पैगंबर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पैगंबर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ जून, २०२०

बादशाह_सुलेमान

बादशाह_सुलेमान

🌹🌹🌹सबा ची राणी 🌹🌹🌹
एक दिवस जेव्हा राजा सुलेमान ने दरबार भरवला होता, त्याच्या लक्षात आले की, हूदहूद( हुपू; hoopoe) गायब होता. तो त्याच्या अनुपस्थितीने नाराज झाला आणि म्हणाला," हुदहुद कोठे आहे? मला तो तुमच्यामध्ये दिसत नाही. जर अनुपस्थित राहण्याचे एक चांगले कारण नसेल तर, मी त्याला नक्कीच शिक्षा करेन."
तो असे म्हणत असतानाच, हुदहुद उडत आत आला आणि विलंब झाल्याने दिलगिरी व्यक्त केली.
" मी एका शक्तीशाली राज्य "सबा" बातमी आणली आहे. त्या राज्यावर एक राणी राज्य करते , जी एका उत्कृष्ट सिंहासनावर विराजमान होते. सबा येथील लोक, खऱ्या अल्लाहची उपासना सोडून, सूर्याची उपासना करतात." त्याने राजाला सांगितले.

"तू आमच्याशी खरे बोलत आहे का, हे आम्ही लवकरच माहीत करू," सुलेमान म्हंटला." हे घे, हे पत्र घेऊन सबा ला जा, तेथे ते पोहोचव आणि मग काय घडते ते पाहायची वाट पाहा.
हुदहुद ने सुलेमानचे पत्र घेतले आणि सबा ला जाण्यासाठी निघाला. तेथे त्याने राणीच्या समोर ते टाकले आणि शांतपणे काय घडते , ते पाहण्याची वाट पाहू लागला.

राणीने जेव्हा ते पत्र वाचले, तिच्या सल्लागाराला काय करावे असे विचारले. "येथे राजा सुलेमान कडून एक पत्र आहे. अल्लाहचा योग्य सन्मान करून आणि अल्लाहच्या नावाने सुरू केलेले आहे. त्याने अल्लाह सत्यनिष्ठेला विरोध न करता, मला समर्पण करण्यासाठी त्याच्याकडे बोलावले आहे."
मग राणीने थोडा वेळ विचार केला.आणि सुलेमानसाठी काही मौल्यवान भेटवस्तू पाठविण्याचा निर्णय घेतला.

पण सुलेमान काही साधारण राजा नव्हता. तो अल्लाहचा संदेश कर्ता (प्रेषित) होता. तो क्रोधित झाला, जेव्हा त्याने पाहिले की राणीने त्याच्या संदेशाचा कसा अर्थ लावला. त्याने तिच्या संदेश देणाऱ्याला भेटवस्तू सहित वापस पाठविले आणि त्याला म्हंटले की, "राणीला सांग की, जर त्याच्या अल्लाहच्या सत्य निष्ठेकडे बोलवण्याचे उत्तर भेटवस्तू असेल, तर तो सबाला सैन्यासह येईन."

