गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१
जिब्राईल (Alaihissalam), प्रेषित मुहम्मद (Sallallahu Alaihi Wassallam) शी बोलले ?
बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१
ताबूत सकीना
🌐📗मृत्यू ला घाबरून पलायन
"बनी इस्राइलचे लोक", जे प्रोफेट मूसा अ. यांचे अनुयायी होते, इजिप्त (मिस्र) या देशाला सोडून, खूप लांब प्रवास करून, "सिना" या ठिकाणी पोहोचले.
हे ठिकाण, त्यांना ज्या त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीचे वचन दिले गेले होते, त्याच्याजवळच होते. [आधीचे "कानान" (canaan) फिलिस्तीन, palestine]
मूसा अ. यांनी त्यांना म्हंटले की, त्यांच्या पूर्वजांच्या शहरात प्रवेश करण्यासाठी आणि त्यांची गेलेली जमीन आणि संपत्ती मागण्यासाठी, स्वतःला तयार करा,
मूसा अ. यांनी म्हंटले, की धैर्याने, आणि अल्लाह वरच्या कणखर निष्ठेने, जमिनीत प्रवेश करा. जर असे कराल तर, विजय त्यांचाच होईल, असे आश्वासन दिले…
त्यांनी शहरात प्रवेश करण्यास नकार दिला…मूसा अ. यांनी बारा माणसे निवडली आणि त्यांना त्या शहरातील स्थिती पाहून येण्यास पाठविले…
जेव्हा हे लोक वापस आले, दोन माणसे सोडून, बाकी सर्वांनी तेथील शत्रुंच्या सामर्थ्याविषयी, भयानक कहाण्या सांगितल्या. लोक अस्वस्थ झाले आणि अशा कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यास नकार दिला.
"आम्ही येथे बसू आणि वाट पाहू, मूसा. तू आणि तुझा अल्लाह जावू शकतो आणि शत्रूशी लढू शकतो", ते म्हणाले.
मूसा अ. काहीच मदत करू शकत नव्हते.
मूसा अ. त्यांच्या या वागण्याच्या पद्धतीवर नाराज आणि रागावलेले होते…त्यांनी त्याचे उरलेले आयुष्य, त्या लोकांना अल्लाहचा संदेश समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात खर्च केले… स्वतःची मदत कशी करायची आणि आळशी आणि भांडत राहणे, योग्य नाही, हे शिकवण्यात त्यांचे बाकी आयुष्य गेले.
🍂🏵️शिस्य🏵️🍂
मूसाच्या मृत्युनंतर त्यांचा मित्र आणि अनुयायी "शिस्य" याने, त्याचे कार्य पुढे चालू ठेवले…मूसा अ. यांनी आधी, जे काही सांगितले होते, ते उपदेश त्याने तसेच देने चालू ठेवले…आणि बनी इस्राइलच्या लोकांना, वापस येण्यास आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्यास खूप प्रेरीत केले…त्याने लढाई करण्यासाठी, त्या लोकांचे नेतृत्व केले…आणि त्यांना एका मागून एक खूप लढाया करावयास, त्यांचे नेतृत्व करत, घेऊन गेला…जोपर्यंत ते पुन्हा एकदा, त्यांच्या वचन दिलेल्या भूमीच्या दारात पोहोचत नाहीत…
शेवटचा विजय झाल्यावर, अल्लाह ने त्यांच्या संदेशवाहकाकडून, त्यांना आदेश दिला की, "शहरात विनम्रतेने, अल्लाहला वाकून आभार मानून एक प्रार्थना करत, प्रवेश करा."
त्यांनी या ऐवजी, फुशारकी मारत, त्यांचा विजय साजरा करत प्रवेश केला. त्यांनी, अल्लाहच्या कृपा आणि मदतीसाठी, ज्या अल्लाहने त्यांना, गुलामगिरीतून वाचवून, शांती आणि स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे त्यांना त्यांचे घर आणि जमीन वापस मिळाली, अल्लाहचे आभार मानत प्रार्थना केली नाही. त्यांनी, जे शब्द त्यांना प्रवेश करतांना बोलावयास सांगितले होते, ते अल्लाहचे शब्द बदलले आणि त्या शब्दांची थट्टा उडविली. हे त्यांच्या मर्यादापेक्षा अती झाले होते…अल्लाहने या कृतघ्न आणि अवज्ञाकारी लोकांना भयंकर दंड दिला…
💖हरझाकील💖
मूसा अ. यांचा दुसरा अनुयायी हरझाकील ने सुद्धा बनी इस्राइलच्या लोकांना, अल्लाहने दिलेल्या संदेशाच्या मार्गावर लढत राहण्यास वारंवार प्रेरित केले.
