत्र जन्मायची वेळ जवळ आली, मरियम, लोकांपासून बाजूला, एका दूरच्या ठिकाणी गेली. तेथे एकटी, घाबरलेली आणि भुकेने आणि तहानेने अशक्त झालेल्या अवस्थेत, एका   झाडाच्या खाली झोपली आणि वेदनेने ओरडू लागली, "मी इच्छा करते, हे होण्याआधी मी मरून गेलेली असावी आणि सर्वजण मला विसरून गेलेले असावे."

एक सुखद आवाज तिच्याशी बोलला, "दुःखी होऊ नको मरियम. तुझ्या प्रभूने, एक पाण्याचा झरा तुझ्याखालून (जवळून), प्रदान (प्रवाहित) केला आहे आणि जर तू झाडाचे खोड हलवशील, तर पुष्कळ ताज्या आणि पिकलेल्या खजुरी तुझ्यावर पडतील. तू खा आणि पी आणि तुझ्या पुत्राला पाहून आनंद घे."

तिचा पुत्र ईसा (अ.), सर्व लोकांपासून दूर अशा जागी जन्मला. 

मरियम ने जरी, तिच्या लहान बाळाला कुशीत घेतले, तरी तिच्यात, त्या बाळाला घेऊन, तिच्या लोकांकडे जाण्याचे साहस नव्हते. ती त्यांच्या प्रश्नांची उत्तरे कशी देऊ शकेलं? ते काय म्हणतील? तिच्या बाळाचा जन्म, ती कसे समजावून सांगू शकेल? ती दयनीय अवस्थेत होती आणि काय करावे तिला समजत नव्हते. पण अल्लाहने (ईश्वराने) तिला दिलासा दिला. 

"लोकांना काहीही सांगू नको, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ नको, फक्त संकेत करून सांग की, तू उपवास करीत आहे आणि त्या दिवशी, काहीही न बोलण्याची शपथ घेतली आहे." तिला आदेश दिला गेला.

अल्लाह (ईश्वरा) च्या मदतीने बळकट होऊन, निरागस मरियमने तिच्या बाळाला उचलले आणि तिच्या लोकांकडे परत गेली. जेव्हा त्यांनी तिला, तिच्या हातात असलेल्या, एका बाळा सोबत येतांना पाहिले, ते तिच्या भोवती जमा झाले.

"मरियम, किती लाजेची गोष्ट आहे! तुझे मातापिता ईश्र्वरनिष्ठ लोक होते, तू हे काय केले?"  आणि ते त्या मुलाविषयी जाणण्यास इच्छुक होते.

मरियमने त्यांना उत्तर दिले नाही. तिने फक्त त्या मुलाकडे इशारा केला.

"तू वेडी आहे का? आम्ही एका नवजात बाळासोबत कसे बोलू शकतो, मरियम ?"

त्यानंतर लगेच प्रत्येकाला पूर्ण आश्चर्य देऊन, मरियमच्या हातातील बाळाने बोलावयास सुरुवात केली. "मी अल्लाह (ईश्वर) चा संदेश पोहोचविणारा आहे," ते बाळ म्हणाले, "त्याने मला एक ग्रंथ (इंजील, बायबल) दिला आहे आणि मला एक प्रेषित (संदेशकर्ता, पैगंबर) बनविले आहे. त्याने मला आज्ञा दिली की, माझ्या (अल्लाहच्या, ईश्वराच्या) प्रार्थना म्हण आणि दानशूर बन आणि माझ्यावर आशीर्वाद दिला की, जिथे मी असेल, तो मला माझ्या आईशी दयाळू असणारा बनवेल आणि माझ्यावर ज्या दिवशी माझा जन्म झाला, ज्या दिवशी मी मृत्यू पावेन, ज्या दिवशी मला पुन्हा वर उचलण्यात येईल, त्या दिवशी शांती देईल."

प्रत्येकाने, डोळे विस्फारून आश्चर्याने लक्ष देऊन ऐकले. त्यांचा या चमत्कारवर विश्वास बसत नव्हता. हे ईसा अ. (येशू, Jesus) होते. अल्लाहचे संदेशकर्ता म्हणजेच प्रोफेट.

जे लोक, मरियमची, जी पवित्र आणि निरागस होती, निंदा करण्यास आले होते,  ते सगळे नवजात बालकाचे बोलणे ऐकून शांत झाले. मरियमच्या विषयी पवित्र क़ुरआन म्हणते, "अल्लाह (ईश्वरा) ने मरियमला, त्या सर्व देशांच्या, सर्व स्त्रियांमधून वरचा दर्जा देऊन निवडले."

ईसा अ., मरियम चे पुत्र, ज्यांना पवित्र कुरआन मध्ये मसीह ही म्हंटले आहे, मोठे होऊन एक खूप सद्गुणी आणि धार्मिक व्यक्ती बनले.

ईसा अ.च्या नात्यातले यहया अ., जकरिया अ. चे पुत्र होते, एक प्रेषित (संदेशकर्ता) होते. ते अल्लाहचा संदेश लोकांमध्ये, उपदेशाद्वारे सांगायचे. प्रवचन द्यायचे. पण यहया अ. यांना, जुदा (Judaea) चा राजा पसंत करत नव्हता. त्याने त्यांची हत्या करविली.

