रविवार, ५ डिसेंबर, २०२१

आदम अलैहिस्सलाम आणि एक अहंकारी

✔️📗2:30 ३०. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने फरिश्त्यांना फर्माविले की मी धरतीवर एक खलीफा (असा समूह जो एकमेकांनंतर येईल) बनवीत आहे. तेव्हा (फरिश्ते) म्हणाले, काय तू धरतीवर अशा लोकांना निर्माण करशील, जे तिच्यावर फसाद आणि रक्तपात करतील आणि आम्ही तुझ्या स्तुती-प्रशंसेसह तुझे गुणगान आणि तुझी पवित्रता वर्णन करतो. त्याने फर्माविले, जे मी जाणतो तुम्ही नाही जाणत. 

2:31 ३१. आणि त्या (अल्लाह) ने आदमला सर्व नावे शिकवून त्या चीज वस्तूंना फरिश्त्यांसमोर प्रस्तुत केले आणि फर्माविले, तुम्ही सच्चे असाल तर या चीज वस्तुंची नावे सांगा.  

2:32 ३२. फरिश्ते म्हणाले, हे अल्लाह! तू तर पवित्र (दोष- व्यंग नसलेला) आहे. आम्हाला तर तेवढेच ज्ञान आहे, जेवढे तू आम्हाला शिकविले आहे परिपूर्ण ज्ञान आणि बुद्धी कुशलता राखणारा केवळ तूच आहे. 

2:33 ३३. सर्वश्रेष्ठ अल्लाहने आदमला फर्माविले, तुम्ही यांची नावे सांगा. जेव्हा त्यांनी ती नावे सांगितली तेव्हा फर्माविले, काय मी तुम्हाला सांगितले नव्हते की मी आकाशांच्या आणि धरतीच्या अदृश्य गोष्टी जाणतो आणि जे तुम्ही करता किंवा लपविता तेही जाणतो. 

2:34 ३४. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना फर्माविले की आदमला सजदा करा. तेव्हा इब्लीसशिवाय सर्वांनी सजदा केला. त्याने इन्कार केला आणि घमेंड दाखविली  आणि तो काफिरां (इन्कारी लोकां) पैकीच होता. 

2:35 ३५. आणि आम्ही फर्माविले हे आदम! तुम्ही आणि तुमची पत्नी जन्नतमध्ये राहा आणि जिथून इच्छा होईल तिथून वाटेल तेवढे खा व प्या. परंतु या झाडाच्या जवळ जाऊ नका, अन्यथा अत्याचारी ठराल. 

2:36 ३६. परंतु सैताानाने त्यांना बहकवून तिथून बाहेर घालविलेच आणि आम्ही सांगून टाकले की उतरा येथून (जा, चालते व्हा), तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात आणि एक ठराविक वेळेपर्यंत तुम्हाला धरतीवर राहायचे आणि लाभ घ्यायचे आहे. 

 2:37 ३७. आदमने आपल्या पालनकर्त्याकडून काही वचने शिकून घेतली (आणि अल्लाहजवळ क्षमायाचना केली). अल्लाहने त्यांची तौबा (क्षमायाचना) कबूल केली. निःसंशय तोच तौबा कबूल करणारा, दया करणारा आहे. 

 2:38 ३८. आम्ही फर्माविले, तुम्ही सर्व येथून उतरा, मग जर तुमच्याजवळ माझ्याकडून मार्गदर्शन आले तर जो कोणी माझ्या उचित मार्गाचा स्वीकार करील त्यांच्यावर कसलेही भय राहणार नाही, ना ते दुःखी होतील. 

 2:39 ३९. आणि जे कुप्र (इन्कार) आणि असत्याद्वारे आमच्या आयतींना खोटे ठरवतील ते जहन्नममध्ये राहणारे आहेत. नेहमी त्यातच राहतील.
(Qur'an 2:30-39)
==================================

 4:1 १. हे लोकांनो! आपल्या त्या पालनकर्त्याचे भय राखा, ज्याने तुम्हाला एकाच जीवापासून निर्माण केले आणि त्याच्यापासूनच त्याच्या पत्नीलाही निर्माण केले, आणि त्या दोघांपासून अनेक स्त्री-पुरुष पसरविले आणि त्या अल्लाहचे भय राखा, ज्याच्या नावाने तुम्ही एकमेकांकडे याचना करतात आणि नाते-संबंध तोडण्यापासूनही (स्वतःला वाचवा) निःसंशय, अल्लाह तुम्हा सर्वांची देखरेख करणारा आहे. 
(Qur'an 4:1)
==================================

✔️📗7:11 ११. आणि आम्ही तुम्हाला निर्माण केले, मग तुमचे रूप घडविले, मग आम्ही फरिश्त्यांना फर्माविले की आदमला सजदा करा, तेव्हा इब्लिसला सोडून सर्वांनी सजदा केला कारण तो सजदा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही. 

 7:12 १२. (अल्लाहने) फर्माविले, जेव्हा मी तुला सजदा करण्याचा आदेश दिला, तेव्हा कोणत्या कारणाने तुला सजदा करण्यापासून रोखले. तो म्हणाला, मी याच्यापेक्षा अधिक चांगला आहे. तू मला आगीपासून निर्माण केले आणि याला मातीपासून निर्माण केले आहे. 

 7:13 १३. (अल्लाहने) आदेश दिला की तू आकाशातून खाली उतर, आकाशात राहून घमेंड करण्याचा तुला काहीच हक्क नाही. तेव्हा चल निघ. निःसंशय तू धिःक्कारलेल्यांपैकी आहेस. 

 7:14 १४. (सैतान) म्हणाला, मला (कयामतपर्यंत) संधी प्रदान कर, जेव्हा लोक दुसऱ्यांदा जिवंत केले जातील. 

 7:15 १५. (अल्लाहने) फर्माविले, तुला ती संधी प्रदान केली गेली. 

 7:16 १६. (सैतान) म्हणाला, तू मला धिःक्कारल्यामुळे मी त्यांच्यासाठी तुझ्या सरळ मार्गावर बसेन. 

 7:17 १७. मग त्यांच्या समोरून आणि पाठीमागून आणि उजव्या व डाव्या बाजूने हल्ला करीन आणि तुला यांच्यात अधिकांश लोक कृतज्ञशील आढळणार नाहीत.  

 7:18 १८. (अल्लाहने) फर्माविले, तू यापासून (येथून) अपमानित होऊन निघून जा जे त्यांच्यापैकी तुझ्या मार्गावर चालतील तर मी तुम्हा सर्वांनी जहन्नमला भरून टाकीन. 

 7:19 १९. आणि (आम्ही फर्माविले की) हे आदम! तुम्ही आणि तुमची पत्नी जन्नतमध्ये राहा, मग जिथून इच्छा होईल तिथून खा, आणि त्या झाडाच्या जवळ जाऊ नका अन्यथा अत्याचारी ठराल. 

 7:20 २०. मग सैतानाने दोघांच्या मनात कुविचार निर्माण केला, यासाठी की दोघांच्या वर त्यांची लज्जास्थाने उघड करावीत आणि सांगितले की तुम्हा दोघांच्या पालनकर्त्याने तुम्हाला या झाडापासून अशासाठी रोखले आहे की तुम्ही दोघे फरिश्ते व्हाल किंवा सदैवकाळ राहणारे व्हाल. 

 7:21 २१. त्याने (सैतानाने) त्या दोघांच्या समोर शपथ घेतली की, मी तुम्हा दोघांचा शुभचिंतक आहे. 

 7:22 २२. अशा प्रकारे धोकेबाजीने दोघांना खाली आणले, मग त्या दोघांनी झाडाचा स्वाद घेताच, दोघांवर त्यांची गुप्तांगे उघड झाली आणि ते आपल्यावर जन्नतची पाने चिकटवू लागले, आणि त्यांच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने दोघांना पुकारले की काय मी तुम्हा दोघांना या झाडापासून रोखले नव्हते? आणि तुम्हाला सांगितले नव्हते की सैतान तुमचा खुला शत्रू आहे. 

 7:23 २३. दोघे म्हणाले, हे आमच्या पालनकर्त्या! आम्ही स्वतःवर जुलून करून घेतला आणि जर तू आम्हाला माफ केले नाही आणि आमच्यावर दया केली नाही तर आम्ही नुकसान उचलणाऱ्यांपैकी होऊ. 

 7:24 २४. (अल्लाहने) फर्माविले, तुम्ही खाली उतरा. तुम्ही आपसात वैरी आहात आणि तुम्हाला एक अवधीपर्यंत धरतीत राहावयाचे आणि लाभ प्राप्त करून घ्यायचे आहे. 

7:25 २५. फर्माविले की तुम्ही त्यातच जीवन व्यतीत कराल आणि त्यातच मरण पावाल आणि त्यातूनच बाहेर काढले जाल. 

7:26 २६. हे आदमच्या पुत्रांनो! आम्ही तुम्हाला असे वस्त्र प्रदान केले जे तुमच्या लज्जास्थानांना झाकेल आणि शोभा देईल आणि सर्वांत उत्तम वस्त्र, अल्लाहच्या भयाचे वस्त्र आहे. ही अल्लाहची निशाणी आहे यासाठी की यांनी स्मरण राखावे. 

 7:27 २७. हे आदमच्या पुत्रांनो! तुम्हाला सैतानाने बहकवून न द्यावे, जसे तुमच्या माता-पित्याला जन्नतमधून बाहेर घालिवले. त्याने त्यांचे वस्त्र उतरवून दिले, यासाठी की त्यांना त्यांची गुप्तांगे दाखवावीत. निःसंशय तो आणि त्याचे जातीबांधव तुम्हाला अशा ठिकाणाहून पाहतात की तुम्ही त्यांना पाहू शकत नाही. आम्ही सैतानांना अशा लोकांचे मित्र बनविले, जे ईमान (विश्वास) राखत नाही.
(Qur'an 7:11-27)
==================================

 ✔️📗7:189 १८९. तो (अल्लाह) असा आहे की ज्याने तुम्हाला फक्त एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच्याद्वारे त्याची जोडी बनवली, यासाठी की त्याने आपल्या त्या जोडीदारापासून सुख चैन प्राप्त करावी, मग पतीने पत्नीशी जवळीक केली, तेव्हा तिला गर्भ राहिला हलकासा, मग ती त्याला घेऊन चालत फिरत राहिली. जेव्हा तिला भार जाणवू लागला, तेव्हा पती-पत्नी दोघे अल्लाहशी, जो त्यांचा स्वामी आहे, दुआ (प्रार्थना) करू लागले की जर तू आम्हाला सहीसलामत (व्यवस्थित स्वरूपात) संतान प्रदान केली तर आम्ही खूप खूप आभार मानू. (Qur'an 7:189)
==================================

✔️📗15:28 २८. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने फरिश्त्यांना फर्माविले की मी एक मानव, काळ्या सडलेल्या, खनकणाऱ्या मातीपासून निर्माण करणार आहे. 

15:29 २९. तर जेव्हा मी त्याला पूर्ण बनवून घेईन आणि त्यात आपला आत्मा फुंकेन तेव्हा तुम्ही सर्व त्याला सजदा करा (त्याच्यापुढे माथा टेका) 

15:30 ३०. यास्तव सर्वच्या सर्व फरिश्त्यांनी आपला माथा टेकला. 

15:31 ३१. परंतु इब्लिसने सजदा करणाऱ्यांमध्ये सामील होण्यास इन्कार केला. 

15:32 ३२. (अल्लाहने) फर्माविले, हे इब्लिस! तुला झाले तरी काय की तू सजदा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही? 

15:33 ३३. तो म्हणाला, मी असा नाही की या मानवाला सजदा करावा, ज्याला तू काळ्या आणि सडलेल्या खणखणणाऱ्या मातीपासून निर्माण केले आहे. 

15:34 ३४. (अल्लाहने) फर्माविले, आता तू जन्नतमधून चालता हो कारण तू धिःक्कारलेला आहेस. 

15:35 ३५. आणि तुझ्यावर कयामतच्या दिवसापर्यंत माझ्यातर्फे धिःक्कार आहे. 

15:36 ३६. तो म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! मला त्या दिवसापर्यंत संधी प्रदान कर की लोकांना दुसऱ्यांदा (जिवंत करून) उठविले जाईल. 

15:37 ३७. फर्माविले, (ठीक आहे) तू त्यांच्यापैकी आहेस, ज्यांना संधी दिली गेली आहे. 

15:38 ३८. ठरलेल्या दिवसाच्या वेळेपर्यंतची. 

15:39 ३९. (सैतान) म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! तू मला मार्गभ्रष्ट केलेस तर मीदेखील शपथ घेतो की मी सुद्धा धरतीत त्यांच्यासाठी मोह माया निर्माण करीन आणि त्या सर्वांना बहकवून मार्गभ्रष्ट करीन. 

15:40 ४०. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, ज्यांना तू निवडून घेतले आहे. 

15:41 ४१. फर्माविले, हो. हाच माझ्यापर्यंत पोहचण्याचा सरळ मार्ग आहे. 
(Qur'an 15:28-41)
==================================

✔️📗17:61 ६१. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना आदेश दिला की आदमला सजदा करा, तेव्हा इब्लिसखेरीज सर्वांनी सजदा केला. तो म्हणाला, काय मी त्याला सजदा करू, ज्याला तू मातीपासून बनविले आहे. 

17:62 ६२. ठीक आहे, पण पाहा तू त्याला माझ्यावर श्रेष्ठता तर प्रदान केली आहे, परंतु जर तू मला कयामतपर्यंत संधी देशील तर मी याच्या संततीला, फार कमी लोकांशिवाय आपल्या काबूत करेन. 

17:63 ६३. (अल्लाहने) आदेश दिला, जा, त्यांच्यापैकी जो कोणी तुझा अनुयायी होईल तर तुम्हा सर्वांची शिक्षा जहन्नम आहे, जो पुरेपूर मोबदला आहे. 

17:64 ६४. त्यांच्यापैकी तू ज्याला देखील आपल्या बोलण्याने बहकवू शकशील बहकव आणि त्यांच्यावर आपले स्वार आणि प्यादे चढवून आण, आणि त्यांच्या धन आणि संततीमधून आपलाही हिस्सा लाव, आणि त्यांना (खोटे) वचन दे. त्यांच्याशी जेवढी देखील वचने (वायदे) सैतानाचे असतात, सर्वच्या सर्व पूर्ण दगाबाजी आहे. 

17:65 ६५. माझ्या सच्चा दासांवर तुझा कोणताही प्रभाव आणि काबू नाही आणि तुमचा पालनकर्ता मोठा काम बनविणारा पुरेसा आहे. 
(Qur'an 17:61-65)
==================================

✔️📗18:50 ५०. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना आदेश दिला की आदमच्या पुढे सजदा करा, तेव्हा इब्लिस (सैताना) खेरीज सर्वांनी सजदा केला तो जिन्नांपैकी होता. त्याने आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाची अवज्ञा केली. काय तरीही तुम्ही त्याला आणि त्याच्या संततीला, मला सोडून आपला मित्र बनवित आहात? वास्तविक तो तुम्हा सर्वांचा शत्रू आहे. अशा जुलमी लोकांचा किती वाईट मोबदला आहे.
(Qur'an 18:50)
==================================

✔️📗20:115 ११५. आणि आम्ही आदमला अगोदरच ताकीदपूर्ण आदेश दिला होता, परंतु त्यांना त्याचा विसर पडला आणि आम्हाला त्यांच्यात कोणताही दृढनिश्चय आढळला नाही. 

20:116 ११६. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना सांगितले की आदमला सजदा करा तेव्हा इब्लिसखेरीज सर्वांनी सजदा केला, त्याने साफ इन्कार केला. 

20:117 ११७. तेव्हा आम्ही सांगितले, हे आदम! हा तुमचा आणि तुमच्या पत्नीचा शत्रु आहे (लक्षात ठेवा) असे न व्हावे की त्याने तुम्हा दोघांना जन्नतमधून बाहेर घालवावे, ज्यामुळे तुम्ही संकटात सापडावे. 

20:118 ११८. इथे तर तुम्हाला ही सवलत आहे की ना तुम्ही उपाशी राहता, ना नग्न. 

20:119 ११९. आणि इथे ना तुम्ही तहानलेले राहता, ना उन्हाने त्रस्त राहता. 

20:120 १२०. परंतु सैतानाने आदमच्या मनात कुविचार टाकला, म्हणाला, हे आदम! काय मी तुम्हाला चिरस्थायी जीवनाचा वृक्ष आणि त्या राज्यसत्तेची खबर देऊ जी कधीही जुनी न व्हावी. 

20:121 १२१. यास्तव त्या दोघांनी त्या झाडातून काही खाल्ले, मग त्यांची गुप्तांगे उघडी झालीत आणि ते जन्नतची पाने आपल्या अंगावर चिकटवू लागले. आदमने आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली आणि बहकले. 

20:122 १२२. मग त्यांच्या पालनकर्त्याने त्यांना उपकृत केले, आदमची तौबा कबूल केली आणि त्यांचे मार्गदर्शन केले. 

20:123 १२३. (अल्लाहने) फर्माविले, तुम्ही दोघेही इथून खाली उतरा. तुम्ही आपसात एकमेकांचे शत्रू आहात. आता तुमच्याजवळ जेव्हा कधीही माझ्याकडून मार्गदर्शन पोहचेल, तर जो कोणी माझ्या मार्गदर्शनाचे पालन करील तर तो न बहकेल, ना कष्ट- यातनाग्रस्त होईल.

20:124 १२४. आणि जो कोणी माझ्या स्मरणापासून तोंड फिरविल, त्याचे जीवन तंगी- अडचणीचे राहील आणि कयामतच्या दिवशी आम्ही त्याला आंधळा करून उठवू. 

20:125 १२५. (तो) म्हणेल, हे पालनकर्त्या! मला तू आंधळा बनवून का उठविले? वास्तविक मी चांगले बघू शकत होतो. 

20:126 १२६. उत्तर मिळेल, असेच व्हायला पाहिजे होते. तू माझ्या (तर्फे) आलेल्या आयातींचा विसर पाडला, तद्‌वतच आज तुझाही विसर पाडला जात आहे. 

20:127 १२७. आणि आम्ही असाच मोबदला प्रत्येक माणसाला देत असतो, जो मर्यादेचे उल्लंघन करील आणि आपल्या पालनकर्त्याच्या आयतींवर ईमान न राखेल आणि निःसंशय आखिरत (मरणोत्तर जीवना) चा अज़ाब मोठा सक्त आणि चिरस्थायी आहे. 
(Qur'an 20:115-127)
==================================

✔️📗38:71 ७१. जेव्हा तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने फरिश्त्यांना सांगितले, मी मातीपासून मानवाला निर्माण करणार आहे. 

38:72 ७२. तर जेव्हा मी त्याला यथायोग्य करीन आणि त्याच्यात आपला आत्मा फुंकीन, तेव्हा तुम्ही सर्व त्याच्यासमोर सजदा करा (माथा टेका) 

38:73 ७३. तेव्हा सर्व फरिश्त्यांनी सजदा केला.

38:74 ७४. परंतु इब्लिसने (केला नाही) त्याने घमेंड केली आणि तो इन्कार करणाऱ्यांपैकी होता. 

38:75 ७५. (अल्लाहने) फर्माविले की हे इब्लिस! त्याला (आदमला) सजदा करण्यापासून तुला कोणत्या गोष्टीने रोखले, ज्याला मी आपल्या हातांनी बनविले, काय तू गर्विष्ठ झाला आहेस की तू उच्च दर्जा राखणाऱ्यांपैकी आहेस? 

38:76 ७६. (त्याने) उत्तर दिले की मी याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, तू मला आगीपासून निर्माण केले आणि याला मातीपासून निर्माण केले. 

38:77 ७७. फर्माविले की तू येथून निघून जा, तू तिरस्कृत (धिःक्कारित) झाला. 

38:78 ७८. आणि कयामतच्या दिवसापर्यंत तुझा माझ्यातर्फे धिःक्कार आहे. 

38:79 ७९. तो म्हणाला, हे माझ्या स्वामी! मला त्या दिवसापर्यंत सवड प्रदान कर, जेव्हा लोक (जिवंत करून) उठविले जातील. 

38:80 ८०. (अल्लाहने) फर्माविले, तू सवड दिल्या जाणाऱ्यांपैकी आहेस. 

38:81 ८१. निर्धारित वेळेच्या दिवसापर्यंत . 

38:82 ८२. म्हणाला, मग तर तुझ्या प्रतिष्ठेची शपथ! मी या सर्वांना अवश्य भटकवीन. 

38:83 ८३. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, जे निवडक (आणि प्रिय, पवित्र) असतील. 

38:84 ८४. फर्माविले, सत्य हेच आहे आणि मी सत्यच सांगत असतो.

38:85 ८५. की मी तुझ्याद्वारे आणि तुझ्या सर्व अनुयायींद्वारे जहन्नमला भरून टाकेन. 
(Qur'an 38:71-85)
==================================
अनुवाद-  — Muhammad Shafi’i Ansari 

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

जिब्राईल (Alaihissalam), प्रेषित मुहम्मद (Sallallahu Alaihi Wassallam) शी बोलले ?

[सौजन्य -वरील वेबसाईट वरून गुगल ट्रान्सलेटर च्या मदतीने भाषांतर मराठीत भाषांतर करण्याचा प्रयत्न. अधिक वाचण्यासाठी वर दिलेल्या लिंकवर दाबून वाचा.]

प्रश्न - कोणता पुरावा आहे की, जिब्राईल (Alaihissalam), 
प्रेषित मुहम्मद (Sallallahu Alaihi Wassallam) शी बोलले ?

अल्लाहची स्तुती असो. 

निःसंशय, जिबराईल (Alaihissalam) यांनी, दोघांच्यामध्ये कोणताही अडथळा आणि पडदा न राहता, प्रेषित मुहम्मद (Sallallahu Alaihi Wassallam) यांच्याशी थेट संवाद साधला, आणि प्रेषित मुहम्मद (Sallallahu Alaihi Wassallam) यांनी त्यांना त्यांच्या खऱ्या स्वरूपात पाहिले. 
ही वस्तुस्थिती  "क़ुरआन" च्या  अनेक आयत (कुरआनचे श्लोक) आणि "अहदीस" म्हणजेच प्रेषित मुहम्मद (Sallallahu Alaihi Wassallam) यांनी सांगितलेल्या आणि कृती केलेल्या गोष्टींच्या अहवाला मध्ये नोंदवली गेली आहे.

1. अल्लाह म्हणतो.

"शपथ आहे नक्षत्राची जेव्हा तो अस्तंगत झाला,
तुमचा मित्र भटकलेला नाही की बहकलेलाही नाही.
तो आपल्या इच्छेने बोलत नाही,

हा तर एक दिव्यबोध आहे जो त्याच्यावर अवतरला जातो.

त्याला जबरदस्त बलशालीने शिकविले आहे.
जो मोठा विवेकशील आहे. तो समोर येऊन उभा राहिला

जेव्हा तो वरील क्षितिजावर होता,

मग जवळ आला आणि वर अधांतरी झाला,

येथपावेतो की दोन धनुष्याइतके किंवा त्याहून काही कमी अंतर उरले.

तेव्हा त्याने अल्लाहच्या दासाला दिव्यबोध पोचविले जे काही दिव्यबोध त्याला पोहोचवायचे होते.

दृष्टिने जे काही पाहिले, मनाने त्यात असत्य मिसळले नाही.

आता काय तुम्ही त्या गोष्टीवर त्याच्याशी भांडता ज्याला तो डोळ्यांनी पाहतो?"

(क़ुरआन 53:1-12)

 कुरआनवरील भाष्यकार यांनी असे म्हटले आहे की “एका सामर्थ्यशाली” चा अर्थ जिब्राईल    (Alaihissalam) आहे, ज्याने मुहम्मद (Sallallahu Alaihi Wassallam) यांना प्रकटीकरण शिकवले. प्रकटीकरण असे झाले की,  जिब्राईल (Alaihissalam) थेट, मुहम्मद (अल्लाहचे शांती आणि आशीर्वाद) यांच्याशी बोलले. हे दर्शविणाऱ्या खालील आयत आहेत. 

"ही सर्व जगांच्या पालनकर्त्याकडून अवतरलेली वस्तू आहे.

ही घेऊन तुझ्या हृदयावर विश्वसनीय आत्मा उतरला आहे

जेणेकरून तू त्या लोकांत सामील व्हावेस जे (ईश्वराकडून त्याच्या निर्मितीस) सावध करणारे आहेत.

अगदी स्पष्ट अरबी भाषेत"

(क़ुरआन 26:192-195)

"त्याना सांग कि जो कुणी जिबरीलशी वैर करतो त्याला हे समजावयास हवे कि जिबरीलने अल्लाहच्या आज्ञेनेच हा कुरआन तुझ्या हृदयावर अवतरला आहे. जो अगोदर आलेल्या ग्रंथाचे समर्थन करीत आहे. आणि ईमानधारकांसाठी मार्गदर्शन व यशाची शुभवार्ता घेऊन आलेला आहे."
(क़ुरआन 2:97)


2. पहिले प्रकटीकरण, जसे की सर्वज्ञात आहे, जेव्हा प्रेषित (Sallallahu Alaihi Wassallam) "हिरा" च्या गुहेत एकांतात होते. जिब्राईल  (Alaihissalam) त्यांच्याकडे आले आणि त्यांना वाचण्याची आज्ञा दिली. 

आयेशा (आस्तिकांची आई) (Rajiallahu Anhu) यांनी वर्णन केले आहे की,

“अल्लाहचे मेसेंजर (Sallallahu Alaihi Wassallam) यांच्याकडे आलेले सर्व प्रथम "वही" (प्रकटीकरण) येणे, हे चांगले खरे स्वप्न पाहण्याच्या स्वरूपात होते; त्यांनी जे काही स्वप्न पाहिले, ते सकाळच्या शुभ्रते सारखे खरे (प्रकट) होत होते. 
मग त्यांना एकांताचे प्रेम बहाल केले गेले. ते "हिरा" च्या गुहेत एकांतात जायचे ’जिथे ते अनेक रात्री सतत अल्लाहची उपासना करत असत, तोपर्यंत ते तिथे असत, जोपर्यंत, अधिक तरतूद (अन्नसामग्री) गोळा करण्यासाठी त्यांना, आपल्या कुटुंबाला भेट देण्यासाठी जावे लागण्याची आवश्यकता भासत नसे. ते खादीजा (Rajiallahu Anhu) कडे परत जायचे, आणि त्यांच्यासोबत नेण्यासाठी अशाच प्रकारच्या रात्रीसाठी तरतूद (अन्नसामग्री ची व्यवस्था) करायचे. (हे असेच चालू होते) की, "सत्य" त्यांच्यापर्यंत आले तेव्हा, ते "हिरा"च्या गुहेत होते. 

ईशदूत त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, "वाचा!" 

ते म्हणाले, "मला वाचता येत नाही." 

ते [प्रेषित (Sallallahu Alaihi Wassallam)] म्हणाले: "त्याने मला मिठी मारली आणि मला इतक्या जोरात दाबले की, माझी शक्ती संपली, मग त्याने मला सोडले आणि म्हणाला, "वाचा!" 
मी म्हणालो, "मला वाचता येत नाही." 
'मग त्याने मला दुसऱ्यांदा मिठी मारली आणि मला इतके जोराने दाबले की, मी पूर्णपणे थकून गेलो, मग त्याने मला सोडले आणि म्हणाला, "वाचा!" 
मी म्हणालो, "मला वाचता येत नाही." 
'मग त्याने मला तिसऱ्यांदा मिठी मारली आणि मला इतके जोराने दाबले की, माझी सहनशक्ती संपली, मग त्याने मला सोडले आणि म्हणाला," वाचा !"

वाचा, (हे पैगंबर (स.)) आपल्या पालनकर्त्याच्या नामासहित ज्याने

निर्माण केले, गोठलेल्या रक्ताच्या एका गुठळीपासून मानवाची निर्मिती केली.

वाचा, आणि तुमचा पालनकर्ता मोठा उदार आहे,
ज्याने लेखणीद्वारे ज्ञान शिकविले,

मानवाला ते ज्ञान दिले जे तो जाणत नव्हता.

(क़ुरआन  96: 1-5) 

मग अल्लाहचे दूत (Sallallahu Alaihi Wassallam) (प्रकटीकरण) घेऊन परत आले आणि त्यांचे हृदय धडधडत होते. ” 

(सहीह बुखारी 3; मुसलमान, 231)

4. आयेशा (Rajiallahu Anhu) यांनी असे सांगितले  की, अल-हारिस बिन हिशाम ने प्रेषित (Sallallahu Alaihi Wassallam) यांना विचारले, "हे अल्लाहचे मेसेंजर अल्लाह, प्रकटीकरण तुमच्याकडे कसे येते? ” 

मेसेंजर (Sallallahu Alaihi Wassallam) म्हणाले: “कधीकधी माझ्याकडे घंटा वाजवण्यासारखे येते, जे सर्वांत कठीण आहे, नंतर, त्यांनी जे काही सांगितले, ते मला समजल्यानंतर ही स्थिती समाप्त होते आणि कधीकधी ईशदूत माझ्याकडे माणसाच्या रूपात येतो आणि माझ्याशी बोलतो आणि तो काय म्हणतो ते मी लक्षात ठेवतो”
(सहीह बुखारी 2).

4. जिब्राईल (Alaihissalam)  बद्दल एक मोठी हदीस, 
जेव्हा ते एक परदेशी माणूस, एक अनोळखी व्यक्ती बनले आणि प्रेषित (Sallallahu Alaihi Wassallam) सोबत बसले आणि त्यांना  इस्लाम, ईमान (विश्वास) आणि एहसान ( चांगुलपणा, परिपूर्णता) बद्दल विचारले. मेसेंजर (Sallallahu Alaihi Wassallam) यांनी जिब्राईल आहे हे जाणून, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. 
जेव्हा त्यांनी आपले प्रश्न विचारणे संपवले आणि ते निघून गेले, तेव्हा प्रेषित (Sallallahu alaihi wasallam) यांनी आपल्या सहाबींना सांगितले की, हे जिब्राईल (Alaihissalam) होते, जे त्यांना त्यांचा धर्म शिकवण्यासाठी आले  होते. 

 सहीह बुखारी 48, सहीह मुस्लिम, 9.


5. इस्रा आणि मेराज (मक्का पासून जेरुसलेम पर्यंत पैगंबरांचा रात्रीचा प्रवास आणि जेरुसलेमपासून सात आकाशात चढणे) बद्दल अहवाल. यामध्ये वर्णन केले गेले आहे की,
पैगंबर (Sallallahu Alaihi Wassallam) यांनी जिब्राईल ला प्रश्न विचारले आणि जिब्राईल यांनी त्यांना उत्तर दिले. 

सहीह बुखारी 2968, सहीह मुस्लिम 238, आणि इस्रा आणि मेराजची कथा सांगणारी अहदीस.

6.अनेक हदीस देखील आहेत ज्यात प्रेषित (Sallallahu Alaihi Wassallam) हे म्हणतात, "जिब्राईल (Alaihissalam) माझ्याकडे आले आणि म्हणाले ..." 

जसे एक वेळेस 

म्हणाले: “जिब्राईल  (Alaihissalam) माझ्याकडे आले आणि म्हणाले, 'तुमच्या उम्मा (अनुयायांमध्ये/ (राष्ट्रात) जो कोणी अल्लाहच्या समकक्ष कुणाला ठरवत नसेल आणि  तो मरण पावला तो स्वर्गात जाईल.
मी विचारले, "जर त्याने ' असे असे ' केले असेल तरी"
त्यांनी उत्तर दिले,  "होय. "

जेव्हा अल्लाहचे मेसेंजर (Sallallahu Alaihi Wassallam) खंदकच्या युद्धातून परत आले, तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या सहाबांनी शस्त्रे खाली ठेवली आणि स्नान करू लागले. जिब्राईल (Alaihissalam) त्यांच्याकडे आले, त्यांच्या डोक्यावर धूळ होती. म्हणाले की, “तुम्ही आपली शस्त्रे खाली ठेवली आहेत! अल्लाहची शपथ, मी माझे शस्त्र खाली ठेवले नाही.” 
अल्लाहचे मेसेंजर (Sallallahu Alaihi Wassallam) त्यांना म्हणाले, "कुठे जाणार आहात?" 
ते म्हणाले, "तिथे" - आणि बनी कुरैजाकडे निर्देश केला. म्हणून अल्लाहचे मेसेंजर (Sallallahu Alaihi Wassallam) त्यांच्या कडे [मोहीम पुन्हा सुरू करण्यासाठी] निघाले. 