एकदा त्याने खूप अडचणीने आणि एक पूर्ण फौज जमा केली. तो शत्रूवर एक खास आक्रमण करण्याची योजना करून होता. तेव्हा हजारो लोकांनी त्याला एकटे सोडले. ते पळून गेले आणि मरणापासून सुटका करण्यासाठी, एका दरीत लपून बसले. हरझाकिल, या भित्रेपणा आणि त्याला एकटे सोडून जाण्याची कृतीवर, इतका निराश झाला आणि दुखावला की, त्याने अल्लाहला प्रार्थना केली, अल्लाहने त्या पळून गेलेल्या लोकांना कठोर शिक्षा केली.
त्याच दरीत जेथे त्यांनी आश्रय घेतला होता, त्यांच्यावर मृत्यू आला. ते मृत झाले, जेथे ते जिवंत राहण्यासाठी आले होते…
काही दिवसांनंतर जेव्हा हरझाकिल त्या दरीतून गेला आणि त्याने त्या युद्धातून पळून गेलेल्यांचे भाग्य (विधिलिखित) पाहिले, त्याला खूप वाईट वाटले. त्याने पुन्हा अल्लाहची प्रार्थना केली, या वेळेस दयेसाठी प्रार्थना केली आणि अल्लाहने, जो सर्वांत मोठा क्षमा करणारा आहे, त्यांना त्यांचे जीवन पुन्हा वापस दिले, की ते पुन्हा अल्लाहकडे वळतील आणि कृतज्ञ राहतील आणि असा गुन्हा, पुन्हा करणार नाही…
🌷शामोल (samuel)
शामोल हे एक पवित्र व्यक्ती होते. त्यांनीही "बनी इस्राइल" च्या लोकांचे , शत्रूविरूध्द मार्गदर्शन आणि नेतृत्व केले. अल्लाहने त्यांना संदेशवाहक बनविले.
जेव्हा शामोल वृद्ध झाले, बनी इस्राइल त्याला म्हणाले,
"आम्हाला वाटते तू आम्हाला एक राजा निश्चित करून द्यावा, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि लढाईत आमचे नेतृत्व करण्यासाठी"
शामोल त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून म्हणाला, की ते सर्व खूप ज्ञानी नाहीत पण त्यांनी आग्रह धरला…
❤️💚💕ताबूत सकीना
ताबूत सकीना म्हणजेच The ark of the Covenant.
यामध्ये (पेटीत) मूसा (अ) आणि आणखी दुसऱ्या प्रेषितांचे (संदेश वाहकांचे) काही पवित्र अवशेष आहेत. सध्या ती पेटी अज्ञात जागी आहे.
लढाई करता वेळेस, बनी इस्राइलचे लोक या पेटीला स्वतःच्या सैन्यासमोर समोर, पुढच्या रांगेत ठेवायचे…आणि अल्लाह, त्यांना त्या पेटीच्या उज्ज्वल भविष्यसूचकतेच्या गुणांमुळे, विजय देत असे…
त्या प्रेषितांच्या अवशेषामुळे, ज्या प्रेषितांनी, अल्लाहच्या इच्छेने लोकांसमोर संदेशवाहक म्हणून स्वतःला प्रस्तुत केले, पुढे न पाहिलेल्या मदतीचे आश्वासन मिळायचे….
"ताबूत सकीना" मध्ये अल्लाहने मूसा अ. यांना "तूर" पर्वतावर जो ग्रंथ दिला, तो, एका शुभदगडाच्या (scripture) दोन भागावर अंतर्लिखित आहे, त्यात मूसा अ. यांना दिलेला कायदा म्हणजे नीतिशास्त्र आणि आराधना अंतर्लिखित केला गेला आहे, ज्याला "टेन कमांडमेंटस" असे म्हणतात, जे "तोराह" या ग्रंथात आहे. आणि मूसा अ. यांची पवित्र काठी आहे…
हा "ताबूत सकीना", शुभ मानला जातो
🌿🌿तलुत 🌿🌿
शामोल यांनी अल्लाह ला प्रार्थना केली आणि अल्लाहच्या आज्ञेने, बनी अमीनच्या जमातीतल्या "तलुत" ला, एक शक्तिशाली आणि देखण्या तरुण व्यक्तीला, त्यांचा शासक म्हणून नियुक्त केले…
बनी इस्राइलच्या लोकांना हे आवडले नाही कारण तलुत एक गरीब माणूस होता आणि तो त्यांच्या जमातितील नव्हता. त्यांनी त्याचा आदेश पाळण्यास नकार दिला.
शामोल यांनी, त्या लोकांना म्हंटले की, एक शासकाला त्याच्या कुटुंबावरून किंवा जन्मावरून नाही तर, वैयक्तिक गुणांवरून प्रशंसित करायला हवे. तलुत कडे एका चांगल्या राजाचे सर्व गुण आणि ज्ञान आहे, जे त्याला अल्लाह ने दिलेले आहे.
बनी इस्राइलच्या लोकांनी त्यांचा वाद चालू ठेवला. त्यांना काही तरी सत्याचा पुरावा पाहिजे होता की, तलुतला अल्लाह ने नियुक्त केले आहे.
