प्रेषित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेषित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २९ जून, २०२०

ईसा अ.

🌹🌴ईसा अ.🌴🌹
मरियम एका पवित्र वातावरणात मोठी झाली. सदाचारी लोकांत, ती एक खूप धार्मिक (ईश्वरनिष्ठ) मुलगी बनली. तिने तिचा जास्तीत जास्त वेळ तिच्या खोलीत प्रार्थना करण्यात खर्च केला आणि स्वतःला अल्लाहच्या सेवेसाठी अर्पण केले. तिची धर्म निष्ठा इतकी चांगली होती की, तिच्यापेक्षा मोठे लोकही तिचा सन्मान करायचे आणि तिच्याकडून प्रेरणा घ्यायचे.

तिची ईश्वर निष्ठा आणि पावित्र्य असाधारण होते. जे तिला ओळखत होते, त्या प्रत्येकाकडून तिने, तिची प्रतिष्ठा जिंकली होती.

एक दिवस जेव्हा मरियम तिच्या खोलीतून, एका वेगळ्या जागेत, जिथे पडदे टाकून आच्छादन केले होते, गेली तेव्हा तिने एक  व्यक्ती तिच्यासमोर उभा राहिलेला पाहिले. मरियम घाबरली होती. "कोण आहे तू?" तिने विचारले. "ईश्र्वरासाठी जवळ येऊ नकोस. मी अल्लाहचा आश्रय मागते तुझ्यापासून"

तो व्यक्ती उत्तरला, "घाबरु नको, मी अल्लाहचा दूत (स्वर्गदूत) आहे आणि अल्लाहकडून फक्त संदेश देणारा म्हणून  पाठविण्यात आलो आहे. तुला हे सांगण्यासाठी की, तुला एक पवित्र मुलगा होईल."

"पण जर मला कोणत्याही पुरुषाने स्पर्श केला नाही (मी विवाहित नाही), तर मला एक पुत्र कसा होईल. मी शील भ्रष्ट (वाईट स्त्री) नाही?", ती म्हणाली.

"ती अल्लाह (ईश्वर) ची इच्छा आहे. ते, त्याच्यासाठी खूप कठीण नाही. जेव्हा तो काही निर्माण करण्याची इच्छा करतो, म्हणतो, होऊन जा आणि ती होते. तुझा पुत्र, एक खूप पवित्र मुलगा असेल." असे म्हणून, स्वर्गदूत दिसेनासा झाला आणि मरियमला विस्मित (स्तंभित) करून गेला.

नंतर काही दिवसांनी, जेव्हा तिचा पुत्र जन्मायची वेळ जवळ आली, मरियम, लोकांपासून बाजूला, एका दूरच्या ठिकाणी गेली. तेथे एकटी, घाबरलेली आणि भुकेने आणि तहानेने अशक्त झालेल्या अवस्थेत, एका   झाडाच्या खाली झोपली आणि वेदनेने ओरडू लागली, "मी इच्छा करते, हे होण्याआधी मी मरून गेलेली असावी आणि सर्वजण मला विसरून गेलेले असावे."

एक सुखद आवाज तिच्याशी बोलला, "दुःखी होऊ नको मरियम. तुझ्या प्रभूने, एक पाण्याचा झरा तुझ्याखालून (जवळून), प्रदान (प्रवाहित) केला आहे आणि जर तू झाडाचे खोड हलवशील, तर पुष्कळ ताज्या आणि पिकलेल्या खजुरी तुझ्यावर पडतील. तू खा आणि पी आणि तुझ्या पुत्राला पाहून आनंद घे."

तिचा पुत्र ईसा (अ.), सर्व लोकांपासून दूर अशा जागी जन्मला. 

मरियम ने जरी, तिच्या लहान बाळाला कुशीत घेतले, तरी तिच्यात, त्या बाळाला घेऊन, तिच्या लोकांकडे जाण्याचे साहस नव्हते. ती त्यांच्या प्रश्नांची उत्तरे कशी देऊ शकेलं? ते काय म्हणतील? तिच्या बाळाचा जन्म, ती कसे समजावून सांगू शकेल? ती दयनीय अवस्थेत होती आणि काय करावे तिला समजत नव्हते. पण अल्लाहने (ईश्वराने) तिला दिलासा दिला. 

"लोकांना काहीही सांगू नको, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ नको, फक्त संकेत करून सांग की, तू उपवास करीत आहे आणि त्या दिवशी, काहीही न बोलण्याची शपथ घेतली आहे." तिला आदेश दिला गेला.

अल्लाह (ईश्वरा) च्या मदतीने बळकट होऊन, निरागस मरियमने तिच्या बाळाला उचलले आणि तिच्या लोकांकडे परत गेली. जेव्हा त्यांनी तिला, तिच्या हातात असलेल्या, एका बाळा सोबत येतांना पाहिले, ते तिच्या भोवती जमा झाले.

"मरियम, किती लाजेची गोष्ट आहे! तुझे मातापिता ईश्र्वरनिष्ठ लोक होते, तू हे काय केले?"  आणि ते त्या मुलाविषयी जाणण्यास इच्छुक होते.

मरियमने त्यांना उत्तर दिले नाही. तिने फक्त त्या मुलाकडे इशारा केला.

"तू वेडी आहे का? आम्ही एका नवजात बाळासोबत कसे बोलू शकतो, मरियम ?"

त्यानंतर लगेच प्रत्येकाला पूर्ण आश्चर्य देऊन, मरियमच्या हातातील बाळाने बोलावयास सुरुवात केली. "मी अल्लाह (ईश्वर) चा संदेश पोहोचविणारा आहे," ते बाळ म्हणाले, "त्याने मला एक ग्रंथ (इंजील, बायबल) दिला आहे आणि मला एक प्रेषित (संदेशकर्ता, पैगंबर) बनविले आहे. त्याने मला आज्ञा दिली की, माझ्या (अल्लाहच्या, ईश्वराच्या) प्रार्थना म्हण आणि दानशूर बन आणि माझ्यावर आशीर्वाद दिला की, जिथे मी असेल, तो मला माझ्या आईशी दयाळू असणारा बनवेल आणि माझ्यावर ज्या दिवशी माझा जन्म झाला, ज्या दिवशी मी मृत्यू पावेन, ज्या दिवशी मला पुन्हा वर उचलण्यात येईल, त्या दिवशी शांती देईल."

प्रत्येकाने, डोळे विस्फारून आश्चर्याने लक्ष देऊन ऐकले. त्यांचा या चमत्कारवर विश्वास बसत नव्हता. हे ईसा अ. (येशू, Jesus) होते. अल्लाहचे संदेशकर्ता म्हणजेच प्रोफेट.

जे लोक, मरियमची, जी पवित्र आणि निरागस होती, निंदा करण्यास आले होते,  ते सगळे नवजात बालकाचे बोलणे ऐकून शांत झाले. मरियमच्या विषयी पवित्र क़ुरआन म्हणते, "अल्लाह (ईश्वरा) ने मरियमला, त्या सर्व देशांच्या, सर्व स्त्रियांमधून वरचा दर्जा देऊन निवडले."

ईसा अ., मरियम चे पुत्र, ज्यांना पवित्र कुरआन मध्ये मसीह ही म्हंटले आहे, मोठे होऊन एक खूप सद्गुणी आणि धार्मिक व्यक्ती बनले.

ईसा अ.च्या नात्यातले यहया अ., जकरिया अ. चे पुत्र होते, एक प्रेषित (संदेशकर्ता) होते. ते अल्लाहचा संदेश लोकांमध्ये, उपदेशाद्वारे सांगायचे. प्रवचन द्यायचे. पण यहया अ. यांना, जुदा (Judaea) चा राजा पसंत करत नव्हता. त्याने त्यांची हत्या करविली.

यहया अ. हे , त्यांच्या पित्याच्या, जकरिया अ. च्या, जीवनकाळात उशिरा जन्मले होते. जकारिया अ. यांच्या अल्लाह (ईश्वर) ला केलेल्या प्रार्थनांचे, ते उत्तर होते. अल्लाह (ईश्वर) नेच त्यांच्यासाठी यहया हे नाव निवडले होते.

यहया अ. यांच्या कुटुंबीयांसाठी, जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रांसाठी ही फार दुःखाची बातमी होती. यहया अ. यांच्या मृत्यू नंतर लोकांना योग्य मार्गावर नेऊन, नेतृत्व करण्याची भारी जबाबदारी, ईसा अ. वर आली.

इस्राइलचे (याकूब चे) वंशज म्हणजेच "बनी इस्राइल" इतके साधे लोक नव्हते की, त्यांचे सहजरीत्या नेतृत्व करून त्यांना सरळ मार्गावर आणावे. ते धीट होते आणि प्रत्येक गोष्टीसाठी टीकात्मक होते आणि फक्त मतभेद दर्शविण्यासाठी वाद घालणारे होते.

त्यांच्यामधील श्रीमंत लोक, गरीब लोकांसाठी क्रूर होते. त्यांच्यामध्ये आपसांमध्ये, कपटकारस्थान आणि भांडणे होती. त्यामुळे ही गोष्ट चकित करणारी नव्हती की, "रोमन" लोकांनी त्यांच्या देशावर नियंत्रण केले होते. आणि ते त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर, फक्त सेवकासारखे राहत होते. त्यांचे राज्यकर्ते म्हणजे राजा आणि इतर प्रधान, फक्त नावापुरते होते, ते फक्त दुसऱ्याच्या हातातील बाहुले होते आणि खरी सत्ता "रोमन गवर्नर" च्या हातात होती.

तेथील सर्व लोक आजारपणात, भयात, गरिबीत आणि दुबळेपणात जीवन जगत होते. ते विटंबना आणि मानहानी आणि दुःखाचे आयुष्य जगत होते. आजूबाजूला सर्वीकडे दारिद्र्य पसरले होते. तेथे त्यांना कोणीही योग्य मार्ग दाखविणारा नव्हता. ते सर्व मेंढ्यांच्या विखुरलेल्या कळपा सारखे होते.

अशा वेळेस ईसा अ. अल्लाहचा संदेश आणि इन्जील ग्रंथ (बायबल) घेऊन, त्यांना मार्गदर्शन करण्यास आले.

ईसा अ. खूप सौम्यपणे संभाषण करणारे आणि विनयशील व्यक्ती होते. त्यांनी त्यांच्या लोकांची अवस्था पाहिली, त्यांचे दुःख जाणले. ते लोकांशी प्रेमाने बोलले. त्यांना दिलासा दिला आणि त्यांना मार्गदर्शन केले.

प्रत्येक वेळेस मार्ग दाखविताना ते असे म्हणत की, एक आणि एकच अल्लाह (यहोवा, yahewe, ईश्वर, God) आहे. ज्याने त्यांना प्रेषित (संदेशकर्ता) म्हणून त्या लोकांकडे पाठविले आहे. ईसा अ. यांनी त्या लोकांची, भविष्याबाबत आणि परलोकाबाबत आशा जागविली. ईसा अ. यांनी आश्वासन दिले की, ते जर सदाचारी, संयमी आणि धैर्य ठेवून राहतील, तर अल्लाह (ईश्वर) त्यांना पारितोषिक देईल.

गरीब लोकांनी ईसा अ. वर विश्वास ठेवला आणि त्यांना मनापासून खूप प्रेम दिले. ते त्यांच्याकडे त्यांचे दुःख घेऊन आले. ईसा अ. त्यांच्यासाठी मसीह (Messiah) होते. अल्लाह (ईश्वरा) ने ईसा अ. यांना आजारातून लोकांना बरे करण्याची शक्ती दिली होती. त्यांनी आजारी लोकांना आणि आंधळ्या लोकांना फक्त स्पर्श करून बरे केले.

त्या काळात सगळ्या आजारांपेक्षा जास्त घातक आणि भयभीत करणारा आजार कुष्ठरोग (महारोग/leprosy) होता. कारण त्यावर काही उपाय नव्हता. त्यावेळी असे मानले जायचे की, हा पसरणारा म्हणजेच संसर्गजन्य आजार आहे आणि ज्या लोकांना कुष्ठरोग व्हायचा, त्यांना सर्वांपासून दूर करून आणि दूर घेऊन जाऊन एका खड्ड्यात किंवा दरीत (जी दरी कुष्ठरोग्यांना फेकण्यासाठी असायची) फेकले जायचे. जेथे त्यांना मरण्यासाठी सोडून देण्यात यायचे. त्यांचे कुटुंबीय आणि मित्र ही या भीतीने की, त्यांनाही हा आजार पकडेल किंवा त्यांनाही संसर्ग होईल, त्यांना भेटायला जात नव्हते. या हताश लोकांसाठी ईसा अ. एक आशेचा किरण बनून आले होते. कारण अल्लाह (ईश्वर) ने ईसा अ. यांना आजारापासून लोकांना, बरे करण्याची शक्ती दिली होती.

ईसा अ. यांना लोकांकडून प्रेम आणि आदरभाव मिळत होता. प्रत्येक ठिकाणी लोक त्यांच्या मागोमाग जात होते. लोक त्यांचे उपदेश आणि प्रवचन लक्षपूर्वक ऐकत होते आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास करत होते. ईसा अ. यांनी अल्लाहचा संदेश, जेथे जेथे ते गेले, तेथे तेथे सर्विकडे पोहोचविला.