यहया अ. हे , त्यांच्या पित्याच्या, जकरिया अ. च्या, जीवनकाळात उशिरा जन्मले होते. जकारिया अ. यांच्या अल्लाह (ईश्वर) ला केलेल्या प्रार्थनांचे, ते उत्तर होते. अल्लाह (ईश्वर) नेच त्यांच्यासाठी यहया हे नाव निवडले होते.

यहया अ. यांच्या कुटुंबीयांसाठी, जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रांसाठी ही फार दुःखाची बातमी होती. यहया अ. यांच्या मृत्यू नंतर लोकांना योग्य मार्गावर नेऊन, नेतृत्व करण्याची भारी जबाबदारी, ईसा अ. वर आली.

इस्राइलचे (याकूब चे) वंशज म्हणजेच "बनी इस्राइल" इतके साधे लोक नव्हते की, त्यांचे सहजरीत्या नेतृत्व करून त्यांना सरळ मार्गावर आणावे. ते धीट होते आणि प्रत्येक गोष्टीसाठी टीकात्मक होते आणि फक्त मतभेद दर्शविण्यासाठी वाद घालणारे होते.

त्यांच्यामधील श्रीमंत लोक, गरीब लोकांसाठी क्रूर होते. त्यांच्यामध्ये आपसांमध्ये, कपटकारस्थान आणि भांडणे होती. त्यामुळे ही गोष्ट चकित करणारी नव्हती की, "रोमन" लोकांनी त्यांच्या देशावर नियंत्रण केले होते. आणि ते त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर, फक्त सेवकासारखे राहत होते. त्यांचे राज्यकर्ते म्हणजे राजा आणि इतर प्रधान, फक्त नावापुरते होते, ते फक्त दुसऱ्याच्या हातातील बाहुले होते आणि खरी सत्ता "रोमन गवर्नर" च्या हातात होती.

तेथील सर्व लोक आजारपणात, भयात, गरिबीत आणि दुबळेपणात जीवन जगत होते. ते विटंबना आणि मानहानी आणि दुःखाचे आयुष्य जगत होते. आजूबाजूला सर्वीकडे दारिद्र्य पसरले होते. तेथे त्यांना कोणीही योग्य मार्ग दाखविणारा नव्हता. ते सर्व मेंढ्यांच्या विखुरलेल्या कळपा सारखे होते.

अशा वेळेस ईसा अ. अल्लाहचा संदेश आणि इन्जील ग्रंथ (बायबल) घेऊन, त्यांना मार्गदर्शन करण्यास आले.

ईसा अ. खूप सौम्यपणे संभाषण करणारे आणि विनयशील व्यक्ती होते. त्यांनी त्यांच्या लोकांची अवस्था पाहिली, त्यांचे दुःख जाणले. ते लोकांशी प्रेमाने बोलले. त्यांना दिलासा दिला आणि त्यांना मार्गदर्शन केले.

प्रत्येक वेळेस मार्ग दाखविताना ते असे म्हणत की, एक आणि एकच अल्लाह (यहोवा, yahewe, ईश्वर, God) आहे. ज्याने त्यांना प्रेषित (संदेशकर्ता) म्हणून त्या लोकांकडे पाठविले आहे. ईसा अ. यांनी त्या लोकांची, भविष्याबाबत आणि परलोकाबाबत आशा जागविली. ईसा अ. यांनी आश्वासन दिले की, ते जर सदाचारी, संयमी आणि धैर्य ठेवून राहतील, तर अल्लाह (ईश्वर) त्यांना पारितोषिक देईल.

गरीब लोकांनी ईसा अ. वर विश्वास ठेवला आणि त्यांना मनापासून खूप प्रेम दिले. ते त्यांच्याकडे त्यांचे दुःख घेऊन आले. ईसा अ. त्यांच्यासाठी मसीह (Messiah) होते. अल्लाह (ईश्वरा) ने ईसा अ. यांना आजारातून लोकांना बरे करण्याची शक्ती दिली होती. त्यांनी आजारी लोकांना आणि आंधळ्या लोकांना फक्त स्पर्श करून बरे केले.

त्या काळात सगळ्या आजारांपेक्षा जास्त घातक आणि भयभीत करणारा आजार कुष्ठरोग (महारोग/leprosy) होता. कारण त्यावर काही उपाय नव्हता. त्यावेळी असे मानले जायचे की, हा पसरणारा म्हणजेच संसर्गजन्य आजार आहे आणि ज्या लोकांना कुष्ठरोग व्हायचा, त्यांना सर्वांपासून दूर करून आणि दूर घेऊन जाऊन एका खड्ड्यात किंवा दरीत (जी दरी कुष्ठरोग्यांना फेकण्यासाठी असायची) फेकले जायचे. जेथे त्यांना मरण्यासाठी सोडून देण्यात यायचे. त्यांचे कुटुंबीय आणि मित्र ही या भीतीने की, त्यांनाही हा आजार पकडेल किंवा त्यांनाही संसर्ग होईल, त्यांना भेटायला जात नव्हते. या हताश लोकांसाठी ईसा अ. एक आशेचा किरण बनून आले होते. कारण अल्लाह (ईश्वर) ने ईसा अ. यांना आजारापासून लोकांना, बरे करण्याची शक्ती दिली होती.

