गुरुवार, २५ जून, २०२०

जकरिया अ.

🌿📚प्रोफेट जकरिया अ. आणि मरियम अ. (मेरी)📚🌿

साधारणतः दोन हजार वर्षांपूर्वी ,एक ईश्वरनिष्ठ वृद्ध व्यक्ती " जकारिया" अ. हे जेरुसलेम या शहरात राहत होते. ते इस्राइल (याकूब अ.) वंशजाच्या कुटुंबातून होते. आणि सुलेमान अ. चा एक वंश होते. ते प्रार्थना स्थळाच्या जागेची देखभाल करायचे आणि धार्मिक आणि पारंपरिक समारंभ करायचे. जेरुसलेम चे लोक त्यांचा खूप आदर करायचे. त्याच्या उदरनिर्वाहासाठी ते सुतारकाम करायचे आणि लाकडापासून सुंदर वस्तू बनवायचे.

जकरीया अ. लहान मुलांवर खूप प्रेम 

करायचे पण त्यांना स्वतःचे मूल नव्हते.

सतत जेव्हा ते दुसऱ्या मुलांना खेळतांना पहायचे, त्यांना वाटायचे की, त्यांनाही त्यांचा स्वतःचा एक पुत्र असावा. पण ते अल्लाह (एक ईश्वर) ला घाबरणारे वृद्ध व्यक्ती होते, त्यांनी तक्रार केली नाही आणि शांत राहिले.
जकरीया अ. च्या पत्नीला एक बहीण होती. "हन्ना". जिचे लग्न इमरान शी झाले होते. इमरान हा त्याच जमातीतील म्हणजे इस्राइल च्या वंशजातील कुटुंबातून होता.

हन्ना आणि इमरान यांनाही मूल नव्हते. त्यांनी अल्लाह (ईश्वर) ला, त्यांना एक मूल देण्यासाठी प्रार्थना केली आणि वचन दिले की, जर त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर मिळाले, तर ते त्या मुलाला अल्लाह (ईश्वर) ची सेवा करण्यासाठी समर्पित करतील आणि त्याला प्रार्थनास्थळामध्येच, यासाठी ठेवतील.

अल्लाह (ईश्वर) ने त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर दिले आणि त्यांना एक सुंदर छोटीसी कन्या दिली. त्यांनी तिचे नाव मरियम ठेवले आणि त्यांनी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी , त्या कृतज्ञ पालकांनी, त्यांच्या छोट्या मुलीला प्रार्थना स्थळात सोडण्यासाठी, जे जेरुसलेम मध्ये होते, तेथे घेऊन आले.
पण एक नवजात मूल, त्याच्या आईवडिलांपासून दूर, कोणीही पालनकर्ता नसल्यास, एकटे जीवन कसे जगेल? त्यामुळे तेेेेेथील लोकांनी, त्या मुलीसाठी एक पालनकर्ता असावा, असा निर्णय घेतला. सर्वात योग्य व्यक्ती जकरिया अ. होते. कारण ते मरियम चे नात्याने काका ही होते,

जे जेरुसलेम च्या प्रार्थनास्थळा च्या अगदी 

समोर राहत होते आणि प्रार्थनास्थळाची देखभाल करत होते आणि ते स्वतः एक धार्मिक वृद्ध व्यक्ती होते. ते मरियम ला, तिच्या धार्मिक संगोपनात  मार्गदर्शन ही करू शकत होते. 

त्यांची पत्नी मरियम ची मावशी होती. तरीही तेथे खूप लोक होते, जे ही चांगली जबाबदारी घेण्यास इच्छुक होते. ते ह्या बाळाचे संगोपन करण्यासाठी इतके उत्सुक होते की, त्यावरून ते भांडले देखील. शेवटी एक उपाय सापडला. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. जकरिया अ. च्याच नावाची चिठ्ठी निघाली. (अल्लाह ची म्हणजेच ईश्वराची हीच इच्छा होती.)