ईसा अ. यांनी लोकांना एकमेकांवर प्रेम करण्यास शिकविले आणि शत्रूला क्षमा करण्यास शिकविले. एक आणि फक्त एकच अल्लाहवर (ईश्वर, यहोवा (yahewe), God) विश्वास करण्यास शिकविले. त्यांनी लोकांना सांगितले की, "मूसा अ. (Moses) यांचा धर्म खरा होता आणि ते स्वतः एक संदेशकर्ते म्हणून, ही सत्यता, सिद्ध करण्यासाठी आले आहेत."

"मूसाने तुमच्याकडे जो कायदा आणला आहे, त्याची पुष्टी करण्यासाठी आणि अजून एक संदेशकर्ता "अहमद" (मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम), माझ्यानंतर येणार असल्याची चांगली वार्ता देण्यासाठी, मला यावे लागले आहे," त्यांनी लोकांना म्हंटले.

अहमद (मुहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम), हे ईसा अ.नंतर साधारणतः पाचशे वर्षांनंतर आले.

ईसा अ. यांनी, त्यांचा संदेश चहूबाजूंना देण्यासाठी, दूरदूर पर्यंत प्रवास केला आणि सर्व लोकांना उपदेश करत राहिले. नाझरेथ (नासरत), जे गलिली (Galilee) मध्ये होते, तेथपासून जेरुसलेम पर्यंत (जे जुदामध्ये होते),  सर्व गरीब लोकांनी त्यांचे ऐकले आणि त्यांच्या उपदेशांमध्ये, एका छान यशस्वी जीवनासाठी आशेचा किरण पाहिला. त्यांनी संयमित आणि नम्र राहून सामर्थ्य (बळ) संपादन केले.

पण श्रीमंत आणि शक्तीशाली लोक, ईसा अ. च्या विरुद्ध झाले. त्यांनी ईसा अ. यांच्या संदेशामध्ये, एका क्रांतीचे बीज पाहिले.

जेरुसलेम आणि जुदाचे श्रीमंत लोक, ईसा अ. ची वाढती लोकप्रियता पाहून भयभीत झाले. त्यामुळे त्यांनी ईसा अ. यांना अपमानित केले. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या अनुयायांसाठी जीवन जगणे अवघड केले. पण ईसा अ. यांनी कुणालाही हानि किंवा इजा पोहोचविली नाही आणि त्यांचे कार्य शांततेने चालू ठेवले. त्यांचे जे विश्वसनीय समर्थक होते, त्यांना "हवारीज" म्हंटले जात होते, ज्यांनी त्यांना प्रत्येक कार्यात मदत केली.

एकदा या समर्थकांनी, म्हणजेच हवारिज (disciples) यांनी, ईसा अ. यांना विनंती केली, की अल्लाह (ईश्वर) ला, स्वर्गातून त्यांच्यासाठी, एक भव्य भोजन (मेजवानी) पाठविण्यास सांगा. ईसा अ. यांनी अशी अवास्तव  मागणी करण्यापासून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आग्रह केला की, यामुळे त्यांची श्रद्धा मजबूत होईल.

अनिच्छिने ईसा अ. यांनी मान्य केले आणि त्यांनी अल्लाह (ईश्वर) ला, त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली. अल्लाह (ईश्वरा) ने, त्याच्या प्रिय प्रेषिताची (संदेशकर्त्याची) प्रार्थना ऐकली आणि त्याच्या हवारिज साठी (disciples साठी), अन्न आकाशातून (स्वर्गातून) खाली पाठविले. याचवेळी अल्लाह (ईश्वर) ने, त्यांना चेतावणी दिली की, जर त्यांच्यापैकी कोणीही, या चमत्कारानंतर अविश्वास दाखविला, तर एक कठोर शिक्षा, त्याची वाट पाहत असेन.

ज्यू लोक (श्रीमंत आणि हट्टी असलेले), ईसा अ. यांना हानि पोहोचविण्यासाठी, एका संधीच्या शोधात होते. त्यांनी ईसा अ. विरुद्ध योजना केली आणि कट रचला.

शेवटी ते  ईसा अ. विरुद्ध, जे त्यांच्या प्रशासनासाठी एक धोकादायक व्यक्ती बनत चालले होते, तक्रार करण्यास "रोमन गवर्नर- पोंटीअस पाइलेट (Pontius pilate)" कडे गेले. त्यांनी ईसा अ. वर, प्रशासनाविरोधात आणि लोकांच्या धर्माविरोधात, लोकांच्या मनात विष कालवत असल्याचा आरोप केला.

रोमन गवर्नर, त्यांनी जो काही आरोप केला, तो पुरावा असल्याशिवाय मानण्यास तयार नव्हते. पण श्रीमंत आणि शक्तीशाली ज्यू लोकांनी, गवर्नरला असे भासविले की, हा एक कट आहे. त्यांनी विनवणी केली की, जर ईसा अ. यांना वेळेत थांबविले नाही, तर त्यांची गरीब लोकांमध्ये वाढती लोकप्रियता सरकारसाठी (प्रशासनासाठी) एक धोक्याची पूर्वसूचना असेल.

शेवटी पाइलेट यांनी ईसा अ. यांना अटक करण्यासाठी आदेश दिला. लोकांचा विरोध, बंड आणि प्रतिक्रिया टाळण्यासाठी, हे लपवून केले जाणार होते. काही अप्रामाणिक लोकांच्या मदतीने एक कट रचण्यात आला. ईसा अ. यांना अटक केली गेली आणि गवर्नर समोर आणण्यात आले.

ईसा अ. वर, देशद्रोहाचा आरोप म्हणजेच लोकांच्या मनात त्यांच्या धर्माविरुद्ध आणि प्रशासनाविरुद्ध विष कालवण्याचा आरोप करण्यात आला. त्यांचे शत्रू त्यांना मृत्यू देण्यास इच्छुक होते. त्या काळात अशा आरोपासाठी शिक्षा "क्रूसावर म्हणजे वध स्तंभावर मरण" अशी होती. क्रूस (वधस्तंभ) म्हणजे सलीब, हा लाकडाचा क्रॉस (+ च्या आकारासारखा) होता, ज्यावर त्या व्यक्तीला खिळे ठोकून बांधले जायचे आणि रक्तस्त्राव होऊन मरण येईपर्यंत तो व्यक्ती तिथेच सोडला जायचा.

त्या जमिनीच्या (देशाच्या) श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांच्या आग्रहातर, ही शिक्षा ईसा अ. यांच्यासाठी सुनावली गेली. पण अल्लाहने, त्यांच्यावर उदारतेने, दया करून ईसा अ. यांना वाचवले. अल्लाह ने ईसा अ. यांना आकाशात वर उचलले.

ईसा अ. हे अल्लाह चे प्रिय प्रेषित होते, ज्यांचे जीवन चमत्कारांनी भरलेले आहे. कधी कधी लोक इतक्या चमत्कारांविषयी ऐकतात, तेव्हा ते आश्चर्यचकित होतात. "एक मूल त्याच्या पित्याविना कसे जन्मू शकते?", लोक विचारतात.

जरी ईसा अ. अल्लाहचे प्रेषित होते, तरी ते एकटे असे मनुष्य होते, ज्यांचा जन्माचा इतिहास खूप असामान्य आहे. पण हे फक्त, अल्लाहची शक्ती आणि सामर्थ्य सिद्ध करतात, ज्याच्यासाठी काहीही अशक्य नाही.

यासाठी आदम अ. यांचे उदाहरण आहे, ज्यांचा जन्म माता आणि पिता, दोन्ही नसतांना झाला, ते मातीपासून बनविले गेले आणि त्यांच्यात आत्मा फुंकला गेला. कारण अल्लाह(ईश्वर) सामर्थ्यशाली आहे आणि तो सगळ्या विश्वाचा निर्माता आहे. त्यांच्यासाठी काहीच अशक्य नाही.अल्लाहने दगडांतून झरे प्रवाहित केले, धरतीतून झाडे उगविली, मास्यांना पाण्यात पोहायला शिकविले, पक्ष्यांना हवेत उडण्यास बनविले. त्याने मानवाला सर्व प्राणिमात्रांवर वरचा दर्जा दिला. ज्यामुळे माणूस एक स्पष्ट चिन्ह पाहू शकतो आणि प्रकृती आणि प्राणी व पक्ष्यां विषयी विचार करू शकतो आणि त्यांच्या निर्मात्याचा आभारी, कृतज्ञ बनू शकतो. त्याने मानवाला हे सर्व समजण्यासाठी आणि अल्लाह (ईश्वरा) च्या उदारतेची प्रशंसा करण्यासाठी, अल्लाहच्या आदेशांवर मजबूत श्रद्धा ठेवण्यासाठी बुद्धिमत्ता दिली.

कुणालाही अल्लाहच्या (ईश्वराच्या) बरोबरीने किंवा समकक्ष समजणे, हे खूप मोठे पाप आहे.

ईसा अ. च्या नंतर, काही दशकांनी, ज्यू (यहुदी) लोकांनी रोमन विरुद्ध बंडखोरी केली आणि इ.स. 66 मध्ये जेरूसलेमवर नियंत्रण केले आणि पहिले रोमन-यहुदी युद्ध सुरू केले. इ.स. 70 मध्ये रोमन लोकांनी "जेरुसलेम" वर नियंत्रण केले आणि दुसऱ्या वेळेस बांधल्या गेलेल्या, प्रार्थना स्थळाला (हैकले सुलेमानी/second temple)
नष्ट केले, ज्यामध्ये पश्चिमेच्या भिंतीचा फक्त काही भाग शिल्लक होता. (जरी अलिकडील पुरातत्व शोधांनी भिंतीचा काही भाग नंतरच्या काळात दिलेला आहे). पाश्चात्य भिंत यहूदींसाठी(ज्यू लोकांसाठी) एक पवित्र स्थान आहे.

इस्राइलचे लोक दोन वेळा उपद्रव माजवतील आणि दोन वेळा त्यांचा विनाश होईल, असेच आधीच "तौरात" म्हणजेच "Torah"  या ग्रंथात वर्तविले होते, जो ग्रंथ मूसा अ. यांना देण्यात आला होता. त्यातली ही दुसरी वेळ होती.

पहिली वेळ ती होती, जेव्हा बेबिलोंनच्या राजाने विनाश केला होता. ही सत्य कथा आधी एका भागात होती...

कुरआन मध्ये हा संदर्भ आहे.

#कुरआनचा_काही_अंश

4 आणि आम्ही इस्राईल च्या मुलांना, ग्रंथाद्वारे हे आधीच कळविले होते की, तुम्ही जमिनीवर दोन वेळा उपद्रव माजवाल आणि मोठ्या विद्रोहाचे प्रदर्शन कराल.

( कुरआन 17:4)

[इस्रायली लोकांच्या ग्रंथात ' तोराह ' मध्ये हे भाकीत अल्लाह (यहोवा, ईश्वर)ने वर्तविले आहे, जो अल्लाह चाच ग्रंथ आहे.]

मंगळवार, २३ जून, २०२०

बादशाह_सुलेमान

बादशाह_सुलेमान

🌹🌹🌹सबा ची राणी 🌹🌹🌹
एक दिवस जेव्हा राजा सुलेमान ने दरबार भरवला होता, त्याच्या लक्षात आले की, हूदहूद( हुपू; hoopoe) गायब होता. तो त्याच्या अनुपस्थितीने नाराज झाला आणि म्हणाला," हुदहुद कोठे आहे? मला तो तुमच्यामध्ये दिसत नाही. जर अनुपस्थित राहण्याचे एक चांगले कारण नसेल तर, मी त्याला नक्कीच शिक्षा करेन."
तो असे म्हणत असतानाच, हुदहुद उडत आत आला आणि विलंब झाल्याने दिलगिरी व्यक्त केली.
" मी एका शक्तीशाली राज्य "सबा" बातमी आणली आहे. त्या राज्यावर एक राणी राज्य करते , जी एका उत्कृष्ट सिंहासनावर विराजमान होते. सबा येथील लोक, खऱ्या अल्लाहची उपासना सोडून, सूर्याची उपासना करतात." त्याने राजाला सांगितले.

"तू आमच्याशी खरे बोलत आहे का, हे आम्ही लवकरच माहीत करू," सुलेमान म्हंटला." हे घे, हे पत्र घेऊन सबा ला जा, तेथे ते पोहोचव आणि मग काय घडते ते पाहायची वाट पाहा.
हुदहुद ने सुलेमानचे पत्र घेतले आणि सबा ला जाण्यासाठी निघाला. तेथे त्याने राणीच्या समोर ते टाकले आणि शांतपणे काय घडते , ते पाहण्याची वाट पाहू लागला.

राणीने जेव्हा ते पत्र वाचले, तिच्या सल्लागाराला काय करावे असे विचारले. "येथे राजा सुलेमान कडून एक पत्र आहे. अल्लाहचा योग्य सन्मान करून आणि अल्लाहच्या नावाने सुरू केलेले आहे. त्याने अल्लाह सत्यनिष्ठेला विरोध न करता, मला समर्पण करण्यासाठी त्याच्याकडे बोलावले आहे."
मग राणीने थोडा वेळ विचार केला.आणि सुलेमानसाठी काही मौल्यवान भेटवस्तू पाठविण्याचा निर्णय घेतला.

पण सुलेमान काही साधारण राजा नव्हता. तो अल्लाहचा संदेश कर्ता (प्रेषित) होता. तो क्रोधित झाला, जेव्हा त्याने पाहिले की राणीने त्याच्या संदेशाचा कसा अर्थ लावला. त्याने तिच्या संदेश देणाऱ्याला भेटवस्तू सहित वापस पाठविले आणि त्याला म्हंटले की, "राणीला सांग की, जर त्याच्या अल्लाहच्या सत्य निष्ठेकडे बोलवण्याचे उत्तर भेटवस्तू असेल, तर तो सबाला सैन्यासह येईन."

आता राणी खरच घाबरली आणि तिने तत्काळ स्वतः सुलेमानकडे जाण्याचा निर्णय घेतला.जेव्हा सुलेमानला तिच्या येण्याचा हेतू कळला, त्याने त्याच्या दरबाऱ्यांना विचारले, "येथे कोणी आहे का, जो तिचे सिंहासन, ती इथे येण्याआधी आणू शकेल ."
एका जिन्नने उत्तर दिले की, "डोळ्यांची पापणी लवण्याआधी तो ते आणू शकेल." सिंहासन आणण्याचा आदेश देण्यात आला. जेव्हा तो आणला गेला, सुलेमानने त्याच्यात थोडा बदल केला.
जेव्हा राणी आली, तिला तो सिंहासन दाखविण्यात आला आणि विचारले," हे तुझे सिंहासन आहे का?" तिने लगेच त्या सिंहासनाला ओळखले, कारण ती खरोखर बुद्धिमान होती, पण तिने तिचे आश्चर्य लपविले आणि म्हणाली," हे तसेच दिसत आहे".
सुलेमानने तिला त्यानंतर एका सुंदर राजवाड्यात नेले, ज्याची फरशी चकाकणारी होती.तिने फरशीवर पाय ठेवण्यासाठी तिचा घागरा वर उचलला. कारण तिला वाटले की ते पाण्याचे तळे आहे. पण ती खरंच राजवाड्याची फरशी होती ज्याची पारदर्शक ( विशेष मौल्यवान काचेने) फरस बंदी केली होती.
(आच्छादली होती.) अशी त्या राजवाड्याची भव्यता होती.
जे अल्लाहने सुलेमानला बहाल केले होते, त्याने ती राणी इतकी प्रभावित झाली की ती अल्लाहच्या सत्यनिष्ठेला शरण गेली.
" मी स्वतःशी चूक केली आहे. आता सुलेमानसह मी या जगाच्या प्रभुला शरण जात आहे."
अशाप्रकारे सुलेमान त्या सुंदर राणीला अल्लाहची शक्ती पटविण्यास सक्षम झाला.

सुलेमानच्या पायाशी सर्व मौल्यवान सांसारिक (ऐहिक) खजिने होते. तरीही त्याची अल्लाहची श्रध्दा कमकुवत झाली नाही. तो नेहमी इतके जास्त देण्यासाठी अल्लाहला आभार मानत राहिला आणि गर्विष्ठ झाला नाही.

जेव्हा एकदा सुलेमान एका उत्कृष्ट मशिदीच्या बांधकामाची देखरेख करत होता. त्याच्यासाठी मृत्यूची वेळ आली. जेव्हा त्याला याची जाणीव झाली की, तो मरणार आहे, तो उरलेल्या बांधकामाच्या देखरेखी विषयी चिंताग्रस्त झाला. त्याला भीती होती की अडेल ( बेलगाम , ताब्यात न राहणारे) जिन्न अर्धवट काम सोडून, मोकळे सुटतील.
अल्लाहने याची काळजी घेतली. त्याच्या मृत्यूनंतर , जेव्हा बांधकाम पूर्ण केले जात होते, सुलेमान त्याच्या चालण्याच्या काठीचा आधार घेऊन उभा राहिला. जेव्हा किड्यांनी आतून काठी पोखरून खाल्ली आणि तो कोसळला, फक्त तेव्हाच सुलेमानच्या मृत्यूचे गुपित जिन्नांसमोर प्रकट झाले. जिन्नांनी ते सर्व , अल्लाहचे रहस्य न समजण्यालायक असल्यामुळे त्यांनी एकमेकांना शाप दिला. " जर आम्हाला याविषयी आधीच माहीत असते तर आम्ही या परिश्रमापासून खूप लवकर सुटका करून घेतली असती." ते म्हणाले.

कुराणसत्यकथा


06. लूत अ. आणि लोक.

लूत अ. हे इब्राहीम अ. च्याच भावाचे पुत्र म्हणजेच त्यांचे पुतणे होते…जेव्हा इब्राहीम अ. यांनी त्यांचा देश सोडला, तेव्हा लूत अ. ही त्यांच्या बरोबर होते.. लूत अ. खूप सद्गुणी असे अल्लाहचे संदेशवाहक होते…

त्यांचा देश सोडल्यानंतर, इब्राहीम अ. हे आधी जेरुसलेमला गेले आणि अल्लाहकडून लूत अ. यांना सदोम या ठिकाणी, जे जॉर्डनच्या पूर्वेत आहे, पाठविण्यात आले. तेथे राहणाऱ्या पापी आणि वाईट लोकांना, अल्लाहच्या संदेशाची शिकवण देण्यासाठी त्यांना पाठविण्यात आले होते.

हे लोक प्रत्येक व्यवसायी, जो त्यांच्या रस्त्यात येत होता, त्याला लुटत होते…त्यांना न्याय काय असतो याचे ज्ञान नव्हते…

एक दिवस एक प्रवासी, त्याची अमानत म्हणजे त्याची कमावलेली संपत्ती… घेऊन जात होता… एका माणसाने त्याच्या कपाळाला एक दगड मारला…आणि त्याला पकडून म्हंटले, "माझ्या दगडाने तुला लागले आहे…तुला जे घडले याची भरपाई द्यावी लागेल"...

प्रवासी खूप रागावला आणि म्हणाला, "तू मूर्ख आहेस का? तू कशाविषयी बोलत आहे…तू मला मारले..तू मारेकरी आहेस…तुला मला भरपाई दिली पाहिजे…"

ते दरबारात गेले…पण न्यायाधीशाने त्या मारेकऱ्याच्या कडून निर्णय दिला, ज्याने प्रवाश्याला मारले होते आणि म्हणाला, "हो, हा बरोबर आहे…याच्या दगडाने तुला मारले… आता तुला याची भरपाई करावी लागेल…"

या अन्यायावर , प्रवासी इतका नाराज झाला की, त्याने एक दगड उचलला आणि न्यायाधीशाच्या डोक्याला मारला…

"बरं.." तो मारल्यानंतर म्हणाला, "आता तुला मला भरपाई द्यावी लागेल. ज्याला तू मला भरपाई द्यायला सांगितली होती, त्याला तू ही भरपाई देऊ शकतो."...

लूत अ. यांनी, या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला की, ते पापाने भरलेले जीवन जगत आहेत. ..पण त्यांनी त्यांची थट्टा उडविली…ते म्हणाले की, "जर तू इतका चांगला आहेस, तर तू आमच्यासोबत राहू शकत नाही…येथून चालला जा…आम्ही तुझ्यासारखे का होऊ?"

लूत अ. दुःखी झाले..त्यांनी त्यांच्याकडून अल्लाहचा संदेश देण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता…पण त्या लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही…

एक दिवस तीन स्वर्ग दूत (फरिश्ते), जे खूप देखणे तरुण दिसत होते.. लूत अ. यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबाकडे आले. ते म्हणाले, "तुम्ही अनोळखी दिसत आहात…कोण आहात तुम्ही?"

स्वर्ग दूत त्यांना म्हणाले की, ते अल्लाहकडून पाठविण्यात आलेले फरिश्ते आहेत. जे त्या लोकांना, जे ऐकत नाहीत त्यांना शिक्षा देण्यासाठी आले आहेत. 

त्यांनी सांगितले की, "पूर्ण शहर नष्ट होणार आहे…" आणि त्यांनी लूत अ.यांना सांगितले की, "तुमच्या कुटुंबाला घेऊन, रात्रीच्या शांततेत हे शहर सोडून जा. कोणीच मागे पाहू नका…तुम्हाला सूर्योदय होण्याच्या आधी, जो प्रकाश दिसतो. म्हणजेच पहाट…त्याआधी ही जागा सोडायची आहे…"

जेव्हा ते बोलत होते, तेव्हा शहरातील सगळे वाईट लोक आले आणि त्यांनी देखण्या तरुणांना पाहिले, "यांना आम्हाला दे", ते म्हणाले…

"हे तुझे पाहुणे आहेत…नाही का?"
"आम्ही तुला म्हटले नव्हते का की, कुणी पाहुणे येऊ देऊ नको… आता त्यांना आमच्या हवाले कर…आम्हाला त्यांच्यासोबत हवे ते करण्यासाठी…"

लूत अ. यांनी त्यांना विनवणी केली, "इतके क्रूर होऊ नका. त्यांच्या पाहुण्यांसमोर इतका वाईट व्यवहार करू नका"…

पण त्यांनी ऐकले नाही आणि जोर देत राहिले…

ते तरुण मुले…निश्चितच अल्लाहचे फरिश्ते होते…आणि त्यांना कुणीच काही करू शकत नव्हते…ते लूत अ. यांना म्हणाले, "आमची काळजी करू नको आणि शांततेने हे शहर सोडून जा"...

त्यामुळे लूत अ. यांनी, ते शहर, रात्रीच्या अंधारात, त्याच्या कुटुंबीयासोबत सोडले…पण त्यांच्या पत्नीला सदोमच्या लोकांवर दया आली. तिने अल्लाहची आज्ञा मानली नाही. तिने जातांना मागे वळून पाहिले आणि ती, जे मागे राहीले आणि ज्यांना शिक्षा मिळाली, त्यांच्यामध्ये ती ही होती…ती दगडाची झाली…

पहाटे एक खूप भयानक आवाजाने त्या लोकांना पकडले...एक जोरदार कडक आणि भाजलेल्या दगडांचा फवारा होता…
पूर्ण शहर, तेथे राहणाऱ्या लोकांसहीत आणि त्याजमिनीत उगवलेल्या प्रत्येकासहीत उध्वस्त झाले…

आज इतक्या हजारो वर्षानंतर त्या शहराचा उध्वस्त ढिगारा.. मृत समुद्राच्या जवळ दिसतो…ज्या मृत समुद्रात कुणीही जिवंत राहू शकत नाही…काही लोक विश्वास करतात की, हे ढिगारे आणि समुद्र याची आठवण करून देतात की, अल्लाहचा शाप ज्यामुळे सदोमचे आज्ञा न पाळणारे लोक, नष्ट झाले…तो किती वेदनादायी आहे…


युनूस अ. माशाच्या पोटात

🐳माशाच्या पोटात 🐳
युनूस हा एक ईश्वरनिष्ठ तरुण होता.जो "निनेवेह" ( सध्याच्या "मोसुल" च्या बाहेरील भागात असणारे एक प्राचीन शहर , इराक) येथे राहत होता. या ठिकाणचे लोक एकाच खऱ्या अल्लाहवर (ईश्र्वरावर) विश्वास ठेवत नव्हते. त्यामुळे अल्लाहने त्या लोकांसाठी युनुसला त्याचा संदेशकर्ता म्हणून निवडला. युनूसने अल्लाहच्या संदेशाचा उपदेश त्या लोकांना दिला. पण त्या लोकांनी त्यांच्या पद्धतीने अविचारीपने त्याचा उपदेश लक्षपूर्वक ऐकला, आणि जेव्हा तो म्हणाला एकच अल्लाह (ईश्वर, पालन कर्ता) आणि तो, अल्लाहचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे, त्यांनी त्याची थट्टा केली.
युनूस ने त्यांना विनवणी केली, अल्लाहच्या क्रोधाविषयी आणि दंडाविषयी (शिक्षा) चेतावणी दिली. पण काहीच अर्थ नव्हता. ते त्याला पाहून अजून हसले आणि विश्वास केला नाही. यामुळे युनूसची त्यांच्याकडून निराशा झाली. त्याने रागावून आणि अल्लाहच्या शिक्षेबद्दल चेतावणी देत, अल्लाहचा आदेश येण्याची वाट न पाहताच निनेवेह च्या लोकांना सोडले.
यावर निनेवेह च्या लोकांना काहितरी गंभीरपने चूक झाली आहे, याची जाणीव झाली.त्यांना त्यानंतर भीती वाटली आणि वाटले की, युनूस हा अल्लाहचा खरा संदेशकर्ता होता. त्याला त्रास देऊन, त्यांनी अल्लाहला नाराज केले आहे. आणि आता अल्लाहची दिलेली शिक्षा नक्कीच त्यांना नष्ट करू शकते..ज्या क्षणी त्यांना याची जाणीव झाली, ते पश्र्चाताप करण्यासाठी खुल्या जागेत आले, वाकून आणि अल्लाहकडे याचना करत, नमन करू लागले. त्यांनी क्षमा याचना केली आणि सत्य निष्ठा स्वीकार केली. त्यांनी इतक्या प्रामाणिकपणेे क्षमा मागितली की, अल्लाहने त्यांना क्षमा केली आणि त्यांच्यावर ती शिक्षा (दंड, आपदा) केली नाही, जी युनूस त्यांना चेतावणी देऊन गेला होता.

या काळात, युनूस ने त्याच्या लोकांना आणि निनेवेह ला रागात सोडल्यानंतर , तो दूर जावून, एका नौकावर चढला जी, त्या क्षणी समुद्रात प्रवासासाठी निघणार होती.
ती नौका, जी लोकांनी भरली होती समुद्रात निघाली, पण रस्त्यात, एक वादळ नौकेवर आदळले आणि नौका लहरींवर हेलकावे देऊ लागली.

त्याकाळी असे मानले जायचे की, जर एखादा पळपुटा गुलाम ( विकत घेतलेला नोकर, जशी त्या काळी माणसांना विकत घेऊन काम करवून घेण्यासाठी, "गुलाम" बनविण्याची पद्धत होती.), नौकेवर किंवा जहाजावर चढला तर, ते जहाज किंवा बोट बुडते.

या कारणामुळे लोकांनी संशय केला की, या बोटीवर, एक पळून आलेला गुलाम आहे. तो कोण आहे हे माहीत करण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकून, ज्या माणसाचे नाव येईल त्याला, नावेच्या बाहेर समुद्रात फेकण्याचा निर्णय घेतला..जेव्हा सगळ्या चिठ्ठ्यामधून, एका नावाची चिठ्ठी उचलण्यात आली, ते युनूसचे नाव होते. कोणीच युनूसवर विश्वास करण्यास तयार नव्हता की, युनूस पळून आलेला गुलाम नाहीं, कारण तो इतका सभ्य आणि धार्मिक वाटत होता.
तीन वेळा चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि प्रत्येक वेळेस युनूसचे नाव आले.
आता युनूसला खात्री झाली की, त्याने अल्लाहचा आदेश येईपर्यंत वाट पाहिली नाही आणि रागात निनेवेह आणि त्याच्या लोकांना सोडून, अल्लाहला नाराज केले आहे.

"हो, मी पळून आलेला गुलाम आहे" तो म्हणाला, मी माझ्या प्रभू आणि मालकाला (ईश्वराला) सोडून पळालो, जर तुम्हाला पुढे सुरक्षित जायचे आहे तर, मला नौकेच्या बाहेर फेका."

खूप अनिच्छिने नावेच्या लोकांनी, जे सांगण्यात आले ते केले आणि त्यांचा पुढचा प्रवास चालू ठेवला.
जसा युनूस खोल पाण्यात पडला, एक मोठा मासा पोहत आला आणि त्या मास्याने त्याला गिळले. युनूसने स्वतःला मास्याच्या पोटात पाहिले, जेथे अंधकार आणि खूप जास्त खोली होती. तो भयभीत आणि असहाय्य होता. जेव्हा मासा पोहायचा, युनूस आतल्या आत फेकला जायचा आणि त्याला खूप अस्वस्थ वाटायचे आणि भिती वाटायची. तो पुन्हा कधी दिवसाचा प्रकाश पाहू शकेन का? किंवा तो अशा दयनीय पिंजऱ्यात मरून जाईल का? त्याला असे विचार यायचे.
त्याने निनेवेहच्या लोकांना का सोडले? त्याने त्याच्या चुकीचा पश्र्चाताप केला आणि अल्लाहकडे क्षमा याचना केली. त्याने त्याच्या मालकाला (अल्लाहला) दया करण्याची विनंती केली.आणि या दुःखातून मुक्त करण्यास प्रार्थना केली.
"हे अल्लाह, तुझ्या शिवाय कुणीच अल्लाह (ईश्वर) नाही. फक्त तूच आहेस. सगळा गौरव तुझाच आहे. मी खरंच चूक होतो." तो म्हणाला. त्याचा पश्र्चाताप पाहून अल्लाहने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याच्यावर दया केली. मासा पोहत वर किनाऱ्यावर आला आणि युनूसला बाहेर रेतीवर फेकले.
जेथे तो पडला, अस्वस्थ, खूप अशक्त आणि असहाय्य होता, जसा नवीन जन्म झालेला बालक असतो.
एक वेल त्याच्या जवळ वाढला आणि त्याला सावली दिली, जोपर्यंत त्याला इतके बळ येत नाही, की तो उठेन आणि त्याच्या लोकांपर्यंत जाईल तोपर्यंत.
आतापर्यंत त्याच्या लोकांनी प्रत्येक ठिकाणी त्याचा शोध घेतला होता. आणि ते त्याला पाहून खूप आनंदित झाले. त्याला कळले की, त्यांनी शेवटी खरी श्रध्दा स्वीकार केली आहे. जे त्याला पाहिजे होते.
अल्लाह, जे पश्र्चाताप करतात आणि नम्रतेते क्षमा मागतात, त्यांना क्षमा करतो.

07. युसूफ ची कथा

युसूफ अ. 

याकूब अ.(इस्राइल) हे  खूप अल्लाहनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्ती होते  आणि अल्लाहचा संदेश पोहोचविणारे होते..त्यांना वेगवेगळ्या पत्नींपासून बारा मुले होती…सगळ्यात लहान मुलगा होता युसुफ अ. आणि बनी अमीन…

याकूब अ. सर्व मुलांमध्ये, त्याच्या सगळ्यात लहान मुलावर युसुफ अ. वर सर्वात जास्त प्रेम करायचे…

एक दिवस बालक युसुफ अ. यांना स्वप्न पडले की सूर्य, चंद्र आणि अकरा तारे त्यांना वाकून प्रणाम करीत आहेत..त्यांनी हे स्वप्न त्यांच्या पित्याला वर्णन केले..त्यांचे पिता त्यांना म्हणाले, की, तू ह्या स्वप्नाबद्दल तुझ्या मोठ्या भावंडांना काहीही सांगू नकोस..कारण त्यांना ईर्ष्या होऊन, ते तुला नुकसान करण्याचा प्रयत्न करतील…त्यांच्या पित्याने हे ही सांगितले की, "युसुफवर अल्लाहचे आशीर्वाद असतील..आणि तो ही अल्लाहचा संदेश सर्वांना पोहोचवेल.."

युसुफ अ. यांचे सावत्र भाऊ युसुफ अ. वर खूप जळायचे..कारण त्यांचे वडील याकूब अ., त्यांच्यावर खूप प्रेम करायचे..

एक दिवस ते सर्व भाऊ, त्यांच्या वडिलांजवळ गेले आणि म्हणाले, "आम्ही बाहेर जात आहोत…तुम्ही आमच्यासोबत युसुफला पाठवाल का?..आम्ही त्याची चांगली काळजी घेऊ..तो आमच्यासोबत खाईल, पियील आणि खेळेल… तुम्ही त्याला आमच्यासोबत ठेवण्यासाठी विश्वास करत नाही का?…"

याकुब अ. यांना, त्यांच्या वाईट हेतूची भनक लागली…ते म्हणाले, "मला भीती वाटते की, रस्त्यात लांडगा युसुफवर आक्रमण करेल…"

पण त्या सगळ्या भावांनी त्याला पटवून दिले आणि हमी दिली की, ते त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतील..त्यामुळे भरलेल्या अंतःकरणाने याकूब अ. यांनी, युसुफ अ. यांना त्यांच्यासोबत जाऊ दिले…

जेव्हा ते सर्व जण जंगलात होते, तेव्हा मोठ्या भावांनी लहान युसुफ अ. यांना एका कोरड्या, जुन्या विहिरीत फेकले… 

ते सर्व जण रडत घरी आले आणि त्यांच्या वडिलांना म्हणाले की, लांडग्याने खरेच त्याला खाल्ले..त्यांनी युसुफ अ. यांचा रक्तळलेला कुरता (सदरा) त्यांची कहाणी सिद्धकरण्यासाठी (दाखविण्यासाठी), वापस आणला होता.. 

याकूब अ.यांनी पाहिले की, कुरता (सदरा) अजिबात फाटला नव्हता..त्यांना त्याच वेळी सगळे समजले की नक्की काय घडले असावे ..आणि ते खूप दुखी झाले…

ते म्हणाले, "मला माहित आहे, हे खरे नाही..पण मी काही तक्रार करणार नाही आणि धीर सोडणार नाही..मी फक्त माझ्या अल्लाहला मदत मागेल.."

लवकरच एक तांडा (राहण्याची व्यवस्था असलेल्या उंटाच्या गाड्या), ज्या इजिप्तकडे जात होत्या, त्या विहिरीजवळून जात असताना पाणीसाठी थांबल्या, ज्यात युसुफ अ. यांना फेकले गेले होते.

 त्या विहिरीत त्यांना युसुफ अ. आढळले..ते लोक त्यांना पाहून खूप आनंदी झाले. त्या दिवसांत गुलामाची (सेवकाची) खरेदी आणि विक्री करणे एक साधारण प्रथा होती..आणि तो ही एक चांगला तरुण युसुफ अ. सारखा मुलगा इजिप्तमध्ये विकून त्यांना एक चांगली रक्कम मिळाली असती.. 

इजिप्तच्या गुलामाच्या बाजारातून, अजीज नावाच्या एका माणसाने, जो एका शाही कुटुंबाचा सदस्य होता आणि सैन्य अधिकारी होता, युसुफ अ. यांना विकत घेतले आणि त्यांना घरी आणले आणि त्याच्या पत्नीला जुलेखाला म्हटले की, "युसुफ ला सन्मानाने वागव..तो आपल्यासाठी चांगले नशीब घेऊन येईल..आणि आपण त्याला एका मुलाप्रमाणे दत्तक घेऊ शकू…" 

युसुफ अ. मोठे होऊन खूपच देखणे तरुण झाले… अजीज त्यांच्यावर खूप दया करायचा. त्यांच्यावर  खूप प्रेम करायचा. घराच्या सर्व आर्थिक कारभाराची जबाबदारी युसुफ अ. यांना दिली होती..अजीजची सुंदर बायको युसुफ अ. यांच्याकडे आकर्षित झाली... 

एक दिवस युसुफ अ. खोलीत एकटे असताना, जुलेखा त्यांना पटवू लागली…युसुफ अ. मानले नाही..ते एक विनम्र आणि अल्लाहला घाबरणारे तरुण होते. त्यांना, त्यांच्या मालकाला, अजीजला अपमानित नव्हते करायचे आणि अल्लाहची अवज्ञा करायची नव्हती..

त्यांनी अल्लाहची प्रार्थना केली आणि अल्लाहने त्यांना मदत केली…आणि तेथून निसटून जाणे त्यांना जमले.. 

त्यांनी दरवाजा उघडला आणि खोलीच्या बाहेर पळण्याचा प्रयत्न केला.. जूलेखा त्यांच्या मागे पळाली आणि तिने त्याचा कुरता (सदरा) पकडून मागे ओढले..सदरा फाटला.. 

जुलेखाचा पती अजीज आणि जुलेखाचा चुलत भाऊ, जे दाराच्या बाहेर उभे होते त्यांनी दोघांना बाहेर येताना पाहिले...

तिने जे केले त्याची लाज वाटण्याऐवजी, तिने युसुफ अ. यांना दोष दिला, "या माणसाला तुरुंगात पाठविले पाहिजे, मला नुकसान पोहोचविल्याबद्दल" असे तिने तिच्या पतीला सांगितले..

युसुफ अ. यांनी हे अमान्य केले आणि त्यांनी जे काही खरे घडले, ते अजीजला सांगितले…

दोन वेगवेगळे कथन होते…अजीजला कुणावर विश्वास ठेवावा, युसुफ अ. की जुलेखा वर कळत नव्हते..

जुलेखाचा चुलत भाऊ खूप हुशार होता..तो म्हणाला, "जर युसुफ चा सदरा पुढून फाटला असेल तर जुलेखा खरी आहे आणि जर सदरा मागच्या बाजूने फाटला तर, जुलेखा खोटे बोलत आहे आणि युसुफ निरागस आहे.."

युसुफ अ. यांचा शर्ट मागून फाटला होता (कारण जुलेखाने त्याला थांबवण्यासाठी मागून ओढले होते)..यामुळे युसुफ अ. यांनी निरागसता सिद्ध झाली होती… 

अजीजला क्षणात कळाले की काय घडले..त्याने युसुफ अ. यांच्यावर विश्वास केला आणि त्याच्या बायकोला त्याची माफी मागायला सांगितली..अजीज ने युसुफ अ. यांनी माफी मागितली आणि विसरून जायला सांगितले…

पण जुलेखा विसरली नाही…तिला अपमानित झाल्यासारखे वाटले आणि तिची हार झाल्यामुळे तिला राग आला..

हळू हळू बातमी महिलांमध्ये पसरली..आणि त्या गप्पा करू लागल्या की, जुलेखा एका सेवकाच्या प्रेमात पडली.. जेव्हा जुलेखा ने हे ऐकले, तेव्हा तिने सर्व महिलांना, एक मोठ्या आणि छान मेजवानीसाठी तिच्या घरी आमंत्रित केले..

तिला त्यांना दाखवायचे होते, 'युसुफ ज्याच्याकडे ती आकर्षित झाली होती, तो साधारण व्यक्ती नव्हतां..तो विलक्षण देखणा तरुण होता..इतका देखणा की, कोणीही त्याच्याकडे आकर्षित होण्यापासून स्वतःला रोखू शकत नव्हते …

जेव्हा त्या सगळ्या महिला जेवणासाठी बसल्या, त्यांच्या हातात फळे कापन्यासाठी चाकू दिलेला होता.. जुलेखा ने युसुफ अ. यांना  बोलावले..