आता राणी खरच घाबरली आणि तिने तत्काळ स्वतः सुलेमानकडे जाण्याचा निर्णय घेतला.जेव्हा सुलेमानला तिच्या येण्याचा हेतू कळला, त्याने त्याच्या दरबाऱ्यांना विचारले, "येथे कोणी आहे का, जो तिचे सिंहासन, ती इथे येण्याआधी आणू शकेल ."
एका जिन्नने उत्तर दिले की, "डोळ्यांची पापणी लवण्याआधी तो ते आणू शकेल." सिंहासन आणण्याचा आदेश देण्यात आला. जेव्हा तो आणला गेला, सुलेमानने त्याच्यात थोडा बदल केला.
जेव्हा राणी आली, तिला तो सिंहासन दाखविण्यात आला आणि विचारले," हे तुझे सिंहासन आहे का?" तिने लगेच त्या सिंहासनाला ओळखले, कारण ती खरोखर बुद्धिमान होती, पण तिने तिचे आश्चर्य लपविले आणि म्हणाली," हे तसेच दिसत आहे".
सुलेमानने तिला त्यानंतर एका सुंदर राजवाड्यात नेले, ज्याची फरशी चकाकणारी होती.तिने फरशीवर पाय ठेवण्यासाठी तिचा घागरा वर उचलला. कारण तिला वाटले की ते पाण्याचे तळे आहे. पण ती खरंच राजवाड्याची फरशी होती ज्याची पारदर्शक ( विशेष मौल्यवान काचेने) फरस बंदी केली होती.
(आच्छादली होती.) अशी त्या राजवाड्याची भव्यता होती.
जे अल्लाहने सुलेमानला बहाल केले होते, त्याने ती राणी इतकी प्रभावित झाली की ती अल्लाहच्या सत्यनिष्ठेला शरण गेली.
" मी स्वतःशी चूक केली आहे. आता सुलेमानसह मी या जगाच्या प्रभुला शरण जात आहे."
अशाप्रकारे सुलेमान त्या सुंदर राणीला अल्लाहची शक्ती पटविण्यास सक्षम झाला.

सुलेमानच्या पायाशी सर्व मौल्यवान सांसारिक (ऐहिक) खजिने होते. तरीही त्याची अल्लाहची श्रध्दा कमकुवत झाली नाही. तो नेहमी इतके जास्त देण्यासाठी अल्लाहला आभार मानत राहिला आणि गर्विष्ठ झाला नाही.

जेव्हा एकदा सुलेमान एका उत्कृष्ट मशिदीच्या बांधकामाची देखरेख करत होता. त्याच्यासाठी मृत्यूची वेळ आली. जेव्हा त्याला याची जाणीव झाली की, तो मरणार आहे, तो उरलेल्या बांधकामाच्या देखरेखी विषयी चिंताग्रस्त झाला. त्याला भीती होती की अडेल ( बेलगाम , ताब्यात न राहणारे) जिन्न अर्धवट काम सोडून, मोकळे सुटतील.
अल्लाहने याची काळजी घेतली. त्याच्या मृत्यूनंतर , जेव्हा बांधकाम पूर्ण केले जात होते, सुलेमान त्याच्या चालण्याच्या काठीचा आधार घेऊन उभा राहिला. जेव्हा किड्यांनी आतून काठी पोखरून खाल्ली आणि तो कोसळला, फक्त तेव्हाच सुलेमानच्या मृत्यूचे गुपित जिन्नांसमोर प्रकट झाले. जिन्नांनी ते सर्व , अल्लाहचे रहस्य न समजण्यालायक असल्यामुळे त्यांनी एकमेकांना शाप दिला. " जर आम्हाला याविषयी आधीच माहीत असते तर आम्ही या परिश्रमापासून खूप लवकर सुटका करून घेतली असती." ते म्हणाले.

कुराणसत्यकथा


युनूस अ. माशाच्या पोटात

🐳माशाच्या पोटात 🐳
युनूस हा एक ईश्वरनिष्ठ तरुण होता.जो "निनेवेह" ( सध्याच्या "मोसुल" च्या बाहेरील भागात असणारे एक प्राचीन शहर , इराक) येथे राहत होता. या ठिकाणचे लोक एकाच खऱ्या अल्लाहवर (ईश्र्वरावर) विश्वास ठेवत नव्हते. त्यामुळे अल्लाहने त्या लोकांसाठी युनुसला त्याचा संदेशकर्ता म्हणून निवडला. युनूसने अल्लाहच्या संदेशाचा उपदेश त्या लोकांना दिला. पण त्या लोकांनी त्यांच्या पद्धतीने अविचारीपने त्याचा उपदेश लक्षपूर्वक ऐकला, आणि जेव्हा तो म्हणाला एकच अल्लाह (ईश्वर, पालन कर्ता) आणि तो, अल्लाहचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे, त्यांनी त्याची थट्टा केली.
युनूस ने त्यांना विनवणी केली, अल्लाहच्या क्रोधाविषयी आणि दंडाविषयी (शिक्षा) चेतावणी दिली. पण काहीच अर्थ नव्हता. ते त्याला पाहून अजून हसले आणि विश्वास केला नाही. यामुळे युनूसची त्यांच्याकडून निराशा झाली. त्याने रागावून आणि अल्लाहच्या शिक्षेबद्दल चेतावणी देत, अल्लाहचा आदेश येण्याची वाट न पाहताच निनेवेह च्या लोकांना सोडले.
यावर निनेवेह च्या लोकांना काहितरी गंभीरपने चूक झाली आहे, याची जाणीव झाली.त्यांना त्यानंतर भीती वाटली आणि वाटले की, युनूस हा अल्लाहचा खरा संदेशकर्ता होता. त्याला त्रास देऊन, त्यांनी अल्लाहला नाराज केले आहे. आणि आता अल्लाहची दिलेली शिक्षा नक्कीच त्यांना नष्ट करू शकते..ज्या क्षणी त्यांना याची जाणीव झाली, ते पश्र्चाताप करण्यासाठी खुल्या जागेत आले, वाकून आणि अल्लाहकडे याचना करत, नमन करू लागले. त्यांनी क्षमा याचना केली आणि सत्य निष्ठा स्वीकार केली. त्यांनी इतक्या प्रामाणिकपणेे क्षमा मागितली की, अल्लाहने त्यांना क्षमा केली आणि त्यांच्यावर ती शिक्षा (दंड, आपदा) केली नाही, जी युनूस त्यांना चेतावणी देऊन गेला होता.

या काळात, युनूस ने त्याच्या लोकांना आणि निनेवेह ला रागात सोडल्यानंतर , तो दूर जावून, एका नौकावर चढला जी, त्या क्षणी समुद्रात प्रवासासाठी निघणार होती.
ती नौका, जी लोकांनी भरली होती समुद्रात निघाली, पण रस्त्यात, एक वादळ नौकेवर आदळले आणि नौका लहरींवर हेलकावे देऊ लागली.

त्याकाळी असे मानले जायचे की, जर एखादा पळपुटा गुलाम ( विकत घेतलेला नोकर, जशी त्या काळी माणसांना विकत घेऊन काम करवून घेण्यासाठी, "गुलाम" बनविण्याची पद्धत होती.), नौकेवर किंवा जहाजावर चढला तर, ते जहाज किंवा बोट बुडते.

या कारणामुळे लोकांनी संशय केला की, या बोटीवर, एक पळून आलेला गुलाम आहे. तो कोण आहे हे माहीत करण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकून, ज्या माणसाचे नाव येईल त्याला, नावेच्या बाहेर समुद्रात फेकण्याचा निर्णय घेतला..जेव्हा सगळ्या चिठ्ठ्यामधून, एका नावाची चिठ्ठी उचलण्यात आली, ते युनूसचे नाव होते. कोणीच युनूसवर विश्वास करण्यास तयार नव्हता की, युनूस पळून आलेला गुलाम नाहीं, कारण तो इतका सभ्य आणि धार्मिक वाटत होता.
तीन वेळा चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि प्रत्येक वेळेस युनूसचे नाव आले.
आता युनूसला खात्री झाली की, त्याने अल्लाहचा आदेश येईपर्यंत वाट पाहिली नाही आणि रागात निनेवेह आणि त्याच्या लोकांना सोडून, अल्लाहला नाराज केले आहे.

"हो, मी पळून आलेला गुलाम आहे" तो म्हणाला, मी माझ्या प्रभू आणि मालकाला (ईश्वराला) सोडून पळालो, जर तुम्हाला पुढे सुरक्षित जायचे आहे तर, मला नौकेच्या बाहेर फेका."

