मरियम एका पवित्र वातावरणात मोठी झाली. सदाचारी लोकांत, ती एक खूप धार्मिक ( ईश्वर निष्ठ) तरुण मुलगी झाली.तिने तिचा जास्तीत जास्त वेळ तिच्या खोलीत प्रार्थना करण्यात खर्च केला.आणि स्वतःला अल्लाह च्या सेवेसाठी अर्पण केले. तिची धर्म निष्ठा इतकी चांगली होती की, तिच्यापेक्षा मोठे लोक ही तिचा सन्मान करायचे.आणि तिच्याकडून प्रेरणा घ्यायचे.
तिची ईश्वर निष्ठा आणि पावित्र्य असाधारण होते. जे तिला ओळखत होते, त्या प्रत्येकाकडून तिने तिची प्रतिष्ठा जिंकली होती.एक दिवस जेव्हा मरियम तिच्या खोलीतून, एका वेगळ्या जागेत जिथे पडदे टाकून आच्छादन केले होते, गेली तेव्हा तिने एक तरुण व्यक्ती तिच्यासमोर उभा राहिलेला पाहिले. मरियम घाबरली होती.' कोण आहे तू? ' तिने विचारले. ' ईश्र्वरासाठी जवळ येऊ नकोस. ' मी अल्लाह चा आश्रय मागते तुझ्यापासून '
तो व्यक्ती उत्तर ला,' घाबरु नको, मी अल्लाह चा दूत (स्वर्ग दूत ) आहे आणि अल्लाह कडून फक्त संदेश देणारा म्हणून पाठविण्यात आलो आहे. तुला हे सांगण्यासाठी की, तुला एक पवित्र मुलगा होईल.'
पण जर मला कोणत्याही पुरुषाने स्पर्श केला नाही (मी विवाहित नाही), तर मला एक पुत्र कसा होईल.' ' मी शील भ्रष्ट (वाईट स्त्री) नाही ? , ती म्हणाली.
' ती अल्लाह ची इच्छा आहे. ते त्याच्यासाठी खूप कठीण नाही. जेव्हा तो काही निर्माण करण्याची इच्छा करतो, म्हणतो , होऊन जा आणि ती असते. तुझा पुत्र एक खूप पवित्र मुलगा असेल. असे म्हणून स्वर्ग दूत दिसेनासा झाला आणि मरियम ला एका विस्मित (स्तंभित) करून गेला.
नंतर जेव्हा तिचा पुत्र जन्मायची वेळ जवळ आली, मरियम, लोकांपासून बाजूला, एका दूरच्या ठिकाणी गेली. तेथे एकटी, घाबरलेली आणि भुकेने आणि तहानेने अशक्त झालेला एका पाम (ताडाच्या जातीचे झाड) झाडाच्या खाली झोपली आणि वेदनेने ओरडू लागली, ' मी इच्छा करते, हे होण्याआधी मी मरून गेलेली असावी आणि सर्व मला विसरून गेलेले असावे.
एक सुखद आवाज तिच्याशी बोलला, ' दुःखी होऊ नको मरियम. तुझ्या प्रभूने एक पाण्याचा झरा तुझ्याखालून (जवळून) प्रदान (प्रवाहित) केला आहे. आणि जर तू झाडाचे खोड हलवशील तर पुष्कळ ताज्या आणि पिकलेल्या खजुरी तुझ्यावर पडतील.तू खा आणि पी आणि तुझ्या पुत्राला पाहून आनंद घे.
तिचा पुत्र ईसा या लोकांपासून दूर अशा जागी जन्मला. मरियम ने जरी, तिच्या लहान बाळाला कुशीत घेतले, तरी तिच्यात त्या बाळाला घेऊन तिच्या लोकांकडे जाण्याचे साहस नव्हते. ती त्यांच्या प्रश्नांची उत्तरे कशी देऊ शकेलं? ते काय म्हणतील? तिच्या बाळाचा जन्म, ती कसे समजावून सांगू शकेल? ती दयनीय अवस्थेत होती आणि काय करावे तिला समजत नव्हते. पण अल्लाह ने तिला दिलासा दिला.' लोकांना काहीही सांगू नको, कोणत्याही प्रश्ना चे उत्तर देऊ नको, फक्त संकेत करून सांग की तू उपवास करीत आहे आणि त्या दिवशी, काहीही न बोलण्याची शपथ घेतली आहे.' तिला आदेश दिला गेला.
अल्लाह च्या मदतीने बळकट होऊन, निरागस तरुण मरियम ने तिच्या बाळाला उचलले आणि तिच्या लोकांकडे परत गेली. जेव्हा त्यांनी तिला तिच्या हातात असलेल्या, एका बाळा सोबत येतांना पाहिले, ते तिच्या भोवती जमा झाले.' मरियम, किती लाजेची गोष्ट आहे! तुझे मातापिता ईश्र्वरनिष्ठ लोक होते, तू हे काय केले? ' आणि ते त्या मुला विषयी जाणण्यास इच्छुक होते.
मरियम ने त्यांना उत्तर दिले नाही.तिने फक्त त्या मुला कडे इशारा केला. ' तू वेडी आहे का? आम्ही एका नवजात बाळासोबत कसे बोलू शकतो, मरियम ?' त्यानंतर लगेच प्रत्येकाला पूर्ण आश्चर्य देऊन, मरियम च्या हातातील बाळाने बोलावयास सुरुवात केली. ' मी अल्लाह चा संदेश पोहोचविणारा आहे, ' ते बाळ म्हणाले, ' त्याने मला एक ग्रंथ ( इंजील, बायबल) दिला आहे आणि मला एक प्रेषित (संदे श कर्ता, पैगंबर) बनविले आहे. त्याने मला आज्ञा दिली की, माझ्या (अल्लाह च्या) प्रार्थना म्हण आणि दानशूर बन आणि माझ्यावर आशीर्वाद दिला की, जिथे मी असेल, तो मला माझ्या आईशी दयाळू असणारा बनवेल आणि माझ्यावर ज्या दिवशी माझा जन्म झाला, ज्या दिवशी मी मृत्यू पावेन, ज्या दिवशी मला पुन्हा वर उचलण्यात येईल, त्या दिवशी शांती देईल.
प्रत्येक जनाने, डोळे विस्फारून आश्चर्याने( चमत्कार) आणि अविश्र्वासाने लक्ष देऊन ऐकले. हे ईसा ( येशू) होते. अल्लाह चे सं देशकर्ता. जे मरियम ची जी पवित्र आणि निरागस होती, निंदा करण्यास आले होते, ते सगळे नवजात बालकाचे बोलणे ऐकून शांत झाले. मरियम च्या विषयी पवित्र कुराण म्हणते, ' अल्लाह ने मरियम ला , त्या सर्व देशांच्या, सर्व स्त्रियांमधून वरचा दर्जा देऊन निवडले. '
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा