chapter 97 अल-कद्र
* आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 आम्ही या (कुराणाच्या ) प्रकटीकरणाची (सुरुवात) भाग्य निश्चित करण्याच्या रात्री केलेली आहे. 2 तुम्हाला काय माहीत, त्या रात्रीचे महत्त्व काय आहे ? 3 ती (एक) रात्र हजार महिन्यापेक्षा अधिक उत्तम आहे. 4 त्या रात्री (असंख्य) स्वर्गदूत व (प्रमुख स्वर्गदूतांपैकी एक असलेला जिब्राइल हा) स्वर्गदूत आपल्या पालनकर्त्याच्या परवानगीने प्रत्येक गोष्टीसंबंधाने त्याचे आदेश घेऊन (पृध्वीवर) उतरतात. 5 पहाट होईपर्यंत ती रात्र शांतता (व सुरक्षिततेची) रात्र आहे. [कुराण 97 : 1 -5 ]
शबे कद्र ची रात्र रमजान महिन्याच्या 21 ,23 ,25 ,27 ,29 या रात्री शोधली जाते. या रात्रीत जास्तीत जास्त प्रार्थना करतात.आणि क्षमा मागतात.आणि नरकाच्या आगीपासून संरक्षण मागतात.
मुख्य रात्र 27 रमजानची "शबे कद्र" ची रात्र आहे, असे समजतात. पण ती वरील पाच पैकी कोणतीही रात्र असू शकते. रात्रभर कुराण वाचतात आणि दुआ ( प्रार्थना ) करतात आणि पहिला कलमा वारंवार म्हणतात, " ला इलाह इल्लल्लाह मोहम्मदूर रसूलल्लाह ".अशी अल्लाहची उपासना, या रात्रीत करतात. दुआ ( प्रार्थना ) स्वतःच्या भाषेत मागू शकता. अरबी त दुआ वाचन करून अल्लाहशी क्षमा मागत असल्याची भावना आणि जाणीव ठेवतात.
या शबे कद्र रात्रीत मागवायची प्रार्थना -
"अल्लाहुम्मा इन्नक अफूवून तुहिब्बुल अफवा फअफु अन्नी या गफुरु या गफुरु या गफुरु "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा