इब्राहीम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इब्राहीम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

कुरआन च्या बोधकथा..2 इब्राहीम अ..एक संदेशवाहक..

 🌼🌼🌿🌿इब्राहीम अ...🌿🌿🌼🌼


खूप खूप वर्षांपूर्वी, साधारणतः 2215 BC मध्ये म्हणजेच अंदाजे 4000 वर्षांपूर्वी, इराकमध्ये (बेबीलोन मध्ये जे आता पुरातन शहर आहे), एका माणसाला ज्याचे नाव अझर होते, जो लाकडाच्या प्रतिमा कोरून बनवत होता, त्याला एक मुलगा झाला...इब्राहीम अ....

त्या दिवसात लोक, लाकडाच्या आणि दगडांच्या प्रतिमांची आराधना करत होते...ते असाही विश्वास ठेवत होते की, तारे मनुष्याच्या भाग्यावर नियंत्रण ठेवतात...

जस जसे इब्राहीम अ. मोठे होऊ लागले, त्यांना जाणीव होऊ लागली की, मनुष्याने बनविलेल्या प्रतिमा कुणालाच मदत करत नाहीत...त्यांची आराधना करून काही उपयोग नाही..त्या प्रतिमा एकदुसऱ्यांनाही मदत करू शकत नाहीत...

इब्राहीम हे एक चांगले, हुशार आणि ज्ञानी व्यक्ती होते...ज्यांना अल्लाहने, त्याचा संदेशवाहक म्हणून निवडले...प्रतिमांची आराधना करण्याऐवजी इब्राहीम अ. यांनी, एका आणि फक्त एका अल्लाहवर विश्वास ठेवला...

त्यांनी त्यांच्या वडिलांना आणि सर्व दुसऱ्या लोकांना प्रतिमांची आराधना करण्यास थांबवले..."ज्यांना तुम्ही स्वतः बनविले त्यांची तुम्ही आराधना कशी करू शकता?..." इब्राहीम अ. यांनी त्यांना विचारले," या प्रतिमा तुम्हाला कशी मदत करू शकतात?..." 

पण त्याचे वडील,अझर रागावले आणि म्हणाले, "इब्राहीम मी तुला चेतावणी देतो की, मी तुला मरेपर्यंत दगडांनी मारेन, जर तू हा मूर्खपणा थांबवला नाहीस.."

यामुळे इब्राहिम अ. उदास झाले...पण ते म्हणाले की, अल्लाह तुम्हाला आर्शिवाद देवो...मी अल्लाहला प्रार्थना करेन की, तो तुमच्यासाठी दयाळू राहो..."

इब्राहीम अ. यांची ही सुद्धा इच्छा होती की, लोकांनी ताऱ्यांवर, त्यांच्या ईश्वरासारखा विश्वास ठेवणे थांबवावे...एका रात्री जेव्हा ते आकाशात ताऱ्यांची चमक पाहत होते...

ते लोकांना म्हंटले, "मी सर्वात तेजस्वी ताऱ्याची आराधना करेन..."

ते लोक, हा विचार करून थोडे आनंदी झाले की, शेवटी इब्राहीम अ. यांनी, त्यांच्या श्रद्धेवर अनुसरण करण्यास सुरुवात केली...पण जेव्हा, तो तारा मंद झाला आणि चंद्र आला, इब्राहीम अ. म्हणाले,

"ओह...मी त्या ताऱ्याची आराधना करू शकत नाही, जो मंद आहे...मी चंद्राची आराधना करेन..."

पुन्हा जेव्हा चंद्र मावळला आणि तेजस्वी सूर्य उगवला...इब्राहीम अ. म्हणाले, "ओह, हा सूर्य चंद्रापेक्षा जास्त तेजस्वी आहे...मी याला ईश्वर बनवतो..." पण जेव्हा सूर्यास्त झाला आणि सूर्य दिसेनासा झाला...इब्राहीम अ. लोकांकडे येऊन बोलले, "लोकहो, जर मला माझ्या अल्लाहने, योग्य रस्ता दाखवला नसता, तर मी भलतीकडेच भटकलो असतो.."

मी अल्लाहला सोडून कुणावरही विश्वास करणार नाही...एक आणि फक्त एक अल्लाह ज्याने ह्या पृथ्वीवरची आणि आकाशातली प्रत्येक गोष्ट बनविली...

इब्राहीम अ. यांच्याशी लोक वाद करत राहिले आणि त्यांच्या प्रतिमांची भीती दाखवत राहिले.

इब्राहीम अ. म्हणाले, "मी तुमच्या प्रतिमांच्या आराध्याला का घाबरु?, जर तुम्ही एक आणि फक्त एक खऱ्या अल्लाहला घाबरत नाही?"

मी तुमच्या पैकी एक नाही...मी एकटा अल्लाहकडे वळेल...जो स्वर्गाचा आणि धरतीचा प्रभु आहे...

तरीही लोकांनी मनुष्याने बनविलेल्या प्रतिमांची आराधना करने चालू ठेवले...

एकदा इब्राहीम अ. यांनी शांतपणेे सांगितले, "मी तुमच्या प्रतिमांबरोबर एक पेच करणार आहे...हे यासाठी, कारण मला माहीत आहे, या प्रतिमा कुणालाच मदत आणि नुकसान करू शकत नाही..."

एक दिवस, जेव्हा शहराचा प्रत्येक जण, एका मोठ्या धार्मिक उत्सवासाठी गेला होता, इब्राहीम अ. यांनी आजारी असल्याचे ढोंग केले आणि मागे राहिला...

ते सर्व लोक गेल्यावर, इब्राहीम अ. त्यांच्या मोठ्या आराधनेच्या ठिकाणी गेले, जेथे शंभर प्रतिमा ठेवल्या होत्या...त्या ठिकाणी सर्व प्रकारची फळे आणि मिठाई लोकांनी त्या प्रतिमांसाठी ठेवली होती...इब्राहीम अ. यांनी प्रतिमांना विचारले, "तुम्ही या हव्या हव्याशा वस्तू, ज्या तुमच्यासाठी ठेवल्या आहेत, का खात नाहीत?...जेव्हा लाकडाच्या आणि दगडाच्या पुतळ्यानी उत्तर दिले नाही, त्याने विचारले, "तुम्ही का बोलत नाही?" मग त्याने एक गज घेतला आणि त्यांना आकारहीन केले...फक्त एका मोठ्या प्रतिमेला तसेच ठेवले...जी सर्व कहाणी लोकांना सांगेल...

जेव्हा लोक उत्सवातून, त्या जागी वापस आले आणि तुटलेले पुतळे पाहिले, ते खूप रागावले...

"हे इब्राहिम शिवाय कोणीच करू शकत नाही.." ते म्हंटले...

लगेच शहरातील सर्व लोक जमा झाले...त्यांनी इब्राहीम अ. यांना बोलावले आणि विचारले की, त्यांनी, त्यांच्या पुतळ्यांच्या प्रतिमांशी काय केले...

इब्राहीम अ.बोलले, "तुमच्या सर्वात मोठ्या पुतळ्याने, बाकी पुतळ्यांना असे केले...तुमच्याच मोठ्या प्रतिमेने हे केले...तुम्ही विचारा...म्हणजे जर ती बोलत असेल तर .."

अर्थात, पुतळे बोलत नाहीत...त्यामुळे ते स्तब्ध राहिले आणि बोलले, "इब्राहीम, तुला चांगले माहीत आहे की, हे पुतळे बोलत नाहीत..."

"मग तुम्ही त्यांची आराधना का करता?" इब्राहीम अ. यांनी विचारले...."ह्या तुम्हाला काहीच कामाच्या नाहीत...तुम्ही का विचार करत नाही आणि समजून घेत नाही...हे पुतळे तुम्ही स्वतः बनविले...तुम्ही अशा मृत लोकांची पुतळा बनवून आराधना का करता?"

पण ते लोक समजून घेण्यास तयारच नव्हते...

नमरुद हा इराकचा म्हणजेच बेबिलोन चा राजा होता, जो स्वतःला ईश्वर समजत होता...त्यानेहीे इब्राहीम अ. विषयी ऐकले. त्याने इब्राहीम अ. यांना, त्याच्या दरबारात बोलावले आणि त्याला विचारले की, तो नमरुदला ईश्वर का मानत नाही?

इब्राहीम अ. एक धैर्यवान तरुण होते, जे अल्लाहशिवाय कुणालाही भीत नव्हते...त्यांनी उत्तर दिले, "कारण तुम्ही एक मनुष्य आहात, जसे आमच्या पैकी प्रत्येक जण आहे...आणि पुतळ्यांविषयी म्हणाल तर ते मुके, बहिरे आणि आंधळे आहेत, तर मग ते ईश्वर कसे असू शकतील?"

