रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

कुरआन च्या बोधकथा..3 युसूफ अ. आणि त्यांचे स्वप्न

🌷युसूफ अ. आणि त्यांची इमानदारी, श्रद्धा, संयम🌷

साधारणतः 2000 BC म्हणजे 4000 वर्षांपूर्वी ची ही एक सत्यकथा आहे. जी कुरआन मध्ये वर्णन केलेली आहे.

प्रोफेट याकूब अ.(Jacob), ज्यांना इस्राईल ही म्हंटले जाते, हे खूप अल्लाह निष्ठ  (ईश्वर निष्ठ) आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्ती होते आणि एक अल्लाह (परमेश्वर)चा संदेश लोकांपर्यंत पोहोचविणारे होते..

त्यांना वेगवेगळ्या पत्नींपासून बारा मुले होती...सगळ्यात लहान पुत्र होते, युसुफ अ.(Joseph) आणि बनी अमीन...


याकूब अ. सर्व मुलांमध्ये, त्याच्या सगळ्यात लहान मुलावर युसुफ अ. यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करायचे...

एक दिवस युसुफ अ. यांना स्वप्न पडले की सूर्य, चंद्र आणि अकरा तारे त्यांना वाकून प्रणाम करीत आहेत..त्यांनी हे स्वप्न त्यांच्या पित्याला वर्णन केले..त्यांचे पिता त्यांना म्हणाले की, "तू ह्या स्वप्नाबद्दल तुझ्या मोठ्या भावंडांना काहीही सांगू नकोस..कारण त्यांना ईर्ष्या होऊन ते तुला नुकसान करण्याचा प्रयत्न करतील."...त्यांच्या पित्याने हे ही सांगितले की, युसुफ अ. यांच्यावर अल्लाह (ईश्वर) चे आशीर्वाद असतील..आणि ते ही अल्लाहचे संदेश सर्वांना पोहोचवतील...

युसुफ अ. यांचे सावत्र भाऊ, युसुफ अ. यांच्यावर खूप ईर्ष्या...कारण त्यांचे वडील याकूब अ. त्यांच्यावर खूप प्रेम करायचे..एक दिवस ते सर्व भाऊ त्यांच्या वडिलांजवळ गेले आणि म्हणाले, "आम्ही बाहेर जात आहोत...तुम्ही आमच्यासोबत युसुफला पाठवाल का?..आम्ही त्याची चांगली काळजी घेऊ..तो आमच्यासोबत प्रवास करेल, खाईल, पियील आणि खेळेल...तुम्ही त्याला आमच्यासोबत   ठेवण्यासाठी विश्वास करत नाही का?..."

याकुब अ. यांना त्यांच्या वाईट हेतू ची भनक लागली...ते म्हणाले, मला भीती वाटते की लांडगा युसुफ वर आक्रमण करेल"...

पण त्या सगळ्या भावांनी त्यांना पटवून दिले आणि हमी दिली की, ते त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतील..त्यामुळे भरलेल्या अंतःकरणाने याकूब अ. यांनी युसुफ अ. यांना, त्यांच्या सोबत  जाऊ दिले...

जेव्हा ते सर्व जण जंगलात होते, तेव्हा मोठ्या भावांनी युसुफ अ. यांना एका कोरड्या, जुन्या विहिरीत फेकले... 

ते सर्व जण रडत घरी आले आणि त्यांच्या वडिलांना म्हणाले की, "लांडग्याने खरेच युसुफ वर आक्रमण करून, त्याला मारले."...त्यांनी युसुफ अ. यांचा रक्ताळलेला सदरा, त्यांची मन गढंत कहाणी सिद्ध करण्यासाठी  व दाखविण्यासाठी, वापस आणला होता.. 
याकूब अ. यांनी पाहिले की, तो सदरा अजिबात फाटला नव्हता..त्यांना त्याच वेळी सगळे समजले की, नक्की काय घडले असावे ..आणि ते खूप दुःखी झाले... 

ते म्हणाले, मला माहित आहे, हे खरे नाही..पण मी काही तक्रार करणार नाही आणि धीर सोडणार नाही..मी फक्त माझ्या अल्लाहला मदत मागेल.. लवकरच एक तांडा (काफिला, राहण्याची सामान असलेल्या गाड्या), ज्या इजिप्त (मिस्र) कडे जात होत्या, त्या विहिरीजवळून जात असतांना पाणीसाठी थांबल्या, ज्यात युसुफ अ. यांना फेकले गेले होते. त्यांना युसुफ अ. विहिरीत दिसले... 

ते त्यांना पाहून खूप आनंदी झाले, त्या दिवसांत सेवकांची खरेदी आणि विक्री करणे, एक साधारण प्रथा होती..आणि ते ही, एक चांगला तरुण युसुफ अ. सारखा मुलगा इजिप्त मध्ये विकून, त्यांना एक चांगली रक्कम मिळाली असती... 

इजिप्त (मिस्र) च्या सेवकांच्या बाजारातून, अजीज नावाच्या एका माणसाने , जो इजिप्त च्या एका शाही कुटुंबाचा सदस्य होता आणि इजिप्तच्या सेनेचा, सैन्य अधिकारी होता, युसुफ अ. यांना विकत घेतले..आणि त्याला घरी आणले..आणि त्याच्या बायकोला जुलेखाला म्हटले की, "युसुफ ला सन्मानाने वागव..तो आपल्यासाठी चांगले नशीब घेऊन येईल..आणि आपण त्याला एका मुलाप्रमाणे दत्तक घेऊ शकू."... 
युसुफ अ. मोठे होऊन, खूपच देखणे तरुण झाले... अजीज त्यांच्यावर खूप दया करायचा.. त्यांच्यावर प्रेम करायचा. 

घराच्या सर्व आर्थिक कारभाराची जबाबदारी त्याला दिली होती..अजीजची सुंदर बायको युसुफ अ. यांच्याकडे आकर्षित झाली.. एक दिवस युसुफ अ. खोलीत एकटे असताना, जुलेखा त्यांना पटवू लागली...युसुफ अ. मानले नाही..ते एक विनम्र आणि अल्लाहला घाबरणारे तरुण होते...त्यांना त्यांच्या मालकाला अजीजला अपमानित करायचे नव्हते आणि अल्लाहची अवज्ञा करायची नव्हती..त्यांनी अल्लाहची प्रार्थना केली..आणि अल्लाहने त्यांना मदत केली...आणि तेथून सुटून जाणे त्यांना जमले.. 

त्यांनी दरवाजा उघडला आणि खोलीच्या बाहेर पळण्याचा प्रयत्न केला.. जुलेखा त्याच्या मागे पळाली आणि तिने त्यांचा सदरा ओढून मागे खेचले.. सदरा फाटला.. जुलेखाचा पती अजीज आणि जुलेखाचा चुलत भाऊ, जे दाराच्या बाहेर येवून उभे होते, त्यांनी दोघांना बाहेर येताना पाहिले... 

आता तिने जे केले त्याची  लाज वाटण्याऐवजी, तिने युसुफ अ. यांना दोष दिला.."या माणसाला तुरुंगात पाठविले पाहिजे, मला नुकसान पोहोचविल्याबद्दल" असे तिने तिच्या पतीला सांगितले..

युसुफ अ. यांनी, हे अमान्य केले आणि त्यांनी, जे काही खरे घडले ते अजीजला सांगितले...दोन वेगवेगळे कथन होते...अजीजला कुणावर विश्वास ठेवावा, युसुफ अ. वर की जुलेखा वर कळत नव्हते..

जुलेखाचा चुलत भाऊ खूप हुशार होता..तो म्हणाला, "जर युसुफचा सदरा पुढून फाटला असेल, तर जुलेखा खरी आहे आणि जर सदरा मागच्या बाजूने फाटला, तर जुलेखा खोटे बोलत आहे आणि युसुफ निरागस आहे.."

युसुफ अ. चा सदरा मागून फाटला होता (कारण जुलेखाने त्यांना थांबवण्यासाठी मागून ओढले होते)..यामुळे युसुफ अ. यांची निरागसता सिद्ध झाली होती... 

अजीजला क्षणात कळाले की काय घडले..त्याने युसुफ अ. यांच्यावर विश्वास केला आणि त्याच्या बायकोला युसुफ अ. यांची क्षमा मागायला सांगितली..अजीजने युसुफ अ. ची माफी मागितली आणि जे झाले ते, विसरून जायला सांगितले...

पण जुलेखा विसरली नाही...तिला अपमानित झाल्यासारखे वाटले आणि  तिची हार झाल्यामुळे तिला राग आला..

हळू हळू बातमी महिलांमध्ये पसरली..आणि त्या गप्पा करू लागल्या की, जुलेखा एका सेवकावर आकर्षित झाली... जेव्हा जुलेखाने ऐकले, तेव्हा तिने सर्व महिलांना एका मोठ्या आणि छान मेजवानीसाठी तिच्या घरी आमंत्रित केले..तिला त्यांना दाखवायचे होते युसुफ अ. ज्यांच्याकडे ती आकर्षित झाली होती, हा कुणी साधारण व्यक्ती नव्हता...तो विलक्षण देखणा तरुण होता..इतका देखणा की, कोणीही त्याच्याकडे आकर्षित होण्यापासून, स्वतःला रोखू शकत नव्हते ...

त्या सगळ्या महिला जेवणासाठी बसल्या आणि त्यांच्या हातात फळे कापन्यासाठी चाकू दिलेला होता.. जुलेखाने युसुफ अ. यांना बोलावले..जसे युसुफ अ. त्या खोलीत आले...महिला त्यांच्या चकाकत्या रूपाकडे पाहतच राहिल्या..आणि त्यांनी फळे कापण्याऐवजी स्वतःची बोटे कापून घेतली...

त्यानंतर त्यांनी जुलेखाकडे पाहून म्हटले की, तू खरी आहेस..तो साधारण मनुष्य नाही..तो इतका चांगला दिसतो की जसा एक स्वर्गदूत... 

जुलेखा त्यांना म्हणाली, जर तो, मी जे सांगितले ते करण्यास मानला नाही, तर माझ्या आज्ञेनुसार त्याला तुरुंगात जावे लागेल, कारण तो एक सेवक आहे आणि मालकिणीची आज्ञा न मानणे हा त्याच्यासाठी अपराध आहे. (मालकाची आज्ञा न पाळणे, हा त्याकाळी अपराध समजला जायचा, कारण सेवकाला, काही नाणी, देऊन विकत घेतलेले असायचे.)

युसुफ अ. यांनी जुलेखाचे ऐकून काही चुकीचे करण्याऐवजी,  तुरुंगात जाणे पत्करले आणि महिलांच्या सांगण्यावरून, ते निरपराधी असताना देखील, त्यांना तुरुंगात टाकले गेले.

युसुफ अ. जेव्हा तुरुंगात होते, त्याच तुरुंगात एक आचारी आणि शाही दरबाराचा एक साकी (मद्य देणारा) त्याचे सहकारी कैदी होते...

एक दिवस ते युसुफ अ. जवळ आले आणि त्यांना पडलेले स्वप्न त्यांनी वर्णन केले..आचारीला स्वप्न पडले होते की तो एक नान (मोठा गोल ब्रेड, भाकरी किंवा पोळी) त्याच्या डोक्यावर घेऊन जात आहे..आणि पक्षी त्यातून ते खात आहेत...साकी ला स्वप्न पडले होते की, तो अंगुर पासून वाईन (मद्य) बनवत आहे...

अल्लाहने युसुफ अ. यांना आशीर्वादासह प्रतिभा दिली होती, त्यामुळे ते स्वप्नांचा अर्थ सांगू शकत होता...त्यांच्या सहकारी कैद्यांना ते म्हणाले, "मी तुमच्या स्वप्नांचे अर्थ सांगेन... जे मला अल्लाहने शिकविले आहे, त्यातलाच हा एक भाग आहे..."

मग युसुफ अ. यांनी दोघांना सांगितले की, आचारीला फाशी दिली जाईल आणि पक्षी त्याचे डोके खातील..आणि साकी सोडून दिला जाईल...आणि राजाला दरबारात वाईन म्हणजे मद्य देण्यासाठी नियुक्त केला जाईल..युसुफ अ. यांनी साकी ला, जेव्हा तो दरबारात जाईल तेव्हा, त्याच्या विषयी (युसुफ अ. विषयी) राजाशी बोलण्यास सांगितले...

पण साकी तुरुंगातून सुटल्यानंतर युसुफ अ. बद्दल सर्व विसरून गेला..आणि युसुफ अ. तुरुंगात काही अजून वर्ष तसेच राहिले..

एक दिवस राजाला एक स्वप्न पडले...राजाने पाहिले की, सात अशक्त गायी, सात जाड (धष्ट पुष्ट) गायींना खात आहेत...त्याने सात कोरडे आणि सात हिरवे मक्याचे कणीस पाहिले...

राजाने दरबारातील लोकांना विचारले की कुणी स्वप्नांचा अर्थ सांगू शकेल का?.. 
त्यानंतर साकीला युसुफ अ. आठवले...जे अजूनही तुरुंगात होते..त्याने राजाची आज्ञा घेतली आणि युसुफ अ. यांना भेटण्यासाठी गेला... त्याने राजाचे स्वप्न युसुफ अ. यांना सांगितले..

त्याच्यावर राग न करता आणि त्याच्याविषयी राजाशी लवकरच बोलण्यास सांगून, युसुफ अ. यांनी, त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला..."जमिनीत सात वर्ष मकाचे पीक खूप जास्त होईल...त्यामुळे तुम्हाला जेवढे आवश्यक आहे, तेवढे खा आणि बाकीचा मका सुरक्षित स्थळी ठेवा..त्यानंतर सात वर्ष खूप भयानक दुष्काळ येईल..त्या वर्षांत पाऊस होणार नाही आणि मका येणार नाही...जे तुम्ही जमा करून ठेवलेले मक्याचे दाणे आहेत त्यातून खा..त्यानंतर त्यापुढचे  वर्ष खूप पाऊस होईल आणि त्यानंतर पिकाची कापणी...." 

जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो खूप आनंदी झाला आणि राजा त्या व्यक्तीला भेटण्यासाठी इच्छुक झाला, ज्याने स्वप्नाचा अर्थ सांगितला होता...युसुफ अ. यांच्याकडे सैनिकांना पाठविण्यात आले...पण युसुफ अ. यांनी तुरुंग सोडण्यास नकार दिला, कारण त्यांना राजाला जाणीव करून द्यायची होती की, त्याला अन्यायपूर्वक बंद केले गेले होते...

त्यामुळे राजाने, त्या महिलांशी, ज्यांनी स्वीकार केले की, "युसुफ हा निरागस आणि सदाचारी आहे", योग्य चौकशी करवून घेतली...आणि न्याय केला.

त्यानंतरच युसुफ अ. तुरुंगातून बाहेर येण्यास तयार झाले.. आता युसुफ अ. यांना सन्मानाने राजाच्या दरबारात नेण्यात आले. राजा आधीच युसुफ अ. यांच्या ज्ञान, हुशारी, निष्ठा, इमानदारी आणि पुण्य यांनी प्रभावित होता...राजाने इच्छा केली की, "युसुफ त्याचा प्रमुख सल्लागार बनावा."...युसुफ अ. यांनी सुचविले की, त्यांना धान्याचा साठा करने आणि धान्याचे व्यवस्थापन करणे, याची जबाबदारी द्यावी...

राजा मानला आणि युसुफ अ. यांना, याचा पूर्ण अधिकार दिला.. अशा प्रकारे अल्लाहने युसुफ अ. यांना, त्यांच्यातील सदगुणामुळे, दरबारात
एक पद आणि स्थान देऊन, बक्षीस दिले ज्यासाठी ते योग्य होते... पुढे, जेव्हा आजूबाजूच्या जमिनीत दुष्काळ (धान्याची कमी) होती, इजिप्तमधील जनतेला खाण्यासाठी अजूनही पुष्कळ अन्न होते..हे सगळे युसुफ अ.च्या, देशाच्या, खाद्य राखीव संग्रहातील, चांगल्या व्यवस्थापनामुळे होते..शेजारील देशातून लोक अन्नासाठी इजिप्त मध्ये येत होते..

सगळीकडे खूप वाईट दुष्काळ पसरला आणि इजिप्तच्या, जवळचे आणि दूरचे लोक इजिप्तमध्ये आले...त्यामध्ये युसुफ अ. यांचे सावत्र भाऊ ही कानान  (सध्याचे पॅलेस्टाईन) वरून आले होते..

युसुफ अ. यांनी जरी त्यांच्या भावांना पाहता क्षणी ओळखले होते, तरी भावांनी त्यांना ओळखले नव्हते...युसुफ अ. यांनी, त्यांना पुढच्या वेळेस येताना त्यांच्या सर्वात लहान भावाला (बनी अमीन जो युसुफ अ. यांचा सख्खा भाऊ होता) घेऊन येण्यास सांगितले..नाहीतर पुढच्या वेळी धान्य मिळणार नाही...

भाऊ घरी त्यांच्या वडीलांजवळ, याकूब अ. यांच्याजवळ गेले आणि जे काही झाले ते सांगितले..आणि म्हंटले की, आमच्यासोबत बनी अमीन ला पाठवा...आम्ही वाचन देतो की, आम्ही त्याची काळजी घेऊ आणि येताना जास्त धान्य आणू..

पण याकूब अ., युसुफ अ. यांच्या भावांनी, जे युसुफ अ. सोबत केले होते ते विसरला नव्हते आणि त्यांची बनी अमीन ला त्यांच्यासोबत पाठवायची इच्छा नव्हती..

त्यांच्यावर दुसऱ्या वेळेस विश्वास ठेवण्यासाठी ते अजिबात इच्छुक नव्हते...तरीसुद्धा जेव्हा भावांनी जोर दिला आणि अल्लाहची शपथ घेतली की, ते बनी अमीन ची पूर्ण जबाबदारी घेतील...याकूब अ. यांनी, बनी अमीन ला जावू दिले...

जेव्हा ते सर्व भाऊ जात होते, तेव्हा याकूब अ. यांनी  त्यांना, इजिप्त मध्ये प्रवेश करताना शहराच्या वेगवेगळ्या दरवाजाने प्रवेश करायचा सल्ला दिला..

सर्व भाऊ, बनी अमीन सोबत इजिप्तसाठी निघाले..पूर्ण रस्ता मोठ्या भावांनी बनी अमीन ला टोमणे मारले आणि चिडविले..जेव्हा ते इजिप्तला पोहोचले आणि युसुफ अ. जवळ गेले, युसुफ अ. यांनी त्यांच्या सख्ख्या भावाला लगेच ओळखले आणि त्याला एकांतात, स्वतः विषयी सांगितले..

त्यांनी हे ही सांगितले की, मोठे भाऊ ज्या पद्धतीने वागवीत आहेत, त्याची यापुढे काळजी करायची आवश्यकता नाही...

जे अन्न धान्य ते विकत घेण्यासाठी आले होते ते त्यांनी दिले , पण जाण्याआधी एक चांदीची वाटी युसुफ अ. यांनी बनी अमीन च्या उंटावरील पिशवीत ठेवली.. 

भाऊ जसे निघणार, तेव्हा राजाच्या सेवकांना राजाची चांदीची वाटी हरवल्याचे आढळले...त्यांनी तांडा (काफिला, उंटाच्या गाड्या) थांबवला आणि त्यांच्या समानांत शोधले.. वाटी बनी अमीन च्या उंटावरील पिशवीत सापडली... 

हा इजिप्त चा कायदा होता की, कोणताही चोर, जिथे त्याने गुन्हा केला, ते शहर सोडून जाऊ शकत नव्हता...त्यामुळे बनी अमीन ला जाण्याची आज्ञा नव्हती...
हेच युसुफ अ. यांना पाहीजे होते...यामुळे युसुफ अ. यांना, त्यांच्या लहान भावाला, त्यांच्या जवळ ठेवण्यासाठी निमित्त मिळाले होते...बनी अमीन ला ही हे कळले होते...

पण त्याचे मोठे भाऊ अत्यंत चिंता करू लागले..कारण त्यांनी त्यांच्या पित्याला याकूब अ. यांना, बनी अमीन ला सुरक्षित वापस आणण्याचे वचन दिले होते...त्यांनी युसुफ अ. यांच्याकडे विनवणी केली की, "बनी अमीन ला जावू  द्यावे आणि आमच्या पैकी एकाला त्याच्या जागी ठेवून घ्यावे"....

पण युसुफ अ. मानले नाही. "हे चूक आहे की ज्याने गुन्हा केला, त्याच्या ऐवजी दुसऱ्या कुणाला ठेवून घ्यावे...". भाऊ यावर खूप उदास झाले होते...

सर्वात मोठा भाऊ म्हणाला, "मी माझ्या वडिलांना बनी अमीन बद्दल  शब्द दिला आहे..मी त्याच्या विना जाणार नाही..जोपर्यंत अल्लाह याविषयी काही ठरवत नाही.."

बाकीचे सर्व भाऊ घरी गेले आणि त्यांच्या वडिलांना सगळी कहाणी सांगितली, "तुमचा मुलगा चोर आहे, हे सगळे त्याच्यामुळे घडले..."

याकूब अ. हे विश्वास करण्यासाठी तयार नव्हते. "हे अशक्य आहे..बनी अमीन कधीही चोरी करणार नाही...पण जरी मी, त्याच्यासाठी काही करू शकत नसलो, तरी मी धीर धरेन आणि तक्रार करणार नाही..."

याकूब अ. यांनी, त्यांचे दिवस आणि रात्र दुःखात आणि प्रार्थना करण्यात घालविले...ते इतके रडले की, त्यांची दृष्टी गेली..पण त्यांनी धीर सोडला नाही...

त्यांची मुले त्यांच्यावर नाराज झाली आणि ते सर्व म्हणाले, "जर तुम्ही रडणे थांबवले नाही, तर तुम्ही असेच मरून जाल..."

"मी तुम्हाला काहीच म्हणत नाही...मी फक्त माझ्या अल्लाहला मदत मागत आहे...आणि त्यांच्यातर्फेच मदत मिळेल, तुमच्याकडून नाही" याकुब अ. बोलले... 

मग याकूब अ. यांनी, त्यांच्या मुलांना वापस इजिप्तला जावून युसुफ अ. आणि बनी अमीन ला बघून येण्यास सांगितले आणि आशा सोडली नाही...

भाऊ  युसुफ अ. जवळ तिसऱ्या वेळेस गेले आणि म्हणाले, "आम्ही वापस आलो कारण आमची गरज आहे...आमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत, तरी कृपा करून आम्हाला आमच्या कुटुंबासाठी धान्य द्या.आमच्यावर दया दाखवा..आम्ही तुमचे खरेच खूप आभारी राहू.." युसुफ अ. यांना, त्यांच्या कुटुंबाची दशा ऐकून खूप वाईट वाटले..

पण युसुफ अ. यांना, त्यांच्याशी केलेल्या त्यांच्या  निर्दयीपणाची  आठवण करून द्यायची होती. "आठवा, तुम्हाला एक भाऊ होता का...युसुफ?..त्याच्याशी तुम्ही काय केले?"

तेव्हा त्यांना जाणीव झाली की, हा चांगला माणूस खरंच त्यांचा भाऊ, युसुफ आहे...ज्याला त्यांनी विहिरीत फेकून दिले होते....

"तू खरच युसुफ आहे का?" त्यांना विश्वास बसत नव्हता आणि स्वतःची लाज ही वाटत होती...