ईसा अ. यांना लोकांकडून प्रेम आणि आदरभाव मिळत होता. प्रत्येक ठिकाणी लोक त्यांच्या मागोमाग जात होते. लोक त्यांचे उपदेश आणि प्रवचन लक्षपूर्वक ऐकत होते आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास करत होते. ईसा अ. यांनी अल्लाहचा संदेश, जेथे जेथे ते गेले, तेथे तेथे सर्विकडे पोहोचविला.

ईसा अ. यांनी लोकांना एकमेकांवर प्रेम करण्यास शिकविले आणि शत्रूला क्षमा करण्यास शिकविले. एक आणि फक्त एकच अल्लाहवर (ईश्वर, यहोवा (yahewe), God) विश्वास करण्यास शिकविले. त्यांनी लोकांना सांगितले की, "मूसा अ. (Moses) यांचा धर्म खरा होता आणि ते स्वतः एक संदेशकर्ते म्हणून, ही सत्यता, सिद्ध करण्यासाठी आले आहेत."

"मूसाने तुमच्याकडे जो कायदा आणला आहे, त्याची पुष्टी करण्यासाठी आणि अजून एक संदेशकर्ता "अहमद" (मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम), माझ्यानंतर येणार असल्याची चांगली वार्ता देण्यासाठी, मला यावे लागले आहे," त्यांनी लोकांना म्हंटले.

अहमद (मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम), हे ईसा अ.नंतर साधारणतः पाचशे वर्षांनंतर आले.

ईसा अ. यांनी, त्यांचा संदेश चहूबाजूंना देण्यासाठी, दूरदूर पर्यंत प्रवास केला आणि सर्व लोकांना उपदेश करत राहिले. नाझरेथ (नासरत), जे गलिली (Galilee) मध्ये होते, तेथपासून जेरुसलेम पर्यंत (जे जुदामध्ये होते),  सर्व गरीब लोकांनी त्यांचे ऐकले आणि त्यांच्या उपदेशांमध्ये, एका छान यशस्वी जीवनासाठी आशेचा किरण पाहिला. त्यांनी संयमित आणि नम्र राहून सामर्थ्य (बळ) संपादन केले.

पण श्रीमंत आणि शक्तीशाली लोक, ईसा अ. च्या विरुद्ध झाले. त्यांनी ईसा अ. यांच्या संदेशामध्ये, एका क्रांतीचे बीज पाहिले.

जेरुसलेम आणि जुदाचे श्रीमंत लोक, ईसा अ. ची वाढती लोकप्रियता पाहून भयभीत झाले. त्यामुळे त्यांनी ईसा अ. यांना अपमानित केले. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या अनुयायांसाठी जीवन जगणे अवघड केले. पण ईसा अ. यांनी कुणालाही हानि किंवा इजा पोहोचविली नाही आणि त्यांचे कार्य शांततेने चालू ठेवले. त्यांचे जे विश्वसनीय समर्थक होते, त्यांना "हवारीज" म्हंटले जात होते, ज्यांनी त्यांना प्रत्येक कार्यात मदत केली.

एकदा या समर्थकांनी, म्हणजेच हवारिज (disciples) यांनी, ईसा अ. यांना विनंती केली, की अल्लाह (ईश्वर) ला, स्वर्गातून त्यांच्यासाठी, एक भव्य भोजन (मेजवानी) पाठविण्यास सांगा. ईसा अ. यांनी अशी अवास्तव  मागणी करण्यापासून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आग्रह केला की, यामुळे त्यांची श्रद्धा मजबूत होईल.

अनिच्छिने ईसा अ. यांनी मान्य केले आणि त्यांनी अल्लाह (ईश्वर) ला, त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली. अल्लाह (ईश्वरा) ने, त्याच्या प्रिय प्रेषिताची (संदेशकर्त्याची) प्रार्थना ऐकली आणि त्याच्या हवारिज साठी (disciples साठी), अन्न आकाशातून (स्वर्गातून) खाली पाठविले. याचवेळी अल्लाह (ईश्वर) ने, त्यांना चेतावणी दिली की, जर त्यांच्यापैकी कोणीही, या चमत्कारानंतर अविश्वास दाखविला, तर एक कठोर शिक्षा, त्याची वाट पाहत असेन.

ज्यू लोक (श्रीमंत आणि हट्टी असलेले), ईसा अ. यांना हानि पोहोचविण्यासाठी, एका संधीच्या शोधात होते. त्यांनी ईसा अ. विरुद्ध योजना केली आणि कट रचला.

शेवटी ते  ईसा अ. विरुद्ध, जे त्यांच्या प्रशासनासाठी एक धोकादायक व्यक्ती बनत चालले होते, तक्रार करण्यास "रोमन गवर्नर- पोंटीअस पाइलेट (Pontius pilate)" कडे गेले. त्यांनी ईसा अ. वर, प्रशासनाविरोधात आणि लोकांच्या धर्माविरोधात, लोकांच्या मनात विष कालवत असल्याचा आरोप केला.

