
🌴💕बिस्मिल्ला हिर्रहमान निर्रहिम 💕🌴मनुष्याचा धर्म कोणता?
'इस्लाम'
धर्मानुसार मनुष्य कोण आहे?
' मुसलमान '
इस्लाम काय शिकवतो?
'अल्लाह एक आहे.तोच आराधनेच्या आणि उपासनेच्या योग्यतेचा आहे '
अल्लाहचा पहिला संदेशवाहक कोण होता?
"आदम अलैहिस्सलाम"
शेवटचा संदेशवाहक कोण आहे?
"मुहम्मद सल्ललाहु अलैही वस्सलम" अल्लाह चे शेवटचे संदेशवाहक आहेत..
यांचा जन्म कुठे झाला?
' मक्का '
यांचे इंतेकाल ( निधन) कुठे झाले?
' मदिना '
मक्का शहर कोणत्या देशात आहे?
'सौदी अरब'
तेथील भाषा कोणती आहे?
' अरबी '
अल्लाह चा किताब ( ग्रंथ) कोणता?
" कुरआन शरीफ "
हा किताब ( ग्रंथ) कुठे संदेश वाहका वर प्रकट झाले?
काही मक्का आणि काही मदिना मध्ये (सौदी अरब या देशातील ही दोन शहरे आहेत)
इस्लाम चा कलिमा कोणता? ( अव्वल (पहिला) कलमा तय्यब )
"ला इलाहा इल्लल्लाहू मुहम्मदूर्रसुलुल्लाह"
शहादत चा कलमा काय आहे?(दोम (दुसरा) कलमा)
" अशहादु अल्लाह इलाह इल्ललाहु व अशहादु अन्ना मुहम्मदन अब्दुहू व रसूलुह"
महम्मद (स. अ. व.) कोण होते?
ते अल्लाहचे(परमात्म्याचे) शेवटचे "संदेशवाहक" होते...आपण त्यांचे अनुयायी आहोत...
ते कुठे जन्मले?
सौदी अरब मध्ये "मक्का" या शहरात ते जन्मले...
त्यांच्या पित्याचे आणि आजोबांचे नाव काय आहे?
त्यांच्या पित्याचे नाव "अब्दुल्लाह" आणि आजोबांचे नाव "अब्दुल मुत्तलिब" होते...
ते जीवनभर कोठे राहिले?
53 वर्ष वयापर्यंत ते मक्का येथे राहिले...त्यानंतर ते मदिना येथे स्थलांतरित झाले...आणि दहा वर्ष तेथे राहिले..आणि वयानुसार 63व्या वर्षी त्यांचे निधन झाले...
हे कसे समजले की ते संदेशवाहक आहेत?
त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या...अशा गोष्टी दाखवल्या आणि सांगितल्या जो कोणी मनुष्य सांगू अथवा दाखवू शकत नाही...
हे कसे कळले की कुराण अल्लाहचा(परमात्म्याचा) ग्रंथ आहे?
कुराण मुहम्मद( स अ व) यांच्याकडे एक फरिश्ता(स्वर्गदूत) घेऊन यायचा आणि ऐकवायचा...आणि ते वाक्य मुहम्मद (स अ व) यांना पाठ होऊन जायचे...
कुराण किती दिवसात त्यांच्यावर उतरला?
कुराण थोडा थोडा उतरला..कधी एक आयत ( वाक्य) ,कधी दोन चार आयते (वाक्य), कधी एक सुरत(धडा).
पूर्ण तेवीस वर्षांत कुराण उतरला...
अल्लाह चे किती ग्रंथ आहेत?
खूप किताब म्हणजेच ग्रंथ उतरले...मुख्य चार आहेत...
1. तोरेत- ही मुसा अलै. यांच्यावर उतरली...
2. जबुर- ही दाऊद अलै. यांच्यावर उतरली...
3.इंजील(बाइबल)- ही ईसा अलै. यांच्यावर उतरली...
4. कुराण - ही मुहम्मद (स अ व) वर उतरली...
पुढच्या भागात "कयामत" विषयी वाचा....फॉलो करा आणि शेअर करा लाईक करा...