खूप अनिच्छिने नावेच्या लोकांनी, जे सांगण्यात आले ते केले आणि त्यांचा पुढचा प्रवास चालू ठेवला.
जसा युनूस खोल पाण्यात पडला, एक मोठा मासा पोहत आला आणि त्या मास्याने त्याला गिळले. युनूसने स्वतःला मास्याच्या पोटात पाहिले, जेथे अंधकार आणि खूप जास्त खोली होती. तो भयभीत आणि असहाय्य होता. जेव्हा मासा पोहायचा, युनूस आतल्या आत फेकला जायचा आणि त्याला खूप अस्वस्थ वाटायचे आणि भिती वाटायची. तो पुन्हा कधी दिवसाचा प्रकाश पाहू शकेन का? किंवा तो अशा दयनीय पिंजऱ्यात मरून जाईल का? त्याला असे विचार यायचे.
त्याने निनेवेहच्या लोकांना का सोडले? त्याने त्याच्या चुकीचा पश्र्चाताप केला आणि अल्लाहकडे क्षमा याचना केली. त्याने त्याच्या मालकाला (अल्लाहला) दया करण्याची विनंती केली.आणि या दुःखातून मुक्त करण्यास प्रार्थना केली.
"हे अल्लाह, तुझ्या शिवाय कुणीच अल्लाह (ईश्वर) नाही. फक्त तूच आहेस. सगळा गौरव तुझाच आहे. मी खरंच चूक होतो." तो म्हणाला. त्याचा पश्र्चाताप पाहून अल्लाहने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याच्यावर दया केली. मासा पोहत वर किनाऱ्यावर आला आणि युनूसला बाहेर रेतीवर फेकले.
जेथे तो पडला, अस्वस्थ, खूप अशक्त आणि असहाय्य होता, जसा नवीन जन्म झालेला बालक असतो.
एक वेल त्याच्या जवळ वाढला आणि त्याला सावली दिली, जोपर्यंत त्याला इतके बळ येत नाही, की तो उठेन आणि त्याच्या लोकांपर्यंत जाईल तोपर्यंत.
आतापर्यंत त्याच्या लोकांनी प्रत्येक ठिकाणी त्याचा शोध घेतला होता. आणि ते त्याला पाहून खूप आनंदित झाले. त्याला कळले की, त्यांनी शेवटी खरी श्रध्दा स्वीकार केली आहे. जे त्याला पाहिजे होते.
अल्लाह, जे पश्र्चाताप करतात आणि नम्रतेते क्षमा मागतात, त्यांना क्षमा करतो.

यशायाह (Isaiah)

🍁🍁यशायाह (Isaiah)🍁🍁
राजा "हजकिया" (Hezekiah) (700BC) (साधारणतः 2700वर्षांपूर्वी) जेरुसलेम (जूदा) या राज्यावर राज्य करीत होता. अल्लाहचा चांगला सेवक आणि राजा होता. त्यावेळी 'यशायाह ' हे अल्लाहचे संदेश कर्ता होते. राजा हजकीया, राज्याच्या चांगल्यासाठी, यशायाह,जे काही करण्याचा सल्ला देत होते आणि ज्यावर प्रतिबंध लावत होते, राजा ऐकत होता आणि त्यांचा आज्ञाकारी होता आणि त्यांना सल्ला मागत होता. इस्रायली लोकांमध्ये घडामोडी होत गेल्या आणि प्रकरणांना वेग आला. राज्य एका योग्य राजाच्या हातात होते आणि राज्याची प्रजा त्यांना पसंत करत होती. एक दिवस राजाला एक आजार झाला. त्याचा पायाला संसर्गित जखम झाली. याच काळात त्यांनी एक भयानक बातमी ऐकली. त्यांचा एक सेवक राजवाड्यात पळत आला आणि त्याने ओरडून सांगितले, " ' बेबिलोन ' चा राजा 'सनहेरीब ' (sennacherib) आपल्यावर आक्रमण करण्यास येत आहेत." आणि हे खरे होते. क्रूर आश्शुरी राजा साठ हजार सैन्यासह इस्राइल (जेरुसलेम) कडे येत होता.