"हो" युसुफ अ. यांनी उत्तर दिले...

"खरंच आम्ही चुकलो...आम्हाला माफ कर." भाऊ म्हणाले...

युसुफ अ. यांनी, त्यांना माफ केले..आणि अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांच्यावर कृपा दृष्टी व्हावी...

मग युसुफ अ. यांनी, त्यांच्या पूर्ण कुटुंबाला इजिप्तमध्ये आणण्यास सांगितले...युसुफ अ. यांनी, त्याच्या वडिलांसाठी, त्यांचा सदरा दिला आणि म्हटले की, "हा सदरा त्यांच्या डोळ्यावर लावा...आणि त्यांची दृष्टी परत येईल.."

कानानला, तांडा (उंटाच्या गाड्या) वापस येण्याआधीच याकूब अ. म्हणाले की, "हवेत युसुफ अ. च्या असण्याचा आभास होत आहे..". लोक बोलत होते की, "खरंच तुमचे डोके काम करीत नाही...हे कसे शक्य आहे, जर युसुफचे काहीच शिल्लक राहिले नाही?" 

पण याकूब अ. यांना खात्री होती की, त्यांचा मुलगा जिवंत आहे...

लवकरच त्यांची मुले युसुफ अ. बद्दल चांगली बातमी घेऊन घरी पोहोचले...आणि त्यांचा सदरा, त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर ठेवला...याकूब अ. यांना  लगेच दृष्टी वापस मिळाली आणि ते म्हणाले, "मी म्हणालो नव्हतो का की, जे अल्लाहकडून मला कळले, ते तुम्हाला कळले नाहीे..मी अल्लाहला तुम्हाला माफ करण्यासाठी प्रार्थना करेल..."

नंतर  पूर्ण कुटुंब इजिप्त ला गेले...युसुफ अ. आता इजिप्त चे राजा बनले होते...ते त्यांना घेण्यासाठी शहराच्या दरवाजा पाशी आला..त्यांनी त्यांच्या पित्याला खूप आदराने आणि सन्मानाने, त्याच्या दरबारात संरक्षण दिले. जेव्हा युसुफ अ. त्यांच्या सिंहासन वर चढले, तेव्हा त्यांच्या कुटुंबासह सर्वांनी त्यांना वाकून प्रणाम केला...

आणि अशा प्रकारे त्याचे बालपणाचे स्वप्न खरे झाले की, त्याचे आईवडिल आणि अकरा भाऊ, जे स्वप्नात सूर्य,चंद्र आणि तारे होते, ते त्याला वाकून प्रणाम करीत होते... 
================================
*याकूब अ.,युसुफ अ.,इब्राहीम अ. आणि लूत अ. हे हिब्रू भाषा बोलत होते व ते अल्लाहला  यहोवा (yahweh) या नावाने संबोधित करत होते. मुहम्मद स. अ. व. यांच्यावर कुरआन प्रकट झाल्यानंतरचे अल्लाह हे संबोधन अरबी भाषेत कुरआनमध्ये आहे. 
विश्वाचा निर्माता एकच आहे...भाषा वेगळ्या त्यामुळे संबोधन वेगळे आहे...इस्लाम धर्माचे लोक इब्राहीम अ. आणि मूसा अ. (Moses) यांनाही मानतात आणि ईसा अ.( येशू) यांनाही मानतात, ज्यामुळे अनुक्रमे ज्यू (यहुदी) आणि ख्रिश्चन धर्म आले. मूसा अ. यांच्यावर तौरात (Torah) आणि ईसा अ. यांच्यावर इंजील (बायबल) हा ग्रंथ प्रकट झाला. तौरात, बायबल आणि कुरआन मध्ये जवळ जवळ सारख्याच प्रोफेट्स च्या सत्यकथा आणि बोधकथा आहेत...आणि संदेश आहे...पण कुरआन हा मूळ ग्रंथ आहे, ज्यात काहीही बदल झालेला नाही.

कुरआन च्या बोधकथा..2 इब्राहीम अ..एक संदेशवाहक..

 🌼🌼🌿🌿इब्राहीम अ...🌿🌿🌼🌼


खूप खूप वर्षांपूर्वी, साधारणतः 2215 BC मध्ये म्हणजेच अंदाजे 4000 वर्षांपूर्वी, इराकमध्ये (बेबीलोन मध्ये जे आता पुरातन शहर आहे), एका माणसाला ज्याचे नाव अझर होते, जो लाकडाच्या प्रतिमा कोरून बनवत होता, त्याला एक मुलगा झाला...इब्राहीम अ....

त्या दिवसात लोक, लाकडाच्या आणि दगडांच्या प्रतिमांची आराधना करत होते...ते असाही विश्वास ठेवत होते की, तारे मनुष्याच्या भाग्यावर नियंत्रण ठेवतात...

जस जसे इब्राहीम अ. मोठे होऊ लागले, त्यांना जाणीव होऊ लागली की, मनुष्याने बनविलेल्या प्रतिमा कुणालाच मदत करत नाहीत...त्यांची आराधना करून काही उपयोग नाही..त्या प्रतिमा एकदुसऱ्यांनाही मदत करू शकत नाहीत...

इब्राहीम हे एक चांगले, हुशार आणि ज्ञानी व्यक्ती होते...ज्यांना अल्लाहने, त्याचा संदेशवाहक म्हणून निवडले...प्रतिमांची आराधना करण्याऐवजी इब्राहीम अ. यांनी, एका आणि फक्त एका अल्लाहवर विश्वास ठेवला...

त्यांनी त्यांच्या वडिलांना आणि सर्व दुसऱ्या लोकांना प्रतिमांची आराधना करण्यास थांबवले..."ज्यांना तुम्ही स्वतः बनविले त्यांची तुम्ही आराधना कशी करू शकता?..." इब्राहीम अ. यांनी त्यांना विचारले," या प्रतिमा तुम्हाला कशी मदत करू शकतात?..." 

पण त्याचे वडील,अझर रागावले आणि म्हणाले, "इब्राहीम मी तुला चेतावणी देतो की, मी तुला मरेपर्यंत दगडांनी मारेन, जर तू हा मूर्खपणा थांबवला नाहीस.."

यामुळे इब्राहिम अ. उदास झाले...पण ते म्हणाले की, अल्लाह तुम्हाला आर्शिवाद देवो...मी अल्लाहला प्रार्थना करेन की, तो तुमच्यासाठी दयाळू राहो..."

इब्राहीम अ. यांची ही सुद्धा इच्छा होती की, लोकांनी ताऱ्यांवर, त्यांच्या ईश्वरासारखा विश्वास ठेवणे थांबवावे...एका रात्री जेव्हा ते आकाशात ताऱ्यांची चमक पाहत होते...

ते लोकांना म्हंटले, "मी सर्वात तेजस्वी ताऱ्याची आराधना करेन..."

ते लोक, हा विचार करून थोडे आनंदी झाले की, शेवटी इब्राहीम अ. यांनी, त्यांच्या श्रद्धेवर अनुसरण करण्यास सुरुवात केली...पण जेव्हा, तो तारा मंद झाला आणि चंद्र आला, इब्राहीम अ. म्हणाले,

"ओह...मी त्या ताऱ्याची आराधना करू शकत नाही, जो मंद आहे...मी चंद्राची आराधना करेन..."

पुन्हा जेव्हा चंद्र मावळला आणि तेजस्वी सूर्य उगवला...इब्राहीम अ. म्हणाले, "ओह, हा सूर्य चंद्रापेक्षा जास्त तेजस्वी आहे...मी याला ईश्वर बनवतो..." पण जेव्हा सूर्यास्त झाला आणि सूर्य दिसेनासा झाला...इब्राहीम अ. लोकांकडे येऊन बोलले, "लोकहो, जर मला माझ्या अल्लाहने, योग्य रस्ता दाखवला नसता, तर मी भलतीकडेच भटकलो असतो.."

मी अल्लाहला सोडून कुणावरही विश्वास करणार नाही...एक आणि फक्त एक अल्लाह ज्याने ह्या पृथ्वीवरची आणि आकाशातली प्रत्येक गोष्ट बनविली...

इब्राहीम अ. यांच्याशी लोक वाद करत राहिले आणि त्यांच्या प्रतिमांची भीती दाखवत राहिले.

इब्राहीम अ. म्हणाले, "मी तुमच्या प्रतिमांच्या आराध्याला का घाबरु?, जर तुम्ही एक आणि फक्त एक खऱ्या अल्लाहला घाबरत नाही?"

मी तुमच्या पैकी एक नाही...मी एकटा अल्लाहकडे वळेल...जो स्वर्गाचा आणि धरतीचा प्रभु आहे...

तरीही लोकांनी मनुष्याने बनविलेल्या प्रतिमांची आराधना करने चालू ठेवले...

एकदा इब्राहीम अ. यांनी शांतपणेे सांगितले, "मी तुमच्या प्रतिमांबरोबर एक पेच करणार आहे...हे यासाठी, कारण मला माहीत आहे, या प्रतिमा कुणालाच मदत आणि नुकसान करू शकत नाही..."

एक दिवस, जेव्हा शहराचा प्रत्येक जण, एका मोठ्या धार्मिक उत्सवासाठी गेला होता, इब्राहीम अ. यांनी आजारी असल्याचे ढोंग केले आणि मागे राहिला...

ते सर्व लोक गेल्यावर, इब्राहीम अ. त्यांच्या मोठ्या आराधनेच्या ठिकाणी गेले, जेथे शंभर प्रतिमा ठेवल्या होत्या...त्या ठिकाणी सर्व प्रकारची फळे आणि मिठाई लोकांनी त्या प्रतिमांसाठी ठेवली होती...इब्राहीम अ. यांनी प्रतिमांना विचारले, "तुम्ही या हव्या हव्याशा वस्तू, ज्या तुमच्यासाठी ठेवल्या आहेत, का खात नाहीत?...जेव्हा लाकडाच्या आणि दगडाच्या पुतळ्यानी उत्तर दिले नाही, त्याने विचारले, "तुम्ही का बोलत नाही?" मग त्याने एक गज घेतला आणि त्यांना आकारहीन केले...फक्त एका मोठ्या प्रतिमेला तसेच ठेवले...जी सर्व कहाणी लोकांना सांगेल...

जेव्हा लोक उत्सवातून, त्या जागी वापस आले आणि तुटलेले पुतळे पाहिले, ते खूप रागावले...

"हे इब्राहिम शिवाय कोणीच करू शकत नाही.." ते म्हंटले...

लगेच शहरातील सर्व लोक जमा झाले...त्यांनी इब्राहीम अ. यांना बोलावले आणि विचारले की, त्यांनी, त्यांच्या पुतळ्यांच्या प्रतिमांशी काय केले...

इब्राहीम अ.बोलले, "तुमच्या सर्वात मोठ्या पुतळ्याने, बाकी पुतळ्यांना असे केले...तुमच्याच मोठ्या प्रतिमेने हे केले...तुम्ही विचारा...म्हणजे जर ती बोलत असेल तर .."

अर्थात, पुतळे बोलत नाहीत...त्यामुळे ते स्तब्ध राहिले आणि बोलले, "इब्राहीम, तुला चांगले माहीत आहे की, हे पुतळे बोलत नाहीत..."

"मग तुम्ही त्यांची आराधना का करता?" इब्राहीम अ. यांनी विचारले...."ह्या तुम्हाला काहीच कामाच्या नाहीत...तुम्ही का विचार करत नाही आणि समजून घेत नाही...हे पुतळे तुम्ही स्वतः बनविले...तुम्ही अशा मृत लोकांची पुतळा बनवून आराधना का करता?"

पण ते लोक समजून घेण्यास तयारच नव्हते...

नमरुद हा इराकचा म्हणजेच बेबिलोन चा राजा होता, जो स्वतःला ईश्वर समजत होता...त्यानेहीे इब्राहीम अ. विषयी ऐकले. त्याने इब्राहीम अ. यांना, त्याच्या दरबारात बोलावले आणि त्याला विचारले की, तो नमरुदला ईश्वर का मानत नाही?

इब्राहीम अ. एक धैर्यवान तरुण होते, जे अल्लाहशिवाय कुणालाही भीत नव्हते...त्यांनी उत्तर दिले, "कारण तुम्ही एक मनुष्य आहात, जसे आमच्या पैकी प्रत्येक जण आहे...आणि पुतळ्यांविषयी म्हणाल तर ते मुके, बहिरे आणि आंधळे आहेत, तर मग ते ईश्वर कसे असू शकतील?"

नमरूद खूप रागावला आणि विचारले,
"तुझा अल्लाह काय करू शकतो, जे मी करू शकत नाही?"
इब्राहीम अ. बोलले, "अल्लाह जीवन देतो आणि जीव घेतो"

नमरुद म्हणाला, "मीही हे करू शकतो...मी कैद्याला फाशी (मृत्युदंड) देतो आणि ज्याला मृत्यूची शिक्षा दिली आहे त्याला जीवनदान देतो..."

मग इब्राहीम अ. म्हणाले, "अल्लाह सूर्य पूर्वेतून उदय करतो आणि पश्चिमेस अस्त करतो...तुम्ही सूर्य पश्चिमेतून उदय करून दाखवू शकता का?"

नमरुद गोंधळलेला होता...त्याला कळलेच नाही, की काय बोलावे...पण तो एक क्रूर आणि गर्विष्ठ राजा होता, त्याने आज्ञा दिली की, इब्राहीम अ. यांना एका मोठ्या आगीत फेकून देण्यात यावे...राजाच्या लोकांनी एक मोठी आग लावली आणि इब्राहीम अ. यांना त्यात फेकले...

इब्राहीम अ. यांनी स्वतःला वाचवण्यासाठी अल्लाहची प्रार्थना केली...अल्लाहने इब्राहीम अ. यांच्यावर खूप प्रेमाने आशीर्वाद दिला आणि आज्ञा केली, "हे आग !...शांत होऊन जा आणि इब्राहीमला वाचवून आशीर्वाद दे." त्याच्या भोवतालची आग शांत झाली...प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आणि इब्राहीम अ. सुखरूप बाहेर आले....


पवित्र कुराणमध्ये खूप ठिकाणी अल्लाह ने, मुहम्मद स. अ. व. यांना इब्राहीम अ. च्या श्रद्धेच्या रस्त्यावर चालण्यास सांगितले, कारण इब्राहीम अ. अल्लाहवर खरा विश्वास ठेवणारे आणि अल्लाहचे मित्र होता...

नमरुदच्या क्रूरपना नंतर,जो इराकचा राजा होता, ज्याने इब्राहीम अ. यांना, जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.. इब्राहीम अ. यांनी, इराक सोडले आणि ते पॅलेस्टाईन (फिलिस्तीन) मध्ये गेले आणि नंतर इजिप्त (मिस्र) मध्ये गेले...त्यांची पत्नी सारा, जी त्याच्या जवळच्या नात्यातली होती आणि त्यांचा पुतण्या, लू अ. त्यांच्यासोबत होते... लूत अ. हे खरी श्रद्धा मानणारे आणि विश्वास ठेवणारे होते...काही दिवसांनी ते ही, अल्लाह चे संदेशवाहक बनले...

जेव्हा ते इजिप्तला गेले, लोकांनी त्यांना इजिप्त (मिस्र) च्या राजा विषयी सांगितले. 
इजिप्त च्या राजाला फिरौंन (pharaoh,फैरो म्हंटले जायचे. 
फिरौंन (pharaoh,फैरो) खूप कपटाचारी आणि दुष्ट राजा होता...जर त्याने एका सुंदर स्त्रीला पाहिले, तर तो त्याच्या माणसांना म्हणायचा, तिला उचला आणि राजवाड्यात घेऊन या...जर ते जबरदस्तीने केले, तरी चालेल...

इब्राहीम अ. यांची पत्नी "सारा" सुंदर स्त्री होती..त्यामुळे फिरौंनच्या लोकांनी तिला राजाकडे घेऊन गेले...एक सद्गुणी आणि निष्ठावंत स्त्री असल्याने, तिने अल्लाहकडे मदत                                   मागितली...अल्लाहने तिच्या प्रार्थनेचे उत्तर दिले... फिरौंन तिला काहीच इजा पोहोचवू शकला नाही, स्पर्श करू शकला नाही..त्याचा हात एकाच जागी कडक, स्थिर झाला....तो हैराण झाला..

तिला राजाच्या वाईट हेतूपासून, अल्लाहने संरक्षण दिले होते...आणि वाचवले होते...फिरौंनने जाणले की, सारा एक सद्गुणी स्त्री आहे आणि कोणत्या तरी अज्ञात शक्ती (अल्लाह) तिला वाचवत आहे...

आता तो इतका भयभीत झाला की, त्याने साराला मोकळे केले आणि तिच्यासोबत आणखी एक सद्गुणी मुलगी जिचे नाव हाजरा होते, पाठविली आणि त्यांना सन्मानाने पाठविले.

नंतर इब्राहीम अ. यांनी हाजराशी लग्न केले... इब्राहीम अ. हे आता वयस्कर झाले होते आणि त्यांना मूल नव्हते...त्यांनी अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांना एक वारस (एक मुलगा) मिळावा...अल्लाहने या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि त्यांना हाजरा पासून एक मुलगा दिला, इस्माईल अ.

जेव्हा हाजरा ने इस्माईल अ. यांना जन्म दिला, इब्राहीम अ. ची पहिली पत्नी, सारा नाराज झाली कारण तिला तिचे स्वतःचे मूल नव्हते...
त्यामुळे अल्लाहने इब्राहीम अ. यांना आज्ञा केली की, 'हाजरा आणि तिचा मुलगा इस्माईल अ. यांना घेऊन, एका वाळवंटाच्या ठिकाणी घेऊन जा आणि तेथे सोडून वापस ये..'

इब्राहीम अ. यांना ही आज्ञा पाळणे, खूप अवघड होते...इतक्या वर्षांनी जो मुलगा जन्माला आला, आणि ज्याच्यासाठी खूप तीव्र इच्छा आणि प्रार्थना करावी लागली, त्याला आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीला हाजराला सोडून येणे, इब्राहीम अ. यांना खूप कठीण होते...

पण ते अल्लाह ची खरी श्रध्दा करणारे होते...त्यांनी कोणताही संकोच न बाळगता, ती आज्ञा पाळली...

अल्लाह च्या हुकुमाप्रमाने ते हाजरा आणि इस्माईल अ. यांना, घेऊन एका वाळवंटाच्या ठिकाणी गेले...रस्त्यात हाजरा ने त्याला विचारले, "तुम्ही आम्हाला कोठे आणि का घेऊन जात आहात?"
इब्राहीम अ. शांत राहिले आणि काहीही उत्तर दिले नाही...
हाजरा समजली आणि तिने विचारले, "ही अल्लाह ची इच्छा आहे का?"

"हो,असेच आहे" इब्राहीम अ. यांनी उत्तर दिले...

"मग मी प्रश्न विचारणार नाही आणि मला कशाचीच भीती नाही..निश्चितपने अल्लाह आमचे संरक्षण करेल", हाजरा म्हणाली...हाजरा एक धैर्यंवान आणि कर्तव्यनिष्ठ स्त्री होती...

इब्राहीम अ. त्यांना निर्मनुष्य जागी घेऊन गेले...जेथे पाणी नव्हते आणि मैलपर्यन्त झाड नव्हते...आणि त्यांना तेथे सोडले...ही जागा "मक्का" होती...

जेव्हा त्यांनी हाजरा आणि इस्माईल अ. यांना निर्जन ठिकाणी एकटे सोडले, त्यांना खूप वाईट वाटले...तो त्यांच्यासाठी खूप मोठा त्याग होता...पण इब्राहीम अ. लटपटले नाही आणि कमजोर पडले नाही...

ते त्यांना सोडून वापस, थोडे दूर गेले...जेव्हा, ते दोघे  इब्राहीम अ. यांना दिसेनासे झाले, तेव्हा ते थांबले आणि चेहरा तिकडे करून अल्लाहला कळकळीने प्रार्थना केली, " 'ओ अल्लाह', तुझ्या इच्छेप्रमाणे, मी माझ्या वारसाला वाळवंटाच्या ठिकाणी सोडून जात आहे... 'ओ अल्लाह'...मी त्यांना सोडले जेणेकरून, ते तुला इथे प्रार्थना करत राहतील. कृपा करून त्यांचे रक्षण कर... लोकांनी त्यांच्याकडे येऊन, त्यांना तुझ्या धरतीतून अन्न पुरवठा करू दे, जेणेकरून ते नेहमी तुझे आभारी राहतील"

असे म्हणून इब्राहीम अ. वळले आणि त्यांना अल्लाहच्या दयाळूतेवर विश्वास करून, सोडून गेले....

अल्लाह इब्राहीम अ. यांच्या निष्ठेवर इतका प्रसन्न झाला की, अल्लाहने इस्माईल अ. आणि हाजरा चे फक्त संरक्षणच केले नाही, तर वचनही दिले की, त्यांच्या नंतरच्या वंशजांची भरभराट होईल...

इकडे हाजरा दोन शुष्क डोंगराच्या मधील वाळवंटात होती...डोंगराचे नाव "सफा" आणि "मरवा" होते...तिला काय करावे काही कळत नव्हते...जेव्हा बाळ प्रखर उष्णतेने, तहान लागल्यामुळे रडायचे, तेव्हा तिचे हृदय बाळासाठी दुखायचे...पण ती काय करू शकत होती...तेथे पाणी नव्हते, अन्न नव्हते, छत नव्हते आणि कोणीच दिसत नव्हते...ती एक माता होती...ती कसे बसून तिच्या बाळाला मरतांना पाहू शकत होती....

ती सफा डोंगरावर हे पाहण्यासाठी चढली की, त्या दिशेला, कोणी मदतीसाठी दिसते का? पण सगळे वाळवंट होते...मग ती पळत वापस आली तिच्या तहानलेल्या बाळाला पाहण्यासाठी.... 

पुन्हा ती दुसऱ्या डोंगरावर " मरवा " वर पळाली... त्या दिशेला कोणी दिसते का, ज्याला ती मदतीसाठी विचारू शकते....पण तिथे कोणीच नव्हते..

स्वतःला त्रास घेऊन, हाजरा एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर मदतीसाठी पळत राहिली...प्रत्येक वेळेस वापस येताना, तिच्या तहानलेल्या आणि भुकेल्या बाळाला पाहत होती...असे वरखाली आणि एका डोंगरावरून, दुसऱ्या डोंगरावर जावून आणि परत परत जावून, सात चकरा झाल्यावर ती, अल्लाहची इच्छा, असे स्वीकार करून, अल्लाहच्या इच्छेला शरण गेली, आणि थकून बसली...

आणि मग...अल्लाहने त्याची दयाळूता दाखविली....चमत्कारिकरित्या..एक पाण्याचा फवारा (झरा), बाळाच्या जवळ वाहू लागला...

त्यालाच आज जमजम म्हणतात..."आब ए जमजम" (जमजम चे पाणी) हे पाणी खूप ताजेतवाने करणारे, उपचार करणारे, जखम भरणारे आणि उत्साहवर्धक म्हणजेच शक्ती देणारे समजले जाते...आजही जे "हज" आणि "उमरा" साठी पूर्ण जगातून "मक्का" येथे जातात,अशा लाखो मनुष्यांसाठी, जमजम चे पाणी उफाळून पुढे येते...

हाजराला तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.. तिचे हृदय आनंदाने भरले...दोघांना, तिला आणि तिच्या बाळाला अल्लाहने वाचविले...

अल्लाहला हाजराची श्रद्धा आणि धैर्य इतके आवडले की, अल्लाहने या दिवसापासून "लाखो माणसे, पुरुष, स्त्रिया, मुले, याच धर्मनिष्ठ स्त्रीने, हाजराने चाललेल्या रस्त्यावर पुन्हा पावले टाकतील...जेव्हा ते सफा आणि मरवाच्या दरम्यान, "हज "च्या अवधीत चालतील" असा आशीर्वाद दिला..

काही वेळानंतर, एक उंटाच्या गाड्या असलेला तांडवने (काफिला) या वाळवंटातून जात असताना, ते झऱ्याचे पाणी पाहिले आणि तेथे थांबून,                           हाजराला, तात्पुरता मुक्काम करण्याची परवानगी मागितली...

"हो नक्कीच", तिने उत्तर दिले..."पण या पाण्यावर तुमचा अधिकार करू नका..ते प्रत्येकासाठी मोफत असेल..."ते लोक मानले...आणि ते तिथे काही दिवस पाण्यासाठी राहिले...
(पाणी शोधणे हे सौदी अरेबिया मध्ये खूप कठीण होते. जिथे कुठे पाणी असायचे...लोक आजूबाजूला त्यांची घरे बनवायचे...) 

अशा प्रकारे मक्का एक व्यस्त वस्ती बनले..आणि इब्राहीम अ. यांनी अल्लाहला जी प्रार्थना केली होती की, 'त्याच्या पत्नी आणि त्याच्या वारसाचे रक्षण कर...आणि लोकांना त्यांच्याकडे येऊ दे..' त्या प्रार्थनेचे अल्लाहकडून उत्तर मिळाले...

हाजरा आणि इस्माईल अ. तिथेच राहिले, जेथे इब्राहीम अ. त्यांना सोडून गेले होते..इब्राहीम अ. त्यांच्या या कुटुंबाला, कधी कधी येऊन भेटायचे...

जेव्हा इस्माईल अ. मोठे झाले...इब्राहीम अ. यांनी एक स्वप्न पाहिले...अल्लाह त्याच्या मुलाची, इस्माईल अ. यांची, आहुती देण्याची आज्ञा करत आहे...

इब्राहीम अ. खूप घाबरले आणि जागे झाले...पण त्यांना, तीन रात्री तेच स्वप्न पडले...त्यांना खात्री झाली की, ही अल्लाह ची आज्ञा आहे...आणि त्यांना, त्या आज्ञेसाठी झुकले पाहिजे...

ही इब्राहिम अ. साठी अत्यंत कडक परीक्षा होती...जे आता एक वृद्ध मनुष्य होते...ते त्यांच्या जिवलग मुलाचा आहुती कसा देऊ शकणार होते?...पण त्यांनी, स्वतःच आठवण केली की, ते अल्लाहचे, संदेशवाहक आहे...आणि आज्ञा न पाळण्याचा, ते कधीही विचार करू शकत नाही...

त्यामुळे ते इस्माईल अ. कडे गेला..आणि त्यांना त्यांच्यासोबत चलण्यास सांगितले...

जेव्हा ते, इस्माईल अ. यांना सूनसान जागी घेऊन जात होता, इस्माईल अ. यांनी, त्यांच्या वडिलांना विचारले की, ते कोठे जात आहेत?...

इब्राहीम अ. यांनी त्यांच्या स्वप्नाविषयी, इस्माईल अ. यांना सांगितले...इस्माईल अ. हे, त्यांच्या अल्लाहनिष्ठ, वडिलांचे, एक शूर पुत्र होते...घाबरून न जाता किंवा विचलित न होता ते म्हणाले, "बाबा...जर ही अल्लाहची इच्छा आहे तर करा...मी आहुतीसाठी तयार आहे..तुम्ही मला अल्लाहच्या इच्छेशी शरणागत (नम्र) पाहाल..."

मग इब्राहीम अ. यांनी, स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जेणेकरून, ते जे काही करणार आहे, ते त्यांना पाहता येऊ नये. 
काही वेळानंतर, लगेच अल्लाह त्याच्याशी बोलला, "इब्राहीम खरंच...मी त्यांना पारितोषिक देतो, जे योग्य करतात..ही एक परीक्षा होती...मी तुझी आहुती स्वीकार केली आहे...आणि इस्माईल अ. च्या जागी एक कोकरू आहुती झाले होते...आणि इस्माईल अ. जिवंत होते...

अल्लाहने त्याच्या वचनावर खरे राहून, इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. यांना आशीर्वाद दिला की, येणाऱ्या पिढ्यां त्यांची आठवण करतील...

या दिवसापासून प्रत्येक मनुष्य जेव्हा "हज" साठी जातो, तेव्हा त्यांच्या आहुतीची आठवण करतो...प्रत्येक वर्षी "ईद उल अजहा" ला म्हणजेच "बकरीद ईद" ला प्रत्येक अनुयायी, त्यांच्या ऐपतीनुसार इब्राहीम अ. च्या आहुतीच्या स्मृतीत एक बकरा बळी देतो...

त्यानंतर अल्लाहची आज्ञा पाळून इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. यांनी अल्लाहचे घर बनविले..."काबा" जेथे लोक प्रार्थना करू शकतील...

जसे इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. अल्लाहच्या घराचा पाया उंच करत होते...ते प्रार्थना करत होते..."हे अल्लाह...ही सेवा स्वीकार कर...आणि आम्हाला तुझ्या इच्छेसाठी आज्ञाधारक बनव...आणि तुझ्या कृपेवर अवलंबून राहू दे, कारण तू खूप दयाळू आहेस..."

इब्राहीम अ. यांनी अशीही प्रार्थना केली की, ही जागा एक शांतीचे शहर बनू दे...त्यांनी त्यांच्या मुलाला अल्लाहच्या श्रद्धेसमोर झुकण्यास सांगितले...आणि अल्लाहपासून कधीही दूर न जाण्यास सांगितले...

मुहम्मद(स.अ.व.) हे त्यांच्याच पिढीतील वंशज आहेत....

अल्लाह त्याच्या संदेशवाहकाला, इब्राहीम अ. यांना, इतके प्रेम करत होता की, त्याने नंतर मुहम्मद (peace be upon him) यांना, जे शेवटचे संदेशवाहक होते, इब्राहीम अ. यांच्या श्रध्देच्या रस्त्यावर चालण्यास सांगितले....

आज जेव्हा पूर्ण जगातून, लाखो मनुष्य "काबा" ला जातात, ते तिचं प्रार्थना म्हणतात जी, मुहम्मद (peace be upon him) ने शिकविली आहे.. आणि तवाफ ("काबा" ला सात चक्कर मारणे) करतात...अशाप्रकारे "इब्राहीम अ. आणि इस्माईल अ. यांची अल्लाहच्या इच्छेशी अधीनता " याची आठवण करने, लोकांनी चालू ठेवले आहे..

काबा च्या समोर एक स्थान आहे... "मुकाम ए इब्राहीम", जेथे दगडावर इब्राहीम अ. यांच्या पायाचे निशाण दिसतात..हे लोकांकडून शतकांपासून संरक्षित केले गेले आहे...येथे प्रत्येक मनुष्य अल्लाहला एक खास प्रार्थना म्हणतो....आणि या अल्लाहच्या प्रिय संदेशवाहकांना ज्यांनी काबा बांधला, त्यांना सलाम पाठवतात...


इब्राहीम अ. जेव्हा, हाजराला वाळवंटात सोडून सारा कडे आले... सारा नाराज होती..तिला स्वतःचे मूल नव्हते म्हणून...

काही वर्षांनंतर अल्लाहने इब्राहीम अ. यांच्याकडे, फरिश्ते (स्वर्गदूत / angle) पाठविले...त्यांना, हे सांगण्यासाठी की, एक चांगली बातमी आहे की, इब्राहीम अ. यांना, अजून एक मुलगा होईल...हे फरिश्ते मनुष्याच्या रुपात आले होते...इब्राहीम अ. यांना, आशिर्वादासह शुभेच्छा देण्यासाठी आले होते...

इब्राहीम अ. यांनीे त्यांच्या शुभेच्छा वापस केल्या.. फरिश्ते नम्रतेने त्याला म्हणाले, "आम्ही तुझ्यासाठी चांगली बातमी आणली आहे ..एक हुशार आणि बुद्धिमान मुला विषयी..."इसाक" अ. आणि त्यानंतर त्याच्या पुढची पिढी... याकूब अ.(इस्राइल)... ही अल्लाहची इच्छा आहे की तुला सारा पासून एक मुलगा होईल...

इब्राहीम अ. यांची पत्नी सारा तेथे उभी होती...ती खूप आश्चर्यचकित झाली...आणि तिने विचारले, "पण हे कसे शक्य आहे? मी एक वृद्ध स्त्री आहे आणि माझे पती ही खूप वृद्ध आहेत...आम्हाला मूल कसे होऊ शकते?"...

फरिश्ते उत्तरले, "अल्लाह च्या इच्छेवर तुम्ही आश्चर्य करत आहात का?अल्लाह निश्चितच सर्वात मोठा आहे आणि जे काही तो इच्छा करतो, ते तो करू शकतो... तुमच्यावर त्याचे आशीर्वाद असो... आशा सोडू नका..."

"नाही, मी आशा सोडणार नाही..जे लोक श्रद्धा करत नाहीत ते आशा सोडतात..." इब्राहीम अ. म्हंटले...

अशा प्रकारे अल्लाहने वचन दिल्याप्रमाणे सारा ला एक मुलगा झाला...इसाक अ...जो मोठा झाल्यावर एक संदेशवाहक बनला...आणि त्यानंतर त्यांचा मुलगा याकूब अ. आणि मग त्याचा मुलगा युसुफ अ...ही संदेशवाहक बनले...

अशाप्रकारे इब्राहीम अ. यांनी, जी प्रार्थना केली होती की त्यांना चांगले आणि सद्गुणी मुले आणि वंशज होऊ दे...ती अल्लाहने पूर्ण केली...त्यांची दोन्ही मुले इस्माईल अ. आणि इसाक अ. आणि त्यांचे वंशज ही संदेशवाहक बनले...त्यामुळे इब्राहीम अ. यांना "संदेश वाहकांचा पिता" म्हंटले जाते...


एक दिवस उत्सुकतेने इब्राहीम अ. यांनी अल्लाहला विचारून, हे दाखविण्यास सांगितले की, अल्लाह, "न्याय करण्याच्या दिवशी"...मृत झालेल्यांना जिवंत कसे करेल?

अल्लाहने विचारले, "इब्राहीम, तुला विश्वास नाही का?"

"मला खरंच विश्वास आहे", इब्राहीम अ. म्हणाले, "पण मला स्वतःला संतुष्ट करण्यासाठी ते पहायचे आहे"...

अल्लाहने मान्य केले...

अल्लाहने इब्राहीम अ. यांना, चार पक्षी पाळण्यास सांगितले...त्यांचे जिबह करून, तुकडे करण्यास सांगितले...आणि ते तुकडे चार डोंगरावर एकमेकांपासून दूर दूर फेकण्यास सांगितले...

मग इब्राहीम अ. यांना, त्या पक्ष्यांना हाक मारण्यास सांगितले...सगळे पक्षी त्यांच्याकडे...त्यांच्या पूर्ण शरीरात वापस आले...

अल्लाहने हा चमत्कार इब्राहीम अ. यांना, त्यांच्यासाठी आणि सर्व मनुष्यांसाठी दाखविला, जेणेकरून प्रत्येक जण समजू शकेल की, जो एक वेळेस जीवन देऊ शकतो...पुन्हा एकदा "न्याय देण्याच्या दिवशी" जीवन देऊ शकतो...

ही कथा कुरआन मध्ये दुसऱ्या धड्यात, "सुरे बकरा" मध्ये वर्णन केलेली आहे...