जसे युसुफ अ. खोलीत आले…महिला त्याच्या चकाकत्या रूपाकडे पाहतच राहिल्या..आणि त्यांनी फळे कापन्या ऐवजी स्वतःची बोटे कापून घेतली…

त्यानंतर त्यांनी जुलेखाकडे पाहून म्हटले की, "तू खरी आहेस..तो साधारण मनुष्य नाही..तो इतका चांगला दिसतो की, जसा एक स्वर्गदूत…"

जुलेखा त्यांना म्हणाली, "जर त्याने, मी जे सांगितले ते केले नाही, तर माझ्या आज्ञेनुसार त्याला तुरुंगात जावे लागेल. (कारण तो एक सेवक आहे आणि मालकिणीची आज्ञा न मानणे हा त्याच्यासाठी गुन्हा आहे)…"

हा युसुफ अ. वर अन्याय झाला होता.

युसुफ अ. यांनी जुलेखा चे ऐकून काही चुकीचे करण्याऐवजी, तुरुंगात जाणे निवडले.. आणि त्यांना (महिलांच्या सांगण्यावरून), तो निरपराधी असताना देखील तुरुंगात टाकले गेले.

युसुफ अ. जेव्हा तुरुंगात होते, त्याच तुरुंगात एक आचारी आणि शाही दरबाराचा एक साकी (मद्य देणारा), त्यांचे सहकारी कैदी होते…

एक दिवस ते युसुफ अ. जवळ आले आणि त्यांना पडलेले स्वप्न त्यांनी वर्णन केले..आचारीला स्वप्न पडले होते की तो एक ब्रेड (भाकरी किंवा पोळी) त्याच्या डोक्यावर घेऊन जात आहे..आणि पक्षी त्यातून ते खात आहेत…साकी ला स्वप्न पडले होते की तो अंगूर पासून वाईन बनवत आहे…

अल्लाहने युसुफ अ. यांना आशीर्वादासह प्रतिभा दिली होती, ज्यामुळे ते स्वप्नांचा अर्थ सांगू शकत होते…त्यांच्या सहकारी कैद्यांना ते म्हणाले, "मी तुमच्या स्वप्नांचे अर्थ सांगेन. जे मला अल्लाहने शिकविले आहे, त्यातलाच हा एक भाग आहे…"

मग युसुफ अ. यांनी दोघांना सांगितले की, आचारी ला फाशी दिली जाईल आणि पक्षी त्याचे डोके खातील..आणि साकी कैदेतून मुक्त होईल आणि राजाला दरबारात वाईन देण्यासाठी नियुक्त केला जाईल..युसुफ अ. यांनी साकी ला, जेव्हा तो दरबारात जाईल तेव्हा, त्याच्या विषयी राजाशी बोलण्यास सांगितले…

पण साकी तुरुंगातून सुटल्यानंतर युसुफ अ. यांच्या बद्दल सर्व विसरून गेला..आणि युसुफ अ. तुरुंगात काही अजून वर्ष तसाच राहिले...

एक दिवस राजाला एक स्वप्न पडले…राजाने पाहीले की, सात अशक्त गायी, सात जाड गायींना खात आहेत…त्याने सात कोरडे आणि सात हिरवे मक्याचे कणीस पाहिले…राजाने दरबारातील लोकांना विचारले की, कुणी स्वप्नांचा अर्थ सांगू शकेल का?.. त्यानंतर साकीला, युसुफ अ. आठवले…जे अजूनही तुरुंगात होते...

त्याने राजाची आज्ञा घेतली आणि युसुफ अ. यांना  भेटण्यासाठी गेला… त्याने राजाचे स्वप्न युसुफ अ. यांना सांगितले..

त्याच्यावर राग न करता आणि त्याच्याविषयी राजाशी लवकरच बोलण्यास सांगून, युसुफ अ. यांनी, त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला…"जमिनीत सात वर्ष मकाचे पीक खूप जास्त होईल…त्यामुळे तुम्हाला जेवढे आवश्यक आहे तेवढे खा आणि बाकीचा मका सुरक्षित स्थळी ठेवा..त्यानंतर सात वर्ष खूप भयानक दुष्काळ येईल...त्या वर्षांत पाऊस होणार नाही आणि मका येणार नाही…जे तुम्ही जमा करून ठेवलेले मक्याचे दाणे आहेत, त्यातून खा..त्यानंतर त्यापुढचे वर्ष खूप पाऊस होईल आणि त्यानंतर पिकाची कापणी…." 

जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो खूप आनंदी झाला आणि तो, त्या व्यक्तीला भेटण्यासाठी इच्छुक झाला, ज्याने स्वप्नाचा अर्थ सांगितला होता…युसुफ अ. यांच्याकडे सैनिकांना पाठविण्यात आले…पण युसुफ अ. यांनी तुरुंग सोडण्यास नकार दिला, कारण त्यांना राजाला जाणीव करून द्यायची होती की, त्यांना अन्यायपूर्वक बंद केले गेले होते… 

त्यामुळे राजाने, त्या महिलांशी योग्य चौकशी करवून घेतली, ज्यांनी मानले की, "युसुफ हा निरागस आणि सदाचारी आहे"…

त्यानंतरच युसुफ अ. तुरुंगातून बाहेर येण्यास तयार झाले...युसुफ अ. यांना सन्मानाने त्या राजाच्या दरबारात नेण्यात आले, जो आधीच युसुफ अ. च्या ज्ञान, हुशारी, निष्ठा, इमानदारी आणि पुण्य या गुणांनी प्रभावित होता…राजाने इच्छा केली की, "युसुफ अ. त्याचा प्रमुख सल्लागार बनावा.."

युसुफ अ. यांनी सुचविले की, त्यांना धान्य साठा करने आणि त्याचे व्यवस्थापन करणे याची जबाबदारी द्यावी…राजा मानला आणि त्याला याचा पूर्ण अधिकार दिला.. अशा प्रकारे अल्लाहने युसुफ अ. यांना त्यांच्या सद्गुणांमुळे, त्यांना दरबारात एक पद आणि स्थान देऊन, बक्षीस दिले, ज्यासाठी ते योग्य होते… 

पुढे येणाऱ्या वर्षांमध्ये, जेव्हा आजूबाजूच्या जमिनीत दुष्काळ (धान्याची कमी) होती, इजिप्त मधील जनतेला खाण्यासाठी अजूनही पुष्कळ अन्न होते..हे सगळे युसुफ अ. यांच्या, देशाच्या खाद्य राखीव संग्रहातील, चांगल्या व्यवस्थापन मुळे होते..शेजारील देशातून लोक अन्नासाठी इजिप्त मध्ये येत होते.. 

युसुफ अ. यांचे भाऊ त्यांना येऊन भेटले का?…युसुफ अ. यांचे  पिता..त्यांना भेटले का?...

सगळीकडे खूप वाईट दुष्काळ पसरला आणि इजिप्त च्या जवळचे आणि दूरचे लोक, इजिप्त मध्ये आले…त्यामध्ये युसुफ अ. यांचे सावत्र भाऊ ही " कानान " वरून (त्यांचे गाव, जे सध्या इस्राइल मध्ये आहे) आले होते..

युसुफ अ. यांनी, जरी त्यांच्या भावांना पाहताक्षणी ओळखले होते, तरी त्या भावांनी, त्यांना ओळखले नव्हते…

युसुफ अ. त्यांना म्हणाले, "पुढच्या वेळेस येताना त्यांच्या सर्वात लहान भावाला (बनी अमीन, जो युसुफ अ. चा सख्खा भाऊ होता) घेऊन या...नाहीतर पुढच्या वेळी धान्य मिळणार नाही.."

सगळे भाऊ घरी (कानान) आल्यावर, त्यांच्या वडिलांजवळ ,याकूब अ. जवळ गेले आणि जे काही झाले ते सांगितले..आणि म्हंटले की, "आमच्यासोबत बनी अमीन ला पाठवा…आम्ही वचन देतो की, आम्ही त्याची काळजी घेऊ आणि येताना जास्त धान्य आणू..पण याकूब अ., त्यांनी जे युसुफ अ. सोबत केले होते, ते विसरले नव्हते आणि त्यांची बनी अमीनला त्यांच्यासोबत पाठवायची इच्छा नव्हती..

त्यांच्यावर दुसऱ्या वेळेस विश्वास ठेवण्यासाठी ते अजिबात इच्छुक नव्हते…तरीसुद्धा जेव्हा भावांनी जोर दिला आणि अल्लाहची शपथ घेतली की, "ते बनी अमीन ची पूर्ण जबाबदारी घेतील"…याकूब अ. यांनी त्याला जावू दिले…

जेव्हा ते जात होते तेव्हा याकूब अ. यांनी, त्यांना इजिप्त मध्ये प्रवेश करताना शहराच्या वेगवेगळ्या दरवाजाने प्रवेश करायचा सल्ला दिला..

सर्व भाऊ बनी अमीन सोबत इजिप्तकडे निघाले..पूर्ण रस्ता मोठ्या भावांनी बनी अमीन ला टोमणे मारले आणि चिडविले..जेव्हा ते इजिप्तला पोहोचले आणि युसुफ अ. यांच्या जवळ गेले.

युसुफ अ. यांनी, त्यांच्या सख्ख्या भावाला लगेच ओळखले आणि त्याला स्वतःविषयी सांगितले..त्यांनी हे ही सांगितले की, मोठे भाऊ ज्या पद्धतीने वागवीत आहेत, त्याची यापुढे काळजी करायची आवश्यकता नाही…जे अन्न धान्य ते विकत घेण्यासाठी आले होते ते त्यांनी दिले.

पण जाण्याआधी एक चांदीची वाटी युसुफ अ. यांनी बनी अमीन च्या उंटावरच्या पिशवीत ठेवली.. सर्व भाऊ जसे निघणार होते, राजाच्या सेवकांना राजाची चांदीची वाटी हरवल्याचे आढळले…त्यांनी तांडा (उंटांच्या गाड्यांचा समूह) थांबवला आणि त्यांच्या समानांत शोधले.. वाटी बनी अमीन च्या उंटावरील पिशवीत सापडली…

हा इजिप्तचा कायदा होता की, कोणताही चोर, जिथे त्याने गुन्हा केला, ते शहर सोडून जाऊ शकत नाही…त्यामुळे बनी अमीनला जाण्याची आज्ञा नव्हती…

हेच युसुफ अ. यांना पाहीजे होते…यामुळे युसुफ अ. यांना, त्यांच्या लहान भावाला त्यांच्याजवळ ठेवण्यासाठी निमित्त मिळाले होते…बनी अमीनलाही हे कळले होते…

पण त्याचे मोठे भाऊ अत्यंत चिंता करू लागले..कारण त्यांनी त्यांच्या पित्याला याकूब अ. यांना, बनी अमीनला सुरक्षित वापस आणण्याचे वचन दिले होते…त्यांनी युसुफ अ. कडे विनवणी केली की, "त्याला (बनी अमीनला) जावू द्यावे आणि आमच्या पैकी एकाला त्याच्या जागी ठेवून घ्यावे."…पण युसुफ अ. मानले नाही…

ते म्हणाले, "हे चूक आहे की, ज्याने गुन्हा केला त्याच्या ऐवजी दुसऱ्या कुणाला ठेवून घ्यावे"…

सर्व भाऊ यावर खूप उदास झाले होते..सर्वात मोठा भाऊ म्हणाला, "मी माझ्या वडिलांना बनी अमीन बद्दल शब्द दिला आहे..मी त्याच्याविना जाणार नाही..जोपर्यंत अल्लाह याविषयी काही ठरवत नाही.."

बाकीचे सर्व भाऊ घरी गेले आणि त्यांच्या वडिलांना सगळी कहाणी सांगितली, "तुमचा मुलगा चोर आहे, हे सगळे त्याच्यामुळे घडले…"

याकूब अ. हे विश्वास करण्यासाठी तयार नव्हते. "हे अशक्य आहे..बनी अमीन कधीही चोरी करणार नाही…पण जरी मी त्यासाठी काही करू शकत नसलो तरी मी धीर धरेन आणि तक्रार करणार नाही…"

याकूब अ. यांनी  त्यांचे, दिवस आणि रात्र दुःखात आणि प्रार्थना करण्यात घालविले…ते इतके रडले की, त्यांची दृष्टी गेली..पण त्यांनी धीर सोडला नाही…

त्यांची मुले त्यांच्यावर नाराज झाली. ते म्हणाले, "जर तुम्ही रडणे थांबवले नाही, तर तुम्ही मरून जाल…"

"मी तुम्हाला काहीच म्हणत नाही…मी फक्त माझ्या अल्लाहला मदत मागत आहे…आणि त्याच्यातर्फेच मदत मिळेल, तुमच्याकडून नाही" युसुफ अ. म्हंटले… 

याकूब अ. यांनी त्यांच्या मुलांना, वापस इजिप्तला जावून युसुफ अ. आणि बनी अमीनला बघून येण्यास सांगितले आणि आशा सोडली नाही…

सर्व भाऊ युसुफ अ. यांच्या जवळ तिसऱ्या वेळेस गेले आणि म्हणाले, "आम्ही वापस आलो, कारण आमची गरज आहे…आमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत, तरी कृपा करून आम्हाला आमच्या कुटुंबासाठी धान्य द्या. आमच्यावर दया दाखवा..आम्ही तुमचे खरेच खूप आभारी राहू.."

युसुफ अ. यांना, त्यांच्याच कुटुंबाची दशा ऐकून खूप वाईट वाटले..पण त्यांना, त्यांच्याशी केलेल्या त्यांच्या निर्दयीपणाची आठवण करून द्यायची होती. "आठवा, तुम्हाला एक भाऊ होता का…युसुफ?..त्याच्याशी तुम्ही काय केले?"

तेव्हा त्यांना जाणीव झाली की, 'हा चांगला माणूस खरंच त्यांचा भाऊ, युसुफ आहे…ज्याला त्यांनी विहिरीत फेकून दिले होते '….

"तू खरच युसुफ आहे का?" त्यांना विश्वास बसत नव्हता आणि स्वतःची लाज ही वाटत होती…

"हो" युसुफ अ. यांनी उत्तर दिले…

"खरंच आम्ही चुकलो…आम्हाला माफ कर"

युसुफ अ. यांनी त्यांना माफ केले..आणि अल्लाहला प्रार्थना केली की, "त्यांच्यावर कृपा दृष्टी व्हावी"…

मग त्यांनी त्यांच्या पूर्ण कुटुंबाला इजिप्तमध्ये आणण्यास सांगितले…युसुफ अ. यांनी त्यांच्या वडिलांसाठी, त्यांचा सदरा दिला आणि म्हटले की, "हा सदरा त्यांच्या डोळ्यावर लावा…आणि त्यांची दृष्टी परत येईल.."

कानान ला तांडा ( उंटाच्या गाड्या) वापस येण्याआधीच याकूब अ. म्हणाले की, "हवेत युसुफच्या असण्याचा आभास होत आहे"..

लोक बोलत राहिले की, "खरंच तुमचे डोके काम करीत नाही…हे कसे शक्य आहे जर युसुफचे काहीच शिल्लक राहिले नाही?"

पण याकूब अ. यांना खात्री होती की, त्यांचा मुलगा जिवंत आहे…

लवकरच त्याची मुले, युसुफ अ. बद्दल चांगली बातमी घेऊन घरी पोहोचली…आणि त्याचा सदरा, त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर ठेवला…याकूब अ. यांना, लगेच दृष्टी वापस मिळाली आणि ते म्हणाले, "मी म्हणालो नव्हतो का की, जे अल्लाहकडून मला कळले, ते तुम्हाला नाही कळले..मी अल्लाहला तुम्हाला माफ करण्यासाठी प्रार्थना करेल…

नंतर पूर्ण कुटुंब इजिप्तला गेले…युसुफ अ. आता इजिप्तचा राजा बनले होते…ते त्यांना घेण्यासाठी शहराच्या गेट पाशी आले.. त्यांनी त्यांच्या पित्याला खूप आदराने आणि सन्मानाने, त्यांच्या दरबारात संरक्षण दिले. जेव्हा युसुफ अ. त्यांच्या सिंहासन वर चढले, तेव्हा त्याच्या कुटुंबासह सर्वांनी त्यांना वाकून प्रणाम केला…

आणि अशा प्रकारे त्यांचे बालपणाचे स्वप्न खरे झाले की, त्यांचे आईवडील आणि अकरा भाऊ, जे स्वप्नात सूर्य, चंद्र आणि तारे होते, ते त्याला वाकून प्रणाम करीत होते…


अय्युब चा संयम

💞💞अय्युब चा संयम 💞💞
दीर्घकाळाच्या आणि वेदनादायक आजाराने अय्युबला अशक्त आणि अवतीभोवती फिरण्यास असमर्थ बनविले होते. तो वर्षांपासून एक असहाय्य आजारी बनून राहिला होता. त्याच्या जागी दुसरा व्यक्ती असता तर, त्याचे धैर्य खचले असते आणि अल्लाहची निष्ठा हरवली असती आणि वेदनेने तो ओरडला असता. त्याने अल्लाहला असे दुःख आणि अस्वस्थता देण्याविषयी, ज्यात त्याचा स्वतःचा काही दोष नाही, तक्रार केली असती. पण अय्युबने संयमानेे आणि अल्लाहच्या निष्ठेत कणखर राहून त्रास सहन केला. त्याने त्याच्या दुःखाविषयी कधीही तक्रार केली नाही.
लोकांनी त्याला भेटण्यास येणे बंद केले आणि त्याला मरण्यासाठी सोडून दिले. फक्त त्याच्या पत्नीने त्याची सेवा केली आणि त्याला प्रवृत्त केले.आणि एकदा तीही एका क्षणासाठी खूप त्रासाने आणि खिन्नतेने, असंयमित झाली आणि तिने अल्लाहला तक्रार केली. यामुळे अय्युब खूप दुखवला. तो, ज्याने , ज्याने एक शब्द ही न उच्चारता, इतक्या दिवसापासून इतका जास्त त्रास सहन केला होता, अल्लाहचे आभार न मानण्याची वृत्ती सहन करू शकला नाही. त्याने, तो जेव्हा बरे होईल, तेव्हा त्याच्या पत्नीला शंभर वेळा मारण्याची शपथ (वचन) घेतली.तो हे कदाचित अशामुळे ही बोलला असेल, कारण तो इतका त्यावेळी असहाय्य होता की, तो किंचाळू शकत नव्हता. त्याचा राग कोणत्याही तऱ्हेने व्यक्त करू शकत नव्हता.
एक पूर्ण असहाय्यतेच्या दशेत, अय्युबने अल्लाहला प्रार्थना केली, की त्याच्यावर दया होवू दे आणि या वेदनेतून त्याची सुटका कर. अल्लाहने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याच्यावर कृपा केली. अल्लाहने आदेश दिला की, जेथे तो झोपलेला आहे, तेथे त्याचा पाय जमिनीवर आपट. अय्युबने आदेश पाळला आणि जेव्हा त्याने असे केले, ताजे पाणी तेथपासून उसळून वाहू लागले.अल्लाहने त्याला म्हंटले की, पाणी पी आणि त्यात स्नान कर. एक वेल त्यात वाढला आणि जेथे तो आराम करत होता तेथे त्याला सावली दिली.
अय्युब अल्लाहच्या कृपेने बरा झाला, पण जेव्हा त्याला आठवले की, त्याने बरे झाल्यानंतर, त्याच्या पत्नीला मारण्याची शपथ घेतली होती, तो अस्वस्थ आणि दुःखी झाला. एकीकडे त्याने अल्लाहचे नाव घेऊन केलेले वचन होते आणि दुसरीकडे त्याची पत्नी होती, जिला तो प्रेम करत होता. तो त्याचे वचन तोडू शकत नव्हता, पण त्याच्या पत्नीला मारहाण करण्याचा विचार त्याला नाखूष करत होता.या अवघड प्रसंगातून बाहेर येण्यासाठी अल्लाहने त्याच्या सद्गुणी संदेशवाहकाची मदत केली.त्याने आज्ञा केली की शंभर गवताच्या काड्या जमा कर आणि त्याने त्याच्या पत्नीला एकदाच मार. अशाप्रकारे तो त्याचे वचन ठेऊ शकला आणि त्याच्या पत्नीला वेदना झाली नाही.
अल्लाहने त्याच्या कृपेने अय्युबला बरे केले, त्याच्या कुटुंब आणि मित्रांसोबत त्याला एकत्र केले आणि त्याला पुष्कळ संपत्ती आणि सुख दिले.
अय्युबच्या प्रार्थनेने खूप व्यक्तींना समाधान मिळते, जेव्हा तो निराशेच्या काळात ती प्रार्थना करतो.
#अय्युबचाकुराणसंदर्भ #इस्लाम #मुस्लिम #मुसलमन #कुराण #एकेश्वर #ईश्वर

#कुराणसत्यकथा


इस्लाम आणि कुराण चा इतिहास…

🌿इस्लाम आणि कुराण चा इतिहास…🌿
अल्लाहने लाखो प्रेषित (संदेष्टा, अल्लाह चा संदेश मनुष्या पर्यंत पोहोचविणारा) पाठविले…जे प्रत्येक जातीत एकाच परमात्म्याची,अल्लाहची आराधना करण्यास सांगायचे….

कुराणमध्ये पंचवीस प्रेषित( संदेष्टा, अल्लाह चा संदेश मनुष्या पर्यंत पोहोचविणारा) नाव आहे…कुराण, बायबल आणि तोराह या ग्रंथांत सारखाच इतिहास आहे…

वर्ष आणि संदेशवाहकांचे नाव..आणि स्थान
खालीलप्रमाणे….

  1. आदम (4000 Before Christ) - (हव्वा,हाबील आणि काबील )(श्रीलंका, सौदी अरब)
    यांना सहीफा म्हणजे छोटा ग्रंथ दिला..
    "शीस" यांनाही छोटा ग्रंथ दिला गेला…
  2. इद्रीस
  3. नुह (3761 BC)(तूर्क)
  4. हुद (3000 BC)(सौदीअरब)
    *उजैर
  5. सालेह (2520 BC) (सौदी अरब)
  6. लुत(सौदी अरब)(2000BC)(इजिप्त,सौदी अरब)
  7. इब्राहीम (2000 BC )(इराक, फिलीस्तीन,इजिप्त,सौदी अरब ) यांना सहिफा म्हणजे छोटा ग्रंथ दिला…
  8. इस्माईल (2000BC) (सौदी अरब)
  9. इसाक (2000BC)
  10. याकूब (इस्राईल,इजिप्त)
  11. युसुफ (इस्राईल, इजिप्त)
  12. शुएब
  13. अय्युब
  14. मुसा (1817 BC) (इजिप्त, इस्राईल) यांना "Torah म्हणजेच तौरेत" हा ग्रंथ
    देण्यात आला….
  15. हारून (1817BC) इजिप्त ,इस्राईल
    *खिझ्र
  16. धुल किफ्ल
  17. दाऊद (इस्राईल)(1000 BC) यांना "जबूर" हा ग्रंथ देण्यात आला..
  18. सुलैमान (इस्राईल)(1000BC)
  19. इलियास
  20. अलयशा
  21. युनूस
  22. जकरिया
  23. याहया
  24. ईसा( येशू) (6-4 BC ) (इस्राईल) यांना "बायबल म्हणजेच इन्जील" हा ग्रंथ देण्यात आला...
  25. मुहम्मद (570 AD) (सौदी अरब) यांना "कुराण" हा ग्रंथ देण्यात आला… 2020 AD- सध्याचे वर्ष येशू ख्रिस्त म्हणजेच ईसा मसिह हे जेव्हा या जगातून गेले.(त्यांना वर उचलण्यात आले आणि ते पुन्हा जमिनीवर येणार यांच्याविषयी सविस्तर पुढच्या लेखात) तेव्हापासून ची तारीख 01.01.0001
    अशी धरण्यात आल्यावर त्या आधीचा जो इतिहास आहे त्याला BC म्हणजे Before Christ म्हणजे येशू ख्रिस्त पूर्वीचा काळ असे म्हणतात…आणि त्यानंतरचा काळ याला AD म्हणजे Anno Domini म्हणजे येशू ख्रिस्त नंतरचा काळ असे म्हणतात….

BC म्हणजे Before Christ….
AD म्हणजे Anno Domini

शनिवार, १३ जून, २०२०

02. नूह अ.आणि नौका...

जेव्हा मानवजात या जगात पसरली…काही लोकांनी अल्लाहची शिकवण लक्षात ठेवली पण जास्त करून लोकांनी लक्षात ठेवली नाही…ते अल्लाहविषयी विसरून गेले आणि दगडाच्या प्रतिमा बनवून आराधना करू लागले…त्यांना अल्लाहची शिकवण आठवून देण्यासाठी, अल्लाहने एक संदेशवाहक त्यांच्याकडे पाठविला… नूह अ.  (नोआ), जे त्यावेळचे एक चांगले व्यक्ती होते. 

नूह अ.  यांनी लोकांना सांगितले की, चांगले बनण्यासाठी, अल्लाहची आज्ञा पाळा…आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवा की, जर ते चांगले होतील, तर ते वापस स्वर्गात जातील…त्यांनी त्यांना फक्त एका अल्लाहची प्रार्थना करण्यास सांगितले, जो त्यांना बनविणारा आहे आणि दगडाच्या प्रतिमेची आराधना करण्यास थांबविले…पण ते लोक खूप आज्ञा भंग करणारे होते…त्यांनी पुरुषांच्या, स्त्रीच्या, सिंहांच्या, घोड्याच्या आणि खूप काही प्राण्यांच्या पुतळ्यांची आराधना करने चालूच ठेवले…

नूह अ. यांनी त्यांना समजावले की, "हे दगड तुम्हाला काहीही देऊ शकत नाही…जर तुम्हाला काही पाहिजे आहे, तर त्यासाठी अल्लाहला मागा…"

नूह अ. यांनी कारण दिले, "तुम्ही सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि आकाश पाहत नाही का? यांना कोणी बनविले…अल्लाहने या सर्वांना बनविले…तुम्हाला जाणीव होत नाही का की, अल्लाहने तुम्हालाही बनविले आणि तुम्हाला मृत्युनंतर अल्लाहकडेच वापस जायचे आहे…"

नूह अ. यांनी विनवणी केली," मी म्हणत नाही की, मी अल्लाहचा दूत आहे…किंवा मला जे अज्ञात आहे त्याचे ज्ञान आहे…मी हेही म्हणत नाही की, माझ्याकडे लपलेला खजिना आहे…मी फक्त एवढेच म्हणत आहे की, एकाच अल्लाहला माना आणि तुमच्या स्वतःच्या चांगल्यासाठी त्याची आज्ञा पाळा…माझा विश्वास करा…मला या बदल्यात काहीही नको आहे…"

नूह अ. एक खूप सहनशील व्यक्ती होते…त्यांनी लोकांना उपदेश करून अल्लाहचा संदेश देणे नऊशे (900) वर्षांपर्यंत चालू ठेवले… त्याला खूप मोठे आयुष्य होते…पण फक्त काहीच चांगल्या लोकांनी अल्लाहचा संदेश स्वीकार केला…

नूह अ.  खूप नाखूष होते…त्यांनी अल्लाहकडे प्रार्थना केली…अल्लाह म्हंटले, "नूह, दुःखी होऊ नकोस…तुझ्याकडून जितके झाले तितके तू खूप चांगले काम केले आहे…हे दुष्ट लोकं एक भयानक शिक्षा भोगण्याच्या लायक आहेत…ते नष्ट होतील…त्यांना या शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही…"

अल्लाहने नूह अ. यांना एका मोठ्या वादळाविषयी सांगितले, जे या विश्वास न करणाऱ्या लोकांना जिवे मारेल…अल्लाहने नूह अ. यांना सल्ला दिला की, एक लांब नाव बनव आणि त्यावर स्वतःला आणि तुझ्या अनुयायींना, येणाऱ्या पूरापासून सुरक्षित करण्याची पूर्ण तयारी कर…

जेव्हा लोकांनी पाहिले की नूह अ.  नाव बनवीत आहे…ते त्याच्याकडे पाहून हसले…आणि म्हणाले की, " तर तू पूरासाठी तयारी करत आहे, नाही का? आणि तू त्यात (नावेत) स्वतःला वाचवशील? हss."..पण नूह अ. यांनी  त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि नाव बनविणे चालू ठेवले…

जेव्हा नाव तयार झाली, तेव्हा अल्लाहने नूह अ. यांना आज्ञा केली आणि वादळ येण्याआधी, त्याच्या अनुयायींना, आणि सगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या, एका जोडीला त्याच्यासोबत, नावेत घेऊन जाण्यास सांगितले…

नूह अ. यांनी, अल्लाहने जी आज्ञा केली होती, ते सर्व केले…पण नूह अ. यांना  त्याच्या मुलाविषयी, कानान (याम) विषयी काळजी वाटत होती…ज्याने अल्लाहची आज्ञा पाळली नव्हती…तो विश्वास करणारा नव्हता…. नूह अ. यांनी अल्लाहला विचारले, कानान चे काय होईल?…तो माझ्या कुटुंबातला आहे….तो वाचविला जाईल का?


आणि अल्लाहने उत्तर दिले, "नाही, नूह, जो माझी आज्ञा पाळत नाही, तो तुझ्या कुटुंबातला नाही…आणि तुला त्याच्यासाठी वाईट वाटले नाही पाहिजे…तुझे कुटुंब त्यांच्यात आहे ज्यांनी तुझ्या अल्लाहची आज्ञा पाळली आणि तुझीही…

शेवटी जेव्हा सगळी तयारी पूर्ण झाली, तेव्हा एक वादळ आले…कुणीही याआधी एवढे मोठे वादळ पाहिले नव्हते…ती एक शिक्षा होती ज्याचे अल्लाहने वचन दिले होते…की जर लोकांनी त्यांची पद्धत (रस्ता) बदलली नाही, तर अल्लाह वादळ पाठवेल…खूप जोरदार पाऊस आकाशातून खाली आला (ढग फाटले) आणि जमिनीतून पाणी उफाळून वर आले…

जसे ते सर्व नावेत बसले, नूह अ. यांनी पुन्हा कानान (Yam) ला आवाज दिला…आणि अल्लाहची आज्ञा पाळायला आणि त्याचा संदेश स्वीकार करायला सांगितला ज्यामुळे तो वाचेल…पण कानान खरच फार हट्टी होता…तो म्हणाला, "नाही…मी येणार नाही…मी पर्वत चढेन आणि स्वतःला वाचवेन…"पण त्यानंतर लगेच एक मोठी लाट त्यांच्यामध्ये आली आणि कानान, त्याच्या सोबतच्या दुसऱ्या सर्व विश्वास न करणाऱ्या लोकांसोबत मरण पावला…

नूह अ. यांची नाव जुडी पर्वता जवळ पोहोचली (आताचे अरारात पर्वत जे तुर्कीत आहे)
ते सर्व लोक जे नाव मध्ये होते ते वाचविले गेले…

नूह अ. यांना, दुसरा आदम म्हणतात…कारण जवळपास प्रत्येक जण त्या भयंकर पुरामध्ये मरण पावला होता…फक्त नूह अ.  आणि त्यांचे काही अनुयायी, या जगात पुन्हा नवीन जीवन सुरू होण्यासाठी वाचविले गेले होते…


शुक्रवार, २९ मे, २०२०

04. सालेह अ. आणि अल्लाह ची उंटणी

सौदी अरेबिया मध्ये अल - हिज्र  किंवा मैदाने सलिह, हिजाजी पर्वत भागात

ही सत्यकथा साधारणतः 4540 वर्षांपूर्वीची म्हणजेच 2520 BC मधील सौदी अरब या देशातील आहे...

जे लोकं जिवंत होते, त्यांना 'समूद ' म्हणले जायचे, हे लोक गोरे, उंच आणि देखणे होते...

त्यांनी डोंगरापासून कोरून भव्य घरे बनविली...आणि मैदानातील जमिनीवर सुंदर राजवाडे बनविले...पण ते कृतघ्न लोक होते...आणि त्यांनी अल्लाहची आज्ञा पाळली नाही...
अल्लाहने त्यांच्यामधलाच एक संदेशवाहक पाठविला...त्याचे नाव होते सालेह अ.   

सालेह अ. यांनी समुदच्या लोकांना चांगले वागून, फक्त एकाच अल्लाहवर विश्वास करायला सांगितले...त्या लोकांत गरीब लोकांनी त्याचे ऐकले, पण श्रीमंत लोकांनी ऐकले नाही....
ते पूर्ण गर्विष्ठ होते आणि गरिबांना कमी लेखत होते...ते म्हणाले, "सालेह, तू आमच्या सारखाच आहेस...तुला काय झाले आहे? की तू आम्हाला आमच्या आराध्यची, प्रतिमांची आराधना करण्यास थांबवत आहे..."
सालेह अ. म्हणाले, मी अल्लाहचा संदेशवाहक आहे...अल्लाहने मला तुम्हाला सत्य सांगण्यासाठी पाठविले आहे...अल्लाहने तुम्हाला या धरतीपासून बनविले आहे आणि तुम्हाला धरतीवर जगायची परवानगी दिली आहे...अल्लाहने तुम्हाला बाग, झरे, कुरण (गवतासाठी राखलेले मैदान), स्वादिष्ट आणि मऊ खजूर आणि सुंदर घरे दिली...

तुम्ही जी त्याची अवज्ञा करीत आहात त्यासाठी त्याची क्षमा मागा...
याबदल्यात मला तुमच्याकडून काही नको आहे...मी तुम्हाला फक्त एकाच अल्लाहवर विश्वास ठेवण्यास सांगत आहे...ज्याने तुम्हाला प्रत्येक गोष्ट दिली...

पण समुदच्या श्रीमंत लोकांनी नाराजी दाखविली...आणि म्हणाले, "ठीक आहे, तुझ्या अल्लाहला सांग की, एक चमत्कार दाखव...मग आम्ही त्या अल्लाहवर विश्वास करू...त्याला मानू...
त्यांनी सालेह अ. यांना, अल्लाहला विनंती करून, एका डोंगरातून एक जिवंत उंट, त्यांच्यासमोर बाहेर आणून दाखविण्यास सांगितले...

सालेह अ. यांनी अल्लाहकडे प्रार्थना केली...आणि अल्लाहने त्यांची प्रार्थना ऐकून समुदच्या  लोकांना, तो चमत्कार दाखवला जो चमत्कार त्यांनी दाखवायला सांगितला होता...

एक मादा उंट जिच्या पोटात वासरू होते, डोंगरातून, खडक दूर करून, बरोबर त्यांच्या डोळ्यासमोर  बाहेर आली...

सालेह अ. म्हणाले, आता तुम्ही चमत्कार पहिला...तुम्हाला जे पाहिजे ते मिळाले आहे...ही मादा उंट पवित्र आहे...आणि अल्लाहने तुमच्या विनंतीवरून पाठविली  आहे...,ज्यामुळे तुम्हाला अल्लाहची उपस्थिती पटावी...ही अल्लाहची इच्छा आहे की, ती शेतात आणि रानात चरावी...आणि तिने एक दिवस ज्या ठिकाणी पाणी पिले.. तुम्ही दुसऱ्या दिवशी तेथून पाणी काढावे... आळीपाळीने...
तुमच्यापैकी कुणीही त्या मादा उंटची आणि तिच्या बछड्याची पाळी घेणार नाही...सालेह अ. यांनी हे ही सांगितले की, जर त्या मादा उंटीनीला कुणी त्रास दिला, तर अल्लाहकडून शिक्षा दिली जाईल...

प्रथम समुदचे लोक प्रभावित झाले आणि घाबरले...त्यांनी चमत्कार होतांना पाहीला होता आणि विश्वास केला की,  उंटीनी, जी डोंगरातून निर्माण झाली आहे, ती खरंच अल्लाहकडून पाठविण्यात आली आहे, जसे त्यांनी अल्लाहला विनंती करण्यास सांगितले होते...

पण लवकरच त्यांनी, त्या उंटीनीचे आणि तिच्या बछड्याचे, चरण्याचे आणि पाणी पिण्याचे (एक दिवसाआडचे) आणि बिना अडथळ्याचे स्वातंत्र्य, याचा द्वेष करण्यास सुरू केला...

ते , त्यांचे पाणी त्या उंटीनी सोबत वाटण्यास (सहभागी करण्यास) इच्छुक नव्हते...त्यामुळे त्यांनी एक योजना आखलीे..आणि एक दिवस त्यांच्यातील काहींनी तिला  जीवे मारले...


जेव्हा सालेह अ. यांनी, हे ऐकले तेव्हा ते खूप दुःखी झाले...त्यांनी समुदच्या लोकांना म्हंटले, "तुम्ही अल्लाहची आज्ञा न पाळून, पाप केले आहे...तुमच्यामुळे अल्लाह खूप रागावला आहे...आणि लवकरच तो तुम्हाला शिक्षा करेन"...


आणि अल्लाहने समुदच्या लोकांना, एक भयानक त्रासदायक आवाज, मेघ गर्जना आणि कडाक्याची वीज पाठवून, खूप कठोरपणे शिक्षा दिली...

समुदचे लोकं, ज्यांनी सालेह अ. यांचे ऐकले नव्हते, जेव्हा त्यांनी हा भीतीदायक आवाज ऐकला आणि मोठा भूकंप आला, तेव्हा त्यांच्या तोंडावर, जमिनीवर पडले...सकाळी ते सगळे त्यांच्या सुंदर आणि मजबूत घरांत, मृत आढळले होते...जी घरे त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी बांधली होती...
फक्त ते लोक ज्यांनी एका अल्लाहला मानले आणि विश्वास ठेवला आणि ज्यांनी सालेह अ. यांचे ऐकले ते वाचवले गेले होते....

03. हूद अ.

ही कथा 5050 वर्षांपूर्वीची म्हणजेच 3000 BC मधील आहे...
नूह अ.चे अनुयायी जे पूरामध्ये वाचलेले  होते, ते चांगले लोक होते...खूप वर्षांनंतर त्यांची मुले आणि नातवंड, त्यांच्या पूर्वजांनी आणि परदादा यांनी जे सांगून गेले, त्याला विसरून गेले...

हे लोक खूप उंच, गोरे आणि चांगल्या शरीरयष्टीचे होते...आणि त्यांना ' आद लोक ' असे म्हंटले जात होते...त्यांनी सुंदर घरे आणि शहरे बनविली...पुन्हा एकदा त्यांनी दगडाच्या प्रतिमांची आराधना करने सुरू केले...

त्यामुळे अल्लाहने अजून एक संदेशवाहक, ज्यांचे नाव हूद अ. होते, यांना पाठविले. त्या जमातीतील लोकांना अल्लाहच्या संंदेशाची आठवण करून देण्यासाठी हूद अ. ला पाठवण्यात आले होते...

हूद अ. यांनी आदच्या जमातीतील लोकांना सांगितले की, "मी अल्लाहचा संदेशवाहक आहे...त्याने मला, तुम्हाला हे सांगण्यासाठी  पाठविले आहे की, तुम्ही अजिबात योग्य करत नाही....आणि तुम्हाला आठवण करून देण्यासाठी की, अल्लाहने नूह अ. यांच्या वेळच्या लोकांना कशी शिक्षा केली आणि जे फक्त एकाच अल्लाहवर विश्वास करत नाहीत, त्यांचा कसा विनाश केला...

पण आदच्या जमातीतील लोकांनी हूद अ.यांचा सल्ला ऐकण्यास नकार दिला...ते हूद अ. वर आक्रमक झाले आणि म्हणाले, "तुझी इच्छा आहे का की, आम्ही आमच्या दगडाच्या प्रतिमा फेकून द्याव्या, ज्यांची आमचे पिता,आजोबा आणि परदादा आराधना करत होते...नाही हूद ss, आम्ही जे तू म्हणतो, ते कधीही करणार नाही...अल्लाहच्या शिक्षेविषयी सांगून आम्हाला घाबरवू नको....जर आम्ही अल्लाहची आराधना नाही केली तर त्याला, आम्हाला शिक्षा देऊ दे..."

हूद अ. म्हणाले, "ती शिक्षा खूप दूर नाही...तुम्ही त्यासाठी वाट पाहा...मी पण तुमच्या सोबत वाट पाहीन..."

लवकरच त्यांची जमीन कोरडी आणि पडीक झाली..तेथे पाऊस नव्हता, त्यामुळे खूप कमी पीक आले...

हूद अ. त्यांच्या जमातीतील लोकांना म्हणाले, "लोकहो, अल्लाहची क्षमा मागा...त्याची क्षमा याचना करा आणि तो खूप जास्त देईल...अल्लाह सर्व काही करू शकतो..."

"तुला जे म्हणायचे ते तू म्हणू शकतो, हूद ...पण आम्ही तेच करणार जे आमच्या पित्याने केले..." आदच्या जमातीतील लोकांनी म्हंटले....

हूद अ. यांनी, त्यांना, त्या फक्त एका अल्लाहला घाबरण्यास सांगितले, ज्याने त्यांना त्यांची मुले दिली...असे पाळीव प्राणी दिले (गुरे), ज्यामुळे त्यांना दूध आणि मांस मिळते आणि अजून खूप उपयोगी साधने दिली...

आदच्या जमातीतील लोक म्हणाले, आमच्यापेक्षा कोण जास्त शक्तीशाली आहे? (आम्हीच जास्त शक्तिशाली आहोत)

शेवटी अल्लाह, त्यांनी आज्ञापालन न केल्यामुळे खूप रागावला....त्याने एक खूप जोरदार वादळ (प्रचंड जोऱ्याचा वारा) पाठविले..जो आठ दिवस आणि सात रात्र चालला...त्यामुळे त्यांची शहरे उध्वस्त झाली, पुसली गेली आणि प्रत्येक जण मारला गेला...वादळ इतके शक्तिशाली होते की, त्याच्या रस्त्यातले सर्व धुळीसारखे वाऱ्याने उडून गेले... आदचे लोक आणि त्यांची मोठी आणि सुंदर घरे, उंच खंब्यासहित पृथ्वीवरून गायब झाली...

01.आदम अ. .. जगातील पहिले मानव

स्वर्ग हा खूप सुंदर बगीचा आहे. ज्याचा कुणी स्वप्नातही विचार करू शकत नाही.....तिथे सगळ्या प्रकारची फळझाडे आहेत...त्यात डाळिंब, अंगुर, ऑलिव...सर्व फळे जितका मनुष्य विचार करु शकतो...आणि त्याच्याहून आधिक.....

आणि त्या फळांच्या झाडांच्या मधून थंड आणि गोड पाण्याचे, दुधाचे आणि मधाचे झरे वाहत आहेत....

एक दिवस अल्लाहने स्वर्गात त्याच्या दूतांना म्हटले की, "माझी इच्छा आहे एक मनुष्य बनविण्याची"

दूत म्हटले, "आम्ही तुझ्या आज्ञा पाळत नाही का?"

अल्लाह म्हणाला, "मला चांगले माहीत आहे"

अल्लाहने ओल्या मातीपासून एक मनुष्य बनविला, आदम अ. (अडम)...आणि त्यात आत्मा (जीव) फुंकला...त्या मनुष्याने त्याच्या जीवनाचा पहिला श्वास घेतला...या प्रत्येक गोष्ट त्याला शिकविली. त्याला बोलण्यासाठी काही शब्द शिकविले... अल्लाहने त्याच्या सर्व दूतांना बोलावले आणि म्हटले, "हा आदम आहे...त्याला वाकून प्रणाम करा.."

सगळ्या दूतांनी आज्ञाचे पालन केले...फक्त एकाने केले नाही..तो होता इब्लिस (शैतान)...तो एक जिन्न होता...

तो म्हणाला, "मी का प्रणाम करू?..मी आगीने बनलो आहे आणि हा फक्त मातीने बनला आहे..मी याला प्रणाम करणार नाही"

अल्लाह इब्लीस वर रागावला आणि त्याला स्वर्गातून बाहेर केले... इबलीस (शैतान/लूसिफर/evil) ने तिथून जाताना प्रण केला की, "तो संपूर्ण मनुष्य जातीशी प्रलय (महाविनाश) (कयामत) येईपर्यंत बदला घेईल"

अल्लाहने म्हटले की, "चांगले मनुष्य तुझे ऐकणार नाहीत.."

अल्लाहने आदम अ. यांना  स्वर्गात राहायला परवानगी दिली.

आणि त्यांना सांगितले की, "तुला जे आनंद देईल ते तू कर..कोणतेही फळ खा...आणि जे तुला आवडेल ते तू पी... तू  स्वर्गातले प्रत्येक फळ खावू शकतो, फक्त एका झाडाचे फळ तू खायचे नाही.."

आदम अ. यांनी सर्व मजा केली...आनंद घेतला...पण लवकरच त्यांना एकटेपणा जाणवू लागला..त्यांना मित्र नव्हते...म्हणून त्यांनी अल्लाहला म्हटले, "कृपा करून मला एक सोबती दे". अल्लाहने त्यांच्या बरगडीच्या (rib) हाडापासून, एक स्त्री बनविली आणि त्यांना एक पत्नी दिली... हव्वा अ. (एव्ह).

इबलीस चालाक होता..त्याने विचार करण्यास सुरू केला की, आदम अ. यांना अल्लाहची अवज्ञा करण्यास कसे भाग पाडावे... 

एक दिवस आदम अ. आणि हव्वा अ. (अडम आणि एव्ह) स्वर्गात असताना, तो त्यांच्या कानात फुसफुसला की (बोलला) की, ज्या झाडाचे फळ खाण्यासाठी तुला मना केलेले आहे, ते फळ  छान आहे..तू जर ते खाशील तर तू नेहमीसाठी जिवंत राहशील...त्यांना मोह झाला...दोंघांनी इबलिस चे ऐकून त्या झाडाकडे जावून ते फळ  खाल्ले.... ते फळ खाताच, त्यांना याची जाणीव झाली की, त्यांनी खूप मोठी चूक केली आहे...त्यांना लाज वाटली...कारण त्यांचे काही अंग हे दिसू लागले होते...झाडाच्या पानांमध्ये ते दोघे स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करू लागले...पण अल्लाहला सर्व माहीत होते आणि तो सर्वीकडे असतो... अल्लाह त्यांच्यावर खूप रागावला,..." मी तुला चेतावणी दिली होती...की त्या मना केलेल्या झाडाचे फळ खावू नको...पण तू माझी आज्ञा पाळली नाही.... आता तुझी जागा धरतीवर  आहे...स्वर्गात नाही"...
अल्लाहने दोघांना स्वर्ग सोडून धरतीवर जाण्यास सांगितले.. त्या दोंघांनी ही एक चूक केली होती..पण त्यांना अल्लाहची अवज्ञा करायची नव्हती... त्यांना त्याचा खूप पश्र्चाताप  होत होता..त्यांनी अल्लाहकडून काही माफी मागण्याचे शब्द शिकून घेतले... ते खूप रडले आणि त्यांनी अल्लाहकडून माफी मागितली...शेवटी अल्लाहला त्यांच्यावर दया आली...अल्लाहने म्हटले की जर तुम्ही चांगले काम (कर्म) केले आणि माझी आज्ञा पाळली, तर मी तुम्हाला वापस  स्वर्गात, जी एक सुंदर बाग आहे, बोलावेन...पण तुमच्या मृत्यूनंतर...पण जर चांगले काम (कर्म) केले नाही आणि आज्ञा पाळली नाही तर मृत्यूनंतर खूप भयानक नरकात जावे लागेल....

ही घटना साधारणतः 6000 वर्षांपूर्वीची आहे...आदम अ. यांना श्रीलंकेतील एका डोंगरावर उतरविण्यात आले आणि हव्वा अ. यांना अराफात या डोंगरावर उतरविण्यात आले...
( Search Wikipedia)

आदम अ. आणि हव्वा अ. यांनी त्यांचे उरलेले जीवन धरतीवर चांगले काम (कर्म) करण्यात आणि अल्लाहची आज्ञा पाळण्यात घालविले...त्यांना आशा होती की, ते पुन्हा अल्लाहला आनंदी करून त्यांच्या मृत्यूनंतर स्वर्गात जातील.....

त्यांना खूप मुले आणि नातवंड झाली...सर्व मानवजात त्यांची पिढी आहे...त्यामुळे आदम अ. यांना father of  human race   हव्वा अ. यांना mother of human race म्हंटले जाते....

आदम अ. आणि हव्वा अ. धरतीवर राहायला आले...जग खूप मोठे होते...अल्लाहला वाटत होते की जग माणसांनी भरून जावे...

त्याला प्रत्येक जागी...सर्वात थंड ठिकाणी आणि सर्वात गरम ठिकाणी, वाळवंटात, जंगलात आणि डोंगरावर मनुष्य हवा होता...त्यामुळे अल्लाहनेे आदम अ. आणि हव्वा अ. यांना असा आशीर्वाद दिला, ज्यामुळे त्यांना खूप दिवसांपर्यंत, रोज दोन मुले होत होतीे, एक मुलगा आणि एक मुलगी..त्यांना खूप खूप मुले झाली, मुले आणि मुली...लवकरच मानवजात पूर्ण धरतीवर पसरली...एकच माता आणि पित्याचे, आदम अ. आणि हव्वा अ. यांची सगळी मुले होती...पांढरे, काळे आणि पिवळे (wheatish) त्वचेचे चे लोक झाले...

आदम अ. आणि हव्वा अ. यांची दोन मुले हाबिल (अबेल) आणि काबील (केन) ह्या दोघांना, एकाच मुलीशी लग्न करायची इच्छा होती, जी खूप सुंदर होती...त्यांना माहीत नव्हते की, कसे ठरवावे की दोघांपैकी कोण लग्न करू शकेन?...म्हणून आदम अ. यांनी, त्यापैकी प्रत्येकाला अल्लाहला  मेंढी अर्पण करण्यासाठी सांगितले...ज्याची अर्पण केलेली मेंढी अल्लाह स्वीकार करेल, तो त्या मुलीशी लग्न करेल...

हाबिल ज्याचा हेतू चांगला होता, त्याने एक चांगली मेंढी, अल्लाहला अर्पण करण्यासाठी निवडली.. काबीलने चांगली त्याच्या स्वतःसाठी ठेवली आणि थोडी अशक्त अर्पण केली...
अल्लाहने स्वाभाविकपणे हाबीलची अर्पण केलेली मेंढी स्वीकार केली...एक आग येऊन त्या मेंढीला घेऊन गेली...याचा अर्थ हाबीलला त्या मुलीशी लग्न करण्यासाठी अल्लाहची परवानगी होती...

काबील यावर खूप रागावला आणि बोलला की काहीही झाले तरी, तोच तिच्याशी लग्न करेन... हाबील ने लढण्यास नकार दिला...पण काबील उग्र होता. त्याने त्याच्या भावाला एका दगडाने मारले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला...

ही पहिली वेळ होती, ज्यात कुणी मनुष्याने दुसऱ्या मनुष्याचा वध केला होता...त्यामुळे हाबीलला मारल्यानंतर, काबील अतिशय घाबरला...त्याला मृत शरीराचे काय करावे, ते कळत नव्हते..त्याने ते मृत शरीर खांद्यावर घेतले आणि अवती भोवती असहाय्यतेने भटकू लागला...

अल्लाहने, दोन कावळे पाठविले, जे काबीलच्या समोर लढले आणि एक मारला गेला...दुसऱ्याने जमिनीत एक खड्डा केला आणि ते मेलेल्या  कावळ्याचे शरीर त्या खड्डयात ओढले आणि मातीने झाकले...

हे पाहून काबील ने, इतकेही माहीत नाही, जितके त्या कावळ्यालाही माहीत आहे...म्हणून स्वतःला दोष दिला...मग त्याने जमिनीत खोदून त्याच्या भावाला हाबीलला त्यात गाडले (दफन केले).

आजपर्यंत, जर कोणी त्याच्या भावाला मारतो (कारण आपण सगळे एकाच मातापित्याची मुले आहोत) तर, नेहमी दोष पहिल्या मारेकऱ्याला जातो ज्याने एक वाईट उदाहरण प्रस्तुत केले....



08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...