फरिश्ते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
फरिश्ते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ जून, २०२०

फरिश्ते

⭐फरिश्ते⭐फरिश्ते( ज्यांना मलाइका आणि मराठीत स्वर्गदूत म्हणतात. इंग्लिश मध्ये angel) ते कोण आहेत?

फरिश्ते अल्लाहने (ईश्वराने) प्रकाशापासून बनविले आहेत.आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत.ते ना स्त्रिया आहेत ना पुरुष.ते अल्लाहची (ईश्वराची) प्रत्येक गोष्ट ऐकतात...जे काम त्याने सांगितले ते काम करत राहतात...

फरिश्ते किती आहेत?

ते एकदा अल्लाह च्या शिवाय कोणालाच माहीत नाही...पण खूप आहेत...त्यांना पंख आहेत...

त्यात चार फरिश्ते मुख्य आणि प्रसिध्द आहेत...

1) ह. जिब्राईल अलै. जे अल्लाह चे (ईश्वराचे) ग्रंथ आणि आज्ञा संदेशवाहकांपर्यंत आणत होते...हाच फरिश्ता मुहम्मद स. अ. व. यांना कुराण चे वाक्य (आयत) आणि सुरत ( धडा) ऐकवून जात होते...आणि मुहम्मद स. अ. व. ते पाठ करत होते...

2) ह. इसराफिल अलै. जे कयामत (प्रलय म्हणजे जग संपण्याच्या दिवशी) आल्यावर शंख फुंकतील..

3) ह. मिकाईंल अलै. जे पाऊसाची व्यवस्था आणि प्रत्येक जीवाला रोजचा दाना पोहोचविण्याचे काम करत आहेत...

4) ह. इजराईल अलै.जे प्रत्येक जीवाला त्यातील आत्मा काढून मृत्यू देतात...

माणसाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन फरिश्ते असतात, किरामन आणि कातीबिन जे प्रत्येकाच्या खांद्यावर असतात...म्हणूनच नमाज मध्ये दोन्हीकडे तोंड करून सलाम केला जातो...उजव्या बाजूचा फरिश्ता आपल्या चांगल्या कामाची( कर्माची) यादी लिहितो..आणि डाव्या बाजूचा फरिश्ता आपल्या वाईट कामाची( कर्माची ) यादी लिहितो...

जेव्हा आपण वॉश रूम मध्ये जातो तेव्हा हे फरिश्ते आत येत नाहीत...बाहेरच थांबतात..बाकी प्रत्येक वेळेस सोबत असतात...

जेव्हा माणूस मृत्यू पावतो, तेव्हा कब्र मध्ये दोन फरिश्ते, मुनकिर आणि नकीर त्याला तीन प्रश्न विचारण्यास येतात...

त्यांचे तीन प्रश्न असतात...

  1. तुमचा अल्लाह(ईश्वर,God) कोण आहे?
  2. तुमचा धर्म कोणता?
  3. मुहम्मद स. अ. व. यांच्याविषयी तुम्ही काय जाणता?

मलिक हा फरिश्ता जहन्नुम (नरक) ची देखरेख करतो आणि रिदवान जन्नत (स्वर्ग)ची देखरेख करतो...ते संरक्षक आहेत...

🌊️कयामत🌊
कयामत (प्रलय) (महाविनाश) चा दिवस कशाला म्हणतात?
-जेव्हा सर्व जिवंत मनुष्य आणि इतर जीव मरून जातील आणि पूर्ण जग मिटून जाईल....पर्वत कापसाच्या गोळ्यासारखे उडत फिरतील...तारे खाली पडतील.म्हणजेच प्रत्येक वस्तू तुटून मिटून (नष्ट) जाईल...या दिवसाला "कयामत" चा दिवस म्हणतात...

सर्व मनुष्य आणि जीव कसे मरतील?

-इस्राफिल नावाचा फरिश्ता ( स्वर्गदूत) आधी सुर(शंख) फुंकेल...त्याची आवाज इतकी भयानक आणि कठोर असेल की त्या धक्क्याने सर्व मरून जातील आणि प्रत्येक वस्तू तुटून मिटून जाईल...

कयामात कधी येईल?

-कयामात येण्याची ठीक वेळ अल्लाहच्या व्यतिरिक्त कुणालाच माहीत नाही...
पण तो दिवस शुक्रवार असणार आहे आणि मुहर्रम (मुस्लिम महिना) ची दिनांक 10 असणार आहे.... अजून काही निशान्या आहेत...ज्यामुळे कयामात येणार आहे हे कळून जाईल..

खालील निशाण्या आहेत...
1. जेव्हा अपराध जगात जास्त होतील..
2. लोक आईवडिलांची ऐकणार नाहीत...आणि त्यांच्यावर अन्याय करतील...
3. संपत्ती आणि पैशांची रक्कम यामध्ये फसवेगिरी होईल...
4. गाणे, वाजवणे आणि नाच चे प्रदर्शन आणि मजा, जास्त होईल...
5. येणारी पिढी , मागच्या पिढीला वाईट म्हणेल...
6.कमी जाणणारे आणि काहीच न जाणणारे लोक मालक बनतील..
7.कमी योग्यतेचे लोकं, मोठी उंच इमारत बनवतील...
8. अशे लोक ज्यांची योग्यता नाही, त्यांना मोठी मोठी पदे मिळतील...

तर कयामात आली आहे असे समजावे..

मेल्यानंतर जिवंत होणे म्हणजे काय आहे?

-कयामात मध्ये सर्व वस्तू आणि जीव नष्ट होतील...मग इस्राफिल पुन्हा एकदा सुर (शंख) फुंकतील...
यावेळेस सर्व मनुष्य जिवंत होतील.. "हश्र"च्या मैदानावर अल्लाहच्या समोर सर्व जमा होतील.. पेशी होईल...हिशोब होईल...चांगले आणि वाईट काम(कर्म) यांचा मोबदला दिला जाईल...

🌴🌐चमत्कार(मोजजे,miracles)�🌐🌴

हे फक्त प्रेषित म्हणजेच संदेशवाहक किंवा संदेष्टा करू शकत होते...ते असे अल्लाह (ईश्वराच्या) च्या मदतीने करत होते...नेहमीच्या सवयी पेक्षा विरूद्ध गोष्ट, अद्भुत वाटणारी घटना, ज्यामुळे ते पाहून, जगातील लोक आणखी जवळ येतात आणि लोकांना कळते, की ते प्रेषित व्यक्ती अल्लाह (ईश्वराने) ने पाठविलेले आहेत...

🍀🍀जिन्न...🍀🍀

अल्लाहने (परमात्म्याने), त्याने बनविलेल्या जिवांमध्ये जिन्न आणि मनुष्य जातीला त्याची आराधना, उपासना करण्याचा आदेश दिला आहे...

जिन्न परमात्म्याने बनविलेला एक जीव आहे...जो आगीने (अंगारांनी) बनलेला आहे...जिन्न चे शरीर आपल्याला दिसत नाहीत...पण ते जेव्हा कोणत्या तरी माणसाच्या किंवा प्राण्याच्या शरीरात असतात, तेव्हा दिसतात...त्यांना स्वतःचे रूप बदलून प्राण्याच्या किंवा माणसाच्या शरीरात जाण्याची शक्ती परमात्म्याने दिली आहे...त्यांच्यात पुरुष ही आहेत आणि स्त्रियाही...आणि त्यांची मुलेही होतात...
दोन प्रकारचे जिन्न आहेत...चांगले जिन्न आणि वाईट जिन्न....हे जिन्न छिद्रात राहतात...चांगले जिन्न मनुष्या सारखीच अल्लाहची ( ईश्वराची) आराधना करतात...आणि ग्रंथातील मजकूर ऐकण्याचा प्रयत्न करतात...

वाईट जिन्न माणसाला आराधना करू देत नाहीत...आणि वाईट मार्ग दाखवतात...वाईट सवय लावतात..हे सगळे वाईट जिन्न, इब्लिस म्हणजेच शैतांन (evil) या जिन्नचे मित्र आहेत, कारण ईबलिस ने मनुष्य जातीचे लक्ष विचलित करता यावे आणि त्याला वाईट मार्गात अडकवता यावे, यासाठी मुदत मागितली होती...
जे मनुष्य अल्लाह ची ( एकाच परमात्म्याची) आराधना करतात आणि मनापासून श्रद्धा करतात आणि त्याच्या कृपेसाठी प्रार्थना करतात, ते अल्लाहच्या (परमात्म्याच्या ) मदतीने वाईट गोष्टींना परावृत्त करतात...

🍂🍂नशीब....🍂🍂

प्रत्येक गोष्ट आणि चांगले, वाईट यासाठी परमात्म्याने एक अंदाज (तर्क, अनुमान) निश्चित केला आहे...प्रत्येक गोष्ट जेव्हा बनते किंवा जीव जन्मतो, त्याच्या आधी परमात्मा त्याला जाणतो...त्याच्या या ज्ञानाला आणि अंदाजाला (तर्काला,अनुमानाला) नशीब म्हणतात...

🍁🍁🍁प्रोफेट( प्रेषित, संदेष्टा, मनुष्यापर्यंत परमात्म्याचा संदेश पोहोचविणारा)....🍁🍁🍁

जो मनुष्य अल्लाहची (परमात्म्याची) सेवा करतो,आदर करतो...त्याचा आदेश सर्व माणसांपर्यंत पोहचवितो...खरे बोलतो आणि असतो....खोटे बोलत नाही...आणि ज्याला फक्त आणि फक्त या कामांसाठी अल्लाह निवडतो...त्यांना प्रोफेट म्हणजेच प्रेषित म्हणतात... प्रत्येक जातीत प्रेषित येऊन गेले....ज्यांनी एका आणि फक्त एका परमात्म्याला प्रार्थना करण्यासाठी उपदेश केला.... लाखो संदेश वाहक धरतीवर आले..त्यांनी एकाच ईश्वराला माना हाच संदेश दिला... भारतात ही असा संदेश देणारे संदेश वाहक नक्कीच आले असतील...कारण परमेश्वर हिशोब करण्याच्या दिवशी विचारणार आहे, की मी तुझ्याकडे संदेश देण्यासाठी .... ला पाठविले होते, तू ऐकले का? कुराणमध्ये पंचवीस संदेश वाहकांचे नाव आहे...


08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...