🍁🍁लूत अ.🍁🍁

लूत अ. हे इब्राहीम अ. यांच्या, भावाचे पुत्र होते, म्हणजेच त्यांचे पुतणे होते...जेव्हा इब्राहीम अ. यांनी त्यांचा देश सोडला होता, तेव्हा लूत अ. हेही त्यांच्या बरोबर होते.. लूत अ. खूप सद्गुणी आणि अल्लाहचा संदेशवाहक होते...

इब्राहीम अ. त्यांच्या देश सोडल्यानंतर, इब्राहीम अ. जेरुसलेमला (पॅलेस्टाईन) गेले. आणि अल्लाह कडून लूत अ. यांना सदूम या ठिकाणी पाठविण्यात आले...जे जॉर्डन च्या पूर्वेत आहे..तेथे राहणाऱ्या पापी आणि वाईट लोकांना, अल्लाह च्या संदेशाची शिकवण देण्यासाठी..

हे लोक प्रत्येक व्यवसायी, जो त्यांच्या रस्त्यात येत होता, त्याला लुटत होते...त्यांना न्याय काय असतो याचे ज्ञान नव्हते...एक दिवस एक प्रवासी त्याची अमानत म्हणजे त्याची कमावलेली संपत्ती... घेऊन जात होता... एका माणसाने त्याच्या कपाळाला एक दगड मारला...आणि त्याला पकडून म्हंटले, "माझ्या दगडाने तुला लागले आहे...तुला जे घडले याची भरपाई द्यावी लागेल.."

प्रवासी खूप रागावला आणि म्हणाला, "तू मूर्ख आहेस का? तू कशाविषयी बोलत आहे...तू मला मारले..तू मारेकरी आहेस...तुला मला दिले पाहिजे..."

ते दरबारात गेले...पण न्यायाधीशाने मारेकऱ्याच्या कडून निर्णय दिला...ज्याने प्रवाश्याला मारले होते...आणि म्हणाला, "हो, हा बरोबर आहे...याच्या दगडाने तुला मारले... आता तुला याची भरपाई करावी लागेल..."

या अन्यायावर , प्रवासी इतका नाराज झाला की, त्याने एक दगड उचलला आणि न्यायाधीशाच्या डोक्याला मारला...

"बरं.." तो मारल्यानंतर म्हणाला, " आता तुला मला भरपाई द्यावी लागेल...ज्या माणसाला, तू मला भरपाई द्यायला सांगितली होती..त्याला तू भरपाई देऊ शकतो..."

लूत अ. यांनी या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला की, ते पाप ने भरलेले जीवन जगत आहेत...पण त्यांनी त्यांची थट्टा उडविली...ते म्हणाले की, "जर तू इतका चांगला आहेस तर तू आमच्यासोबत राहू शकत नाही...येथून चालला जा...आम्ही तुझ्यासारखे का होऊ?"

लूत अ. दुःखी झाले..त्यांनी त्यांच्याकडून अल्लाहचा संदेश देण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता...पण लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही...

एक दिवस...तीन फरिश्ते, जे खूप देखणे तरुण दिसत होते.. लूत अ. कडे आणि त्याच्या कुटुंबाकडे आले... लूत अ. म्हणाले, "तुम्ही अनोळखी दिसत आहात...कोण आहात तुम्ही?"

ते त्याला म्हणाले की, ते अल्लाहकडून पाठविण्यात आलेले फरिश्ते आहेत...जे त्या पापी लोकांना, जे ऐकत नाहीत, त्यांना शिक्षा देण्यासाठी आले आहेत...त्यांनी सांगितले की, "पूर्ण शहर नष्ट होणार आहे..." आणि त्यांनी लूत अ. यांना सांगितले की, त्यांच्या कुटुंबाला घेऊन, रात्रीच्या शांततेत, हे शहर सोडून जा..."कोणीच मागे पाहू नका...तुम्हाला सूर्योदय होण्याच्या आधी जो उजेड होतो. म्हणजेच पहाट...त्याआधी ही जागा सोडायची आहे..."

जेव्हा ते बोलत होते, तेव्हा शहरातील सगळे वाईट लोकं आले आणि त्यांनी त्या देखण्या तरुणांना पाहिले, "यांना आम्हाला दे"...ते म्हणाले..."हे तुझे पाहुणे आहेत...नाही का?"

आम्ही तुला म्हटले नव्हते का की, कुणी पाहुणे येऊ देऊ नको... आता त्यांना आमच्या ताब्यात दे...आम्हाला त्यांच्यासोबत हवे ते करण्यासाठी..."

लूत अ. यांनी, त्यांची विनवणी केली..."इतके क्रूर होऊ नका... त्यांच्या पाहुण्यांसमोर इतका वाईट व्यवहार करू नका"...पण त्यांनी ऐकले नाही...आणि जोर देत राहिले...

ते तरुण मुले...निश्चितच अल्लाहचे फरिश्ते होते...आणि त्यांना कुणीच काही करू शकत नव्हते...ते लूत अ. यांना म्हणाले, ' त्यांची काळजी करू नका आणि शांततेने हे शहर सोडून जा...'

त्यामुळे लूत अ. यांनी ते शहर, रात्रीच्या अंधारात, त्याच्या कुटुंबीयासोबत सोडले...पण त्यांच्या पत्नीला सदूमच्या लोकांवर दया आली...तिने अल्लाहची आज्ञा मानली नाही... तिने जातांना मागे वळून पाहिले...आणि ती जे मागे राहीले आणि शिक्षा मिळाली, त्यांच्यामध्ये ती ही होती...ती दगडाची झाली...आजही तो दगड तसाच दिसत आहे.

पहाटे एक खूप भयानक आवाजाने त्या लोकांना पकडले...एक जोरदार कडक आणि भाजलेल्या दगडांचा फवारा होता...

पूर्ण शहर, तेथे राहणाऱ्या लोकांसहित आणि त्याजमिनीत उगवलेल्या प्रत्येकासहित उध्वस्त झाले...

आज इतक्या हजारो वर्षानंतर त्या शहराचा उध्वस्त ढिगारा.. मृत समुद्राच्या जवळ दिसतो...ज्या मृत समुद्रात कुणीही जिवंत राहू शकत नाही...काही लोक विश्वास करतात की, हे ढिगारे आणि समुद्र याची आठवण करून देतात की, अल्लाहचा शाप ज्यामुळे सदूमचे आज्ञा न पाळणारे लोक, नष्ट झाले...तो किती वेदनादायी आहे...

*इब्राहीम अ. आणि लूत अ. हे हिब्रू भाषा बोलत होते व ते अल्लाह ला  यहोवा  (yahweh) या नावाने संबोधित करत होते. मुहम्मद स. अ. व. यांच्यावर कुरआन प्रकट झाल्यानंतरचे अल्लाह हे संबोधन अरबी भाषेत  कुरआनमध्ये आहे.
विश्वाचा निर्माता एकच आहे...भाषा वेगळ्या त्यामुळे संबोधन वेगळे आहे...इस्लाम धर्माचे लोक इब्राहीम अ. आणि मूसा अ. (Moses) यांनाही मानतात आणि ईसा अ.( येशू) यांनाही मानतात, ज्यामुळे अनुक्रमे ज्यू (यहुदी ) आणि ख्रिश्चन धर्म आले. मूसा अ. यांच्यावर तोरात (Torah) आणि ईसा अ. यांच्यावर इंजील (बायबल) हा ग्रंथ प्रकट झाला. तोरात, बायबल आणि कुरआन मध्ये जवळ जवळ सारख्याच पैगंबरांच्या सत्यकथा आणि बोधकथा आहेत...आणि संदेश आहे...पण कुरआन हा मूळ ग्रंथ आहे, ज्यात काहीही बदल झालेला नाही.

कुरआन मध्ये ज्या संदेश वाहकांचे नाव आहे, त्यांच्या कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला दाबा...
www.marathitunislam.wordpress.com

किंवा कुरआन चे मराठी भाषांतर वाचण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा...
https://www.facebook.com/quran2020786/

कुरआन च्या बोधकथा..1 आदम अ. आणि हव्वा, नूह अ., हूद अ. सालेह अ.

 1  आदम अ.  आणि  हव्वा ....


लाखो वर्षाआधी हे जग नव्हते...अल्लाहने म्हंटले...होऊन जा..आणि जग (धरती,पृथ्वी) बनले गेले...पण या जगात मनुष्य नव्हता...स्वर्गात ही मनुष्य नव्हता...

स्वर्ग हा खूप सुंदर बगीचा आहे. ज्याचा कुणी स्वप्नातही विचार करू शकत नाही.....तिथे सगळ्या प्रकारची फळझाडे आहेत...त्यात डाळिंब,अंगुर,ऑलिव...सर्व फळे जितका मनुष्य विचार करु शकतो...आणि त्याच्याहून आधिक.....

आणि त्या फळांच्या झाडांच्या मधून थंड आणि गोड पाण्याचे, दुधाचे आणि मधाचे झरे वाहत आहेत....

एक दिवस अल्लाहने स्वर्गात त्याच्या दूतांना म्हटले की, "माझी इच्छा आहे एक मनुष्य बनविण्याची"

दूत म्हटले, "आम्ही तुझ्या आज्ञा पाळत नाही का?"

अल्लाह म्हणाला, "मला चांगले माहीत आहे"

अल्लाहने ओल्या मातीपासून एक मनुष्य बनविला, आदम अ. (अडम)...आणि त्यात आत्मा (जीव, रुह) फुंकला...आदम अ. यांनी त्यांच्या जीवनाचा, पहिला श्वास घेतला... , अल्लाहने त्यांना प्रत्येक गोष्ट त्याला शिकविली. त्यांना बोलण्यासाठी काही शब्द शिकविले... अल्लाहने त्याच्या सर्व स्वर्गदूतांना बोलावले आणि म्हटले..."हा आदम आहे...त्याला वाकून प्रणाम करा.."

सगळ्या स्वर्गदूतांनी आज्ञाचे पालन केले...फक्त एकाने केले नाही..तो होता इब्लिस (शैतान)...तो एक जिन्न होता...तो म्हणाला, "मी का प्रणाम करू?..मी आगीने बनलो आहे आणि हा फक्त मातीने बनला आहे...मी याला प्रणाम करनार नाही"

अल्लाह इब्लीस वर रागावला आणि त्याला स्वर्गातून बाहेर केले... इबलीस (शैतान) ने तिथून जाताना प्रण केला की, "तो संपूर्ण मनुष्य जातीशी कयामत (महाविनाश) येईपर्यंत बदला घेईल"

अल्लाहने म्हटले की, "चांगले मनुष्य तुझे ऐकणार नाहीत.."

अल्लाहने आदमला  स्वर्गात राहायला परवानगी दिली.

आणि त्याला सांगितले की, "तुला जे आनंद देईल, ते तू कर..कोणतेही फळ खा...आणि जे तुला आवडेल ते तू पी... तू स्वर्गातले प्रत्येक फळ खावू शकतो फक्त एका झाडाचे फळ तू खायचे नाही.."अडम (आदम) यांनी सर्व मजा अनुभवली...आनंद घेतला...पण लवकरच त्यांना एकटेपणा जाणवू लागला..त्यांना मित्र नव्हते...म्हणून त्यांनी अल्लाहला म्हटले, "कृपा करून मला एक सोबती दे".  
अल्लाहने त्याला एक पत्नी दिली... हव्वा (एव्ह). ईबलीस चालाक होता..त्याने विचार करण्यास सुरू केला की, आदम अ. यांना अल्लाहची अवज्ञा करण्यास कसे भाग पाडावे... एक दिवस आदम अ. आणि हव्वा (अडम आणि एव्ह) स्वर्गात असताना तो त्यांच्या कानात फुसफुसला (बोलला) की, "ज्या झाडाचे फळ खाण्यासाठी तुला अडवले आहे, ते फळ  छान आहे...तू जर ते खाशील तर तू नेहमीसाठी जिवंत राहशील..." आदम अ. यांना मोह झाला...दोघांनी ईबलिसचे ऐकून त्या झाडाकडे जावून, ते फळ  खाल्ले.

