रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

अरमाया (जरमाया)

 जेरुसलेम च्या लोकांनी फक्त एक अल्लाह (अल्लाह ला ते लोक ' यहोवा ' म्हणत होते.) (परमेश्वर) ची उपासना करणे सोडून, दगडांच्या प्रतिमा बनविल्या आणि त्यांची उपासना सुरू केली.


अर्माया यांनी अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला, फक्त एका अल्लाह ची ( ईश्वराची) उपासना करा. आणि परत या.
अर्माया यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला की, ही त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे. नाहीतर ते सर्व लोक नष्ट होतील. पण त्यांचा उपदेश लोकांनी मानला नाही. त्यांनी अरमाया यांना खोटं बोलणारा समजले. ते लोक गर्विष्ठ झाले. त्यांना चमत्कार दाखवूनही ( अल्लाह च्या मदतीने) काही फरक पडत नव्हता. ते या गोष्टीवर विश्वासच करू शकत नव्हते की, अल्लाह त्या दगडाच्या गुंबद ला  (हैकले सुलेमानी ) ला, जे जेरुसलेम मध्ये सुलेमान ने बांधले होते आणि ज्यावर अल्लाह ची कृपा होती, नष्ट ही करू शकतो.

आणि लोकांनी त्या संदेशातील धमकी आणि चेतावणी ऐकली, ते म्हणाले, तू खोटे बोलत आहेस, जर तू असे म्हणत आहे की, अल्लाह या जमिनीला, त्याचा प्रार्थना स्थळाला, त्याच्या ग्रंथाला  नष्ट करेल.
त्यांचा राजा खूप गर्विष्ठ होता.त्याने आदेश दिला की, अर्माया ला कैद करा आणि तुरुंगात टाका. त्यांनी अरमाया ला जकडून तुरुंगात टाकले. ही खूप मोठी चूक होती. 

अल्लाह नबूकदनेस्सर (nebuchadnezzar) या बेबीलोन (इराकचे प्राचीन शहर) च्या राजाला त्यांच्यावर आक्रमण करण्यास पाठवले. त्याने त्याच्या सैन्यासह देशात प्रवेश केला आणि शहराला घेरले . जेव्हा हा सैन्याचा वेढा प्रदीर्घ कालावधी पर्यंत राहिला. इस्रायल च्या सैन्याने, त्या राजाशी शरणागती पत्करली, त्यांनी त्यांचे शहराचे दरवाजे उघडले आणि राजाच्या सैन्याने शहरात प्रवेश केला आणि ते खूप क्रूर होते.  राजाने क्रूरतेने त्यांच्यावर त्याचा कायदा लागू केला आणि त्यांना निर्दयीपणे शिक्षा केली. राजाने एक तृतीयांश लोकांचा वध केला आणि एक तृतीयांश लोकांना पकडले आणि वृद्धांना आणि अपंगाना सोडले.
मग त्यांनी, त्यांना घोड्यांवर स्वार होऊन पायदळी तुडविले. त्यांची घरे पाडली. तरुणांना वेगळे करून स्त्रियांना बाजाराच्या ठिकाणी रक्षक म्हणून उभे केले. त्यांनी सैन्यात दहशत पसरवली आणि त्या किल्ल्याला आणि प्रार्थना स्थळाला (हैकले सुलेमानी) नष्ट केले. राजाने इस्राइलच्या वंशाला पूर्णपणे संपुष्टात आणले. राजा बेबिलोन ला, सर्व लूट घेऊन निघाला ज्यामध्ये संपत्ती होती आणि लोक होते, त्यांच्यात तरुणी होत्या आणि धर्मोपदेशकांची मुले होती सर्व मिळून सत्तरहजार पर्यंत होते. हे इस्राइल च्या लोकांसाठी खूप भयानक दृश्य होते. ती जागा लोकांच्या रक्ताने भरली.सगळी कडे मृतदेह होते. बेबिलोन च्या सैन्याने फक्त अपंग आणि वृद्ध लोकांना जाऊ दिले. त्यांनी जेरुसलेमच्या लोकांच्या सर्व घरांना नष्ट केले. त्या सैन्याने हैकले सुलेमानी च्या इमारतीला नष्ट केले. बेबोलोन च्या सैन्याने , तेथील लोकांचे सर्व पुस्तके आणि ग्रंथ जाळून टाकले. त्यांनी मुलांशी आणि स्त्रियांशी ही वाईट वागणूक केली. हा तेथील लोकांसाठी खूप भयावह दिवस होता.
इस्राइल ची जमात ही अल्लाह ची जमात होती. त्या लोकांकडे खूप संदेश देणारे (पैगंबर ) आले. अल्लाहने त्यांना खूप संधी दिल्या होत्या. पण दुर्दैवाने त्यांनी अल्लाह चा प्रत्येक आदेश तोडला. इतकेच नाही तर त्यांनी अल्लाह चा संदेश देणाऱ्यांचा वध केला. आणि दगडाच्या प्रतिमांची उपासना करणे चालू ठेवले. याच कारणाने अल्लाह त्यांच्यावर खूप क्रोधित झाला आणि पूर्ण जमातीला ध्वस्त आणि नष्ट केले. 
एक दिवस बेबोलोन च्या राजाला माहीत झाले की, इस्राइल च्या लोकांचा एक संदेशकर्ता आहे, ज्याला आधी पासूनच या विनाशा विषयी माहीत होते आणि त्याचे नाव अर्माया आहे. राजा ने आदेश दिला की, त्या संदेश कर्त्याला तुरुंगातून बाहेर आणले जावे. अरमाया शी बोलल्यानंतर राजा ला जाणीव झाली, की ते खरच अल्लाहचे  खरे संदेश कर्ता (पैगंबर) होते. राजा ने त्यांची सुटका केली.
त्या पूर्ण शहराला नष्ट करून बेबिलोन चा राजा पुन्हा त्याच्या राज्यात गेला.आणि त्याच्या सोबत खूप मूल्यवान खजिने, पुरुष आणि स्त्रिया आणि मुले सोबत घेऊन गेला.काही जण म्हणतात त्याने अंदाजे सत्तर हजार पुरुष आणि स्त्रियांना सेवक बनविले.
या विध्वं सा नंतर इस्राइल मध्ये नवीन युग. सुरू झाले. अरमाया ने लोकांना म्हंटले की, जे इस्राइल मध्ये हजर आहेत, त्यांनी स्वतःच्या अपराधावर. पश्चाताप करून आणि अल्लाह ला  क्षमा मागावी. त्यांनी हे ही सांगितले की, अल्लाह पुन्हा एकदा त्या लोकांची भरभराट करेल. पण खूप लोक त्या विध्वंस झालेल्या शहरात राहण्यास इच्छुक नव्हते. त्यांनी पुन्हा एकदा अरमाया यांचा आदेश मानण्यास नकार दिला. आणि ते सगळे लोक जगाच्या वेगवेगळ्या भागात स्थलांतरित झाले. त्यातील काही इजिप्त (मिसर), स्पेन(हिजर) आणि सौदी अरेबिया(तैफ) मध्ये गेले. पण अरमाया अ. यांनी इस्राइल ची पुन्हा भरभराट करण्याचा पूर्ण केला. 

ही सत्य घटना आहे. बायबल मध्ये पूर्ण एक chapter यावर आधारित आहे. जेरुसलेम च्या लोक दोन वेळा उपद्रव माजवतील व दोन वेळा नष्ट जेरुसलेम नष्ट केले जाईल, अशी चेतावणी अल्लाह  (यहोवा) कडून देण्यात आली होती. कुराण मध्ये हा संदर्भ आहे.( कुराण 17:2-8)

मरियम आणि स्वर्ग दूत

 मरियम एका पवित्र वातावरणात मोठी झाली. सदाचारी लोकांत, ती एक खूप धार्मिक ( ईश्वर निष्ठ) तरुण मुलगी झाली.तिने तिचा जास्तीत जास्त वेळ तिच्या खोलीत प्रार्थना करण्यात खर्च केला.आणि स्वतःला अल्लाह च्या सेवेसाठी अर्पण केले. तिची धर्म निष्ठा इतकी चांगली होती की, तिच्यापेक्षा मोठे लोक ही तिचा सन्मान करायचे.आणि तिच्याकडून प्रेरणा घ्यायचे. 

तिची ईश्वर निष्ठा  आणि पावित्र्य असाधारण होते. जे तिला ओळखत होते, त्या प्रत्येकाकडून तिने  तिची प्रतिष्ठा जिंकली होती.

एक दिवस जेव्हा मरियम तिच्या खोलीतून, एका वेगळ्या जागेत जिथे पडदे टाकून आच्छादन केले होते, गेली तेव्हा तिने एक तरुण व्यक्ती तिच्यासमोर उभा राहिलेला पाहिले. मरियम घाबरली होती.' कोण आहे तू? ' तिने विचारले. ' ईश्र्वरासाठी जवळ येऊ नकोस. ' मी अल्लाह चा आश्रय मागते तुझ्यापासून '
तो व्यक्ती उत्तर ला,' घाबरु नको, मी अल्लाह चा दूत (स्वर्ग दूत ) आहे आणि अल्लाह कडून फक्त संदेश देणारा म्हणून  पाठविण्यात आलो आहे. तुला हे सांगण्यासाठी की, तुला एक पवित्र मुलगा होईल.'
पण जर मला कोणत्याही पुरुषाने स्पर्श केला नाही (मी विवाहित नाही), तर मला एक पुत्र कसा होईल.'  ' मी शील भ्रष्ट (वाईट स्त्री) नाही ? , ती म्हणाली.
' ती अल्लाह ची इच्छा आहे. ते त्याच्यासाठी खूप कठीण नाही. जेव्हा तो काही निर्माण करण्याची इच्छा करतो, म्हणतो , होऊन जा आणि ती असते. तुझा पुत्र एक खूप पवित्र मुलगा असेल. असे म्हणून स्वर्ग दूत दिसेनासा झाला आणि मरियम ला एका विस्मित (स्तंभित) करून गेला. 
नंतर जेव्हा तिचा पुत्र जन्मायची वेळ जवळ आली, मरियम, लोकांपासून बाजूला, एका दूरच्या ठिकाणी गेली. तेथे एकटी, घाबरलेली आणि भुकेने आणि तहानेने अशक्त झालेला एका पाम (ताडाच्या जातीचे झाड) झाडाच्या खाली झोपली आणि वेदनेने ओरडू लागली, ' मी इच्छा करते, हे होण्याआधी मी मरून गेलेली असावी आणि सर्व मला विसरून गेलेले असावे.
एक सुखद आवाज तिच्याशी बोलला, ' दुःखी होऊ नको मरियम. तुझ्या प्रभूने एक पाण्याचा झरा तुझ्याखालून (जवळून) प्रदान (प्रवाहित) केला आहे. आणि जर तू झाडाचे खोड हलवशील तर पुष्कळ ताज्या आणि पिकलेल्या खजुरी तुझ्यावर पडतील.तू खा आणि पी आणि तुझ्या पुत्राला पाहून आनंद घे.
तिचा पुत्र ईसा या लोकांपासून दूर अशा जागी जन्मला. मरियम ने जरी, तिच्या लहान बाळाला कुशीत घेतले, तरी तिच्यात त्या बाळाला घेऊन तिच्या लोकांकडे जाण्याचे साहस नव्हते. ती त्यांच्या प्रश्नांची उत्तरे कशी देऊ शकेलं? ते काय म्हणतील? तिच्या बाळाचा जन्म, ती कसे समजावून सांगू शकेल? ती दयनीय अवस्थेत होती आणि काय करावे तिला समजत नव्हते. पण अल्लाह ने तिला दिलासा दिला.' लोकांना काहीही सांगू नको, कोणत्याही प्रश्ना चे उत्तर देऊ नको, फक्त संकेत करून सांग की तू उपवास करीत आहे आणि त्या दिवशी, काहीही न बोलण्याची शपथ घेतली आहे.' तिला आदेश दिला गेला.
अल्लाह च्या मदतीने बळकट होऊन, निरागस तरुण मरियम ने तिच्या बाळाला उचलले आणि तिच्या लोकांकडे परत गेली. जेव्हा त्यांनी तिला तिच्या हातात असलेल्या, एका बाळा सोबत येतांना पाहिले, ते तिच्या भोवती जमा झाले.' मरियम, किती लाजेची गोष्ट आहे! तुझे मातापिता ईश्र्वरनिष्ठ लोक होते, तू हे काय केले? '  आणि ते त्या मुला विषयी जाणण्यास इच्छुक होते.
मरियम ने त्यांना उत्तर दिले नाही.तिने फक्त त्या मुला कडे इशारा केला. ' तू वेडी आहे का? आम्ही एका नवजात बाळासोबत कसे बोलू शकतो, मरियम ?'  त्यानंतर लगेच प्रत्येकाला पूर्ण आश्चर्य देऊन, मरियम च्या हातातील बाळाने बोलावयास सुरुवात केली. ' मी अल्लाह चा संदेश पोहोचविणारा आहे, ' ते बाळ म्हणाले, ' त्याने मला एक ग्रंथ ( इंजील, बायबल) दिला आहे आणि मला एक प्रेषित (संदे श कर्ता, पैगंबर) बनविले आहे. त्याने मला आज्ञा दिली की, माझ्या (अल्लाह च्या) प्रार्थना म्हण आणि दानशूर बन आणि माझ्यावर आशीर्वाद दिला की,  जिथे मी असेल, तो मला माझ्या आईशी दयाळू असणारा बनवेल आणि माझ्यावर ज्या दिवशी माझा जन्म झाला, ज्या दिवशी मी मृत्यू पावेन, ज्या दिवशी मला पुन्हा वर उचलण्यात येईल, त्या दिवशी शांती देईल.
प्रत्येक जनाने, डोळे विस्फारून आश्चर्याने( चमत्कार) आणि अविश्र्वासाने लक्ष देऊन ऐकले. हे ईसा ( येशू) होते. अल्लाह चे सं देशकर्ता. जे  मरियम ची जी पवित्र आणि निरागस होती, निंदा करण्यास आले होते,  ते सगळे नवजात बालकाचे बोलणे ऐकून शांत झाले. मरियम च्या विषयी पवित्र कुराण म्हणते, ' अल्लाह ने मरियम ला , त्या सर्व देशांच्या, सर्व स्त्रियांमधून वरचा दर्जा देऊन निवडले. '

कुरआनचा काही अंश

 काही chapters   

75 अल कियामह 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व  कृपाळू आहे.
1 मी पुनरुत्थानाच्या दिवसाला साक्षी ठेवून सांगतो. 2 तसेच (मानवाचे ) मन , जे (वाईट कामांविषयी ) त्याला दोष देत असते, त्यास साक्ष ठेवून सांगतो. 3 मानवाला असे वाटते कि काय, आम्ही त्याची हाडे पुन्हा एकत्र करून त्याचे (पुनरुत्थान ) करू शकत नाही ? 4 अर्थातच, आम्हाला त्याच्या बोटांची पेर अन पेर (जशाचे तसे) बसवण्याचे सामर्थ्य प्राप्त आहे. 5 पण माणूस त्याच्यापुढे, जे येणार आहे त्यास नाकारू इच्छितो (म्हणजेच पुनरुत्थानास, कारण त्याला निर्भयपणे दुष्कृत्ये करता यावीत ). 6 (चेष्टा करत) तो विचारतो, ' तो पुनरूत्थानाचा दिवस येणार तरी केव्हा ? 7 जेव्हा (दहशतीने) डोळे दिपून जातील. 8 आणि चंद्राला ग्रहण लागेल. 9 जेव्हा सूर्य व चंद्र एकत्र आणले जातील.10 त्या दिवशी मनुष्य म्हणेल, ' आता कुठे पळून जाऊ ?' 11 नाही, ( हे मानवा !) तुझ्यासाठी आता कुठेही आश्रय नाही! 12 त्या दिवशी केवळ तुझ्या पालनकर्त्यापाशीच आश्रयस्थान आहे ! 13 त्या दिवशी मनुष्यासमोर त्याने जे काही आपल्यापुढे पाठविलेले असेल , आणि जे काही मागे सोडलेले असेल , ते सर्व उघड केले जाईल. 14 वस्तुस्थिती ही आहे की, मनुष्य स्वतः आपल्याविरुद्ध साक्ष आहे.15 मग तो कितीका सबबी पुढे ठेवत नाही ?
16 ( पैगंबर !) तुम्ही (हे कुराण) तुम्हाला लवकर पाठ होऊन जावे म्हणून घाईघाईने आपल्या जिभेला चालना देऊन नका. 17 कारण त्यास (तुमच्या मनात) संकलित करण्याची व पठण करवण्याची जबाबदारी निश्चितपणे आमच्यावर आहे. 18 जेव्हा आम्ही तुम्हाला वाचून ऐकवू, तेव्हा तुम्ही त्याच्या शब्दांचे लक्षपूर्वक अनुसरण करा. 19 त्याचे अर्थ स्पष्ट करणे आमचेच काम आहे.
20  नाही , पण तुमच्यापैकी (अनेकांना) ताबडतोब होणार फायदाच प्रिय असतो (म्हणजेच याच जगात सर्व काही मिळावे.) 21 आणि यानंतरच्या जीवनाकडे दुर्लक्ष करता. 22 काही चेहरे त्या दिवशी प्रफुल्लित असतील. 23 आपल्या पालनकर्त्याकडे पाहत असतील. 24 आणि त्या दिवशी काही चेहऱ्यांवर उदासीनता पसरलेली असेल. 25 या विचारात असतील की, त्यांच्यावर फार मोठं दुःखाचे संकट लवकरच कोसळणार आहे. 26 पण जेव्हा (मरणाऱ्या ) माणसाचा (शेवटचा श्वास) कंठाशी येतो. आणि (त्याच्या आसपासचे) लोक म्हणतात, ' कोणी मांत्रिक आहे का, जो त्याला वाचवू शकतो ? 28 आणि त्याला खात्री होते की, हीच या जगाला निरोप देण्याची वेळ आहे. 29 मृत्यू होताना होणाऱ्या तीव्र वेदनेमुळे, एक पाय दुसऱ्या पायावर घासू लागेल. (हे मानवा !) हा दिवस असेल तुझ्या पालनकर्त्याकडे प्रयाण करण्याचा !
31 (जोपर्यंत तो जिवंत होता) ना त्याने सत्याचा स्वीकार केला, ना त्याने नमाजरुपी प्रार्थना केली. 32 या उलट, त्याने सत्यास खोटे  ठरविले आणि त्याकडे पाठ दाखविली. 33 मग तो (उपदेशगृहातून) उठून मोठ्या ऐटीने आपल्या कुटुंबीयांकडे निघून जायचा. 34 (हे मानवा ! ) खेद आहे तुझ्याबद्दल , फक्त खेद ! 36 मनुष्याला असे वाटते की काय, त्यास (वाटेल ते करण्यासाठी) असेच सोडून देण्यात येईल ? (म्हणजे त्याच्याशी जाब विचारला जाणार नाही ?) 37 प्रथमतः तो गर्भाशयात टाकला गेलेला वीर्याचा एक बिंदू नव्हता का ? 38 वीर्यापासून पुढे तो गुठळी झाला, मग अल्लाहने त्यास घडविले व पूर्ण संतुलनासह त्याच्या अवयवांची रचना केली. 39 आणि त्याचे दोन प्रकार बनविले, म्हणजे नर व नारी. त्याचा (निर्माता असलेला अल्लाह) मृताला जिवंत करण्यास समर्थ नसेल का ? 