अशाप्रकारे समस्या निवारण झाले आणि जकरिया अ. ला "मरियम" या लहान बाळाच्या चा पालनकर्ता बनविण्यात आले.
तिच्या काकांच्या आणि मावशीच्या मार्गदर्शनाखाली मरियम जगत होती, प्रार्थना करत होती आणि प्रार्थनास्थळीे वाढत होती. ती एक खूप सदाचारी  (ईश्वर निष्ठ) मुलगी होती आणि अल्लाह ची भक्ती करण्यात तिचा जास्तीत जास्त वेळ घालवत होती. 

जशी ती मोठी झाली, जकरिया अ. यांना तिच्यासाठी एक वेगळी खोली मिळाली, जिथे ती एकनिष्ठतेने आणि एकाग्रतेने प्रार्थना करू शकत होती.

काही वेळेस जेव्हा ते, मरियमकडे, तिला कशाची 

आवश्यकता आहे का?, हे विचारण्यासाठी जायचे, तिच्याकडे ताजी फळे आणि रुचकर अन्न तिच्यासमोर असलेले पाहून चकित व्हायचे.
"तू हे कोठून मिळवते, मरियम?" जकारिया विचारायचे. ती साधेपणाने आणि निरागसतेने उत्तर द्यायची,

"अल्लाह कडून. तो ज्याला इच्छितो, त्याला देतो, न मोजता."
जकरिया अ. यांना माहीत होते, मरियम किती ईश्वरनिष्ठ , खरी आणि निर्मळ होती, त्यामुळे ती जे म्हणत आहे, त्यावर शंका करण्याचे काहीच कारण नव्हते.

यामुळे त्यांचा अल्लाह (ईश्वर) वरील विश्वास अजून कणखर झाला आणि त्यांना अल्लाह (ईश्वर) ला,

जी खूप खूप दिवसांपासून त्यांच्या मनात ते इच्छा करत होते, त्याविषयी मागण्यासाठी त्यांना धैर्य मिळाले. 

जर "अल्लाह त्याची कृपा, तो ज्यावर इच्छितो त्यावर करतो," 

तर ते, निश्चितपणे त्यांना एक पुत्र होण्यासाठी प्रार्थना करू शकतात, असा त्यांनी अल्लाहवर विश्वास ठेवून, मनाशीच विचार केला. म्हणून जकरिया अ. यांनी  अल्लाह (ईश्वर) ला प्रार्थना करून, त्यांना एक ईश्वरनिष्ठ मूल व्हावे, असे प्रार्थनेत मागितले, जो त्यांचे काम पुढे चालू ठेवेल.

"हे माझ्या अल्लाह (ईश्वरा), मला एकटा सोडू नको. तुझा आधार खूप चांगला आहे." त्यांनी प्रार्थना केली.

"मला एक सद्गुणी मुलगा दे, काहीच शंका नाही, की तू आमच्या प्रार्थना ऐकतोस."
अल्लाह ने त्यांची प्रार्थना ऐकली आणि एक संदेश त्यांच्याकडे पाठवला की, "त्यांना एक पुत्र होईल, 

ज्याला ते "यहया" या नावाने बोलावतील. जकरिया अ.  या बातमीवर खूप आनंदी झाले. त्यांनी आभार मानण्यासाठी वाकून नमन केले. पण विचार केला की, एक मुलगा होणे, हे कसे शक्य आहे, कारण ते आणि त्याची पत्नी खूप वृद्ध आहेत.

"तू जेव्हा काहीही नव्हता, तेव्हा मी तुला निर्माण केले नाही का?" अल्लाह (ईश्वर) ने म्हंटले. "ते माझ्यासाठी अशक्य नाही."

"माझ्या अल्लाह, मला कसे कळेल की केव्हा?" जकरिया अ. यांनी विचारले.
"तू तीन दिवसांसाठी बोलू शकणार नाहीस",  अल्लाह (ईश्वर) ने म्हटले.
आणि खरच एक दिवस जकरिया अ. ला आढळले, की ते काहीच बोलू शकत नाहीत.

ते खूप आनंदी झाले, कारण ही त्यांच्यासाठी चांगली बातमी होती. लवकरच त्यांना एक मुलगा झाला, ज्याचे नाव त्यांनी "यहया" ठेवले, जसे अल्लाहने म्हंटले होते. "यहया" हा ही मोठा होऊन एक खूप ईश्वरनिष्ठ व्यक्ती बनला आणि अल्लाह चा एक संदेशकर्ता बनला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...