(सहीह बुखारी 2602, सहीह मुस्लिम 3315) 

आणि आणखी, समान, पुरावे आहेत आणि अल्लाह उत्तम जाणतो.

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

ताबूत सकीना

🌐📗मृत्यू ला घाबरून पलायन

"बनी इस्राइलचे लोक", जे प्रोफेट मूसा अ. यांचे अनुयायी होते, इजिप्त (मिस्र) या देशाला सोडून, खूप लांब प्रवास करून, "सिना" या ठिकाणी पोहोचले.

हे ठिकाण, त्यांना ज्या त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीचे वचन दिले गेले होते, त्याच्याजवळच होते. [आधीचे "कानान" (canaan) फिलिस्तीन, palestine] 
मूसा अ. यांनी त्यांना म्हंटले की, त्यांच्या पूर्वजांच्या शहरात प्रवेश करण्यासाठी आणि त्यांची गेलेली जमीन आणि संपत्ती मागण्यासाठी, स्वतःला तयार करा,
मूसा अ. यांनी म्हंटले, की धैर्याने, आणि अल्लाह वरच्या कणखर निष्ठेने, जमिनीत प्रवेश करा. जर असे कराल तर, विजय त्यांचाच होईल, असे आश्वासन दिले…

त्यांनी शहरात प्रवेश करण्यास नकार दिला…मूसा अ. यांनी बारा माणसे निवडली आणि त्यांना त्या शहरातील स्थिती पाहून येण्यास पाठविले…

जेव्हा हे लोक वापस आले, दोन माणसे सोडून, बाकी सर्वांनी तेथील शत्रुंच्या सामर्थ्याविषयी, भयानक कहाण्या सांगितल्या. लोक अस्वस्थ झाले आणि अशा कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यास नकार दिला.

"आम्ही येथे बसू आणि वाट पाहू, मूसा. तू आणि तुझा अल्लाह जावू शकतो आणि शत्रूशी लढू शकतो", ते म्हणाले.

मूसा अ. काहीच मदत करू शकत नव्हते.
मूसा अ. त्यांच्या या वागण्याच्या पद्धतीवर नाराज आणि रागावलेले होते…त्यांनी त्याचे उरलेले आयुष्य, त्या लोकांना अल्लाहचा संदेश समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात खर्च केले… स्वतःची मदत कशी करायची आणि आळशी आणि भांडत राहणे, योग्य नाही, हे शिकवण्यात त्यांचे बाकी आयुष्य गेले.

🍂🏵️शिस्य🏵️🍂
मूसाच्या मृत्युनंतर त्यांचा मित्र आणि अनुयायी "शिस्य" याने, त्याचे कार्य पुढे चालू ठेवले…मूसा अ. यांनी आधी, जे काही सांगितले होते, ते उपदेश त्याने तसेच देने चालू ठेवले…आणि बनी इस्राइलच्या लोकांना, वापस येण्यास आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्यास खूप प्रेरीत केले…त्याने लढाई करण्यासाठी, त्या लोकांचे नेतृत्व केले…आणि त्यांना एका मागून एक खूप लढाया करावयास, त्यांचे नेतृत्व करत, घेऊन गेला…जोपर्यंत ते पुन्हा एकदा, त्यांच्या वचन दिलेल्या भूमीच्या दारात पोहोचत नाहीत…

शेवटचा विजय झाल्यावर, अल्लाह ने त्यांच्या संदेशवाहकाकडून, त्यांना आदेश दिला की, "शहरात विनम्रतेने, अल्लाहला वाकून आभार मानून एक प्रार्थना करत, प्रवेश करा."

त्यांनी या ऐवजी, फुशारकी मारत, त्यांचा विजय साजरा करत प्रवेश केला. त्यांनी, अल्लाहच्या कृपा आणि मदतीसाठी, ज्या अल्लाहने त्यांना, गुलामगिरीतून वाचवून, शांती आणि स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे त्यांना त्यांचे घर आणि जमीन वापस मिळाली, अल्लाहचे आभार मानत प्रार्थना केली नाही. त्यांनी, जे शब्द त्यांना प्रवेश करतांना बोलावयास सांगितले होते, ते अल्लाहचे शब्द बदलले आणि त्या शब्दांची थट्टा उडविली. हे त्यांच्या मर्यादापेक्षा अती झाले होते…अल्लाहने या कृतघ्न आणि अवज्ञाकारी लोकांना भयंकर दंड दिला…

💖हरझाकील💖
मूसा अ. यांचा दुसरा अनुयायी हरझाकील ने सुद्धा बनी इस्राइलच्या लोकांना, अल्लाहने दिलेल्या संदेशाच्या मार्गावर लढत राहण्यास वारंवार प्रेरित केले.

एकदा त्याने खूप अडचणीने आणि एक पूर्ण फौज जमा केली. तो शत्रूवर एक खास आक्रमण करण्याची योजना करून होता. तेव्हा हजारो लोकांनी त्याला एकटे सोडले. ते पळून गेले आणि मरणापासून सुटका करण्यासाठी, एका दरीत लपून बसले. हरझाकिल, या भित्रेपणा आणि त्याला एकटे सोडून जाण्याची कृतीवर, इतका निराश झाला आणि दुखावला की, त्याने अल्लाहला प्रार्थना केली, अल्लाहने त्या पळून गेलेल्या लोकांना कठोर शिक्षा केली.
त्याच दरीत जेथे त्यांनी आश्रय घेतला होता, त्यांच्यावर मृत्यू आला. ते मृत झाले, जेथे ते जिवंत राहण्यासाठी आले होते…
काही दिवसांनंतर जेव्हा हरझाकिल त्या दरीतून गेला आणि त्याने त्या युद्धातून पळून गेलेल्यांचे भाग्य (विधिलिखित) पाहिले, त्याला खूप वाईट वाटले. त्याने पुन्हा अल्लाहची प्रार्थना केली, या वेळेस दयेसाठी प्रार्थना केली आणि अल्लाहने, जो सर्वांत मोठा क्षमा करणारा आहे, त्यांना त्यांचे जीवन पुन्हा वापस दिले, की ते पुन्हा अल्लाहकडे वळतील आणि कृतज्ञ राहतील आणि असा गुन्हा, पुन्हा करणार नाही…

🌷शामोल (samuel)

शामोल हे एक पवित्र व्यक्ती होते. त्यांनीही "बनी इस्राइल" च्या लोकांचे , शत्रूविरूध्द मार्गदर्शन आणि नेतृत्व केले. अल्लाहने त्यांना संदेशवाहक बनविले.
जेव्हा शामोल वृद्ध झाले, बनी इस्राइल त्याला म्हणाले,

"आम्हाला वाटते तू आम्हाला एक राजा निश्चित करून द्यावा, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि लढाईत आमचे नेतृत्व करण्यासाठी"
शामोल त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून म्हणाला, की ते सर्व खूप ज्ञानी नाहीत पण त्यांनी आग्रह धरला…

❤️💚💕ताबूत सकीना
ताबूत सकीना म्हणजेच The ark of the Covenant.
यामध्ये (पेटीत) मूसा (अ) आणि आणखी दुसऱ्या प्रेषितांचे (संदेश वाहकांचे) काही पवित्र अवशेष आहेत. सध्या ती पेटी अज्ञात जागी आहे.

लढाई करता वेळेस, बनी इस्राइलचे लोक या पेटीला स्वतःच्या सैन्यासमोर समोर, पुढच्या रांगेत ठेवायचे…आणि अल्लाह, त्यांना त्या पेटीच्या उज्ज्वल भविष्यसूचकतेच्या गुणांमुळे, विजय देत असे…

त्या प्रेषितांच्या अवशेषामुळे, ज्या प्रेषितांनी, अल्लाहच्या इच्छेने लोकांसमोर संदेशवाहक म्हणून स्वतःला प्रस्तुत केले, पुढे न पाहिलेल्या मदतीचे आश्वासन मिळायचे….

"ताबूत सकीना" मध्ये अल्लाहने मूसा अ. यांना "तूर" पर्वतावर जो ग्रंथ दिला, तो, एका शुभदगडाच्या (scripture) दोन भागावर अंतर्लिखित आहे, त्यात मूसा अ. यांना दिलेला कायदा म्हणजे नीतिशास्त्र आणि आराधना अंतर्लिखित केला गेला आहे, ज्याला "टेन कमांडमेंटस" असे म्हणतात, जे "तोराह" या ग्रंथात आहे. आणि मूसा अ. यांची पवित्र काठी आहे…

हा "ताबूत सकीना", शुभ मानला जातो 

🌿🌿तलुत 🌿🌿

शामोल यांनी अल्लाह ला प्रार्थना केली आणि अल्लाहच्या आज्ञेने, बनी अमीनच्या जमातीतल्या "तलुत" ला, एक शक्तिशाली आणि देखण्या तरुण व्यक्तीला, त्यांचा शासक म्हणून नियुक्त केले…
बनी इस्राइलच्या लोकांना हे आवडले नाही कारण तलुत एक गरीब माणूस होता आणि तो त्यांच्या जमातितील नव्हता. त्यांनी त्याचा आदेश पाळण्यास नकार दिला.
शामोल यांनी, त्या लोकांना म्हंटले की, एक शासकाला त्याच्या कुटुंबावरून किंवा जन्मावरून नाही तर, वैयक्तिक गुणांवरून प्रशंसित करायला हवे. तलुत कडे एका चांगल्या राजाचे सर्व गुण आणि ज्ञान आहे, जे त्याला अल्लाह ने दिलेले आहे.

बनी इस्राइलच्या लोकांनी त्यांचा वाद चालू ठेवला. त्यांना काही तरी सत्याचा पुरावा पाहिजे होता की, तलुतला अल्लाह ने नियुक्त केले आहे.

शामोल यांनी त्यांना म्हंटले, की एक पुरावा म्हणून, ते "ताबूत सकीना" ची पेटी पुन्हा वापस मिळवतील. ज्यात मूसा अ. आणि हारून अ. यांचे अवशेष आहेत. जे ते गमावून बसले होते. ते म्हणाल की, फरिश्ते (स्वर्गदूत) त्या पेटीला वापस घेऊन येतील.

पॅलेस्टाईन (फिलिस्तिन) च्या लोकांनी ती पेटी असा विचार करून घेतली होती की, त्या पेटीला व्यवस्थित ठेवतील, हे त्यांच्यासाठी दुर्भाग्य ठरले. त्यांनी त्या पेटीपासून सुटका करण्याचा प्रयत्न केला. यासाठी ते दोन गायींच्या मागे गेले, ज्या त्यांना बनी इस्राइल च्या लोकांपर्यंत घेऊन आल्या आणि ते तेथे त्या पेटीला सोडून गेले.

त्यामुळे बनी इस्राइल च्या लोकांना त्यांची पेटी शाबूत वापस मिळाली. या पुरव्यानंतर त्यांना तलुत ला राजा म्हणून स्वीकार करावे लागले…

08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...