नमरूद खूप रागावला आणि विचारले,
"तुझा अल्लाह काय करू शकतो, जे मी करू शकत नाही?"
इब्राहीम अ. बोलले, "अल्लाह जीवन देतो आणि जीव घेतो"

नमरुद म्हणाला, "मीही हे करू शकतो...मी कैद्याला फाशी (मृत्युदंड) देतो आणि ज्याला मृत्यूची शिक्षा दिली आहे त्याला जीवनदान देतो..."

मग इब्राहीम अ. म्हणाले, "अल्लाह सूर्य पूर्वेतून उदय करतो आणि पश्चिमेस अस्त करतो...तुम्ही सूर्य पश्चिमेतून उदय करून दाखवू शकता का?"

नमरुद गोंधळलेला होता...त्याला कळलेच नाही, की काय बोलावे...पण तो एक क्रूर आणि गर्विष्ठ राजा होता, त्याने आज्ञा दिली की, इब्राहीम अ. यांना एका मोठ्या आगीत फेकून देण्यात यावे...राजाच्या लोकांनी एक मोठी आग लावली आणि इब्राहीम अ. यांना त्यात फेकले...

इब्राहीम अ. यांनी स्वतःला वाचवण्यासाठी अल्लाहची प्रार्थना केली...अल्लाहने इब्राहीम अ. यांच्यावर खूप प्रेमाने आशीर्वाद दिला आणि आज्ञा केली, "हे आग !...शांत होऊन जा आणि इब्राहीमला वाचवून आशीर्वाद दे." त्याच्या भोवतालची आग शांत झाली...प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आणि इब्राहीम अ. सुखरूप बाहेर आले....


पवित्र कुराणमध्ये खूप ठिकाणी अल्लाह ने, मुहम्मद स. अ. व. यांना इब्राहीम अ. च्या श्रद्धेच्या रस्त्यावर चालण्यास सांगितले, कारण इब्राहीम अ. अल्लाहवर खरा विश्वास ठेवणारे आणि अल्लाहचे मित्र होता...

नमरुदच्या क्रूरपना नंतर,जो इराकचा राजा होता, ज्याने इब्राहीम अ. यांना, जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.. इब्राहीम अ. यांनी, इराक सोडले आणि ते पॅलेस्टाईन (फिलिस्तीन) मध्ये गेले आणि नंतर इजिप्त (मिस्र) मध्ये गेले...त्यांची पत्नी सारा, जी त्याच्या जवळच्या नात्यातली होती आणि त्यांचा पुतण्या, लू अ. त्यांच्यासोबत होते... लूत अ. हे खरी श्रद्धा मानणारे आणि विश्वास ठेवणारे होते...काही दिवसांनी ते ही, अल्लाह चे संदेशवाहक बनले...

जेव्हा ते इजिप्तला गेले, लोकांनी त्यांना इजिप्त (मिस्र) च्या राजा विषयी सांगितले. 
इजिप्त च्या राजाला फिरौंन (pharaoh,फैरो म्हंटले जायचे. 
फिरौंन (pharaoh,फैरो) खूप कपटाचारी आणि दुष्ट राजा होता...जर त्याने एका सुंदर स्त्रीला पाहिले, तर तो त्याच्या माणसांना म्हणायचा, तिला उचला आणि राजवाड्यात घेऊन या...जर ते जबरदस्तीने केले, तरी चालेल...

इब्राहीम अ. यांची पत्नी "सारा" सुंदर स्त्री होती..त्यामुळे फिरौंनच्या लोकांनी तिला राजाकडे घेऊन गेले...एक सद्गुणी आणि निष्ठावंत स्त्री असल्याने, तिने अल्लाहकडे मदत                                   मागितली...अल्लाहने तिच्या प्रार्थनेचे उत्तर दिले... फिरौंन तिला काहीच इजा पोहोचवू शकला नाही, स्पर्श करू शकला नाही..त्याचा हात एकाच जागी कडक, स्थिर झाला....तो हैराण झाला..

तिला राजाच्या वाईट हेतूपासून, अल्लाहने संरक्षण दिले होते...आणि वाचवले होते...फिरौंनने जाणले की, सारा एक सद्गुणी स्त्री आहे आणि कोणत्या तरी अज्ञात शक्ती (अल्लाह) तिला वाचवत आहे...

आता तो इतका भयभीत झाला की, त्याने साराला मोकळे केले आणि तिच्यासोबत आणखी एक सद्गुणी मुलगी जिचे नाव हाजरा होते, पाठविली आणि त्यांना सन्मानाने पाठविले.

नंतर इब्राहीम अ. यांनी हाजराशी लग्न केले... इब्राहीम अ. हे आता वयस्कर झाले होते आणि त्यांना मूल नव्हते...त्यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांना एक वारस (एक मुलगा) मिळावा...अल्लाहने या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि त्यांना हाजरा पासून एक मुलगा दिला, इस्माईल अ.

जेव्हा हाजरा ने इस्माईल अ. यांना जन्म दिला, इब्राहीम अ. ची पहिली पत्नी, सारा नाराज झाली कारण तिला तिचे स्वतःचे मूल नव्हते...
त्यामुळे अल्लाहने इब्राहीम अ. यांना आज्ञा केली की, 'हाजरा आणि तिचा मुलगा इस्माईल अ. यांना घेऊन, एका वाळवंटाच्या ठिकाणी घेऊन जा आणि तेथे सोडून वापस ये..'

इब्राहीम अ. यांना ही आज्ञा पाळणे, खूप अवघड होते...इतक्या वर्षांनी जो मुलगा जन्माला आला, आणि ज्याच्यासाठी खूप तीव्र इच्छा आणि प्रार्थना करावी लागली, त्याला आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीला हाजराला सोडून येणे, इब्राहीम अ. यांना खूप कठीण होते...

पण ते अल्लाह ची खरी श्रध्दा करणारे होते...त्यांनी कोणताही संकोच न बाळगता, ती आज्ञा पाळली...

अल्लाह च्या हुकुमाप्रमाने ते हाजरा आणि इस्माईल अ. यांना, घेऊन एका वाळवंटाच्या ठिकाणी गेले...रस्त्यात हाजरा ने त्याला विचारले, "तुम्ही आम्हाला कोठे आणि का घेऊन जात आहात?"
इब्राहीम अ. शांत राहिले आणि काहीही उत्तर दिले नाही...
हाजरा समजली आणि तिने विचारले, "ही अल्लाह ची इच्छा आहे का?"

"हो,असेच आहे" इब्राहीम अ. यांनी उत्तर दिले...

"मग मी प्रश्न विचारणार नाही आणि मला कशाचीच भीती नाही..निश्चितपने अल्लाह आमचे संरक्षण करेल", हाजरा म्हणाली...हाजरा एक धैर्यंवान आणि कर्तव्यनिष्ठ स्त्री होती...

इब्राहीम अ. त्यांना निर्मनुष्य जागी घेऊन गेले...जेथे पाणी नव्हते आणि मैलपर्यन्त झाड नव्हते...आणि त्यांना तेथे सोडले...ही जागा "मक्का" होती...

जेव्हा त्यांनी हाजरा आणि इस्माईल अ. यांना निर्जन ठिकाणी एकटे सोडले, त्यांना खूप वाईट वाटले...तो त्यांच्यासाठी खूप मोठा त्याग होता...पण इब्राहीम अ. लटपटले नाही आणि कमजोर पडले नाही...

ते त्यांना सोडून वापस, थोडे दूर गेले...जेव्हा, ते दोघे  इब्राहीम अ. यांना दिसेनासे झाले, तेव्हा ते थांबले आणि चेहरा तिकडे करून अल्लाहला कळकळीने प्रार्थना केली, " 'ओ अल्लाह', तुझ्या इच्छेप्रमाणे, मी माझ्या वारसाला वाळवंटाच्या ठिकाणी सोडून जात आहे... 'ओ अल्लाह'...मी त्यांना सोडले जेणेकरून, ते तुला इथे प्रार्थना करत राहतील. कृपा करून त्यांचे रक्षण कर... लोकांनी त्यांच्याकडे येऊन, त्यांना तुझ्या धरतीतून अन्न पुरवठा करू दे, जेणेकरून ते नेहमी तुझे आभारी राहतील"

असे म्हणून इब्राहीम अ. वळले आणि त्यांना अल्लाहच्या दयाळूतेवर विश्वास करून, सोडून गेले....

अल्लाह इब्राहीम अ. यांच्या निष्ठेवर इतका प्रसन्न झाला की, अल्लाहने इस्माईल अ. आणि हाजरा चे फक्त संरक्षणच केले नाही, तर वचनही दिले की, त्यांच्या नंतरच्या वंशजांची भरभराट होईल...

इकडे हाजरा दोन शुष्क डोंगराच्या मधील वाळवंटात होती...डोंगराचे नाव "सफा" आणि "मरवा" होते...तिला काय करावे काही कळत नव्हते...जेव्हा बाळ प्रखर उष्णतेने, तहान लागल्यामुळे रडायचे, तेव्हा तिचे हृदय बाळासाठी दुखायचे...पण ती काय करू शकत होती...तेथे पाणी नव्हते, अन्न नव्हते, छत नव्हते आणि कोणीच दिसत नव्हते...ती एक माता होती...ती कसे बसून तिच्या बाळाला मरतांना पाहू शकत होती....

ती सफा डोंगरावर हे पाहण्यासाठी चढली की, त्या दिशेला, कोणी मदतीसाठी दिसते का? पण सगळे वाळवंट होते...मग ती पळत वापस आली तिच्या तहानलेल्या बाळाला पाहण्यासाठी.... 

पुन्हा ती दुसऱ्या डोंगरावर " मरवा " वर पळाली... त्या दिशेला कोणी दिसते का, ज्याला ती मदतीसाठी विचारू शकते....पण तिथे कोणीच नव्हते..

स्वतःला त्रास घेऊन, हाजरा एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर मदतीसाठी पळत राहिली...प्रत्येक वेळेस वापस येताना, तिच्या तहानलेल्या आणि भुकेल्या बाळाला पाहत होती...असे वरखाली आणि एका डोंगरावरून, दुसऱ्या डोंगरावर जावून आणि परत परत जावून, सात चकरा झाल्यावर ती, अल्लाहची इच्छा, असे स्वीकार करून, अल्लाहच्या इच्छेला शरण गेली, आणि थकून बसली...

आणि मग...अल्लाहने त्याची दयाळूता दाखविली....चमत्कारिकरित्या..एक पाण्याचा फवारा (झरा), बाळाच्या जवळ वाहू लागला...

त्यालाच आज जमजम म्हणतात..."आब ए जमजम" (जमजम चे पाणी) हे पाणी खूप ताजेतवाने करणारे, उपचार करणारे, जखम भरणारे आणि उत्साहवर्धक म्हणजेच शक्ती देणारे समजले जाते...आजही जे "हज" आणि "उमरा" साठी पूर्ण जगातून "मक्का" येथे जातात,अशा लाखो मनुष्यांसाठी, जमजम चे पाणी उफाळून पुढे येते...

हाजराला तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.. तिचे हृदय आनंदाने भरले...दोघांना, तिला आणि तिच्या बाळाला अल्लाहने वाचविले...

अल्लाहला हाजराची श्रद्धा आणि धैर्य इतके आवडले की, अल्लाहने या दिवसापासून "लाखो माणसे, पुरुष, स्त्रिया, मुले, याच धर्मनिष्ठ स्त्रीने, हाजराने चाललेल्या रस्त्यावर पुन्हा पावले टाकतील...जेव्हा ते सफा आणि मरवाच्या दरम्यान, "हज "च्या अवधीत चालतील" असा आशीर्वाद दिला..

काही वेळानंतर, एक उंटाच्या गाड्या असलेला तांडवने (काफिला) या वाळवंटातून जात असताना, ते झऱ्याचे पाणी पाहिले आणि तेथे थांबून,                           हाजराला, तात्पुरता मुक्काम करण्याची परवानगी मागितली...

"हो नक्कीच", तिने उत्तर दिले..."पण या पाण्यावर तुमचा अधिकार करू नका..ते प्रत्येकासाठी मोफत असेल..."ते लोक मानले...आणि ते तिथे काही दिवस पाण्यासाठी राहिले...
(पाणी शोधणे हे सौदी अरेबिया मध्ये खूप कठीण होते. जिथे कुठे पाणी असायचे...लोक आजूबाजूला त्यांची घरे बनवायचे...) 

अशा प्रकारे मक्का एक व्यस्त वस्ती बनले..आणि इब्राहीम अ. यांनी अल्लाहला जी प्रार्थना केली होती की, 'त्याच्या पत्नी आणि त्याच्या वारसाचे रक्षण कर...आणि लोकांना त्यांच्याकडे येऊ दे..' त्या प्रार्थनेचे अल्लाहकडून उत्तर मिळाले...

हाजरा आणि इस्माईल अ. तिथेच राहिले, जेथे इब्राहीम अ. त्यांना सोडून गेले होते..इब्राहीम अ. त्यांच्या या कुटुंबाला, कधी कधी येऊन भेटायचे...

जेव्हा इस्माईल अ. मोठे झाले...इब्राहीम अ. यांनी एक स्वप्न पाहिले...अल्लाह त्याच्या मुलाची, इस्माईल अ. यांची, आहुती देण्याची आज्ञा करत आहे...

इब्राहीम अ. खूप घाबरले आणि जागे झाले...पण त्यांना, तीन रात्री तेच स्वप्न पडले...त्यांना खात्री झाली की, ही अल्लाह ची आज्ञा आहे...आणि त्यांना, त्या आज्ञेसाठी झुकले पाहिजे...

ही इब्राहिम अ. साठी अत्यंत कडक परीक्षा होती...जे आता एक वृद्ध मनुष्य होते...ते त्यांच्या जिवलग मुलाचा आहुती कसा देऊ शकणार होते?...पण त्यांनी, स्वतःच आठवण केली की, ते अल्लाहचे, संदेशवाहक आहे...आणि आज्ञा न पाळण्याचा, ते कधीही विचार करू शकत नाही...

त्यामुळे ते इस्माईल अ. कडे गेला..आणि त्यांना त्यांच्यासोबत चलण्यास सांगितले...

जेव्हा ते, इस्माईल अ. यांना सूनसान जागी घेऊन जात होता, इस्माईल अ. यांनी, त्यांच्या वडिलांना विचारले की, ते कोठे जात आहेत?...

इब्राहीम अ. यांनी त्यांच्या स्वप्नाविषयी, इस्माईल अ. यांना सांगितले...इस्माईल अ. हे, त्यांच्या अल्लाहनिष्ठ, वडिलांचे, एक शूर पुत्र होते...घाबरून न जाता किंवा विचलित न होता ते म्हणाले, "बाबा...जर ही अल्लाहची इच्छा आहे तर करा...मी आहुतीसाठी तयार आहे..तुम्ही मला अल्लाहच्या इच्छेशी शरणागत (नम्र) पाहाल..."

मग इब्राहीम अ. यांनी, स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जेणेकरून, ते जे काही करणार आहे, ते त्यांना पाहता येऊ नये. 
काही वेळानंतर, लगेच अल्लाह त्याच्याशी बोलला, "इब्राहीम खरंच...मी त्यांना पारितोषिक देतो, जे योग्य करतात..ही एक परीक्षा होती...मी तुझी आहुती स्वीकार केली आहे...आणि इस्माईल अ. च्या जागी एक कोकरू आहुती झाले होते...आणि इस्माईल अ. जिवंत होते...

अल्लाहने त्याच्या वचनावर खरे राहून, इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. यांना आशीर्वाद दिला की, येणाऱ्या पिढ्यां त्यांची आठवण करतील...

या दिवसापासून प्रत्येक मनुष्य जेव्हा "हज" साठी जातो, तेव्हा त्यांच्या आहुतीची आठवण करतो...प्रत्येक वर्षी "ईद उल अजहा" ला म्हणजेच "बकरीद ईद" ला प्रत्येक अनुयायी, त्यांच्या ऐपतीनुसार इब्राहीम अ. च्या आहुतीच्या स्मृतीत एक बकरा बळी देतो...

त्यानंतर अल्लाहची आज्ञा पाळून इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. यांनी अल्लाहचे घर बनविले..."काबा" जेथे लोक प्रार्थना करू शकतील...

जसे इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. अल्लाहच्या घराचा पाया उंच करत होते...ते प्रार्थना करत होते..."हे अल्लाह...ही सेवा स्वीकार कर...आणि आम्हाला तुझ्या इच्छेसाठी आज्ञाधारक बनव...आणि तुझ्या कृपेवर अवलंबून राहू दे, कारण तू खूप दयाळू आहेस..."

इब्राहीम अ. यांनी अशीही प्रार्थना केली की, ही जागा एक शांतीचे शहर बनू दे...त्यांनी त्यांच्या मुलाला अल्लाहच्या श्रद्धेसमोर झुकण्यास सांगितले...आणि अल्लाहपासून कधीही दूर न जाण्यास सांगितले...

मुहम्मद(स.अ.व.) हे त्यांच्याच पिढीतील वंशज आहेत....

अल्लाह त्याच्या संदेशवाहकाला, इब्राहीम अ. यांना, इतके प्रेम करत होता की, त्याने नंतर मुहम्मद (peace be upon him) यांना, जे शेवटचे संदेशवाहक होते, इब्राहीम अ. यांच्या श्रध्देच्या रस्त्यावर चालण्यास सांगितले....

