ही कथा 5050 वर्षांपूर्वीची म्हणजेच 3000 BC मधील आहे...
नूह अ.चे अनुयायी जे पूरामध्ये वाचलेले होते, ते चांगले लोक होते...खूप वर्षांनंतर त्यांची मुले आणि नातवंड, त्यांच्या पूर्वजांनी आणि परदादा यांनी जे सांगून गेले, त्याला विसरून गेले...
हे लोक खूप उंच, गोरे आणि चांगल्या शरीरयष्टीचे होते...आणि त्यांना ' आद लोक ' असे म्हंटले जात होते...त्यांनी सुंदर घरे आणि शहरे बनविली...पुन्हा एकदा त्यांनी दगडाच्या प्रतिमांची आराधना करने सुरू केले...
त्यामुळे अल्लाहने अजून एक संदेशवाहक, ज्यांचे नाव हूद अ. होते, यांना पाठविले. त्या जमातीतील लोकांना अल्लाहच्या संंदेशाची आठवण करून देण्यासाठी हूद अ. ला पाठवण्यात आले होते...
हूद अ. यांनी आदच्या जमातीतील लोकांना सांगितले की, "मी अल्लाहचा संदेशवाहक आहे...त्याने मला, तुम्हाला हे सांगण्यासाठी पाठविले आहे की, तुम्ही अजिबात योग्य करत नाही....आणि तुम्हाला आठवण करून देण्यासाठी की, अल्लाहने नूह अ. यांच्या वेळच्या लोकांना कशी शिक्षा केली आणि जे फक्त एकाच अल्लाहवर विश्वास करत नाहीत, त्यांचा कसा विनाश केला...
पण आदच्या जमातीतील लोकांनी हूद अ.यांचा सल्ला ऐकण्यास नकार दिला...ते हूद अ. वर आक्रमक झाले आणि म्हणाले, "तुझी इच्छा आहे का की, आम्ही आमच्या दगडाच्या प्रतिमा फेकून द्याव्या, ज्यांची आमचे पिता,आजोबा आणि परदादा आराधना करत होते...नाही हूद ss, आम्ही जे तू म्हणतो, ते कधीही करणार नाही...अल्लाहच्या शिक्षेविषयी सांगून आम्हाला घाबरवू नको....जर आम्ही अल्लाहची आराधना नाही केली तर त्याला, आम्हाला शिक्षा देऊ दे..."
हूद अ. म्हणाले, "ती शिक्षा खूप दूर नाही...तुम्ही त्यासाठी वाट पाहा...मी पण तुमच्या सोबत वाट पाहीन..."
लवकरच त्यांची जमीन कोरडी आणि पडीक झाली..तेथे पाऊस नव्हता, त्यामुळे खूप कमी पीक आले...
हूद अ. त्यांच्या जमातीतील लोकांना म्हणाले, "लोकहो, अल्लाहची क्षमा मागा...त्याची क्षमा याचना करा आणि तो खूप जास्त देईल...अल्लाह सर्व काही करू शकतो..."
"तुला जे म्हणायचे ते तू म्हणू शकतो, हूद ...पण आम्ही तेच करणार जे आमच्या पित्याने केले..." आदच्या जमातीतील लोकांनी म्हंटले....
हूद अ. यांनी, त्यांना, त्या फक्त एका अल्लाहला घाबरण्यास सांगितले, ज्याने त्यांना त्यांची मुले दिली...असे पाळीव प्राणी दिले (गुरे), ज्यामुळे त्यांना दूध आणि मांस मिळते आणि अजून खूप उपयोगी साधने दिली...
आदच्या जमातीतील लोक म्हणाले, आमच्यापेक्षा कोण जास्त शक्तीशाली आहे? (आम्हीच जास्त शक्तिशाली आहोत)
शेवटी अल्लाह, त्यांनी आज्ञापालन न केल्यामुळे खूप रागावला....त्याने एक खूप जोरदार वादळ (प्रचंड जोऱ्याचा वारा) पाठविले..जो आठ दिवस आणि सात रात्र चालला...त्यामुळे त्यांची शहरे उध्वस्त झाली, पुसली गेली आणि प्रत्येक जण मारला गेला...वादळ इतके शक्तिशाली होते की, त्याच्या रस्त्यातले सर्व धुळीसारखे वाऱ्याने उडून गेले... आदचे लोक आणि त्यांची मोठी आणि सुंदर घरे, उंच खंब्यासहित पृथ्वीवरून गायब झाली...