ते फळ खाताच, त्यांना याची जाणीव झाली की, त्यांनी खूप मोठी चूक केली आहे...त्यांना लाज वाटली...कारण त्यांचे काही अंग हे दिसू लागले होते...झाडाच्या पानांमध्ये ते दोघे स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करू लागले...
पण अल्लाहला सर्व माहीत होते आणि तो सर्वीकडे असतो... अल्लाह त्यांच्यावर खूप रागावला, " मी तुला चेतावणी दिली होती...की त्या मना केलेल्या झाडाचे फळ खावू नको...पण तू माझी आज्ञा पाळली नाही...आता तुझी जागा धर्तीवर आहे...स्वर्गात नाही"...

अल्लाहने दोघांना स्वर्ग सोडून धरतीवर जाण्यास सांगितले.. त्या दोघांनीही एक चूक केली होती...पण त्यांना अल्लाहची अवज्ञा करायची नव्हती...त्यांना त्याचा खूप पश्र्चाताप होत होता...त्यांनी अल्लाहकडून काही माफी मागण्याचे शब्द शिकून घेतले...ते खूप रडले आणि त्यांनी अल्लाहकडून माफी मागितली...शेवटी अल्लाहला त्यांच्यावर दया आली...अल्लाहने म्हटले की, जर तुम्ही चांगले काम (कर्म) केले आणि माझी आज्ञा पाळली तर मी तुम्हाला वापस स्वर्गात, जी एक सुंदर बाग आहे, बोलावेन...पण तुमच्या मृत्यू नंतर...पण जर चांगले काम (कर्म) केले नाही आणि आज्ञा पाळली नाही, तर मृत्यूनंतर खूप भयानक नरकात जावे लागेल....

आदम अ.यांना श्रीलंका येथील एका पर्वतावर उतरविण्यात आले...ही 4223BC
मधील घटना आहे....म्हणजे साधारणतः 6000 वर्षांपूर्वीची...

आदम अ. आणि हवा ने त्यांचे उरलेले जीवन धरतीवर चांगले काम (कर्म) करण्यात आणि अल्लाहची आज्ञा पाळण्यात घालविले...त्यांना आशा होती की, ते पुन्हा अल्लाहला खुश करून, त्यांच्या मृत्यूनंतर स्वर्गात जातील.....

त्यांना खूप मुले आणि नातवंड झाली...सर्व मानवजात त्यांची पिढी आहे...त्यामुळे आदम अ. यांना father of  human race म्हटले जाते....आणि हव्वा यांना mother of human race म्हंटले जाते. पुढे ते पॅलेस्टाईन मध्ये राहिले....आदम अ. हे 930 वर्षे जगले...


आदम अ. जेव्हा धरतीवर आले, तेव्हा त्यांच्या पायाचा ठसा, हा श्रीलंकेतील एका पर्वतावर आहे...


2 .  नूह अ.  आणि  प्रलय (पूर) 

जेव्हा मानवजात या जगात पसरली...काही लोकांनी अल्लाहची शिकवण लक्षात ठेवली, पण जास्त करून लोकांनी लक्षात ठेवली नाही...
ते अल्लाहविषयी विसरून गेले आणि दगडाच्या प्रतिमा बनवून आराधना करू लागले...

त्यांना अल्लाहची शिकवण आठवून देण्यासाठी, अल्लाहने एक संदेशवाहक त्यांच्याकडे पाठविला...त्यांचे नाव होते, नूह अ. (नोआ/Noah).

हा साधारणतः 3167BC मध्ये म्हणजे  अंदाजे 5000 वर्षांपूर्वीचा काळ होता. नूह अ. यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला, त्या देशाचे आताचे नाव, अझरबैजान (Azerbaijan) आहे...नूह अ. त्यावेळचे चांगले, सदाचारी व्यक्ती होते...

नूह अ. यांनी लोकांना सांगितले की, चांगले बनण्यासाठी, अल्लाहची आज्ञा पाळा...आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवा की, जर ते चांगले होतील तर ते वापस स्वर्गात जातील...त्याने त्यांना फक्त एका अल्लाहची प्रार्थना करण्यास सांगितले, जो त्यांना बनविणारा आहे आणि दगडाच्या प्रतिमेची आराधना करू नका, असे सांगितले...पण लोक खूप आज्ञा भंग करणारे होते...त्यांनी पुरुषांच्या, स्त्रीच्या, सिंहांच्या, घोड्याच्या आणि खूप काही प्राण्यांच्या पुतळ्यांची आराधना करने चालूच ठेवले...

नूह अ. यांनी त्यांना समजावले की, "हे दगड तुम्हाला काहीही देऊ शकत नाही...जर तुम्हाला काही पाहिजे आहे, तर त्यासाठी अल्लाहला मागा..."

नूह अ. यांनी  कारण दिले, "तुम्ही सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि आकाश पाहत नाही का? यांना कोणी बनविले...अल्लाहने या सर्वांना बनविले...तुम्हाला जाणीव होत नाही का की, अल्लाहने तुम्हालाही बनविले आणि तुम्हाला मृत्यूनंतर अल्लाहकडेच वापस जायचे आहे..."

नूह अ. यांनी विनवणी केली, " मी म्हणत नाही की, मी अल्लाहचा दूत आहे...किंवा मला, जे अज्ञात आहे, त्याचे ज्ञान आहे...मी हेही म्हणत नाही की, माझ्याकडे लपलेला खजिना आहे...मी फक्त एवढेच म्हणत आहे की, एकाच अल्लाहला माना आणि तुमच्या स्वतःच्या चांगल्यासाठी त्याची आज्ञा पाळा...माझा विश्वास करा...मला या बदल्यात काहीही नको आहे..."  नूह अ., एक खूप सहनशील व्यक्ती होते...त्यांनी लोकांना उपदेश करून अल्लाहचा संदेश देणे नऊशे (900) वर्षांपर्यंत चालू ठेवले... त्यांना खूप मोठे आयुष्य होते...पण फक्त काहीच चांगल्या लोकांनी अल्लाहचा संदेश स्वीकार केला...

नूह अ. खूप नाखूष होते...त्यांनी अल्लाहकडे प्रार्थना केली...अल्लाह ने प्रकट केले, " नूह, दुःखी होऊ नकोस...तुझ्याकडून जितके झाले तितके तू खूप चांगले काम केले आहे...हे दुष्ट लोक, भयानक शिक्षा भोगण्याच्या योग्य आहेत...ते नष्ट होतील...त्यांना या शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही..."

अल्लाहने नूह अ. यांना, एका मोठ्या वादळविषयी सांगितले, जे या अविश्वास करणाऱ्या लोकांना जीवे मारेल...अल्लाहने नूह अ. यांना सल्ला दिला की, एक लांब नाव बनव आणि त्यावर स्वतःला आणि तुझ्या अनुयायींना, येणाऱ्या पूरापासून सुरक्षित करण्याची पूर्ण तयारी कर...

जेव्हा लोकांनी पाहिले की, नूह अ.  मोठी नाव बनवीत आहे...ते त्यांच्याकडे पाहून हसले...आणि म्हणाले की, "तर तू पूरासाठी तयारी करत आहे, नाही का? आणि तू त्यात (नावेत) स्वतःला वाचवशील? हss."..

पण नूह अ. यांनी, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि मोठी नाव बनविणे चालू ठेवले...

जेव्हा एक मोठी नाव तयार झाली, तेव्हा अल्लाहने नूह अ. यांना आज्ञा केली की, वादळ येण्याआधी, त्यांच्या कुटुंबाला, अनुयायींना, आणि सगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या, एका जोडीला त्याच्यासोबत, नावेत घेऊन जाण्यास सांग...

नूह अ. यांनी, अल्लाहने जी आज्ञा केली होती, ते सर्व केले...पण नूह अ. यांना, त्यांच्या एका मुलाविषयी, कानान (Yam) विषयी काळजी वाटत होती...ज्याने अल्लाहची आज्ञा पाळली नव्हती...तो विश्वास करणारा नव्हता.... नूह अ. यांनी अल्लाहला विचारले, कानान (Yam) चे काय होईल?...तो माझ्या कुटुंबातला आहे....तो वाचविला जाईल का? आणि अल्लाहने उत्तर दिले, "नाही, नूह, जो माझी आज्ञा पाळत नाही, तो तुझ्या कुटुंबातला नाही...आणि तुला त्याच्यासाठी वाईट नाही वाटले पाहिजे...तुझे कुटुंब त्यांच्यात आहे, ज्यांनी तुझ्या अल्लाहची आज्ञा पाळली आणि तुझीही...

शेवटी जेव्हा सगळी तयारी पूर्ण झाली, तेव्हा एक वादळ आले...कुणीही याआधी एवढे मोठे वादळ पाहिले नव्हते...ती एक शिक्षा होती ज्याचे अल्लाहने वचन दिले होते की, जर लोकांनी त्यांची पद्धत (रस्ता) बदलली नाही, तर अल्लाह वादळ पाठवेल...खूप जोरदार पाऊस आकाशातून खाली आला (ढग फाटले) आणि जमिनीतून पाणी उफाळून वर आले...जसे ते सर्व नावेत बसले, नूह अ. यांनी पुन्हा कानानला आवाज दिला...आणि अल्लाहची आज्ञा पाळायला आणि त्याचा संदेश स्वीकार करायला सांगितला, ज्यामुळे तो वाचेल...

पण कानान खरच फार हट्टी होता...तो म्हणाला, "नाही...मी येणार नाही...मी पर्वत चढेन आणि स्वतःला वाचवेन..." पण त्यानंतर लगेच एक मोठी लाट त्यांच्यामध्ये आली आणि कानान, त्याच्या सोबतच्या दुसऱ्या सर्व विश्वास न करणाऱ्या लोकांसोबत मरण पावला...

नूह अ. यांची नाव जुडी पर्वता जवळ पोहोचली (आताचे अरारात पर्वत जे तुर्कीत आहे) ते सर्व लोक, जे नाव मध्ये होते ते वाचविले गेले...

नूह अ. यांना दुसरा आदम अ. म्हणतात...कारण जवळपास प्रत्येक जण त्या भयंकर प्रलयामध्ये (पुरामध्ये) मरण पावला होता...फक्त नूह अ. आणि त्याचे काही अनुयायी, या जगात पुन्हा नवीन जीवन सुरू होण्यासाठी वाचविले गेले होते...

*ही सत्यकथा आणि बोधकथा कुरआन, बायबल, तोराह, वेद मध्ये ही आहे. वेद मधील ग्रंथात नूह अ. यांचे नाव मनु आहे.

संदेश हाच आहे, ही विश्वाचा निर्माता एक आणि फक्त एकच आहे...आणि त्याचीच उपासना करणे योग्य आहे...

3.   आदची   जमात   आणि   हूद अ.

नूह अ. यांचे अनुयायी, जे प्रलयामध्ये वाचवले गेले होते, ते चांगले लोक होते. नूह अ. हे 950 वर्ष जीवन जगले...खूप वर्षांनंतर त्यांची मुले आणि नातवंड हे, त्यांच्या पूर्वजांनी आणि परदादा यांनी जे सांगून गेले, त्याला विसरून गेले...