-----------------------------------------------------------------

chapter 61 अस-सफ्फ 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 जे काही आकाशात आहे व जे काही पृथ्वीवर आहे, हे सर्व अल्लाहचेच स्तुतिगान करीत असतात, तोच सर्वांवर नियंत्रण ठेवणारा आहे, अस्सल बुद्धीवान आहे. 2 श्रद्धावंतांनो ! तुम्ही बोलता एक आणि करता दुसरेच असे का ? (तुम्ही आपल्या आचार व विचारात फरक का करता ?) 3 अल्लाहच्या नजरेत तुमचे असे कृत्य अत्यंत अप्रिय आहे की , बोलायचे एक आणि करायचे दुसरेच. 4 अल्लाहला तर ते लोक प्रिय आहेत. जे त्याच्या कार्यासाठी पंक्तिबद्ध  होऊन लढतात, जणू ते सर्व एक मजबूत अशी भिंत आहेत. 
5 (आणि ती वेळ आठवा) जेव्हा मुसाने आपल्या लोकांना म्हटले, 'माझ्या बांधवांनो ! तुम्ही मला त्रास का देता, जेव्हा तुम्ही हे जाणून आहात की, मी तुमच्याकडे पाठविण्यात आलेला पैगंबर आहे ; मग जेव्हा त्यांनी सन्मार्गापासून दूर जाणे पसंत केले. तेव्हा अल्लाहनेही त्यांच्या हृदयांना सत्यापासून दूर करून टाकले. कारण अल्लाह आज्ञाभंग करणाऱ्या लोकांना सन्मार्ग दाखवीत नसतो.
6 (असेच तेव्हाही घडले) जेव्हा मरियमपुत्र येशू मसीहने म्हटले, 'इस्राईलच्या मुलांनो ! मी तुमच्याकडे अल्लाहकडून पाठविलेला पैगंबर आहे;  माझ्यापूर्वीच्या तौरात या ग्रंथांपैकी जे सत्य बाकी राहिलेले आहे, त्यास प्रमाणित करणारा (मी) आहे. तसेच तुम्हाला एका पैगंबराविषयी शुभवार्ता देतो आहे, जो माझ्यानंतर येईल. ज्याचे नाव अहमद असेल.' आणि जेव्हा तो त्यांच्याकडे सत्याचे सर्व स्पष्ट प्रमाण घेऊन आला, तेव्हा ते म्हणाले, 'ही केवळ जादू आहे.' 7 आणि त्याच्यापेक्षा अधिक दुष्ट माणूस कोण असू शकतो, ज्याला, अल्लाहला समर्पित अशी जीवनपद्धती (म्हणजेच इस्लाम) कडे येण्याचे आवाहन केले जात असतानाही, तो अल्लाहविषयी खोट्या गोष्टी रचत असतो. पण अल्लाह अत्याचारी लोकांना सन्मार्ग दाखवीत नसतो. 8 जे आपल्या तोंडाच्या फुंकरेने अल्लाहचा प्रकाश विझवून टाकू इच्छितात. पण अल्लाह आपला प्रकाश पूर्णपणे सर्वत्र पसरविल्याशिवाय राहणार नाही. मग सत्य नाकारणाऱ्यांना याबद्दल कितीका वाईट वाटेना. 9 त्यानेच आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सत्यधर्म यांच्यासह पाठविले आहे, या उद्देशाने की, सत्यधर्माला इतर सर्व धर्मांवर (वैचारिक) प्रभुत्व करून द्यावे, मग ते अनेकेश्वरवाद्यांना कितीका अप्रिय वाटत नाही. 
10 (पैगंबर ! लोकांना सांगा,) श्रद्धावंतांनो ! मी तुम्हाला अशा फायद्याच्या सौद्याविषयी मार्गदर्शन करू का, जो तुम्हाला दुःखदायी शिक्षेपासून वाचवू शकतो ? 11 (तो हा की,) तुम्ही अल्लाह व त्याच्या पैगंबरावर विश्वास ठेवणारे बना आणि अल्लाहच्या मार्गात आपले धन व प्राण यांच्यासह प्रयत्नांची पराकाष्ठा (म्हणजेच जिहाद) करा. तुम्हाला हे समजत असेल , तर यात तुमचे (निश्चितपणे) भले आहे. 12 (तुम्ही असे केल्यास) अल्लाह तुमच्या चुका माफ करून टाकेल. आणि तुम्हाला अशा बागांमध्ये प्रवेश देईल. ज्यातून पाण्याचे (नयनरम्य) प्रवाह (नेहमी) वाहत असतील. तसेच राहण्यासाठी सुंदर घरे तो देईल, जे (घरे) शाश्वत  व सुखदायी बागांमध्ये असतील. हेच सर्वश्रेष्ठ यश आहे. 13 (त्या सर्वांसह) तुमच्यावर (या जगातही) आणखी एक कृपा तो करेल, ज्याची तुम्ही अभिलाषा बाळगून आहात.- अल्लाहकडून मिळणारे साहाय्य आणि लवकरच विजयाची प्राप्ती. (पैगंबर ! याविषयी ) श्रद्धावंतांना शुभवार्ता देऊन टाका.
14 श्रद्धावंतांनो ! तुम्ही (त्याप्रमाणे) अल्लाहची मदत करणारे बना, ज्याप्रमाणे मरियमपुत्र येशू मसीहने आपल्या अनुयायांना म्हटले होते,' अल्लाहकडे (लोकांना  बोलावण्याच्या) कार्यात कोण माझी मदत करेल?' त्याच्या अनुयायांनी उत्तर दिले होते, ' आम्ही अल्लाहची मदत करण्यासाठी तयार आहोत.' तेव्हा इस्राईलच्या मुलांपैकी (म्हणजे ज्यू लोकांपैकी) काहींनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि काहींनी नकार दिला. मग आम्ही श्रद्धा धारण केलेल्या लोकांची त्याच्या शत्रूंच्या विरुद्ध मदत केली, परिणामी ते विजयी झाले.