रोमन गवर्नर, त्यांनी जो काही आरोप केला, तो पुरावा असल्याशिवाय मानण्यास तयार नव्हते. पण श्रीमंत आणि शक्तीशाली ज्यू लोकांनी, गवर्नरला असे भासविले की, हा एक कट आहे. त्यांनी विनवणी केली की, जर ईसा अ. यांना वेळेत थांबविले नाही, तर त्यांची गरीब लोकांमध्ये वाढती लोकप्रियता सरकारसाठी (प्रशासनासाठी) एक धोक्याची पूर्वसूचना असेल.

शेवटी पाइलेट यांनी ईसा अ. यांना अटक करण्यासाठी आदेश दिला. लोकांचा विरोध, बंड आणि प्रतिक्रिया टाळण्यासाठी, हे लपवून केले जाणार होते. काही अप्रामाणिक लोकांच्या मदतीने एक कट रचण्यात आला. ईसा अ. यांना अटक केली गेली आणि गवर्नर समोर आणण्यात आले.

ईसा अ. वर, देशद्रोहाचा आरोप म्हणजेच लोकांच्या मनात त्यांच्या धर्माविरुद्ध आणि प्रशासनाविरुद्ध विष कालवण्याचा आरोप करण्यात आला. त्यांचे शत्रू त्यांना मृत्यू देण्यास इच्छुक होते. त्या काळात अशा आरोपासाठी शिक्षा "क्रूसावर म्हणजे वध स्तंभावर मरण" अशी होती. क्रूस (वधस्तंभ) म्हणजे सलीब, हा लाकडाचा क्रॉस (+ च्या आकारासारखा) होता, ज्यावर त्या व्यक्तीला खिळे ठोकून बांधले जायचे आणि रक्तस्त्राव होऊन मरण येईपर्यंत तो व्यक्ती तिथेच सोडला जायचा.

त्या जमिनीच्या (देशाच्या) श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांच्या आग्रहातर, ही शिक्षा ईसा अ. यांच्यासाठी सुनावली गेली. पण अल्लाहने, त्यांच्यावर उदारतेने, दया करून ईसा अ. यांना वाचवले. अल्लाह ने ईसा अ. यांना आकाशात वर उचलले.

ईसा अ. हे अल्लाह चे प्रिय प्रेषित होते, ज्यांचे जीवन चमत्कारांनी भरलेले आहे. कधी कधी लोक इतक्या चमत्कारांविषयी ऐकतात, तेव्हा ते आश्चर्यचकित होतात. "एक मूल त्याच्या पित्याविना कसे जन्मू शकते?", लोक विचारतात.

जरी ईसा अ. अल्लाहचे प्रेषित होते, तरी ते एकटे असे मनुष्य होते, ज्यांचा जन्माचा इतिहास खूप असामान्य आहे. पण हे फक्त, अल्लाहची शक्ती आणि सामर्थ्य सिद्ध करतात, ज्याच्यासाठी काहीही अशक्य नाही.

यासाठी आदम अ. यांचे उदाहरण आहे, ज्यांचा जन्म माता आणि पिता, दोन्ही नसतांना झाला, ते मातीपासून बनविले गेले आणि त्यांच्यात आत्मा फुंकला गेला. कारण अल्लाह(ईश्वर) सामर्थ्यशाली आहे आणि तो सगळ्या विश्वाचा निर्माता आहे. त्यांच्यासाठी काहीच अशक्य नाही.अल्लाहने दगडांतून झरे प्रवाहित केले, धरतीतून झाडे उगविली, मास्यांना पाण्यात पोहायला शिकविले, पक्ष्यांना हवेत उडण्यास बनविले. त्याने मानवाला सर्व प्राणिमात्रांवर वरचा दर्जा दिला. ज्यामुळे माणूस एक स्पष्ट चिन्ह पाहू शकतो आणि प्रकृती आणि प्राणी व पक्ष्यां विषयी विचार करू शकतो आणि त्यांच्या निर्मात्याचा आभारी, कृतज्ञ बनू शकतो. त्याने मानवाला हे सर्व समजण्यासाठी आणि अल्लाह (ईश्वरा) च्या उदारतेची प्रशंसा करण्यासाठी, अल्लाहच्या आदेशांवर मजबूत श्रद्धा ठेवण्यासाठी बुद्धिमत्ता दिली.

कुणालाही अल्लाहच्या (ईश्वराच्या) बरोबरीने किंवा समकक्ष समजणे, हे खूप मोठे पाप आहे.

ईसा अ. च्या नंतर, काही दशकांनी, ज्यू (यहुदी) लोकांनी रोमन विरुद्ध बंडखोरी केली आणि इ.स. 66 मध्ये जेरूसलेमवर नियंत्रण केले आणि पहिले रोमन-यहुदी युद्ध सुरू केले. इ.स. 70 मध्ये रोमन लोकांनी "जेरुसलेम" वर नियंत्रण केले आणि दुसऱ्या वेळेस बांधल्या गेलेल्या, प्रार्थना स्थळाला (हैकले सुलेमानी/second temple)
नष्ट केले, ज्यामध्ये पश्चिमेच्या भिंतीचा फक्त काही भाग शिल्लक होता. (जरी अलिकडील पुरातत्व शोधांनी भिंतीचा काही भाग नंतरच्या काळात दिलेला आहे). पाश्चात्य भिंत यहूदींसाठी(ज्यू लोकांसाठी) एक पवित्र स्थान आहे.

इस्राइलचे लोक दोन वेळा उपद्रव माजवतील आणि दोन वेळा त्यांचा विनाश होईल, असेच आधीच "तौरात" म्हणजेच "Torah"  या ग्रंथात वर्तविले होते, जो ग्रंथ मूसा अ. यांना देण्यात आला होता. त्यातली ही दुसरी वेळ होती.

पहिली वेळ ती होती, जेव्हा बेबिलोंनच्या राजाने विनाश केला होता. ही सत्य कथा आधी एका भागात होती...

कुरआन मध्ये हा संदर्भ आहे.

#कुरआनचा_काही_अंश

4 आणि आम्ही इस्राईल च्या मुलांना, ग्रंथाद्वारे हे आधीच कळविले होते की, तुम्ही जमिनीवर दोन वेळा उपद्रव माजवाल आणि मोठ्या विद्रोहाचे प्रदर्शन कराल.

( कुरआन 17:4)

[इस्रायली लोकांच्या ग्रंथात ' तोराह ' मध्ये हे भाकीत अल्लाह (यहोवा, ईश्वर)ने वर्तविले आहे, जो अल्लाह चाच ग्रंथ आहे.]

मंगळवार, २३ जून, २०२०

बादशाह_सुलेमान

बादशाह_सुलेमान

🌹🌹🌹सबा ची राणी 🌹🌹🌹
एक दिवस जेव्हा राजा सुलेमान ने दरबार भरवला होता, त्याच्या लक्षात आले की, हूदहूद( हुपू; hoopoe) गायब होता. तो त्याच्या अनुपस्थितीने नाराज झाला आणि म्हणाला," हुदहुद कोठे आहे? मला तो तुमच्यामध्ये दिसत नाही. जर अनुपस्थित राहण्याचे एक चांगले कारण नसेल तर, मी त्याला नक्कीच शिक्षा करेन."
तो असे म्हणत असतानाच, हुदहुद उडत आत आला आणि विलंब झाल्याने दिलगिरी व्यक्त केली.
" मी एका शक्तीशाली राज्य "सबा" बातमी आणली आहे. त्या राज्यावर एक राणी राज्य करते , जी एका उत्कृष्ट सिंहासनावर विराजमान होते. सबा येथील लोक, खऱ्या अल्लाहची उपासना सोडून, सूर्याची उपासना करतात." त्याने राजाला सांगितले.

"तू आमच्याशी खरे बोलत आहे का, हे आम्ही लवकरच माहीत करू," सुलेमान म्हंटला." हे घे, हे पत्र घेऊन सबा ला जा, तेथे ते पोहोचव आणि मग काय घडते ते पाहायची वाट पाहा.
हुदहुद ने सुलेमानचे पत्र घेतले आणि सबा ला जाण्यासाठी निघाला. तेथे त्याने राणीच्या समोर ते टाकले आणि शांतपणे काय घडते , ते पाहण्याची वाट पाहू लागला.

राणीने जेव्हा ते पत्र वाचले, तिच्या सल्लागाराला काय करावे असे विचारले. "येथे राजा सुलेमान कडून एक पत्र आहे. अल्लाहचा योग्य सन्मान करून आणि अल्लाहच्या नावाने सुरू केलेले आहे. त्याने अल्लाह सत्यनिष्ठेला विरोध न करता, मला समर्पण करण्यासाठी त्याच्याकडे बोलावले आहे."
मग राणीने थोडा वेळ विचार केला.आणि सुलेमानसाठी काही मौल्यवान भेटवस्तू पाठविण्याचा निर्णय घेतला.

पण सुलेमान काही साधारण राजा नव्हता. तो अल्लाहचा संदेश कर्ता (प्रेषित) होता. तो क्रोधित झाला, जेव्हा त्याने पाहिले की राणीने त्याच्या संदेशाचा कसा अर्थ लावला. त्याने तिच्या संदेश देणाऱ्याला भेटवस्तू सहित वापस पाठविले आणि त्याला म्हंटले की, "राणीला सांग की, जर त्याच्या अल्लाहच्या सत्य निष्ठेकडे बोलवण्याचे उत्तर भेटवस्तू असेल, तर तो सबाला सैन्यासह येईन."

आता राणी खरच घाबरली आणि तिने तत्काळ स्वतः सुलेमानकडे जाण्याचा निर्णय घेतला.जेव्हा सुलेमानला तिच्या येण्याचा हेतू कळला, त्याने त्याच्या दरबाऱ्यांना विचारले, "येथे कोणी आहे का, जो तिचे सिंहासन, ती इथे येण्याआधी आणू शकेल ."
एका जिन्नने उत्तर दिले की, "डोळ्यांची पापणी लवण्याआधी तो ते आणू शकेल." सिंहासन आणण्याचा आदेश देण्यात आला. जेव्हा तो आणला गेला, सुलेमानने त्याच्यात थोडा बदल केला.
जेव्हा राणी आली, तिला तो सिंहासन दाखविण्यात आला आणि विचारले," हे तुझे सिंहासन आहे का?" तिने लगेच त्या सिंहासनाला ओळखले, कारण ती खरोखर बुद्धिमान होती, पण तिने तिचे आश्चर्य लपविले आणि म्हणाली," हे तसेच दिसत आहे".
सुलेमानने तिला त्यानंतर एका सुंदर राजवाड्यात नेले, ज्याची फरशी चकाकणारी होती.तिने फरशीवर पाय ठेवण्यासाठी तिचा घागरा वर उचलला. कारण तिला वाटले की ते पाण्याचे तळे आहे. पण ती खरंच राजवाड्याची फरशी होती ज्याची पारदर्शक ( विशेष मौल्यवान काचेने) फरस बंदी केली होती.
(आच्छादली होती.) अशी त्या राजवाड्याची भव्यता होती.
जे अल्लाहने सुलेमानला बहाल केले होते, त्याने ती राणी इतकी प्रभावित झाली की ती अल्लाहच्या सत्यनिष्ठेला शरण गेली.
" मी स्वतःशी चूक केली आहे. आता सुलेमानसह मी या जगाच्या प्रभुला शरण जात आहे."
अशाप्रकारे सुलेमान त्या सुंदर राणीला अल्लाहची शक्ती पटविण्यास सक्षम झाला.

सुलेमानच्या पायाशी सर्व मौल्यवान सांसारिक (ऐहिक) खजिने होते. तरीही त्याची अल्लाहची श्रध्दा कमकुवत झाली नाही. तो नेहमी इतके जास्त देण्यासाठी अल्लाहला आभार मानत राहिला आणि गर्विष्ठ झाला नाही.

जेव्हा एकदा सुलेमान एका उत्कृष्ट मशिदीच्या बांधकामाची देखरेख करत होता. त्याच्यासाठी मृत्यूची वेळ आली. जेव्हा त्याला याची जाणीव झाली की, तो मरणार आहे, तो उरलेल्या बांधकामाच्या देखरेखी विषयी चिंताग्रस्त झाला. त्याला भीती होती की अडेल ( बेलगाम , ताब्यात न राहणारे) जिन्न अर्धवट काम सोडून, मोकळे सुटतील.
अल्लाहने याची काळजी घेतली. त्याच्या मृत्यूनंतर , जेव्हा बांधकाम पूर्ण केले जात होते, सुलेमान त्याच्या चालण्याच्या काठीचा आधार घेऊन उभा राहिला. जेव्हा किड्यांनी आतून काठी पोखरून खाल्ली आणि तो कोसळला, फक्त तेव्हाच सुलेमानच्या मृत्यूचे गुपित जिन्नांसमोर प्रकट झाले. जिन्नांनी ते सर्व , अल्लाहचे रहस्य न समजण्यालायक असल्यामुळे त्यांनी एकमेकांना शाप दिला. " जर आम्हाला याविषयी आधीच माहीत असते तर आम्ही या परिश्रमापासून खूप लवकर सुटका करून घेतली असती." ते म्हणाले.

कुराणसत्यकथा


युनूस अ. माशाच्या पोटात

🐳माशाच्या पोटात 🐳
युनूस हा एक ईश्वरनिष्ठ तरुण होता.जो "निनेवेह" ( सध्याच्या "मोसुल" च्या बाहेरील भागात असणारे एक प्राचीन शहर , इराक) येथे राहत होता. या ठिकाणचे लोक एकाच खऱ्या अल्लाहवर (ईश्र्वरावर) विश्वास ठेवत नव्हते. त्यामुळे अल्लाहने त्या लोकांसाठी युनुसला त्याचा संदेशकर्ता म्हणून निवडला. युनूसने अल्लाहच्या संदेशाचा उपदेश त्या लोकांना दिला. पण त्या लोकांनी त्यांच्या पद्धतीने अविचारीपने त्याचा उपदेश लक्षपूर्वक ऐकला, आणि जेव्हा तो म्हणाला एकच अल्लाह (ईश्वर, पालन कर्ता) आणि तो, अल्लाहचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे, त्यांनी त्याची थट्टा केली.
युनूस ने त्यांना विनवणी केली, अल्लाहच्या क्रोधाविषयी आणि दंडाविषयी (शिक्षा) चेतावणी दिली. पण काहीच अर्थ नव्हता. ते त्याला पाहून अजून हसले आणि विश्वास केला नाही. यामुळे युनूसची त्यांच्याकडून निराशा झाली. त्याने रागावून आणि अल्लाहच्या शिक्षेबद्दल चेतावणी देत, अल्लाहचा आदेश येण्याची वाट न पाहताच निनेवेह च्या लोकांना सोडले.
यावर निनेवेह च्या लोकांना काहितरी गंभीरपने चूक झाली आहे, याची जाणीव झाली.त्यांना त्यानंतर भीती वाटली आणि वाटले की, युनूस हा अल्लाहचा खरा संदेशकर्ता होता. त्याला त्रास देऊन, त्यांनी अल्लाहला नाराज केले आहे. आणि आता अल्लाहची दिलेली शिक्षा नक्कीच त्यांना नष्ट करू शकते..ज्या क्षणी त्यांना याची जाणीव झाली, ते पश्र्चाताप करण्यासाठी खुल्या जागेत आले, वाकून आणि अल्लाहकडे याचना करत, नमन करू लागले. त्यांनी क्षमा याचना केली आणि सत्य निष्ठा स्वीकार केली. त्यांनी इतक्या प्रामाणिकपणेे क्षमा मागितली की, अल्लाहने त्यांना क्षमा केली आणि त्यांच्यावर ती शिक्षा (दंड, आपदा) केली नाही, जी युनूस त्यांना चेतावणी देऊन गेला होता.