आज जेव्हा पूर्ण जगातून, लाखो मनुष्य "काबा" ला जातात, ते तिचं प्रार्थना म्हणतात जी, मुहम्मद (peace be upon him) ने शिकविली आहे.. आणि तवाफ ("काबा" ला सात चक्कर मारणे) करतात...अशाप्रकारे "इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. यांची अल्लाहच्या इच्छेशी अधीनता " याची आठवण करने, लोकांनी चालू ठेवले आहे..

काबा च्या समोर एक स्थान आहे... "मुकाम ए इब्राहीम", जेथे दगडावर इब्राहीम अ. यांच्या पायाचे निशाण दिसतात..हे लोकांकडून शतकांपासून संरक्षित केले गेले आहे...येथे प्रत्येक मनुष्य अल्लाहला एक खास प्रार्थना म्हणतो....आणि या अल्लाहच्या प्रिय संदेशवाहकांना ज्यांनी काबा बांधला, त्यांना सलाम पाठवतात...


इब्राहीम अ. जेव्हा, हाजराला वाळवंटात सोडून सारा कडे आले... सारा नाराज होती..तिला स्वतःचे मूल नव्हते म्हणून...

काही वर्षांनंतर अल्लाहने इब्राहीम अ. यांच्याकडे, फरिश्ते (स्वर्गदूत / angle) पाठविले...त्यांना, हे सांगण्यासाठी की, एक चांगली बातमी आहे की, इब्राहीम अ. यांना, अजून एक मुलगा होईल...हे फरिश्ते मनुष्याच्या रुपात आले होते...इब्राहीम अ. यांना, आशिर्वादासह शुभेच्छा देण्यासाठी आले होते...

इब्राहीम अ. यांनीे त्यांच्या शुभेच्छा वापस केल्या.. फरिश्ते नम्रतेने त्याला म्हणाले, "आम्ही तुझ्यासाठी चांगली बातमी आणली आहे ..एक हुशार आणि बुद्धिमान मुला विषयी..."इसाक" अ. आणि त्यानंतर त्याच्या पुढची पिढी... याकूब अ.(इस्राइल)... ही अल्लाहची इच्छा आहे की तुला सारा पासून एक मुलगा होईल...

इब्राहीम अ. यांची पत्नी सारा तेथे उभी होती...ती खूप आश्चर्यचकित झाली...आणि तिने विचारले, "पण हे कसे शक्य आहे? मी एक वृद्ध स्त्री आहे आणि माझे पती ही खूप वृद्ध आहेत...आम्हाला मूल कसे होऊ शकते?"...

फरिश्ते उत्तरले, "अल्लाह च्या इच्छेवर तुम्ही आश्चर्य करत आहात का?अल्लाह निश्चितच सर्वात मोठा आहे आणि जे काही तो इच्छा करतो, ते तो करू शकतो... तुमच्यावर त्याचे आशीर्वाद असो... आशा सोडू नका..."

"नाही, मी आशा सोडणार नाही..जे लोक श्रद्धा करत नाहीत ते आशा सोडतात..." इब्राहीम अ. म्हंटले...

अशा प्रकारे अल्लाहने वचन दिल्याप्रमाणे सारा ला एक मुलगा झाला...इसाक अ...जो मोठा झाल्यावर एक संदेशवाहक बनला...आणि त्यानंतर त्यांचा मुलगा याकूब अ. आणि मग त्याचा मुलगा युसुफ अ...ही संदेशवाहक बनले...

अशाप्रकारे इब्राहीम अ. यांनी, जी प्रार्थना केली होती की त्यांना चांगले आणि सद्गुणी मुले आणि वंशज होऊ दे...ती अल्लाहने पूर्ण केली...त्यांची दोन्ही मुले इस्माईल अ. आणि इसाक अ. आणि त्यांचे वंशज ही संदेशवाहक बनले...त्यामुळे इब्राहीम अ. यांना "संदेश वाहकांचा पिता" म्हंटले जाते...


एक दिवस उत्सुकतेने इब्राहीम अ. यांनी अल्लाहला विचारून, हे दाखविण्यास सांगितले की, अल्लाह, "न्याय करण्याच्या दिवशी"...मृत झालेल्यांना जिवंत कसे करेल?

अल्लाहने विचारले, "इब्राहीम, तुला विश्वास नाही का?"

"मला खरंच विश्वास आहे", इब्राहीम अ. म्हणाले, "पण मला स्वतःला संतुष्ट करण्यासाठी ते पहायचे आहे"...

अल्लाहने मान्य केले...

अल्लाहने इब्राहीम अ. यांना, चार पक्षी पाळण्यास सांगितले...त्यांचे जिबह करून, तुकडे करण्यास सांगितले...आणि ते तुकडे चार डोंगरावर एकमेकांपासून दूर दूर फेकण्यास सांगितले...

मग इब्राहीम अ. यांना, त्या पक्ष्यांना हाक मारण्यास सांगितले...सगळे पक्षी त्यांच्याकडे...त्यांच्या पूर्ण शरीरात वापस आले...

अल्लाहने हा चमत्कार इब्राहीम अ. यांना, त्यांच्यासाठी आणि सर्व मनुष्यांसाठी दाखविला, जेणेकरून प्रत्येक जण समजू शकेल की, जो एक वेळेस जीवन देऊ शकतो...पुन्हा एकदा "न्याय देण्याच्या दिवशी" जीवन देऊ शकतो...

ही कथा कुरआन मध्ये दुसऱ्या धड्यात, "सुरे बकरा" मध्ये वर्णन केलेली आहे...


🍁🍁लूत अ.🍁🍁

लूत अ. हे इब्राहीम अ. यांच्या, भावाचे पुत्र होते, म्हणजेच त्यांचे पुतणे होते...जेव्हा इब्राहीम अ. यांनी त्यांचा देश सोडला होता, तेव्हा लूत अ. हेही त्यांच्या बरोबर होते.. लूत अ. खूप सद्गुणी आणि अल्लाहचा संदेशवाहक होते...

इब्राहीम अ. त्यांच्या देश सोडल्यानंतर, इब्राहीम अ. जेरुसलेमला (पॅलेस्टाईन) गेले. आणि अल्लाह कडून लूत अ. यांना सदूम या ठिकाणी पाठविण्यात आले...जे जॉर्डन च्या पूर्वेत आहे..तेथे राहणाऱ्या पापी आणि वाईट लोकांना, अल्लाह च्या संदेशाची शिकवण देण्यासाठी..

हे लोक प्रत्येक व्यवसायी, जो त्यांच्या रस्त्यात येत होता, त्याला लुटत होते...त्यांना न्याय काय असतो याचे ज्ञान नव्हते...एक दिवस एक प्रवासी त्याची अमानत म्हणजे त्याची कमावलेली संपत्ती... घेऊन जात होता... एका माणसाने त्याच्या कपाळाला एक दगड मारला...आणि त्याला पकडून म्हंटले, "माझ्या दगडाने तुला लागले आहे...तुला जे घडले याची भरपाई द्यावी लागेल.."

प्रवासी खूप रागावला आणि म्हणाला, "तू मूर्ख आहेस का? तू कशाविषयी बोलत आहे...तू मला मारले..तू मारेकरी आहेस...तुला मला दिले पाहिजे..."

ते दरबारात गेले...पण न्यायाधीशाने मारेकऱ्याच्या कडून निर्णय दिला...ज्याने प्रवाश्याला मारले होते...आणि म्हणाला, "हो, हा बरोबर आहे...याच्या दगडाने तुला मारले... आता तुला याची भरपाई करावी लागेल..."

या अन्यायावर , प्रवासी इतका नाराज झाला की, त्याने एक दगड उचलला आणि न्यायाधीशाच्या डोक्याला मारला...

"बरं.." तो मारल्यानंतर म्हणाला, " आता तुला मला भरपाई द्यावी लागेल...ज्या माणसाला, तू मला भरपाई द्यायला सांगितली होती..त्याला तू भरपाई देऊ शकतो..."

लूत अ. यांनी या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला की, ते पाप ने भरलेले जीवन जगत आहेत...पण त्यांनी त्यांची थट्टा उडविली...ते म्हणाले की, "जर तू इतका चांगला आहेस तर तू आमच्यासोबत राहू शकत नाही...येथून चालला जा...आम्ही तुझ्यासारखे का होऊ?"

लूत अ. दुःखी झाले..त्यांनी त्यांच्याकडून अल्लाहचा संदेश देण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता...पण लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही...

एक दिवस...तीन फरिश्ते, जे खूप देखणे तरुण दिसत होते.. लूत अ. कडे आणि त्याच्या कुटुंबाकडे आले... लूत अ. म्हणाले, "तुम्ही अनोळखी दिसत आहात...कोण आहात तुम्ही?"

ते त्याला म्हणाले की, ते अल्लाहकडून पाठविण्यात आलेले फरिश्ते आहेत...जे त्या पापी लोकांना, जे ऐकत नाहीत, त्यांना शिक्षा देण्यासाठी आले आहेत...त्यांनी सांगितले की, "पूर्ण शहर नष्ट होणार आहे..." आणि त्यांनी लूत अ. यांना सांगितले की, त्यांच्या कुटुंबाला घेऊन, रात्रीच्या शांततेत, हे शहर सोडून जा..."कोणीच मागे पाहू नका...तुम्हाला सूर्योदय होण्याच्या आधी जो उजेड होतो. म्हणजेच पहाट...त्याआधी ही जागा सोडायची आहे..."

जेव्हा ते बोलत होते, तेव्हा शहरातील सगळे वाईट लोकं आले आणि त्यांनी त्या देखण्या तरुणांना पाहिले, "यांना आम्हाला दे"...ते म्हणाले..."हे तुझे पाहुणे आहेत...नाही का?"

आम्ही तुला म्हटले नव्हते का की, कुणी पाहुणे येऊ देऊ नको... आता त्यांना आमच्या ताब्यात दे...आम्हाला त्यांच्यासोबत हवे ते करण्यासाठी..."

लूत अ. यांनी, त्यांची विनवणी केली..."इतके क्रूर होऊ नका... त्यांच्या पाहुण्यांसमोर इतका वाईट व्यवहार करू नका"...पण त्यांनी ऐकले नाही...आणि जोर देत राहिले...

ते तरुण मुले...निश्चितच अल्लाहचे फरिश्ते होते...आणि त्यांना कुणीच काही करू शकत नव्हते...ते लूत अ. यांना म्हणाले, ' त्यांची काळजी करू नका आणि शांततेने हे शहर सोडून जा...'

त्यामुळे लूत अ. यांनी ते शहर, रात्रीच्या अंधारात, त्याच्या कुटुंबीयासोबत सोडले...पण त्यांच्या पत्नीला सदूमच्या लोकांवर दया आली...तिने अल्लाहची आज्ञा मानली नाही... तिने जातांना मागे वळून पाहिले...आणि ती जे मागे राहीले आणि शिक्षा मिळाली, त्यांच्यामध्ये ती ही होती...ती दगडाची झाली...आजही तो दगड तसाच दिसत आहे.

पहाटे एक खूप भयानक आवाजाने त्या लोकांना पकडले...एक जोरदार कडक आणि भाजलेल्या दगडांचा फवारा होता...

पूर्ण शहर, तेथे राहणाऱ्या लोकांसहित आणि त्याजमिनीत उगवलेल्या प्रत्येकासहित उध्वस्त झाले...

आज इतक्या हजारो वर्षानंतर त्या शहराचा उध्वस्त ढिगारा.. मृत समुद्राच्या जवळ दिसतो...ज्या मृत समुद्रात कुणीही जिवंत राहू शकत नाही...काही लोक विश्वास करतात की, हे ढिगारे आणि समुद्र याची आठवण करून देतात की, अल्लाहचा शाप ज्यामुळे सदूमचे आज्ञा न पाळणारे लोक, नष्ट झाले...तो किती वेदनादायी आहे...

*इब्राहीम अ. आणि लूत अ. हे हिब्रू भाषा बोलत होते व ते अल्लाह ला  यहोवा  (yahweh) या नावाने संबोधित करत होते. मुहम्मद स. अ. व. यांच्यावर कुरआन प्रकट झाल्यानंतरचे अल्लाह हे संबोधन अरबी भाषेत  कुरआनमध्ये आहे.
विश्वाचा निर्माता एकच आहे...भाषा वेगळ्या त्यामुळे संबोधन वेगळे आहे...इस्लाम धर्माचे लोक इब्राहीम अ. आणि मूसा अ. (Moses) यांनाही मानतात आणि ईसा अ.( येशू) यांनाही मानतात, ज्यामुळे अनुक्रमे ज्यू (यहुदी ) आणि ख्रिश्चन धर्म आले. मूसा अ. यांच्यावर तोरात (Torah) आणि ईसा अ. यांच्यावर इंजील (बायबल) हा ग्रंथ प्रकट झाला. तोरात, बायबल आणि कुरआन मध्ये जवळ जवळ सारख्याच पैगंबरांच्या सत्यकथा आणि बोधकथा आहेत...आणि संदेश आहे...पण कुरआन हा मूळ ग्रंथ आहे, ज्यात काहीही बदल झालेला नाही.

कुरआन मध्ये ज्या संदेश वाहकांचे नाव आहे, त्यांच्या कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला दाबा...
www.marathitunislam.wordpress.com

किंवा कुरआन चे मराठी भाषांतर वाचण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा...
https://www.facebook.com/quran2020786/

मंगळवार, २३ जून, २०२०

05.इब्राहीम अ.


ही साधारणतः 4000 वर्षांपूर्वीची म्हणजेच 2000 BC ची सत्यकथा आहे..
खूप खूप वर्षांपूर्वी इराकमध्ये, एका माणसाला ज्याचे नाव अझर होते, जो लाकडाच्या प्रतिमा कोरून बनवत होता त्याला एक मुलगा झाला…इब्राहीम अ.…

त्या दिवसात अरबचे लोक, लाकडाच्या आणि दगडांच्या प्रतिमांची आराधना करत होते…ते असाही विश्वास ठेवत होते की, तारे मनुष्याच्या भाग्यावर नियंत्रण ठेवतात…

जस जसे इब्राहीम अ. मोठे होऊ लागले, त्यांना जाणीव होऊ लागली की, मनुष्याने बनविलेल्या प्रतिमा कुणालाच मदत करत नाहीत…त्यांची आराधना करून काही उपयोग नाही..त्या प्रतिमा एक दुसऱ्यांना ही मदत करू शकत नाहीत…

इब्राहीम अ. हे एक चांगले, हुशार आणि ज्ञानी व्यक्ती होते…ज्यांना अल्लाहने त्याचा संदेशवाहक म्हणून निवडले…प्रतिमांची आराधना करण्याऐवजी इब्राहीम अ. यांनी एका आणि फक्त एका अल्लाहवर विश्वास ठेवला…

त्यांनी त्याच्या वडिलांना आणि सर्व दुसऱ्या लोकांना प्रतिमांची आराधना करण्यास थांबवले…”ज्यांना तुम्ही स्वतः बनविले त्यांची तुम्ही आराधना कशी करू शकता?…” त्यांनी त्यांना विचारले,” या प्रतिमा तुम्हाला कशी मदत करू शकतात?…”
पण त्यांचे वडील,अझर रागावले आणि म्हणाले, “इब्राहिम मी तुला चेतावणी देतो की, मी तुला मरेपर्यंत दगडांनी मारेन, जर तू हा मूर्खपणा थांबवला नाहीस..”
यामुळे इब्राहीम अ. उदास झाले…पण ते म्हणाले की, अल्लाह तुम्हाला आर्शिवाद देवो…मी अल्लाहला प्रार्थना करेन की, तो तुमच्यासाठी दयाळू राहो…”

इब्राहीम अ. ची ही सुद्धा इच्छा होती की, लोकांनी ताऱ्यांवर, ईश्वरासारखा विश्वास ठेवणे थांबावावे…एका रात्री जेव्हा ते आकाशात ताऱ्यांची चमक पाहत होते… ते लोकांना म्हंटले, “मी सर्वात तेजस्वी ताऱ्याची आराधना करेन…”

लोक हा विचार करून थोडे आनंदी झाले की, शेवटी इब्राहीम अ. यांनी, त्यांच्या श्रद्धेवर अनुसरण करण्यास सुरुवात केली…पण जेव्हा तो तारा मंद झाला आणि चंद्र आला, इब्राहीम अ. म्हणाले, “ओह…मी त्या ताऱ्याची आराधना करू शकत नाही, जो मंद आहे…मी चंद्राची आराधना करेन…”
पुन्हा जेव्हा चंद्र मावळला आणि तेजस्वी सूर्य उगवला…इब्राहीम अ. म्हणाले, “ओह, हा सूर्य चंद्रापेक्षा जास्त तेजस्वी आहे…मी याला ईश्वर बनवतो…” पण जेव्हा सूर्यास्त झाला आणि सूर्य दिसेनासा झाला…इब्राहीम अ. लोकांकडे येऊन बोलले, “लोकहो…जर मला माझ्या अल्लाहने योग्य रस्ता दाखवला नसता तर मी भलतीकडेच भटकलो असतो..”

मी अल्लाहला सोडून कुणावरही विश्वास करणार नाही…एक आणि फक्त एक अल्लाह, ज्याने ह्या पृथ्वीवरची आणि आकाशातली प्रत्येक गोष्ट बनविली…


इब्राहीम अ. यांच्याशी लोक वाद करत राहिले आणि त्यांच्या प्रतिमांची भीती दाखवत राहिले.
इब्राहिम अ. म्हणाले, “मी तुमच्या प्रतिमांच्या आराध्याला का घाबरु, जर तुम्ही एक आणि फक्त एक खऱ्या अल्लाहला घाबरत नाही?”
मी तुमच्या पैकी एक नाही…मी एकटा अल्लाहकडे वळेल…जो स्वर्गाचा आणि धरतीचा प्रभु आहे…

तरीही लोकांनी मनुष्याने बनविलेल्या प्रतिमांची आराधना करने चालू ठेवले…
एकदा इब्राहीम अ. ने शांतपणेे सांगितले,
“मी तुमच्या प्रतीमांबरोबर एक पेच करणार आहे…हे यासाठी कारण मला माहीत आहे, या प्रतिमा कुणालाच मदत आणि नुकसान करू शकत नाही…”

एक दिवस जेव्हा शहराचा प्रत्येक जण, एका मोठ्या धार्मिक उत्सवासाठी गेला होता, इब्राहीम अ. आजारी असल्याचे सांगून  मागे राहिले…
ते सर्व लोक गेल्यावर इब्राहीम अ. त्यांच्या मोठ्या आराधनेच्या ठिकाणी गेले, जेथे शंभर प्रतिमा ठेवल्या होत्या…त्या ठिकाणी सर्व प्रकारची फळे आणि मिठाई, लोकांनी त्या प्रतिमांसाठी ठेवली होती…इब्राहीम अ. यांनी प्रतिमांना विचारले, “तुम्ही या हव्या हव्याशा वस्तू, ज्या तुमच्यासाठी ठेवल्या आहेत, का खात नाहीत?…जेव्हा लाकडाच्या आणि दगडाच्या पुतळ्यानी उत्तर दिले नाही, त्यांनी विचारले,”तुम्ही का बोलत नाही?” मग त्यांनी एक गज घेतला आणि त्यांना आकारहीन केले…फक्त एका मोठ्या प्रतिमेला तसेच ठेवले…जी सर्व कहाणी लोकांना सांगेल.
जेव्हा लोक उत्सवातून, त्या जागी वापस आले आणि पुतळे पाहीले, ते खूप रागावले…
“हे इब्राहीम शिवाय कोणीच करू शकत नाही..” ते म्हंटले…
लगेच शहरातील सर्व लोक जमा झाले…त्यांनी इब्राहीम अ. यांना बोलावले आणि विचारले की, त्यांनी त्यांच्या पुतळ्यांच्या प्रतिमांशी काय केले…


इब्राहीम अ. बोलले, ” तुमच्या सर्वात मोठ्या पुतळ्याने, बाकी पुतळ्यांना असे केले…तुमच्याच मोठ्या प्रतिमेने हे केले…तुम्ही विचारा…म्हणजे जर ती बोलत असेल तर ..”
अर्थात, पुतळे बोलत नाहीत…त्यामुळे ते स्तब्ध राहिले आणि बोलले, ” इब्राहीम, तुला चांगले माहीत आहे की, हे पुतळे बोलत नाहीत…”

“मग तुम्ही त्यांची आराधना का करता?” इब्राहीम अ. यांनी विचारले….”ह्या तुम्हाला काहीच कामाच्या नाहीत…तुम्ही का विचार करत नाही आणि समजून घेत नाही…हे पुतळे तुम्ही स्वतः बनविले…तुम्ही अशा मृत लोकांची पुतळा बनवून आराधना का करता?”
पण ते समजून घेण्यास तयारच नव्हते…


‘ नमरुद’ हा इराक (बेबीलोन)चा राजा होता, जो स्वतःला ईश्वर समजत होता…त्यानेहीे इब्राहीम अ. विषयी ऐकले. त्याने इब्राहीम अ. यांना, त्याच्या दरबारात बोलावले आणि त्यांना विचारले की, तो नमरुदला ईश्वर का मानत नाही?


इब्राहीम अ. एक धैर्यवान तरुण होते, जे अल्लाहशिवाय कुणालाही भीत नव्हते..त्यांनी उत्तर दिले,”कारण तुम्ही एक मनुष्य आहात, जसे आमच्या पैकी प्रत्येक जण आहे…आणि पुतळ्यांविषयी म्हणाल तर ते मुके,बहिरे आणि आंधळे आहेत तर मग ते ईश्वर कसे असू शकतील?”

नमरूद खूप रागावला आणि विचारले,
“तुझा अल्लाह काय करू शकतो,जे मी करू शकत नाही?”
इब्राहीम अ. बोलले, ” अल्लाह जीवन देतो आणि जीव घेतो”
नमरुद  म्हणाला, “मीही हे करू शकतो…मी कैद्याला फाशी (मृत्युदंड) देतो आणि ज्याला मृत्यूची शिक्षा दिली आहे त्याला जीवनदान देतो…”


मग इब्राहीम अ. म्हणाले, “अल्लाह सूर्याला पूर्वेतून उदय करतो आणि पश्चिमेस अस्त  करतो…तुम्ही सूर्य पश्चिमेतून उदय करून दाखवू शकता का?”

नमरुद गोंधळलेला होता…त्याला कळलेच नाही की, काय बोलावे…पण तो एक क्रूर आणि गर्विष्ठ राजा होता, त्याने आज्ञा दिली की, इब्राहीम अ. यांना एका मोठ्या आगीत फेकून देण्यात यावे…राजाच्या लोकांनी एक मोठी आग लावली आणि इब्राहीम अ. यांना त्यात फेकले…


इब्राहीम अ. यांनी स्वतःला वाचवण्यासाठी अल्लाहची प्रार्थना केली…अल्लाहने इब्राहीम अ. वर खूप प्रेमाने आशीर्वाद दिला आणि आज्ञा केली, “हे आग…शांत होऊन जा आणि इब्राहीमला वाचवून आशीर्वाद दे.” त्याच्या भोवतालची आग शांत झाली…प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आणि इब्राहीम सुखरूप बाहेर आले….

नमरुदच्या क्रूरपना नंतर, जो इराक (बेबिलोन) चा राजा होता, ज्याने इब्राहीम अ. यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.. इब्राहीम अ. यांनी इराक सोडले आणि फिलिस्तीन मध्ये गेले आणि नंतर इजिप्त मध्ये गेले…त्याची पत्नी ‘ सारा ‘ जी त्यांच्या जवळच्या नात्यातली होती आणि त्यांचा पुतण्या ‘ लूत ‘ त्यांच्यासोबत होते… लूत अ. हे खरे ईश्र्वरावर श्रद्धा करणारे आणि विश्वास ठेवणारे होते…काही दिवसांनी ते ही अल्लाहचा संदेशवाहक बनले…

जेव्हा ते इजिप्तला गेले, लोकांनी त्यांना सांगितले की, फिरौंन (pharaoh,फैरो) खूप कपटाचारी आहे..तो इजिप्तचा राजा आहे…

जर त्याने, एका सुंदर स्त्रीला पाहिले, तर तो त्याच्या माणसांना म्हणतो, तिला उचला आणि तिला राजवाड्यात घेऊन या… जबरदस्तीे केले तरी चालेल…

इब्राहीम अ. यांची पत्नी “सारा” सुंदर  होती..त्यामुळे फिरौंनच्या लोकांनी तिला राजाकडे घेऊन गेले…एक सद्गुणी स्त्री असल्याने, तिने अल्लाहकडे मदत  मागितली…अल्लाहने तिच्या प्रार्थनेचे उत्तर दिले… फिरौंन तिला काहीच इजा पोहोचवू शकला नाही, स्पर्श करू शकला नाही..त्याचा हात एकाच जागी कडक झाला….तो हैराण झाला..

तिला राजाच्या वाईट हेतूपासून अल्लाहने संरंक्षण दिले होते…आणि वाचवले होते…फिरौंनने जाणले की, सारा एक सद्गुणी स्त्री आहे आणि कोणती तरी अज्ञात शक्ती (अल्लाह) तिला वाचवत आहे…
आता तो इतका भयभीत झाला की, त्याने साराला मोकळे केले आणि तिच्यासोबत आणखी एक सद्गुणी मुलगी जिचे नाव “हाजरा” होते, पाठविली आणि त्यांना सन्मानाने पाठविले.

इब्राहीम अ. यांनी  हाजरा शी लग्न केले…
इब्राहीम अ. हे वयस्कर झाले होते आणि त्यांना मूल नव्हते…त्यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांना एक वारस (एक मुलगा) मिळावा…अल्लाहने या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि त्याला हाजरा पासून एक मुलगा दिला, इस्माईल..

जेव्हा हाजरा ने इस्माईल ला जन्म दिला, इब्राहीम अ. यांची पहिली पत्नी, सारा नाराज झाली, कारण तिला तिचे स्वतःचे मूल नव्हते…
त्यामुळे अल्लाहने इब्राहीम अ. यांना आज्ञा केली की, ‘हाजरा आणि तिचा मुलगा इस्माईल यांना घेऊन वाळवंटाच्या ठिकाणी घेऊन जा आणि तेथे सोडून वापस ये..’

इब्राहीम अ. यांना ही आज्ञा पाळणे खूप अवघड होते…इतक्या वर्षांनी जो मुलगा जन्माला आला,  आणि ज्याच्यासाठी खूप तीव्र इच्छा आणि प्रार्थना करावी लागली, त्याला आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीला हाजराला सोडून देणे, इब्राहीम अ. यांना खूप कठीण होते…

पण ते अल्लाह ची खरी श्रध्दा करणारे होते…त्यांनी कोणताही संकोच न बाळगता ती आज्ञा पाळली…

अल्लाह च्या हुकुमाप्रमाने ते हाजरा आणि इस्माईल ला घेऊन वाळवंटाच्या ठिकाणी गेले…रस्त्यात हाजरा ने त्यांना विचारले, “तुम्ही आम्हाला कोठे आणि का घेऊन जात आहात?”
इब्राहीम अ. शांत राहिले आणि काहीही उत्तर दिले नाही…
हाजरा समजली आणि तिने विचारले,” ही अल्लाहची इच्छा आहे का?”
“हो, असेच आहे” इब्राहीम अ. यांनी उत्तर दिले…
“मग मी  प्रश्न विचारणार नाही आणि मला कशाचीच भीती नाही..निश्चितपने अल्लाह आमचे संरक्षण करेल”, हाजरा म्हणाली…हाजरा एक धैर्यंवान आणि कर्तव्यनिष्ठ स्त्री होती…
इब्राहीम अ. त्यांना निर्मनुष्य जागी घेऊन गेले…जेथे पाणी नव्हते आणि मैल पर्यन्त झाड नव्हते…आणि त्यांना तेथे सोडले…ही जागा “मक्का” होती…
जेव्हा त्यांनी हाजरा आणि इस्माईल ला निर्जन ठिकाणी एकटे सोडले, त्यांना खूप वाईट वाटले…तो त्यांच्यासाठी खूप मोठा त्याग होता…पण इब्राहीम अ. लटपटले नाही आणि कमजोर पडले नाही…
ते त्यांना सोडून वापस थोडे दूर गेले…जेव्हा ते दोघे त्यांना दिसेनासे झाले, तेव्हा ते थांबले आणि चेहरा तिकडे करून अल्लाहला कळकळीने प्रार्थना केली,” ‘ओ अल्लाह’, तुझ्या इच्छेप्रमाणे, मी माझ्या वारसाला वाळवंटाच्या ठिकाणी सोडून जात आहे… ‘ओ अल्लाह’…मी त्यांना सोडले जेणेकरून, ते तुला इथे प्रार्थना करत राहतील. कृपा करून त्यांचे रक्षण कर… लोकांनी त्यांच्याकडे येऊन, त्यांना तुझ्या धरतीतून अन्न पुरवठा होवू दे, जेणेकरून ते नेहमी तुझे आभारी राहतील”
असे म्हणून इब्राहीम अ. वळले आणि त्यांनी त्यांना अल्लाहच्या दयाळूतेवर विश्वास करून, सोडून गेले….
अल्लाह  इब्राहीम अ. च्या निष्ठेवर इतका प्रसन्न झाला की, अल्लाहने इस्माईल आणि हाजरा चे फक्त संरक्षणच केले नाही तर वचन ही दिले की, त्यांच्या नंतरच्या वंशजांची भरभराट होईल…मुहम्मद (स. अ. व.) हे त्यांच्याच पिढीतील आहेत….

इकडे हाजरा दोन शुष्क डोंगराच्या मधील वाळवंटात होती…डोंगराचे नाव “सफा” आणि “मरवा” होते…तिला काय करावे काही कळत नव्हते…जेव्हा बाळ प्रखर उष्णतेने, तहान लागल्यामुळे रडायचे, तेव्हा तीचे हृदय बाळासाठी दुखायचे…पण ती काय करू शकत होती?…तेथे पाणी नव्हते, अन्न नव्हते, छत नव्हते आणि कोणीच दिसत नव्हते…ती एक माता होती…ती कसे बसून तिच्या बाळाला मरतांना पाहू शकत होती….
ती सफा डोंगरावर, हे पाहण्यासाठी चढली की, त्या दिशेला, कोणी मदतीसाठी दिसते का? पण सगळे वाळवंट होते…मग ती पळत वापस आली, तिच्या तहानलेल्या बाळाला पाहण्यासाठी….
पुन्हा ती दुसऱ्या डोंगरावर ” मरवा ” वर पळाली… त्या दिशेला कोणी दिसते का, ज्याला ती मदतीसाठी विचारू शकते….पण तिथे कोणीच नव्हते..


स्वतःला त्रास घेऊन, हाजरा एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर मदतीसाठी पळत राहिली…प्रत्येक वेळेस वापस येताना तिच्या तहानलेल्या आणि भुकेल्या बाळाला पाहत होती…अशा वर खाली आणि एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जावून आणि परत जावून सात चकरा झाल्यावर ती…अल्लाहची इच्छा असे स्वीकार करून, अल्लाहच्या इच्छेला शरण गेली, ती थकून बसली…
आणि मग अल्लाहने त्याची दयाळूता दाखविली.चमत्कारिकरित्या एक पाण्याचा फवारा (झरा), बाळाच्या जवळ वाहू लागला…
त्यालाच आज जमजम म्हणतात…”आब ए जमजम” (जमजम चे पाणी) हे पाणी खूप ताजेतवाने करणारे, उपचार करणारे, जखम भरणारे आणि उत्साहवर्धक म्हणजेच ताकद देणारे समजले जाते…आजही जे “हज” आणि “उमरा” साठी पूर्ण जगातून “मक्का” येथे जातात,अशा लाखो मनुष्यांसाठी जमजमचे पाणी उफाळून पुढे येते…

हाजराला तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.. तिचे हृदय आनंदाने भरले…दोघांना, तिला आणि तिच्या बाळाला अल्लाहने वाचविले…
अल्लाहला हाजराची श्रद्धा आणि धैर्य इतके आवडले की, अल्लाहने या दिवसापासून लाखो माणसे, पुरुष, स्त्रिया, मुले, याच धर्मनिष्ठ स्त्रीने, हाजराने चाललेल्या रस्त्यावर पुन्हा पावले टाकतील..जेव्हा ते सफा आणि मरवाच्या दरम्यान, “हज “च्या अवधीत चालतील, असा आशीर्वाद दिला..

काही वेळानंतर, एक उंटाच्या गाड्या असलेल्या तांडवाने, या वाळवंटातून जात असताना, ते झऱ्याचे पाणी पाहिले आणि हाजराला, तेथे थांबून तात्पुरता मुक्काम करण्याची परवानगी मागितली…

“हो नक्कीच”, तिने उत्तर दिले…”पण या पाण्यावर तुमचा अधिकार करू नका..ते प्रत्येकासाठी मोफत असेल…”
ते लोक मानले…आणि ते तिथे काही दिवस पाण्यासाठी राहिले. (पाणी शोधणे अरेबिया मध्ये हे खूप कठीण होते. जिथे कुठे पाणी असायचे…लोक आजूबाजूला त्यांची घरे बनवायचे…) अशा प्रकारे “मक्का ” एक व्यस्त वस्ती बनले..आणि इब्राहीम अ. यांनी अल्लाहला जी प्रार्थना केली होती की, ‘त्याच्या पत्नी आणि त्याच्या वारसाचे रक्षण कर…आणि लोकांना त्यांच्याकडे येऊ दे..’ त्याचे अल्लाह कडून उत्तर मिळाले…

हाजरा आणि इस्माईल तिथेच राहिले, जेथे इब्राहीम अ. त्यांना सोडून गेले होते..इब्राहीम त्याच्या कुटुंबाला कधी कधी येऊन भेटायचे…

जेव्हा इस्माईल मोठा झाला…इब्राहीम अ. यांनी एक स्वप्न पाहिले…अल्लाह त्यांच्या मुलाची, इस्माईलची, आहुती देण्याची आज्ञा करत आहे…

इब्राहीम अ. खूप घाबरले आणि जागे झाले…पण त्यांना, तीन रात्री तेच स्वप्न पडले…त्यांना खात्री झाली की, ही अल्लाहची आज्ञा आहे…आणि त्यांना त्या आज्ञेसाठी झुकले पाहिजे…

ही इब्राहीम अ. यांच्यासाठी अत्यंत कडक परीक्षा होती…जे आता एक वृद्ध मनुष्य होते…ते त्याच्या जिवलग मुलाची आहुती कसे देऊ शकणार होते?…पण त्यांनी स्वतःच आठवण केली की, ते अल्लाहचे संदेशवाहक आहे…आणि आज्ञा न पाळण्याचा, ते कधीही विचार करू शकत नाही…

त्यामुळे ते इस्माईल कडे गेले..आणि त्याला त्यांच्यासोबत चलण्यास सांगितले…
जेव्हा ते इस्माईलला सूनसान जागी घेऊन जात होते, इस्माईलने त्याच्या वडिलांना विचारले की, ते कोठे जात आहेत…
इब्राहीम अ. यांनी, त्यांच्या स्वप्नाविषयी त्याला सांगितले…इस्माईल त्याच्या अल्लाहनिष्ठ, वडिलांचा एक शूर मुलगा होता..घाबरून न जाता किंवा विचलित न होता तो म्हणाला, “बाबा…जर ही अल्लाहची इच्छा आहे तर करा…मी आहुती साठी तयार आहे..तुम्ही मला अल्लाहच्या इच्छेशी शरणागत (नम्र) पाहाल…”
इब्राहीम अ. ने इस्माईलला झोपविले. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, जेणेकरून, ते जे काही करणार आहे, त्यांना दिसणार नाही.लगेच अल्लाह त्यांच्याशी बोलला, “इब्राहिम खरंच…मी त्यांना पारितोषिक देतो, जे योग्य करतात..ही एक परीक्षा होती…..आणि इस्माईल च्या जागी एक कोकरू आहुती झाले होते…आणि इस्माईल जिवंत होता…

अल्लाहने त्याच्या वचनावर खरे राहून, इब्राहीम अ. आणि इस्माईलला आशीर्वाद दिला की, येणाऱ्या पिढ्या  त्यांची आठवण करतील…

या दिवसापासून  प्रत्येक मनुष्य जेव्हा “हज” साठी जातो, तेव्हा त्यांच्या आहुतीची आठवण करतो…प्रत्येक वर्षी “ईद उल अजहा” ला  प्रत्येक अनुयायी, त्याच्या ऐपतीनुसार इब्राहीम अ.  यांच्या आहुतीच्या स्मृतीत एक बकरा बळी देतो…

त्यानंतर अल्लाहची आज्ञा पाळून इब्राहीम अ. आणि इस्माईलने अल्लाहचे घर बनविले…”काबा” जेथे लोक प्रार्थना करू शकतील…

जसे इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. अल्लाहच्या घराचा पाया उंच करत होते…ते प्रार्थना करत होते. “हे अल्लाह, ही सेवा स्वीकार कर…आणि आम्हाला तुझ्या इच्छेसाठी आज्ञाधारक बनव…आणि तुझ्या कृपेवर अवलंबून राहू दे, कारण तू खूप दयाळू आहेस…”

इब्राहीम अ. यांनी अशीही प्रार्थना केली की, ही जागा एक शांतीचे शहर बनू दे…त्यांनी त्यांच्या मुलांना अल्लाहच्या श्रद्धेसमोर झुकण्यास सांगितले…आणि अल्लाहपासून कधीही दूर न जाण्यास सांगितले…
अल्लाह त्याच्या संदेशवाहकाला, इब्राहीम अ. यांवर, इतके प्रेम करत होता की, त्याने नंतर मुहम्मद (peace be upon him)ला जे शेवटचे संदेश वाहक होते, इब्राहीम अ. यांच्या श्रध्देच्या रस्त्यावर चालण्यास सांगितले….

आज जेव्हा पूर्ण जगातून, लाखो मनुष्य “काबा” ला जातात, ते तिच प्रार्थना म्हणतात, जी मुहम्मद (peace be upon him) ने शिकविली आहे.. आणि तवाफ (“काबा” ला सात चक्कर मारणे) करतात…अशाप्रकारे “इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. यांची अल्लाहच्या इच्छेशी अधीनता ” याची आठवण करणे, लोकांनी चालू ठेवले आहे..

काबा च्या समोर एक स्थान आहे… “मुकाम ए इब्राहीम”, जेथे  दगडावर इब्राहीम अ. यांच्या पायाचे निशाण दिसतात..हे लोकांकडून शतकांपासून संरक्षित केले गेले आहे…येथे प्रत्येक मनुष्य अल्लाहला एक खास प्रार्थना म्हणतो….आणि अल्लाहच्या प्रिय संदेशवाहकाला ज्याने “काबा” बांधला त्याला “दुआ” देतात…


इब्राहीम अ. हाजराला वाळवंटात सोडून सारा कडे आले… सारा नाराज होती..तिला स्वतःचे मूल नव्हते म्हणून…
काही वर्षांनंतर अल्लाहने इब्राहीम अ. कडे, फरिश्ते(स्वर्गदूत,angel)  पाठविले…त्यांना हे सांगण्यासाठी की, एक चांगली बातमी आहे की, त्यांना अजून एक मुलगा होईल…हे फरिश्ते मनुष्याच्या रुपात आले होते…इब्राहीम अ. यांना आशिर्वादासह शुभेच्छा देण्यासाठी आले होते…
इब्राहीम अ. यांनी, त्यांच्या शुभेच्छा वापस केल्या.. फरिश्ते नम्रतेने त्याला म्हणाले, “आम्ही तुझ्यासाठी चांगली बातमी आणली आहे ..एक हुशार आणि बुध्दीमान मुलाविषयी…”इसाक ” आणि त्यानंतर त्याच्या पुढची पिढी… याकूब (इस्राइल)… ही अल्लाहची इच्छा आहे की तुला सारा पासून एक मुलगा होईल…

इब्राहीम अ. यांची पत्नी सारा तेथे उभी होती. ती खूप आश्चर्य चकित झाली…आणि तिने विचारले, “पण हे कसे शक्य आहे? मी एक वृद्ध स्त्री आहे आणि माझे पती ही खूप वृद्ध आहेत…आम्हाला मूल कसे होऊ शकते?”…

फरिश्ते उत्तरले ,”अल्लाहच्या इच्छेवर तुम्ही आश्चर्य करत आहात का?अल्लाह निश्चितच सर्वात मोठा आहे आणि जे काही तो इच्छा करतो, ते तो करू शकतो… तुमच्यावर त्याचे आशीर्वाद असो… आशा सोडू नका…”

“नाही, मी आशा सोडणार नाही..जे लोक श्रद्धा करत नाहीत, ते आशा सोडतात…” इब्राहीम अ. म्हंटले..

अशा प्रकारे अल्लाहने वचन दिल्याप्रमाणे सारा ला एक मुलगा झाला…इसाक…जो मोठा झाल्यावर एक संदेशवाहक बनला…आणि त्यानंतर त्याचा मुलगा याकूब (इस्राइल) अ. आणि मग त्याचा मुलगा युसुफ अ.…ही संदेशवाहक बनले…
अशाप्रकारे इब्राहीम अ. यांनी, जी प्रार्थना केली होती की, त्यांना चांगले आणि सद्गुणी मुले आणि वंशज होऊ दे…ती अल्लाहने पूर्ण केली…त्याचे दोन्ही मुले इस्माईल आणि इसाक आणि त्यांचे वंशज ही संदेशवाहक बनले…त्यामुळे इब्राहीमला “संदेश वाहकांचा पिता” म्हंटले जाते…

एक दिवस उत्सुकतेने इब्राहीम अ. यांनी अल्लाहला विचारून, त्यांना दाखविण्यास सांगितले की अल्लाह,”न्याय करण्याच्या दिवशी” मृत झालेल्यांना जिवंत कसे करेल?
अल्लाहने विचारले,” इब्राहीम, तुला  विश्वास नाही का?”

“मला खरंच विश्वास आहे…”…इब्राहीम अ. म्हणाले,” पण मला स्वतःला संतुष्ट करण्यासाठी ते पहायचे आहे”…

अल्लाहने मान्य केले…
अल्लाहने इब्राहीम अ. यांना चार पक्षी पाळण्यास सांगितले…त्यांचे आहुती देऊन, वेगवेगळे भाग (तुकडे) करण्यास सांगितले…आणि ते भाग (हिस्से) चार डोंगरावर एकमेकांपासून दूर दूर फेकण्यास सांगितले…

मग इब्राहीम अ. यांना, त्या पक्ष्यांना हाक मारण्यास सांगितली…सगळे पक्षी त्यांच्याकडे…त्यांच्या पूर्ण शरीरात वापस आले…
अल्लाहने हा चमत्कार इब्राहीम अ. यांना, त्यांच्यासाठी आणि सर्व मनुष्यांच्यासाठी  दाखविला, जेणेकरून प्रत्येक जण समजू शकेल की, जो एक वेळेस जीवन देऊ शकतो..पुन्हा एकदा “न्याय देण्याच्या दिवशी” जीवन देऊ शकतो…

ही कथा कुराण मध्ये दुसऱ्या धड्यात, “सुरे बकरा” मध्ये  वर्णन केलेली आहे…


08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...