रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

शबे कद्र

 chapter 97 अल-कद्र


* आरंभ अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे.

1 आम्ही या (कुराणाच्या ) प्रकटीकरणाची (सुरुवात) भाग्य निश्चित करण्याच्या रात्री केलेली आहे. 2 तुम्हाला काय माहीत, त्या रात्रीचे महत्त्व काय आहे ? 3 ती (एक) रात्र हजार महिन्यापेक्षा अधिक उत्तम आहे. 4  त्या रात्री (असंख्य) स्वर्गदूत व (प्रमुख स्वर्गदूतांपैकी एक असलेला जिब्राइल हा) स्वर्गदूत आपल्या पालनकर्त्याच्या परवानगीने प्रत्येक गोष्टीसंबंधाने त्याचे आदेश घेऊन (पृध्वीवर) उतरतात. 5 पहाट होईपर्यंत ती रात्र शांतता (व  सुरक्षिततेची) रात्र आहे.        [कुराण 97 : 1 -5 ]

शबे कद्र ची रात्र रमजान महिन्याच्या 21 ,23 ,25 ,27 ,29 या रात्री शोधली जाते. या रात्रीत जास्तीत जास्त प्रार्थना करतात.आणि क्षमा मागतात.आणि नरकाच्या आगीपासून संरक्षण मागतात.

मुख्य रात्र 27 रमजानची  "शबे कद्र" ची रात्र आहे, असे समजतात. पण ती वरील पाच पैकी कोणतीही रात्र असू शकते. रात्रभर कुराण वाचतात आणि दुआ ( प्रार्थना ) करतात आणि पहिला कलमा वारंवार म्हणतात, " ला इलाह इल्लल्लाह मोहम्मदूर रसूलल्लाह ".अशी अल्लाहची उपासना, या रात्रीत करतात. दुआ ( प्रार्थना ) स्वतःच्या भाषेत मागू शकता. अरबी त दुआ वाचन करून अल्लाहशी क्षमा मागत असल्याची भावना आणि जाणीव ठेवतात. 

या शबे कद्र रात्रीत मागवायची प्रार्थना -

"अल्लाहुम्मा इन्नक अफूवून तुहिब्बुल अफवा फअफु अन्नी या गफुरु या गफुरु या गफुरु "

  

कुरआन च्या बोधकथा..4 मूसा अ.

याकूब (Jacob,इस्राइल) अ., युसुफ अ. आणि युसुफ अ. यांचे अकरा भाऊ इजिप्त(मिस्र) मध्ये स्थायिक झाले...आणि फक्त एक अल्लाहची (पालनकर्त्याची) निष्ठा करण्याची शिकवण देत राहिले...त्यांना "बनी इसराइल" म्हणजेच इस्राइलची संतान म्हंटले जात होते..


इजिप्शियन एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते...त्यामुळे ते, बनी इस्राइलला पसंत करत नव्हते....कारण बनी इस्राइल फक्त एक आणि एक अल्लाह (ईश्वर) ची उपासना करत होते...

इजिप्शियन बनी इस्राइल वर, अन्याय करत होते...त्यांच्याशी वाईट वागत होते...इजिप्शियन खूप शक्तिशाली होते...त्यामुळे गरीब, अत्याचार सहन करणारे, बनी इस्राइल यांना, त्यांच्या क्रूरतेपासून आणि निर्दयतेपासून, खूप कमी संरक्षण मिळायचे...ते त्यांचा आवाज उठवू शकत नव्हते...

त्या काळी, इजिप्तच्या राजाला, फिरौंन (फैरों, Pharo) म्हंटले जायचे...

इजिप्शियन लोकांना ज्योतिष विद्येत, जादू आणि भविष्य कथन यामध्ये खूप विश्वास होता...

एका भविष्य कथन करणाऱ्याने (ज्योतिषी) फिरौंनला सांगितले की एक मुलगा, बनी इस्राइलच्या जमातीत जन्म घेईल, जो त्याचे राज्य कोसळण्यास कारण होईल...

फिरौंन यावर खूप नाराज झाला आणि त्याने आज्ञा दिली की, बनी इस्राइलच्या कोणत्याही कुटुंबात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला जन्मताच मारून टाकावे...

याच काळात, एक मुलगा, बनी इस्राईल मध्ये जन्माला आले...त्याची आई खूप घाबरली...तिने त्या बाळाचा जन्म गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण जर राजाच्या कोणत्याही सैनिकांनी त्या बाळाला  शोधले, तर ते लगेच त्याला मारून टाकतील, असे तिला वाटले.

तिने अल्लाह (ईश्वर) कडे प्रार्थना केली आणि अल्लाहने तिला मार्गदर्शन केले की, "एका लाकडाच्या पेटीत त्या बाळाला ठेव आणि ती पेटी नाईल नदीत सोड..." 

तिने अल्लाहवर विश्वास ठेऊन ती आज्ञा पाळली...आणि अल्लाहने तिला वचन दिले की, "तिचा मुलगा सुरक्षित राहील आणि ती पुन्हा लवकरच त्याच्या जवळ जाईल..."

तिने बाळाला एका लाकडाच्या पेटीत ठेवले आणि नदीच्या पाण्यावर तरंगू दिले आणि  तिच्या मोठ्या मुलीला, मरियमला सांगितले की, त्या पेटीकडे नजर ठेव...

ती पेटी राजवाड्याच्या दिशेने वाहत चालली होती आणि मरियम पेटीच्या मागे मागे नदीच्या काठावरून जात होती...जेव्हा पेटी राजवाड्याच्या जवळून जात होती, काही दरबारातील महिलांनी पाहिले की, एक छान आणि गोंडस बाळ, त्याचा अंगठा चोकत आरामात पेटीत खेळत आहे... त्यांनी ते बाळ राणीकडे आणले, जी फिरौंनची पत्नी होती...आसिया...

आसिया त्या बाळाला पाहून खूप आनंदी झाली, कारण तिला स्वतःचे मूल नव्हते...तिने, त्या बाळाला  दत्तक घेण्यासाठी, तिच्या पतीची परवानगी मागितली...पण तिच्या पतीला ही कल्पना आवडली नाही..."हे मूल मला इजा करू शकते, जसे ज्योतिषाने भविष्य कथन केले आहे..." त्याने नकारार्थी उत्तर दिले...

पण आसियाने याचना केली, "या मुलाला मारू नका...तो आपल्यासाठी चांगला ही असू शकेल..."

अनिच्छेने तो मानला...

हे ठरवले गेले की, ते बाळ राजवाड्यात मोठे होईल आणि एक महिला त्याची काळजी घेण्यासाठी आणि त्याला दूध पाजण्यासाठी नियुक्त केली जाईल..जी महिला त्या बाळाला दूध देण्यासाठी नियुक्त केली गेली, बाळाने तिच्याकडून दूध घेतले नाही..आणि रडणे चालूच ठेवले...

मग मरियम (जी बाळाची बहीण होती, पण हे कुणालाही माहीत नव्हते..) पुढे आली आणि म्हणाली, मी तुम्हाला एका महिलेविषयी सांगू शकते, जी खूप चांगली आहे आणि या बाळाला दूध पाजू शकते...

मरियमला, त्या महिलेला बोलावण्यास सांगण्यात आले...ती घरी आली आणि तिच्या आईला तिथे वापस घेऊन गेली...त्या बाळाने लगेच, त्याच्या आईच्या हातात गेल्यावर, रडणे थांबवले...आणि दूध पिणे सुरू केले...

प्रत्येक जण आनंदी झाला...आणि त्या आईला, त्या लहान बाळाची देखभाल करण्याचे आणि दूध पाजण्याचे काम देण्यात आले...(जो की तिचाच मुलगा होता...). 

या बाळाचे नाव होते, मूसा अ.(मोशे, Moses)

मूसा अ. एका राजकुमारासारखे, फिरौंनच्या राजवाड्यात मोठे झाले...ते एक बलवान, सद्गुणी आणि योग्य तरुण बनले...पण ते, जे अवतीभोवती पाहत होते, ते त्यांना आवडत नव्हते...

नेहमी, ते शहरात, त्यांच्या लोकांना भेटायला जायचे आणि पहायचे की, इजिप्तचे लोक, गरीब लोकांशी निर्दयतेने आणि क्रूरपणाने वागायचे. मूसा अ., इजिप्त च्या लोकांच्या, अन्यायाने शिकार झालेल्या लोकांना मदत करायचे...त्यांना क्रूरता आवडायची नाही..त्यांना खूप राग यायचा, जो त्यांना सहन होत नव्हता...

एक दिवस, एका बलवान इजिप्तच्या माणसाने, एका गरीब व्यक्तीला खूप मारले...त्या गरीब व्यक्तीने मदतीसाठी मूसा अ. यांना बोलावले... मूसा अ. खूप रागावले आणि इजिप्तच्या माणसाला त्यांनी, जोऱ्याने मारले...इतक्या जोऱ्यात मारले की, तो माणूस खाली पडला आणि मृत झाला...

आता मूसा अ., जे अनपेक्षितपणे घडले, त्यामुळे घाबरले आणि हताश झाले...त्यांना त्या माणसाचा जीव घ्यायचा नव्हता...असे यामुळे झाले, कारण अन्याय पाहून, त्यांचा राग अनावर झाला...त्यांनी अल्लाहची क्षमायाचना केली...

जेव्हा इजिप्तच्या लोकांना कळले की, मूसा अ. यांनी एका माणसाला मारले आहे, फिरौंनच्या लोकांनी त्यांचा शोध सुरू केला..आणि म्हणून, मूसा अ. यांना इजिप्त सोडावे लागले...

ते एका "मदयन" नावाच्या जागी गेले...

जेव्हा ते तेथे आले, त्यांनी एका विहिरीभोवती खूप लोकं पहिली...ते त्या विहिरीतून पानी काढत होते..आणि त्यांच्या बकऱ्यांना आणि मेंढ्यांना देत होते...

त्या गर्दीपासून, थोड्याच अंतरावर दोन तरुण मुली त्यांच्या  मेंढ्यासोबत उभ्या होत्या आणि शांततेने, त्यांची पाळी संपण्याची वाट पाहत होत्या..ज्यामुळे त्यांची, पाणी काढण्याची पाळी येईल....

"तुम्ही पण तुमच्या हिश्श्याचे पाणी का नाही घेत?" मूसा अ. यांनी विचारले...

"कारण आम्ही इतके धैर्यवान नाही, आम्हाला त्यांचे होईपर्यंत वाट पाहावी लागेल...आमचे पिता, इथे स्वतःहून येण्यासाठी, खूप वृद्ध आणि अशक्त आहेत...त्यामुळे आम्हाला वाट पाहावी लागेल", त्या म्हणाल्या...

एक शक्तिशाली आणि सभ्य तरुण असल्याने आणि ज्यांना न्याय देण्याची खूप चांगली बुध्दी असल्याने, मूसा अ. पुढे झाले, आणि त्यांच्यासाठी पाणी काढले आणि त्यांच्या  मेंढ्यांना दिले....

जेव्हा मुली घरी गेल्या, त्यांनी त्यांच्या पित्याला सांगितले की, कसे एका दयाळू तरुण माणसाने त्यांना मदत केली...त्यांचे पिता एक पवित्र  व्यक्ती होते...एक संदेशवाहक होते..."शोएब अ. "

ते त्यांच्या मुलींना म्हणाले की, "वापस जा आणि त्या तरुणाला घेऊन या..."

जेव्हा दोघींमधील एक मुलगी मूसा अ. यांना बोलावण्यासाठी वापस गेली, ते एका झाडाखाली झोपले होते...थकलेले आणि भुकेले होते..आणि अल्लाहला प्रार्थना करत होते की, मदत कर...

ती त्यांच्याकडे आली आणि म्हणाली की, तिचे पिता, त्यांना भेटण्यासाठी इच्छुक आहेत...

म्हणून मूसा अ. उठले आणि तिच्यासोबत तिच्या घरी गेले...

शोएब अ. यांनी त्यांना छान जेवण दिले आणि मग विचारले की, ते कोण आहे... मूसा अ. यांनी, त्यांना फिरौंन आणि त्यांच्या गरीब लोकांच्या, बनी इस्राईलवरच्या अन्यायाची कहाणी सांगितली...आणि त्यांची स्वतःच्या सुटकेची कहाणी सांगितली..

त्या वृद्ध संदेशवाहकाने त्यांना म्हंटले की, त्यांना काही काळजी करण्याचे कारण नाही..कारण आता ते, एका सुरक्षित जागी, मित्रांत आले आहे...

दोघींपैकी एका मुलीने, तिच्या पित्याला मूसा अ. यांना, एका मेंढपाळाच्या कामावर ठेवण्यास सांगितले .. मेंढ्यांची देखभाल करण्यासाठी कारण ते बलवान, सद्गुणी आणि प्रामाणिक व्यक्ती होते...

त्यांचे पिता मूसा अ. यांना म्हणाले, "जर तुम्ही आमच्यासोबत राहिले आणि आठ ते दहा वर्ष आमच्या मेंढ्याची देखभाल केली, तर मी माझ्या मुलीशी तुमचे लग्न करून देईन..."

मूसा अ. तेथे राहण्यास आणि त्यांच्यासाठी काम करण्यास तयार झाले... तेवढ्या वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर, त्यांनी लग्न करण्याची परवानगी मागितली आणि त्यांच्या पत्नीसोबत, त्यांच्या मेंढ्याच्या कळपाला घेऊन, मदयन सोडले...

इजिप्तला जातांना, मूसा अ. यांनी, एका टेकडीवर एक प्रकाश पहिला...त्यांनी त्यांच्या पत्नीला जोपर्यंत ते तेथून (टेकडीवरून), काही आग घेऊन येत नाही, तोपर्यंत वाट पाहण्यास सांगितले...त्यांनी असाही विचार केला की कोणी, जो त्याला रस्ता दाखवण्यास पात्र आहे, तेथे असेन...

त्यामुळ ते आगीकडे गेले...पण तो काही साधारण प्रकाश नव्हता...तो अल्लाह (ईश्वर) चा प्रकाश होता...

जसे मूसा अ. जवळ गेले, तो प्रकाश दूर आणि आणखी दूर गेला...ते घाबरले आणि तेथून वापस येण्यासाठी फिरले...पण एका आवाजाने त्यांना थांबवले..., "ओ, मूसा..मी तुझा अल्लाह (ईश्वर) आहे...तुझी पादत्राणे काढ...तू एका पवित्र " तोवा"च्या दरीत उभा आहे...मी तुला माझा संदेशवाहक म्हणून निवडले आहे...त्यामुळे तुला जे सांगितले जाईल, नीट काळजीपूर्वक ऐक..."

अशाप्रकारे अल्लाह मूसा अ. यांच्याशी बोलले आणि त्यांना संदेशवाहक बनविले...

मूसा अ. गोंधळलेले होते...अल्लाहने त्यांना विचारले की, "तुझ्या हातात काय आहे?..

"ती माझी काठी आहे", मूसा अ. यांनी उत्तर दिले....

"खाली टाक", आज्ञा आली...

मूसा अ. यांनी आज्ञा पाळली आणि त्यांना आश्चर्य वाटले, ती काठी एक भयंकर साप बनली...

"आता ती काठी उचल आणि घाबरु नको", आज्ञा आली आणि तो साप पुन्हा काठी बनला...

मग मूसा अ. यांना आज्ञा देण्यात आली की, "तुझा हात, तुझ्या भुजेच्या खाली (बगलेत) घेऊन जा...आणि बाहेर काढ...

त्यांच्या हातावरचे, जळल्याचे डाग होतेे, तेे जावून, तो हात चमकू लागला...(मूसा अ. जेव्हा बालक होते, तेव्हा त्यांचा हात पोळला होता...)

हे दोन चमत्कार ( miracles, मोजजे) मूसा अ. यांना देऊन,अल्लाहने आज्ञा केली की, "इजिप्तला वापस जा आणि त्यांच्या 
खऱ्या एक अल्लाह ( ईश्वर) च्या
धर्माचा संदेश, फिरौंनला आणि त्यांच्या तेथील लोकांना दे."

पण मूसा अ. यांना भीती 
वाटत होती की, ते 
इजिप्त  चे लोक त्यांना मारून
टाकतील. कारण त्यांनी, त्यांच्यामधल्या एका इजिप्शियनला मारले होते...अल्लाहने त्यांना आश्वासनं दिले की, ते तसे करणार नाही...

मूसा अ. यांना, शब्द बोलतांना, थोडी अडचण येत होती...ते थोडे अडकून बोलायचे...म्हणून ते अल्लाहला म्हणाले की, त्यांच्या भावाला, हारून अ. यांना सुध्दा, एक संदेशवाहक बनव, त्यामुळे हारून अ., मूसा अ. यांना मदत करतील...

"हे ओझे सहन करण्यासाठी, माझ्या मनाला (हृदयाला) धैर्य दे आणि माझे बोलणे स्पष्ट आणि प्रभावात्मक होऊ दे...जे लोक ऐकतील त्यांच्यासाठी.." मूसा अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली...

अल्लाहने त्यांना, त्यांनी जे मागितले सगळे दिले...आणि दोघा भावांना, अल्लाहचा संदेश घेऊन इजिप्तच्या दरबारात जाण्याची आज्ञा केली...

"तुमचा संदेश देतांना दयाळू रहा, कठोर राहू नका"...त्यांना सांगण्यात आले...

अल्लाहच्या मदतीने मूसा अ. बळकट झाले आणि त्यांच्या संदेशवाहक भावासोबत, हारून अ. यांच्यासोबत ते, इजिप्तच्या दरबारात जावून अल्लाहचा संदेश 
सांगण्यासाठी निघाले...

जेव्हा मूसा अ. आणि हारून अ. , 
फक्त एक अल्लाह (ईश्वर) ची श्रद्धा बाळगून, त्याच्यासमोर झुका, हा संदेश, उपदेश, फिरौंन आणि त्याच्या 
लोकांना देण्यासाठी इजिप्त मध्ये आले, 
तेव्हा त्यांना दिसले की, बनी इस्राईल ची जमात, दयनीय अवस्थेत जगत आहेत...
त्यांना  कठोर गुलामी करण्यासाठी 
जबरदस्ती केली जात आहे...

मूसा अ. आणि हारून अ. फिरौंनच्या दरबारात गेले आणि त्यांनी घोषणा केली की, ते त्यांच्या लोकांना, म्हणजे बनी इस्राईलला, इजिप्त पासून दूर घेऊन जाण्यासाठी आले आहेत...त्यांच्या बापदादाच्या धरतीवर....
[जेथून याकूब अ. इजिप्त मध्ये आले होते,आणि जेथे इब्राहीम अ. आणि इसाक अ. यांनी जीवन व्यतीत केले होते..](ही सत्यकथा या पेज च्या आधीच्या भागांत लिहिली आहे..)

फिरौंनने लोकांना घेऊन जाण्यास नकार दिला आणि , म्हणाला, "मूसा, तू माझ्या राजवाड्यात माझ्या मुलासारखा मोठा झाला आहेस? आणि आता तू उपकार विसरून कृतघ्न बनला आहेस...?"

मूसा अ. यांनी उत्तर दिले , "माझ्या अल्लाहने मला मार्गदर्शन केले आहे आणि मला एक संदेशवाहक बनविले आहे...तुम्ही मला लहानाचे मोठे केले, या अशा एक मोठ्या उपकारामुळे, मी माझ्या सर्व लोकांना दुःख सहन करायला लावू का ?

फिरौंनने मूसा अ. यांचे काही ऐकले नाही आणि त्यांच्या संदेशावर वर खूप नाराज झाला, कारण तो स्वतःला अल्लाह (प्रभू) समजत होता...

"तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे, मूसा? कोण आहे तुझा अल्लाह (यहोवा)?" त्याने विचारले...

"माझा अल्लाह हा, तो आहे ...ज्याने हे विश्व बनविले...त्याला भूतकाळाविषयी पूर्ण ज्ञान आहे...त्याने ही धरती, तुझ्या चालण्यासाठी बनविली आणि तोच पाऊस खाली पाठवतो.." मूसा अ. उत्तरले...

"हा हा...", फिरौंन हसला..." , मला माहीत आहे की, माझ्याशिवाय कोणीच प्रभू नाही..." मग तो त्याच्या मंत्र्यांकडे वळला आणि म्हणाला, "हमाम, खूप उंच इमारत बनली का? जेणेकरून मी त्याच्या शिखरावर चढू शकेल आणि मूसाच्या अल्लाहला भेटेन..., नक्कीच तो खोटे बोलत आहे..."

पण मनातून फिरौंनला खात्री नव्हती...त्याने मूसा अ. यांना घाबरविण्याचा प्रयत्न केला.
"मी तुला तुरुंगात टाकेल, मूसा, जर तू म्हणाला की, माझ्याशिवाय दुसरा कोणी प्रभू आहे"..तो म्हणाला. "जर तू बरोबर आहे, तर तू मला काही स्पष्ट निशान्या, तुझे म्हणणे सिध्द करण्यासाठी दाखविल्या पाहिजेत... "

मूसा अ. तयार झाले...अल्लाहने त्यांना, दोन चमत्कार (Miracles, मोजजे)
दाखविण्याच्या शक्ती सोबत आशीर्वाद दिला होता.
त्यांनी त्यांची काठी खाली फेकली आणि ती एका सापात बदलली...मग त्यांनी त्यांचा हाथ त्याच्या काखेत नेला आणि बाहेर काढला...तो प्रखरतेने चमकू लागला...यावर दरबारातील लोक म्हणाले, "हा माणूस नक्कीच जादूगार आहे.." 

फिरौंनने इजिप्तच्या सगळ्या हुशार जादूगारांना, त्यांची जादू मूसा अ. यांना दाखविण्यासाठी बोलावले...

एक दिवस आणि वेळ स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आली आणि  हे मान्य करण्यात आले की, जो स्पर्धेत जिंकेल, तो खरा योग्य आहे, असे मानण्यात येईल...त्या काळी जादूचे खेळ इजिप्त मध्ये खूप प्रसिद्ध होते...त्यामुळे सर्व शहरातून लोक ते पाहण्यासाठी आले...