बेबिलोन (बाबिली) हे मेसोपोटेमिया मधील एक सुप्रसिद्ध प्राचीन शहर होते. या शहराची स्थापना 1894 BC मध्ये आमोरी वंशीय राजांनी केली होती.(हल्लीच्या इराक, इराण, तुर्कस्तान व सीरिया या देशांचा काही भूभाग प्राचीन काळी ' मेसोपोटेमिया' भूप्रदेश नावाने ओळखला जायचा.)
{बेबिलोन चे अवशेष इराकच्या बेबीलोन प्रांतातील अल हिल्लाह या गावाजवळील एका टेकडीखाली सापडतात.}

लोक खूप भयभीत झाले.बातमी ऐकून राजा चिंताग्रस्त झाला आणि त्याने यशायाह ला विचारले, "अल्लाह ने सेनेरब आणि त्याच्या सैन्याविषयी तुमच्यावर काय प्रकट केले (सांगितले) आहे".
"अल्लाहने आतापर्यंत मला काहीही नाही सांगितले", त्यांनी उत्तर दिले.
राजा दुःखी होता. कारण तो त्याच्या पायाच्या आजारमुळे लढाई करू शकत नव्हता.
यशायाह प्रार्थना करत होते, तेव्हा अल्लाहने त्यांना एक गुप्त गोष्ट सांगितली. (प्रकट केली)
दुसऱ्या दिवशी यशायाह संदेश घेऊन राजाला भेटावयास आले.
"तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या उत्तराधिकारीची नेमणूक करा .कारण तुमची शेवटची वेळ आलेली आहे."
जेव्हा यशायाहने हे सांगितले, राजा प्रार्थना स्थळाकडे तोंड करून प्रार्थना करू लागला. त्याने गौरवशाली अल्लाहला प्रार्थना केली आणि विनंती केली, रडला.
प्रामाणिक मन, विश्वास आणि संयम ठेवून, सर्वशक्तीशाली आणि उदात्त अल्लाहला रडत आणि विनंती करत, तो म्हणाला" हे प्रभू, माझ्या कर्मांची आठवण ठेव, इस्राइलच्या लोकांसाठी असलेला निर्णय, सगळे तुझ्याकडूनच होते. मी जे करतो, ते तू चांगले जाणतो. माझे सर्व काम आणि माझे खुले आणि गुप्त कार्य तुझ्या समोर आहेत."
जेव्हा अल्लाहने हिजकियाची मनापासून केलेला प्रार्थना ऐकली, तेव्हा अल्लाहला त्याच्यावर दया आली.
त्या रात्री जेव्हा यशायाह प्रार्थना करत होते, अल्लाहने त्यांना राजाला आनंददायक बातमी देण्यास सांगितले की, त्याच्यावर दया झाली आहे. अल्लाह आणखी पंधरा वर्षांसाठी हिजकीयाचे वय वाढवणार आहे. आणि त्यांचा आजार बरा होणार आहे. आणि शत्रू सनहेरीब पासून वाचवनार आहे.

लगेच दुसऱ्या दिवशी यशायह ने राजाला ही चांगली बातमी दिली. जेव्हा राजाने हे ऐकले, तो आनंदी झाला.
दुःख आणि वाईट विचार दूर झाले. त्याने वाकून प्रणाम करून प्रार्थना केली, " हे प्रभू, तू ज्याला इच्छितो त्याला राजा बनवतो आणि ज्याला इच्छितो त्याला सत्तेवरून काढून टाकतो.ज्याला इच्छितो त्याला उन्नत करतो आणि ज्याला इच्छितो त्याची अधोगती करतो. अदृश्य जाणणारा आणि स्पष्ट असणारा. सगळ्यात पहिला आणि शेवटचा. अभिव्यक्त आणि ज्ञात असणारा. तू दया दाखविली आणि अस्वस्थ लोकांच्या प्रार्थनांना उत्तर दिले."
जेव्हा राजाने त्याचे डोके वर केले, अल्लाहने यशायाह ला राजाला आदेश देण्यास सांगितला की, अंजिराचे पाणी काढून त्याच्या जखमेवर लावावे आणि तो बरे होईल.