शामोल यांनी त्यांना म्हंटले, की एक पुरावा म्हणून, ते "ताबूत सकीना" ची पेटी पुन्हा वापस मिळवतील. ज्यात मूसा अ. आणि हारून अ. यांचे अवशेष आहेत. जे ते गमावून बसले होते. ते म्हणाल की, फरिश्ते (स्वर्गदूत) त्या पेटीला वापस घेऊन येतील.
पॅलेस्टाईन (फिलिस्तिन) च्या लोकांनी ती पेटी असा विचार करून घेतली होती की, त्या पेटीला व्यवस्थित ठेवतील, हे त्यांच्यासाठी दुर्भाग्य ठरले. त्यांनी त्या पेटीपासून सुटका करण्याचा प्रयत्न केला. यासाठी ते दोन गायींच्या मागे गेले, ज्या त्यांना बनी इस्राइल च्या लोकांपर्यंत घेऊन आल्या आणि ते तेथे त्या पेटीला सोडून गेले.
त्यामुळे बनी इस्राइल च्या लोकांना त्यांची पेटी शाबूत वापस मिळाली. या पुरव्यानंतर त्यांना तलुत ला राजा म्हणून स्वीकार करावे लागले…
मंगळवार, १३ जुलै, २०२१
युनूसचाकुराणमध्येसंदर्भ
युनूसचाकुराणमध्येसंदर्भ
🐠🐟युनूस माशाच्या पोटात🦈🐬🐋🐳
98💙मग (मानवाच्या इतिहासात असे) कधीही घडले नाही की, एखाद्या जनसमुहाने (अल्लाहच्या) प्रकोपाला पाहून श्रद्धा धारण केली आणि त्यांची श्रद्धा त्यांच्यासाठी फायद्याची ठरली. याला अपवाद फक्त युनूसचा जनसमूह आहे. जेव्हा त्यांनी (अल्लाह च्या प्रकोपाला ओळखून) श्रद्धा धारण केली, तेव्हा आम्ही या जगात (त्यांच्यावर कोसळणारी) अवहेलनेची शिक्षा (त्यांच्यापासून) दूर केली.आणि आम्ही त्यांना एका कालावधीपर्यंत जीवनाचा उपभोग करण्याची संधी दिली.
[कुराण 10:98]
87💙आणि माशाने ज्याला गिळून घेतले होते त्या (युनुसची) आठवण करा, जेव्हा तो आपल्या लोकांशी क्रोधित होऊन त्यांच्यापासून निघून गेला. त्याला वाटले होते की, (याविषयी) त्याची आमच्याकडून पकड केली जाणार नाही. मग ( त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली) त्याने त्या अंधकारातून आम्हाला हाक दिली. '(हे अल्लाह!) तुझ्याशिवाय कोणीच पूजनीय नाही, असीम आहे तुझी महिमा, खरोखर मीच अत्याचारी कृत्य केले आहे!' 88💙 तेव्हा आम्ही त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याची दुःखातून मुक्तता केली.अशाच प्रकारे आम्ही सच्च्या श्रध्दा वंतांना वाचवित असतो.
[कुराण 21:87-88]
139💙तसेच युनूस हा देखील पैगंबरांपैकी एक होता.140💙जेव्हा तो (आपल्या लोकांपासून) धावत जावून भरलेल्या नौकेवर पोहोचला.141💙मग नौकेंवाल्यांनी चिठ्ठ्या टाकल्या (तेव्हा त्यात पुन्हा - पुन्हा त्याचेच नाव निघाले ) तर त्यांनी त्याला (समुद्रात) फेकून दिले.142💙 मग (एका) माशाने त्याला गिळून टाकले. तेव्हा तो स्वतःला दोष देऊ लागला. (तेव्हा त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली.)143💙जर तो (अल्लाहचे) स्तुतिगान करणाऱ्यांपैकी नसता 144💙तर तो पुनरूत्थानच्या दिवसांपर्यंत माशाच्याच पोटात राहिला असता. 145💙मग आम्ही (त्याला माशाच्या पोटातून काढून समुद्रकिनाऱ्यावर) खुल्या मैदानात टाकून दिले.तेव्हा तो अगदी कासावीस होऊन गेला होता.146💙मग आम्ही (तिथे) त्याच्यापाशी एक वेलीचे झाड उगवले.147💙आणि नंतर आम्ही त्याला (पुन्हा एकदा) एक लाख किंवा त्यापेक्षा काही जास्तच लोकांकडे (पैगंबर म्हणून) पाठविले.148💙तेव्हा त्या लोकांनी श्रध्दा धारण केली. म्हणून आम्ही त्यांना काही काळ (या जीवनाचे) लाभ उपभोगू दिले.
[कुराण 37:139-148]
08. मूसा अ. आणि फिरौंन
मूसा अ. आणि फिरौंन (*या सत्य कथे युसुफ अ. ची सत्यकथा वाचावी.) इजिप्तचे लोक, एक अल्लाह मध्ये विश्वास करत नव्हते…त्यामुळे ते, बनी इस्राइल च्...