मूसा अ. यांनी स्पर्धा ठेवण्याबद्दल, फिरौंनचे मन बदलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, "आम्ही जादूगार नाही, आम्ही अल्लाहचे  संदेशवाहक आहोत. अल्लाहवर शंका करू नको..तो तुझा नाश करू शकतो..."

पण फिरौंनने निश्चय केला होता की, स्पर्धा ठेवायची...कारण तो त्याच्या जादूगारांवर अगदीं खात्री बाळगून होता...

शेवटी मूसा अ. मानले...," ठीक आहे, यामुळे प्रत्येकासमोर सत्य काय आहे ते सिद्ध होईल..."

जादूगारांनी फिरौंनला विचारले, "जर आम्ही जिंकलो तर तुम्ही पारितोषिक देणार का?"

"नक्कीच", फिरौंन उत्तरला..."मी तुम्हाला उच्च पद ही देईन".

"कोण सुरू करनार?" जादूगारांनी विचारले.."तू का आम्ही ?"

"तुम्ही" मूसा अ. यांनी उत्तर दिले...

जादूगारांनी त्यांच्या सळया आणि काठ्या खाली फेकल्या, ज्या सापांमध्ये बदलल्या...काही क्षणासाठी मूसा अ. यांना चिंता वाटली की, ह्यामुळे ती गर्दी प्रभावित झाली असेल...

पण अल्लाहने त्याला धीर दिला, "काळजी करू नको, मूसा, तू जिंकशील...तुझी काठी फेक"

मूसा अ. यांनी तसे केले...आणि त्यांची काठी एक मोठा सर्प बनून, त्या सापाने त्याच्या आजूबाजूचे सर्व साप गिळून टाकले...प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला...ह्याने जादूगारांचा पराजय सिद्ध  झाला.. आणि सत्याचा विजय झाला...ह्याने हेही सिद्ध झाले, की मूसा अ. आणि हारून अ. हे अल्लाहचे खरे संदेशवाहक होते...

जेव्हा जादूगारांना ह्याची जाणीव झाली, ते सगळे गुडघ्यावर पडून वाकून नमन करू लागले...आणि म्हणाले, " आम्ही मूसाच्या अल्लाहवर विश्वास करतो. जो खरोखर विश्वाचा निर्माता आहे......

फिरौंन यावर संतापला होता आणि ओरडला, "जर तुमचे धैर्य असेल तर तसे करा. मी तुमचा डावा हाथ आणि उजवा पाय कापून टाकेन आणि तुम्हाला झाडांना अडकवेल.."

"तुला जे आनंद देईल ते तू कर," जादूगारांनी उत्तर दिले...,"पण आता आम्ही सत्य निष्ठा स्वीकार केली आहे...आमचा अल्लाह,
(ईश्वर)आमच्या भूतकाळातील जादू दाखविण्याच्या पापासाठी आम्हाला क्षमा करो, जे तू आमच्याकडून जबरदस्तीने करून घेतले...."

थोड्या संख्येनेे, तरुण व्यक्ती, जेव्हा त्यांनी हे घडलेले पाहिले, मूसा अ. यांच्या धर्माचे अनुयायी बनले...पण ते, त्यांची श्रद्धा उघडपणे जाहीर करण्यास, फिरौंनच्या भीतीमुळे घाबरत होते...

मूसा अ. इजिप्त मध्ये लोकांना उपदेश देत होते...इजिप्त मध्ये एक खूप श्रीमंत माणूस राहत होता "कारून". त्याचा खजिना अगणित होता...त्याने शक्तिशाली माणसे त्याच्या खजिन्याच्या चाव्या सांभाळण्यासाठी ठेवली होती...ते त्या चाव्यांच्या ओझ्याने पार थकून गेले होते...

मूसा अ. नेहमी रस्त्यात आणि शहराच्या चौकात उपदेश द्यायचे...ते त्यांच्या लोकांना आठवण करून द्यायचे की, फक्त एका आणि एकाच अल्लाहची (ईश्वराची) आराधना करा...आणि सांसारिक गोष्टींची काळजी करणे थांबवा...

एकदा त्याचवेळेस "कारून" तेथून जात होता...भव्य रुबाबदार अंगरखा घातलेला त्याचा पोषाख होता  आणि त्याच्या मागे त्याचे सेवक, जे त्याच्या खजिन्याच्या चाव्या सांभाळून होते...चालत होते...

त्याच्या संपत्तीचे आणि सामर्थ्याचे हे प्रदर्शन होते...यामुळे जे तरुण लोक मूसा अ. यांचे ऐकत होते, त्यांचे ध्यान विचलित झाले...

त्यांच्यातले काही, कारूनच्या अवाढव्य संपत्तीला, एक मत्सराने भरलेल्या नजरेने पाहण्यासाठी, अल्लाहच्या संदेशाचे शब्द सोडून, तिकडे वळले...त्यांनी, 
 जीवना नंतर, येणाऱ्या मृत्यू 
नंतरच्या स्वर्गाच्या सुखापेक्षा, अशा संपत्तीची, जी जास्त दिवस राहत नाही, इच्छा केली...

या कारूनच्या संपत्तीच्या आणि सामर्थ्याच्या प्रदर्शनाने मूसा अ. यांचे कार्य अजून कठीण केले... मूसा अ. यांनी कारूनला म्हंटले, "अल्लाहने तुझ्यावर कृपा केली आहे आणि तुला इतकी जास्त संपत्ती दिली आहे...तू गरीबांसाठी दयाळू होऊन, त्यांना दान केले पाहिजे..."

कारून निर्लज्जपणे फुशारकी मारत म्हणाला, "ही माझी संपत्ती आहे, जी मी माझ्या कौशल्याने आणि बुध्दीने मिळविली आहे...तुझ्या अल्लाहने मला दिली नाही...मी का या संपत्तीला दान देऊ? मी मूर्ख नाही, मूसा..."

मूसा अ. खूप नाराज झाले...पण ते काही करू शकत नव्हते...कारून त्याची संपत्ती गरिबांना आणि गरजूंना वाटू इच्छित नव्हता...तो स्वार्थी आणि हट्टी होता...आणि असे मानत होता की, त्याची संपत्ती त्याच्या कष्टांचे फळ आहे...आणि अल्लाहची कृपा नाही...

अल्लाह त्यांना देतो, जो त्याला आनंदी ठेवतो..(गरिबांना दान करून) आणि त्यांच्याकडून घेतो, जो त्याला नाराज करतो...लवकरच लोकांना कळाले की, स्वर्गाचा आणि धरतीचा भव्य खजिना कोण नियंत्रित करतो...

अल्लाहने कारूनला जे पुष्कळ दिले होते, ते त्याच्याकडून घेतले....फुशारकी मारणारा कारून जमिनीत त्याच्या खजिन्याच्यासोबत नष्ट झाला..धसला गेला... त्याचा पैसा त्याच्या किंवा कुणाच्याही, काही कामी आला नाही...

जेव्हा लोकांनी त्याचे भाग्य पाहिले, त्यांना जाणीव झाली की, मूसा अ. बरोबर होते आणि तो गर्विष्ठ आणि फुशारकी मारणारा नाश होणाऱ्यांमध्ये होता....

"फिरौंनला घाबरु नका", मूसा अ. 
त्यांच्या लोकांना म्हणाले,
 " अल्लाह वर निष्ठा ठेवा आणि त्याला मदत मागा..."

मूसा अ. त्यांच्या लोकांना इजिप्तपासून त्यांच्या बापदादांच्या (युसुफ अ. आणि याकूब अ.) जमिनीवर घेऊन जाण्यास इच्छुक होता...पण ते इजिप्शियनचे नोकर (गुलाम) होते, त्यामुळे जाऊ शकत नव्हते...

मूसा अ. यांनी त्याच्याकडून जितके होऊ शकते तितके त्यांना मदत केली आणि मार्ग दर्शन केले...

जेव्हा फिरौंनला मूसा अ. यांचा हेतू समजला, त्याने मूसा अ. यांना आणि बनी इस्राईलचे तरुण लोक, जे मूसा अ. यांच्या धर्माचे अनुयायी बनले होते, त्यांना मारण्याचा निर्णय घेतला...

पण त्याच्या दरबारातील एका दरबाऱ्याला ,जो गुप्तपणे  मूसा अ. यांच्या धर्माचा अनुयायी बनला होता, त्याने फिरौंनला तसे करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला.

"तुम्ही त्याला का मारू इच्छिता?" त्याने विचारले.."फक्त यासाठी का? की, तो असे मानतो की, तुम्ही त्याचे प्रभू नाही..."

मग तो धैर्याने बोलला आणि लोकांना त्या शिक्षेची आठवण करून दिली, जी, त्या लोकांवर येणार आहे, ज्यांनी पूर्वी खऱ्या प्रभूचे अस्तित्व नाकारले आहे...

या त्याच्याविरोधातल्या खुल्या बंडाने, फिरौंन खूप रागावला आणि त्याला सुद्धा, मारण्याची धमकी दिली...

जेव्हा फिरौंनच्या क्रौर्यतेने सगळ्या मर्यादा पार केल्या..,अल्लाह ने मूसा अ. आणि त्याच्या लोकांना आज्ञा केली की, रात्री शांततेने इजिप्त सोडून जा...त्यामुळे मूसा अ., हारून अ. आणि बनी इस्राईलचे लोक शांततेने "कानान" (आताचे पॅलेस्टाईन किंवा फिलिस्तिन) कडे निघाले...जी त्यांच्या बापदादांची जमीन होती...

इजिप्तपासून खूप दूरचा रस्ता होता आणि रस्त्यात नदी होती...(काही म्हणतात तो समुद्र होता).त्यांना दुसऱ्या काठावर जाण्यासाठी, ती नदी पार करायची होती...पण ते तसे करू शकण्याआधी, फिरौंनने शोधून काढले की, त्यांनी सुटका करून घेतली आहे...

तो मोठ्या सैन्यासह तो त्यांच्या मागे गेला...बनी इस्राईलचे लोक, भयंकर घाबरले आणि मूसा अ. कडे वळून म्हणाले, "आता, आपण पकडले गेलो..."

"नाही, कधीही नाही, "मूसा अ. यांनी उत्तर दिले.."अल्लाह (ईश्वर) आपल्या सोबत आहे. 
तो आपल्याला मार्ग दाखवेल..."

या अशा असहाय्यतेच्या वेळी, जेव्हा फिरौंनचे सैन्य मागे होते आणि खोल पाणी समोर होते, त्यांना अल्लाहशिवाय कोणीच मदत करू शकत नव्हते...आणि अल्लाहने मदत केली.

अल्लाहने मूसा अ. यांना आज्ञा केली की, "तुझ्या काठीने पाण्यावर वार कर...". त्यांनी तसे केले आणि लोकांना त्यामधून चालण्यासाठी, मध्ये कोरडा रस्ता बनून, पानी दोन्हींकडे विभागले (दोन भाग झाले..) बनी इस्राईलच्या लोकांनी नदी पार केली आणि सुरक्षितपणे दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचले...

जेव्हा फिरौंनच्या सैन्याने हे पाहिले, ते पाणी पार करण्यासाठी त्याच रस्त्यावरून धावले, जो एका चमत्काराने निर्माण झाला होता...पण जसे ते मध्यभागी पोहोचले, मोठ्या लहरींच्या रूपाने, पाणी वापस आले आणि पूर्ण सैन्य बुडाले....

फिरौंन मरताना ओरडला, "हो, मी विश्वास करतो, बनी इस्राईल ज्याची निष्ठा करतात, तो एकच अल्लाह  (यहोवा, ईश्वर) आहे...दुसरा कोणताही नाही..."

आणि अल्लाह म्हणाला, "तर तू शेवटी मला मानले."  पण, खूप उशीर झाला होता ...

(फिरौंनचे शरीर अजूनही तसेच आहे.... संग्रहालयात ठेवलेले आहे...ज्या पाण्यात तो बुडाला होता तो "रेड सी ( red sea)" आहे, असे मानतात...आणि तिथले पाणी हे खूप खारे असल्याने त्याचे शरीर तसेच राहीले..आणि अल्लाहने कुरआन
मध्ये हे सांगितले आहे की, येणाऱ्या पिढ्यांना ते शरीर पाहता यावे आणि त्याला दिलेली शिक्षेची आठवण व्हावी म्हणून ते शरीर तसेच ठेवण्यात येईल....)

नदी पार केल्यानंतर मूसा अ. आणि बनी इस्राइल चे लोक अशा निर्जन ठिकाणी पोहोचले, जेथे पाणी, झाडे आणि घरे नव्हती....

इस्राइलचे लोक नम्र आणि सौम्य झाले होते...शतकांपासून ते दाबून राहिले होते, त्यामुळे ते धैर्य आणि आत्मविश्वास गमावून बसले होते...

इजिप्त मधून सुटकेनंतर ते थकून गेले होते...ते भुकेले होते आणि घाबरलेले होते...आणि त्यांना मार्गदर्शन, मदत आणि आश्वासन पाहिजे होते...

मूसा अ. आणि हारून अ. यांच्यासाठी हे एक कठीण काम होते...

मूसा अ. आणि हारून अ. यांनी, त्यांना समजावून सांगितले की, जर ते अल्लाहची आज्ञा पाळत राहिले, तर अल्लाह (ईश्वर) निश्चितपणे त्यांची मदत करेल.. फिरौंनच्या हातून अपमानाच्या जीवनापेक्षा, एक 
स्वतंत्र जीवन आणि सत्य श्रद्धा ही कितीतरी चांगली आहे...

इतक्या दिवसापासून, जे लोक दाबून जीवन जगत होते, त्यांनी त्यांचा आत्मविश्वास आणि काही नवीन  करून दाखवायची इच्छा गमावली होती....

त्यांनी तक्रार करण्यास सुरुवात केली, "मूसा, तू आम्हाला कोठे आणले आहे? इथे पाणी नाही...आम्ही काय पिणार आहे? तहानेने आम्ही मरून जावू..."

मूसा अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली आणि अल्लाहने त्यांना म्हंटले की, "त्याची काठी, एका खडकावर मार...". मूसाने अ. यांनी तसे केले आणि बारा पाण्याचे झरे (प्रवाह), त्या कोरड्या खडकातून वाहू लागले...जेणेकरून तेथे प्रत्येकासाठी पुष्कळ पाणी झाले...

त्यांनी मूसा अ. यांच्याकडे वळून म्हंटले, "आता आम्हाला पाणी आहे, पण अन्नाविषयी काय? आम्ही भुकेले आहोत...आम्ही काय खाणार? पुन्हा मूसा अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली आणि अल्लाहने उत्तर दिले, "काळजी करू नको मूसा, तुम्हाला अन्नही मिळून जाईल".

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा लोक झोपेतून उठले, त्यांनी झुडूपांवर, काही मऊ आणि पांढरे पाहीले...हे "मन्न" होते...एक प्रकारचे अन्न ज्याचा आकाशातून थेंबासारखा पाऊस झाला होता...त्याची चव गोड होती...

दिवसा, जोऱ्याचा वारा आला आणि त्याच्यासोबत एक खूप मोठा क्वेलस् (लहान पक्षी) चा कळप उडत आला...आणि जमिनीवर सर्वीकडे बसला...लोकांनी त्यांना हातांनी पकडले आणि जेवणासाठी भाजले...हे "सलवा" होते....

त्या दिवसापासून बनी इस्राइलच्या लोकांना रोज मन्न आणि सलवा भेटू लागले...पण अल्लाहने त्यांना दुसऱ्या दिवसासाठी अन्न जमा करून ठेवण्यास मनाही केली...

अल्लाहने त्यांना अन्न आणि पाणी पुरविल्यावर, लोक पुन्हा मूसा अ. यांच्याकडे येऊन म्हणाले, "आम्हाला येथे घरे ही नाही आणि सावली ही नाही, मूसा...आम्ही उन्हाच्या उष्णतेने मरून जाऊ, असे आम्हाला वाटते...

मूसा अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली..अल्लाहने उन्हापासून त्यांच्या रक्षणासाठी भारी ढग पाठविले...

लवकरच त्यांचा त्रास कमी होईल, जेव्हा ते त्यांना वचन दिलेल्या, त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीवर पोहोचतील...आणि हे सर्व एका चांगल्या कारणासाठीच होते की, त्यांनी इजिप्त सोडले, हे  त्या लोकांना समजावणे मूसा अ. यांना कठीण होऊन बसले... मूसा अ. यांनी, अल्लाहच्या मदतीने त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण केल्या....

त्यांनी आपसांत वाद आणि भांडण
सुरू केले...

ते म्हणाले, " मूसा मन्न आणि सलवा पुरेसे नाही...आम्हाला कांदा, लसूण, डाळ,आणि हिरव्या भाज्या पाहिजेत...तुझ्या अल्लाहला हे देण्यास सांग"

त्यांच्या कृतघ्नते ने मूसा अ. नाराज झाले, "इतक्या चांगल्या अन्नाऐवजी तुम्हाला या सामान्य वस्तू पाहिजे का? बरं, मग तुम्ही एका शहरात जा आणि तेथे राहा, जेथे तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल..."

लवकरच ते एका शहरापासून जात असताना त्यांनी पाहिले की , लोक दगडाच्या पुतळ्याची आराधना करत होते....ते मूसा अ. यांना म्हणाले की, "मूसा, आमच्यासाठीही अशी प्रतिमा बनव".

मूसा अ. खूप नाराज झाले आणि त्यांना वीट आला. "अरेरे...", ते म्हणाले..., "तुम्ही खरेच अज्ञानी आहात...तुम्हाला अजूनही तुमच्यासाठी, एकाच आणि खऱ्या अल्लाह 
(ईश्वर) च्या  ऐवजी, पुतळे (प्रतिमा)  पाहीजे का?

बनी इस्राइलच्या लोकांनी आग्रह केला... खूप थोडे जे खरंच अल्लाहवर विश्वास करत होते, ते सोडून बाकी सर्व खरंच अज्ञानी आणि खूप कृतघ्न  होते....

अल्लाहने मूसा अ. यांना वचन दिले होते की, जेव्हा त्यांचे लोक इजिप्त सोडतील, त्यांना अल्लाह (ईश्वर) चा कायदा 
( commandmends) देण्यात येईल...
म्हणून इजिप्त सोडल्यानंतर मूसा अ. 
"तूर" या पर्वतावर प्रार्थनेसाठी गेले....त्यांनी त्यांच्या भावाला हारून अ. यांना, जेव्हा ते दूर असतील तेव्हा, त्यांच्या लोकांची काळजी घेण्यास सांगितले...

तेथे मूसा अ. यांनी अल्लाहला चाळीस दिवस पूर्ण भक्तीने प्रार्थना केली. "हे माझे प्रभु....माझ्यासमोर प्रकट हो, जेणेकरून मी तुला पाहू शकेन", त्यांनी प्रार्थना केली....

आणि अल्लाहने उत्तर दिले, "हे तुझ्यासाठी शक्य नाही, की तू मला प्रत्यक्षपने पाहू शकशील...पण जर तू आग्रह करत असशील तर, त्या टेकडीकडे पाहा....जर मला पाहण्यासाठी, तू ते सहन करू शकला, तर तू करू शकतो...". मूसा अ. यांनी  आग्रह केला...

आणि जेव्हा अल्लाह ( ईश्वर) ने त्याची तेजस्विता (प्रकाश,चमक) टेकडीवर
दाखविली, ती टेकडी विखरली आणि मूसा अ. बेशुद्ध होऊन खाली पडले...

जेव्हा ते शुध्दीवर आले, मूसा अ. म्हणाले, "तुझा गौरव असू दे, हे अल्लाह...मी क्षमेची याचना करतो आणि मी तो पहिला विश्वास करणारा आहे..."

अल्लाहने मूसा अ. यांना त्यांचा कायदा दिला आणि त्यांचा ग्रंथ दिला "तौरात 
(तोराह) आणि म्हणाला, 
"मूसा मी तुझ्याशी संभाषण केले...आणि तुला एक प्रेषित (संदेष्टा) म्हणून निवडले....म्हणून मी जे दिले आहे, ते घे आणि कृतज्ञ (आभारी) राहा..ते मजबुतीने पकड...आणि तुझ्या लोकांना त्या खऱ्या श्रद्धेचे अनुसरण करावयास सांग..."

जेव्हा मूसा अ. दूर, तूर डोंगरावर होते, त्यांच्या लोकांनी त्यांच्याविरुद्ध बंड केले...

तेथे त्यांच्यामध्ये एक जादूगार होता.. सामरी...

त्याने त्या लोकांकडून सोन्याचे अलंकार जमा केले आणि त्यांना वितळविले....ते पातळ सोने एका साच्यात ओतले आणि एक सोन्याचे बछडे बनविले. जे आवाज काढू शकत होते....मग त्याने लोकांना त्याची आराधना करण्यास सांगितले....

जेव्हा मूसा अ. तूर डोंगरावरून वापस आले आणि त्यांच्या लोकांना, एका सोन्याच्या बछड्याची आराधना करतांना पाहीले...ते उग्र झाले...त्यांनी त्यांच्या भावाला त्याची दाढी पकडून ओढले...आणि म्हणाले, "मी तुला सांगितले नव्हते का, की त्यांना मार्गदर्शन कर आणि माझ्या अनुपस्थितीत त्यांची काळजी घे? तू ते का केले नाही?"

हारून अ. म्हणाले, "भाऊ, या लोकांसमोर माझ्यावर रागावू नको...अल्लाहला माहीत आहे, की मी त्यांना म्हंटले होते की, ते जे करत आहेत, ते करू नका...जर मी त्यांच्याशी जास्त कठोर नव्हतो, तर ते केवळ या भीतीपायी की ,जेव्हा तू दूर असशील, तेव्हा ते आपसांत भांडतील....आणि तू  वापस आल्यावर माझ्यावर रागावशील..."

मूसा अ. त्यांच्या लोकांकडे वळले आणि म्हणाले, माझ्या लोकांनो, तुम्ही हे का केले? तुम्हाला अल्लाहने त्याच्या कृपेचे वचन दिले नव्हते का? मग का तुम्ही एवढ्या लवकर त्याला विसरला? तुम्हाला स्वतःला मारण्यासाठी, अल्लाहचा प्रकोप पाहीजे आहे का? कारण तुम्ही मला दिलेले तुमचे वचन तोडले...."

त्या सोन्याच्या बछड्याकडे इशारा करत ते म्हणाले, "आणि आता पाहा तुमच्या आराध्याकडे...आपण त्याला आगीत वितळवू आणि त्याचे अवशेष समुद्रात टाकू...एक आणि फक्त एक अल्लाहच्या शिवाय दुसरा कोणताही प्रभु नाही...माझ्या लोकांनो, तुम्ही, एक सोन्याचा बछडा तयार करून आणि त्याची आराधना करून, एक अपराध केला आहे... आता खऱ्या अल्लाहकडे वळा, आणि त्याची क्षमा याचना करा...आणि त्याला असे बलिदान द्या की, तो तुमच्यावर दया करो..."

मूसा अ. यांचे लोक आधी होतेे, तसेच हट्टी होते. त्यांनी, जोपर्यंत ते अल्लाहला त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही तोपर्यंत, अल्लाहवर विश्वास ठेवण्यास नकार दिला... मूसा अ. यांनी  सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला की, ते शक्य नाही, पण त्यांनी आग्रह धरला....

शेवटी, मूसा अ. यांनी, त्यांच्यामधील सत्तर लोकांना निवडले...आणि त्यांना स्वतःसोबत तूर डोंगरावर घेऊन गेले, जेथे त्यांनी अल्लाहशी संभाषण केले होते..पण हेही त्यांना पटवून देण्यात पुरेसे नव्हते...त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी अल्लाहला पाहण्याचा आग्रह धरला...

अल्लाह त्यांच्या हट्टीपणावर रागावला...भयानक वीज चमकली, मेघ गर्जना झाली आणि भूकंप आला...आणि सर्व सत्तर माणसे मृत होऊन खाली पडली...

जेव्हा मूसा अ. यांनी हे पाहीले, त्यांनी अल्लाहला पूर्ण प्रामाणिकतेने याचना केली की, त्यांच्या लोकांना, त्यांच्या अविश्वासाठी क्षमा कर, "हे माझ्या प्रभु, आमच्यावर दया कर...आम्हाला सर्वांना, काही लोकांच्या मूर्खतेमुळे, नष्ट करू नकोस."

अल्लाहने दया दाखविली आणि मृत लोकांना पुन्हा जीवन देऊन, वापस आणले....जेणेकरून ते कृतज्ञ बनतील...ते त्यांचे डोळे चोळत उठले आणि चमत्कार पाहून चकीत झाले...

अल्लाहने म्हंटले, "माझी कृपा त्यांच्यासाठी असेल जे योग्य करतील आणि दान देतील आणि त्यांच्यासाठी असेल जे प्रेषितांना  (संदेशवाहक) ज्यांचे नाव त्यांच्या ग्रंथात , इंजिल (बायबल) आणि तौरात (तोराह) आहे, अनुसरण करतील.....ते असे असतील, ज्यांची भरभराट होईल...

जेव्हा हे सत्तर लोक, त्यांच्या लोकांकडे वापस गेले, त्यांनी त्यांचा अनुभव वर्णन केला आणि म्हणाले, "मूसा खरंच अल्लाहचा एक  संदेशवाहक आहे..."

त्यांनी त्यांना जो वृत्तान्त सांगितला, त्यावर विश्वास करण्यासही सांगितले...पण ते लोक अजूनही शंका करत होते...आणि ऐकण्यासाठी इच्छुक नव्हते....

मूसा अ. यांनी अल्लाहला प्रार्थना केली आणि पुन्हा एकदा अल्लाहने, तूर डोंगर उचलून, त्या लोकांच्या डोक्यावर आणून, त्यांना चमत्कार दाखविला. जेव्हा त्यांनी पाहिले की, तो डोंगर त्यांच्यावर पडणारच आहे, ते घाबरले आणि ओरडले, "आम्ही विश्वास करतो की, मूसा हा अल्लाहचा संदेशवाहक आहे आणि हा तौरात 
(Torah) हा अल्लाह (ईश्वर) चा 
 प्रकट झालेला ग्रंथ आहे...

बनी इस्राइलचे लोक, एक खूप लांब प्रवास करून, "सिना" या ठिकाणी पोहोचले, जे ठिकाण, त्यांना ज्या त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीचे वचन दिले होती...त्याच्या जवळच होते...

मूसा अ. यांनी त्यांना म्हंटले की, "तुमच्या पूर्वजांच्या शहरात प्रवेश करण्यासाठी आणि तुमची गेलेली जमीन आणि संपत्ती मागण्यासाठी, स्वतःला तयार करा."

मूसा अ. म्हंटले, "धैर्याने, आणि अल्लाहवरच्या कणखर निष्ठेने, जमिनीत प्रवेश करा...जर असे कराल तर , विजय तुमचाच होईल."  त्यांनी असे आश्वासन दिले...

त्या लोकांनी शहरात प्रवेश करण्यास नकार दिला...

मूसा अ. यांनी बारा माणसे निवडली आणि त्यांना त्या शहरातील स्थिती पाहून येण्यास पाठविले...

जेव्हा हे लोक वापस आले, दोन माणसे सोडून बाकी सर्वांनी तेथील शत्रुंच्या सामर्थ्याविषयी भयानक कहाण्या सांगितल्या...लोक अस्वस्थ झाले आणि अशा कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यास नकार दिला... 

"आम्ही येथे बसू आणि वाट पाहू, मूसा.  तू आणि तुझा अल्लाह जावू शकतो आणि शत्रूशी लढू शकतो" , ते म्हणाले... मूसा अ. काहीच मदत करू शकत नव्हते...

मूसा अ. त्यांच्या या वागण्याच्या पद्धतीवर नाराज आणि रागावलेले होते...त्यांनी त्यांचे उरलेले आयुष्य, त्या लोकांना अल्लाहचा संदेश समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात खर्च केले... स्वतःची मदत कशी करायची आणि आळशी आणि भांडत राहणे, योग्य नाही, हे शिकवण्यात त्यांची शेवटची
वर्षे गेली...

मूसा अ. यांच्या मृत्युनंतर त्यांचा मित्र आणि अनुयायी "शिस्य" याने, त्याचे कार्य पुढे चालू ठेवले... मूसा अ. यांनी आधी, जे काही सांगितले होते, ते उपदेश त्याने तसेच देने चालू ठेवले...आणि बनी इस्राइलच्या लोकांना, वापस येण्यास आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्यास खूप प्रेरीत केले...

त्याने लढाई करण्यासाठी, त्या लोकांचे नेतृत्व केले...आणि त्यांना एका मागून एक खूप लढाया करावयास, त्यांचे नेतृत्व करत, घेऊन गेला...जोपर्यंत ते पुन्हा एकदा, त्यांच्या वचन दिलेल्या भूमीच्या दारात पोहोचत नाहीत...

शेवटचा विजय झाल्यावर, अल्लाहने त्यांच्या संदेशवाहकाकडून, त्यांना आदेश दिला की, शहरात विनम्रतेने...अल्लाहला वाकून आभार मानून एक प्रार्थना करत, प्रवेश करा...

त्यांनी या ऐवजी, फुशारकी मारत, त्यांचा विजय साजरा करत प्रवेश केला. त्यांनी, अल्लाहच्या कृपा आणि मदतीसाठी, ज्या अल्लाहने त्यांना, गुलामगिरीतून वाचवून, शांती आणि स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे त्यांना त्यांचे घर आणि जमीन वापस मिळाली, अल्लाहचे आभार मानत प्रार्थना केली नाही...

त्यांनी, जे शब्द त्यांना प्रवेश करतांना बोलावयास सांगितले होते, ते अल्लाहचे शब्द बदलले आणि त्या शब्दांची थट्टा उडविली...हे त्यांच्या मर्यादापेक्षा अती झाले होते...अल्लाहने या कृतघ्न आणि अवज्ञाकारी लोकांना भयंकर दंड दिला...


🌴🌴🌍मूसा अ. आणि खिझ्र अ.

खीझ्र अ. हे एक ज्ञानी माणूस होते...

जेव्हा मूसा अ. यांनी खिझ्र अ.यांच्या ज्ञानाविषयी ऐकले,  एका सहकाऱ्यासोबत त्यांना शोधण्यासाठी निघाले....आणि जोपर्यंत त्यांना ते भेटत नाही, तोपर्यंत विश्रांती घ्यायची नाही, असा निर्णय घेतला...

जेव्हा ते एका जागी पोहोचले जेथे दोन पाण्याचे प्रवाह (झरे), एका प्रवाहात एकत्र होऊन वाहत होते..., मूसा अ. खूप थकले आणि एका खडकावर गाढ झोपले...

तेथे, मासा जो त्यांनी त्यांच्या दुपारच्या जेवणासाठी आणला होता, जिवंत झाला आणि त्याने पाण्यात उडी मारली...आणि पोहत एक चंदेरी रेषा बनवत दूर गेला.... मूसा अ. यांच्या सहकाऱ्याने हे पाहीले पण याबाबत मूसा अ. यांना सांगण्यास विसरला...

त्यामुळे त्यांनी, जोपर्यंत मूसा अ. यांना भूक लागत नाही आणि ते, सहकाऱ्याला मास्याविषयी विचारत नाही, तोपर्यंत, त्यांचा प्रवास पुढेे तसाच चालू ठेवला.

त्यानंतर, सहकाऱ्याने मूसा अ. यांना जे घडले आहे ते सांगितले... मूसा अ. यांना त्या क्षणी वाटले की, त्यांना
खीझ्रकडे जाण्यासाठी, मार्ग दाखविण्यासाठी तो एक संकेत होता....

म्हणून ते वापस त्या जागी गेले, जेथे ते गाढ झोपले होते...आणि त्यांनाा, एक संतासारखे व्यक्ती त्याच खडकावर बसलेले दिसले...ते खीझ्र अ. होते....

मूसा अ. यांनी, त्यांना अभिवादन केले आणि म्हंटले, "जे अल्लाह खिझ्रच्या द्वारे मूसाला माहीत करवून देणार होते...ते जाणण्यासाठी मी आलो आहे..."

खिझ्र अ. म्हणाले, "अल्लाहने (ईश्वराने)
मला त्याच्या काही रहस्याचे ज्ञान दिले आहे....जे तुला माहीत नाही...तुला ते विचित्र वाटेल आणि त्यामुळे जेव्हा तू माझ्यासोबत असशील, तेव्हा तुला स्वतःला प्रश्न विचारण्यापासून थांबवणे, हे तुझ्यासाठी अवघड होईल..."

पण जेव्हा मूसा अ. यांनी वचन दिले की, ते संयमी राहील. खिझ्र अ. मूसा अ. यांना त्यांच्या सोबत घेऊन जाण्यास आणि शिकण्यास, या अटीवर की ते फक्त लक्ष देऊन पाहतील आणि कोणतेही प्रश्न विचारणार नाही, तयार झाले...

मूसा अ. खिझ्र अ. सोबत गेले...लवकरच ते एका नदीवर आले आणि खिझ्र अ. यांनी नदी पार करण्यासाठी, एक नाव भाड्याने घेतली...नावे वरील लोक खिझ्र अ. यांना ओळखत होते...आणि त्यांना नदी पार करवून देण्यासाठी, त्यांनी कोणतेही शुल्क घेतले नाही...

जेव्हा ते नदी पार करत होते, खिझ्र अ. यांनी, एक फळी तोडून, नावेत एक छिद्र केले.....हे जास्त विचित्र होते... मूसा अ. यावर नाराज झाले...आणि खिझ्र अ. यांना  म्हणाले, "या अशाप्रकारे, त्यांच्या दयाळुतेची तुम्ही भरपाई करणार आहात का? तुम्ही ते का केले?"

"मी तुला म्हटले नव्हते का, की कोणताही प्रश्न विचारायचा नाही?", खिझ्र अ. बोलले....

त्याच वेळेस एक पक्षी आला आणि नौकेच्या पुढच्या निमुळत्या भागावर बसला आणि एक थेंब पाणी पिला...तिकडे इशारा करून खिझ्र अ. म्हणाले, " अल्लाहच्या ज्ञानाशी तुलना करतांना, जे एका महासागरासारखे आहे, आपले ज्ञान त्या एका थेंबासारखे आहे..."

मूसा अ. यांना त्यांची चूक कळली, वचनाची आठवण करून, त्यांनी माफी मागितली, "मी पुढच्या वेळेस जास्त सावध राहील", ते म्हणाले.....

जेव्हा ते नदीच्या पलीकडे, शहरात पोहोचले आणि ते त्या शहरातून जात असताना, त्यांनी एका मुलाला पाहिले...काहीच खास कारण नसतांना खिझ्र अ. यांनी त्या मुलाला मारले.....

हे मूसा अ. यांच्यासाठी सहन करने खूप कठीण होते....ते त्यांचे वचन विसरले आणि त्यांनी रागाने विचारले, "त्या निरागस मुलाला तुम्ही का मारले?"

खिझ्र अ. यांनी काहीच उत्तर दिले नाही....त्यांनी फक्त मूसा अ. यांना त्यांच्या वाचनाची आठवण करून दिली...आणि म्हणाले, "जर तू पुन्हा एकदा तुझे वचन तोडले तर मी तुला सोडून जाईल"

मूसा अ. यांनी माफी मागितली...आणि वचन दिले की, पुन्हा प्रश्न विचारणार नाही...

लवकरच ते दुसऱ्या शहरात पोहोचले जेथे, कुणालाही आश्रय देण्यास नाखूष असे लोक होते....त्यांनी मूसा अ. आणि खिझ्र अ., या प्रवाश्यांना कोणतेही अन्न आणि निवारा दिला नाही...

खिझ्र अ. एका भिंतीजवळ आले, जी अगदी कोसळणारच होती... खिझ्र अ. यांनी ती भिंत, कामाचे काहीही पैसे न घेता दुरुस्त केली....

मूसा अ. यांना, ही निर्दयपनाच्या बदले, दयाळूता कळाली नाही....ते स्वतःला विचारण्यापासून थांबवू शकले नाही, "जर ते लोक आपल्याशी इतके निर्दयी राहिले, तर तुम्ही हे का केले? कमीत कमी त्यामुळे काही अन्न विकत घेण्यासाठी, तुम्ही काही पैसे घेऊ शकत होता"

"अरेरे", खिझ्र अ. म्हणाले, "तू संयम ठेऊ शकला नाही...आपण वेगळे होण्याची ही वेळ आहे...पण मी तुला सांगतो की मी का केले आणि मी काय केले"

"ती नाव ज्या मध्ये मी छिद्र पाडले, ती गरीब लोकांची होती, ज्यांनी त्यापासून त्यांच्या जीवनाचा उदरनिर्वाह मिळवला... नदीच्या पलीकडे राहणारा राजा खूप क्रूर आहे आणि सगळी चांगली चालणारी नावे जबरदस्तीने घेऊन टाकतो....त्याने ती नाव ही घेतली असती...म्हणून मी त्यात छिद्र पाडले..."

"पण तुम्ही त्या मुलाला का मारले?" मूसा अ. यांनी विचारले...

"मी त्याला मारले कारण त्याचे माता पिता खूप साधे आणि सद्गुणी लोक आहेत," खिझ्र अ. म्हणाले,      "पण तो एक खूप दुष्ट व्यक्ती म्हणून मोठा होणार होता...आणि त्यांचे जीवन दयनीय करणार होता....यामुळे ते नाराज झाले असतील पण या वेदना आणि दुःख खूप कमी आहे, त्यापेक्षा जेव्हा तो मोठा होऊन एक पापी बनला असता आणि तेव्हा त्यांना जे सहन करावे लागले असते....अल्लाह लवकरच त्यांना दुसरा मुलगा देईल जो त्यांच्या वृद्धापकाळात एक आनंद देईल"

"शेवटच्या कृत्य काय होते? तुम्ही ती भिंत का नीट केली, त्या लोकांनी आपल्याला इतका निर्दयपना दाखवूनही," मूसा अ. म्हणाले....

"बरं, मी तसे केले कारण त्या भिंतीखाली, दोन अनाथ मुलांच्या मालकीचा खजिना लपलेला आहे..." खिझ्र अ. म्हणाले, "त्यांचे पिता खूप सद्गुणी मनुष्य होते...आणि ही अल्लाहची इच्छा आहे की, जेव्हा ही मुले मोठी होतील, तेव्हा खजिना शोधून काढतील..."

मूसा अ. समोर हे सर्व स्पष्ट केल्यानंतर खिझ्र म्हणाले, " लक्षात घे, मी स्वतःहून काहीही केलेले नाही, ही सर्व अल्लाहची इच्छा होती..."

मग खिझ्र अ. मुसा अ. यांना, आश्चर्यचकित सोडून निघून गेले...आणि ते, या विचारांत हरवून गेले, की अल्लाहच्या रहस्यांविषयी मनुष्याला किती कमी माहीत आहे...खरंच प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि एकट्या अल्लाहला सर्व माहीत आहे...

कुरआन च्या बोधकथा..3 युसूफ अ. आणि त्यांचे स्वप्न

🌷युसूफ अ. आणि त्यांची इमानदारी, श्रद्धा, संयम🌷

साधारणतः 2000 BC म्हणजे 4000 वर्षांपूर्वी ची ही एक सत्यकथा आहे. जी कुरआन मध्ये वर्णन केलेली आहे.

प्रोफेट याकूब अ.(Jacob), ज्यांना इस्राईल ही म्हंटले जाते, हे खूप अल्लाह निष्ठ  (ईश्वर निष्ठ) आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्ती होते आणि एक अल्लाह (परमेश्वर)चा संदेश लोकांपर्यंत पोहोचविणारे होते..

त्यांना वेगवेगळ्या पत्नींपासून बारा मुले होती...सगळ्यात लहान पुत्र होते, युसुफ अ.(Joseph) आणि बनी अमीन...


याकूब अ. सर्व मुलांमध्ये, त्याच्या सगळ्यात लहान मुलावर युसुफ अ. यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करायचे...

एक दिवस युसुफ अ. यांना स्वप्न पडले की सूर्य, चंद्र आणि अकरा तारे त्यांना वाकून प्रणाम करीत आहेत..त्यांनी हे स्वप्न त्यांच्या पित्याला वर्णन केले..त्यांचे पिता त्यांना म्हणाले की, "तू ह्या स्वप्नाबद्दल तुझ्या मोठ्या भावंडांना काहीही सांगू नकोस..कारण त्यांना ईर्ष्या होऊन ते तुला नुकसान करण्याचा प्रयत्न करतील."...त्यांच्या पित्याने हे ही सांगितले की, युसुफ अ. यांच्यावर अल्लाह (ईश्वर) चे आशीर्वाद असतील..आणि ते ही अल्लाहचे संदेश सर्वांना पोहोचवतील...

युसुफ अ. यांचे सावत्र भाऊ, युसुफ अ. यांच्यावर खूप ईर्ष्या...कारण त्यांचे वडील याकूब अ. त्यांच्यावर खूप प्रेम करायचे..एक दिवस ते सर्व भाऊ त्यांच्या वडिलांजवळ गेले आणि म्हणाले, "आम्ही बाहेर जात आहोत...तुम्ही आमच्यासोबत युसुफला पाठवाल का?..आम्ही त्याची चांगली काळजी घेऊ..तो आमच्यासोबत प्रवास करेल, खाईल, पियील आणि खेळेल...तुम्ही त्याला आमच्यासोबत   ठेवण्यासाठी विश्वास करत नाही का?..."

याकुब अ. यांना त्यांच्या वाईट हेतू ची भनक लागली...ते म्हणाले, मला भीती वाटते की लांडगा युसुफ वर आक्रमण करेल"...

पण त्या सगळ्या भावांनी त्यांना पटवून दिले आणि हमी दिली की, ते त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतील..त्यामुळे भरलेल्या अंतःकरणाने याकूब अ. यांनी युसुफ अ. यांना, त्यांच्या सोबत  जाऊ दिले...

जेव्हा ते सर्व जण जंगलात होते, तेव्हा मोठ्या भावांनी युसुफ अ. यांना एका कोरड्या, जुन्या विहिरीत फेकले... 

ते सर्व जण रडत घरी आले आणि त्यांच्या वडिलांना म्हणाले की, "लांडग्याने खरेच युसुफ वर आक्रमण करून, त्याला मारले."...त्यांनी युसुफ अ. यांचा रक्ताळलेला सदरा, त्यांची मन गढंत कहाणी सिद्ध करण्यासाठी  व दाखविण्यासाठी, वापस आणला होता.. 
याकूब अ. यांनी पाहिले की, तो सदरा अजिबात फाटला नव्हता..त्यांना त्याच वेळी सगळे समजले की, नक्की काय घडले असावे ..आणि ते खूप दुःखी झाले... 

ते म्हणाले, मला माहित आहे, हे खरे नाही..पण मी काही तक्रार करणार नाही आणि धीर सोडणार नाही..मी फक्त माझ्या अल्लाहला मदत मागेल.. लवकरच एक तांडा (काफिला, राहण्याची सामान असलेल्या गाड्या), ज्या इजिप्त (मिस्र) कडे जात होत्या, त्या विहिरीजवळून जात असतांना पाणीसाठी थांबल्या, ज्यात युसुफ अ. यांना फेकले गेले होते. त्यांना युसुफ अ. विहिरीत दिसले... 

ते त्यांना पाहून खूप आनंदी झाले, त्या दिवसांत सेवकांची खरेदी आणि विक्री करणे, एक साधारण प्रथा होती..आणि ते ही, एक चांगला तरुण युसुफ अ. सारखा मुलगा इजिप्त मध्ये विकून, त्यांना एक चांगली रक्कम मिळाली असती... 

इजिप्त (मिस्र) च्या सेवकांच्या बाजारातून, अजीज नावाच्या एका माणसाने , जो इजिप्त च्या एका शाही कुटुंबाचा सदस्य होता आणि इजिप्तच्या सेनेचा, सैन्य अधिकारी होता, युसुफ अ. यांना विकत घेतले..आणि त्याला घरी आणले..आणि त्याच्या बायकोला जुलेखाला म्हटले की, "युसुफ ला सन्मानाने वागव..तो आपल्यासाठी चांगले नशीब घेऊन येईल..आणि आपण त्याला एका मुलाप्रमाणे दत्तक घेऊ शकू."... 
युसुफ अ. मोठे होऊन, खूपच देखणे तरुण झाले... अजीज त्यांच्यावर खूप दया करायचा.. त्यांच्यावर प्रेम करायचा. 

घराच्या सर्व आर्थिक कारभाराची जबाबदारी त्याला दिली होती..अजीजची सुंदर बायको युसुफ अ. यांच्याकडे आकर्षित झाली.. एक दिवस युसुफ अ. खोलीत एकटे असताना, जुलेखा त्यांना पटवू लागली...युसुफ अ. मानले नाही..ते एक विनम्र आणि अल्लाहला घाबरणारे तरुण होते...त्यांना त्यांच्या मालकाला अजीजला अपमानित करायचे नव्हते आणि अल्लाहची अवज्ञा करायची नव्हती..त्यांनी अल्लाहची प्रार्थना केली..आणि अल्लाहने त्यांना मदत केली...आणि तेथून सुटून जाणे त्यांना जमले.. 

त्यांनी दरवाजा उघडला आणि खोलीच्या बाहेर पळण्याचा प्रयत्न केला.. जुलेखा त्याच्या मागे पळाली आणि तिने त्यांचा सदरा ओढून मागे खेचले.. सदरा फाटला.. जुलेखाचा पती अजीज आणि जुलेखाचा चुलत भाऊ, जे दाराच्या बाहेर येवून उभे होते, त्यांनी दोघांना बाहेर येताना पाहिले... 

आता तिने जे केले त्याची  लाज वाटण्याऐवजी, तिने युसुफ अ. यांना दोष दिला.."या माणसाला तुरुंगात पाठविले पाहिजे, मला नुकसान पोहोचविल्याबद्दल" असे तिने तिच्या पतीला सांगितले..

युसुफ अ. यांनी, हे अमान्य केले आणि त्यांनी, जे काही खरे घडले ते अजीजला सांगितले...दोन वेगवेगळे कथन होते...अजीजला कुणावर विश्वास ठेवावा, युसुफ अ. वर की जुलेखा वर कळत नव्हते..

जुलेखाचा चुलत भाऊ खूप हुशार होता..तो म्हणाला, "जर युसुफचा सदरा पुढून फाटला असेल, तर जुलेखा खरी आहे आणि जर सदरा मागच्या बाजूने फाटला, तर जुलेखा खोटे बोलत आहे आणि युसुफ निरागस आहे.."

युसुफ अ. चा सदरा मागून फाटला होता (कारण जुलेखाने त्यांना थांबवण्यासाठी मागून ओढले होते)..यामुळे युसुफ अ. यांची निरागसता सिद्ध झाली होती... 

अजीजला क्षणात कळाले की काय घडले..त्याने युसुफ अ. यांच्यावर विश्वास केला आणि त्याच्या बायकोला युसुफ अ. यांची क्षमा मागायला सांगितली..अजीजने युसुफ अ. ची माफी मागितली आणि जे झाले ते, विसरून जायला सांगितले...

पण जुलेखा विसरली नाही...तिला अपमानित झाल्यासारखे वाटले आणि  तिची हार झाल्यामुळे तिला राग आला..

हळू हळू बातमी महिलांमध्ये पसरली..आणि त्या गप्पा करू लागल्या की, जुलेखा एका सेवकावर आकर्षित झाली... जेव्हा जुलेखाने ऐकले, तेव्हा तिने सर्व महिलांना एका मोठ्या आणि छान मेजवानीसाठी तिच्या घरी आमंत्रित केले..तिला त्यांना दाखवायचे होते युसुफ अ. ज्यांच्याकडे ती आकर्षित झाली होती, हा कुणी साधारण व्यक्ती नव्हता...तो विलक्षण देखणा तरुण होता..इतका देखणा की, कोणीही त्याच्याकडे आकर्षित होण्यापासून, स्वतःला रोखू शकत नव्हते ...

त्या सगळ्या महिला जेवणासाठी बसल्या आणि त्यांच्या हातात फळे कापन्यासाठी चाकू दिलेला होता.. जुलेखाने युसुफ अ. यांना बोलावले..जसे युसुफ अ. त्या खोलीत आले...महिला त्यांच्या चकाकत्या रूपाकडे पाहतच राहिल्या..आणि त्यांनी फळे कापण्याऐवजी स्वतःची बोटे कापून घेतली...

त्यानंतर त्यांनी जुलेखाकडे पाहून म्हटले की, तू खरी आहेस..तो साधारण मनुष्य नाही..तो इतका चांगला दिसतो की जसा एक स्वर्गदूत... 

जुलेखा त्यांना म्हणाली, जर तो, मी जे सांगितले ते करण्यास मानला नाही, तर माझ्या आज्ञेनुसार त्याला तुरुंगात जावे लागेल, कारण तो एक सेवक आहे आणि मालकिणीची आज्ञा न मानणे हा त्याच्यासाठी अपराध आहे. (मालकाची आज्ञा न पाळणे, हा त्याकाळी अपराध समजला जायचा, कारण सेवकाला, काही नाणी, देऊन विकत घेतलेले असायचे.)

युसुफ अ. यांनी जुलेखाचे ऐकून काही चुकीचे करण्याऐवजी,  तुरुंगात जाणे पत्करले आणि महिलांच्या सांगण्यावरून, ते निरपराधी असताना देखील, त्यांना तुरुंगात टाकले गेले.

युसुफ अ. जेव्हा तुरुंगात होते, त्याच तुरुंगात एक आचारी आणि शाही दरबाराचा एक साकी (मद्य देणारा) त्याचे सहकारी कैदी होते...

एक दिवस ते युसुफ अ. जवळ आले आणि त्यांना पडलेले स्वप्न त्यांनी वर्णन केले..आचारीला स्वप्न पडले होते की तो एक नान (मोठा गोल ब्रेड, भाकरी किंवा पोळी) त्याच्या डोक्यावर घेऊन जात आहे..आणि पक्षी त्यातून ते खात आहेत...साकी ला स्वप्न पडले होते की, तो अंगुर पासून वाईन (मद्य) बनवत आहे...

अल्लाहने युसुफ अ. यांना आशीर्वादासह प्रतिभा दिली होती, त्यामुळे ते स्वप्नांचा अर्थ सांगू शकत होता...त्यांच्या सहकारी कैद्यांना ते म्हणाले, "मी तुमच्या स्वप्नांचे अर्थ सांगेन... जे मला अल्लाहने शिकविले आहे, त्यातलाच हा एक भाग आहे..."

मग युसुफ अ. यांनी दोघांना सांगितले की, आचारीला फाशी दिली जाईल आणि पक्षी त्याचे डोके खातील..आणि साकी सोडून दिला जाईल...आणि राजाला दरबारात वाईन म्हणजे मद्य देण्यासाठी नियुक्त केला जाईल..युसुफ अ. यांनी साकी ला, जेव्हा तो दरबारात जाईल तेव्हा, त्याच्या विषयी (युसुफ अ. विषयी) राजाशी बोलण्यास सांगितले...

पण साकी तुरुंगातून सुटल्यानंतर युसुफ अ. बद्दल सर्व विसरून गेला..आणि युसुफ अ. तुरुंगात काही अजून वर्ष तसेच राहिले..

एक दिवस राजाला एक स्वप्न पडले...राजाने पाहिले की, सात अशक्त गायी, सात जाड (धष्ट पुष्ट) गायींना खात आहेत...त्याने सात कोरडे आणि सात हिरवे मक्याचे कणीस पाहिले...

राजाने दरबारातील लोकांना विचारले की कुणी स्वप्नांचा अर्थ सांगू शकेल का?.. 
त्यानंतर साकीला युसुफ अ. आठवले...जे अजूनही तुरुंगात होते..त्याने राजाची आज्ञा घेतली आणि युसुफ अ. यांना भेटण्यासाठी गेला... त्याने राजाचे स्वप्न युसुफ अ. यांना सांगितले..

त्याच्यावर राग न करता आणि त्याच्याविषयी राजाशी लवकरच बोलण्यास सांगून, युसुफ अ. यांनी, त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला..."जमिनीत सात वर्ष मकाचे पीक खूप जास्त होईल...त्यामुळे तुम्हाला जेवढे आवश्यक आहे, तेवढे खा आणि बाकीचा मका सुरक्षित स्थळी ठेवा..त्यानंतर सात वर्ष खूप भयानक दुष्काळ येईल..त्या वर्षांत पाऊस होणार नाही आणि मका येणार नाही...जे तुम्ही जमा करून ठेवलेले मक्याचे दाणे आहेत त्यातून खा..त्यानंतर त्यापुढचे  वर्ष खूप पाऊस होईल आणि त्यानंतर पिकाची कापणी...." 

जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो खूप आनंदी झाला आणि राजा त्या व्यक्तीला भेटण्यासाठी इच्छुक झाला, ज्याने स्वप्नाचा अर्थ सांगितला होता...युसुफ अ. यांच्याकडे सैनिकांना पाठविण्यात आले...पण युसुफ अ. यांनी तुरुंग सोडण्यास नकार दिला, कारण त्यांना राजाला जाणीव करून द्यायची होती की, त्याला अन्यायपूर्वक बंद केले गेले होते...

त्यामुळे राजाने, त्या महिलांशी, ज्यांनी स्वीकार केले की, "युसुफ हा निरागस आणि सदाचारी आहे", योग्य चौकशी करवून घेतली...आणि न्याय केला.

त्यानंतरच युसुफ अ. तुरुंगातून बाहेर येण्यास तयार झाले.. आता युसुफ अ. यांना सन्मानाने राजाच्या दरबारात नेण्यात आले. राजा आधीच युसुफ अ. यांच्या ज्ञान, हुशारी, निष्ठा, इमानदारी आणि पुण्य यांनी प्रभावित होता...राजाने इच्छा केली की, "युसुफ त्याचा प्रमुख सल्लागार बनावा."...युसुफ अ. यांनी सुचविले की, त्यांना धान्याचा साठा करने आणि धान्याचे व्यवस्थापन करणे, याची जबाबदारी द्यावी...

राजा मानला आणि युसुफ अ. यांना, याचा पूर्ण अधिकार दिला.. अशा प्रकारे अल्लाहने युसुफ अ. यांना, त्यांच्यातील सदगुणामुळे, दरबारात
एक पद आणि स्थान देऊन, बक्षीस दिले ज्यासाठी ते योग्य होते... पुढे, जेव्हा आजूबाजूच्या जमिनीत दुष्काळ (धान्याची कमी) होती, इजिप्तमधील जनतेला खाण्यासाठी अजूनही पुष्कळ अन्न होते..हे सगळे युसुफ अ.च्या, देशाच्या, खाद्य राखीव संग्रहातील, चांगल्या व्यवस्थापनामुळे होते..शेजारील देशातून लोक अन्नासाठी इजिप्त मध्ये येत होते..

सगळीकडे खूप वाईट दुष्काळ पसरला आणि इजिप्तच्या, जवळचे आणि दूरचे लोक इजिप्तमध्ये आले...त्यामध्ये युसुफ अ. यांचे सावत्र भाऊ ही कानान  (सध्याचे पॅलेस्टाईन) वरून आले होते..