-----------------------------------------------------------------

chapter 62 अल - जुमुआ

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 जे काही आकाशात आहे आणि जे काही पृथ्वीवर आहे, ते सर्व अल्लाहचे स्तुतीगान करीत असतात. तो अस्सल सम्राट आहे, सर्व उणिवांपासून मुक्त असा, सर्वशक्तिमान आहे, बुद्धिमान आहे. 2 त्यानेच निरक्षर (उम्मी) लोकांमध्ये त्यांच्यामधूनच एक पैगंबर उभा केला, जो त्यांना त्याचे  (म्हणजे अल्लाहचे) संदेश ऐकवीत असतो. आणि (मानसिकदृष्टया) त्यांचे शुद्धीकरण करतो. आणि त्यांना  ग्रंथ व शहाणपणाचे धडे देत असतो. ते या यापूर्वी स्पष्टरित्या वाट चुकलेले होते. 3 (मक्केतील निरक्षरांव्यतिरिक्त) इतर लोकांकडेही (हा संदेश पोचविण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे), ते लोक ज्यांचा (या मक्कावासीयांशी) अद्याप संबंध आलेला नाही. तोच सर्वशक्तिमान आहे आणि अस्सल बुद्धिवान आहे. 4 ही (पैगंबरी) अल्लाहची कृपा होय, तो इच्छितो त्यास, ती प्रदान करतो. अल्लाह असीम कृपावंत आहे.
5 ज्या लोकांच्या (शिरावर) तौरात (या अल्लाहच्या) ग्रंथाची जबाबदारी सोपवण्यात आली होती , पण त्यांनी ती जबाबदारी (गंभीरतापूर्वक) पेलली नाही. त्यांची तुलना त्या गाढवाशी केली जाऊ शकते, जो पुस्तकांचे ओझे वाहून नेत आहे. (खरोखर,) किती वाईट उपमा आहे, त्या लोकांसाठी ज्यांनी अल्लाहच्या संदेशांना खोटे ठरविले (त्याकडे वाईटरित्या दुर्लक्ष केले) ! अल्लाह अशा अत्याचारी लोकांना सन्मार्ग दाखवत नसतो. 6 (पैगंबर ! ज्यू लोकांना) सांगा, 'हे ज्यू लोकांनो ! तुम्हाला वाटत असेल की , तुम्ही इतरांपेक्षा अल्लाहला सर्वाधिक प्रिय आहात , आणि तुमच्या या वाटण्यात काही सत्यता असेल तर तुम्ही (लवकरात लवकर) मरण्याची अभिलाषा बाळगायला हवी. 7 ' पण (पैगंबर !) त्यांच्या हातांनी जी (दुष्) कृत्ये आपल्या पुढे पाठवलेली आहेत , त्या कारणामुळे ते कधीही अशी अभिलाषा बाळगणार नाहीत. अल्लाह अपराध्यांना चांगले ओळखून आहे. 8 त्यांना सांगा,' ज्या मृत्यूपासून तुम्ही दूर पळत आहेत, तो तुमच्यावर अटळरित्या येणार आहे. तेव्हा तुम्हाला त्या (अल्लाह) समोर हजार केले जाईल, जो ते सर्व जाणतो जिथपर्यंत कोणाचीही बुद्धी पोचू शकत नाही आणि तेही, जे सर्व जाणतात. तेव्हा तो तुम्हाला त्या कामांशी अवगत करेल , जी तुम्ही करीत होता.'
9 इमानधारकांनो ! जेव्हा तुम्हाला (साप्ताहिक प्रार्थनेकरिता) जमा होण्याच्या दिवशी (म्हणजे शुक्रवारी) नमाजासाठी  येण्याचे आवाहन केले जाईल, तेव्हा अल्लाहचे (नमाजरुपी) स्मरण करण्यासाठी सर्व खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद करून (प्रार्थनागृहाकडे) निघा. तुम्हाला हे समजणार असेल, तर यात तुमचे स्वतःचे भले आहे. 10 मग जेव्हा नमाज पूर्ण होईल, तेव्हा अल्लाहच्या कृपेच्या शोधार्थ (त्याच्या जमिनीवर) (पाहिजे तिकडे) पसरून जा. पण अल्लाहची प्रत्येक प्रसंगी आठवण करीत राहा. यासाठी कि, तुम्ही यशस्वी व्हावे.
11 (पण पैगंबर !) (काही लोकांच्या बाबतीत घटते मात्र याच्या उलट ) जेव्हा त्यांना काही खरेदी-विक्रीचा प्रकार किंवा करमणुकीचा प्रकार होत असल्याचे आढळते तर तुम्ही (प्रवचन करीत असताना) तुम्हाला उभे सोडून त्याकडे पळत सुटतात. त्यांना सांगा, 'जे अल्लाहपाशी आहे, ते कोणत्याही खरेदी-विक्रीच्या वस्तूपेक्षा व करमणुकीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि अल्लाह सर्वोत्कृष्ट उपजीविका प्रदान करणारा आहे.'
-----------------------------------------------------------------

chapter 63 अल -मुनाफिकून 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 (पैगंबर !) जेव्हा दांभिक लोक तुमच्याकडे येतात, तेव्हा ते म्हणतात, 'आम्ही अशी साक्ष देतो की, तुम्ही निःसंदेह अल्लाहचे पैगंबर आहात.' अल्लाह जाणतो की, तुम्ही निःसंदेह त्याचे पैगंबर आहात. आणि अल्लाह या गोष्टीची साक्ष देतो की , हे दांभिक खोटे बोलणारे आहे. 2 त्यांनी (खोटे बोलण्याचा उद्योग करण्यासाठी) आपल्या शपथांना ढाल बनविलेले आहे. आणि ते (त्याद्वारे) लोकांना अल्लाहच्या मार्गापासून परावृत्त करीत असतात. जे ते करीत आहे, खरोखर फार वाईट आहे.  3 (ते दांभिक) अशाप्रकारे बनले की , त्यांनी सुरुवातीला (वरवर ) श्राद्ध धारण केली , पण (मनोमनी) ते सत्य नाकारतात (व ते त्यांच्या कृत्यांतूनही दिसून येते), (परिणामी अल्लाहने ) त्यांची मने (सत्याच्या प्रवेशासाठी) सीलबंद करून टाकली. आता त्यांना सत्य उमजतच नाही. 
4 आता जेव्हा तुम्ही त्यांना पाहता, त्यांचे दर्शनी रूप तुम्हाला चांगले वाटू शकते. आणि जेव्हा ते बोलतात, तेव्हा तुम्ही त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकता. (पण ते तुमच्यासमोर असे बसतात) जणू भिंतीला टेकवून उभे केलेले लाकडाचे ओंडके आहेत , प्रत्येक जोराची आवाज त्यांच्याचविरुद्ध (काहीतरी) असल्याचे त्यांना वाटते. हे (धर्माचे खरे)शत्रू आहेत, तर यांच्यापासून (नेहमी) सावध राहा. त्यांच्यावर अल्लाहचा प्रकोप होवो ! ते कुठे भलतीकडे जात आहेत ! 5 कारण जेव्हा त्यांना म्हटले जाते, 'या, पैगंबर तुमच्यासाठी अल्लाहकडे क्षमायाचना करेल.' तेव्हा ते (नकार दर्शवीत) आपली डोकी हालवतात. आणि तुम्ही त्यांना पाहाल, मगरूरीचे प्रदर्शन करीत तिथून निघून जातात. 6  तुम्ही त्यांच्यासाठी (अल्लाहकडे) क्षमायाचना करा किंवा करू नका, दोन्ही गोष्ट सारख्या आहेत. (कारण परिणाम शून्यच असेल). अल्लाह त्यांना कदापि क्षमा करणार नाही. कारण अल्लाह विद्रोही लोकांना सन्मार्ग दाखवत नसतो.
7 हेच ते आहेत, जे (आपल्या साथीदारांना) म्हणतात, 'जे लोक अल्लाहच्या पैगंबरांसोबत आहेत, त्या लोकांवर (आपले धन) खर्च करू नका, (परिणामी) त्यांची गोची होऊन ते (पैगंबराची) साथ सोडून देतील.'  पण या दांभिक लोकांना हे माहीत  नाही की, आकाश व पृथ्वीचे सर्व खजिने, अल्लाहच्या मालकीचे आहेत. 8 आणि ते म्हणतात,' आम्ही मदिनेला परतल्यानंतर, (आम्ही) तेथील सर्वाधिक सन्माननीय लोक, तेथून त्या सर्वात तुच्छ अशा लोकांना निश्चितपणे हाकलून लावू.' पण या दांभिक लोकांना या गोष्टीची जाण नाही की, सर्व प्रकारचे मन-सन्मान अल्लाहसाठी  आहे, त्याच्या पैगंबरासाठी आहे व श्रद्धावंतांसाठी आहे. 
9 श्रद्धावंतांनो ! तुमची धनसंपत्तीं व तुमची मुले तुम्हाला अल्लाहच्या आठवणीपासून ढळण्यास कारणीभूत ठरायला नको. आणि ज्याला या गोष्टी (अल्लाहच्या स्मरणापासून विचलित करतील) तर असेच लोक (शेवटी) नाश पावणारे असतींल. 10 आणि तुम्हाला जे काही दिलेले आहे, त्यातून तुमच्यापैकी एखाद्याला मृत्यू येण्यापूर्वी त्याने खर्च करावे. मग तो म्हणू लागेल, ' हे माझ्या पालनकर्त्या ! तू मला आणखी काही काळ उसंत का नाही दिलीस? की , मी दानकार्य केले असते आणि सदाचारी लोकांपैकी झालो असतो.' 11 पण अल्लाह कोणालाही त्याची नियत वेळ येऊन ठेपल्यावर उसंत देत नसतो. आणि तुम्ही जे काही करता, अल्लाह त सर्व जाणतो. 
-----------------------------------------------------------------