राजाने अल्लाहच्या आदेशा प्रमाणे पाणी लावले. हा एक चमत्कार होता. त्याचे जखम लगेच भरले. राजा आनंदी होता. त्याने म्हंटले की, ' अल्लाह दया करतो आणि दुःखी लोकांच्या वेदना कमी करतो.

अल्लाहने सनहेरीब च्या सैन्याकडे मृत्यु च्या स्वर्गदुताला पाठविले. सकाळी राजा सनहेरीब ने त्याच्या सैन्याला मृत झालेले पाहिले.अल्लाहने जे वचन दिले होते ते पूर्ण केले. राजा आणि त्याचे पाच सहकारी सोडून कोणीच जिवंत नव्हते.या पाच सहकाऱ्यांमध्ये नबूकदनेस्सर (बूख्त नसर) ही होता.
राजा हजकिया ने त्यांना बेड्या घातल्या आणि त्यांच्या राज्यात वापस नेले. त्यांनी सनहेरीब आणि त्याच्या सहकाऱ्यांना, सर्वांना दिसण्यासाठी, दरबाराच्या शिक्षा देण्याच्या जागी ठेवले आणि सत्तर दिवसापर्यंत, द्वेष आणि अपमानित करण्यासाठी कैदेत ठेवले. रोज प्रत्येकाला खाण्यासाठी बारले ची भाकरी देण्यात यायची. सत्तर दिवसानंतर त्यांना राजाने तुरुंगात टाकले.

सत्तर दिवसानंतर अल्लाहने यशायाह ला सनहेरीब आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्यांच्या राज्यात वापस पाठवण्यास सांगितले. जेणेकरून ते त्यांच्या लोकांना सावध करतील, की त्यांच्यासोबत काय घडले. जेव्हा यशायाह ने राजा हजकिया ला या बाबतीत संदेश दिला, तेव्हा राजाने तुरंत त्यांना मुक्त केले.
जेव्हा सनहेरीब त्याच्या लोकांत वापस गेला, त्याने त्याच्या वाजिरांना आणि सल्लागारांना जमा केले आणि सांगितले, की त्यांच्या सैन्याला कसे मारण्यात आले आणि सत्तर दिवस त्यांना त्रास दिला.
तेव्हा धार्मिक लोक आणि जादूगार लोक पुढे आले आणि म्हणाले, आम्ही तुम्हाला अल्लाह आणि त्यांच्या संदेशकर्त्या विषयी सूचना दिली होती.पण तुम्ही ऐकले नाही. दुसऱ्याने असे म्हंटले, तो एक असा देश आहे ज्याला कोणी मिटवू शकत नाही. त्या देशाला कोणी जिंकू शकत नाही. सनहेरीब आता अल्लाह ला घाबरला होता. त्याने पुन्हा कधी इस्राएलवर आक्रमण करण्याचा विचार केला नाही. त्यानंतर सात वर्षांनंतर त्याचा मृत्यू झाला.

#कुराणसत्यकथा

कुराण मध्ये यशायाह चे नाव आहे.
यहुदी( ज्यू,हिब्रू) लोक अल्लाह ला याहोदा म्हणतात.आणि ख्रिश्चन लोक गॉड म्हणतात.तिन्ही ग्रंथात कुराण,बायबल आणि तोराह( तोरेत) मध्ये जवळजवळ सारख्याच कथा आहेत. संदेशकर्ता ही सारखेच आहेत.पण कुराण च्या आधीचे ग्रंथ काही धार्मिक लोकांकडून बदलण्यात आले.त्यामुळे ते मूळ ग्रंथ नाही.


08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...