हे लोक खूप उंच, गोरे आणि चांगल्या शरीरयष्टीचे होते...आणि त्यांना आद लोक असे म्हंटले जात होते...त्यांनी सुंदर घरे आणि शहरे बनविली...पुन्हा एकदा त्यांनी दगडाच्या प्रतिमांची आराधना करने सुरू केले...त्यामुळे अल्लाहने अजून एक संदेशवाहक ज्यांचे नाव हूद अ. होते,पाठविला...त्या जमातीतील लोकांना अल्लाहच्या संदेशाची आठवण करून देण्यासाठी हूद अ. यांना पाठवण्यात आले होते.( अंदाजे 2500BC म्हणजे साधारणतः 4520वर्षांपूर्वी)

हूद अ. यांनी आदच्या जमातीतील लोकांना सांगितले की, "मी अल्लाहचा संदेशवाहक आहे, त्याने मला, तुम्हाला हे सांगण्यासाठी पाठविले आहे की, तुम्ही अजिबात योग्य करत नाही आणि तुम्हाला आठवण करून देण्यासाठी की, अल्लाहने नूह अ. यांच्या वेळच्या लोकांना कशी शिक्षा केली आणि जे एकाच अल्लाहवर विश्वास करत नाहीत, त्यांचा कसा विनाश केला...

पण आदच्या जमातीतील लोकांनी हूद अ. यांचा सल्ला ऐकण्यास नकार दिला...ते हूद अ. यांच्यावर आक्रमक झाले आणि म्हणाले, "तुझी इच्छा आहे का की आम्ही आमच्या दगडाच्या प्रतिमा सोडून द्याव्या, ज्यांची आमचे पिता,आजोबा आणि परदादा आराधना करत होते...नाही हूद ss ,आम्ही जे तू म्हणतो, ते कधीही करणार नाही...अल्लाहच्या शिक्षेविषयी सांगून आम्हाला घाबरवू नको....जर आम्ही अल्लाहची आराधना नाही केली तर त्याला, आम्हाला शिक्षा देऊ दे..."

हूद अ. म्हणाले, "ती शिक्षा खूप दूर नाही...तुम्ही त्यासाठी वाट पाहा...मी पण तुमच्या सोबत वाट पाहीन..." 

लवकरच त्यांची जमीन कोरडी आणि पडीक झाली..तेथे पाऊस नव्हता त्यामुळे खूप कमी पीक आले... हूद अ. त्यांच्या जमितीतील लोकांना म्हणाले, "लोकहो, अल्लाहची क्षमा मागा...त्याची क्षमा याचना करा आणि तो खूप जास्त देईल...अल्लाह सर्व काही करू शकतो..."

"तुला जे म्हणायचे ते तू म्हणू शकतो, हूद ...पण आम्ही तेच करणार जे आमच्या पित्याने केले..." आदच्या जमातीतील लोकांनी म्हंटले....

हूद अ. यांनी त्यांना, त्या फक्त एका अल्लाहला घाबरण्यास सांगितले, ज्याने त्यांना त्यांची मुले दिली...असे पाळीव प्राणी दिले (गुरे), ज्यामुळे त्यांना दूध आणि मांस मिळते आणि अजून खूप उपयोगी साधने दिली...

आदच्या जमातीतील लोक म्हणाले, आमच्यापेक्षा कोण जास्त शक्तीशाली आहे? (आम्हीच जास्त शक्तिशाली आहोत)

शेवटी अल्लाह, त्यांनी आज्ञापालन न केल्यामुळे खूप रागावला....त्याने एक खूप जोरदार वादळ (प्रचंड जोऱ्याचा वारा.../ tornado) पाठविले..जो आठ दिवस आणि सात रात्र चालला...त्यामुळे त्यांची शहरे उध्वस्त झाली, पुसली गेली आणि प्रत्येक जण मारला गेला...वादळ इतके शक्तिशाली होते की, त्याच्या रस्त्यातले सर्व धुळीसारखे वाऱ्याने उडून गेले... आदचे लोक आणि त्यांची मोठी आणि सुंदर घरे, उंच खंब्यासहित पृथ्वीवरून गायब झाली...

त्यानंतर हूद अ. अंदाजे 464 वर्षे जगले आणि त्यांच्या अनुयायांना अल्लाह च्या उपासनेचा संदेश देत राहिले...

अल्लाहने, हूद अ. यांचा संदेश ज्यांनी मानला नाही, त्या अादच्या जमातीतील लोकांना शिक्षा दिली...जे जिवंत राहिले ते काही काळासाठी अल्लाहला भयभीत झाले...पण लगेच हूद अ. यांची शिकवण विसरून, पुन्हा दगडांच्या प्रतिमांची आराधना सुरू केली...या लोकांना समुद म्हणले जायचे... 

आदच्या लोकांसारखेच , हे लोक गोरे, उंच आणि देखणे होते...त्यांनी डोंगरापासून कोरून भव्य घरे बनविली...आणि मैदानातील जमिनीवर सुंदर राजवाडे बनविले...पण ते कृतघ्न लोक होते...आणि त्यांनी अल्लाहची आज्ञा पाळली नाही...अल्लाहने त्यांच्या मधलाच एक संदेशवाहक पाठविला...त्याचे नाव सालेह अ. होते...

सालेह अ. यांनी समुदच्या लोकांना चांगले वागून, फक्त एकाच अल्लाहवर विश्वास करायला सांगितले...त्या लोकांत गरीब लोकांनी त्यांचे ऐकले, पण श्रीमंत लोकांनी ऐकले नाही....ते पूर्ण गर्विष्ठ होते आणि गरिबांना कमी लेखत होते...

ते म्हणाले, "सालेह, तू आमच्या सारखाच आहेस...तुला काय झाले आहे? की तू आम्हाला आमच्या आराध्यची, प्रतिमांची आराधना करण्यास थांबवत आहे..."

सालेह अ. म्हणाले, "मी अल्लाहचा संदेशवाहक आहे...अल्लाहने मला तुम्हाला सत्य सांगण्यासाठी पाठविले आहे...अल्लाहने तुम्हाला या धरतीपासून बनविले आहे आणि तुम्हाला धरतीवर जगायची परवानगी दिली आहे...अल्लाहने तुम्हाला बाग, झरे, कुरण (गवतासाठी राखलेले मैदान), स्वादिष्ट आणि मऊ खजूर आणि सुंदर घरे दिली...तुम्ही जी त्याची अवज्ञा करीत आहात त्यासाठी त्याची क्षमा मागा...याबदल्यात मला तुमच्याकडून काही नको आहे...मी तुम्हाला फक्त एकाच अल्लाहवर विश्वास ठेवण्यास सांगत आहे...ज्याने तुम्हाला प्रत्येक गोष्ट दिली..."

पण समुदच्या श्रीमंत लोकांनी नाराजी दाखविली आणि म्हणाले, "ठीक आहे, तुझ्या अल्लाहला सांग की, एक चमत्कार दाखव...मग आम्ही, त्या अल्लाहवर विश्वास करू...त्याला मानू...त्यांनी सालेह अ. यांना, अल्लाहला विनंती करून, डोंगरातून एक जिवंत उंट, त्यांच्यासमोर बाहेर काढून दाखविण्यास सांगितले...

सालेह अ. यांनी अल्लाहकडे प्रार्थना केली...आणि अल्लाहने त्यांची प्रार्थना, ऐकून समुदच्या लोकांना चमत्कार दाखवला, जो चमत्कार त्यांनी दाखवायला सांगितला होता...

एक मादा उंट डोंगराच्या गुफेतून, बरोबर, त्यांच्या डोळ्यासमोर बाहेर आली....

सालेह अ. म्हणाले, आता तुम्ही चमत्कार पाहीला.  तुम्हाला जे पाहीजे ते मिळाले आहे...ही मादा उंट पवित्र आहे...आणि अल्लाहने तुमच्या विनंतीवरून पाठविली आहे, ज्यामुळे तुम्हाला अल्लाहची उपस्थिती पटावी...ही अल्लाहची इच्छा आहे की, ती शेतात आणि रानात चरावी...आणि तिने एक दिवस ज्या ठिकाणी पाणी पिले...तुम्ही दुसऱ्या दिवशी तेथून पाणी काढावे... आळीपाळीने...तुमच्यापैकी कुणीही त्या मादा उंटची आणि तिच्या बछड्याची पाळी घेणार नाही...सालेह अ. यांनी हे ही सांगितले की, जर त्या मादा उंटीनीला कुणी त्रास दिला तर अल्लाहकडून शिक्षा दिली जाईल...

प्रथम समुदचे लोकं प्रभावित झाले आणि घाबरले...त्यांनी चमत्कार होतांना पहिला होता आणि विश्वास केला की, उंटीनी जी डोंगरातून बाहेर आली आहे, ती खरंच अल्लाहकडून पाठविण्यात आली आहे, जसे त्यांनी अल्लाहला विनंती करण्यास सांगितले होते...

पण लवकरच त्यांनी, त्या उंटीनीचे आणि तिच्या बछड्याचे, चरण्याचे आणि पाणी पिण्याचे (एक दिवसाआडचे) बिना अडथळ्याचे स्वातंत्र्य, याचा द्वेष करण्यास सुरू केला...ते त्यांचे पाणी त्या उंटीनी सोबत वाटण्यास (सहभागी करण्यास) इच्छुक नव्हते...त्यामुळे त्यांनी एक योजना आखलीे..आणि एक दिवस त्यांच्यातील काहींनी, तिला जिवे मारले...

जेव्हा सालेह अ. यांनी हे ऐकले तेव्हा ते खूप दुःखी झाले...त्यांनी समुदच्या लोकांना म्हंटले, "तुम्ही अल्लाहची आज्ञा न पाळून, पाप केले आहे...तुमच्यामुळे अल्लाह खूप रागावला आहे...आणि लवकरच तो तुम्हाला शिक्षा करेन"...आणि अल्लाहने समुदच्या लोकांना एक भयानक त्रासदायक आवाज, मेघ गर्जना आणि कडाक्याची वीज पाठवून, खूप कठोरपणे शिक्षा दिली...समुदचे लोकं, ज्यांनी सालेह अ. यांचे ऐकले नव्हते, जेव्हा त्यांनी हा भीतीदायक आवाज ऐकला तेव्हा त्यांच्या तोंडावर, जमिनीवर पडले. सकाळी ते सगळे त्यांच्या सुंदर आणि मजबूत घरांत, मृत आढळले होते, जी घरे त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी बांधली होती...

फक्त ते लोक ज्यांनी एका अल्लाहला मानले आणि विश्वास ठेवला आणि ज्यांनी सालेह अ. यांचे ऐकले ते वाचवले गेले होते....(सौदी अरब देशात काही सापळे, तेलाच्या विहिरी खोदताना आढळले. सौदीतील लोक, जे हाडांचे सापळे दिसले, ते आद आणि समुदचे लोक होते असे मानतात...त्याचे फोटो गूगल वर आद पीपल स्केलेटन असे search केल्यास दिसतात.)


हे सर्व संदेशवाहक, हिब्रू भाषा बोलत होते व ते अल्लाह ला  यहोवा ( yahweh) या नावाने संबोधित करत होते. मुहम्मद स. अ. व. यांच्यावर कुराण प्रकट झाल्यानंतरचे अल्लाह हे संबोधन अरबी भाषेत कुरआन मध्ये आहे.

विश्वाचा निर्माता एकच आहे...भाषा वेगळ्या त्यामुळे संबोधन वेगळे आहे...इस्लाम धर्माचे लोक इब्राहीम अ. आणि मूसा अ. (Moses) यांनाही मानतात आणि ईसा अ.( येशू) यांनाही मानतात, ज्यामुळे अनुक्रमे ज्यू (यहुदी) आणि ख्रिश्चन धर्म आले. मूसा अ. यांच्यावर तोरात (Torah) आणि ईसा अ. यांच्यावर इंजील (बायबल) हा ग्रंथ प्रकट झाला. तोरात, बायबल आणि कुरआन मध्ये जवळ जवळ सारख्याच पैगंबरांच्या (संदेश वाहकाच्या) सत्यकथा आणि बोधकथा आहेत...आणि संदेश आहे...पण कुरआन हा मूळ ग्रंथ आहे, ज्यात काहीही बदल झालेला नाही.

_____________________________

08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...