chapter 64 अत तगाबुन

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 जे काही आकाशात आणि जे काही पृथ्वीवर आहे, ते सर्व अल्लाहचे स्तुतिगान करीत असतात. सर्वत्र त्याचीच सत्ता आहे व सर्वत्र त्याचीच स्तुती आहे. आणि सर्व वस्तुमात्रांवर त्यालाच पूर्ण 
नियंत्रण प्राप्त आहे. 2 त्यानेच तुम्हा (सर्वांना) निर्माण केले, मग तुमच्यात काही सत्य 
नाकारणारे तर काही सत्य स्वीकारणारे 
(श्रद्धावंत) आहेत. तुम्ही जे काही करता, त्यावर अल्लाह (नेहमी) नजर ठेवून असतो. 3 त्यानेच आकाश व पृथ्वी यांना उचित उद्देशासहित 
निर्माण केलेले आहे. आणि त्याने तुम्हाला 
आकार दिला, उत्तम आकार दिला. आणि त्याच्याकडेच तुम्हा सर्वांना परत जायचे आहे. 
4 जे काही आकाशात आहे व जे काही पृथ्वीवर आहे, ते सर्व तो जाणतो. तसेच तो तुम्ही जे 
लपवता व जे प्रकट करता तेही जाणतो. कारण 
अल्लाहलाच (लोकांच्या) मनात काय काय आहे, याचे पूर्ण ज्ञान आहे. 5 तुम्हाला त्या लोकांची जाणीव झाली नाही का, ज्यांनी यापूर्वी सत्य नाकारण्याचे (अपकृत्य) केले ? मग आपल्या कर्मांची फळे चाखली . आणि (यानंतरच्या जीवनात) तर त्यांच्यासाठी (याहूनही) कठोर 
शिक्षा आहे. 6 असे (पुन्हा-पुन्हा) यासाठी 
(घडले), कारण त्यांच्याकडे त्यांचे पैगंबर सत्याचे सर्व स्पष्ट प्रमाण घेऊन आले. पण  (पैगंबराप्रतिनेहमी) त्यांचा प्रतिसाद असाच होता की, ही (आमच्यासारखी असलेली) माणसे आम्हाला मार्दर्शन करणार आहेत ? अशाप्रकारे त्यांनी सत्यास नकार दिला आणि त्याकडे  
पाठ फिरवली. आणि अल्लाहला अशा लोकांची गरज नाही. तो (खराखुरा) आत्मनिर्भर आहे. सर्व प्रकारच्या स्तुतीस (सदैव) पात्र असा 7 सत्य नाकारणारे असा दावा करतात की, त्यांना पुन्हा जिवंत करून उठविले जाणे शक्यच नाही.
(पैगंबर!) त्यांना सांगा, ' माझ्या पालनकर्त्याची शपथ, तुम्हाला पुन्हा जिवंत करून 
अवश्य उठविलेजाईल, मग तुम्हाला तुम्ही जे जे करत होता, त्याचे दर्शन घडविले जाईल. ही अल्लाहसाठी अगदी सोपी गोष्ट आहे. 8 म्हणून (लोकांनो!) अल्लाहवर व त्याच्या पैगंबरावर 
आणि जो सन्मार्ग दाखवणारा प्रकाश 
आम्ही प्रकट केला आहे. त्यावर विश्वास 
ठेवणारे बना. आणि तुम्ही जे काही करता, त्याची अल्लाहला पूर्ण जाणीव आहे.   
9 जेव्हा तो तुम्हाला त्या एकत्र करण्याच्या 
दिवशी एकत्रित करेल. हाचदिवस (खऱ्याअर्थाने) जय व पराजयाचा दिवस असेल. 
जो कोणी श्रद्धा धारण करून सत्कर्मे केलेला 
असेल, अल्लाह अशा माणसाची वाईट कृत्ये 
माफ करून टाकेल.आणि त्यास अशा बागांत 
प्रवेश देईल, जिथे पाण्याचे (नयनरम्य) प्रवाह (नेहमी) वाहत असतील(असे लोक) तिथे 
कायम वास्तव्य करतील. हेच आहे अस्सल यश. 
10 ज्या लोकांनी सत्य स्वीकारण्यास नकार दिला 
आणि आमच्या संदेशांना खोटे ठरविले, 
असेच लोकनरकवासी असतील. ते तिथे 
कायम वास्तव्य करतील. हेच सर्वात 
वाईट ठिकाण आहे (राहण्याचे !)
11 (लोकांनो!) तुमच्यावर कोणतीही आपत्ती 
अल्लाहच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. 
आणि जो कोणी अल्लाहवर दृढ विश्वास ठेवतो, 
अल्लाह त्याच्या अंतःकरणास योग्य मार्ग 
दाखवतो. अल्लाहला प्रत्येक गोष्टीचे 
परिपूर्ण ज्ञान आहे. 12 तुम्ही अल्लाहचे 
आज्ञापालन करा व पैगंबराचे 
आज्ञापालन करा. मग जर तुम्ही (या संदेशाकडे) दुर्लक्ष कराल तर आमच्या 
पैगंबरावर(संदेश) स्पष्टपणे पोहोचविण्यापलीकडे 
अन्य जबाबदारी नाही. 
13 अल्लाह त्याच्याशिवाय दुसरा कोणीच
उपासनेयोग्य नाही. आणि विश्वास 
ठेवणाऱ्यांना त्याच्यावरच विश्वास ठेवायला हवा.
14श्रद्धावंतांनो! तुमच्या पत्नी व तुमची मुले 
यांच्यापैकी काही (धर्माच्या बाबतीत) 
तुमचे शत्रू आहेत. तरतुम्ही त्यांच्यापासून 
सावध राहा. पण जर तुम्ही त्यांच्या 
चुकांकडे दुर्लक्ष कराल  आणि 
त्यांच्याप्रति दया दाखवाल व त्यांना माफ 
कराल, तर अल्लाह (देखील) फार क्षमा करणारा व दया करणारा आहे.15 (लोकांनो!) तुमची धनसंपत्ती व तुमची 
अपत्ये या गोष्टी तुमची कसोटी 
पाहण्याचे साधन आहे आणि (माणसाला जे जे हवे, ते खऱ्या अर्थाने) अल्लाहकडेच प्राप्त 
होणार आहे. 16 तर (श्रद्धावंतांनो!) नेहमी 
अल्लाहचा जाण  ठेवून (जीवन व्यतीत 
करण्यासाठी) प्रयत्नशील राहा. (जे सांगितले जाते ते) ऐका व आग्येचे 
पालन करा. व (त्याच्या कार्यासाठी) खर्च करा. 
यात तुमचे स्वतःचे भले आहे. जे लोक 
कृपनतेच्या (लालसेच्या) आहारी जाण्यापासून 
सुरक्षित राहिले. तर असेच लोक यशस्वी 
ठरणारे आहेत. 17 जर तुम्ही अल्लाहला उदारतापूर्ण कर्ज द्याल तर तो त्यात तुमच्यासाठी कित्येक पटीने वाढ करेल.आणि तो तुमच्या 
चुका माफ करेल. कारण अल्लाह  हा (आपल्या दासांप्रति) फार गुणग्राहक आहे व फार 
सहिष्णू आहे.18तो ते सर्व जाणतो, जिथपर्यंत कोणाचीही बुद्धी पोचू शकत नाही आणि तेही, जे सर्व 
जाणतात. तोच सर्वशक्तीमान व खरा  बुद्धिवान आहे.

-----------------------------------------------------------------

chapter 65 अत - तलाक

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.1 पैगंबर !  जेव्हा तुमच्यापैकी कोणीही आपल्या पत्नींना घटस्फोट (तलाक) देईल तर (त्याने ) त्यांना त्यांच्या स्वच्छतेच्या (म्हणजे मासिक पाळी नसलेल्या) काळात तलाक द्यावा. आणि त्या काळाची गणना काळजीपूर्वक करा. आणि आपला पालनकर्ता असलेल्या अल्लाहसमोर (जाब देण्याची सदैव) जाण  ठेवा. (तलाकची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत) त्यांना त्यांच्या घरातून काढू नका. तसेच त्यांनीही घर सोडून जाऊ नये. पण फक्त त्यांनी जर उघड-उघड काही निर्लज्जपणाचे कृत्य केलेले असेल (तर त्यांना घराबाहेर घालवू शकता). या अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा आहेत आणि जो कोणी अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादा भंग करेल, तर तो स्वतःवरच अन्याय करणारा आहे. 
(हे माणसा !) तू जाणत नाहीस की, अल्लाह त्यानंतर कदाचित काही नवीन (कल्याणकारी ) स्थिती निर्माण करेल. 2 मग त्यांच्या प्रतीक्षेची मुदत पूर्ण झाल्यांनंतर, त्यांना सन्मानाने ठेवून घ्या किंवा सन्मानाने सोडून द्या. आणि आपल्या 
(नातेवाईकांपैकी) दोन विश्वसनीय लोकांना साक्ष म्हणून बोलावून घ्या. (आणि साक्ष देणाऱ्यांनी गरज असेल तेव्हा) अल्लाहची जाण ठेवून, योग्य तीच साक्ष द्यावी. हे उपदेश त्या माणसाला दिले जात आहेत, जो अल्लाहवर व न्यायाच्या दिवसावर विश्वास ठेवणारा आहे. आणि जो कोणी अल्लाहकडे (जाब देण्याची) जाण ठेवेल, अल्लाह त्याच्यासाठी (अडचणीतून) बाहेर पाडण्याचा मार्ग काढेल. 3 आणि तो त्याला अशा ठिकाणाहून उपजीविका पुरवेल, ज्याची त्याने कधी कल्पनाही केलेली नसेल. जो कोणी अल्लाहवर विश्वास ठेवतो, अल्लाह त्याच्यासाठी पर्याप्त आहे. अल्लाह नेहमी आपली योजना तडीस नेतोच. (आणि) अल्लाहने प्रत्येक गोष्टीसाठी एक (अवधी व) प्रमाण ठरवून दिलेले आहे.4 आणि तुमच्या स्त्रियांपैकी वय झाल्यामुळे ज्यांना मासिक पाळी येण्याविषयी शंका आहे. तर अशा स्त्रियांसाठी प्रतिक्षेची अवधी तीन महिने आहे आणि हाच नियम त्यांनाही लागू होईल ज्यांना मासिक पाळी आलेलीच नाही. आणि गर्भवती असलेल्या स्त्रियांसाठी प्रतिक्षेचा काळ प्रसूती होईपर्यंत आहे. आणि जो कोणी अल्लाहकडे (जाब देण्याची) जाण ठेवेल, अल्लाह त्याचे काम सोपे करून टाकेल. हा आहे अल्लाहचा आदेश, जो त्याने तुमच्याकडे प्रकट केलेला आहे. जो कोणी अल्लाहची जाण बाळगून (जीवन जगेल), अल्लाह त्याच्या चुका माफ करून टाकेल आणि त्यास फार मोठे बक्षीस प्रदान करेल.6 ज्या स्त्रिया (प्रतिक्षेच्या काळात) आहेत. त्यांना आपल्या ऐपतीनुसार जसे तुम्ही राहत  आहात, तसेच त्यांनाही तिथेच राहू द्या. आणि त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांचा छळ करू नका. आणि त्या जर गर्भवती असतील, तर बाळ जन्माला येईपर्यन्त खर्च करा. मग जर (तलाक झाल्यानंतरही) त्या तुमच्या (बाळाला) स्तनपान देत असतील, तर त्यांना त्याबद्दल योग्य तो मोबदला द्या. (मुलाच्या भविष्याविषयी) आपसात सामंजस्यपूर्वक विचारविमर्श करा. आणि जर तुम्ही आपसात असहमत असाल, तर मग इतर एखादी स्त्री तुमच्या बाळाला दूध पाजील. (या सर्व बाबतीत) ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती आहे, त्याने त्यानुसार खर्च करावा. आणि ज्याच्याकडे निर्वाहाची साधने कमी प्रमाणात आहेत त्याने, अल्लाहने त्याला जे काही दिलेले आहे त्यानुसार त्यातून खर्च करावा. अल्लाहने ज्याला जितके दिलेले आहे, त्यापेक्षा अधिक भार तो कोणावरही टाकत नसतो. अल्लाह हलाखीच्या (दिवसांनंतर)लवकरच चांगले दिवसही आणेल. 8 कित्येक अशा वस्त्या होत्या, ज्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या व त्याच्या पैगंबराच्या आग्यांचे उल्लंघन केले, तेव्हा आम्ही त्यांना कठोरपणे फैलावर घेतले. आणि आम्ही त्यांना कठोर शिक्षा केली. 9 अशाप्रकारे त्यांनी आपल्या (कर्मरूपी) कमाईची फळे चाखली आणि शेवटी विनाशाशिवाय त्यांच्या वाट्याला काहीच आले नाही. 10 (यापलीकडेही ) अल्लाहने त्यांच्यासाठी (याहूनही) मोठी शिक्षा तयार ठेवलेली आहे. हे बुद्धी बाळगणाऱ्या श्रद्धावंतांनो! अल्लाहची जाण बाळगून असा. अल्लाहने तुमच्याकडे एक बोधग्रंथ प्रकट केलेला आहे. 11 (आणि) एक पैगंबर (पाठविला आहे), जो तुम्हाला अल्लाहचे सुस्पष्ट संदेश  ऐकवीत आहे. यासाठी की, जे श्रद्धा धारण करून सत्कर्मे करीत आहेत, अशा लोकांना अंधकारातून काढून प्रकाशात आणावे. आणि जो कोणी अल्लाहवर श्रद्धा धारण करून सत्कर्मे करतो, तो त्यास अशा बागांत प्रवेश देईल, ज्यातून पाण्याचे   (नयनरम्य) प्रवाह (कायम) वाहत असतील. ते तिथे कायम वास्तव्य करतील. ही  अल्लाहने त्याला प्रदान केलेली उत्कृष्ट उपजीविका असेल. तो अल्लाह आहे, ज्याने सात आकाशांना निर्माण केले व तशाच पृथ्वी देखील. त्यांच्यामध्ये त्याचे आदेश प्रकट होत असतात (आणि त्या आदेशांनुसार हा प्रचंड कारखाना काम करीत असतो) ते यासाठी की, तुम्हाला कळून यावे की, प्रत्येक गोष्टीवर अल्लाहचे पूर्ण नियंत्रण आहे. आणि अल्लाहने आपल्या ज्ञानाने प्रत्येक गोष्टीस वेढून ठेवलेले आहे.
___________________________________

66  आत-तहरीम 

1 पैगंबर ! तुम्ही आपल्या पत्नींच्या  प्रसन्नतेखातर  त्या गोष्टीला (स्वतःसाठी) का अवैध ठरवता, जी अल्लाहने तुमच्यासाठी वैध ठरविलेली आहे. पण अल्लाह फार क्षमाशील व दयाळू आहे.
2 अल्लाहने तुम्हाला आपल्या शपथांमधून मुक्त होण्याचे (नियमासहित) आधीच बजावलेले आहे, कारण अल्लाह तुमचा साम्भाळकर्ता आहे. आणि तोच सर्व काही जाणणारा व बुद्धिमान आहे.
3 आणि (एकदा असे घडले की,) पैगंबराने आपल्या पत्नींपैकी एकीला एखादी गोपनीय गोष्ट सांगितली. पण तिने ती गोष्ट गुप्त ठेवली नाही. आणि अल्लाहने पैगंबराला याबद्दल सूचित केले. तेव्हा पैगंबराने तिला त्यांपैकी काही भाग सांगितला आणि काही भाग सांगायचे टाळले. मग जेव्हा पैगंबराने आपल्या पत्नीस हे सांगितले, (जे त्यास अल्लाहद्वारे कळविण्यात आले होते ), तेव्हा तिने विचारले,
' तुम्हाला याविषयी कोणी सांगितले?
पैगंबराने उत्तर दिले, ' मला त्याने हे सांगितले जो सर्व काही जाणणारा आहे व प्रत्येक गोष्टीविषयी जागरूक आहे. 4 (पैगंबराच्या पत्नींनो !) जर तुम्ही दोघी पश्चातापदग्ध होऊन अल्लाहकडे वळाल, तर (ते तुमच्या हिताचे असेल) (कारण) तुमची मने आधीच (जे योग्य आहे) त्यापासून दूर गेलेली आहेत. पण जर तुम्ही दोघी पैगंबराच्या विरुद्ध एकमेकींना मदत कराल, तर (लक्षात ठेवा) पैगंबरांचा साहाय्यकरता अल्लाह आहे आणि  जिब्रील (हा स्वर्गदूत) आणि सत्कृत्ये करणारे श्रद्धावंत आणि याव्यतिरिक्त (सर्व इतर) स्वर्गदूत त्याला साहाय्य करणारे आहेत. 5 (पैगंबराच्या पत्नींनो !) जर पैगंबराने तुम्हाला घटस्फोट दिला, 
तर त्याचा पालनकर्ता तुमच्याजागी तुमच्याहून अधिक चांगल्या पत्नी त्याला देऊ शकतो. ज्या, अल्लाहप्रति समर्पित अशा, श्रद्धावंत, आज्ञाधारक, नेहमी अल्लाहसमोर लीन असलेल्या, निष्ठावंत उपासक, उपवास करणाऱ्या, ज्या विधवा व कुमारिकाही असतील. 
6  श्रद्धावंतांनो  ! तुम्ही स्वतःला व तुमच्या कुटुंबियांना त्या (नरकाच्या) आगीपासून वाचवा जिचे इंधन माणसे व दगड असतील. जिचे (रखवालदार म्हणून ) कठोर व प्रचंड शक्तिशाली (अल्लाहचे ) दूत नियुक्त आहेत. अल्लाहने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत ते जराशीदेखील कुचराई करीत नाहीत. ते अगदी तेच करतात, जे करण्याचा त्यांना आदेश दिला जातो. 7 सत्य नाकारण्यावर आग्रही राहिलेल्या लोकांनो ! आज कोणत्याही सबबी प्रस्तुत करू नका. तुम्हाला त्याचाच मोबदला देण्यात येत आहे, जे तुम्ही करीत होता.
8 श्रद्धावंतांनो! प्रामाणिकपणे पश्चाताप करून अल्लाहकडे वळा, नवल नव्हे, तुमचा पालनकर्ता तुमची वाईट कृत्ये माफ करून टाकेल आणि तुम्हाला अशा बागांमध्ये प्रवेश देईल, ज्यांमधून पाण्याचे (नयनरम्य) प्रवाह (सदैव) वाहत असतील. त्या दिवशी (म्हणजे न्यायाच्या दिवशी), अल्लाह पैगंबरास व त्याचे अनुसरण करणाऱ्या श्रद्धावंतांना अपमानित करणार नाही. त्यांच्या (सद्गुणांचा) प्रकाश त्यांच्यासमोर व त्याच्या उजव्या बाजूस धावत असेल. आणि ते म्हणतील, ' हे प्रभू ! आमच्यासाठी आमच्या या प्रकाशास सदैव तळपत ठेव. आणि आम्हाला क्षमा कर. खरोखर, तुला प्रत्येक गोष्टीवर पूर्ण नियंत्रण प्राप्त आहे.'
9 पैगंबर ! (अल्लाहचे शत्रू असलेल्या) सत्य नाकारणाऱ्या लोकांशी व दांभिक लोकांशी जिहाद करा. आणि त्यांच्याप्रति दयामाया दाखवू नका. त्यांचे अंतिम स्थान नरक आहे आणि ते खरोखर फार वाईट स्थान आहे.
अल्लाह सत्य नाकारणाऱ्या लोकांसाठी नूहची पत्नी व लूतची पत्नी यांचे उदाहरण सादर करीत आहे. ज्या आमच्या दोन सदाचारी भक्तांशी विवाहबद्ध होत्या. मग त्यांनी त्यांच्याशी (म्हणजे आपल्या पतींशी) विश्वासघात केला. त्यामुळे (न्यायाच्या दिवशी) अल्लाहच्या मर्जीच्या विरुद्ध , ते त्यांच्या कोणत्याही प्रकारे कामी येऊ शकणार नाहीत. आणि त्या दोघींना सांगितले जाईल, ' नरकाच्या आगीत प्रवेश करा, इतर प्रवेश करणाऱ्यांबरोबर.'
11 आणि इमान धारण केलेल्या लोकांसाठी अल्लाह फिरऔनच्या पत्नीचे उदाहरण समोर ठेवत आहे. तिने ( अल्लाहशी प्रार्थना केली ) म्हणाली, ' हे प्रभू ! माझ्यासाठी स्वर्गात तुझ्या सान्निध्यात एक घर बनव, आणि मला फिरऔन व त्याच्या कुकृत्यांपासून वाचव  आणि मला अत्याचारी लोकांपासून मुक्ती दे.' असेच (दुसरे उदाहरण) इमरानची मुलगी मरियम  हिचे आहे, जिने आपले शील सुरक्षित ठेवले. मग आम्ही तिच्यात आमचा आत्मा फुंकला. आणि तिने आपल्या पालनकर्त्याच्या वचनांचे व त्याच्या ग्रंथाचे (पूर्ण) समर्थन केले. आणि ती आज्ञाधारक (भक्तांपैकी) होती.

-----------------------------------------------------------------

67 अल - मुल्क

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत 
दयाळू व कृपाळू आहे.

1 असीम समृद्ध आहे तो, ज्याच्या हाती समस्त विश्वाची (ची) सत्ता आहे. प्रत्येक वस्तुमात्रावर त्याचेच नियंत्रण आहे. 2 त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन व मृत्यू निर्माण केले. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो, 
(हे त्याला पाहायचे आहे). तो सर्वशक्तिमान (असूनही) फार क्षमाशील आहे. 3 ज्याने 
एकावर एक असे सात आकाश निर्माण  केले. कृपावंत (अल्लाहच्या) निर्मितीमध्ये तुम्हाला कोणताही दोष असल्याचे आढळून येणार नाही. 
(एकदा पाहिल्याने दोष न आढळल्यास) पुन्हा एकदा पाहा, की, तुम्हाला आढळतो का 
कुठे काही दोष ? 4 मग आणखी पुन्हा पुन्हा 
पाहा, (प्रत्येक वेळेस) तुमच्या (दोष शोधणाऱ्या) 
नजरा थकून व निराश होऊन तुमच्याकडे परततील (पण अल्लाहच्या निर्मितीमध्ये दोष कुठेही 
आढळणार नाही).
5 आणि आम्ही पृथ्वीसाठी सर्वात जवळ असलेल्या आकाशाला दिव्यांनी सजवलेले आहे. आणि (वाईट हेतूने आपल्या मर्यादा ओलांडणाऱ्या) 
सैतानांना पिटाळून लावण्याचे त्यांना साधन 
बनविले आहे.आणि त्यांच्यासाठी धगधगत्या 
आगीची (भयंकर) शिक्षा तयार आहे. 
6  ज्या लोकांनी आपल्या पालनकर्त्याला 
मानण्यास नकार दिला त्यांच्यासाठी नरकाची (भयंकर) आग तयार ठेवलेली आहे. (खरोखर) ते फारच वाईट ठिकाण आहे. 
7 जेव्हा त्यांना तिच्यात टाकले जाईल, तेव्हा तिची (भयंकर) गर्जना ते ऐकतील आणि ती उसळी घेत असेल. 8 जणू तिच्या क्रोधाचा स्फोटच होत आहे. प्रत्येक समूह जेव्हा तिच्यात टाकला 
जाईल, तिचे रखवालदार (प्रत्येक समूहाला) 
विचारतील, ' तुमच्याकडे कोणी सावध 
करणारा आला नव्हता का ?' 9 ते उत्तर देतील, ' अर्थातच, सावध करणारा आमच्याकडे 
आला होता, पण आम्ही त्यास खोटे ठरविले होते 
आणि आम्ही त्यास म्हटले होते, 'अल्लाहने 
काहीही प्रकट वगैरे केलेले नाही.
' तुम्ही (स्वयंनियुक्त पैगंबर अल्लाह च्या 
संदेशा चे नाटक करून) चुकीच्या मार्गी 
लागलेले आहात ' 10  आणि ते म्हणतील, ' जर आम्ही त्यांचे म्हणणे ऐकले असते आणि        ( निदान) आमच्या बुद्धीचा वापर केला 
असता, तर आता आम्ही नरकवासीयांपैकी 
 झालो नसतो.' 11  आणि अशाप्रकारे ते 
आपल्या अपराधाची कबुली देतील.
तर नारकवासीयांवर सर्वप्रकारे अल्लाहची 
अवकृपा होवो!

12  (या उलट) जे लोक आपल्या 
पालनकर्त्याला  न पाहताही त्याच्याप्रति 
भीतीयुक्त आदर बाळगतात. त्यांना
(अल्लाहकडून) क्षमा व फार मोठे 
बक्षीस प्राप्त होईल.

13( लोकांनो!) तुम्ही काहीही गुपचुपरित्या बोला किंवा मोठ्याने बोला प्रत्येकाच्या मनात जे- जे आहे, ते सर्व त्याला माहीत आहे. 14 
ज्याने तुम्हाला निर्माण केले, त्यालाच ( तुमच्याविषयी) प्रत्येक गोष्ट माहीत नसणार का? 
त्याची बौद्धिक शक्ती अगाध आहे, ( कोणासाठीही) अनाकलनीय अशी आहे. 
तोच प्रत्येक गोष्टीची जाणीव असणारा आहे. 

15 त्यानेच पृथ्वीला तुमच्या अधीन करून टाकले. तर तुम्ही तिच्या भूभांगावर  संचार करा. आणि त्याने दिलेल्या उपजिविकेतून खा, आणि (हे नेहमी लक्षात ठेवा की, शेवटी) पुनरुत्थान 
होऊन त्याच्याकडेच परत जायचे आहे. 16
तुम्ही त्याच्यापासून स्वतःला सुरक्षित समजता
 का, जो आकाशात आहे. (म्हणजेच 
अल्लाहपासून ) ? की , तो तुम्हाला जमिनीत 
गाडून टाकू शकत नाही ? पाहा जेव्हा 
ती कंपित होते (तेव्हा काय होऊ शकते?) 
17  किंवा जो आकाशात आहे,
त्याच्यापासून तुम्ही निर्भय झाला आहेत 
का ? की, तो तुमच्यावर दगडांचा 
वर्षाव करणारे तुफानी वादळ पाठवू
शकत नाही? पण तेव्हाच तुम्हाला 
कळून चुकेल की , किती (खरा) होता माझा 
इशारा. 18 आणि त्यांच्या पूर्वीच्या अनेकांनी (माझ्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून त्यास) 
खोटे ठरविले. तर कशी होती माझी नाराजी (जी त्यांच्यावर प्रकट झाली )!

19 ते त्यांच्यावर उडणाऱ्या पक्ष्यांचे कधी (चिंतनपूर्वक ) अवलोकन कारण नाहीत का, 
जे आपले पंख पसरवितात आणि (गरजेनुसार) ते आत मिटून घेत असतात. त्यांना 
थांबवून ठेवणारा कृपावंत (अल्लाहशिवाय)
दुसरा कोणीच नाही. कारण तो सर्व गोष्टींवर नजर ठेवून असतो. 20  अशी कोणती सेना आहे, जी कृपावंत अल्लाहच्या विरुद्ध तुम्हाला 
साहाय्य करू शकेल? सत्य नाकारणारे 
केवळ स्वतःची फसवणूक करीत आहेत ! 21 (अशाप्रकारे) अल्लाहने तुम्हाला उपजीविका 
प्रदान करणे बंद केले, तर (त्याच्याशिवाय) दुसरा कोण आहे जो 
तुम्हाला उपजीविका देऊ शकतो ? (हे सत्य उघड असतानाही,) हे केवळ हट्टापोटी 
विद्रोहाची आणि सत्यापासून दूर जाण्याची भूमिका घेत आहेत.

22 जो माणूस आपल्या चाऱ्यावर लोटांगण घालून चालतो, तो सन्मार्गावर असू  शकतो की, जो सरळ मार्गावर, सरळ ताठ मान ठेवून चालतो तो? 
23 त्यांना सांगा, 'तोच आहे (अल्लाह) 
ज्याने तुम्हा सर्वांना निर्माण केले आणि 
तुमच्यासाठी कान, डोळे व हृदये बनविली, पण 
(अल्लाहप्रति) फारच थोडी कृतज्ञता
दाखवता.' 24  त्यांना सांगा कि, तोच आहे (अल्लाह) ज्याने तुम्हाला पृथ्वीवर सर्वत्र पसरवून टाकले. आणि शेवटी (पुनरुत्थानाच्या दिवशी) 
तुम्हाला त्याच्याकडेच एकत्रित आणले जाणार 
आहे.