या काळात, युनूस ने त्याच्या लोकांना आणि निनेवेह ला रागात सोडल्यानंतर , तो दूर जावून, एका नौकावर चढला जी, त्या क्षणी समुद्रात प्रवासासाठी निघणार होती.
ती नौका, जी लोकांनी भरली होती समुद्रात निघाली, पण रस्त्यात, एक वादळ नौकेवर आदळले आणि नौका लहरींवर हेलकावे देऊ लागली.

त्याकाळी असे मानले जायचे की, जर एखादा पळपुटा गुलाम ( विकत घेतलेला नोकर, जशी त्या काळी माणसांना विकत घेऊन काम करवून घेण्यासाठी, "गुलाम" बनविण्याची पद्धत होती.), नौकेवर किंवा जहाजावर चढला तर, ते जहाज किंवा बोट बुडते.

या कारणामुळे लोकांनी संशय केला की, या बोटीवर, एक पळून आलेला गुलाम आहे. तो कोण आहे हे माहीत करण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकून, ज्या माणसाचे नाव येईल त्याला, नावेच्या बाहेर समुद्रात फेकण्याचा निर्णय घेतला..जेव्हा सगळ्या चिठ्ठ्यामधून, एका नावाची चिठ्ठी उचलण्यात आली, ते युनूसचे नाव होते. कोणीच युनूसवर विश्वास करण्यास तयार नव्हता की, युनूस पळून आलेला गुलाम नाहीं, कारण तो इतका सभ्य आणि धार्मिक वाटत होता.
तीन वेळा चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि प्रत्येक वेळेस युनूसचे नाव आले.
आता युनूसला खात्री झाली की, त्याने अल्लाहचा आदेश येईपर्यंत वाट पाहिली नाही आणि रागात निनेवेह आणि त्याच्या लोकांना सोडून, अल्लाहला नाराज केले आहे.

"हो, मी पळून आलेला गुलाम आहे" तो म्हणाला, मी माझ्या प्रभू आणि मालकाला (ईश्वराला) सोडून पळालो, जर तुम्हाला पुढे सुरक्षित जायचे आहे तर, मला नौकेच्या बाहेर फेका."

खूप अनिच्छिने नावेच्या लोकांनी, जे सांगण्यात आले ते केले आणि त्यांचा पुढचा प्रवास चालू ठेवला.
जसा युनूस खोल पाण्यात पडला, एक मोठा मासा पोहत आला आणि त्या मास्याने त्याला गिळले. युनूसने स्वतःला मास्याच्या पोटात पाहिले, जेथे अंधकार आणि खूप जास्त खोली होती. तो भयभीत आणि असहाय्य होता. जेव्हा मासा पोहायचा, युनूस आतल्या आत फेकला जायचा आणि त्याला खूप अस्वस्थ वाटायचे आणि भिती वाटायची. तो पुन्हा कधी दिवसाचा प्रकाश पाहू शकेन का? किंवा तो अशा दयनीय पिंजऱ्यात मरून जाईल का? त्याला असे विचार यायचे.
त्याने निनेवेहच्या लोकांना का सोडले? त्याने त्याच्या चुकीचा पश्र्चाताप केला आणि अल्लाहकडे क्षमा याचना केली. त्याने त्याच्या मालकाला (अल्लाहला) दया करण्याची विनंती केली.आणि या दुःखातून मुक्त करण्यास प्रार्थना केली.
"हे अल्लाह, तुझ्या शिवाय कुणीच अल्लाह (ईश्वर) नाही. फक्त तूच आहेस. सगळा गौरव तुझाच आहे. मी खरंच चूक होतो." तो म्हणाला. त्याचा पश्र्चाताप पाहून अल्लाहने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याच्यावर दया केली. मासा पोहत वर किनाऱ्यावर आला आणि युनूसला बाहेर रेतीवर फेकले.
जेथे तो पडला, अस्वस्थ, खूप अशक्त आणि असहाय्य होता, जसा नवीन जन्म झालेला बालक असतो.
एक वेल त्याच्या जवळ वाढला आणि त्याला सावली दिली, जोपर्यंत त्याला इतके बळ येत नाही, की तो उठेन आणि त्याच्या लोकांपर्यंत जाईल तोपर्यंत.
आतापर्यंत त्याच्या लोकांनी प्रत्येक ठिकाणी त्याचा शोध घेतला होता. आणि ते त्याला पाहून खूप आनंदित झाले. त्याला कळले की, त्यांनी शेवटी खरी श्रध्दा स्वीकार केली आहे. जे त्याला पाहिजे होते.
अल्लाह, जे पश्र्चाताप करतात आणि नम्रतेते क्षमा मागतात, त्यांना क्षमा करतो.

अय्युब चा संयम

💞💞अय्युब चा संयम 💞💞
दीर्घकाळाच्या आणि वेदनादायक आजाराने अय्युबला अशक्त आणि अवतीभोवती फिरण्यास असमर्थ बनविले होते. तो वर्षांपासून एक असहाय्य आजारी बनून राहिला होता. त्याच्या जागी दुसरा व्यक्ती असता तर, त्याचे धैर्य खचले असते आणि अल्लाहची निष्ठा हरवली असती आणि वेदनेने तो ओरडला असता. त्याने अल्लाहला असे दुःख आणि अस्वस्थता देण्याविषयी, ज्यात त्याचा स्वतःचा काही दोष नाही, तक्रार केली असती. पण अय्युबने संयमानेे आणि अल्लाहच्या निष्ठेत कणखर राहून त्रास सहन केला. त्याने त्याच्या दुःखाविषयी कधीही तक्रार केली नाही.
लोकांनी त्याला भेटण्यास येणे बंद केले आणि त्याला मरण्यासाठी सोडून दिले. फक्त त्याच्या पत्नीने त्याची सेवा केली आणि त्याला प्रवृत्त केले.आणि एकदा तीही एका क्षणासाठी खूप त्रासाने आणि खिन्नतेने, असंयमित झाली आणि तिने अल्लाहला तक्रार केली. यामुळे अय्युब खूप दुखवला. तो, ज्याने , ज्याने एक शब्द ही न उच्चारता, इतक्या दिवसापासून इतका जास्त त्रास सहन केला होता, अल्लाहचे आभार न मानण्याची वृत्ती सहन करू शकला नाही. त्याने, तो जेव्हा बरे होईल, तेव्हा त्याच्या पत्नीला शंभर वेळा मारण्याची शपथ (वचन) घेतली.तो हे कदाचित अशामुळे ही बोलला असेल, कारण तो इतका त्यावेळी असहाय्य होता की, तो किंचाळू शकत नव्हता. त्याचा राग कोणत्याही तऱ्हेने व्यक्त करू शकत नव्हता.
एक पूर्ण असहाय्यतेच्या दशेत, अय्युबने अल्लाहला प्रार्थना केली, की त्याच्यावर दया होवू दे आणि या वेदनेतून त्याची सुटका कर. अल्लाहने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याच्यावर कृपा केली. अल्लाहने आदेश दिला की, जेथे तो झोपलेला आहे, तेथे त्याचा पाय जमिनीवर आपट. अय्युबने आदेश पाळला आणि जेव्हा त्याने असे केले, ताजे पाणी तेथपासून उसळून वाहू लागले.अल्लाहने त्याला म्हंटले की, पाणी पी आणि त्यात स्नान कर. एक वेल त्यात वाढला आणि जेथे तो आराम करत होता तेथे त्याला सावली दिली.
अय्युब अल्लाहच्या कृपेने बरा झाला, पण जेव्हा त्याला आठवले की, त्याने बरे झाल्यानंतर, त्याच्या पत्नीला मारण्याची शपथ घेतली होती, तो अस्वस्थ आणि दुःखी झाला. एकीकडे त्याने अल्लाहचे नाव घेऊन केलेले वचन होते आणि दुसरीकडे त्याची पत्नी होती, जिला तो प्रेम करत होता. तो त्याचे वचन तोडू शकत नव्हता, पण त्याच्या पत्नीला मारहाण करण्याचा विचार त्याला नाखूष करत होता.या अवघड प्रसंगातून बाहेर येण्यासाठी अल्लाहने त्याच्या सद्गुणी संदेशवाहकाची मदत केली.त्याने आज्ञा केली की शंभर गवताच्या काड्या जमा कर आणि त्याने त्याच्या पत्नीला एकदाच मार. अशाप्रकारे तो त्याचे वचन ठेऊ शकला आणि त्याच्या पत्नीला वेदना झाली नाही.
अल्लाहने त्याच्या कृपेने अय्युबला बरे केले, त्याच्या कुटुंब आणि मित्रांसोबत त्याला एकत्र केले आणि त्याला पुष्कळ संपत्ती आणि सुख दिले.
अय्युबच्या प्रार्थनेने खूप व्यक्तींना समाधान मिळते, जेव्हा तो निराशेच्या काळात ती प्रार्थना करतो.
#अय्युबचाकुराणसंदर्भ #इस्लाम #मुस्लिम #मुसलमन #कुराण #एकेश्वर #ईश्वर

#कुराणसत्यकथा


08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...