युसुफ अ. यांनी जरी त्यांच्या भावांना पाहता क्षणी ओळखले होते, तरी भावांनी त्यांना ओळखले नव्हते...युसुफ अ. यांनी, त्यांना पुढच्या वेळेस येताना त्यांच्या सर्वात लहान भावाला (बनी अमीन जो युसुफ अ. यांचा सख्खा भाऊ होता) घेऊन येण्यास सांगितले..नाहीतर पुढच्या वेळी धान्य मिळणार नाही...

भाऊ घरी त्यांच्या वडीलांजवळ, याकूब अ. यांच्याजवळ गेले आणि जे काही झाले ते सांगितले..आणि म्हंटले की, आमच्यासोबत बनी अमीन ला पाठवा...आम्ही वाचन देतो की, आम्ही त्याची काळजी घेऊ आणि येताना जास्त धान्य आणू..

पण याकूब अ., युसुफ अ. यांच्या भावांनी, जे युसुफ अ. सोबत केले होते ते विसरला नव्हते आणि त्यांची बनी अमीन ला त्यांच्यासोबत पाठवायची इच्छा नव्हती..

त्यांच्यावर दुसऱ्या वेळेस विश्वास ठेवण्यासाठी ते अजिबात इच्छुक नव्हते...तरीसुद्धा जेव्हा भावांनी जोर दिला आणि अल्लाहची शपथ घेतली की, ते बनी अमीन ची पूर्ण जबाबदारी घेतील...याकूब अ. यांनी, बनी अमीन ला जावू दिले...

जेव्हा ते सर्व भाऊ जात होते, तेव्हा याकूब अ. यांनी  त्यांना, इजिप्त मध्ये प्रवेश करताना शहराच्या वेगवेगळ्या दरवाजाने प्रवेश करायचा सल्ला दिला..

सर्व भाऊ, बनी अमीन सोबत इजिप्तसाठी निघाले..पूर्ण रस्ता मोठ्या भावांनी बनी अमीन ला टोमणे मारले आणि चिडविले..जेव्हा ते इजिप्तला पोहोचले आणि युसुफ अ. जवळ गेले, युसुफ अ. यांनी त्यांच्या सख्ख्या भावाला लगेच ओळखले आणि त्याला एकांतात, स्वतः विषयी सांगितले..

त्यांनी हे ही सांगितले की, मोठे भाऊ ज्या पद्धतीने वागवीत आहेत, त्याची यापुढे काळजी करायची आवश्यकता नाही...

जे अन्न धान्य ते विकत घेण्यासाठी आले होते ते त्यांनी दिले , पण जाण्याआधी एक चांदीची वाटी युसुफ अ. यांनी बनी अमीन च्या उंटावरील पिशवीत ठेवली.. 

भाऊ जसे निघणार, तेव्हा राजाच्या सेवकांना राजाची चांदीची वाटी हरवल्याचे आढळले...त्यांनी तांडा (काफिला, उंटाच्या गाड्या) थांबवला आणि त्यांच्या समानांत शोधले.. वाटी बनी अमीन च्या उंटावरील पिशवीत सापडली... 

हा इजिप्त चा कायदा होता की, कोणताही चोर, जिथे त्याने गुन्हा केला, ते शहर सोडून जाऊ शकत नव्हता...त्यामुळे बनी अमीन ला जाण्याची आज्ञा नव्हती...
हेच युसुफ अ. यांना पाहीजे होते...यामुळे युसुफ अ. यांना, त्यांच्या लहान भावाला, त्यांच्या जवळ ठेवण्यासाठी निमित्त मिळाले होते...बनी अमीन ला ही हे कळले होते...

पण त्याचे मोठे भाऊ अत्यंत चिंता करू लागले..कारण त्यांनी त्यांच्या पित्याला याकूब अ. यांना, बनी अमीन ला सुरक्षित वापस आणण्याचे वचन दिले होते...त्यांनी युसुफ अ. यांच्याकडे विनवणी केली की, "बनी अमीन ला जावू  द्यावे आणि आमच्या पैकी एकाला त्याच्या जागी ठेवून घ्यावे"....

पण युसुफ अ. मानले नाही. "हे चूक आहे की ज्याने गुन्हा केला, त्याच्या ऐवजी दुसऱ्या कुणाला ठेवून घ्यावे...". भाऊ यावर खूप उदास झाले होते...

सर्वात मोठा भाऊ म्हणाला, "मी माझ्या वडिलांना बनी अमीन बद्दल  शब्द दिला आहे..मी त्याच्या विना जाणार नाही..जोपर्यंत अल्लाह याविषयी काही ठरवत नाही.."

बाकीचे सर्व भाऊ घरी गेले आणि त्यांच्या वडिलांना सगळी कहाणी सांगितली, "तुमचा मुलगा चोर आहे, हे सगळे त्याच्यामुळे घडले..."

याकूब अ. हे विश्वास करण्यासाठी तयार नव्हते. "हे अशक्य आहे..बनी अमीन कधीही चोरी करणार नाही...पण जरी मी, त्याच्यासाठी काही करू शकत नसलो, तरी मी धीर धरेन आणि तक्रार करणार नाही..."

याकूब अ. यांनी, त्यांचे दिवस आणि रात्र दुःखात आणि प्रार्थना करण्यात घालविले...ते इतके रडले की, त्यांची दृष्टी गेली..पण त्यांनी धीर सोडला नाही...

त्यांची मुले त्यांच्यावर नाराज झाली आणि ते सर्व म्हणाले, "जर तुम्ही रडणे थांबवले नाही, तर तुम्ही असेच मरून जाल..."

"मी तुम्हाला काहीच म्हणत नाही...मी फक्त माझ्या अल्लाहला मदत मागत आहे...आणि त्यांच्यातर्फेच मदत मिळेल, तुमच्याकडून नाही" याकुब अ. बोलले... 

मग याकूब अ. यांनी, त्यांच्या मुलांना वापस इजिप्तला जावून युसुफ अ. आणि बनी अमीन ला बघून येण्यास सांगितले आणि आशा सोडली नाही...

भाऊ  युसुफ अ. जवळ तिसऱ्या वेळेस गेले आणि म्हणाले, "आम्ही वापस आलो कारण आमची गरज आहे...आमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत, तरी कृपा करून आम्हाला आमच्या कुटुंबासाठी धान्य द्या.आमच्यावर दया दाखवा..आम्ही तुमचे खरेच खूप आभारी राहू.." युसुफ अ. यांना, त्यांच्या कुटुंबाची दशा ऐकून खूप वाईट वाटले..

पण युसुफ अ. यांना, त्यांच्याशी केलेल्या त्यांच्या  निर्दयीपणाची  आठवण करून द्यायची होती. "आठवा, तुम्हाला एक भाऊ होता का...युसुफ?..त्याच्याशी तुम्ही काय केले?"

तेव्हा त्यांना जाणीव झाली की, हा चांगला माणूस खरंच त्यांचा भाऊ, युसुफ आहे...ज्याला त्यांनी विहिरीत फेकून दिले होते....

"तू खरच युसुफ आहे का?" त्यांना विश्वास बसत नव्हता आणि स्वतःची लाज ही वाटत होती...

"हो" युसुफ अ. यांनी उत्तर दिले...

"खरंच आम्ही चुकलो...आम्हाला माफ कर." भाऊ म्हणाले...

युसुफ अ. यांनी, त्यांना माफ केले..आणि अल्लाहला प्रार्थना केली की, त्यांच्यावर कृपा दृष्टी व्हावी...

मग युसुफ अ. यांनी, त्यांच्या पूर्ण कुटुंबाला इजिप्तमध्ये आणण्यास सांगितले...युसुफ अ. यांनी, त्याच्या वडिलांसाठी, त्यांचा सदरा दिला आणि म्हटले की, "हा सदरा त्यांच्या डोळ्यावर लावा...आणि त्यांची दृष्टी परत येईल.."

कानानला, तांडा (उंटाच्या गाड्या) वापस येण्याआधीच याकूब अ. म्हणाले की, "हवेत युसुफ अ. च्या असण्याचा आभास होत आहे..". लोक बोलत होते की, "खरंच तुमचे डोके काम करीत नाही...हे कसे शक्य आहे, जर युसुफचे काहीच शिल्लक राहिले नाही?" 

पण याकूब अ. यांना खात्री होती की, त्यांचा मुलगा जिवंत आहे...

लवकरच त्यांची मुले युसुफ अ. बद्दल चांगली बातमी घेऊन घरी पोहोचले...आणि त्यांचा सदरा, त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर ठेवला...याकूब अ. यांना  लगेच दृष्टी वापस मिळाली आणि ते म्हणाले, "मी म्हणालो नव्हतो का की, जे अल्लाहकडून मला कळले, ते तुम्हाला कळले नाहीे..मी अल्लाहला तुम्हाला माफ करण्यासाठी प्रार्थना करेल..."

नंतर  पूर्ण कुटुंब इजिप्त ला गेले...युसुफ अ. आता इजिप्त चे राजा बनले होते...ते त्यांना घेण्यासाठी शहराच्या दरवाजा पाशी आला..त्यांनी त्यांच्या पित्याला खूप आदराने आणि सन्मानाने, त्याच्या दरबारात संरक्षण दिले. जेव्हा युसुफ अ. त्यांच्या सिंहासन वर चढले, तेव्हा त्यांच्या कुटुंबासह सर्वांनी त्यांना वाकून प्रणाम केला...

आणि अशा प्रकारे त्याचे बालपणाचे स्वप्न खरे झाले की, त्याचे आईवडिल आणि अकरा भाऊ, जे स्वप्नात सूर्य,चंद्र आणि तारे होते, ते त्याला वाकून प्रणाम करीत होते... 
================================
*याकूब अ.,युसुफ अ.,इब्राहीम अ. आणि लूत अ. हे हिब्रू भाषा बोलत होते व ते अल्लाहला  यहोवा (yahweh) या नावाने संबोधित करत होते. मुहम्मद स. अ. व. यांच्यावर कुरआन प्रकट झाल्यानंतरचे अल्लाह हे संबोधन अरबी भाषेत कुरआनमध्ये आहे. 
विश्वाचा निर्माता एकच आहे...भाषा वेगळ्या त्यामुळे संबोधन वेगळे आहे...इस्लाम धर्माचे लोक इब्राहीम अ. आणि मूसा अ. (Moses) यांनाही मानतात आणि ईसा अ.( येशू) यांनाही मानतात, ज्यामुळे अनुक्रमे ज्यू (यहुदी) आणि ख्रिश्चन धर्म आले. मूसा अ. यांच्यावर तौरात (Torah) आणि ईसा अ. यांच्यावर इंजील (बायबल) हा ग्रंथ प्रकट झाला. तौरात, बायबल आणि कुरआन मध्ये जवळ जवळ सारख्याच प्रोफेट्स च्या सत्यकथा आणि बोधकथा आहेत...आणि संदेश आहे...पण कुरआन हा मूळ ग्रंथ आहे, ज्यात काहीही बदल झालेला नाही.

08. मूसा अ. आणि फिरौंन

मूसा अ. आणि फिरौंन  (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...