25  पण ते विचारतात, ' या (पुनरुत्थानाच्या) 
वचनाची पूर्तता होणार तरी केव्हा? तुमच्या 
म्हणण्यात काही सत्य असेल, तर (आम्हाला उत्तर द्या). ' 26 (पैगंबर !) त्यांना सांगा, ' याचे ज्ञान केवळ अल्लाहला आहे आणि मी तर 
फक्त त्यापासून स्पष्टरित्या सावध करणारा आहे.' 
27  पण जेव्हा ते वचन पूर्ण होण्यासाठी जवळ 
येत असल्याचे पाहतील, तेव्हा सत्य नाकारणाऱ्या लोकांचे चेहरे (दहशतीने) अगदी खिन्न 
होऊन जातील. आणि (तेव्हा) त्यांना 
सांगितले जाईल, ' हीच ती गोष्ट आहे, जिची (खिल्ली उडवत तिला आणण्याची) तुम्ही मागणी करीत असत.' 28 (पैगंबर !) त्यांना सांगा     '(या जगात) अल्लाह मला व माझ्याबरोबर 
असलेल्या लोकांना नष्ट करेल
 किंवा आमच्यावर दया करेल. पण (यानंतरच्या जगात) सत्य नाकारणाऱ्यांना त्या (कायमस्वरूपी) दुःखदायी  शिक्षेपासून कोण 
वाचवू शकतो? याविषयी तुम्ही कधी विचार 
केलात का ?' 29 त्यांना सांगा, ' तो कृपावंत अल्लाह आहे, आम्ही त्याच्यावरच 
श्रद्धा ठेवतो व त्याच्यावरच भरवसा ठेवतो. आणि 
तुम्हाला लवकरच कळून चुकेल की , कोण 
उघडउघड वाट चुकलेला आहे.' 30 ( सत्य नाकारणाऱ्यांना) सांगा, ' तुम्ही यावर कधी विचार केला आहात का की, जर तुमचे सर्व पाण्याचे साठे जमिनीत अचानक 
लुप्त झाले तर (अल्लाहशिवाय दुसरा) कोण आहे, जो 
तुमच्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करू  शकतो ?'

-----------------------------------------------------------------

चॅप्टर 109 अल काफ़िरून 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 सांगा, ' हे सत्य नाकारणाऱ्या लोकांनो ! 2 मी त्यांची उपासना करीत नाही, ज्यांची उपासना तुम्ही करता. 3  तसेच तुम्ही त्याची उपासना करीत नाही, ज्याची उपासना मी करतो. 4 मी त्यांची कदापि उपासना कदापि करू शकत नाही, ज्यांची उपासना करू शकत नाही, ज्यांची उपासना तुम्ही करता. 5 तसेच ना तुम्ही त्याची उपासना कधी कराल, ज्याची उपासना मी करतो. 6 तुमचा धर्म तुम्हाला लखलाभ आणि माझा धर्म मला.' [ कुराण 109 : 1 - 6 ]
-----------------------------------------------------------------

चॅप्टर 112 अल इखलास 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू  व कृपाळू आहे.
1 ( पैगंबर ! हे लोक अल्लाहविषयीं विचारतात ), तुम्ही त्यांना सांगा, 'अल्लाह एकच  आहे, 2 तो आत्मनिर्भर ( व स्वयंपूर्ण ) आहे. 3 ना तो कोणाला ( अपत्यरूपी )जन्म देतो. ना तो कोणापासून जन्माला आलेला आहे ( असा आहे अल्लाह ).4  आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही.' [कुराण 112 :1 -4 ]
-----------------------------------------------------------------

चॅप्टर ११३ अल फ़लक 

*आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 ( पैगंबर !) सांगा, 'सकाळ निर्माण करणाऱ्या पालनकर्त्याचे मी शरण प्राप्त करू इच्छितो. 2 त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या अपायापासून ( स्वतःला वाचविण्यासाठी ).3  आणि रात्रीच्या अपायापासून , जेव्हा ती सर्वत्र (अंधार ) पसरवते. 4 तसेच त्यांच्या अपायापासून जे काही गूढ प्रयास करून फुंकर मारतात. 5 तसेच मत्सर बाळगणारा जेव्हा मत्सर बाळगतो, त्याच्या अपायापासून वाचवण्यासाठी ( त्याचे शरण अवश्य आहे).' [कुराण 113 : 1 -5 ]
-----------------------------------------------------------------


चॅप्टर 114 अन नास 

* आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.
1 (पैगंबर!) सांगा, 'मी लोंकाच्या पालनकर्त्याचे शरण प्राप्त करू इच्छितो, 2 जो लोकांचा सर्वाधिपती 3 (व) लोकांचा ईश्वर आहे, 4 जो लपून बहकाविण्याचे काम करतो अशा (सैतानाच्या) अपायापासून  (स्वतःला वाचविण्यासाठी मला त्याचे शरण हवे आहे.) 5 जो लोकांच्या मनात वाईट विचार भरतो, 6 मग तो जिन्नांपैकी असो वा  मनुष्यांपैकी.'  [कुराण 114 : 1 -6 ]
----------------------------------------------------------------


कुरआन

2 हा अल्लाहचा ग्रंथ आहे, यात मुळीच शंका नाही. मार्गदर्शन आहे अल्लाहची जाण  असणाऱ्यांसाठी. 3 जे श्रध्दा ठेवतात (मानवी आकलनापलीकडील) अदृश्यावर, आणि अढळपणे प्रार्थना करीत असतात, आणि जे काही आम्ही त्यांना दिले आहे, त्यातून (इतरांवर ) खर्च करीत असतात. 4 आणि  (पैगंबर!) जो ग्रंथ तुम्हाला प्रदान करण्यात आला व जे ग्रंथ तु मच्यापूर्वी ((इतर पैगंबरांना ) प्रदान करण्यात आले, सर्वांवर दृढ विश्वास ठेवतात आणि मरणोत्तर जीवनावरही आढळ श्रद्धा ठेवतात.5  हे लोक आपल्या प्लांकर्त्याने दाखवलेल्या सरळ मार्गावर आहे. हेच लोक यशस्वी होणार आहेत.[कुराण 2 :2 -5 ]

-------------------------------------------------

75 तर मी ताऱ्यांच्या स्थानांची शपथ घेऊन सांगतो. 76 जर तुम्ही चिंतन कराल तर ( कळून येईल ) ही खरोखर फारच मोठी शपथ आहे. 77 यात शंकाच नाही की , हे कुराण फार थोर ( असा ग्रंथ )आहे. 78 एका सुरक्षित ग्रंथात जतन करून ठेवलेला आहे. 79 त्यास तेच स्पर्श करतात. जे ( मनाने पवित्र) आहेत. 80 प्रकट करण्यात आलेला आहे सर्व जगांच्या मालकाकडून.     [कुराण 56 : 75 -79 ]

---------------------------------------------------

4 (पण ) पूर्वीच्या ग्रंथधारकांकडे स्पष्ट प्रमाण येऊन पोचल्यानंतरच त्यांच्यात फाटाफूट झाली.[कुराण 98:4 ]

-------------------------------------------------

23  अल्लाहने सर्वोत्तम संदेशग्रन्थ प्रकट केलेला आहे, ज्यातील संदेशवचने एकमेकास  (मिळतीजुळती व ) पूरक आहेत आणि पुन्हा-पुन्हा आलेली आहे. ( हे ऐकून किंवा वाचून ) त्या लोकांच्या अंगावर शहारे उभे राहतात, जे आपल्या पालनकर्त्याची जाण बाळगून आहे. मग त्यांचे तन व मन मृदू होऊन, अल्लाहच्या स्मरणासाठी प्रवृत्त होतात. हे कुराण अल्लाहचे मार्गदर्शन आहे. याद्वारे तो इच्छितो त्यास मार्गदर्शन प्रदान करतो ( अर्थातच सत्याचा शोधकाला ) आणि ज्याला अल्लाह मार्गभ्रष्ट करतो, त्यास कोणीही मार्गदर्शन करू शकत नाही. [कुराण 39 :23 ] 

----------------------------------------------

1 हा. मीम . 2  या सुबोध अशा ग्रंथाची शपथ. 3 आम्ही या (ग्रंथास) अरबी भाषेत (प्रकट केले आहे), म्हणजे तुम्हा लोकांना ( त्यातील संदेश ) ग्रहण करता यावे.

4 आणि या ( कुराणाचा ) मूळ स्रोत आमच्याकडे असलेल्या महाग्रंथात आहे. खरोखर हे उदात्त व ज्ञानाने परिपूर्ण आहे.          [कुराण 43 : 2 -4 ]

------------------------------------------------------

89 आम्ही या कुराणात लोकांसाठी, सर्व प्रकारची उदाहरणे विविध प्रकारे प्रस्तुत केलेली आहेत. तरीसुद्धा बहुसंख्य लोकांनी सत्य नाकारण्याचीच भूमिका आग्रहपूर्वक स्वीकारलेली आहे.
[कुराण 17 : 89]

-----------------------------------------------------

 

08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...