बादशाह_सुलेमान
🌹🌹🌹सबा ची राणी 🌹🌹🌹
एक दिवस जेव्हा राजा सुलेमान ने दरबार भरवला होता, त्याच्या लक्षात आले की, हूदहूद( हुपू; hoopoe) गायब होता. तो त्याच्या अनुपस्थितीने नाराज झाला आणि म्हणाला," हुदहुद कोठे आहे? मला तो तुमच्यामध्ये दिसत नाही. जर अनुपस्थित राहण्याचे एक चांगले कारण नसेल तर, मी त्याला नक्कीच शिक्षा करेन."
तो असे म्हणत असतानाच, हुदहुद उडत आत आला आणि विलंब झाल्याने दिलगिरी व्यक्त केली.
" मी एका शक्तीशाली राज्य "सबा" बातमी आणली आहे. त्या राज्यावर एक राणी राज्य करते , जी एका उत्कृष्ट सिंहासनावर विराजमान होते. सबा येथील लोक, खऱ्या अल्लाहची उपासना सोडून, सूर्याची उपासना करतात." त्याने राजाला सांगितले.
"तू आमच्याशी खरे बोलत आहे का, हे आम्ही लवकरच माहीत करू," सुलेमान म्हंटला." हे घे, हे पत्र घेऊन सबा ला जा, तेथे ते पोहोचव आणि मग काय घडते ते पाहायची वाट पाहा.
हुदहुद ने सुलेमानचे पत्र घेतले आणि सबा ला जाण्यासाठी निघाला. तेथे त्याने राणीच्या समोर ते टाकले आणि शांतपणे काय घडते , ते पाहण्याची वाट पाहू लागला.
राणीने जेव्हा ते पत्र वाचले, तिच्या सल्लागाराला काय करावे असे विचारले. "येथे राजा सुलेमान कडून एक पत्र आहे. अल्लाहचा योग्य सन्मान करून आणि अल्लाहच्या नावाने सुरू केलेले आहे. त्याने अल्लाह सत्यनिष्ठेला विरोध न करता, मला समर्पण करण्यासाठी त्याच्याकडे बोलावले आहे."
मग राणीने थोडा वेळ विचार केला.आणि सुलेमानसाठी काही मौल्यवान भेटवस्तू पाठविण्याचा निर्णय घेतला.
पण सुलेमान काही साधारण राजा नव्हता. तो अल्लाहचा संदेश कर्ता (प्रेषित) होता. तो क्रोधित झाला, जेव्हा त्याने पाहिले की राणीने त्याच्या संदेशाचा कसा अर्थ लावला. त्याने तिच्या संदेश देणाऱ्याला भेटवस्तू सहित वापस पाठविले आणि त्याला म्हंटले की, "राणीला सांग की, जर त्याच्या अल्लाहच्या सत्य निष्ठेकडे बोलवण्याचे उत्तर भेटवस्तू असेल, तर तो सबाला सैन्यासह येईन."
आता राणी खरच घाबरली आणि तिने तत्काळ स्वतः सुलेमानकडे जाण्याचा निर्णय घेतला.जेव्हा सुलेमानला तिच्या येण्याचा हेतू कळला, त्याने त्याच्या दरबाऱ्यांना विचारले, "येथे कोणी आहे का, जो तिचे सिंहासन, ती इथे येण्याआधी आणू शकेल ."
एका जिन्नने उत्तर दिले की, "डोळ्यांची पापणी लवण्याआधी तो ते आणू शकेल." सिंहासन आणण्याचा आदेश देण्यात आला. जेव्हा तो आणला गेला, सुलेमानने त्याच्यात थोडा बदल केला.
जेव्हा राणी आली, तिला तो सिंहासन दाखविण्यात आला आणि विचारले," हे तुझे सिंहासन आहे का?" तिने लगेच त्या सिंहासनाला ओळखले, कारण ती खरोखर बुद्धिमान होती, पण तिने तिचे आश्चर्य लपविले आणि म्हणाली," हे तसेच दिसत आहे".
सुलेमानने तिला त्यानंतर एका सुंदर राजवाड्यात नेले, ज्याची फरशी चकाकणारी होती.तिने फरशीवर पाय ठेवण्यासाठी तिचा घागरा वर उचलला. कारण तिला वाटले की ते पाण्याचे तळे आहे. पण ती खरंच राजवाड्याची फरशी होती ज्याची पारदर्शक ( विशेष मौल्यवान काचेने) फरस बंदी केली होती.
(आच्छादली होती.) अशी त्या राजवाड्याची भव्यता होती.
जे अल्लाहने सुलेमानला बहाल केले होते, त्याने ती राणी इतकी प्रभावित झाली की ती अल्लाहच्या सत्यनिष्ठेला शरण गेली.
" मी स्वतःशी चूक केली आहे. आता सुलेमानसह मी या जगाच्या प्रभुला शरण जात आहे."
अशाप्रकारे सुलेमान त्या सुंदर राणीला अल्लाहची शक्ती पटविण्यास सक्षम झाला.
सुलेमानच्या पायाशी सर्व मौल्यवान सांसारिक (ऐहिक) खजिने होते. तरीही त्याची अल्लाहची श्रध्दा कमकुवत झाली नाही. तो नेहमी इतके जास्त देण्यासाठी अल्लाहला आभार मानत राहिला आणि गर्विष्ठ झाला नाही.
जेव्हा एकदा सुलेमान एका उत्कृष्ट मशिदीच्या बांधकामाची देखरेख करत होता. त्याच्यासाठी मृत्यूची वेळ आली. जेव्हा त्याला याची जाणीव झाली की, तो मरणार आहे, तो उरलेल्या बांधकामाच्या देखरेखी विषयी चिंताग्रस्त झाला. त्याला भीती होती की अडेल ( बेलगाम , ताब्यात न राहणारे) जिन्न अर्धवट काम सोडून, मोकळे सुटतील.
अल्लाहने याची काळजी घेतली. त्याच्या मृत्यूनंतर , जेव्हा बांधकाम पूर्ण केले जात होते, सुलेमान त्याच्या चालण्याच्या काठीचा आधार घेऊन उभा राहिला. जेव्हा किड्यांनी आतून काठी पोखरून खाल्ली आणि तो कोसळला, फक्त तेव्हाच सुलेमानच्या मृत्यूचे गुपित जिन्नांसमोर प्रकट झाले. जिन्नांनी ते सर्व , अल्लाहचे रहस्य न समजण्यालायक असल्यामुळे त्यांनी एकमेकांना शाप दिला. " जर आम्हाला याविषयी आधीच माहीत असते तर आम्ही या परिश्रमापासून खूप लवकर सुटका करून घेतली असती." ते म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा